Tuesday, March 24, 2026

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। 

articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते..

अनंत शिखरे, एकच ध्यास.. जानेवारीत सुरेश परब आणि ज्ञानेश्वर नाईक नामक दोन मावळ्यांनी trans सह्याद्रीची मोहीम २५ दिसतात आटोपली.. हो.. १,२७० कि.मी. प्रवास आणि ३६ हजार elevation gain 📈 आणि loss 📉.. तापी नदी पासून तिलारी नदी, रायकोट (नंदूरबार) ते पारगड (महाराष्ट्र 
गोवा border), फक्त आणि फक्त २५ दिवसात 🫡..


नर्मदे हर.. प्रल्हाद लवाटे सरांनी चार महिन्यात / हिवाळ्यात नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली.. साधारणपणे ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर होणारा हा ३,२०० कि.मी. प्रवास, मय्येला कुठेही न ओलांडता clockwise 🔁 केला जातो.. हे सगळं वयाच्या ७२व्या वर्षी करणे म्हणजे शारीरिक आणि आध्यात्मिक कसोटीच 🙏..

नर्मदे हर

हे आवर्जून सांगायचं कारण असं की ते इथे सांगण्यापलीकडे आहे 😊.. थोडक्यात काय, तर ordinary व्यक्ती कसा extraordinary बनतो, ह्याचे काही उदाहरणं.. आता मुद्द्याकडे वळूया..

दुधाची तहान ताकावर दुधावर चहावर

गेल्या वर्षी शारदीय नवरात्री दरम्यान काही दिवस नाशिकला असल्यामुळे नवसकाळीच्या सातव्या आवृत्तीत हवा तसा elevation gainचा हातभार लागला नव्हता 💔.. सरासरी ९ कि.मी. चालून ती तहान भागवायचा प्रयत्न केला खरा, पण किती जरी म्हंटलं तरी शेवटी 'दूध' ते "दूध", 'ताक' ते "ताक" आणि पावसाळा असो वा उन्हाळा, 'चहा' तो "चहा" ☕..


90-10 : 90% without sugar ☕

हा अधुरापन घालवायला काहीतरी करावं म्हणून चैत्र नवसकाळीची योजना आखली आणि ती यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेली 😃 म्हणून हा लेख.. 

तसं चैत्र नवसकाळीचा उपक्रम हा काही पहिल्यांदा राबवण्यात आलेला नाही.. तरी, ह्या आधी २०२४ साली पहिल्यांदा आणि एकमेव प्रसंग जो नकळत घडून आला, त्यानंतर हा दुसराच ✌️.. बरं, ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी - नवसकाळी म्हणजे 9 days, 9+1 hikes - रोज गजराच्या ⏰ आवाजात स्वतःशी झुंजत उठायचं, पुण्यात जगभर हिंडायचं, rather गड / टेकड्यांवर चढाई करायची आणि weekday असला तर office 💻 करायचं.. असा रोजचा संघर्ष..

'यंदा never before काहीतरी करावं का?' चा विचार करत ठरलं असं की ह्यावेळेस तरी ९ सिंहगड करू ⛰️.. २०२४ साली resolution पाई सरासरी दीड पेक्षा कमी दिवसात एक सिंहगड होत होता 🥾, तरी ९ किंवा अधिक दिवस सलग 
करायचा प्रसंग कदाचित नसावा / नाही आहे, म्हणून अधोलिखित काय जे आहे ते has never happened before 🤘..
 
cairn / लिगोरचा 😜
 
दुधाची तहान दुधावर.. चैत्र नवसकाळी
जगात भारी, सिंहगडची वारी ⛰️..

गडावर नियमित येणाऱ्यांकडून बहुधा तुम्ही हे ऐकलं असेल.. जगात भारी, सिंहगडची वारी.. त्यात, शारदीय आणि चैत्र नवरात्रीत इथे सलग
 ९ दिवस येणारे भरपूर 🙇‍♂️.. काही जण गणपतीचे १० दिवसही रोज येतात.. पहिल्यांदा जेव्हा हे ऐकलं तेव्हा, 'आपल्याला नाही जमायचं', हा समज 😓, ज्यात आजतायगत फारसा बदल झालेला नाही.. ह्याआधी ७, rather ८ नवसकाळी झाल्या तरी हे जमलेलं नाही 🙃..

रोज?.. ११ वर्ष झाली, गडावर येतोय.. तरी आजसुद्धा हे अशक्य नाही पण अवघड आणि कौतुकास्पद नक्की वाटतं.. पण 'रोज एकच वाट?'.. ह्यातही काहीतरी वेगळं करू, हा नाद काही सरळ विचार करू देत नव्हता..

1️⃣ प्रवाहम् अनुगच्छन्तु
८.१० कि.मी., ८१० मी. 📈

काही दिवसाधी officeला दिनानाथ भेटले, तेव्हा त्यांनी सुद्धा weekly गड चालू केल्याचं कळलं 👍.. आज सुट्टी असल्यामुळे पाडव्याच्या दिवशी, गडावर त्यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली.. आजका ज्ञान 'go with the flow' / 'प्रवाहम् अनुगच्छन्तु' - हा त्यांच्या t-shirt 👕 वरचा quote.. दीड सिंहगड करून सुट्टीचा दुसरा असा फायदा करून घेण्यात आला.. तिसरा फायदा - मिसळ पाव आणि चहा ☕..


2️⃣ ये दिलवालों की दुनिया है, अजब है दास्तां इसकी
किसीसे दिल नहीं मिलता, कोई दिलसे नहीं मिलता
११.१ कि.मी., ५११ मी. 📈

विकासमार्फत ओळख झाली तो महेश वर्ष+ झालं, नियमित गडावर येतो आहे, weekly.. चिरपूटकर काका म्हणतात तसं, 🚸 school bus सारखं, त्याच्या गावाहून गडावर येता-येता रस्त्याने पोरं गोळा करत येतो.. फालतू petrol जाळून 🚗 carbon footprint का वाढवावं?, म्हणून गेली काही महिने मी सुद्धा bus pool 🚘 करतो आहे.. आज सोबत अजून प्रभुणे (प्रवीण किंबहुणे) आणि भूषण होते.. कालच्या दीड नंतर आजचा वेगळेपणा होता घाट रस्त्याने धावत उतरणे.. त्याचा सगळ्यात आवडता timepass 🏃‍♂️ म्हणून भूषण तयार झाला.. बाकी दोघं नियमित वाटेने उतरून, bus घेऊन आले आणि गोळेवाडीला we crossed paths again..


3️⃣ मंज़िल का मिल जाना आसान नहीं होता साहब
रास्ते क्या-क्या छीन लेते हैं, ये बस मुसाफ़िर ही जानता है
२०.७ कि.मी., ११६८ मी. 📈

आज कुछ तूफ़ानी करते हैं 💪.. आजचं अंतर आणि elevation gain, are easily the highest amongst all सकाळs from any of the नवसकाळीs till date 📅.. वाट नवीन नसली तरी नवसकाळीत ही range trek वाली मोहीम पहिल्यांदाच - सिंहगड ते धायरी.. त्यात 'आज तिसराच दिवस आहे, अजून ६ दिवस जायचे आहेत', म्हणून मनात थोडी रुखरुख 😟.. पण ह्यावेळेस शेवटचा / नववा दिवस शुक्रवार असल्याने, weekend एकच आणि तो सुद्धा नेमका सुरवातीला आल्यामुळे नाईलाज.. busने जायचा plan, देवूंना विचारल्यावर बदलण्यात आला 🛵.. 

सोबत गड चढून झाल्यावर मनीष भेटले.. आज लवकर आल्याचं लक्षात येताच ते सुद्धा माझ्यासोबत निघाले, next stop पर्यंत.. त्यांच्या मागे-मागे जात, काही दिवसांनंतरचा plan असलेला 'potato point' / चिलीम कडा 🥔 आजच झाला.. मनीष सोबत असले म्हणजे आपल्याला phone बाहेर काढायची गरज पडत नाही, तरी पुढील photoचे credits देवू सरांना..

 काही दिवसांनी छप्परही बघायला मिळेल 😜

इथून माघारी येत, दोघं गडाच्या दिशेने निघाले, आणि मी खालच्या.. गेल्या महिन्यात moonlight walk group 🌕 (यापुढे MWG) सोबत same route केला तेव्हापेक्षा आज एकटा असल्याचा फायदा भरपूर झाला / फायदा घेत लवकर संपवता आला.. trans सह्याद्री करणाऱ्यांना आजचा range trek हा आमच्या क्षमतेनुसार मानाचा मुजरा 😊..

4️⃣ May be the journey isn't about becoming anything, but about unbecoming everything that isn't really you.
१०.८ कि.मी., ८८५ मी. 📈

हा quote आजच्या activityला एकदम perfect fit होतो.. नसेल जमत एखादी वाट तर माणसाने सरळ नाद सोडावा.. period.

गड चढून कल्याण sideला उतरून, अर्ध्यातून परिक्रमेच्या वाटेने मोरदरी गावात जाऊन तिथून घाट रस्त्याला यायचा plan होता.. कधी-कधी वाट माहिती नसल्यामुळे फजिती होते.. आज सगळी माहिती सोबत असुनसुद्धा वाट काटेरी झाडांनी 🌵 अडवलेली / दडवलेली होती.. आलो त्या मार्गी परत जाण्यापलीकडे पर्याय नव्हता.. पहाटे लवकर पोहोचल्याचा गैरसमज जो parking न भेटल्यामुळे दूर झाला 😞, तसंच रविवार असला तरी उन्हामुळे गर्दी कमी असल्याचा गैरसमज पुन्हा lockdown 🔒 झाल्याशिवाय दूर होणार नाही, असं दिसतंय.. पण मग प्रसादही भेटणार नाही..

5️⃣ You haven't lived until you have done something for someone who can never repay you.
६.३ कि.मी., ५६४ मी. 📈

95 years since शहीद दिवस.. गडावर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीला आदरांजली 🙏, हा आजचा program.. period.

 
6️⃣ What's the point of becoming unstoppable, if you forget who were you running from or what were you running for?
७.२ कि.मी., ७०१ मी. 📈

एक अधिक पहिल्या दिवशीच्या दीड मधला राहिलेला खालचा अर्धा सिंहगड पूर्ण करत आजही दीड गडाची नोंद करण्यात आली..


7️⃣ शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही,
चरित्राला प्रमाणपत्र नाही ..contd
४.८ कि.मी., ४९४ मी. 📈

सकाळी, rather पहाटे लवकर जाग आली 🕞 आणि साक्षात्कार झाला की आज सातवा दिवस आहे म्हणून +1 करणे भाग आहे.. झटपट आवरत निघालो.. दप्तर 🎒 (load) न घेता गड चढायला सुरुवात केली तेव्हा 🔈Spotifyवर 'दिगंबरा दिगंबरा नामस्मरण' track लावला, duration - 39:57.. त्यात शेवटी शंखध्वनी 🐚आहे.. किल्ल्याची पायरी चढायचा उशीर and you guessed it right.. गायतोंडे म्हणतो ना, "कभी-कभी लगता है की अपुन ही भगवान है", तसंच काहीतरी.. 🤪 🥳

वर मनीष सरांच्या photographyचा उल्लेख करून photo नाही टाकला तर बहुत बड़ी नाइंसाफी होगी..


7️⃣ contd.. शब्दापेक्षा काही तिखट नाही,
आणि मौनासारखं उत्तम साधन नाही
९.१ कि.मी., १४० मी. 📈

साधारण सव्वा तासात गड आटपून धावत निघालो तळजाईला.. MWGचा आज walk day आहे म्हणून ५.१५ ची सुरुवात हुकणार, हे नक्की.. कमीतकमी शेवटच्या टप्प्यात तरी गाठू, असा घरातून निघतांना जो विचार केला, त्यात आपण बऱ्यापैकी lead घेतल्याचं लक्षात आलं 😌.. पोहचत करत जे थेट मंदिराजवळ चहा प्यायला भेट झाली, तेव्हा नुसता formality म्हणून नाही / नावापुरता न करता "+1" व्यवस्थित tick झाल्याचं समाधान लाभलं ✅.. म्हटलं ना, कभी-कभी लगता है.. 😜


8️⃣ संगत से स्वभाव तो नहीं बदलता पर कर्म ज़रूर बदल जाते हैं.
१३.७ कि.मी., ५६९ मी. 📈

आजच्या दिवसाला होती भूषणची 'एखादा दिवस घाट रस्त्याने जाऊ'ची फरमाइश.. म्हणजे फिर एक बार पडला '९ सिंहगड'ला खाडा.. आता एखादा ह्याला सुद्धा सिंहगड hike म्हणेल, तर अपनी-अपनी सोच है 🤔.. कोणी हे ही म्हणेल, हा नसेल पकडायचा तर पहिल्या दिवशी आणि परवा दीड-दीड केले, म्हणून उद्याचा पकडून ९ दिवसात ९ होतील.. तर हो, ते बरोबर आहे 🤜🤛.. तरी फिर एक बार, सलग ९ दिवस गड नाही - मुद्दामून.. कारण खाली आहे.. पटलं तर तुम्हीसुद्धा list बनवायला घ्या 📝.. back to today's activity..

भूषण सोबत वहिनी आणि पाखी 🧑‍🧑‍🧒 सुद्धा होत्या.. दुसऱ्या दिवशी उतरलो तोच रस्ता आज उलट / खालच्या दिशेने चढायला सुरू ↗️.. काही वेळाने दोघींना एकमेकींच्या हवाले करत आम्ही पुढे निघालो.. गडावर पोहोचत नाही तर plan बदलून नेहमीच्या वाटेने उतरायचा बेत बनला ↘️.. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना आणि त्यांना निस्वार्थपणे सेवा देणाऱ्यांना आजची ही clockwise परिक्रमा आमच्या क्षमतेनुसार मानवंदना 😊..

on a lighter note.. digital / natural, recorded / live चा फरक सोडला तर कालसारखाच आजचा योगायोग / दैवयोग 🐚.. उद्या सुद्धा, सलग तिसऱ्यादिवशी जर असंच काही झालं / घडलं, तर मला साक्षात परमेश्वराचा अवतार असल्याची खात्री होईल 😇.. "don't have a choice" म्हणतो, तसंच काहीतरी 😆..

जय श्री राम
 
9️⃣ हज़ारों उलझनें हैं राहों में, और कोशिशें बेहिसाब,
इसी का नाम है ज़िन्दगी, चलते रहिये जनाब
८.७ कि.मी., ६२७ मी. 📈

काल घाट रस्त्याने नाही उतरल्यामुळे आज शतक पूर्ण करायला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार होती.. अनपेक्षित घडायला काही scope न ठेवता लेण्यांच्या विचार रविवारच्या फजितीमुळे already डोक्यातून वजा केला होता 🙅‍♂️.. सिद्धगडच्या त्या भयाण स्मृती मनाच्या कोपऱ्यात अशा काही रूतून बसल्या आहेत की, पुन्हा ते धाडस दिवसाढवळ्याही दुरापास्त वाटते.. so, target 💯 साठी revised plan नुसार गडावरचे उर्वरित spots - गडमाथा, wind point आणि पुढील photo - केले की अधिक लागणारं अंतर पुरून उरणार होतं 🤠..

'इतका prologue म्हणजे काहीतरी twist असेल', असं वाटत असल्यास, sorry to disappoint you 😬..

आणि in case you are wondering, आज सुद्धा शंखध्वनी का?.. तर, वाचलो / सुटलो 🤗.. manifestation कामी आलं - खरंच असतं असं काही !? 🤨.. back to pavilion - normal माणसाचा जन्म आहे माझा.. feeling so relieved, नाहीतर Trump सारख्यांचा उद्धार !? 🫠.. नसेल जमत एखादी व्यक्ती तर माणसाने सरळ नाद सोडावा.. period.

जगात भारी ⛰️ सिंहगडची वारी 🙏 (#१०३५ ते #१०४३)

🔢 stats credits: Coros ⌚

बेरीज केली सर्व आकड्यांची तर ९ दिवसात होत आहे १००.६ कि.मी. पायपीट 👣 आणि ६४६९ मी. gain = highest amongst all नवसकाळीs so far.. 👏

comparison करणं नक्कीच चुकीचं ठरेल.. तरी सुरुवातीला जे लिहिलं, त्यातून प्रेरणा घेत 🙇‍♂️, तसं काहीतरी करून extraordinary बनायला किती कष्ट घ्यावे लागतील, ह्याची हळू-हळू जाणीव व्हायला लागली आहे 😰.. भगवान तो नहीं बनना पर extraordinary तो अपुन बनके रहेगा 😏..

एक दिवस वगळला तर रोज आतकरवाडी हुन गड चढणे, आणि बहुधा सोबतीला काहीतरी extras 👽 - अश्यातऱ्हेने ह्यावेळेसची चैत्र नवसकाळी संपन्न झाली, वर्ष २रे.. सिंहगड side accompanied by भूषण, महेश, प्रवीण, देवू, मनीष, रत्ना, पाखी.. तळजाई - पोपटी MWG 🦜..

हिवाळा असो वा उन्हाळा,
दुधाची तहान ताकावर दुधावर चहावर 🫖

तरी '९ दिवस सलग सिंहगड चढाई' अजूनही झालेली नाही / जमली नाही 🙂‍↔️ / जमवली नाही / कमवली नाही.. 'नाही शक्य' अशातला भाग नाही, पण राहू द्याव्या काही गोष्टी मुद्दामून अपुऱ्या 📑.. todo list अगदीच रिकामी सुद्धा चांगली नाही दिसत 😎.. what's in yours ❓

"नवसकाळी" विषयावर पुन्हा आश्विन महिन्यात भेट होईलच..
तोपर्यंत, have a great time 🙋‍♂️..

Sunday, March 1, 2026

Andharban


।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। 

LSoM (marathon नव्हे, फक्त "last sunday of the month") ला अंधरबान / अंधारबन tick-mark ☑️ झाला.. महिना संपायला आल्यावर सरतेशेवटी सरकार पडलं, आणि पाऊसही 👌..

drift of the year ⏩

after watching the video, if you are suspecting it to be AI generated 😅 - wondering such a climate and greenery is not possible to find in today's weather conditions even if it is आंधरबन, you are very much on the right track.. but still, the video is as unadulterated as it should be, only trick being the basic most of all - timelapse..

yet, that pretty much should also contribute nothing in terms of amplifying your hopes to any unbeatable levels which can never be fulfilled.. 'never be fulfilled' as in, in today's 🌡️ weather conditions.. so, here is the second trick.. the video is from a different universe 🌦️.. same place, same group, but a different time zone.. ~Jun '22..

if you missed out on 'Resolution T22' article 📑, will be helping out with the link towards the end, so that along with the drift, you also get to enjoy the swag, frame, peak ⛰️, view, pattern etc. etcetra from that year..
 
 शिलालेख, महादेव मंदिर, हिरडी
 
sometimes the wait is longer because the blessing is bigger.. Andharban.. because it's सह्याद्री !

what's with the title?.. ह्यांचा हा सुद्धा trek गंडला वाटतं?.. आणि, पावसाळ्यात already एकदा करून झाला आहे तर पुन्हा भर उन्हाळ्यात आणि भर उन्हात 🌞 करण्यासारखं असं काय आहे इथे?.. let's see..

when enquired विशाल about the availability the previous day, he replied with a हरी झंडी ✔️.. then checked with वैभव.. since he was also part of the pilot, I was doubtful if he'd come again.. but he said, 'I'll swim 🏊‍♂️,' and he showed up 👇..


now you must be wondering... since when has अंधरबान been / known for swimming ❓.. and what's with this 'pilot trek' here?.. aren't people roaming this area for the last 25+ years, may be more ⁉️ 🤔..

now is the time for the reality check 💔, but that also is the fun part of all.. जो होता है वह अच्छे के लिए होता है.. when this line is used, generally nobody would expect - everything falls / fell in place, and so it be.. the harsh reality is - we were not supposed to trail अंधरबन.. but as they say, समय से पहले और किस्मत से ज्यादा किसीको कुछ नहीं मिलता, we compromised 😒.. had to..

महादेव मंदिर, हिरडी

while the original idea was to descend the कुंडलिका valley along the emrald water 🌊, through origin of the कुंडलिका river (yes, the same one, that's famous for rafting), our ignorance was at its peak.. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं रे 🪅, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है.. least aware of the script, we reached the starting point 🏁.. and that'll also be all from bollywood..

on the way, also learnt about considerably lower RTO registration charges for 🇮🇳 all India permit vehicles 🚐 in Daman and Assam.. so, if you happen to spot any tourist vehicles having DD or AS tattoos ®️, you now know the reason..


and now, you also know the reason behind the spelling mistakes in the article.. unless those got sneaked in un-noingly, are the forced ones and forced once 🤣..

28 February 2026

one of the those few instances, where the intro might be longer than the trek itself..

if you are ever planning to visit this dark forest (नाम में क्या रखा है?), please make a dew note of this.. we were well aware about the needed entry fee 🎫.. least we were aware that this entry doesn't happen offline / on the spot anymore.. मग काय? शोधा network 🛜.. literally, each one of us were made to pay for it on an individual level.. for 25 pax, it was an hour wasted, especially when, for selecting birth date, पंकज was actually going back in time, one month per tap 🤦‍♂️ (what if he was from 60's, instead of 90's) .. trust me, you have also done this some time, so you know, what exactly am I talking about here 😜..

कुंडलिका valley, उन्नेयी धरण, भिरा गाव

our leads tried hard to convince the official that we wanted to hike down the offbeat valley, but he did not budge at all.. नाही ते नाहीच 🥺.. a few mishaps here and there, and suddenly every other area has to deal with the ripples.. somebody had died 🥀 near एकोले / lotus valley, and thus issued were strict guidelines..

last time, we hiked from घुटके till पिंपरी.. today's refreshed plan 🔄 was still from पिंपरी till भिरा, but via हिरडी..

माकड्या आणि बोकड्या ओढ्यांवर बांधलेले गरज नसलेले पूल were something different than last time.. the next distinct thing was what we first took for butterflies 🦋.. however, sensing their collective presence and a somewhat atypical fluttering style, we became skeptical.. observing closely, we realised those were moths..



couple of weeks ago, वैभव was here to hike from नागशेत till पिंपरी, when he learnt about a beautiful महादेव मंदिर at हिर्डी..


अब और का बताएं भैया / बहना 🙃, आज के लिये बस करते हैं 🫠..

what would have been otherwise an expected walk in scorching sun ☀️, turned out to be an unexpected one through the shadows interim.. generally, people are happy the other way, but we had not signed up for this..

if there will be another attempt to hike down the valley, even if all needed precautions / permissions are taken beforehand? - time will tell 🙂‍↔️..

trekचं काय जे झालं ते झालं, best thing that happened today was जेवण 🍱. period.

consecutive weekends, another plan b (b for back-up).. though start and end points were unchanged, the journey unfolded differently than planned.. yet, no complaints.. because it's सह्याद्री ! 🥳.. बऱ्याच गोष्टी ज्या पुण्यात / इतरत्र मिळत नाहीत, त्याचं हे एकमेव ठिकाण!"

another timelapse, course of the day 

उन्नेयी धरणाच्या आसपास कुठेतरी, photo credits: वैभव

annexure

last weekend's plan b, SRT

Resolution T22,

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...