Thursday, November 25, 2021

कैलासगड आणि प्लस व्हॅली

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

It's about the Journey, not the Destination.. कैलासगड आणि प्लस व्हॅली

plan होता AMKचा, जो माझा ह्याच वर्षी दुसऱ्यांदा cancel झाला होता 😔.. पहिल्यांदा "खूप गर्दी असते, climbing / rappeling 🧗साठी तासभर वाट ⏱️ बघावी लागते" म्हणत आणि ह्या वेळेस, "minimum participants नाही म्हणून confirm नाही" म्हणत.. असो, ToDo list मध्ये असलेले trek असे cancel 🚫 होऊन, जेव्हा actually Done list मध्ये प्रस्थान करतात, ती मजा वेगळीच 😇.. ह्या category मधले काही उदाहरण द्याचे झाले तर, लिंगाणा, (मोरोशीचा) भैरवगड, (शिरपुंजेचा) भैरवगड ते रतनगड, अस्वलखिंड इ. (सगळेच organizersनी cancel केले होते, असं नाही).. उजवीकडे 👉 Blog Archive 🗒️ मध्ये आहेत.. ही post जर आवडली तर नक्की ते सुद्धा वाचा.. नाही आवडली 😉 तरी, भैरवगडच्या दोन्ही तर नक्की वाचाच (from February 2021), ज्या आहेत "trek म्हणजे 'trek आणि बरंच काही'" ची perfect / classic उदाहरणं 👌..

दुसरी एक category म्हणजे 'नुकताच ऐकला 👂 आणि लागलीच केला ✅', किंवा ToDo list मध्ये न जाता, थेट Done list मधेच.. मोजकेच पण हे सुद्धा अनुभव सांगण्यासारखेच.. ढाक बहिरी, देहेरगड ('आम्ही तर कधी नाव पण ऐकले नाही' 🤨 म्हणणारे), ह्या post मधला / मधली plus valley (trek म्हणून 'मधला' आणि valley म्हणून 'मधली') इ...

आता येते कैलासगडची category.. ऐकून आहोत पण आवर्जून करावा, अशी इच्छा नाही 😒.. ह्यामागची कारणे भरपूर, त्यातलं एक ☝️ म्हणजे - Google Maps 🌍 घरून २ तासाच्या वर दाखवतोय, त्यात फक्त तासभर trek करून माघारी म्हणजे पचण्यासारखं 😞 नाहीच, मला तरी.. 'RoI' 💱 पण काही प्रकार असतो, का नाही?.. मग Duke's nose सोबत इरशाळगड 👥, मोहनदरी सोबत कण्हेरगड 👯, कैलासगड सोबत plus valley 🖇️, हे असलं काही सुचतं..

बरं, AMK करणार म्हणून group वर weekend planningचं तसं काही discussion नाही 😐.. पण एकदा cancel झालाय म्हण्टल्यावर राहुल, वैभवला 'आपण weekendला काय करायचं?" ह्या प्रश्नाचं समाधानकारक 🥳 उत्तर भेटलं असावं.. थोडा research करत 🔬, काही वेळात महेश आणि आधी 'माझं fix नाही' म्हणणारा अमन संध्याकाळ 🌇 पर्यंत तयार झाले.. "गोष्ट इथे संपत नाही" चा कार्यक्रम रविवारी होता म्हणून दिवस आधीच ठरला होता शनिवार..

the vibrant hues

२० नोव्हेंबर २०२१

"बालाजी चौकातून ये" orderला follow करत आणि Google Mapsच्या बाईला नाराज करत, आम्ही राहुलच्या घरी 🏢 पोहोचलो.. ६ वाजता 🕕 तिथून निघत आणि अमनची चांदणी चौकातून जायची ईच्छा मारत, आम्ही थेट पौडला बाहेर निघत ताम्हिणी घाटाच्या रस्त्याला लागलो 🛣️.. Maps वर बघता हे आधीच लक्षात आलं होतं की एकदा हा रस्ता सोडला तर नाश्त्याची 🍛 सोय होणे अवघड आहे, पण रस्त्यात असलेल्या बऱ्याच hotelsचा 🏨 (technically, restaurantsचा) अजून दिवस उजाडला 🌄 नव्हता / weekend चालू झाला नव्हता.. आणि जे मोजकेच उघडलेले दिसत होते, तिथे एकतर फक्त चहाची सोय होती, नाहीतर राहुलचा speed ⏩ थांबायची परवानगी देत नव्हता..

विठ्ठल कामतच्या पार्किंग मध्ये १-२ गाड्या दिसल्या तर ठरलं, now or never.. रस्त्याला toll नाही म्हणून इथे mobileला सुद्धा range नाही 📴.. तुमच्याकडे cash 💰 असेल तरच तुम्ही आत या म्हणून बाहेरच पाटी लावलेली होती "only cash, no internet, no wifi".. barter system सारखं आपल्याकडची अंडी 🥚 देऊन नाश्ता भेटेल का? ही hypothesis दिवसभरासाठी (at regular intervals) व्यंगाचा 😂 विषय होऊन गेली.. १० मिनिट लागतील म्हणत २ मिनिटात order 🍝 देणारं hotel restaurant हे आयुष्यातलं पहिलच..


अंधारबनचा turn ➡️ चुकलो, तो आजचा पहिला (आणि शेवटचाही) नव्हता.. नशीब चांगलं होतं की तिन्ही वेळेस २-५ मिनिटांच्या वर वेळ नाही गेला 😊.. Maps वरच्या 'Kailasgad trek starting point' ला पोहोचायच्या प्रयत्नांमध्ये रस्त्यात आम्हाला बगळ्यांसारखे काही पक्षी 🦢 दिसले / लागले.. एक तर समोरून हलायलाच तयार नव्हता.. "आम्ही बिबट्याला 🐅नाही घाबरत, असेल तो बिबट्या, त्याच्या घरी" सारखंच, तो आम्हाला हूल देत असावा, "असशील तू कोंडे, तुझ्या घरी 🏠.. मी नाही घाबरत"..

parking - मराठीत काय? tea 🍵 ला चहा म्हणतात, coffee ☕ ला? bread 🍞 म्हणजे पाव, आणि toast? मराठी भाषेने काही शब्द फक्त लिपीच्या 📝 फरकाने जशेच्या तशे आत्मसात केले आहेत, त्यातला एक - पार्किंग.. "कैलासगडाकडे" board 📋 च्या बाजूला जेमतेम एक-दोन गाड्या बसतील इतकीच जागा.. गाडी लावली आणि विषय एकच, ok, दोनच.. पाहिल्या पावलापासूनच चढ 😥 आहे, warm-upला काही scopeच नाही.. किती वारा 🍃 आहे!? थोडा खडसांबळेला पाठवा.. 'खडसांबळे' पहिल्यांदाच ऐकत / वाचत असाल तर तुम्ही सुखी 🙋 आहात, कारण तुम्ही नक्कीच आमच्या बरोबर त्या trekला नव्हते..


बराच चढ सरल्यावर आला थोडा traverse आणि मंदावला वारा.. म्हणजे योग्य तिथे आहे / होता आणि आता नसला तरी हरकत नव्हती.. तिन्ही बाजूला होतं मुळशी धरण आणि आम्ही चढत होतो चौथ्याच दिशेला.. आळीपाळीने चढ चढत आणि traverse करत, सूर्य आणि ढगांचा लपंडाव ⛅ बघत / सोसत ४०-४५ मिनिटात वर पोहोचलो.. डावीकडच्या sideला थोडं उतरून पाण्याचं एक सुंदर टाकं 👍 आहे.. माघारी परत येऊन पुढे बांधकामाचे काही अवशेष आणि App वरचा trail संपतो तिथे शिवलिंग आहे (प्रत्येक गडावर असतंच).. ह्यापलीकडे गडावर बघायला काही नाही (at least, आम्हाला दिसलं 🧐 तरी नाही).. बाकी मग गडावरून बघायला मुळशी धरणाचा सुंदर परिसर आहे, जिथे you cannot skip falling in love 💖 with that 1 beautiful tiny island 🏝️ in the North (हे मराठीत नसतं जमलं)..



खाली उतरून झाल्यावर जवळच वाघोबा मंदिर आणि caveला जाऊन यायचं ठरलं.. मंदिर बघून, cavesला जायला रस्ता सापडत नसल्याने माघारी येऊन पुढच्या ⏭️ destination कडे journey सुरु झाली.. अमनने सांगितलं नसतं तर 'तेरी महिमा अपरंपार' 👏 कुंडलिका valleyच्या viewचा आनंद न घेताच आम्ही निघून गेलो असतो.. नव्हतं माहिती म्हणून काय गमावलं असतं, हे कळालं नसतं आणि म्हणून कदाचित ह्या वेळेस वाईट वाटलं नसतं 🙃, पण आता कळाल्यावर next time चुकलो, तर नक्कीच वाईट वाटेल.. so for this time, it was surprise, surprise ! 😍




अंडी घालणे - हे कोण आणि कधी म्हणतय, ह्याचा तसा अर्थ निघतो / निघू शकतो.. अगदी 3 idiots मधल्या हिंदी वाला सफर नही, अंग्रेजी वाला सफर सारखंच.. महेशने जो एक किस्सा सांगितला, त्या मुलाचे (ज्याला नवीन अंडी घालून uncomfortable वाटत होतं) हे लोक काय हाल करत असतील, त्यांनाच माहिती 🤣.. नसेल काही click 🖲️ झालं, तर जाऊ द्या, परत ताम्हिणीत येऊया..

'Stick' with a Plan

जेवायची वेळ तर नाही झाली, पण plus valley हून परत येई पर्यंत वेळ निघून जाईल ⌛ - मग करायचं काय?.. म्हणून काही तासांपूर्वी जो turn चुकलो होतो, त्या कोपऱ्यावरच्या 'जय मल्हार' ला भेटेल ते इंधन ⛽ पोटात टाकत, गाडी पुढच्या वाटेला निघाली.. तिथल्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे plus valleyच्या थोडं पुढे मंदिराला लागून parkingची सोय होती.. तिथे पोहोचून, गाडी लावून 🚘, उलट्या trekची सुरुवात झाली.. 'उलटा' कारण, इथे होता आधी descend 📉 आणि return येतांना ascend 📈.. पण, त्याआधी..

Western Ghats - ज्याला आपण महाराष्ट्रात सह्याद्री म्हणून ओळखतो / संबोधतो, हे कशे तयार झाले असतील? ही process नक्कीच केवल १ / २ / ५ हजार वर्ष जुनी नाही.. हे transformation घडत आलंय गेल्या ६ करोड वर्षांपासून 🏚️.. ज्वालामुखीतून 🌋 निघालेला लावा पसरावा आणि ह्या थंड झालेल्या लावाची झीज होऊन जेव्हा दऱ्या / खोरं तयार झाली, त्यातून सह्याद्री ⛰️ तयार व्हावा.. मग हिमालय 🏔️ पण असाच का? तर नाही, इथे ज्वालामुखीचा काही संबंध नाही.. पृथ्वीचा भूभाग १५ Tectonic plates 🗺️ ने बनलेला आहे, ज्या दरवर्षी साधारण २ से.मी. सरकतात.. करोडो वर्ष सरकत-सरकत जेव्हा Indian 🇮🇳 plate आणि Eurasian plate converge झाल्या, त्यातून निर्मिती झाली हिमालयाची.. दोन्हीकडच्या दगडांमधला फरक ह्यामुळेच.. खालच्या image मध्ये आपण reverse engineering करत जर बघितलं, तर अंदाज घेता येतो की भारत देश आधी अफ्रिका आणि अंटार्क्टिका ह्या दोन्ही महाद्वीपांच्या मध्ये होता.. पण हे मी इथे का सांगतोय? 🤔 ह्याचा आणि ह्या postचा संबंध काय?.. तर ऑगस्ट-२०१४ पासून नवीन / सध्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले 👩‍🏫 पुणे विद्यापीठाने 🎓 ह्या वर्षीच चालू केलेल्या Diploma in Mountaineering and Allied Sports च्या अभ्यासक्रमात हे सगळं शिकवलं जातं.. महेश ने admission घेतली आहे आणि ही Geology 📖 विषयी माहिती त्यानेच plus valley उतरतांना दिली..




वाट दिसायला तशी पाण्याची वाटत होती पण उतरण्याजोगी होती.. बोराट्याची नाळ (लिंगाणा) किंवा नळीची वाट (हरिश्चंद्रगड) आठवावी, अशी समृद्धी.. इथे १२ महिने पाणी 🏊‍♀️ असतं असं म्हणतात, जे आम्हाला त्या plusच्या centerला पोहोचल्यावर लागलं सुद्धा / लागणारंच होतं.. purest form of water - तुमच्या-आमच्या घरी येणाऱ्या 🚰 किंवा purify होणाऱ्या पेक्षाही कितीतरी हितकारी.. थोडी विश्रांती 🧘‍♂️ घेऊन (तसं दमण्यासारखं अजून काही केलं नव्हतं, पण वेळ आणि जागेचा आदर 🙏 करणं गरजेचं असतं), रिकाम्या बाटल्या भरून (रिकाम्या करून आणि भरून), App जो उजवीकडे अजून trail दाखवत होता, त्या दिशेने आमची वाटचाल चालू झाली trekच्या end point 🔚 पर्यंत.. इथून जे पाणी धबधबा म्हणून खाली पडतं, तो म्हणजे देवकुंड (स्वप्नीलने सांगितल्याप्रमाणे 1 of its 7 streams)..


ह्या end point साठी काही शब्द नाहीत, फक्त photo 📸 आणि video 🎥, आणि हीच आजची आठवण / परत येण्याची ओढ / ह्या post ची समाप्ती..

In some parts of the world, people believe, 'Journey is just as important as the Destination'.. In some other, 'Destination is just as important as the Journey'.. In सह्याद्री, there is no Journey or Destination, yet everything is Journey and Destination 🤗..




Friday, October 15, 2021

नवसकाळी २०२१

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

नवरात्र.. दरवर्षी येणाऱ्या चार पैकी सर्वात प्रचलित आणि भारतात सर्वत्र साजरी होणाऱ्या अश्विन महिन्यातल्या शारदीय नवरात्रीत देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते, जे खालील प्रमाणे आहेत,
१. शैलपुत्री
२. ब्रह्मचारिणी
३. चन्द्रघंटा
४. कूष्मांडी
५. स्कंदमाता
६. कात्यायनी
७. कालरात्री
८. महागौरी
९. सिद्धिदात्री

उपवास करणे 🍌, अनवाणी राहणे 👣, दांडिया 🥢, नवमाळ 📿 हे ह्या नवरात्रीतील प्रचलित culture.. तसेच सिंहगडनवम ⛰️, नवरन 🏃, nav ride 🚴‍♂️ हे नवीन culture.. असंच काहीतरी मी सुद्धा गेली २ वर्षे follow करतो आहे..

नवरात्री नवसकाळी.. 9 days, 9+1 hikes
वर्ष तिसरे, २०२१.. a half Everesting and a double Marathon

Day Yellow 🐥, सिंहगड (५२६ मी., ५.७ कि.मी.): नवरात्र आली की रोज (नऊ दिवस) सिंहगडला येणाऱ्यांची रांग लागते.. ह्यात काही नवीन नाही, आणि आज काही वेगळं नव्हतं.. त्यात गुरुवार असला की विचारायलाच नको 😓.. असो.. मागच्या वर्षी (नवरात्री दरम्यान) weekendsला सिंहगड trek बंद होते, म्हणून exact मधले ५ दिवस सिंहगड केले होते.. त्या उलट 🙃, ह्या वर्षी पहिला, पाचवा आणि शेवटचा दिवस सिंहगडच करायचा, असं ठरवलं 📌..


Day Green 🐸, तळजाई (२३७ मी., १०.७ कि.मी.): सोबतीला आज वैभव होता.. मागच्या रविवारी १२ कि.मी.च्या trekला १२ तास लागले होते 😨, म्हणून आज २ तासात आपलं already १० कि.मी. चालून झालंय, ह्यावर विश्वास बसत नव्हता.. अरे हो, त्या trekची स्वतंत्र post लिहिलेली ✍️ नाही.. थोडक्यात 🤏 सांगायचं झालं तर.. ना गार वारा, ना गारवा, ना गारा, ना वारा 😜.. फक्त कोकणातला दमटपणा 😰.. त्यात लेण्यांमध्ये झालेल्या photo-session 📸 ने सगळी morning energy खाल्ली.. ह्यात एक नवीन गोष्ट शिकलो, ती अशी की photo मध्ये एकच व्यक्ती 👯‍♂️ दोनदा कशी आणायची, without any editing - magic 🎩 it is.. trekचा first half भरपूर exhaustive 🥵 होता ज्यात सगळ्यांनाच थोडा-फार त्रास झाला.. location होतं - खडसांबळे लेण्या आणि केवनी पठार.. तासभर पठारावर आराम 😴 केल्यानंतर जेव्हा बरं वाटायला लागलं तेव्हा समोर फक्त एकच target 🎯 होतं 'आता घनगड सोडायचा नाही'.. now, back to नवसकाळी..

magic! isn't it? #noedit
credits: Vaibhav

all Ks
this (and similar) was all we did in the caves
credits: Vishal

तळजाईच्या schedule मध्ये चिखल (पावसाळ्यात) आणि मटार करंजी 🥟 (any season) नेहमीचे.. कधी-कधी मोर 🦚 दिसायला चुकत असले तरी त्यांचे आवाज आजपर्यंत कधी चुकले नाही.. चलते-चलते गप्पा 🗣️ मारत 'next weekend काही plan आहे का?' विषय निघाला.. ह्या वर्षी आधीच anniversaryला घरी नव्हतो.. 'मुलाच्या वाढदिवशी 🎂 तरी परत कुठे जायला नको' म्हणत दोन ✌️ ओळखीच्या (ज्यांच्याबरोबर मी नियमित treks केले आहेत) groups ने schedule 📅 केलेला 'रतनगड ते हरिश्चंद्रगड' trek नंतर करायचं ठरवलं.. तुम्ही ह्या अगोदरही काही posts मध्ये वाचलं असेलच - there is always a next time 😇..

credits: Vaibhav

Day Grey 🐨, खंडोबा टेकडी (३६७ मी., ८.९ कि.मी.): आजच्या plan मध्ये होता 'निळकंठेश्वर family trek 👨‍👩‍👦'.. काही दिवसांगोदर पर्यंत, ह्याबद्दल ऐकलंही नव्हतं.. Sandeepचा YouTube video 📽️ (channel: studious wanderer) आणि Google Maps 🌏 वर reviews वाचून लागलीच नवसकाळीच्या list 📝 मध्ये add केला.. पण सुमेधला सर्दी 🤧 झाली आणि तो plan आता झालाय postpone.. कोई नई, there is always a next time.. Plan B म्हणून नेहमी 'खंडोबा टेकडी' असतेच, जी (येणाऱ्या) परवाच्या दिवशी सुद्धा उपयोगी ठरली..


Day Orange 🍂, राजगड (८२८ मी., १०.८ कि.मी.): २.५ वर्षांगोदर मोरगिरीलाच भरपूर उशीर झाल्यामुळे नंतरचा plan cancel करण्यात आला होता, त्यामुळे कधीपासून करायचा-करायचा म्हणत ToDo list मधून न हलणारा 🥺 कठीणगड (तुंग) आजचा plan होता.. पण पाहिजे तसा RoI (Return on Investment) नाही आणि नऊ दिवस सलग करायचे आहेत म्हणून एकाच दिवशी दोन करण्यात point नाही, म्हणून 'दुसरीकडे कुठे?' आणि Sunday 🏖️ आहे म्हणून 'सोबतीला कोण?' अश्या प्रश्नांचे उत्तरं शोधत, दुपारी विनायकचा phone ☎️ आला, 'आम्ही येत आहोत'.. काल महेशने राजगड suggest केला होता.. तेच repeat 🔄 करत विनायक आणि दीपा तयार झाले..

"गडांचा राजा, महाराजांचा गड".. विचार होता jungle trekचा, जो निसर्गाला काही मंजूर नव्हता.. रात्री झालेल्या पावसामुळे 🌧️ अंदाज घेत parking वाल्या काकांनी (आमच्या planच्या exact opposite) 'चोर दरवाज्याने जा 📈 आणि गुंजवणे दरवाज्याने या 📉' असं सांगितलं.. पण उतरतांना उगच risk नको म्हणून आम्ही चोर दरवाज्यानेच जायचं-यायचं ठरवलं आणि घरून आणलेला trekking pole 🦯, 'jungle trek करायचा नाही' म्हणून गाडीतच 🚙 ठेवला..


जवळच्या तोरणा किल्ल्याला जरी ढगांनी ☁️ वेढलं होतं, तरी थोड्या दूरवरच्या सिंहगडच्या दिशेला बऱ्यापैकी clear view होता.. रस्त्याने हळदी-कुंकू 🏵️ फुलांचा बहर होता आणि समोर बालेकिल्ल्यापासून डावीकडे सुवेळा माचीच्या दिशेने (आणि पुढे) उतरती पर्वत रांग, विरळ ढग / धुकं आणि sky blue सूर्यप्रकाशाच्या combo मध्ये hide-and-seek खेळत होती.. पद्मावती माचीला पोहोचून ह्यात अजून भर पडली भाटघर धरणाची आणि पुरंदर, रायगड 🏰, लिंगाणा किल्ल्यांची.. पण ह्या सगळ्यांवर बाजी मारणारा speechless करून सोडणारा view 😍 होता दाट ढगांनी नटलेला मढे घाट.. बालेकिल्ल्याहून दिसत होती पद्मावती माची, पाली दरवाजा, संजीवनी माची आणि ever-tempting end-to-end राजगड-तोरणा ridge.. अर्थातच, ह्या सगळ्यांच्या स्पर्धेत जीत 🏆 आमची होती..

credits: a fellow trekker

बालेकिल्ल्याला केलेल्या नाश्त्याला 🥪 सोबत होती महेशने घरून आणलेल्या चहाची ☕.. लक्षात आलं होतंच, फक्त second opinion घेतल्यासारखं confirm झालं, खाली फक्त साखरेचं पाणी प्यायलो होतो.. नाश्ता करत झालेल्या चर्चेत ठरलं की जेवण 🍱 करूनच घरी जाऊ, आणि राहिलेला वेळ भरून काढण्यासाठी नेढ्यात जाऊन यायचं ठरलं.. तिथे दुसऱ्या groupने droneने घेतलेला video 👇.. वर ताक 🥛 प्यायला थांबलो, तिथे परत 'गुंजवणे दरवाज्याची वाट घसरडी नाही ना?' confirm करत पद्मावती माची पर्यंत न जाता खाली उतरायला अलीकडचाच right turn ↘️ घेतला..

नेढं - from the drone
credits: @rajgire (Instagram)

मागच्या रविवारी जसे अनुभवले, तसेच spiders 🕷️ वाटेत आमची वाट बघत होते - थोडे छोटे, थोडे जास्त आणि अगदी रस्त्याच्या मधोमध 🕸️.. काठ्यांचा vipers म्हणून वापर करण्यापलीकडे पर्याय नव्हता.. पावसाळ्यात ही वाट जास्त वापरात नसावी, ह्याचा after-effect असावा.. म्हणजे, baby हरीण 🦌 दिसणेही less-travelled-route चीच कृपा.. साधारण २.५-३ वर्षांआधी जेव्हा ह्याच रस्त्याने वर गेलो होतो, तेव्हा एकही ओढा 🏞️ लागला नव्हता, at least लागल्याचा आठवत 🤔 तरी नाही.. तर आजची कहानी जरा अलग होती..


जेवण करून रस्त्याला लागलो आणि जो धो-धो चालू 🌦️ झाला, तत्क्षणी "काय perfect timing ⌚ आहे, वाचलो!" म्हणत सुटकेचा निश्वास 😌 सोडला.. ऑस्ट्रेलियात 🇦🇺 मात्र India womenचं नशीब येव्हडं चांगलं नव्हतं..


speed gun 🔫 बद्दल ऐकलं होतंच, पण आज हे पण कळलं की एका ठराविक वेळेच्या आत ⏳ दोन toll booth 🛣️ जर cross केले तरी fine 💰 लागतो.. ह्या भीतीने तरी आता गाडी mileage दिल चांगला, असा चुकीचा गैरसमज करून घेण्यात हरकत काय?..

Day White 🐰, खंडोबा टेकडी (३७९ मी., ९.० कि.मी.): रात्री 🌃 लवकर (९:३० ला) झोपून सुद्धा आज काही केल्या उठायची ईच्छा 🥱 होत नव्हती.. alarms snooze ⏰ करून, re-schedule करून, परत snooze 🔔 करून जेव्हा ६:१० ला उठलो, तेव्हा potato point 🥔 साठी बराच उशीर होऊन गेला होता.. सलग तिसऱ्या दिवसाचा tentative plan, final नाही होऊ शकला आणि पाचव्या दिवशी जो सिंहगड करायचा होता, तो हुकला 😔.. पण आता तुम्हाला माहिती झालंच आहे, Plan B म्हणून नेहमी 'खंडोबा टेकडी' असतेच..


जे परवा सुद्धा इथेच होते, आज परत तेच काका दिसले.. विचारल्यावर कळलं की माझ्या घराजवळच राहतात.. गेली २६ वर्षे, नवरात्रीत मात्र इथे येऊन मंदिरात 🛕 राहतात, घट बसल्यापासून उतरेपर्यंत.. त्यांच्या अगोदर त्यांचे चुलते असं करत असत, आणि त्यांच्या आधी त्यांचे 👴.. नवरात्रीत उपवास करणार, इथे राहून देवाची सेवा करणार, मंदिराची साफ सफाई 🧹 करणार आणि संन्यासी lifestyle अनुभवणार..


Day Red 🐾, सिंहगड + circuit (७२७ मी., १६.३ कि.मी.): जय निळकंठेश्वर! अरे ते सोपं नाहीये, त्याला छातीत दम 😥 लागतो.. unlimited थाळी २ sweets, pizza 🍕 पाहिजे म्हणतो, व्यायाम नको.. अमूल पावभाजी पाहिजे, वडापाव 🍔 खायला पाहिजे, डेक्कनला फिरायला पाहिजे, सूर्यनमस्कार 🙏 मार म्हटलं तर माहित नाही.. उकडीचे मोदक 🧄 पाहिजे, साजूक तुपाची धार पाहिजे, सिंहगडला चल म्हटलं तर पाय दुखतात.. जय शिवराय 🚩.. हे आहे नियमित सिंहगडला येणाऱ्या बंडू तिखे 🧔 यांचे slogan, जे ३-४ वेळेस तरी आज कानावर पडलं असेल.. facebook link, https://fb.watch/8BbrO4waSv


tranquillity

आज जर तुम्ही सिंहगडला आले असाल (८ च्या आधी), तर तुमच्यासारखा नशीबवान 🍀 कोणी नाही.. क्वचितच जेव्हा ढग army आपल्या धरणी मैत्रिणीला भेटायला 🤝 येते, तो आजचा दिवस.. तसंही सिंहगडला प्रत्येक दिवस unique, resourceful आणि perfect 👌असतो.. इथे रोजचे अनुभव अविस्मरणीय 🥳 असतात.. इथे आलं की इथेच राहून जावंसं वाटतं.. त्यात घाट रस्त्याने उतरतांना तर हे ढग-cum-धुकं तर अजून होश हिरावून घेतात.. btw, घाट रस्त्याने आता खाजगी गाड्या चालू झाल्या आहेत 🤘, in case, you were waiting..



Day Royal Blue 🌀, घोराडेश्वर (२३९ मी., ३.६ कि.मी.): इथे आलो की नेहमीप्रमाणे आजही target होतं 'wheels ⚙️ on the curve'.. पण आपले plan, निसर्गाला नेहमीच मंजूर असतील, असं नसतं 🙁.. काल सारखाच आज पण 🌁 'today's special' white belt sheet चा बोलबाला होता 😁 🎉.. viewला ना MCA होता, ना curve.. राहिलेल्या menu मध्ये कुठेतरी कोपऱ्यात होते काही सेकंदांसाठी दिसलेले floodlights 🏟️ आणि बेगडेवाडी railway station हुन ये-जा करणाऱ्या local 🚞, मालगाडी 🚂 आणि एक्सप्रेस 🚋, one each..


पहिल्या नवसकाळीचा पहिला trek घोराडेश्वर होता.. otherwise also, ह्याआधी १-२ दा येऊन गेलो आहे.. पण parking साठी आज पहिल्यांदाच पैशे दिले.. "कधीपासून घेताय?" विचारल्यावर काका सांगता, "५ वर्ष झाले".. confidence बघा! माणसाने खोटं बोलावं, पण अगदीच 'नरो 🧝 वा कुंजरो 🐘 वा' / life-and-death matter असेल, तरंच.. उगच कशाला आपले कार्मिक account sacrifice करायचे? सांगायचा तात्पर्य हा की, truck 🚚 मागे 'शेवटी नशीबच' जे लिहिलेलं असतं, ते कळत-नकळत आपणच लिहीत / बनवत असतो 👻..


Day Royal Blue 🐬, पाषाण-बाणेर टेकडी (२१७ मी., ६.५ कि.मी.): नवसकाळीचा plan बनवयच्या अगोदरच, राहुल: "एक दिवस पाषाण टेकडी कर".. Google Maps, AllTrails app check करत लक्षात आलं की टेकडीला ना elevation, ना distance (comparatively).. मग त्यानेच सुचवलं 💡, 'घोराडेश्वरच्या दिवशी करू शकतो'.. मागच्या वर्षीही सातव्या दिवशीच 9+1 मधला +1 bonus होता, ह्या वेळेसही तत्सम 👍..

pic(k) of the league

वाकड सोडल्यावर navigation लावलं.. Google Mapsला बरं 'तसदीबद्दल क्षमस्व' ⚠️ 👷 ची माहिती होती की सध्या पाषाण sideला highway हुन उतरता येत नाही.. digital बाईने सांगितल्याप्रमाणे बाणेर हुन service road घेतला, आता त्याक्षणी 'का?' 🤨 कोणाला विचारणार ना! पोहोचल्यावर राहुलच्या captaincy खाली आजची second innings चालू केली, जी unexpectedly, घोराडेश्वर सारख्याच कमी गर्दीत 🚷, म्हणजे मनासारखी झाली 😎.. बाणेरच्या / टेकडीच्या बाणेर sideच्या तुकाई माता मंदिरापर्यंत जाऊन, माघारी येऊन, नाश्ता-चहा केला आणि back to pavilion 🏢..

तुकाई माता मंदिर, बाणेर

Day Pink 🦩, all Ks (४४८ मी., ६.८ कि.मी.): from कल्याण पेठ to कोंढाणेश्वर via कल्याण दरवाजा at कोंढाणा by कोठावदे.. कालपर्यंतच्या सात दिवसांपैकी एखाद्याने आज repeat केला असता तर ह्यात अजून एक K असू शकला असता 'with कुलकर्णी / खराडे / कोंडे'.. असो..


Day Purple 🌂, सिंहगड + potato point (७१२ मी., १०.२ कि.मी.): आज होता कल्ला.. नऊ दिवस रोज येणारे करत होते celebrate 🥳.. "गणपती बाप्पा मोरया" पासून "जय भवानी" च्या गजरात "इंकलाब जिंदाबाद" पण कोणीतरी add केलं 🤪.. म्हणजे "होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है!" सारखीच गत झाली.. घरून लवकर ⏱️ निघाल्याचा फायदा घेत sunrise point ऐवजी थेट 'final destination' 🎯 potato point हून सूर्योदय 🌄 बघितला / mobile मध्ये सोबत घेतला.. सिंहगडला (जवळ) असलेला हा दुसरा wind point आहे, असं म्हणायलाही कोणाची हरकत नसावी..


New Zealandचे 🇳🇿 Sir Edmund Hillary आणि शेर्पा 🇳🇵 Tenzing Norgay यांनी १९५३ साली २९ मे तारखेला पहिल्यांदा पीक XV / चोमोलुंगमा / सागरमाथा शिखरावर 🏔️ चढाई केली होती, ज्याला आपण Mt. Everest नावाने ओळखतो.. समुद्र पातळी 🏖️ पासून ह्याची उंची ८८४९ मी. आहे.. consequentially,
Everesting - Climb the height of Everest. One hill, anywhere in the world 🗺️. One activity. No time limit. No Sleep.
>> फक्त पहिला clause लक्षात घेतला तर ह्या वर्षी नवसकाळीत (वरचे सगळे आकडे जोडून) half Everesting झालंय, total ४६८० मी. ✌️..

४९० ई.पू. साली Greece देशामधे Marathon गावात झालेल्या लढाईत ⚔️, Persia विरुद्ध पहिल्यांदाच जिंकल्याची बातमी सांगण्यासाठी एक युनानी सैनिक 💂‍♂️ तिथून non-stop Athens पर्यंत २६ मैल (४२.१९५ कि.मी.) धावत 🏃 गेला होता.. परिणामस्वरूप,
Marathon - Long-distance foot race with a distance of 42.195 kilometres, usually run as a road race, but the distance can be covered on trail routes.
>> फक्त अंतर लक्षात घेतलं तर नऊ दिवसात दोन Marathon चालून झाल्या आहेत, total ८८.५ कि.मी. 🥾..

The best art in the world is land. Appreciate it. Preserve it.

credits: महाराष्ट्र शासन वनविभाग, पुणे

Friday, September 24, 2021

कोळेश्वर पठार

|| श्री अशापुरी देव्यै नमः ||

पायाला मुंग्या आल्या जळू लागल्या.. कोळेश्वर पठार

Geographically, we all know, the धोम dam backwaters 🏝️ is V-shaped, 90° rotated anti-clockwise, when viewed conventionally on the Maps, i.e., with North direction pointing upwards.. what lies at the center of this 'V' is कमळगड fort (popularly known for its कावेची विहीर of red soil) and its open end is the plateau, where our itinerary was planned for today 📅 - starting from V's Northern end (further West ⬅️, from जांभळी village 🏘️) and ending at its Southern end, at नांदगणे (Sachin साठी, नांदगाव 😜)..

Few weeks ago, we were exactly on the 🙃 opposite side of this 'V'.. what can be seen at the center (a bit left) is कमळगड ⛰️ and everything behind it (towards right) is what this post is about, कोळेश्वर पठार.. the area which we were set to hike / explore 🧐, or should I say, the area which we were to be victims of its bloodsuckers..


19 September 2021

After resting 😴 a while at जांभळी, after morning chores, after घरून आणलेला breakfast 🍛, after some village अति-गोड चहा ☕ and after short introduction ℹ️ round, as always, we kicked-off today's schedule along with a villager 👳, to aid us in starting the navigation via the correct one.. yes, you read 📖 it right - even if it was Vishal's trek, there were no cooking plans today 🤔..


Now, we were on our own.. through the beautiful हळदी-कुंकू blossom 🏵️, we reached a small dam / lake like structure in the West.. this reservoir can only be viewed on Google Maps 🌏 in satellite mode (and not by default).. calm as mirror and clear as reflection, the water was peacefully resting, after the heavy rainfall ⛈️ in last months, the outcome of which were clearly seen in the surrounding mountains 🏞️ in the form of landslides - brown shades of green.. for the first few minutes, it felt like we were circumambulating (walking around / प्रदक्षिणा) the still water body, in attempts of seeking a way upwards ↖️ on the left..



After trial and error, soon we were gaining the elevation, but कोळेश्वर was yet to reveal its true identity / enormity.. fighting the innumerous leeches on the way, we reached its first plateau.. here, all could be seen getting rid of the parasite from their shoes 🥾, socks 🧦 and pants 👖, outside and inside.. had only heard 👂 before today, ok, also seen 👁️‍🗨️ in a hollywood flick 'Speed 2' 🛥️, these bloodsuckers do literally suck-it-out (from humans) / suck-it-in (inside themselves).. it was yet another never-before / first-time experience that will easily be remembered 🧠 for the lifetime..


Also known for leech therapy, they are used for medicinal ⚕️ reasons, to remove the impure blood 🔴 (impure जरी असलं तरी लालच असतं 😉) from human body, and for Gangrene treatment.. each one of them can drain you upto (to a maximum of) 15 ml.. same as 'upto 50%' type bluff by commercials, this must have been a rare case today though.. in its uninterrupted and natural version, it silently 📴 (without any sensible movement) creeps up the body, starts the sucking process and gives up automatically when satisfied, without any possible side-effects.. forcing / pulling it apart can be more painful and harmful, leading to continuous discharge of the red liquid 🩸.. salt can make them release the hold, and as we experimented (that also successfully worked), so does the antiseptic, dettol ➕ (credits: Tanmay).. Prasad and Piyush were firsts of major victims.. whoever was spared virgin, or had cleared himself of the charges, could then savor some surrounding views of beautiful केंजळगड, its neighboring giant - रायरेश्वर, the lake we came from and now back-in-vicinity, the धोम dam.. Far-off seen were पांडवगड (clicked-from-location 📸 of first snap above) and मांढरदेवी 🛕.. कमळगड? महाबळेश्वर? not yet..


It was another round of reliving SarPass 🏔️ while chatting with Mr. Gokhale.. for your kind information, there is also a version of chatting outside mobile world.. what we observed after reaching this side of the top, laden by सितेची आसवे 🌸, the earlier one merely turned out to be a promo.. Sandeep and Nilesh, who had not thoroughly checked themselves in phase 1, were now bleeding. red. unstoppable... "actions 💪 speak louder than words 🗣️" is one saying.. so should be another one, like "videos 🎥 explain better than texts 🗒️" / "YouTube 🎥 overrules Google Web Search 🗒️".. watch this one for the grip: leech special "not to miss" video on whatever happened till here, by Sandeep (also today's winner 🏆 with about 23 bites), https://youtu.be/-S1wNuB1syE

सितेची आसवे


Dilip and Vivek even removed their Ts 👕 to check if some of them crept all the way up.. employing dettol and turmeric (हळद), we were on our way to the day's next target, the ➡️ East side col (खिंड), which in itself was about 4 hours of 🌲 jungle walk 🚶‍♂️.. yes, that's the expanse of this plateau.. we started having रायरेश्वर closest on the left.. in about ⏳ 2 hrs (honey 🍯 break included), it was time to relish some केंजळगड moments (then closest on the left), and another ⌛ 2 hours (lunch 🍱 break included) meant we had कमळगड in the front..


After hour and a half break of leech clean-up, snacks (bourbon 🍪? of course, yes), time-lapse of always beautiful #Sahyadris, we were accompanied by another villager 👨‍🌾 to his home 🏡 for unadulterated honey, ₹500/kg.. what seemed like ages to fill in those 3 bottles, most of us started worrying about rest of the schedule ⌚.. finally, we were off to an ancient कोळेश्वर temple with hardly any remains.. occasionally checking for leeches, the dense forest rescued / protected us from the sun 🌤️, as it did not rain throughout the day.. after crossing and drinking from some tiny streams of free-flowing, natural, mineral water 💧, we decided to have lunch next to a hut, under a full-grown tree.. Piyush had to again clean them up, the leeches.. as if poked by a needle 📍 planted / planned on a chair 🪑, Vishal got up in a flash, where he had just declared, 'we'll have lunch here' and had laid down as if the trek had ended.. confirming a nearby safe, more precisely 'leech-free' place, we did have our lunch.. with 👈 Sandeep and Nilesh 👉 on either side, it felt like, (as if) I was in a containment zone.. at once, I parted to the other side of the circle 🔁..


Giving tummies sufficient to be busy with, we were now feeling much better than what was after that long walk.. about to get up, Prasad claimed, 'पायाला मुंग्या आल्या'.. some of us instantly proclaimed 🤪, आज फक्त 'पायाला जळू लागल्या' म्हणायचं, thus the title of the post.. Nimish, Vaibhav and Dilip shared some fruits 🍈, चिक्की 🍫 and खाकरा with the kids.. sealing off the lunch with their home-made buttermilk 🥛, we marched toward the col..

धोम dam


Now म्हातारीचे दात 🦷 were clearly visible.. a mountain adjacent to कमळगड having some distant pinnacles, as if to maintain social physical distancing 😷, are known as म्हातारीचे दात.. धोम dam, green landscapes coupled with the floating clouds ☁️ were nothing less than cherry on the cake 🍰 for the view.. कमळगड also had started to somewhat show itself..

म्हातारीचे दात

कमळगड

In no time, we were in the col, now also able to catch the glimpse of the Southern end of the 'V'.. कमळगड in the front now moved to our left, ok! we turned right toward South, and from flat, were now to descend.. but before that, was today's final opportunity to be fascinated 😍 by #Sahyadris, in its महाबळेश्वर flavor and mini बळकवडी dam (with an arrow 🏹), first dam on the कृष्णा river, that originates not very far from here.. while half of us were still finding the correct way, we half were all enjoying 🥳 yet another version of the unbeatable and beautiful nature..

महाबळेश्वर and बळकवडी dam

Before I forget / before the post ends, another rare thing to happen today was spotting leopard 🐆 pugmarks 🐾.. also, today was the day 🤞 from those 7 years - the span required for Strobilanthes callosa / कार्वी to blossom..

pugmarks

कार्वी blossom

Being अनंत चतुर्दशी, at the base village, people were busy with the known rituals of गणपती विसर्जन.. implying, today's eventful journey was to end with the well deserved prasadam 🍚..

2021 edition of IPL 🏏 was to resume today, MI 🔵 vs CSK 🟡, after the tournament was halfway called-off earlier this year, when some of the players were affected / infected by the pandemic.. as we were waiting for the ordered dinner to arrive on our tables, when we switched on the live streaming on hotstar 🌟, Android mobile app, CSK were already 3 down for 10 runs on the board 📋.. yet they won.. but, MI have always lived up to the habit / reputation of starting low 🔅 and ending high 🔆 in the IPLs.. let's see..

The fatigue of 18.8 kms feet distance 📏 and 800m elevation gain, नैनसुख @ #Sahyadris followed by dinner, duly meant, our conscious mind was to be awakened only when our stop arrived.. ok! when we arrived at our alighting spot..

Kiran. Others are mentioned above

Back to home, it was / is / will be obvious dialog of sharing the experiences with better half 👩, specially the uniqueness of them.. while 7-8 were successful in confronting my shoes, 3 others could creep-up my legs, but not a drop was wasted.. "चढून पस्तावल्या असतील, काही असेल तर निघेल ना!?" 😀 म्हणत the day ended in sweet dreams 💤..

YouTube video of complete trek, by Sandeep again, TBA

Hold on.. Dilip was with us today, and sure the post cannot end without some of his lines 📝 (English translation follows)..

मानवाच्या 50 हजार वर्षांच्या आधुनिक इतिहासात,
एक काळ ⏱️ होता जेव्हा या जगात प्रत्येकजण वैज्ञानिक होता, तत्ववेत्ता होता, इंजिनिअर, शेतकरी होता 👨‍🔬👷 👨‍💻.. मानवाला या ग्रहावर 🌍 राहण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा शोध 🔍 खुप आधीच लागला.. पुढची शतकं त्यातून फक्त निर्मिती होत गेली गरज नसलेल्या गोष्टींची आणि त्या गोष्टींसाठी / गोष्टींनी मानवाला धावायला 🏃मजबूर केलं..

In the 50,000 years of modern human history, there was a time when everyone in the world was a scientist, a philosopher, an engineer, a farmer 👨‍🚒 👨‍🔧 👳‍♂️.. all necessary things that human beings need to live on this planet 🌎 were discovered long ago.. the next centuries saw only extras, forcing human beings into a rat race 🐀..

सांगायचा तात्पर्य असा की / the point is, leeches are just another parasite in the world, first is human.. 🤖
difference being, parasites depend on other living organisms, and humans depend on non-living objects.. 🙏

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...