।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
पहिलं प्रेम 💓.. राजगड
कुठला गड / किल्ला तुमचं "पहिलं प्रेम" आहे? ह्या प्रश्नाला जर तुमचं उत्तर "राजगड" नसेल, तर "और क्या?", ह्या remote / remotest scenario बद्दल मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल..
सह्याद्रीत कधीही भटकायला आवडेल 🥳, असा गड.. राजगड
स्वराज्याची पहिली राजधानी, साधारण २५ वर्षे.. राजगड
एकमेव गड जिथे मी आजतायगत मुक्काम 😴 केला आहे.. तो म्हणजे राजगड.. १८ मार्च २००६
प्रत्येक दुर्गप्रेमीला आपल्या प्रेमात पाडणारा 😍 गड कुठला?.. अर्थातच, राजगड
सिंहगडला किती वाईट वाटेल, हे सगळं ऐकून.. तर नाही.. सिंहगड special आहे, बायको सारखा.. हे त्याला, तिला, दोघांना माहिती आहे ☺️.. now back to "first love", राजगड..
राजगड बिरमडोंगरी। तीन माच्या तीन द्वारी॥
दोन तपे कारोभारी । जयावरी राहिले॥
वर तुम्ही एक तारीख वाचली.. 'इतक्या details कश्या लक्षात राहतात?' 🙀, तर ह्या प्रश्नाचं सर्वात सोपं उत्तर म्हणजे, photo वर right click करून "Properties" (smartphone वर '...' आणि 'Details') option वर click केलं की आपल्याला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, असं लक्षात येईल 😀.. thank you राहुल 🙏 for the photos.. तुम्ही articles मध्ये नेहमी ज्या राहुल बद्दल वाचता, हा तो नव्हे..
(some flashback)
१८-१९ मार्च २००६.. sunset - stay - sunrise combo
this is going to be tough.. १६+ वर्षांगोदर घडलेलं, काय आणि किती आठवणार आहे? 🤔 let's try..
२००५ स्वातंत्र्य दिनाच्या 🇮🇳 दिवशी आम्ही bikes घेऊन दुपारच्या वेळेस unplanned निघालो राजगडच्या दिशेने.. कात्रजच्या बोगद्यात (तेव्हा एकच होता) traffic मध्ये अडकलो (bikes 🏍️ असूनही), सुटलो, वेल्हेचा रस्ता सोडल्यावर चिखलात bike(s) घसरून पडलो, पायथ्याला कसंतरी पोहोचलो - ह्यातच आमचं सगळं adventure झालं होतं.. तरी काहींना भर पावसात / चिखलात राजगड चढायचा होता.. गेले आणि अर्धा तास कुठेतरी फिरून आले परत.. flatवर 🏢 परतल्यावर जेवायच्या आणि झोपेच्या सोबतीला होतं मलमपट्टीचं 🩹 वाढीव काम..
cut to मार्च-२००६.. ४ गाड्या 🏍️ घेऊन आम्ही ६ जण गडावर मुक्काम करायच्या तयारीनिशी निघालो.. राहुल, वैभव, भूषण, नियंत, सुमित आणि मी.. here too, हा वैभव आणि articles मध्ये असणारा वैभव, two different human beings.. 'ना हो पायेगा' म्हणणाऱ्या सुमितला बळं-बळं चढवलं होतं..
Parle-Gचा 🍪 family pack सोडला तर अजून काही नेल्याचं / खाल्ल्याचं मला तरी आठवत नाही.. पद्मावती तलावातलंच पाणी पियुन fit-n-fine होतो.. आता sophisticated होऊन hygiene बद्दल शिकलो आहोत.. not sure, which one was / is better 😑..
पद्मावती मंदिरात बस्ता 🎒 ठेवत नाही तर, सूर्यास्ताची वेळ झाली होती.. नियंतचा digital camera 📷, तेव्हडा एकच photo काढायचा source होता.. गडावर / group मध्ये मुक्काम करायचा म्हणजे कोणीतरी अती घोरणारा असणारच, किंवा इथल्याप्रमाणे, दुसरा एखादा group गडबड करणारा भेटणारच..
गडावरच्या तुरळक गर्दीचा फायदा घेत त्यादिवशी sunset 🌇 आणि दुसऱ्या दिवशी sunriseचे 🌄 मनसोक्त photo काढत आम्ही, सबंध गड फिरत, "special attraction" नेढ्यात तास-दीड तास timepass केला.. त्यावेळेसची समजूत हीच की, नेढं असलेला, 'राजगड' हा एकमेव गड आहे 🤫..
२६ जानेवारी २०१९.. republic day special
lockdown चालू झाल्यावर जे आठवून-आठवून articles लिहायला सुरुवात झाली / केली, त्यात एक candidate हा republic day special 🇮🇳 सुद्धा होता.. "काही अपरिहार्य कारणास्तव" ते article लिहिलं गेलं नाही.. किती cheap वाटतं ना असं लांब-लचक, useless आणि diplomatic कारण द्यायला / वाचायला.. असो, आपल्याला सवय आहेच हे ऐकण्याची 👂 / सांगण्याची 🗣️..
गुंजवणे गावात नाश्ता करतांना, hotel मध्ये एक poster 🖼️ बघितलं.. गडावर जायला २ वाटा दाखवल्या होत्या (हे poster आजही तिथेच आहे).. आमचं लक्ष कुठे आहे, हे तिथल्या काकांनी लक्षात घेत सांगितलं, "तुम्हाला खरोखर trekkingचा feel घ्यायचा असेल तर जंगलातून जा.. तसंही चोर दरवाज्याने जाणाऱ्यांची आज खूप गर्दी असेल"..
सांगितल्याप्रमाणे आम्ही regular वाट सोडून जंगलातल्या वाटेसाठी डावीकडे वळालो.. ह्या वाटेचं वयशिष्ट असं की उन्हाचा त्रास कमी.. हसत-खेळत आम्ही चालत / चढत होतो.. तेव्हड्यात, जास्त नाश्ता झाला की काय, म्हणून जितेंद्रला त्रास व्हायला लागला.. उलटी 🤮 केल्यावर, he was back to normal..
साधारणपणे अर्धा चढून झाल्यावर वाटेत railings लावलेल्या दिसतात.. डावीकडे ⬅️ सुवेळा माची, समोर ⬆️ बालेकिल्ला आणि उजवीकडे ➡️ पद्मावती माची.. दुसऱ्या वाटेने हे सर्व डावीकडेच.. पद्मावती माचीवर वारेच्या मदतीने सोबतीने फडकणारा अवाढव्य तिरंगा 🇮🇳 आम्हाला स्पष्ट दिसत होता..
इथून पुढे मात्र खरा trek चालू होतो.. वाट थोडीशी अवघड, म्हणजे steep होत जाते.. traverse वगैरे काही options नाही, गप सरळ धार चढायची 😓.. काही ठिकाणी दगडांमध्ये पायऱ्या कोरल्या आहेत, तर कुठे दगडं जुळवून पायऱ्या बनवल्या आहेत.. एखाद्या-दुसऱ्या ठिकाणी तर हात टेकवत, बसून चढण्याखेरिज पर्याय नाही.. छातीला पाय टेकल्याशिवाय जमणं अवघडच म्हणायचं.. पण एक नवीन वाट अनुभवायचं समाधान वेगळंच 😇..
गुंजवणे दरवाजा नंतर बालेकिल्ला, डुबा, नेढं, सुवेळा माचीचा शेवटचा बुरुज.. असा आग्नेय (दक्षिण-पूर्व) ↘️ दिशेचा पसारा आणि काही भाग संजीवनी माचीचाही बघून आम्ही republic day special तिरंगा mobile मध्ये सोबत घेऊन, पद्मावती माचीहून regular, म्हणजे चोर दरवाजा मार्गे खाली उतरलो.. विशेष सांगायचं झालं तर डुबा चढून सुवेळा माचीच्या sideने उतरतांना सगळे squat position 🧎 मध्ये उतरलो होतो 😬.. इथून सरळ चालत, न घसरता उतरणं म्हणजे अजुबाच होईल.. हाच अनुभव आठवत विनायकला गेल्या वर्षी warning ⚠️ देण्यात आली होती.. anyway..
ह्या नंतर ९ मार्चला (त्याच वर्षी) आम्ही तोरणा-राजगड केला.. मागच्या वर्षीच्या नवसकाळीतला राजगड, ह्यावर्षी राजगड परिक्रमा आणि गेली ३ वर्षे सलग, फेब्रुवारी महिन्यातल्या SRT बद्दल लिहीत नाही आता.. ह्यांच्याबद्दल त्या-त्या ६ articles मध्ये तुम्ही विस्तृतपणे आधीच वाचलं आहे.. पण जर ह्यातला highlight, "drone shot" 🛩️ तुम्ही miss केला असेल, just in case, तर adding here for ready reference..
(flashback ends, back to present)
plan राजगड नव्हताच.. पुढचे ९ दिवस सलग ९ trek करायचे आहेत (नवसकाळी), म्हणून जवळच काहीतरी explore करायचं ठरवलं / ठरलं होतं.. सोबतीला चिंतन असणार होता, पण काही अपरिहार्य कारणामुळे 🤣 तो cancel 😒 झाला..
आदल्यादिवशी राहुलचा message, "I am available ✅, राजगड करायचा का?".. तुम्ही guess केलं असेलच, पण तरी, नेहमी जो articles मध्ये असतो, हा तो राहुल.. मागच्या वर्षी (२०२१) नवसकाळीत जो राजगड केला होता, तो खूप hectic 😴 झाला होता.. आणि आता (२०२२), next day, सोमवार पासून नवसकाळी चालू होणार होते.. "जो होगा, देखा जायेगा" विचार करत / not fully convinced, मी "no problem" reply केला.. आता राजगडची तार छेडल्यावर "love 💓 के लिये कुछ भी करेगा" वाला वेडेपणा कुठे गप बसू देणार होता !!.. "जंगल trek करू", ह्याहून दुसरं काही discussion नाही.. अजून जे तयार झाले, ते प्रसाद, प्रशांत आणि वैभव.. here too, हा वैभव तोच, ज्याच्याबद्दल तुम्ही नेहमी वाचता, not from २००६..
२५ सप्टेंबर २०२२.. फिर एक बार, पहिलं प्रेम
ह्या आधीची recorded trail, App मध्ये load करून follow करणे, हे आजचं पहिलं target.. सुरवातीलाच जे ३-४ घर लागतात, त्यातल्या एका काकांनी, 'आम्ही वाट चुकलोय', हा संशय घेत विचारलं, "कुठे जायचंय?".. अर्थातच आमचं "गडावर" उत्तर ऐकत, त्यांनी reply केला, "इथून नाहीये रस्ता" 🤦.. असो..
सुरवातीला वाट promote करायचे कष्ट घेतलेले दिसतात 👏.. ठिकठिकाणी दगडं टाकून सोईस्कर बनवायचा सफल प्रयत्न करण्यात आला आहे.. same as last time, आजही आम्हीच पाच जण होतो ह्या वाटेवर 🖐️.. गवत इतकं वाढलेलं होतं की पहिल्या पावलापासूनच shoes आणि pant भिजले 👖.. दोन ओढे जे लागतात, अजिबात स्वतःला / बुटांना 👟 न वाचवता, cross केले.. एक तर already भिजले होते, आणि दुसरं म्हणजे, फागुल गव्हाण खिंडीत दगडावरुन सटकल्याच्या आठवणी अजून ताज्या होत्या 🆕..
railings नंतर जो grade वाढतो, तो भाग आज घसरडा सुद्धा होता.. सगळ्यांची एकच complaint, पाहिजे तिथे नाही आणि गरज नाही तिथे भरमसाठ लाऊन ठेवल्या आहेत, railings 🫤.. ज्याला जसं जमेल तसं, आप-आपल्या हिशोबाने चढत होता.. राहुल नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या पुढे, गुंजवणे दरवाज्यात जाऊन आमची वाट बघत, time lapse 🎥 काढत होता आणि reels बनवत होता.. Instagram link.. आम्हीही दरवाज्यात पोहोचल्यावर ही संधी गमावणार नव्हतो 🤷..
धबधबे तर आहेतच attraction, पण पावसाळा असला की सह्याद्रीत, नजर जाईल तिथपर्यंत फुलं (सुद्धा) बघायला मिळतात 🏵️ 🌼 🌸 आणि त्यात ही वाट येव्हडी popular नसल्याने इथे तर बगीचाच आमची वाट बघत होता.. निरनिराळ्या रंगांची, छोट्या, अति छोट्या आकाराची, सगळ्यांना सोबत घेऊन 📷 (तोडून नाही), आम्ही क्षणभर विश्रांती ⏸️ घेत पुढे बालेकिल्ल्याकडे निघालो..
गर्दी असो वा नसो, एकदा महादरवाजा ओलांडला की आपल्या स्वागतासाठी माकडं 🐒 इथे नेहमी हजर असतात, त्रास द्यायला.. shield (trekking pole 🦯) बाहेर काढत सावधपणे पुढे राजवाड्याकडे गेलो.. तिथे आधुनिक / शिकलेल्या किंवा राहुलच्या शब्दात 'उन्नती / उत्क्रांती झालेल्या' माकडांची जत्रा भरली आहे, बघून आम्ही (मी + राहुल) एप्रिल मध्ये परिक्रमेच्या वेळेस खालून जे खिडकी type structure 🪟 दिसलं होतं, ते शोधायला निघालो.. काही पावलं चालत नाही तर, उन्नत किंवा मागासलेले, कुठल्याच प्रकारच्या माकडांचा त्रास नाही.. ☮️ नीरव शांतता.. bliss 😇.. inner peace ('kung fu panda' 🐼 fame)..
खिडकी जवळ ५ मिनिट बसत नाही तर bluetooth speaker वाले माकडं आले आमच्या मागे-मागे 🗯️.. almost १० 🕙 वाजले होते.. सकाळपासून / चालू केल्यापासून पोट अनवाणीच होतं.. चुकीचं / बरोबर लिहिलंय, सोडा.. भावना पोहोचल्या ना, बस्स.. सोबत आणलेला नाश्ता इथे करायचा का पद्मावती माचीला, का थेट नेढ्यात ⭕?.. ह्या गर्दीमुळे बालेकिल्ला उतरतांना traffic jam 🚦 व्ह्याच्या आत आपण उतरू, नाश्त्याचं नंतर बघू.. असा सगळा हिशोब करत, आम्ही बालेकिल्ला उतरलो 📉.. वाटेत प्रसाद, प्रशांत आणि वैभवशी गाठ पडली.. त्यांनाही "लवकरात लवकर उतरा" सांगण्यात 😮💨 आलं..
flag hoistingच्या ⛳ जागी पोहचताच, 'आता हे तिघे येईपर्यंत नाही थांबू शकत' म्हणत डब्बे 🍞 बाहेर काढत आम्ही पोटाला shoes घातले.. वैभव आजचा राहुल होता, म्हणून त्याच्यासाठी थोडं ठेवत आणि range असल्याचा दुरुपयोग करत आम्ही सात समंदर पार अमनला झोपेतून उठवलं.. ढगांनी ☁️ कृपा केली तर तोरणा आणि सिंहगड दिसतील, ह्याबाबतीत तत्क्षणी फक्त 'वाट बघणे' ⏳ हेच आमच्या नशिबी होतं..
next target 🎯 was 'needle hole'.. नेढं.. राजगडला (किंवा नेढं असणाऱ्या कुठल्याही गडावर) येणारा प्रत्येकजण "शक्यतो" नेढ्याला भेट दिल्याशिवाय परतत नसतो.. हो, "शक्यतो".. कारण पहिल्यांदा मोहनदरीला गेलो असता, आम्ही नेढ्यात न जाताच माघारी आलो होतो 😞.. इथे नेढ्यात जायला आणि गडमाथ्यावर जायला २ वेग-वेगळ्या वाटा आहेत, so.. पण 'लहू मुह लग गया' मुळे ही disappointment काही जास्त दिवस टिकली नव्हती 🥳.. now, back to 'पहिलं प्रेम'..
सगळ्यांसोबत परत एकदा नाश्ता करत 🍎, आम्ही निघालो सुवेळा माचीच्या दिशेने.. सिंहगड side आता clear झाली होती (view).. पहिल्या चिलखती बुरुजात group photo 🤳 काढून, खाली, थोडं पुढे, नेढ्यात आलो.. ह्याचा व्यास साधारण १०-१२ फूट आहे.. ऐसपैस वारा इथे नेहमीचं नाटक 🙃 आहे.. wide angle cameraचा सर्वात जास्त फायदा जर कधी आणि कुठे झाला असेल, तर, आज आणि इथे.. २०-२५ मिनिट तिथेच बसून होतो.. गर्दीच इतकी होती की, photo पेक्षा photobombingच जास्त होत होतं, पण 'मनासारखे photo निघाल्याशिवाय नाही निघायचं', हा निर्धारही पक्का होता..
![]() |
| credits: राहुल / प्रसाद 🤝 |
![]() |
| नजर जाईल तिथपर्यंत "नैनसुख" credits: राहुल |
इथून पुढे, शेवटच्या बुरुजापर्यंत जाऊन आम्ही पुन्हा "नजर जाईल तिथपर्यंत" नैनसुख अनुभवलं.. आता मात्र वारा नाहीसा झाला होता आणि 'पाऊस पडणार आहे', अशी अचूक भविष्यवाणी करत आम्ही चोर दरवाजा मार्गे non-stop पायथ्याच्या दिशेने सुटलो.. राहुलला काहीच नाही, आणि प्रशांतला भरपूर पाऊस लागला.. चहा ☕ - जेवण 🍱 - चहा उरकत गाडी चालू झाली.. खेड शिवापूर toll plaza 🛣️ दोन्ही sideने, येतांना / जातांना, literally zero traffic (गाडी जी एकदाच थांबली, ती थेट barrier समोरच), हे आजचं वेगळंच achievement 😎..
असं काही आहे, खूपच थोडक्यात, आमचं पहिलं प्रेम..
articleचं title "पहिलं प्रेम" आहे म्हणून हे one line extension, जे राजगड / trek शी संबंधित नाही..
I had attended one of the sessions on 'breathing', where I learnt about, "any type of cancer is caused by deficiency of oxygen"..
that's all for today..




















