Friday, December 29, 2023

राजगड २०२३

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

एक बार और, 'frame of the year'.. राजगड

article सुरू करण्याआधी, title बद्दल थोडंसं.. 'एक बार और' बोले तो, मागच्या वर्षीच्या 100k 📈 resolution वाल्या article मध्ये ज्या photoला "frame of the year" caption ✍️ दिलं होतं, त्याची ही पुनरावृत्ती 🔄.. so, इथल्या मजकुराला साथ असणार आहे mostly ह्या frame मधल्या मोजक्या (५ जणांच्या) ५ फोटोंची.. शिवाय, तुम्हाला (हिरव्यागार) राजगडचे photo बघायचे असतील तर, पहिलं प्रेम 💓 article वाचू शकता, here.. आणि मागच्या वर्षीचे अशेच अजून "xyz of the year" handpicked highlights 👌 बघायचे असतील तर read here..

महिन्याच्या सुरवातीला गिरनारला गेलो असता, one of the topics for discussion was ह्यावर्षी राजगड राहिला आहे 😞.. त्यात वैभव नवीन गाडी 🚘 घेणार आहे, तर बोहणी पण होऊन जाईल, म्हणून (पुण्यात) परत गेल्यावर (आणि गाडी आल्यावर) करू एखादा दिवस plan - असं ठरवण्यात आलं / असं ठरलं..

बरं, आता तुम्ही म्हणाल, SRT मधला R म्हणजे राजगड नाही का? मग "ह्यावर्षी राहिला" कसा? 🤔.. तर, तसं नसतं ते.. range trek आणि out and back किंवा circuit / roundtrip treksचे थोड्याफार फरकाने का होईना, आप-आपले एक proprietary गणित असतात 😌.. also, from a different perspective, the most popular definition of राजगड (amongst many others) is "बालेकिल्ला आणि नेढं", जे SRT मध्ये cover होत नसतात.. म्हणून, राजगडचा हा solo trek ⛰️ आणि हे article 📄.. solo trek !? - please ignore / rationalize..

काही दिवसांनी groupवर राहुलने २३ तारखेचा प्रस्ताव मांडला.. weekend जवळ येत नाही तर 'सिंहगडला जायचं का?' विचारायला लागला.. आणि आदल्या दिवशी ते ही जमणार नाही सांगून विषय (तात्पुरता) close झाला 🚫.. ही हालचाल बघत दुसऱ्या thread वर (1-to-1) वैभवने विचारलं, "२४ला जायचं का?".. then I / we had some other (family) plan, म्हणून त्याला "नाही जमणार" सांगितलं, आणि इथे सुद्धा विषय (तात्पुरता) close झाला 🚫.. then, due to unforeseen circumstances, that other plan had to be rerouted (हर्षद can tell better).. and राजगड was back "on" ✅.. आणि शोधमोहीम चालू झाली, 'अजून कोण येतंय?', ह्याची.. भूषणला विचारलं, झटक्यात तयार 😀.. सुयोग as usual, "संध्याकाळी सांगतो" आणि संध्याकाळी "येतो" म्हणाला 😃.. आणि वैभवचा एक colleague, स्वप्निल, अशे ५ जण तयार झाले 👏..

frame of the year - सुयोग

२४ डिसेंबर २०२३

सकाळी ६ वाजता 🕕 निघायचं ठरलं, जो IST नुसार goal achieve झाला आणि वैभवची spacious गाडी testing करायला / test व्हायला निघाली.. सोबतीला दर वेळेस कोणीतरी असतो, ज्याला इथली माहिती नसते म्हणून नेहमीप्रमाणे नसरापुर फाट्याला विजयस्तंभ 🗼 बघायला गाडी पहिल्यांदा थांबवण्यात आली.. तुम्ही सुद्धा इथून कधी ये-जा करणार असाल, तर अवश्य भेट द्या (GMaps location).. ह्याविषयी थोडक्यात माहिती (courtesy: Google 🔍)..

courtesy: Google

भोर संस्थानचे राज्यपाल श्रीमंत रघुनाथराव पंत सचिव यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्मारक म्हणून १७४९ मध्ये हा स्तंभ उभारला होता.. ह्या स्तंभाचे स्वरूप म्हणजे खाली चौरस ⏹️, नंतर अष्टकोनी 🛑 आणि वर वर्तुळाकार 🔘.. खाली ज्या-त्या दिशेला असणाऱ्या किल्ल्यांची आणि गावांची नावे व त्यातील अंतर (in miles) संगमरवरी पट्ट्यांवर कोरलेले आहे.. 'हा खांब इथे का बसवला गेला?', याबद्दल असं सांगितलं जातं की, शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांनी ह्याच ठिकाणी तोरणा किल्ला ताब्यात घेण्याची योजना आखली होती.. स्तंभावर भवानी मातेच्या पूजेची प्रार्थना कोरलेली आहे.. दुसरीकडे, मजकूर इंग्रजीमध्ये 🔠 आहे.. तसेच या स्तंभावर हिंदवी स्वराज्याचा शपथविधी 📜 सोहळा आणि राजमुद्राही 🪙 कोरलेल्या आहेत.. स्तंभाची उंची सुमारे 30 फूट आहे..

good cases pass झाल्यावर आता वेळ होती corner cases test करायची.. national highway ४८ सोडून गाडी (आणि गाडीसोबत आम्ही) उजवीकडे ➡️ वळाली state highway ६५ कडे / वर.. अंबावणे गावाजवळ कुठलीतरी कमान ⛩️ बघून (विंझर आल्याचं समजून) वैभव सांगायला लागला, SRTच्या वेळेस आम्ही इथून येतो.. 'आपण पुढे आलो आहोत का?' पेक्षा 'विंझर इतक्या लवकर कसं?' हे doubts यायला लागले.. गाडी u-turn ↩️ घेतच होती की all-time आणि any-time saviors Google / Google Maps धावत आले, आणि आपण पुढे आल्याचा गैरसमज दूर झाला.. मार्गासनी पुढे test करायच्या होत्या bad cases.. इथे मात्र वैभवला शेवटी सांगावं लागलं की, 'नवीन जरी असली तरी विमान नाही.. जरा थंड घे' 😉.. 

गाडी लावून, parking 🎫 आणि entry fee 🎟️ भरत चहा-नाश्ता करून आम्ही चोर दरवाज्याच्या मार्गी लागलो.. इथपर्यंत discussion हेच होतं की, मागच्या वेळेस कोणाला किती वेळ लागला होता?, फलाना-ढीमका etc. etc... पण मग सर्वांनी 'डोक्यावर पाणी' सांगितल्या वेळेच्या आत चोर दरवाजा गाठण्यात यश मिळवले ✌️..

frame of the year - भूषण

all the way till here, we were badly searching for a glimpse of सिंहगड, but had none.. pollutionचा असा थर साचला होता की खालची गावं सुद्धा बऱ्यापैकी अस्पष्ट दिसत होती.. पाठीमागे (उत्तर-पूर्व / ईशान्य ↗️) जो सिंहगड दिसायला पाहिजे, त्याचे गगनचुंबी 🗼 towersही शोधून सापडत नव्हते.. समोर (उत्तर-पश्चिम / वायव्य ↖️) तोरणा (प्रचंड)गड नसून नुसता भुईकोट किल्लाच आहे, असंच जाणवत होतं.. दक्षिणेकडे ⬇️ दूर कुठेतरी कुठलंतरी पठार दिसत होतं - कोणी कोळेश्वर म्हणत होतं, तर कोणी महाबळेश्वर - exactly कुठलं? हे फक्त त्या भूभागालाच माहिती.. हे सगळं बघता / वाचता, एक प्रश्न आपणा सर्वांना नक्कीच पडायला हवा.. शुद्ध हवेसाठी morning walk किंवा कुठलाही walk कितपत प्रभावी आहे? 😢.. मला तर ह्याहून मोठा doubt 🧐 हाही आहे, 'शहरातल्या छोट्या-मोठ्या टेकड्या सोडा, सिंहगडावर तरी स्वास्थ्य आहे का?'.. disheartening 💔 it is.. असो,

for no specifically known reason, इथून (चोर दरवाजा) पुढे बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जायचा नेहमीच कंटाळा येतो 😞.. ह्यावेळेस इथे पायऱ्यांचे काम होत असतांना दिसले.. बरंच झालंय, थोडंसं बाकी आहे 👍.. काही जण ⛺ campingचे tent आवरत होते.. थोडे आवरलेले होते, बरेच बाकी होते..

frame of the year - वैभव

बालेकिल्ला चढायचा म्हणजे पुण्यातली slow-moving traffic 🚦.. त्यात रविवार असला म्हणजे मुंबईतली standing traffic ⛔.. कोल्हापूरचा एक group जो उतरत होता, संपतच नव्हता.. नाव काय? तर, 'विघ्नहर्ता'.. वैभव तरी म्हणालाच, विघ्नहर्ता पेक्षा विघ्नकर्ता नाव पाहिजे होतं 😆.. १० मिनिट सुद्धा खूप झाले, अशी वाट चढायला साधारण अर्धा तास तर फक्त वाट बघावी लागली ⏸️.. मागे / खाली रांग वाढतच होती, आणि समोरून उतरणारे थांबतच नव्हते.. शेवटी झाली हातापायी / हाणामारी (आमची नव्हे).. इथे तुम्हाला Amit Tandonचा latest video 🎥 आठवला असावा - a must watch - clubbing in 40's 🕺..

राजवाड्याच्या sideला माकडं 🐒 असतात म्हणून 🪟 खिडकीच्या sideला बसून डबा 🥚 काढत नाही तर आले २ भुक्कड वास घेत.. शिस्तीत डबा 📦 परत ठेवत, हातात पुडा पकडता येतो म्हणून फक्त biscuits 🍪 वर काम धकवत, चंद्रतळ्या सोबत photo काढत आम्ही परत उतरायला लागलो.. उतरतांना ना मुंबईची traffic, ना पुण्याची 😇.. उतरताच right turn घेत आम्ही सुवेळा माचीच्या दिशेने निघालो.. सावलीतून बाहेर निघत नाही तेच एक नजर गेली अजून एका वाटेकडे - कदाचित 💭 संजीवनी माचीकडे जात असावी.. ह्याचीच चर्चा काही लोक वर करत असावे.. so, looks like, it's not absolutely mandatory to traverse the upper fort (बालेकिल्ला) from the right side to go towards "engineering marvel" संजीवनी माची..

पुढे नेढ्यात जाण्याआधी, आम्ही चिलखती बुरुजाच्या पायऱ्यांवर राहिलेली पेटपूजा करायचं ठरवलं.. dry fruits, bourbon, अंडी, काकडी 🥒, कडधान्य - all check.. पराठे नव्हते आज, पण नेहमीच्या इतर healthy आणि unhealthy options सोबत आज bonus मध्ये होते - भाकरवडी आणि oreo 🤤.. next stop was needs-no-guesses - 'the formidable' नेढं..

frame of the year - CY 2023

मागच्या वर्षी गर्दीच्या भरात ज्यांनी मनमोकळे photo काढले नव्हते / काढायला भेटले नव्हते, त्यांच्यातला आज फक्त एकच ☝️ सोबत होता.. तरी, सर्वांचे solo photo काढत झाली थोडीशी misunderstanding.. 'परतीच्या वाटेवर समोर कोणी का दिसत नाही?', म्हणून सुयोगला phone 📞 लावला, तर लक्षात आलं की सगळे गेलेत अजून पूढे सुवेळा माचीच्या दिशेने.. मग काय? हनुमान मंदिराजवळ एक आजोबा ताक आणि पाणी विकत होते, त्या सावलीत बसलो ह्यांची वाट बघत.. आधी एक group आप-आपसात गप्पा मारत होता, त्यानंतर २ जण आले आणि "७० आणि ३" वय सांगणाऱ्या आजोबांकडे त्यांची कदकाठी बघत आणि दिनचर्या ऐकत आपलं 'usual' दुखडं गाऊ लागले 💊.. with this, 'आजोबा म्हणावं की काका?', हा सुद्धा प्रश्न पडायला आता सुरुवात झाली आहे..

चढतांनाच ठरलं होतं, की उतरतांना आपण गुंजवणे दरवाज्या मार्गे उतरणार आहोत.. गेल्या २ वर्षांसारखंच आजही plan होता circuit trekचा ⭕.. २०२१ साली anticlockwise 🔄, मागच्या वर्षी clockwise 🔁 आणि आता परत anti 🔄.. so, similar to pattern observed / mentioned in the latest article from other blog on 'how and when India lost the World Cup?' (read here), next year, it's most likely to be clockwise 🔁 wandering in this same area..

गुंजवणे दरवाजा - स्वप्निल

२-२ करून बाकी ४ आल्यावर आम्ही सोबत निघालो.. इथून तरी नवीन बसवलेले दरवाजे 🚪 बंद आहेत, असं वाटत होतं.. खाली उतरून 'नाही' लक्षात येताच इथेही / ह्यांचेही photo-session 📸 झाले.. वाटेत जो एक ओढा २ वेळेस cross करावा लागतो, तो कोरडा पडला होता.. that basically confirms the impression from previous experience during the hike on Republic Day 🇮🇳, 2019.. another affirmation also then is, "subconscious mind 🧠 forgets nothing"..

another common particulars from all of these instances is the lunch 🍱 at 'सुवेळा garden' (GMaps location).. म्हणजे, 'आम्ही राजगडला trek करायला येतो का इथे जेवायला?', हा सुद्धा एक विचार करायला लावणारा 🤨 प्रश्न आहे..

चलो then, if the trend continues, भेटू पुन्हा इथेच, "frame 🖼️ of the year" सोबत, अजून एखाद्या नवीन गडी / buddy सोबत.. तोपर्यंत, remain physically active 🏃‍♂️ to stay healthy..

Sunday, December 10, 2023

गिरनार २०२३

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

।। श्री गुरुदेव दत्त ।।

winter is here.. ગિરનાર

To: You
Cc: Mahesh, Bhushan, Parmeshwar, Lalit
Bcc: Vaibhav, Rahul, Suyog, Rahul, Prashant, Tushar, Omkar

then, 2 of the last updates were, "winter is coming 😇" - just couldn't feel the heat 🧣 of the season.. and now that we have checked ગિરનાર ⛰️, the same was "winter is here 😇" - just couldn't feel the heat 🔆 anymore.. similarly and as per followed practice, in Feb, as and when (when and as) SRT wraps-up ✅, winter will be done and dusted.. सांगायचं हेच की, the definition of winter has changed to, 'ગિરનાર to SRT' 😏.. होईलच परत हा विषय फेब्रुवारी मध्ये.. बोलू तेव्हा अजून..

गेल्यावर्षी आलो होतो (read detailed post here), तेव्हाच 'ગિરનાર सुद्धा, नवसकाळी आणि SRT सारखा yearly event व्हायला पाहिजे 👍', असा प्रस्ताव मांडण्यात आला आणि म्हणूनच तुम्ही आता हा लेख (second edition) वाचत 📜 आहात.. group (बऱ्यापैकी) तोच - थोडेफार जे बदल आहेत, ते म्हणजे - ➖ प्रशांत वजा (वर Bcc मध्ये नमूद केलेला प्रशांत वेगळा), आणि ➕ ओंकार, तुषार आणि सुयोग जमा झाले होते.. मागच्या वर्षी प्रमाणेच, or more appropriately, नेहमीप्रमाणेच 😝, महेश cancelled last minute week.. so, we 8 were to start our 🛤️ 11088 journey, on second ✌️ Thursday of this year's December, unlike last year's first ☝️..

જય ગિરનારી

while the hiking matters were to be same as last year's itinerary 📑, the follow-up actions actions those were planned to follow ⏭️ were slightly different.. (unchanged) ludo 🃏 and Somnath 🛕 along with (changed) chain reaction 🔗 and a Gir Safari 🦁 were plan of the people, by the people and for the people in Bcc, and I was (changed) to return via the same 11087 🚂, same route as used during the 'to' travel (same TTE 🧑‍✈️)..

अजून काय वेगळं होतं तर मागच्या वर्षी प्रसादने reference दिलेल्या ज्या आश्रम-cum-hotel मध्ये थांबलो 🛌 होतो, तिथे लग्न असल्यामुळे ह्यावेळेसही फजिती नको म्हणून दिवेकर काका (दर महिन्याला) जिथे थांबता, ते आश्रम try करायचं ठरलं 👌..

आधार card extras (महेश special) -
१. ह्या वेळेस, 'महेश cancel 🚫 झाला आहे', हे सगळ्यांना माहिती नसल्यामुळे, वैभवने तो राहत असलेल्या areaच्या 🏙️ आसपासच्या membersला गुरुवारी संध्याकाळी जेव्हा "पुणे stationला कसं जायचंय? महेश, सुयोग, सुशील?" विचारलं, तेव्हा राहुल उत्तरला, "महेशचं फक्त आधार card 🎫 येणार आहे"..
२. मागच्या वेळेस मात्र महेशच्या ticket 🎟️ आणि आधार card वर प्रशांत आला होता - (somehow) धकून गेलं 😊.. ह्या वेळेसचा TTE असलं काही खपवून घेईल, असं दिसत नव्हतं 🙍.. so, बरं झालं, भूषण आणि परमेश्वर नाही म्हणाले आणि महेशचं ticket cancel केल्याचं पथ्यात पडलं..

ઉપરકોટ કિલ્લો

बाकी मग, blogचा विषय trekking असल्याने, જૂનાગઢच्या sightseeing 🏰 मधल्या भुईकोट ઉપરકોટ किल्ल्याबद्दल जास्त न लिहिता, फक्त इतकंच सांगेल, 'જૂનાગઢला कधी गेलात तर नक्की भेटून या' 👍.. आश्रम बदलायचा निर्णय ठीक ठरला खरं पण फक्त तात्पुरता.. रात्री १२ वाजता 🕛 आलेल्या groupने गोंधळ घालून आमची झोप तर उडवलीच, शिवाय वैभव काही जास्त दूर झोपला / घोरत नव्हता 😴.. but a gesture not worth ignoring also is Lalit arranging ગોંડલ famous ગાંઠીયા and જલેબી for all 8 of us 🙏.. met him f2f first time, though working together 👨‍💻 for last more than a year now..

९ डिसेंबर २०२३

पहाटे / रात्री २ वाजता 🕑 गजर वाजयच्या आधीच जाग आली.. smartphone बघितला तर '१ तास आधीपासूनच जे alarmचं notification दिसायला सुरुवात होते, ते का दिसत नाही?', हे बघायला गेलो तर a.m. / p.m. चा गोंधळ फक्त Lucky Singh (लगे रहो मुन्ना भाई) किंवा bellbottom 🎬 जाणून-बुजून करत नसतात, तर कधी-कधी आपल्याकडूनही नकळत होत असतो, हे (परत) लक्षात आलं 😬.. 'परत' म्हणजे, this was not my first time 🤦 too.. btw, तारीख दाखवणाऱ्या analog घड्याळात दुपारच्या १२ वाजता तारीख बदलत असेल तर उपाय काय? 🤔 बूझो तो जाने.. असो,

एकाच room-cum-hall मध्ये झोपलेलो असूनही सर्वांनीच गजर ⏰ लावले होते.. ठरलेल्या वेळेत आवरून आम्ही 🕒 ३च्या आत घरा बाहेर होतो - '७च्या आत घरात' सारखंच काहीतरी.. ८ जणांमध्ये आपोआप ३ groups झाले जेव्हा आम्ही पाऊले टाकायला सुरुवात केली.. for obvious reasons तुषार आणि प्रशांतने head-start 🏃‍♂️ घेतली.. राहुल आणि राहुल सोबत ह्या वेळेस होता ओंकार.. सर्वात लहान असल्यामुळे त्याच्या कोवळ्या जोशला कसलाच तोटा नव्हता ☺️.. काही वेळातच त्यांनी अगदी क्रूरपणे head-start वाल्यांचा उत्साह नाहीसा केला 👽.. सूयोगने कदाचित पहिल्यांदाच hiking पोटी, त्याचे दुसरे plan(s) adjust केले असावेत 🤘.. राहिलो मग मी आणि वैभव, ह्या groupचे कदाचित togetherest hiking buddies 😀.. म्हणजे काय? तर, भावनाओं को समझो..

वाटेत दिसतील त्या सर्वांना (ગુજરાતી असो वा महाराष्ट्रीयन) "જય ગિરનારી" अभिवादन 🙏 करत आम्ही unexpectedly superfast / non-stop 🚷 पद्धतीने आगेकूच करत होतो.. वर जाऊन आरती होत नाही, तो पर्यंत थांबण्याशिवाय काहीही पर्याय नाही, हे माहिती असून सुद्धा weatherचा योग्य तो उपयोग, म्हणजेच सदुपयोग करण्यात आला..

the regular December season was time and again landing hard and full, accompanied by intervalized breeze 🌪️.. म्हणजे काय? तर, बोचरी वा काटेरी थंडी.. आता हे काय? तर, भावनाओं को समझो.. "intervalize" - छान शब्द आहे ना?.. that triggers another question - by any chance, do you know 🤨 the process of vocabularizing? "vocabularize" - another good one, is it not?..

साधारण ०४:२० ला जैन मंदिरे, ०४:४५ ला अंबाजी मंदिर, ०५:०० वाजता 🕔 श्री दत्तात्रेय चरण पादुका / संस्थानची कमान ⛩️ cross करून आम्ही ०५:१५ ला लागलो रांगेत.. काय केलं नंतर? तर, तासभर कुडकुडत होतो 🥶.. तिथेच ओंकारने मला भरपूर शिव्या 😖 दिल्या असाव्यात, कारण काल संध्याकाळीच त्याने (room-cum-hallच्या दुसऱ्या कोपऱ्यातून) इशारे करत 'jacket 🧥 लागेल का?' विचारल्यावर त्याला मान डोलवत ❌ 'नाही' म्हणालो होतो.. तेव्हा नसतील दिल्या तर ह्या ओळी वाचून आता देत असेल.. पण नाही, साधा भोळा आहे 😌, असं काही करायची फितरत नाही त्याची..

आम्हा दोघांच्या (मी आणि वैभव) आधीपासून २५ मिनिट अधिक कुडकुडायचा आनंद घेणाऱ्या / सहन करणाऱ्या राहुलचा शोध घेत पायऱ्यांवर पहिल्यांदा जिथे बसलो तिथे शेजारीच शेकोटी 🔥 असल्यामुळे थोडीफार ऊब भेटत तर होती पण भरपूर धुरही 😷 सहन करावा लागत होता - 'कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है' सारखंच काहीतरी.. आमच्या वर बसलेले अजून वर सरकले म्हणून आम्हीही त्यांचा पाठलाग करत धुरापलीकडे डेरा टाकला 😊.. काही वेळात, म्हणजे ०५:४० दरम्यान तुषार आणि प्रशांत आले.. त्यांच्या पाठोपाठ (५ मिनिटात) सुयोगही हाजर.. all in, before time 👏.. for some reason (आता फक्त बर्फच पडायचा बाकी होता), some of us again thought of putting efforts in trying in favour of hopes towards getting in a better position, duly respecting the chilling weather ❄️.. me and राहुल रामपुरा were unmoved..

police personnel 👮‍♂️ and the sages 🐚 were now indefinitely delaying beyond our incompetent preparation to fight against the weather odds.. 'आता तरी या, तांबडं फुटायला सुरुवात झाली आहे, आमचे गोरखनाथ मंदिर वाले photo 📸 miss होतील' म्हणत we could do nothing more than only and also hope of their asap arrival.. till then the crowd 👥 was multiplying in numbers and beyond.. as we now got used to the sufferings, and sunrise 🌄 could also be seen round the corner, finally we observed some proceedings from the other end..

दर्शन घेऊन झाल्यावर एकंदरीत आमच्या लक्षात आलं होतं की photo काढायच्या योग्य वेळेत, आपण परत गोरखनाथ मंदिरापर्यंत पोहचू शकत नाही 😔.. but that craving also doesn't qualify enough in skipping the सुपीक breakfast served here.. म्हणून खाली परततांना ગુજરાત special साठी अल्पविराम घेत 🍮, गाडीची टाकी full करून 🤤 group photo काढत खडी चढाई करायला सुरुवात केली..

finally, everybody took their own time ⏳ and poses 🕺 to capture solo moments at today's highest point.. by the way, the view from here is closest to the Google Keyboard's mountain emoji ⛰️.. Tushar opted a ropeway 🚡 return - Prashant accompanied him.. rest of us were off to non-stop descending journey towards and till the first step.. jain temples were still under-construction - 'still' as in, same as last year.. user-friendly monkeys 🐒 (in numbers and beyond) is another characteristics of this place..


attaching the recording of the activity, probably first time in this blog (58 articles till date).. the red line observed is the ropeway 🚡 till અંબાજી માતા temple, more than halfway (from the first step) till the दत्तात्रेय मंदिर..

another thing, what we could not ignore but notice and thought of putting a logic behind 🧠, was - may be because of slope of the ropeway, the supporting structures are not exactly perpendicular to the ground level..

last but not the least.. unfinished topic from last year's post.. the melodious tune 🎵 that runs 24 hours a day, 7 days a week at the first step is,
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
श्री राम जय राम जय जय राम

ह्या आधीच्या, म्हणजे नवसकाळीच्या article मध्ये शेवटी सांगितल्याप्रमाणे 📝 ही होती डिसेंबर महिन्यातली प्रस्तुती - नक्कीच पहिली, कदाचित शेवटची 🏁..

ગિરનાર विषयी ह्याहून अधिक माहिती हवी असेल, तर read here (along with better photos)..

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...