।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
कर हर मैदान फतेह.. ढाक बहिरी..
नुकताच YouTube वर "थरारक trek" म्हणून एक video बघितला होता.. पाहता क्षणी ठरवलं की हा नक्कीच आणि लगेचच केला पाहिजे.. Himalayan trek एवढ्यातच book केल्यामुळे practice चालू होतीच, शिवाय हिवाळ्याने चांगलाच जोर पकडला होता..
२९ डिसेंबर २०१८
पहाटे निघून ६:३० ला आम्ही जांभवलीला पोहोचलो.. as usual, नाश्ता ची विचारपूस केली आणि ज्यांना विचारलं, त्यांनी त्यांचाच घरी नेलं.. जरा वेळ बसून, वाढीव rate चे पोहे, चहा झाल्यावर आम्ही हूड-हूड करत कोंडेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो.. आज जरा बाहेरचे वातावरण कडकच होते ⛄.. बरं, फक्त ऊन कडक असतं, असं नाही..
दर्शन घेऊन पुढे ढाक डोंगराच्या दिशेला दिसेल त्या वाटेने.. १-१.५ तासाने जेव्हा आपण mini K2S करतोय हे वाटायला लागले, तोवर आम्ही कळकराई सुळक्यापर्यंत पोहोचलो होतो.. बहिरीच्या गुहेपर्यंत जायला आता कसरत करावी लागणार होती.. ही तीच मोहीम होती जी अनुभवायच्या उत्साहापायी आम्ही आज घरून निघालो होतो..
लोखंडी साखळीच्या ⛓️ मदतीने (mini) खिंड खाली उतरून आता traverse करायची वेळ होती.. तारेच्या मदतीने आम्ही तो पार करत नाही तर आता दोर.. थोडंसं चढत नाही तर एका लाकडाच्या मदतीने शेवटचा टप्पा.. हे सगळं तिथे आधीपासूनच आहे, in other words, आम्ही घरून काहीच नेलं नव्हतं..
थोडा विसावा घेऊन, दगड तापायच्या अगोदर लाकूड, दोर, तार, साखळी, ह्या क्रमाने परत सुळक्याखाली.. जसा जमेल, जितका जमेल, तसा २०-२५ फूट सुळका चढलो आणि माघारी.. mini K2S return, back to pavilion..
..सह्याद्रीतील एक thrilling अनुभव
YouTube वर बघितलेल्या video ची link
YouTube वर बघितलेल्या video ची link
No comments:
Post a Comment