Wednesday, October 23, 2024

सिद्धगड

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

आज जाने की जिद न करो.. सिद्धगड.. not by choice

"yes, not by choice".. परत आल्यावर जेव्हा smartphone / smartwatch ⌚ range मध्ये आले, आणि मुद्द्याचं म्हणजे त्यांच्यात जीव ओतून त्यांना बोलकं केलं, म्हणजे charge 🔋 करून, activities sync आणि upload होऊन जगभराला कळलं, तेव्हा हे घडणं आम्हाला अनपेक्षित नव्हतं / अपेक्षित होतं 😐..

unusual पद्धतीने घडलेल्या २ दिवसांचा trek बघून भूषणचा साहजिक आणि साधा भोळा असा doubt "Ohh.. you guys stayed ⛺ on सिद्धगड?".. reply तुमचा आधीच वाचून झाला आहे.. तरी हे article, त्या एक दिवसाचं दोनात रूपांतरण व्ह्याच्या आधीच "लिहिलं गेलं पाहिजे" / "yes, by choice", ह्या categoryत migrate झालं होतं..

प्रत्येकाची हौस / आवड वेग-वेगळी असते.. काहींना गडावर stay केल्याचं आवडतं, तर बहुतांश लोकांना one day return पुरतो..  collegeला असतांना (२००६ साली 🎓) राजगडचा stay 'by choice' 'वेगळं काहीतरी' म्हणून ठीक होता, पण मग गड घाण करायची ही concept तेव्हापासूनच thought process मधून बाद झाली 🙅‍♂️.. 'अजून काय बरं?', तर पुढच्या मिनिटाला काय घडणार आहे, हे आपणाला माहिती नसतं, हे ही तितकेच खरे 🙄.. कधी मन मारायची वेळ येईल, सांगणे अवघडच.. आणि म्हणून, revolving around the topic of "मन मारून stay करणे", सादर करतो आहे, ही "not by choice" गोष्ट..

कधीचा रखडत असलेला गोरखगड गेल्यावर्षी ०८ ऑक्टोबर रोजी झाला ✅.. शेजारचा सिद्धगडही लवकरच करू, म्हणत वर्ष सरलं.. सप्टेंबर मध्ये कोथळीगड दुसऱ्यांदा झाला, पण सिद्धगडला काही मुहूर्त लागत नव्हतं.. family reasons 👶 मुळे गेली काही महिने busy असलेला राहुल दसऱ्याच्या मुहूर्तावर थोडा release / free झाला आणि लागलीच चर्चेचा विषय 'सिद्धगड' झाला.. जमलेही तेव्हडेच - नेहमीचे आम्ही तिघे.. तिसरा कोण? ते तुम्ही ओळखलं असेलच.. otherwise, नाव सांगायची घाई करून काही फायदा होणार नाही आहे.. पुढे तसंही बऱ्याच वेळ repeat होईलच 🔁.. पावसाचा मावळता जोर पाहता तारिक ठरली १९ ऑक्टोबर.. तेव्हडं एकंच option होतं आणि 'ठरली' काय म्हणतोय मी? 🤦‍♂️.. "beggars can't be choosers" म्हणतात, ते हे..

youtube वरील एका 📽️ चलचित्रानुसार "सिद्धगड trekkersची सिद्धता पारखणारा किल्ला" आहे, हे समजलं.. अजून अभ्यास करता लक्षात आलं - गड - जवळ, थोडा 🤏 किंवा सोपा, ह्यापैकी एकही नाही.. एका blogनुसार तर "सिद्धगड महाराष्ट्रात सर्वात जास्त elevation gain 📈 असणारा किल्ला आहे".. नरिवली किंवा उचले गावातून चालू केलं तर हा दावा खराही ठरू शकेल.. आम्ही मात्र बोरवाडीहुन सुरु करणार होतो म्हणून आम्ही हे म्हणणे कदाचित चुकीचं ठरेल 🤨.. तरी, इथला gainही कमी आखण्यासारखा नाही 😓.. त्यात मुंबईचं वातावरण म्हणजे "सोनेपे सुहागा", ohh sorry, "दुष्काळात तेरावा" 😰.. एकंदरीत, ११ दिवस उशीरा जात असल्यामुळे वातावरण आणि terrain थोडंफार का होईना, बरं असेल, तयारी त्या हिशबानेच.. आणि शेवटी कितीही उशीर झाला तरी रात्री 🌃 जेवायला घरी पोहचू, इतपत मनाची तयारी केली होती.. पण मग, "देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड़के", हे तुम्ही ऐकून असालच, मग ते भाग्य असो वा दुर्भाग्य..

१९ ऑक्टोबर २०२४

एखाद्याची काहीच चूक नसतांना, समोरून येणारा, actually 'येणारी' divider ओलांडून 🚚 एका truckला जोरात येऊन धडकते, अश्या प्रकारचे किस्से आजकाल नवीन नाही.. अब इनको कौन समझायें, "आज कुछ तूफानी करते हैं" मधला तुफानही खरा नसतो आणि करणाराही.. diesel ⛽ भरायला थांबलो नसतो तर कदाचित ह्या accidentने अडवलेल्या traffic मध्ये न अडकता वेळेवर trek तरी चालू झाला असता ⏳.. असो,


कर्जतला थोडा आणि कडावला राहिलेला नाश्ता करत आम्हाला बोरवाडीत पोहचायलाच १० वाजले 🕙.. तासभर उशीर झाल्याचं बघून, "खालीच जेवायची सोय होते का?" ह्याचा शोध चालू झाला.. 'माचीवरचे लोकं सोय करतात' कळताच इथला नाद सोडत आम्ही गड चढायला सुरुवात केली.. पण त्याआधी - अभ्यास करता-करता / बाकी लोकांच्या posts बघता आमच्या असं लक्षात आलं होतं की, एका वाटेने चढून, गडमाथा गाठून, परतीला दुसरी वाट धरून आपण गडाची परिक्रमाही ⭕ करू शकतो from / to same base village, बोरवाडी.. एखाद्या appवर trail दिसते का?, शोधत-करत AllTrails app वर बोरवाडी - सिद्धगड माची - बालेकिल्ला - माची - जाखमाता मंदिर, अशी trail सापडली (नंतर ते नारमाता मंदिर असल्याचं कळलं).. तिथून फक्त बोरवाडीच्या रस्त्याला लागायचा part missing होता.. आणि इथेच आजचा सगळा खेळ झाला.. इतर वाटाही आहेत, पण सध्या आमच्या काही कामाच्या नव्हत्या.. now back to, १० वाजता गड चढायला सुरुवात केली..

वातावरण त्रास देणारं नव्हतं, तरी trekking pole गाडीत विसरल्यामुळे आणि cough झाल्यामुळे वैभवचा speed कमी पडत होता 😪.. हळू-हळू आणि थोडा-थोडा करत त्याने तो भरपूर प्रमाणात बाहेर काढला.. सोबत केलेला नाश्ताही निघाला असावा.. म्हणून काही केल्या नेहमीचा वैभव अजूनही कुठेतरी missing होता.. त्यात त्याने स्वतःचं ढापणही 👓 कुठेतरी सांडलं होतं.. वाटेत होते लहान-मोठे बरेच rockpatches, ज्यांच्या सोबतीला होतं - शिंपडलेलं शेवाळं, साचलेलं पाणी आणि लहान-सान falls.. पावसाळ्याचा हा सगळा पसारा बघत आनंद 😊 ह्याच गोष्टीचा होत होता की इथून उतरायचं नाही आहे..


वैभवला वेळ लागतोय, म्हणून नको ते photo काढत आम्ही timepass करत होतो.. चढ संपताक्षणी गप्पा मारायला राहुलला एक जोडपं भेटलं.. कुत्रा माचीवरचाच होता, 🐶 कुत्री बहुतेक खालून आली होती.. 'आमच्यासाठीच काही नाही, त्यात तुम्हाला काय भरवू?', सांगायचा प्रयत्न निष्फळ ठरल्याचं बघत त्यांना सोबत नेल्याशिवाय पर्याय दिसत नव्हता.. again, as if we had choice.. इथलाच नाही, तर कुठल्याही गडावर ह्याबाबतीतले अनुभव नेहमीचे / सर्वांचे सारखेच - एकदा ही जात सोबत आली की सहजा-सहजी सोडत नाही 🔗..

orange pinwheel, कानपेट
asiatic dewflower, डोंगरी कोरांटी

इथून पुढे माचीपर्यंत traverse आहे.. काही अंतराने उजवीकडे जंगल साफ होताच बालेकिल्ला दिसायला सुरुवात होते.. तो जणू आमच्याकडे बघत मिश्कीलपणे हसत म्हणत असावा 'उशीर केलात पाहूणे'.. back-to-normal speedने 🕛 १२ पर्यंत पोहचल्यावर एका घरात menu ठरवत जेवायची order दिली आणि '२ पर्यंत परत येतो' सांगून पुढे बालेकिल्ल्याच्या रस्त्याला लागलो..


थोडा चढ चढलो आणि वाट हरवली.. पावसाळ्यातला दुसरा usual problem.. trailच्या बरंच off गेल्याचं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा परत trailशी जुळायचा खटाटोप चालू झाला 📌.. सापडल्यावर स्वतःवरच दया आली, 'इतकी ठसठशीत वाट कशी सुटली ⁉️'.. by now, वैभव was performing far better than before.. राहुल नेहमीप्रमाणे सगळ्या जगापुढे जात गुहेच्या उंबरठ्यावर बसून, 'कोणी photo 📸 काढायला येतंय का?', ह्याचा शोध घेत होता.. ह्या सगळ्यात समोर गोरखगड सोबत आता मच्छिंद्रगडही दिसायला सुरुवात झाली होती..



ही गुहा साधारण १०*१४ ची खोली असेल.. समोरच्या गडांसोबत दरवाज्याची frame set 🖼️ करत photo काढून झाल्यावर आम्ही तिघेही सोबत निघालो.. अजून थोडंसं चढून गेल्यावर दुसरी जी गुहा लागते ती एका लहान open balcony सारखी आहे.. त्यात विठ्ठलाचं चित्र दिसताच वैभव म्हणतो, "पंढरपूरला मंदिराचा कळस दिसला तरी 'विठ्ठल दर्शन झाले', असं म्हणतात.. इथे कळसावर जाणं अवघड दिसतंय, म्हणून विठ्ठलच दर्शन द्यायला खाली आला आहे.. झालं summit, चला घरी.." 😂


पावसाळ्याचा पसारा ह्यवाटेवरही भरपूर होता आणि भरपूर त्रास देत होता.. अजून पाऊस नाही, नशीब तेव्हडं चांगलं होतं.. कितीही चढलो तरी, किल्ल्याचा top 🔝 काही येईना.. एक-एक करून आता आम्ही तिघेही थोड्या-थोड्या अंतराने उद्गारलो - बोर झालं, कंटाळा आला आता, बस झालं, जाऊ इथूनच परत आणि पुन्हा येऊ डिसेंबर मध्ये, सगळं वाळलेलं असेल, झाडीही आणि दगडही.. विचार केला, 'इतक्या लांब येऊन, परत इतकं चढायला नाही जमायचं, काय जे थोडंफार बाकी आहे, आजच उरकू' 😣..

तेव्हड्यात आमच्या पुढे-पुढे चालणारी कुत्री वेगाने घाबरल्यागत परत येतांना दिसली.. थोड्या अंतरावर 🐒 माकडंही डरकाळ्या फोडत होते.. साहजिक doubt हाच, 'काहीतरी दिसतंय / दिसलंय ह्यांना, फिरावं का परत?'.. नाही म्हणत, धाडस करत पुढच्या दिशेने वाटचाल चालू ठेवत आम्ही chennai express 🚂 मधल्या 'where is the temple?' सारखाच 'where is the top?' - 'दिसतोय का?' हा एकमेकांना कमी आणि स्वतःलाच जास्त, असा प्रश्न विचारत होतो.. आता कंटाळाचाही कंटाळा आला होता 🥺..

चतुर / dragonfly / helicopter


finally, जेवणासाठी सांगितलेल्या परतायच्या वेळेत आम्ही बालेकिल्ला top गाठला.. couple 🐕 सोबत पिंड आणि नंदी चे photo काढत, सोबत आणलेला थोडासा खाऊ फस्त करून इतर कुठे, म्हणजे आजूबाजूच्या बुरुजांवर न जाता u-turn घेतला.. in case you are wondering, वाटेत कुठलाच दुसरा प्राणी दिसला नाही आम्हाला 😃.. आलो ती वाट व्यवस्थित follow करत, कुठेही न चुकता, 🕒 ३च्या आसपास आम्ही बूट काढत, तोंड धूत वांगे-बटाट्यांवर ताव मारायला सुरूवात केली..

इथून पुढच्या वाटेबद्दल मावशींनी जी माहिती दिली, ती ऐकून जे सुकून भेटलं, क्या कहने!.. आलो त्यापेक्षा जाखमाता मंदिराची वाट इथले लोक जास्त वापरतात, असं कळलं.. वाटेत पावसाळ्याचा कुठलाच पसारा नाही, was "दुष्काळात तेरावा", ohh sorry, "सोनेपे सुहागा" 👍.. जेवण झाल्यावर दप्तर घेऊन निघतच होतो, त्यात एक गृहस्थ येऊन विचारतात, "बोरवाडीहून आले का?".. "हो" म्हणत जेव्हा त्यांच्या हातात ढापण बघितलं, तेव्हा विचारायचं कारण लक्षात आलं 🙋‍♂️.. वैभव खुश.. आणि, 'गाडी चालवावी लागणार नाही' म्हणून राहुलही सुखी..

तासकाटा साधारण ४ खुणावत होता 🕓, पण आता फक्त थोडा traverse, खिंड ओलांडायच्या अगोदरचा चढ आणि पलीकडे नुसता उतारच आहे 📉, शिवाय वाट सुद्धा लहान आहे म्हणून, '६ पर्यंत जरी रस्त्याला लागलो तरी चालेल' अशी स्वतःची कमी आणि एकमेकांची जास्त समजूत घालत आम्ही निश्चिन्त होत निघालो 🤗.. प्रशस्त मंदिर दिसताच आमच्या हेही लक्षात आलं की हे जाखमाता नसून नारमाता मंदिर आहे..

नारमाता मंदिर



तोफ, वीरगळ इ. photo काढायच्या नादात आम्हाला उजवीकडची वाट नाही दिसली, आणि डावीकडे दुसऱ्या गावातून येणाऱ्या मळलेल्या वाटेचे प्रखर स्वरूप दिसताच तीने उतरायला लागलो.. इथे चुकलो नसतो तर गडावर असलेला एकमेव दरवाजा बघायचा राहिला असता.. पण इथे चुकलो म्हणून 'खिंड exactly कुठली उतरायची आहे?', हा doubtही यायला लागला 🤔.. जेव्हा आपण भीमाशंकरच्या वाटेला लागल्याचं लक्षात आलं, लागलीच आपापल्या दुचाकी जागेवर फिरवत ↪️ माघारी मंदिरात येऊन इतर वाटेचा शोध सुरू झाला आणि लागला..


उजवीकडे खिंड चढायला कधी चालू केली!, कधी चढ संपला!, कळलंच नाही.. समोर दूरवर पदरगड दिसत होता आणि खाली सुटसुटीत वाट (without पसारा).. दिल खुश 🥰.. थोडं उतरताच जाखमाता मंदिरही लागलं, म्हणजे agenda मधला आता बाकी होता, फक्त "उतार"..


जाखमाता मंदिर

पण इथेही आम्हाला उजवीकडची वाट somehow दिसली नाही.. डावीकडच्या वाटेवर चालत जेव्हा मी म्हणालो, "आज आपले २ trek होतील, एक गड आणि एक परिक्रमा", तेव्हा वैभवने दिलेल्या "परिक्रमा केल्यासारखी वाटत तर नाही आहे" reply मुळे 'आपण अजून एकदा चुकलो आहे', ही tubelight पेटली 💡.. पुन्हा जाखमाता मंदिरापर्यंत येत योग्य वाट उतरायला चालू केली तेव्हा तासकाटा ५ दर्शवत होता 🕔.. म्हणजे आतापर्यंतच्या (बालेकिल्ल्याला जायची पकडुन) तिन्ही चुका माफ होत्या..​

मावशींनी सांगितलं तसं, वाट ठळक / मळलेली होती, कसलाच त्रास नाही.. समोर फक्त एकच target होतं - शेवटचा टप्पा - 'रस्ता'.. ठरवलेल्या वेळेत / ६च्या सुमारास रस्त्याला लागलो आणि तिथून २०-२५ मिनिटात गाडीपाशी पोहचत आम्ही सिद्धगडला शेवटचा रामराम केला 🙏.. normal पद्धतीने trek झाला असता तर आजचा एकदिवसीय सामना इथे संपला असता.. पण, but, पर, किंतू, परंतु.. कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा? 🤪..

मावशींनी सांगितलं तसं, वाट ठळक / मळलेली होती.. trail नसूनही जास्त वेळ वाया न गेल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.. तेव्हड्यात राहुल म्हणतो, "ही वाट परत चढावी लागली तर वाट लागेल".. दादा! गप की जरा 🤫, दीवारों के भी कान होते हैं.. एव्हढ्या गप्पा मारल्या, त्यातल्या पूरी कायनातला फक्त हेच ऐकू आलं वाटतं !! manifestationच्या स्वरूपात कहानी में twist आला तो असा की वाटेत दरड कोसळलेली होती.. डावीकडे बघतोय, उजवीकडे बघतोय - शोधून-शोधून हैरान, परेशान - पण काहीच दिसेना.. कापलेल्या फांद्या, रचलेले दगड, बांधलेल्या चिंध्या / ribbon 🎗️ - कसलाच पत्ता नाही.. शेवटी पाण्याच्या वाटेने उतरायचं ठरवलं.. १०-१५ मिनिट हा निर्णय योग्यही वाटला, पण मग शेवटी ते पाणी आहे - त्याला वाहायला वाट नाही लागत, त्याला पाहिजे असतो फक्त उतार / गुरुत्वाकर्षण, जो सर्वव्यापी आहे.. आता इथे काय असेल / झालं असेल, ते तुम्ही अगदी बरोबर ओळखलेलं आहे.. डोक्यावर rain, पायाखाली fall 🫥..

by the way, आपलं उर्वरित ३०% शरीरही पाणी असतं तर !?.. 

वेळ: पावणे-सहा, location: जंगल, हवामान: धो-धो पाऊस, visibility: none, trail: absolutely clueless.. अश्या परिस्थितीत सापडल्यावर सगळ्यात सोईस्कर option जे डोळ्यासमोर दिसलं, ते म्हणजे, "back to माची".. २९% battery जी बाकी होती ती फक्त माचीवर पोहचेपर्यंत टिकावी, हीच एक अपेक्षा - कारण आता दिसणार काहीच नव्हतं आणि परत जायला 'navigate back' / 'आलो त्या मार्गी परत' हाच पर्याय होता..

पाण्याच्या वाटेतून बाहेर पडायच्या आणि दरड कोसळलेल्या जागी पोहचायच्या प्रयत्नात आम्ही तिघेही एकमेकांपासून दुरावलो.. पण actual problems वेगळेच होते, ते म्हणजे - १. माचीवर परत जायचं म्हणजे अर्धी उतरलेली वाट चढायची होती, २. पाण्याचा आवाज इतका होता ही आमच्या आरोळ्या एकमेकांना ऐकू जात नव्हत्या 😬.. (नंतर कळलं) वैभवला परत सकाळचा त्रास व्हायला लागला होता..

'आता काय करावं?' तर पुन्हा वाटेवर आल्यावर एकटाच दोघांना आवाज देत बसलो - आशा हीच की कधीतरी आवाज पोहचेल, ज्याणेकरून त्यांना कमीत-कमी यायची दिशा तरी लक्षात येईल.. झालंही तेच, लागलीच राहुल दिसला.. काही वेळाने एक torch 🔦 येतांना दिसली.. आणि ह्या सगळ्या गडबडीत वैभवने पुन्हा एकदा कुठेतरी ढापण सांडलं 🤦‍♂️.. इथून पुढे आम्ही सोबतच वाट धरत चालत होतो.. जाखमाता मंदिरानंतर शक्यतो चुकणार नाही हा विचार करत mobile मध्ये ठेवला आणि आजचे पुन्हा एकदा, पण शेवटचे चुकलो.. त्यापुढे कुठलाच शहाणपणा न करता पावला-पावलाला trail check आणि follow करत आजच्या अन्नदात्यांकडे पोहचलो 🔚..

so close, yet so far 😢
the moment of truth - (re)turning point

वाजले होते ७ 🕖.. काका आले होते परत.. as expected, दरवाजा उघडताच आम्हाला ज्ञान पाजायला लागले.. नंतर काय झालं, कुणास ठाऊक? - स्वतःच म्हणाले, "शेजारच्या घरात कोणी नसतं, तिथे तुमची सोय करून देतो"..

इतकं होऊनही अजून भीती नव्हती वाटली कसली.. पण जेव्हा sleeves काढल्या तेव्हा अचानक थंडी भरली, आणि first time for the day - indicator लागले / वाजले 😱.. ताबडतोब अंगावरचं सगळं काढून वाळायला घातलं.. त्यासाठी घरात असलेल्या चारपाईचा आणि already बांधलेल्या काही दोऱ्यांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला.. जेव्हडं सुकेल तेव्हडं, नाहीतर worst-case, आलो त्या condition मध्ये उद्या सकाळी उतरायची तयारी होती..

काकांनी केलेल्या इतर सोयीचा तपशील असा - अंथरायला चटई, सतरंजी, पांघरायला blanket, अंग पुसायला towel, घालायला shirt, थंडी वाजायला नको / उब मिळावी / मिळत राहावी म्हणून चूल आणि जेवायला पिठलं-भात.. आहे की नाही, ५-star? 👻.. #CannotAskForMore


आळीपाळीने तिघांनी जेवण येई आणि होई पर्यंत चूल 🔥 पेटती ठेवली.. पाऊसही आळीपाळीने रिम-झिम, टिप-टिप, धो-धो बरसत होता.. जेवण तयार होईपर्यंत घरी phone झाले आणि 🤤 पोट भरल्यावर अजुन काही करायला नसल्यामुळे आम्ही विसावलो.. तत्पूर्वी, अंबानी यांनी मित्तलचे पुन्हा एकदा आभार मानले..

२० ऑक्टोबर २०२४

सकाळी तोडक्या-मोडक्या झोपेतून उठून बाहेर बघतो तर ढग गायब.. वाट दाखवायला कोणी सोबत येणारं सापडलं नाही म्हणून त्याच (जाखमातेच्या) वाटेने उतरायचं option बाद करत काल चढलो त्याच rockpatches वाल्या वाटेने उतरायचं ठरलं.. कालच्या मेहमाननवाज़ी साठी काकांना "किती द्यायचे?" विचारलं तर काकांनी "as you wish" म्हणत हात वर केले.. त्यात आमच्याकडे cash नाही, हे त्यांनी कालच ओळखलं होतं.. म्हणून आम्हाला जे योग्य वाटले, त्यांच्या मुलाला GPay करून, त्यांचे खूप-खूप आभार 🙏 मानत तिथून निघालो.. काकांचे नाव - जयवंत कोकाटे (मो: ७२१८ ३१९ ६२६)..

डूबते को तिनके का सहारा / आसरा

निघतांना शेजारचे दुसरे काका आम्हाला म्हणाले, "ती कुत्री तुमच्या बरोबर आली आहे ना? घेऊन जा तिला बरोबर".. अजून तरी कुठे त्या दाम्पत्याचा पत्ता नव्हता.. आम्ही निघताच आमच्या सोबतीने खाली उतरायला निघाले.. सकाळच्या वातावरणात views अगदी clear होते.. ⬆️ उत्तरेकडे दूरवर माहुली सुद्धा बऱ्यापैकी दिसत होता..

traverse संपता-संपता पश्चिमेकडून दक्षिणेकडे ताहुली ते चंदेरी ची range, माथेरान, कोथळीगड, पदरगड आणि बरेच views आता धूसर व्हायला सुरुवात झाले होते.. कालच्या पावसामुळे आज वाटेत बरंच पाणी होतं.. patches उतरतांना योग्य ती काळजी घेत आणि एक दुसऱ्याला मदत करत तासाभरात आम्ही गावात पोहचलो.. ह्या सगळ्यात काय जे overnight सुकले होते, कपडे परत ओले झाले.. कपडे बदलायला गेलो असता, एका काकूंना चहासाठी विचारलं, तर त्यांनी "क्या बात!" चहा बनवला 👌 - वाह, एक नंबर !! ☕

घरून आणलेले पराठे थोडे आम्ही खाल्ले, थोडे कुत्रीला दिले - reaction अशी, जणू दुष्काळातला तेरावा हीचाही चालू होता.. एव्हड्यात ८-१० पन्नाशीतले oldies 👴 मोहिमेवर आलेले दिसले.. विचार तर आला होता, सांगू की, 'नका जाऊ, rockpatches आहेत, आणि slippery आहेत'.. पण परत म्हणलं, 'उगाच कशाला निराश करायचं !'

जांभूर्डे धरणाहून सिद्धगडचा "larger than life" view
(oops.. थोडा जास्त edit झाला 😜)

तर असा सगळा होता, आम्हा beggarsचा आगळा-वेगळा "not by choice" अनुभव.. reserve day वापरत पूर्ण झालेला एकदिवसीय सामना आणि कटप्पाचा आगाऊपणा..

तात्पर्य

ह्या article मागचा उद्देश तुम्ही समजाल तो.. फक्त मी जे नेहमी सांगत असतो, इथे तेच repeat करेल.. पावसाळा trek करायचा season नाही 🚫.. बहुतेक लोकांना thrill / तूफानी वाटतं, पण अश्या परिस्थितींना सामोरे जाणे हा कमजोर दिलका खेल नाही.. बऱ्याच गोष्टी अनिश्चित असतात, हे वेगळं सांगायला नको.. ह्या वेळेस ५-star सोय झाली - आमचं नशीब.. नाहीतर?.. बाकी सब छोड़ो, कपडे नसते भेटले तर काय 🫨 !?

एकंदरीत - ह्या वेळेस हौशी trekker सारखं वागून खूप काही achieve केल्यागत जरी वाटत असलं, तरी matrix movie मधल्या "not like this" ☎️ dialog म्हणावं लागण्या सारख्या परिस्थितीत अडकून, "यापुढे trekking बंद", म्हणावं लागेल, अशे अनुभव / निर्णय घेणे ही खूप काही कौतुकास्पद नाही 😔..

भेटू पुन्हा.. नाही.. there is no "see you later" or "next time".. काही निवडक treks चालू राहतील, पण explore mode आता नेहमीसाठीच बंद करण्यात आला आहे 🙂‍↔️.. आणि त्याच त्या locations बद्दलही मी किती लिहिणार / तुम्ही किती वाचणार !?.. तसंही आजकाल लोकांचा attention span कमी होत चालला आहे, 0 बराबर - त्यामुळे लेख वाचायला सुरु करणाऱ्यांपैकी किती लोक इथपर्यंत टिकून आहेत, हा ही फार मोठा प्रश्न आहे 💭.. म्हणून,

signing off from this blog 👋..
keep hiking, keep healthy..

Friday, October 11, 2024

नवसकाळी २०२४

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

मराठी calendar 📆 म्हणा किंवा त्याहून सोप्या शब्दात, सगळ्यांना लक्षात येईल अश्या 'कालनिर्णय' नुसार म्हणा.. दर महिन्याला चंद्राचा पुनर्जन्म 🌑 होत असतो, हे आपल्याला माहिती आहेच.. अपवाद एकच, actually दोन 🤨.. गोंधळात सापडलात ना? 🤔..

'खगोलशास्त्रात कसले अपवाद !?' - भरपूर आहेत.. जसं 'दर ४ वर्षांनी leap year असणारच', हे सत्य नव्हे 🥺, तसं दर महिन्याला चंद्र किमान एकदातरी किंवा फक्त एकच पुनर्जन्म घेईल, हे ही सत्य नाही 🥴.. मराठी बाजूला ठेऊन, इंग्रजी calendar चाळलं / छळलं, तर येईल लक्षात 💡.. आता तुम्ही म्हणाल, 'ह्यात चूक Julius Caesarची नाही का?', तर भावनाओं को समझो - माझ्या नाही, त्याच्या 🤦‍♂️..

असो.. articleचा विषय तो नाही.. so.. let's start again..


दरवर्षीप्रमाणे आश्विन महिन्यात चंद्र पुनर्जन्म घेतो, rather, पुनर्जन्म झाल्यावर जेव्हा आश्विन महिना चालू होतो, तेव्हा जी तंगडतोड / पायपीट 👣 चालू होते, त्याला म्हणायचं "नवसकाळी".. 'ह्यावर्षी वेगळं काय?' 💭 तर गुढीपाडवा ते रामनवमी वाल्या नवसकाळी नंतरची, ही ह्या इंग्रजी (jan, feb, ..oct) / मराठी (चैत्र, वैशाख, ..आश्विन) वर्षातली ✌️ दुसरी नवसकाळी आणि म्हणूनच दरवर्षीच्या 9+1 hikes ऐवजी 9+2 hikes..

थोडक्यात stats - 5340 mtrs 📈..

only second (and bettering 🏅 the previous) instance (from the same calendar year) of gaining elevation in excess of 5k mtrs (in 9 consecutive days) 😎.. and thus the article's title 👇..

'अजून नवीन काय?', तर सब तरफ AIका बोलबाला आहे, म्हणून बघुया 🤖 त्याचं ह्या abundantly प्रफुल्लित वसुंधरेबद्दल 🌺 🍀 🏵️ 💮 ☘️ काय मत आहे ते..

Flowers 🌻 are like, 'Hey, we're here!'
Rain's all, 'I helped, no need to fear!'

Blooms abound 🌼, scents fill the air,
Nature's symphony, beyond compare!

Petals 🌸 dancing, colors so bright,
Sunshine smiles, and everything's all right!

Garden's popping 🪻, like a flower fest,
Thanks, rain! You're the best!

Garden बोले तो - टेकड्या, गड आणि किल्ले..

beat yesterday.. नवसकाळी २०२४
9 days, 9+2 hikes, वर्ष ६वे

0️⃣ location - distance (km)/elevation gain (m)
1️⃣ सिंहगड (circuit) - १३.९/६९५
2️⃣ आतकरवाडी < सिंहगड > कल्याण पेठ - १२.०/१००१
3️⃣ पाषाण बाणेर टेकडी - ६.१/२१४
4️⃣ हत्ती डोंगर - ५.३/३९३
5️⃣ सिंहगड, potato point - ९.८/७३९
6️⃣ खंडोबा टेकडी - ९.६/४७८
7️⃣ सिंहगड २x - १०.३/१०४५
8️⃣ तळजाई - १०.०/२३४
9️⃣ सिंहगड - ५.५/५४१

ह्यावेळेस let's skip the contents altogether and let's just go through the stills.. तरी, 📚 वाचायची आवड आणि सवड असल्यास historical "आमची शाखा कुठेही नाही" नवसकाळीच्या निवडक articlesच्या links 🔗 शेवटी दिल्या आहेत..

disclaimer, actually "claimer": none of these prints are AI generated 📸.. few of them are definitely slightly edited (beautified) though 😊..

in no particular order, here is nature's modus operandi to wind up the El Niño cycle - hoping for a कडक winter and milder summer 🤞..

गोगलगाय - १ / garden snail

कण्हेर / oleander / rosebay

spittlebug cocoon


मूग / mung bean / vigna radiata

सुबाभूळ / river tamarind

पांढरी कोरांटी / wild white barleria

freshwater crab

लहान जासवंद / lobed leaf mallow

लाजाळू / touch-me-not


हळुंदा / zombi pea / wild cow pea

जंगली मेथी / sida acuta

गोगलगाय -  / tropical leatherleaf slug

काळादाणा - १

काळादाणा - २ / blue morning glory

up next - sɪɴʜɢᴀᴅ [𝟾𝟶𝟶] @ [𝟾] 👶
this Wed, 16-Oct-2024

तेरडा / rose balsam

hare's foot inkcap

salt marsh moth (larva)

century plant



बूगनवेल / paper flower


sulfur cosmos

गणेशवेल variant / cardinal creeper

चंदर / गोपाळी / western hill catmint

कारवी - १ / strobilanthes callosa

कारवी - २

पारिजात / पारिजातक / night jasmine

रुई / रुचकी / crown flower

common grass yellow


डोरली / बृहती / african eggplant


वरधारा / morning glory

cabbage looper

घाणेरी / टनटनी / tickberry

कुटकी / chinese mullein



hairy pimpinel


सोनकी / graham's groundsel


जट्रोफा / peregrina

कानपेट / asiatic dayflower

banyan tree(s) - as old as time itself 😉

कवला / hairy smithia

चित्रक / white leadwort

the heaven on earth 😇

Annexure

आमची शाखा कुठेही नाही.. नवसकाळी २०२३

those were the best days of my life.. चैत्र नवसकाळी.. odd man out.. https://sskothawade.blogspot.com/2024/04/blog-post.html

a half Everesting and a double Marathon.. नवसकाळी २०२१ https://sskothawade.blogspot.com/2021/10/blog-post.html

पुणेकरांसाठी एक वरदान.. सिंहगड #५००.. नवसकाळी २०२२ https://sskothawade.blogspot.com/2022/10/blog-post.html

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...