Monday, October 23, 2023

नवसकाळी २०२३

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का, 'नवरात्रीचे रंग 🌈 कसे ठरतात?' किंवा, 'पहिल्यांदा हे कोणी ठरवले?'.. ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मलाही माहित नाही 🤷, पण एक trend एखाद्याच्या लक्षात यावा 💡, आणि त्याला quoraवर सगळ्यात जास्त upvotes 👍 मिळावे (including mine), ते उत्तर असं की, पहिले ७ रंग ठरलेले असतात, जे आठवड्यातल्या कुठल्या दिवशी घट बसताय 🌑, त्यानुसार मागे-पुढे होत असतात..
Monday - White
Tuesday - Red
Wednesday - Royal Blue
Thursday - Yellow
Friday - Green
Saturday - Grey
Sunday - Orange 🍊 (२०२३ सालचा पहिला रंग)

ह्यापुढे राहिले मग, आठवा, नववा आणि कदाचित दहावा दिवस.. ह्या दिवसांचे जे रंग आढळून येतात ते असे,
Second Monday - Peacock 🦚 Green
Second Tuesday - Pink
Second Wednesday - Sky Blue
Second Thursday - Pink
Second Friday - Purple
Second Saturday - Peacock Green
Second Sunday - Purple

आता एक साहजिक प्रश्न तुम्हाला पडला असावा 🤨 कारण रंग repeatही होत नसतात.. आणि त्याचं उत्तर पाहिजे असेल तर google 🔍 -> quora तुमची वाट बघताय..

now, enough of girl talk.. let's start 🏁 with the chronological events of this year's नवरात्री नवसकाळी..

आमची शाखा कुठेही नाही.. नवसकाळी २०२३
9 days, 9+1 hikes, वर्ष ५वे


वैभव (गोरखगडहुन परत येतांना): पाषाण टेकडी करायची आहे..
राहुल (शनिवारी सिंहगडला ⛰️ असतांना): पाषाण टेकडी कर एक दिवस.. वैभव पण येईल, त्याची बाकी आहे..
सुयोग (घटस्थापनेच्या दिवशी): ह्या वेळेस तुझा नवसकाळीचा message नाही 😐 आला..
महेश (later, same day): नवसकाळी नाही का ह्या वर्षी? 💭

४ वर्षांचा trend बघता 'कोणी येईल का सोबत?', ह्यापेक्षा, 'नवसकाळी होते का नाही?', यावर्षी सुरुवात इथून होती.. काहीच planning नाही म्हणून कोणाला messageही केला नाही.. कारण - गोरखगडला झाले ते हाल 😥 (detailed article, read here).. तरी, गेल्या ९ दिवसात जसं जमलं तसं, terrains repeat करत, काही already राबवलेल्या मार्गीच तर काही नवीन मार्गे आणि शेवटी-शेवटी एका नवीन ठिकाणी hiking केल्याचा बहीखाता / लेखा-जोखा पुढीलप्रमाणे..

खंडोबा टेकडी: transportची गरज नसणारा आणि "ना कम, ना ज्यादा" types 🙋.. गेल्यावर्षीचं ६ आकडी resolution मुकम्मल करण्यात इथला खूप हातभार लागला होता, आणि तेच ह्या वर्षी, नुसत्या खंडोबा टेकडी (२) पेक्षा d2s (३) जास्त झाले आहेत 🙄.. हे समीकरण तात्पुरतं का होईना, जुळवण्यासाठी, ह्या नवसकाळीची सुरुवात इथून.. तसं वातावरण झालंय तयार, म्हणून 'फिर एक बार' 🔄 करतोय विचार, d2sचा, with पौर्णिमा 🌕 round the corner.. but for now, it's not even on the paper, rather, only on this paper 📜.. d2s / k2s - इथली मजा, इथेच - 'आमची शाखा कुठेही नाही' सारखंच काहीतरी.. अजून वेगळं सांगायला नको की हे type करता-करताच, ह्या articleचंही नामकरण झालं.. ऐकलंय तुम्ही ह्या आधी "नवसकाळी"? 🤨, except earlier articles from this blog?

back to 'जय मल्हार' - तुम्ही ह्या आधी इथे आले / गेले असाल, तर पायऱ्या आणि railings असल्याचं तुम्हाला माहिती असेलच.. त्यात हे गरज नसतांना अजून भर घालत आहेत.. दुचाकी 🛵 जिथपर्यंत जाऊ शकतात, तिथपासून पायऱ्या बनवायला घेतल्या आहेत.. ४० एक झाल्या आहेत, नंतर मध्ये gap आहे, आणि मग जुनं construction, जे कदाचित redevelopmentला जाईल.. हे तरी एक वेळ ठीक आहे ओ, 'पण ह्यासाठी आजूबाजूची 🪓 झाडं का कापलेत?' हे काही उमजेना..

सिंहगड, बटाटा point: ३+ महिने झाले असतील, गोळेवाडी ते आतकरवाडी रस्त्याचं 🚧 काम चालू आहे.. ही redevelopment तर कधीची due होती.. finally 🥳.. ह्यामुळेच सध्या सिंहगडच्या वारी कमी झाल्या आहेत.. आणि म्हणूनच गतवर्षीच्या नवसकाळीत २ दिवस केले ते ह्यावेळेस एकाच दिवशी म्हणजे सुमेधच्या वाढदिवशी 🎂 target केले - कोंढाणेश्वर आणि बटाटा point - अर्थातच ascended सिंहगड just once ☝️.. साधारण असंच गणित अजून एक दिवस जुळून आलं, ते पुढे वाचणार आहातच तुम्ही - तिथे मात्र, सिंहगड ascend was twice ✌️..

घरून निघतांना plan फक्त 'पुणे दरवाजा' होता.. बाकी सगळं ठरलं आणि झालं runtime.. सोमवार असल्याचा फायदा घेत आणि 'पावसाळ्यात कारवी वाढली असलेच' हा अंदाज घेत, वर parking समोरचा डोंगर traverse न करता, गप (60% of total) concrete रस्त्याने येत-जात बटाटा point केला.. इथेही भगवा 🚩 फडकतो आता - हे नवीनच - एक नाही तर दोन..

potato point

पाषाण-बाणेर टेकडी: of course, this was now a mandate.. वैभव आणि राहुल सोबत भूषण also joined 👥.. २ वर्षांगोदरच्या नवसकाळीत, घोराडेश्वर करून इथे आलो होतो.. ह्या वेळेस, कालचा आणि पुढचा विचार करत, मोहीम छोटीच 🤏 काढली.. followed same pattern as from 2 years ago - एका sideने दोन्ही top आणि दुसऱ्या sideने traverse.. u-turnला असलेलं तुकाई माता मंदिर 🛕 अजूनही under construction होतं / आहे - 'बहुत लंबा जाएगा'.. 

कोणी सोबत असल्यावर मग फक्त hiking होत नसते.. बालाजी चौकात authentic South Indian, म्हणजे सांभार काहीतरी नवीनच / superb 👌.. आणि नंतर, कोंडेंच्या घरचा चहा ☕.. हे ह्या नवसकाळीतले पहिले extras..

घोराडेश्वर (this can be personal): आरणा (niece / पुतणी) 🍼 आणि सुमेधच्या वाढदिवसांनिमित्त आई-आबा काही दिवस पुण्यात होते.. कालच्या extras नंतर घरी येताच मेघा मावशीकडे निघाले (तळेगाव दाभाडे).. त्यांनी तिथून परत इथे येण्यापेक्षा, आजचा plan बदलून घोराडेश्वर करण्यात आला.. म्हणजे, त्यांचं सामान 🧳 घेऊन, trek झाल्यावर, मावशीकडे जाऊन (+ next set of extras), त्यांना तिथून घेऊन (सामानासोबत) शिवाजीनगरला सोडता येईल, for their return journey 🚌 to नाशिक..

नाशिक / Nasik, पुणे / Pune (पुने), घोराडेश्वर / घोरावडेश्वर - संभाषण 🗣️ कुठल्या भाषेत चाललंय, त्यानुसार जागेची नावं बदलणे, हे काही नवीन नाही.. पण मग, कमीत-कमी पुण्यात तरी 'नाशिक'ला इंग्रजी 🔤 मध्ये लिहितांना Nashik लिहा ना !! मुंबईला Bombay नसून Mumbai लिहिता, then what's 🤔 the problem with "Nashik" ❓ आहे एक signboard 🛣️ नाशिक फाट्या अगोदर (from that side), डावीकडच्या चिन्हासोबत 'Nasik' म्हटलंय 👋..

घोरावडेश्वर (hiking): ह्या वेळेस पायऱ्यांनी न जाता, देवीच्या मंदिरा अलीकडची वाट घेऊन, गडमाथ्याला भेट देऊन त्याच वाटेने परत ⤵️ आलो - प्रसादच्या नक्शेकदम वर चालत.. इथे वाटेत एका milestoneवर श्री. मंदार दातार ह्यांनी लिहिलेल्या कवितेतलं शेवटचं couplet छापलं / कोरलं आहे..

रान राखावे, रान जोखावे । रान मेळवावे परोपरी ।।
रान आणि आपण जैसे देह आणि प्राण । हे जाणावे प्रमाण अंतरात ।।

complete set of couplets, read / listen here.. just beautifully written 👌..

आजचा u-turn ↩️ होता उद्या होणाऱ्या matchच्या 🏟️ stadiumचा top view (from north side ⬆️).. वर असलेल्या महादेवाच्या मंदिरांपेक्षा ह्या वेळेस खाली स्वयंभू अमरदेवी / अमरजाई माता मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आलं.. वैभव यायचं म्हणाला होता पण वरचा plan सांगितल्यावर त्याच्याकडेही 'carry on' reply करण्यापलीकडे पर्याय उरला नसावा 😔.. कोई नई, there is always a next time ☺️.. पाषाण-बाणेर टेकडी झाली तसंच घोरावडेश्वरही होईल..

हत्ती डोंगर: जानेवारी महिन्यात ज्या वाटेने वर गेलो होतो, ह्यावेळेसही सुरुवात तिथूनच - north-east / ईशान्य ↗️ दिशेने.. येतांना नवीन वाट explore करत north-west / वायव्य ↖️ दिशेने उतरलो.. इतर २ वाटा बहुप्रचलित आहेतच.. अजून असतील तर कळतीलच, but so far, that's 4/4.. that figure was also same as 🇮🇳 India's progress in the ODI MCWC 2023 🏏 🏆 till that evening - 4 wins in 4 matches..

काल / परवा प्रमाणे आजही view clear नाही म्हणून थोडी राज़ी, जास्त नाराज़ी होती 😞.. समोर मोठ्या मुश्किलीने सिंहगड ⛰️ दिसत होता, राजगड-तोरणा 🚩 तो भूल ही जाओ.. (काल / परवा प्रमाणे) आजही देवीचं दर्शन घ्यायला नाही चुकलो.. 'झोरळजाई माता' म्हणतात इथे.. इतर locationsपेक्षा अवघड ठिकाणी एका छोट्याश्या गुहेत देवी वसण्याची 🪨 धारणा आहे..

तळजाई: most happening place from the list.. कुठूनही शिरा / चढा किंवा कुठलीही वाट धरा, सकाळच्या वेळेस इथल्या प्रत्येक spotला गर्दी असते, आणि असते म्हणून दिसते 🙈.. त्यात मग daily येणाऱ्यांपलीकडे नवरात्री म्हंटली की इथेही असतीलच काही नऊ दिवस रोज येणारे (सिंहगडच्या "इंक़लाब ज़िन्दाबाद" वाल्यांसारखे).. plus, शुक्रवारचा खेळ 🎲 वेगळा असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.. ही वाढीव गर्दी बघता, आज नमस्कार मंदिरा बाहेरूनच 🙏..

इथे तर एखाद वर्ष आरामात झालं असेल, झाडं 🌳 🌴 साफ करायला घेतली आहे.. again, अडचण काय हो तुम्हाला? 🥴 तेव्हडं concrete पेरू नका, म्हणजे बरं होईल 🙏.. हा विषय परत निघालाच आहे तर - वेताळ टेकडीच्या प्रस्तावित बोगद्यांची case वेगळी आहे.. हत्ती डोंगराला जुनं शाबूत असून पाडलेच ना २ नवीन भोकं (२००५-०६ दरम्यान).. एकंदरीत फायदाच झाला आहे ना?.. anyway..

then

सिंहगड २x: दोन का? तर, सातवी माळ.. for some reason, पहिल्या वर्षीपासूनच सातव्या दिवशी २ करायची प्रथा आहे.. कारण काहीच नाही पण trend set झालाय, रंगांसारखा.. आणि रंग जरी repeat होत नसले तरी नवरात्रीत नवसकाळीत terrain repeat न होण्याची कसलीच अट नाही.. आणि त्यात ४ आकडे भरले (हजार मीटर elevation gain 📈) की कसं छान वाटतं 🤗, दिल बाग-बाग हो जाता है.. total ५ तास 🖐️ पायपीट करत दोन्ही sideने दरवाजे गाठायला १:२५ आणि १:१० लागले 😓, म्हणून सोबत नव्हतं कोणी तरी आज extras नाही वगळता आले.. स्थळ: hotel गुरुदत्त (GMaps location).. by the way, these not-to-be-proud-of / disappointing figures are still better than what was registered for exactly the same activity from July this year, with प्रसाद, अद्वैत and परमेश्वर (me being slowest)..

बरं, 'दोन्ही sideने' म्हणजे आतकरवाडीहून (popular side) गड चढायचा ↖️ आणि पलीकडे, कल्याण पेठ गावात उतरून ↙️ same route return ⤴️ ⤵️.. पाच वर्षात नवसकाळीत घडलेला हा पहिलाच प्रसंग / stunt.. नुसते पुणे दरवाजा / कल्याण दरवाजा केले असते तर ४ आकडे भरले नसते म्हणून सोबतीला आज परत सिंहगड top / कोंढाणेश्वर 🔝 होता.. आणि तोफ बघायला गेलो तर अतिक्रमण वाल्यांसोबत हीचीही झडती घेतलेली दिसली - काळा रंग फासलाय 😟.. was more beautiful before 😏.. and now, you are also nodding in agreement 😃..

now

वेताळ टेकडी: कालच्या ४ आकडी धावसंख्येनंतर आज ३ आकडे तरी जमतील का नाही, ही शंका होती, मुळात इच्छाही नव्हती 🤷 - म्हणून वेताळ टेकडी.. वर गाडी लाऊन, ६ कि.मी.चं सुटसुटीत target 🎯 होतं..

हा area आजपर्यंत unexploredच होता.. म्हणून 🕠 ५.३०च्या अंधारात सुरवातीला थोडी चुकामूक झाली 🤦.. म्हतोबा मंदिराबद्दल ह्या आधी ऐकून असल्यामुळे main objective तेच होतं.. पांडवलेणी परिक्रमा करतांना मंदिर लागतं, तिथल्या मूर्ती सारखंच इथेही दगडाला शेंदूर लावून, डोळे 👁️ बसवले आहेत, आणि पुण्यात (त्यात कोथरूड) आहे म्हणून सोबत आहे मावळ्यांची पगडी (trapezoid shaped).. बाकी मग जी main टेकडी आहे, गर्दी वाली, तिथे नाही गेलो 🚷.. त्यामुळे, perspective wise तळजाई stays "most happening" 🥇, आणि 'आज वेताळ टेकडीला गेलो होतो का?' ह्याचे सगळेच संभाव्य उत्तरे बरोबर ✅.. तसंच, हा area आजही unexploredच आहे..

back to प्रस्तावित बोगदे - एकंदरीत, झाडांची इतकी समृद्धी बघत कोणालाच आक्षेप घ्यायची गरज नसायला हवी / हौस करायला नाही पाहिजे.. 🌲 🌳 🌴 लाखोंच्या गिनतीत हजाराचं नुकसान कुठे मोजताय? 🔴 traffic 🟡 सुरळीत 🟢 व्हायला शक्य ते सगळं केलं गेलंच पाहिजे.. कारण आज आपण गाड्या चालवत आणि traffic मध्ये अडकत आयुष्यातला significant भाग वाया घालवतोय, time, health, wealth wise.. तुम्ही सहमत नसू शकाल, तेही बरोबर आहे 🤝 - we are democracy..

खंडोबा टेकडीपाऊले चालती पंढरीची वाट.. जिथून श्रीगणेशा, तिथेच सांगता.. time ⏱️, health 🧘, wealthची ⛽ बचत करत आज पाऊले पुन्हा निघाली खंडोबाच्या दिशेने, दक्षिण ⬇️.. plan अजून एका अपरिचित ठिकाणी जायचा होता पण Kohli and co.ने काल उशीर केला 🏏.. आणि अगोदरच प्रस्तावना म्हणून लिहिलेल्या आजसाठीच्या २ ओळी खोडाव्या लागल्या 🚮.. कोई नई, there is always a next time..

आजचं वातावरण इतर सर्व दिवसांपेक्षा बरं होतं 🍃.. काहीतरी म्हणतात ना ते.. हं.. बेश्ट 😇.. पहिल्या दिवशी जे ०२:२५ तास लागले होते, तेच आज back-to-normal, sub-2चा आकडा was very overwhelming ☺️.. #CannotAskForMore.. and that unsettles the equation again for this year.. खंडोबा टेकडी (४) आता d2s (३) पेक्षा जास्त झाल्या आहेत.. 'on paper' वाला plan आता मार्गी लावायलाच हवा.. कारण as just confirmed / observed / experienced.. तयार झालेलं वातावरण अजून दिलफेक झालंय 🎉.. बघुया..

जय मल्हार

तर हा आहे ह्या वर्षीच्या "आमची शाखा कुठेही नाही"चा बहीखाता / लेखा-जोखा.. हिशोब?, ३८३५ मी. 📈 elevation gain आणि ७६ कि.मी. 🐾 feet distance..

गेल्यावर्षी नवसकाळीचं स्वतंत्र article नव्हतं.. दसऱ्याला सिंहगड #५०० निमित्त बेत होता इतिहास ⚔️ आणि भूगोल 🌎 टिपण्याचा, with some drone 🕹️ shots (मजबूरी का नाम Google).. तुम्ही miss केलं असेल आणि आवड 👍 असेल ह्या विषयांची तर read here..

भेटू आता डिसेंबर 🧥 महिन्यात (if not earlier), अजून एकदा घरबसल्या trekking करायला..

Tuesday, October 10, 2023

गोरखगड

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

ह्याला आईने 🤱 नीट शिकवलंय.. गोरखगड

खूप दिवसांनी article लिहायची ✍️ सवड आणि संधी ⏳ मिळाली आहे.. एप्रिलचा EBC एकदा जो universal language 🌏 मध्ये लिहिला, तो तुमच्यापैकी काहींना सांगितल्याप्रमाणे मायबोलीत टिपण्याचा जो राहून गेला तो राहूनच गेला 😞.. ६ महिने झाले तरी अजून काही मुहूर्त नाही.. सांगायचा हेतू हाच की कमीत-कमी आता तरी मला ह्याची उणीव आणि जाणीव होत राहील 🤞..

articlesचा दुष्काळ पडण्यामागे इतर कारणं म्हणजे उन्हाळा 🔆 आणि पावसाळा 🌧️.. उन्हाळ्यात बाहेर निघण्याचं धाडस आमच्यात नाही, पण october heat मध्ये अगदी न चुकता आम्ही ठाणे / कोकणात जाऊन trek करणार.. किती विरोधाभास 🤦 !? पण नाईलाजही तितकाच.. मग तो कलावंतीण (२०१७) असो, कर्नाळा (२०१९) असो, खडसांबळे - केवनी पठार (२०२१) असो किंवा latest addition to the list, हे article 'गोरखगड' (२०२३).. आणि पावसाळा मुळात trekkers साठी नसून 'हौशी trekkers' साठी असतो, म्हणून त्या महिन्यांतही कसली / कुठली नोंद नाही 🚷.. पण मग, करणाऱ्याला कारणं समजत नसतात आणि न करणाऱ्याला संपत नसतात - हे हि तितकच खरं ✅.. असो,

group वर कधी नव्हे तो राहुलचा message 🕊️, 'any plans for this weekend?'.. आणि त्यातून जो जुळून आला, तो म्हणजे गोरखगडचा योग.. तयार झालेल्या तिघांपैकी गेलोही आम्ही तिघच ☘️.. इतरांनी बहुतेक location आणि October बघून माघार घेतली असावी 🔙 (logical आहे, no offence).. recording चालू करून थांबवण्यात / संपवण्यात जरी साडे-चार तास लागले आणि ६ कि.मी. भरले, तरी moving time 🥾 होता फक्त ३ तास.. दुसऱ्या / सोप्या शब्दात - ठाणे जिल्हा.. म्हणजे, इतक्या लांब 🛣️ जाणार आहोत तर supplementary म्हणून अजून एका / एखाद्या छोट्याश्या (e.g., सोंडाई) गडाचा विचारही करण्यात अर्थ / आला नव्हता 🙅‍♂️..

०८ ऑक्टोबर २०२३

ठरल्याप्रमाणे मी आणि वैभव, राहुलच्या घरी ०५:३० 🕠 वाजता पोहोचून, ताबडतोब निघालो.. सुरुवातीला अंधार 🌃 आणि नंतर धुक्यामुळे 🌁 speed शेवटपर्यंत कमीच (logical आहे, but offensive too 😛).. मध्ये only available option (GMaps location), गुरव hotelला (कडाव) वडापाव-चहाचा 🍔 ☕ नाश्ता करून, plan नुसार ~०८:४५ दरम्यान आम्ही trek चालू केला.. बऱ्यापैकी प्रचलित असल्यामुळे वाट सुटसुटीत होती आणि सतत app वर trail check / follow करायची तशी गरज नाही पडली ☺️.. हो, पण, ह्याच धुक्याच्या नादात, sleeves न घातल्यामुळे पावसाळ्यात वाढ झालेल्या गवताचा 🌾 त्रास मात्र झाला..

take 1 🎬

नावावरून लक्षात आलं असेलच 🤔, तरी सांगतो, वाटेत सुरुवातीलाच गोरक्षनाथ मंदिर आहे.. 'आत्ताच बूट घातले' विचार करत बाहेरूनच नमस्कार 🙏 केला आणि मंदिराच्या उजवीकडून 👉 वर जाणाऱ्या trailकडे प्रस्थान केले.. इतर गडांप्रमाणे इथेही थोडा gradual, कधी flat, मधेच steep, असा प्रवास काही वेळ, म्हणजे, गवत संपेपर्यंत चालला.. तिथून पुढे होता पाषाण (पुण्यातलं नव्हे) आणि we were exposed to a smiling wide sun 🌞.. आम्हाला वाऱ्याचा काहीच support नव्हता पण उन्हाला सोबत होती दमटपण्याची.. वर बघताच हरिहर आणि भैरवगड (मोरोशीचा) आठवले.. त्यांच्या सारखंच इथेही वारा आणि humidityचं गणित जुळून आलं असतं तर 'क्या बात है होती !..

जहां चाह, वहां राह.. observe the roots

शेजारी मच्छिंद्रगड (twin 👯), त्यापुढे आहुपे घाट, भीमाशंकर range आणि त्याच्या मागे डोकावणारा सिद्धगड ⛰️, ही आजची visual treat 😍 🤩..

मच्छिंद्रगड (twin)

आता गरज होती recharge 🔋 होण्यासोबतच सावधपणाची.. माथा गाठायला इथून पुढे आहेत exposure असलेल्या पायऱ्या 😳.. पावसाळ्यात trek नाही करायच्या भरपूर कारणांमधील एक.. डबीतली शेवटची glucovita खाल्ली, तरी वारा नसण्याचा जोर भारी पडत होता.. दर ४-५ पायऱ्यांनंतर दम खाण्यापलीकडे पर्याय नव्हता 🥵.. थोडं वर जाऊन बिस्कीटही पोटात ढकलले.. तरी 'अजुनही बरंच दिसतंय, इथेच थांबू 🛑 का?', ही शंका अधून-मधून भेट देऊन गेली.. मग एक गाणं आठवलं, 'हारी बाज़ी को जीतना हमें आता है' 😇.. and then, there was no looking back.. literally too..

कहत कबीर 😆

दरवाजा 🚪 गाठला आणि सावली वाचवायला आली.. नंतरच्या, म्हणजे गुहेपर्यंतच्या पायऱ्या माणसाळलेल्या (बऱ्या) आहेत.. इथेही मस्त सावली बघता माघारी येतांना गुहेतच पराठ्यांसाठी थांबू, हा विचार करत पुढे सरकत राहिलो.. इथे आहे थोडासा rockpatch, एक शिडी 🪜, आणि मग almost शेवटपर्यंत खोबण्या (grooves) असलेल्या पायऱ्या.. हळू-हळू चढत, उतरणाऱ्यांसाठी मधे-मधे थांबत (much needed), आम्ही ११च्या 🕚 सुमारास गडमाथ्यावर पोहोचलो.. 'पायऱ्या घाण कोण करतंय?', हा doubt इथे clear झाला 🐵..

वर तुम्ही 'हौशी trekkers' वाचलं, बरोबर?.. इथेही होते काही 😶.. ह्यांची ओळख किंवा लक्षणं म्हणजे, हे फक्त कोणाचे तरी 'Can you guess the fort?' / 'This is not #HariharFort' अगैरे-वगैरे reels 🎥 बघून, reels बनवायला कुठल्यातरी गडावर जाणार (इथे येणार), किंवा ह्यांना सगळीकडे फक्त oxygenचा pipe दिसणार 🤔.. पहिली ओळख तुमच्या लक्षात आली असेलच.. दुसरी ओळख अर्थातच केविलवाणी (किंवा हास्यास्पद) असून मला महेशकडून कळली होती, जी रविराजने hampta passला 🏔️ अनुभवली होती.. today was our turn (law of कर्मा 😜).. top वर असलेल्या मंदिराबाहेर काही जण गप्पा मारत होते, जे वैभवच्या bag मधून बाहेर डोकावणाऱ्या pipeला "oxygen pipe" म्हणत होते.. बरं, तुम्हालाही हा गैसमज व्हायला नको 🤨 किंवा हा प्रश्न पडायला नको ❓ म्हणून इथेच knowledge base वाढवून घ्या.. बागेतून बाटली काढून पाणी प्यायचा कंटाळा 😴 करण्यापेक्षा / येण्यापेक्षा, pipeने पाहिजे तेव्हा, halt घ्यायची गरज न पडता, पाणी पिण्याची सोय decathlon वाल्यांनी करून दिली आहे.. आणि, ह्याचा oxygenशी काहीही संबंध नसतो..

take 2 🎬

दोन दगड मिळून / मिळवून (distance apart), कोणीतरी इथे सोनेरी शिवलिंग बनवायचा वायफळ प्रयत्न केल्याचं लक्षात येतं 😞.. बऱ्याच गोष्टींबाबत आपल्याला "का?" हा प्रश्न पडतो, त्यातली एक.. "पराठे काढू?" विचारायची संधी आज राहुलने साधली.. हो, राहुलने चक्क आज डबा आणला होता ('cook 👩‍🍳 लावली' म्हणे / म्हणून).. पण 'उन्हात नको' म्हणून, थोडं खाली, धोडप किल्ल्यावर असल्यासारखी प्रशस्त / भली मोठी जी गुहा लागली / लाभली होती (वर नमूद केली, तीच), तिथे जाऊन निवांत खायचा बेत ठरला.. आणि bourbon नसले summitला, तर summit, "summit" होत नसतो, हे आम्ही मुळीच विसरत नसतो 🍪..

गुहेत शांतपणे बसून पराठे खायचा बेत माकडांना (माकडाला) 🐒 मंजूर नव्हता.. नाही आमचं तर कमीत कमीत मोबाइलचं पोट भरून (photo काढून 📸) आम्ही पुढचा उतार मार्गी लावायला घेतला..

take 3 🎬

पाषाण पूर्ण उतरून होताच, म्हणजे, ह्या sideने, गवत चालू व्हायच्या अगोदरच्या मंदिराबाहेर, पायऱ्यांवर पराठे खायला बसलो - माकड येत नाही तोपर्यंत (नाही आले).. मंदिर कोणाचं होतं माहित नाही, पण पत्र्यावर 'स्त्रियांनी ♀️ आत जाऊ नये', हे रेखाटलं होतं.. so, काळभैरवनाथ?.. एका / पहिल्या कुत्र्याला 🐶 देऊ केलेला पराठ्याचा एक घास त्याने वास घेऊन without any second thoughts नाकारला 🤥.. कसला माज ना !? 'देतो biscuit' सांगून, त्याला थोडं थांबायला सांगितलं ✋.. तेच पुडा फोडत नाही तर मंदिरातून अजून एक कुत्रा आमच्या अंगावर धावतच 🐾 आला - biscuit कुठलंही चालतं मग ह्यांना.. आणि आधी टाकलेला तो पराठ्याचा घास दुसऱ्याने with a second thought गिळला.. and Rahul instantly comments, 'ह्याला आईने नीट शिकवलंय' - so is the title of today's article 📜..

आम्ही 📉 उतरत असतांना लोकं अजून येतच होते 📈, हे आजही काही नवीन नव्हतं.. ह्यात ह्यांचा शहाणपणा असतो वा दीड, हे त्यांनाच ठाव.. इतकं ऊन आपण / आम्ही तरी सहन करू शकत नाही.. ह्याच संदर्भात, एकदा (मार्च महिन्यात) जेव्हा project team 👨‍💻 सोबत सिंहगडला गेलो होतो, तेव्हा साधारण ११ 🕚 वाजता उतरत असतांना लखनने जे शाळेतल्या काही विद्यार्थ्यांना वर चढतांना बघून विचारलं, ते म्हणजे, "तुम्हाला punishment दिली आहे का?" 😆.. सांगायचं हेच की, थोडं लवकर उठून कुठलीही कामं एरवी लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळेत होत असतात, ह्यात तुमचं सुद्धा एकमत असेलच 🤝..

ऊन - भाजणारं, वारा - नसल्यात जमा, दमटपणा - सांगायला नको.. yet, this breathless achievement = speechless contentment..

photo credits: १२९,५००

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...