Wednesday, November 30, 2022

नागेश्वर गुहा

​।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

क्या समय? क्या प्रलय? दोनो में तेरी महानता.. नागेश्वर गुहा.. ending on a high note

बामणोली sideने ३ वर्षांगोदर (December २०१९) जेव्हा वासोटा ⛰️ केला, तेव्हा boatingची 🛶 आयुष्यभराची हौस पूर्ण झाली 😐.. म्हणजे next time इथून चुकूनही यायचं नाही, हे ठरलं - अगदी carved in stone 🪨.. पण नागेश्वर गुहेचा trek अजून बाकी होता.. म्हणून, चोरवणे sideने जर एखाद्या groupने कधी plan केला तर नक्कीच जाऊन, परत आल्यावर article लिहू 📝, असा सगळा योग जुळून आल्याचा परिणाम म्हणजे - आज, आता, ताबडतोब - तुम्ही हे article 📜 वाचत आहात..

SGच्या WhatsApp statusला काही दिवसांगोदर ह्याचं schedule 📑 बघितलं / दिसलं.. 'अजून कोणी येईल का?' चा शोध घेत दोन्ही राहुल तयार झाले 👍.. आदल्या दिवशी विशालने publish केलेल्या list मध्ये मात्र एकच सापडला.. असो,

नागेश्वर गुहा - इथला शिखर नागाच्या 🐍 डोळ्यांसारखा दिसतो, कदाचित त्यामुळे ह्या ठिकाणाला 'नागेश्वर' असे नाव पडले असावे.. इथे पाहण्याजोगी एक अतिशय अनोखी प्रक्रिया म्हणजे - वर्षभर होणारा शिवलिंगाचा 'अभिषेक' 💧.. अगदी २४*७ / १२ महिने / ३६५ दिवस / २४ तास (pick your favorite) - पाण्याचा एक नैसर्गिक प्रवाह 🌧️ डोंगरमाथ्यावरून खाली झिरपतो आणि थेट शिवलिंगावर पडतो.. लोकांचा असाही विश्वास 🍀 आहे की इथे केलेला नवस पूर्ण होतो.. सांगायची गरज नसावी, पण तरी - महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार निमित्त इथे दूरवरून भाविक दर्शनासाठी 🙏 येत असतात..

क्या समय? क्या प्रलय? दोनो में तेरी महानता

आम्ही शनिवारी 🕚 रात्री ११ वाजता पुण्याहून निघालो 🚌.. गाडी मध्ये बसलो आणि cylinder, शेगडी, भांडे घेऊन निघणारा जुना विशाल साधारण दीड वर्षांनी भेटला ☺️.. तसं typical details असणाऱ्या message मध्ये त्याने नाश्त्याला maggi 🍜 (आहे / असेल) असं नमूद केलं असल्याने अंदाज आला होताच, पण "things to carry"च्या list मध्ये plate 🍽️, spoon, cup नसल्याने खात्री नव्हती..

२७ नोव्हेंबर २०२२

Google Maps वर "डांगेवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर" ही pin 📍 असलेल्या locationला विशालने जेव्हा चहा करायला पातेलं शेगडीवर 🔥 ठेवलं तेव्हा वाजले होते ५:४५.. AH47 (ग्वालियर-मुंबई-बेंगलुरू) सोडल्यावर येऊन-जाऊन करत त्रास देणाऱ्या झोपेने परेशान झाल्यामुळे आता ☕ चहाचा (सु)वास आल्यावर काही राहवेना.. दूध (powder) टाकूनही black tea सारखा दिसणाऱ्या चहात दूध powder कमी झाली होती की चहा powder जास्त? 🤔 ह्याचं उत्तर त्यालाच माहित.. score - बनवणारे ०, खाणारे-पिणारे १..

ह्याची कमतरता भरून काढली maggi ने.. आपण सर्वांना सवय / माहिती आहेच, तरी - maggi बनवायला फक्त पाणी 💧 पुरेसं नसतं.. maggi बनवायला लागते "कला".. hot-n-sour soup 🍵 नव्हतं आज, पण जसं बटाटा कुठल्याही भाजीत चालतो, तसं maggi बनवतांना किंवा बनवून झाल्यावर त्यात काहीही टाकलेलं चालतं, पण हे फक्त कलाकारालाच जमतं.. bonus point के साथ 🤤, score - बनवणारे २, खाणारे-पिणारे १..

इथून साधारण गडाच्या दिशेने २ कि.मी. नंतर टाकायचं होतं trekkingचं पहिलं पाऊल.. "journey of thousand miles begins with a single step" म्हणतात ना, त्यातलं पहिलं पाऊल / single step, हेच ते.. ह्याची pin 📌 सुद्धा GMaps वर कोरलेली आहे.. पाणी 🍶 घालून आणि shoes 🥾 घेऊन परत एकदा bus मधून उतरून आम्ही निघालो.. 'काहीतरी चुकीचं लिहिलंय' असं वाटलं असेल तर तुम्ही बरोबर आहात.. नसेल वाटलं तर मात्र परत वाचा.. check करतोय ओ, तुम्ही आहात ना सोबत! 🤨..

वाट ठसठशीत आहे, हे माहित होतंच आणि सोबत होती 'सुरवातीला चढ, मध्ये traverse / आडवा आणि शेवटी steep', ही अधिकची मानसिक तयारी.. वाजले होते ०८:०० 🕗.. १०:३०चं 🕥 सुटसुटीत target ठेऊन चढायला सुरुवात केली.. कोकणातून वर चढायचंय, म्हणून वाऱ्याचा हट्ट धरत निसर्गाशी भांडण्यात काही अर्थ नव्हता 😓.. फक्त काल जो (पुण्यात) संध्याकाळी १०-१२ थेंब पाऊस झाला / पडला, तसलं काही वातावरण नको 🤞, हीच प्रार्थना करत आम्ही elevation gain 📈 करायला लागलो..

खोटा नागेश्वर, वासोटा, जुना वासोटा and pollution

साधारण अर्ध चढल्यावर समोर दिसलं नेढं / नाखिंद.. म्हणजे, job half done.. माहित नाही, "का?", पण नेढं नुसतं बघितलं / दिसलं तरी जे समाधान मिळतं 👻, त्याचं काही मोजमाप नाही.. कदाचित कारण असावं, निसर्गाच्या ताकदीचा पुरावा भेटल्यावर, "आपण किती छोटे आहोत" ह्याची होणारी जाणीव.. सतत reminders 🔔 लावत-लावत एखाद्या गोष्टीची जी सवय होते आपल्याला, तसंच काहीतरी..

नेहमीप्रमाणे राहुल, आणि आजचे नवीन जोडीदार, मंदार, काही वेळ सोबत होते.. traverse करतांना हे दोघेही पुढे निघाले आणि मला वाटेत भेटले चिपळूण इथले रहिवासी - समीर जोशी.. ह्यांची 'भटजी' 🕉️ म्हणून ओळख.. इथे नियमित येऊन पूजा करणारे.. localite म्हणून विशालने आजच्या late lunchच्या 🍱 सोयीची जबाबदारी ह्यांना दिली होती.. सकाळी चहा घेतांनाच त्यांनी आम्हाला, "वर आपल्याला पूजा करायची आहे, group photo काढायचा आहे", म्हणत head-start ⏯️ घेतला होता..

इथून पुढे होता चढ.. आणि चढ इतका चांगला 😓 होता की भाविकांच्या सोयीसाठी इथे कोरलेल्या पायऱ्या चढायला काही ठिकाणी railing तर काही ठिकाणी साखळ्याही ⛓️ लावलेल्या आहेत.. 'हे ही कमी पडेल' हा विचार करणाऱ्यांनी अगदी लोखंडी शिड्याही इथे बसवलेल्या दिसतात.. सर्वांचे आभार 🙇 मानत वर जेव्हा वासोट्याहून येणाऱ्या / वासोट्याला जाणाऱ्या वाटेला लागलो, तेव्हा "हत्ती 🐘 गेला, शेपूट राहिली", म्हणत, 'आता १० मिनिटात गुहा गाठू' विचार करत जेव्हा mobileच्या screenला 'उठ' 🙃 म्हणून हाक मारली, तर दिसणारे आकडे बघत एक क्षणभंगुर विचार cut मारून गेला - 'range नसल्यावर mobileचं घड्याळ सुद्धा बंद पडतं का?' 😜..

गुहा, कळस and last steps - credits: राहुल

credits: राहुल

atop

(as projected) exact १० मिनिटात बूट काढून, गुहेत शिरत, समोर होती पिंड.. rather, मी पिंडीच्या समोर होतो.. ०९:४५.. थोडा वेळ दम खात, 'पिंडीवर non-stop पडणारं (टीप-टीप 💧 का होईना) पाणी कसं आणि कुठून येत असेल?' ह्याचा अजिबात विचार न करता (शास्त्रज्ञ ⚛️ करतील / करत आहेत, as per their priority list), वर कळसरुपी शिखरावर 🚩 जाऊन यायचं ठरलं.. प्रशांत (आल्यावर) आणि आम्ही तिघे, बाकीचे यायच्या आत जाऊनही आलो.. हिवाळा 🧣 असल्यामुळे, as expected, फक्त जो थोडाफार दिसत होता, तो म्हणजे 'चकदेव' ⛰️.. वर जे तुम्ही hot-n-sour soup बद्दल वाचलं, तो प्रसंग ह्या गडाच्या पायथ्याचाच ⛺.. राहिलेलं public यायच्या आत जी थोडीफार माहिती ℹ️ जोशींनी दिली, ती पुढीलप्रमाणे,

चोरवणे गावाहून नागेश्वर देवस्थानाला यायला forest departmentची परवानगी 🆗 लागत नाही.. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कैद्यांना इथे शिक्षा देण्यासाठी 👮 ठेवण्यात येत असे.. नंतर, J. Asthana ⚕️ J. Williams 💂 यांनी, इथे यायला-जायला नवीन मार्ग बनवला.. इथे आपल्याला अध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही समाधान भेटतात 🧘‍♂️.. अर्ध चढून झाल्यावर दिसणाऱ्या नेढ्याचं / नाखिंदचं, 'हत्तीची सोंड' म्हणून चित्र आखलं तर आपल्याला हा देव अंबारीत बसल्यासारखा लक्षात येतो..

दरम्यान, (सतत पाणी पडत असल्यामुळे 🫗) पिंडीची अजून झीज होऊ नये, म्हणून गाववाल्यांनी वरून ठेवलेलं तांब्याचं पात्र (next photo), त्यांनी उचलून आम्हाला 'दगडी', म्हणजे original पिंडीचे दर्शन घडवून दिले (first photo 🔝) 🙏.. सगळे वर पोहोचल्यावर वेळ होती गणपतीची 🐘, शंकराची 🔱 आणि देवीची ♀️ आरती म्हणायची, followed by a group photo 📸..

ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था

दिवसाचा तिसरा प्रहर 🕛 चालू झाल्याचं लक्षात घेत आम्ही इथून थोडं खाली, बामणोली / मेट इंदावली sideने वर येणाऱ्या वाटेला लागणाऱ्या विहिरीतून पाणी भरून माघारी येत, आलो त्या रस्त्याने खाली उतरायला सुरुवात केली.. गंमत आहे ना? - तिसरा प्रहर चालू झाला की त्याला म्हणायचं "दुपार" 🌞.. असो.. ऊन आणि दमटपणा, ह्यांचा प्रकोप असा की अंगातून वाफा निघत होत्या.. थांबायची हिम्मत "ना" बराबर 🚫.. पण चालायचं motivationही तेवढंच - शून्य / भोपळा ⭕.. जेव्हा शेवटी, म्हणजे चढतांना सुरवातीलाच ज्या जांभा दगडाच्या पायऱ्या लागल्या होत्या, त्यांवर चालत जो सुकून भेटला, त्याचे "क्या कहने?" 😇..

जांभा - एक प्रकारचा खडक, जो सहसा उष्ण आणि ओल्या विषुवत वृत्तीय (equatorial) प्रदेशांत सापडतो.. भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो.. लाल रंगाच्या 🔴 ह्या खडकात iron आणि bauxite खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.. हा अतिशय खडबडीत, पण सच्छिद्र आणि कातळापेक्षा वजनाने हलका असतो.. कोकणातील बहुतांश घरे ह्या दगडापासून बांधली जातात.. (संदर्भ: wikipedia)

late lunch / early dinner साठी suggest केल्याप्रमाणे आम्ही चिपळूण येथे तुलसी hotelला (राजस्थानी) थाळी 🍱 खायला टेकलो.. brunch सारखीच lunner सुद्धा एक term असायला हवी ना? इथे, हे type करून Google search 🔍 केलं तर साक्षात्कार ✨ असा झाला की, there actually is an established term "lunner", by exactly the same meaning 🤓.. अश्याच अजून बऱ्याच बाबतीत मी अंधारात 🌑 आहे, I know.. but, so are you.. all sailing in the same boat ⛵..

"चेन्नई एक्स्प्रेस", "पांढरा रस्सा, तांबडा रस्सा" आणि "लस्सी हुन बनवत असतील कढी" 🤣, ह्या trekच्या काही "ending on a high note 🔖" आठवणी..

Monday, November 7, 2022

पट्टा / विश्रामगड

​।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

everything changes with time (and water?).. पट्टा / विश्रामगड

नाशिकला 🍇 असल्याचा, rather, and more appropriately, परत एकदा "work 👨‍💻 from home house"चा नाजायज़ फायदा घेत 😉, ह्यावेळेस दिवाळीत फराळासोबत मिसळ-पाव वर जरा जास्तच जोर होता.. जसे लहानाचा 🧒 मोठा 🧔 होत असतांना केलेले treks आणि गेल्या ३-४ वर्षात केलेले treks are far-off, same analogy fits perfect 👌 in devouring the नाशिक special 🤤.. अर्थात, ह्या सगळ्यात *conditions applied (and fulfilled) आहेतच.. जश्या सिंहगडला / सिंहगडची भजी 🧅 खायच्या काही आहेत..

चुलीवरची मिसळ (साधना)

पण ह्या fulfillment साठी पांडवलेणी नकोसं वाटतं 😒.. इथल्या teenagersची 🧑 immaturity सोसण्यापेक्षा (try it, to feel it), कुठेतरी दुसरीकडे जाऊ म्हणून शुक्रवारी peacock hills 🦚 नंतर शनिवारी, 'रांजणगिरी' का 'विश्रामगड?', ह्याचं conclusion, 1️⃣ दिवसाच्या second-halfचा plan disturb होणार नाही, 2️⃣ family सोबत असल्यामुळे वर काहीतरी बघण्या सारखं पण पाहिजे, असे काही parameters लक्षात घेत, पहाटे 🕠 ५:३० ला निघायच्या हिशोबाने करण्यात आलं..


पट्टा / विश्रामगड - एकाच नावाने एकाहून जास्त गड असतात, हे आपल्यासाठी काही नवीन नाही 😏, e.g., भैरवगड, रतनगड, जयगड.. तेच September मध्ये कुर्डूगडला गेलो असता, जेव्हा लक्षात आलं की त्याला विश्रामगड सुद्धा म्हणतात, तेव्हा बाजी पासलकर ह्याचा विश्रामासाठी 😴 वापर करायचे, असं वाचण्यात आलं.. असाच अजून एक विश्रामगड म्हणजे (अहमद)नगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यातला "पट्टा" 🥋 किल्ला..

पट्ट्या किंवा गरुडाच्या 🦅 पसरलेल्या पंखा सारखा पसारा असणाऱ्या ह्या किल्ल्याची ओळख आधी फक्त 'पट्टा' ह्या नावाने होती.. १६७९ साली, जालनाची लूट 💰 घेऊन परततांना शिवाजी महाराजांना मुघलांशी झालेल्या त्यांच्या शेवटच्या लढाईत मदत करत, त्यांचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे "बहिर्जी नाईक", यांनी detour करत / करवत पट्टा किल्ल्यावर आणले.. प्रकुर्ती खराब 🤒 झाल्याने त्यांनी इथेच साधारण महिनाभर आराम करत ह्याला नवीन नाव दिले, आरामगड 🤥, I mean, "विश्रामगड"..

०५ नोव्हेंबर २०२२

The morning was journey time via then recently built सिन्नर bypass 🛣️ and very well maintained tar road till base of the fort (a trouble-free driving is worth a mention 🙂)

that's an excerpt from earlier post on विश्रामगड, कळसूबाई and रतनगड, during (work-from-office era) 🎇 दीपावली २०१८'s week off (read here).. it was then engraved with such a confidence that only if there is a loophole in the popular saying, "कमान से निकला तीर something, something .. ..", I'd now happily switch 🔀 the sides and bet my 2 cents.. "who is to blame?", water?, rain?, hold it for a while ⏸️.. पण लक्षात आलं असेलच - it was so frustratingly potholed 🫤 this time, that it was just super easy to decide - परत ↩️ टाकेद-भगूर मार्गे जाऊ.. कितीजरी खराब असला तरी, आलो त्या रस्त्या एव्हढा तर नक्कीच नसेल.. 

इथल्या kick-offला नुसत्या ☕ black teaची मेजवानी पुरेशी होती / आहे, कारण गड उंच जरी असला तरी पायथ्यापासून चढ जास्त नाही आहे.. शिवाय, पट्टाई देवी मंदिरापर्यंत पायऱ्या आहेत.. तिथून पुढे पठार आणि top पर्यंत तुरळक चढ.. पण त्याआधी..


पायथ्याला कमानीजवळच एक man-made हत्ती 🐘 (actual size) दिसतो.. काही माहितीफलक आणि not-to-scale map चाळत थोडं वर चढल्यावर काही पाण्याचे टाके आणि गुहा-cum-मंदिरं लागतात.. अजून थोडं चढल्यावर (खालून दिसणारं) पट्टाई देवीचं मंदिर 🛕 लागतं.. वाटेत एक photogenic त्र्यंबक दरवाजाही लागतो, ज्याला आपण उजवीकडे ठेऊन पुढे जातो.. इथे खाली बघितल्यावर एखाद्या गावाहून वाट येत असावी, असं दिसून तरी येत नाही 🤔.. वक्त-वक्त ⏱️ की बात है..

इथून पुढे आहे गडाचं पहिलं attraction, अंबरखाना.. बाहेर शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला नमन करत अंबरखान्यात शिरताच थकवा नाहीसा झाला / होतो 😀.. गडावर अजून तरी अजून कोणी आलं नव्हतं.. त्यामुळे सोबतीला लाभलेल्या शांती ☮️ आणि गारव्याचा आनंद लुटत इथल्या 3D paintings मधून इतिहास अनुभवत, विभूतीला शिकवत, पुन्हा शिवचरित्र refresh झालं..


सुरुवात होते शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या / घडलेल्या शिवजन्मापासून 👼, जे आज आपण बघतो की गाड्यांचे silencer काढून celebrate केलं जातं.. one word, (कितीतरी type करून delete केल्यावर) pity 😔..




इथून पुढे आहे रायरेश्वरला घेतलेली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ 🕯️ आणि स्वराज्याचे तोरण बांधण्यात आलं, तो तोरणा किल्ला 🚩.. पुरंदरच्या लढाईत शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे मुरारबाजी 🤺.. मुलासाठी ज्या आईला रायगडचा सर्वात कठीण कडा उतरावा लागला, अशी हिरकणी 🧗‍♀️.. 'महाराज विशाळगडावर पोहचल्याशिवाय नाही' म्हणत, मृत्यूलाही चकवणारे बाजीप्रभू 🫡 (घोड खिंड / पावनखिंड).. प्रतापगडाच्या पायथ्याला वाघनखाने केलेला अफज़लखानाचा वध, लाल महालात (पुणे) कापलेले शाइस्तेखानाचे बोटं आणि मिठाईच्या खोक्यातून साधलेली आग्र्याहून सुटका.. centerला आहे रायगडच्या दरबारचा देखावा 👑..





शेवटचे चित्र काही केल्या लक्षात येईना.. कदाचित जालनाची लूट असावी, पण Bible पकडलेले father ✝️ चित्रित असल्यामुळे काही निष्कर्ष निघत नव्हता.. तुम्हाला काही कल्पना / खात्री असल्यास नक्की कळवा..


इथून पुढे, target होतं गडाचं शिखर.. पवनचक्क्यांच्या सोबतीला आता आजूबाजूचे गड दृष्टीस 🧐 पडायला सुरवात झाली होती.. कळसुबाई डोंगराचं शिखर मोठ्या मुश्किलीने precipitated धुरावरून 🏭 डोकावत होतं.. त्याच्या शेजारी, सह्याद्रीतले सर्वात अवघड trek म्हणून ओळख असलेले AMK (अलंग-मदन-कुलंग), lens blur केल्यागत कुठेतरी हरवले होते.. जवळ असल्यामुळे बितनगड आणि औंढा सुटसुटीत ओळख दाखवत होते 🤩.. निलेंद्रने म्हंटल्याप्रमाणे, 'हर साल कम-से-कम १५ दिन lockdown करना चाहिये' 🤝, म्हणजे आपण करत असलेलं pollution कुठेतरी settle होऊन, घरबसल्या आर-पार निसर्ग तरी अनुभवता येईल..

ज्यांचा दंतकथेवर विश्वास आहे, त्यांच्यासाठी - कळसुबाई जर आज हयात असती तर तिने रुसल्यावर एकदा तरी इतर राज्यात / देशात ✈️ जायचा विचार नक्कीच केला असता.. 'कुठली दंतकथा?' विचारताय?, तर, मार्च-२०२१ च्या articleची मदत होऊ शकेल (read here).. now, let's revisit that unanswered question, "who is to blame?".. the answer correct is, "time".. and hence, the title of this article..

do zoom for the windmills

top हून दिसणारं गडाचं दुसरं attraction, म्हणजेच औंढा किल्ल्या पासून सुरू होणारा अर्धगोलाकार कडा, ज्याच्यावरून गडाला "पट्टा" हे नाव पडलं, तो गरुडाचा पसरलेला पंख बघत, दम खाऊन झाल्यावर, गारठायच्या आत आम्ही नाश्त्यासाठी खालच्या gazeboत माघारी आलो.. वाटेत रांगेने कोरलेल्या भरपूर पाण्याच्या टाक्या दिसतात.. अश्या बांधकामाचं कोरीवकामाचं एक कारण असंही असतं की वरून वाहून येणारं पाणी सर्वात खालच्या टाकीत पोहचेपर्यंत आपोआप स्वच्छ होऊन जातं 👍.. ह्याचा, "वेगवेगळ्या रंगाचं पाणी" असाही अर्थ होतो..

परतीच्या वेळेस (उतरतांना) वेळ होती, त्र्यंबक दरवाज्याला अजून एका 📸 photosessionची.. वाटेत अजून २ जण दिसले, आणि हीच होती आजची गडावरची गर्दी.. '४ वर्षांगोदरचे माकडं लुप्त झाले का?' च्या सोबत 'खरंच शनिवार आहे का?' 🤨, आता ह्यावरही doubt यायला लागला होता..

विभूती, योगेश काका, तनिष

ठरवल्याप्रमाणे म्हैसवळण घाट उतरून टाकेद-भगूर मार्गे घरी माघारी आलो.. indeed, a better option.. आता पुढच्या वेळेस कुठल्या रस्त्याचा प्रचार करेल, ये तो वक्त ही बतायेगा, because everything changes with time ⏳..

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...