Friday, October 15, 2021

नवसकाळी २०२१

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

नवरात्र.. दरवर्षी येणाऱ्या चार पैकी सर्वात प्रचलित आणि भारतात सर्वत्र साजरी होणाऱ्या अश्विन महिन्यातल्या शारदीय नवरात्रीत देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते, जे खालील प्रमाणे आहेत,
१. शैलपुत्री
२. ब्रह्मचारिणी
३. चन्द्रघंटा
४. कूष्मांडी
५. स्कंदमाता
६. कात्यायनी
७. कालरात्री
८. महागौरी
९. सिद्धिदात्री

उपवास करणे 🍌, अनवाणी राहणे 👣, दांडिया 🥢, नवमाळ 📿 हे ह्या नवरात्रीतील प्रचलित culture.. तसेच सिंहगडनवम ⛰️, नवरन 🏃, nav ride 🚴‍♂️ हे नवीन culture.. असंच काहीतरी मी सुद्धा गेली २ वर्षे follow करतो आहे..

नवरात्री नवसकाळी.. 9 days, 9+1 hikes
वर्ष तिसरे, २०२१.. a half Everesting and a double Marathon

Day Yellow 🐥, सिंहगड (५२६ मी., ५.७ कि.मी.): नवरात्र आली की रोज (नऊ दिवस) सिंहगडला येणाऱ्यांची रांग लागते.. ह्यात काही नवीन नाही, आणि आज काही वेगळं नव्हतं.. त्यात गुरुवार असला की विचारायलाच नको 😓.. असो.. मागच्या वर्षी (नवरात्री दरम्यान) weekendsला सिंहगड trek बंद होते, म्हणून exact मधले ५ दिवस सिंहगड केले होते.. त्या उलट 🙃, ह्या वर्षी पहिला, पाचवा आणि शेवटचा दिवस सिंहगडच करायचा, असं ठरवलं 📌..


Day Green 🐸, तळजाई (२३७ मी., १०.७ कि.मी.): सोबतीला आज वैभव होता.. मागच्या रविवारी १२ कि.मी.च्या trekला १२ तास लागले होते 😨, म्हणून आज २ तासात आपलं already १० कि.मी. चालून झालंय, ह्यावर विश्वास बसत नव्हता.. अरे हो, त्या trekची स्वतंत्र post लिहिलेली ✍️ नाही.. थोडक्यात 🤏 सांगायचं झालं तर.. ना गार वारा, ना गारवा, ना गारा, ना वारा 😜.. फक्त कोकणातला दमटपणा 😰.. त्यात लेण्यांमध्ये झालेल्या photo-session 📸 ने सगळी morning energy खाल्ली.. ह्यात एक नवीन गोष्ट शिकलो, ती अशी की photo मध्ये एकच व्यक्ती 👯‍♂️ दोनदा कशी आणायची, without any editing - magic 🎩 it is.. trekचा first half भरपूर exhaustive 🥵 होता ज्यात सगळ्यांनाच थोडा-फार त्रास झाला.. location होतं - खडसांबळे लेण्या आणि केवनी पठार.. तासभर पठारावर आराम 😴 केल्यानंतर जेव्हा बरं वाटायला लागलं तेव्हा समोर फक्त एकच target 🎯 होतं 'आता घनगड सोडायचा नाही'.. now, back to नवसकाळी..

magic! isn't it? #noedit
credits: Vaibhav

all Ks
this (and similar) was all we did in the caves
credits: Vishal

तळजाईच्या schedule मध्ये चिखल (पावसाळ्यात) आणि मटार करंजी 🥟 (any season) नेहमीचे.. कधी-कधी मोर 🦚 दिसायला चुकत असले तरी त्यांचे आवाज आजपर्यंत कधी चुकले नाही.. चलते-चलते गप्पा 🗣️ मारत 'next weekend काही plan आहे का?' विषय निघाला.. ह्या वर्षी आधीच anniversaryला घरी नव्हतो.. 'मुलाच्या वाढदिवशी 🎂 तरी परत कुठे जायला नको' म्हणत दोन ✌️ ओळखीच्या (ज्यांच्याबरोबर मी नियमित treks केले आहेत) groups ने schedule 📅 केलेला 'रतनगड ते हरिश्चंद्रगड' trek नंतर करायचं ठरवलं.. तुम्ही ह्या अगोदरही काही posts मध्ये वाचलं असेलच - there is always a next time 😇..

credits: Vaibhav

Day Grey 🐨, खंडोबा टेकडी (३६७ मी., ८.९ कि.मी.): आजच्या plan मध्ये होता 'निळकंठेश्वर family trek 👨‍👩‍👦'.. काही दिवसांगोदर पर्यंत, ह्याबद्दल ऐकलंही नव्हतं.. Sandeepचा YouTube video 📽️ (channel: studious wanderer) आणि Google Maps 🌏 वर reviews वाचून लागलीच नवसकाळीच्या list 📝 मध्ये add केला.. पण सुमेधला सर्दी 🤧 झाली आणि तो plan आता झालाय postpone.. कोई नई, there is always a next time.. Plan B म्हणून नेहमी 'खंडोबा टेकडी' असतेच, जी (येणाऱ्या) परवाच्या दिवशी सुद्धा उपयोगी ठरली..


Day Orange 🍂, राजगड (८२८ मी., १०.८ कि.मी.): २.५ वर्षांगोदर मोरगिरीलाच भरपूर उशीर झाल्यामुळे नंतरचा plan cancel करण्यात आला होता, त्यामुळे कधीपासून करायचा-करायचा म्हणत ToDo list मधून न हलणारा 🥺 कठीणगड (तुंग) आजचा plan होता.. पण पाहिजे तसा RoI (Return on Investment) नाही आणि नऊ दिवस सलग करायचे आहेत म्हणून एकाच दिवशी दोन करण्यात point नाही, म्हणून 'दुसरीकडे कुठे?' आणि Sunday 🏖️ आहे म्हणून 'सोबतीला कोण?' अश्या प्रश्नांचे उत्तरं शोधत, दुपारी विनायकचा phone ☎️ आला, 'आम्ही येत आहोत'.. काल महेशने राजगड suggest केला होता.. तेच repeat 🔄 करत विनायक आणि दीपा तयार झाले..

"गडांचा राजा, महाराजांचा गड".. विचार होता jungle trekचा, जो निसर्गाला काही मंजूर नव्हता.. रात्री झालेल्या पावसामुळे 🌧️ अंदाज घेत parking वाल्या काकांनी (आमच्या planच्या exact opposite) 'चोर दरवाज्याने जा 📈 आणि गुंजवणे दरवाज्याने या 📉' असं सांगितलं.. पण उतरतांना उगच risk नको म्हणून आम्ही चोर दरवाज्यानेच जायचं-यायचं ठरवलं आणि घरून आणलेला trekking pole 🦯, 'jungle trek करायचा नाही' म्हणून गाडीतच 🚙 ठेवला..


जवळच्या तोरणा किल्ल्याला जरी ढगांनी ☁️ वेढलं होतं, तरी थोड्या दूरवरच्या सिंहगडच्या दिशेला बऱ्यापैकी clear view होता.. रस्त्याने हळदी-कुंकू 🏵️ फुलांचा बहर होता आणि समोर बालेकिल्ल्यापासून डावीकडे सुवेळा माचीच्या दिशेने (आणि पुढे) उतरती पर्वत रांग, विरळ ढग / धुकं आणि sky blue सूर्यप्रकाशाच्या combo मध्ये hide-and-seek खेळत होती.. पद्मावती माचीला पोहोचून ह्यात अजून भर पडली भाटघर धरणाची आणि पुरंदर, रायगड 🏰, लिंगाणा किल्ल्यांची.. पण ह्या सगळ्यांवर बाजी मारणारा speechless करून सोडणारा view 😍 होता दाट ढगांनी नटलेला मढे घाट.. बालेकिल्ल्याहून दिसत होती पद्मावती माची, पाली दरवाजा, संजीवनी माची आणि ever-tempting end-to-end राजगड-तोरणा ridge.. अर्थातच, ह्या सगळ्यांच्या स्पर्धेत जीत 🏆 आमची होती..

credits: a fellow trekker

बालेकिल्ल्याला केलेल्या नाश्त्याला 🥪 सोबत होती महेशने घरून आणलेल्या चहाची ☕.. लक्षात आलं होतंच, फक्त second opinion घेतल्यासारखं confirm झालं, खाली फक्त साखरेचं पाणी प्यायलो होतो.. नाश्ता करत झालेल्या चर्चेत ठरलं की जेवण 🍱 करूनच घरी जाऊ, आणि राहिलेला वेळ भरून काढण्यासाठी नेढ्यात जाऊन यायचं ठरलं.. तिथे दुसऱ्या groupने droneने घेतलेला video 👇.. वर ताक 🥛 प्यायला थांबलो, तिथे परत 'गुंजवणे दरवाज्याची वाट घसरडी नाही ना?' confirm करत पद्मावती माची पर्यंत न जाता खाली उतरायला अलीकडचाच right turn ↘️ घेतला..

नेढं - from the drone
credits: @rajgire (Instagram)

मागच्या रविवारी जसे अनुभवले, तसेच spiders 🕷️ वाटेत आमची वाट बघत होते - थोडे छोटे, थोडे जास्त आणि अगदी रस्त्याच्या मधोमध 🕸️.. काठ्यांचा vipers म्हणून वापर करण्यापलीकडे पर्याय नव्हता.. पावसाळ्यात ही वाट जास्त वापरात नसावी, ह्याचा after-effect असावा.. म्हणजे, baby हरीण 🦌 दिसणेही less-travelled-route चीच कृपा.. साधारण २.५-३ वर्षांआधी जेव्हा ह्याच रस्त्याने वर गेलो होतो, तेव्हा एकही ओढा 🏞️ लागला नव्हता, at least लागल्याचा आठवत 🤔 तरी नाही.. तर आजची कहानी जरा अलग होती..


जेवण करून रस्त्याला लागलो आणि जो धो-धो चालू 🌦️ झाला, तत्क्षणी "काय perfect timing ⌚ आहे, वाचलो!" म्हणत सुटकेचा निश्वास 😌 सोडला.. ऑस्ट्रेलियात 🇦🇺 मात्र India womenचं नशीब येव्हडं चांगलं नव्हतं..


speed gun 🔫 बद्दल ऐकलं होतंच, पण आज हे पण कळलं की एका ठराविक वेळेच्या आत ⏳ दोन toll booth 🛣️ जर cross केले तरी fine 💰 लागतो.. ह्या भीतीने तरी आता गाडी mileage दिल चांगला, असा चुकीचा गैरसमज करून घेण्यात हरकत काय?..

Day White 🐰, खंडोबा टेकडी (३७९ मी., ९.० कि.मी.): रात्री 🌃 लवकर (९:३० ला) झोपून सुद्धा आज काही केल्या उठायची ईच्छा 🥱 होत नव्हती.. alarms snooze ⏰ करून, re-schedule करून, परत snooze 🔔 करून जेव्हा ६:१० ला उठलो, तेव्हा potato point 🥔 साठी बराच उशीर होऊन गेला होता.. सलग तिसऱ्या दिवसाचा tentative plan, final नाही होऊ शकला आणि पाचव्या दिवशी जो सिंहगड करायचा होता, तो हुकला 😔.. पण आता तुम्हाला माहिती झालंच आहे, Plan B म्हणून नेहमी 'खंडोबा टेकडी' असतेच..


जे परवा सुद्धा इथेच होते, आज परत तेच काका दिसले.. विचारल्यावर कळलं की माझ्या घराजवळच राहतात.. गेली २६ वर्षे, नवरात्रीत मात्र इथे येऊन मंदिरात 🛕 राहतात, घट बसल्यापासून उतरेपर्यंत.. त्यांच्या अगोदर त्यांचे चुलते असं करत असत, आणि त्यांच्या आधी त्यांचे 👴.. नवरात्रीत उपवास करणार, इथे राहून देवाची सेवा करणार, मंदिराची साफ सफाई 🧹 करणार आणि संन्यासी lifestyle अनुभवणार..


Day Red 🐾, सिंहगड + circuit (७२७ मी., १६.३ कि.मी.): जय निळकंठेश्वर! अरे ते सोपं नाहीये, त्याला छातीत दम 😥 लागतो.. unlimited थाळी २ sweets, pizza 🍕 पाहिजे म्हणतो, व्यायाम नको.. अमूल पावभाजी पाहिजे, वडापाव 🍔 खायला पाहिजे, डेक्कनला फिरायला पाहिजे, सूर्यनमस्कार 🙏 मार म्हटलं तर माहित नाही.. उकडीचे मोदक 🧄 पाहिजे, साजूक तुपाची धार पाहिजे, सिंहगडला चल म्हटलं तर पाय दुखतात.. जय शिवराय 🚩.. हे आहे नियमित सिंहगडला येणाऱ्या बंडू तिखे 🧔 यांचे slogan, जे ३-४ वेळेस तरी आज कानावर पडलं असेल.. facebook link, https://fb.watch/8BbrO4waSv


tranquillity

आज जर तुम्ही सिंहगडला आले असाल (८ च्या आधी), तर तुमच्यासारखा नशीबवान 🍀 कोणी नाही.. क्वचितच जेव्हा ढग army आपल्या धरणी मैत्रिणीला भेटायला 🤝 येते, तो आजचा दिवस.. तसंही सिंहगडला प्रत्येक दिवस unique, resourceful आणि perfect 👌असतो.. इथे रोजचे अनुभव अविस्मरणीय 🥳 असतात.. इथे आलं की इथेच राहून जावंसं वाटतं.. त्यात घाट रस्त्याने उतरतांना तर हे ढग-cum-धुकं तर अजून होश हिरावून घेतात.. btw, घाट रस्त्याने आता खाजगी गाड्या चालू झाल्या आहेत 🤘, in case, you were waiting..



Day Royal Blue 🌀, घोराडेश्वर (२३९ मी., ३.६ कि.मी.): इथे आलो की नेहमीप्रमाणे आजही target होतं 'wheels ⚙️ on the curve'.. पण आपले plan, निसर्गाला नेहमीच मंजूर असतील, असं नसतं 🙁.. काल सारखाच आज पण 🌁 'today's special' white belt sheet चा बोलबाला होता 😁 🎉.. viewला ना MCA होता, ना curve.. राहिलेल्या menu मध्ये कुठेतरी कोपऱ्यात होते काही सेकंदांसाठी दिसलेले floodlights 🏟️ आणि बेगडेवाडी railway station हुन ये-जा करणाऱ्या local 🚞, मालगाडी 🚂 आणि एक्सप्रेस 🚋, one each..


पहिल्या नवसकाळीचा पहिला trek घोराडेश्वर होता.. otherwise also, ह्याआधी १-२ दा येऊन गेलो आहे.. पण parking साठी आज पहिल्यांदाच पैशे दिले.. "कधीपासून घेताय?" विचारल्यावर काका सांगता, "५ वर्ष झाले".. confidence बघा! माणसाने खोटं बोलावं, पण अगदीच 'नरो 🧝 वा कुंजरो 🐘 वा' / life-and-death matter असेल, तरंच.. उगच कशाला आपले कार्मिक account sacrifice करायचे? सांगायचा तात्पर्य हा की, truck 🚚 मागे 'शेवटी नशीबच' जे लिहिलेलं असतं, ते कळत-नकळत आपणच लिहीत / बनवत असतो 👻..


Day Royal Blue 🐬, पाषाण-बाणेर टेकडी (२१७ मी., ६.५ कि.मी.): नवसकाळीचा plan बनवयच्या अगोदरच, राहुल: "एक दिवस पाषाण टेकडी कर".. Google Maps, AllTrails app check करत लक्षात आलं की टेकडीला ना elevation, ना distance (comparatively).. मग त्यानेच सुचवलं 💡, 'घोराडेश्वरच्या दिवशी करू शकतो'.. मागच्या वर्षीही सातव्या दिवशीच 9+1 मधला +1 bonus होता, ह्या वेळेसही तत्सम 👍..

pic(k) of the league

वाकड सोडल्यावर navigation लावलं.. Google Mapsला बरं 'तसदीबद्दल क्षमस्व' ⚠️ 👷 ची माहिती होती की सध्या पाषाण sideला highway हुन उतरता येत नाही.. digital बाईने सांगितल्याप्रमाणे बाणेर हुन service road घेतला, आता त्याक्षणी 'का?' 🤨 कोणाला विचारणार ना! पोहोचल्यावर राहुलच्या captaincy खाली आजची second innings चालू केली, जी unexpectedly, घोराडेश्वर सारख्याच कमी गर्दीत 🚷, म्हणजे मनासारखी झाली 😎.. बाणेरच्या / टेकडीच्या बाणेर sideच्या तुकाई माता मंदिरापर्यंत जाऊन, माघारी येऊन, नाश्ता-चहा केला आणि back to pavilion 🏢..

तुकाई माता मंदिर, बाणेर

Day Pink 🦩, all Ks (४४८ मी., ६.८ कि.मी.): from कल्याण पेठ to कोंढाणेश्वर via कल्याण दरवाजा at कोंढाणा by कोठावदे.. कालपर्यंतच्या सात दिवसांपैकी एखाद्याने आज repeat केला असता तर ह्यात अजून एक K असू शकला असता 'with कुलकर्णी / खराडे / कोंडे'.. असो..


Day Purple 🌂, सिंहगड + potato point (७१२ मी., १०.२ कि.मी.): आज होता कल्ला.. नऊ दिवस रोज येणारे करत होते celebrate 🥳.. "गणपती बाप्पा मोरया" पासून "जय भवानी" च्या गजरात "इंकलाब जिंदाबाद" पण कोणीतरी add केलं 🤪.. म्हणजे "होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है!" सारखीच गत झाली.. घरून लवकर ⏱️ निघाल्याचा फायदा घेत sunrise point ऐवजी थेट 'final destination' 🎯 potato point हून सूर्योदय 🌄 बघितला / mobile मध्ये सोबत घेतला.. सिंहगडला (जवळ) असलेला हा दुसरा wind point आहे, असं म्हणायलाही कोणाची हरकत नसावी..


New Zealandचे 🇳🇿 Sir Edmund Hillary आणि शेर्पा 🇳🇵 Tenzing Norgay यांनी १९५३ साली २९ मे तारखेला पहिल्यांदा पीक XV / चोमोलुंगमा / सागरमाथा शिखरावर 🏔️ चढाई केली होती, ज्याला आपण Mt. Everest नावाने ओळखतो.. समुद्र पातळी 🏖️ पासून ह्याची उंची ८८४९ मी. आहे.. consequentially,
Everesting - Climb the height of Everest. One hill, anywhere in the world 🗺️. One activity. No time limit. No Sleep.
>> फक्त पहिला clause लक्षात घेतला तर ह्या वर्षी नवसकाळीत (वरचे सगळे आकडे जोडून) half Everesting झालंय, total ४६८० मी. ✌️..

४९० ई.पू. साली Greece देशामधे Marathon गावात झालेल्या लढाईत ⚔️, Persia विरुद्ध पहिल्यांदाच जिंकल्याची बातमी सांगण्यासाठी एक युनानी सैनिक 💂‍♂️ तिथून non-stop Athens पर्यंत २६ मैल (४२.१९५ कि.मी.) धावत 🏃 गेला होता.. परिणामस्वरूप,
Marathon - Long-distance foot race with a distance of 42.195 kilometres, usually run as a road race, but the distance can be covered on trail routes.
>> फक्त अंतर लक्षात घेतलं तर नऊ दिवसात दोन Marathon चालून झाल्या आहेत, total ८८.५ कि.मी. 🥾..

The best art in the world is land. Appreciate it. Preserve it.

credits: महाराष्ट्र शासन वनविभाग, पुणे

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...