Sunday, April 12, 2020

सरपास

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

SarPass (Himalayan), May-2019

Slides
special attraction of this adventure.. (we'll shortly come to that)

आधीचे २ दिवस (day -1, day 0) कासोल base camp च्या आसपासच सराव करून ह्या अविस्मरणीय adventure चा श्रीगणेशा झाला.. अर्थातच त्या वेळेस हा अविस्मरणीय वगैरे काही नसून, blogs 🗒️ मधून जसा अनुभवता येईल तसा काल्पनिक 🤔 होता..

पहिल्या २ दिवसांचा (day 1, day 2) अनुभव सह्याद्री हून तसा फार वेगळा नव्हता.. निसर्गाचा आस्वाद घेत Padri camp ला घेतलेले काही फोटो आणि त्यामागची choreography 🕺 सोबत attach केली आहे..


credits: Mahesh


तिसरा दिवस कसोटीचा होता.. थोडा पाऊस 🌧️, भरपूर ऊन 🌤️, जंगल, चिखल आणि सोबतीला altitude.. आम्ही सगळेच थोडेफार जास्त प्रमाणात सांडलो 😉.. काहींचे हात सुजले, कोणाला रडूच आवरेना, तर सगळ्यांनाच आजच्या निसरड्या वाटेचा कंटाळा.. थोड्याच वेळात आजचा lunch spot आला.. आणि view 🏔️ बघता it's all worth it वाली feeling.. क्षणात सारं विसरून, होत्याचं नव्हतं झालं.. 

रात्री clear sky असेल तर milky way 🌌 दिसू शकते, हे नवीनच ऐकुन होतो / इथे आल्यावरच ऐकलं होतं.. त्या रात्री हा पण अनुभव घेतला.. काही कारणाने जाग आली (एखादा घोरतच असेल 😴) आणि tent बाहेर निघाल्यावर जे दृष्टीस पडलं, त्यासाठी इतर रात्री खास लावलेले alarms ⏰ सुद्धा काही कामी नाही आले..

चौथ्या दिवसाच्या camp (Nagaru) बद्दल आम्ही सर्वांनी खूप thrilling असं वाचलं होतं (वाचलं काय, हे वाचण्यापेक्षा आमचा अनुभवच वाचा).. आधीच्या काही बॅचेस weather प्रतिकूल असल्यामुळे इथे नाही गेल्याचं कळता आमचा पण trek complete न होताच पोपट 🐦 होतो का? असा नावडता प्रश्न ❓ आम्हाला सतत सतावत होता.. 

ढगांनी थोडी उघडीप दिल्यामुळे आम्ही Nagaru ला पोहोचलो खरे, पण पुढचे १८-२० तास आम्हाला बिगर पाण्याचे काढायचे होते.. ह्या camp चा तसा एक(च) plus point आहे, इथे mobile network 📲 आहे.. rest, I leave it to your imagination.. संध्याकाळ होत नाही तसा ढगांचा जोर वाढला आणि सूर्यास्त होत नाही तसा गारांचा वर्षाव चालू झाला.. वाऱ्याचा जोर tent 🎪 उडवून नेतो, ह्याचे practical आम्ही आजच्या lunch spot ला बघून आलो होतो.. camp leader विचार बदलून आम्हाला परत पाठविण्या इतपत वातावरण खराब होऊ नये, हिच प्रार्थना करत आम्ही दिवसाची सांगता केली.. 

fifth day was summit.. ४२०० मी.
fifth day was sweet..
बर्फ तसा आम्हाला पहिल्या दिवसापासूनच दिसत होता, पण आज मात्र डोळ्यांपासून पुष्ठभागापर्यंत आणि sunglasses पासून trekking pole पर्यंत फक्त बर्फच होता.. पहाटे ४:३० ला आम्ही संथ गतीने सुरुवात केली.. आधी ladies, मग oldies, आणि मग राहिलेले.. ३ trek guides पहिल्या दिवसापासूनच होते, आज अजून ३ snow guides देखील steps तयार करून देण्यासाठी आमच्या बरोबरीने (actually आमच्या पुढे) चालत होते.. sunrise अगोदर snowflakes 🌨️ kisses + breathtaking visual was start of just a perfect day.. थोड्याच वेळात, it was time for summit, photo-session आणि शिवगर्जना..

कच्चा लसूण - ह्या altitude ला oxygen कमी असल्याने झोप लागू शकते, आणि हे जीवघेणं असू शकतं, तेव्हा लसूण खाल्ला पाहिजे, हे त्या दिवशी "रोज काहीतरी नवीन शिकावं" यादीत 📝 add झालं.. दुसऱ्या group मध्ये एका महिलेची ही अवस्था बघत आमच्या guide ने त्यांना जबरदस्ती खाऊ घातला, थोडं बरं वाटायला लागल्यावर आम्ही पुढे निघालो..

summit म्हणजे आता अजून चढायचं नाही.. पण उतरायची वाट पण दिसत नव्हती.. दिसत होता फक्त sunglasses 😎 च्या पलीकडचा बर्फ.. आम्ही सगळे आतुरतेने ज्याची वाट बघत होतो, त्या slides ची वेळ आली होती, पण पहिले जाणार कोण? लहानपणी park मध्ये खेळलो, हा तोच प्रकार, फक्त इथे बर्फ होता आणि पकडायला / तोल गेल्यावर support काही नाही.. अशी आधी कोणी केली नव्हती, ना कोणाला करतांना बघितली होती.. स्वतःलाच धीर देत खाली बसलो, snow guide च्या instructions मान डोलवत ऐकल्या, आणि घसर-घसर-घसरगुंडी.. कपडे ओले होत होते, पुष्ठभाग बधीर होत होता, पण ह्यातली मजा अनुभवल्या शिवाय नाहीच नाही.. 🎉 यापुढे कुठे सरळ रस्ता असला तरी आता काहींना slide च करायचे होते.. 😋 काहींच्या rucksack 🎒 च्या side pockets मधले सामान पडत होते, तर काही लोक तोल जात असल्याने वेगळाच प्रकार करत होते / काही लोकांकडून वेगळाच प्रकार घडत होता..
total slide distance was somewhere between 3-4 kms..

तुम्हाला आता प्रश्न पडला असावा, परत परत sunglasses चा उल्लेख का? तर sunglasses नसल्याने आधीच्या batch मधून एकाला snow-blindness झाल्यामुळे त्याला पुढच्या camp ला एक दिवस थांबवण्यात आलं होतं (आणि त्याने आमच्या बरोबर पुढचा प्रवास करायचा होता).. आपण जसे सह्याद्रीत वापरतो तसेच हिमालयात सुद्धा महत्वाचे असतात.. temperature does not matter..

अजून एक - थंड वातावरण असल्यामुळे गरज जरी भासत नसली तरी पाणी 💧 हे नियमित प्यायलाच पाहिजे.. नाहीतर हात, पाय आणि ओळखण्यापलीकडे चेहरा सुजतो..

आता मात्र बर्फाचा विट आला होता.. पुढचा दिवस ह्या trek मधल्या सर्वात सुंदर camp ला जायचा होता.. पोहोचत करत पावसाचे वातावरण झाल्याने, skip करून इतरांबरोबर सरळ दिल्ली फिरायला जायला पाहिजे होतं, असं वाटायला लागलं.. but.. next morning was just beautiful आणि trek पूर्ण करायचा निर्णय पदरात पडला..

हाच शेवटचा दिवस पुढे मनिकर्णला गरम पाण्याच्या कुंडात 🛁 अंघोळ करुन trek चा सगळा थकवा काढण्याचा आणि गुरूद्वारा च्या लंगर मध्ये पंचतारांकित जेवण करण्याचा होता..

that ends in short, what was my best trekking experience so far.. hope it was not monotonous..
and, trek freaks 👊 should definitely go for it..

बरं, एका guide चं नाव नरेंद्र 😇 पण होतं..

credits: Mahesh

6 comments:

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...