Wednesday, October 5, 2022

सिंहगड #५००

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

सिंहगडला किती वाईट वाटेल, हे सगळं ऐकून.. तर नाही.. सिंहगड special आहे

ह्याआधीच्या article (read here) मध्ये राजगडला "पहिलं प्रेम 💓" आणि बरंच काही म्हंटलो होतो, त्या संदर्भातलं हे वाक्य.. आणि आता.. सिंहगड किती special आहे?, ह्याचं फक्त एकाच शब्दात उत्तर.. पण त्याआधी (as always 😛),


नवरात्री नवसकाळी.. 9 days, 9 hikes
वर्ष चौथे, २०२२

ह्या वर्षीच्या नवसकाळी बद्दल article भरून लिहायला तसं नवीन काही नाही 🤷.. ९ दिवस, आसपासच फेरफटका मारत जे गड / टेकड्या चढलो 📈 (आणि उतरलो 📉), ती list पुढीलप्रमाणे..
1️⃣ day white, सिंहगड (circuit) - १४.२/६८१
2️⃣ day red, तळजाई - १०.३/२३०
3️⃣ day royal blue, सिंहगड (कोंढाणेश्वर) - ७.०/६१५
4️⃣ day yellow, खंडोबा टेकडी - ८.४/३५९
5️⃣ day green, सिंहगड (पुणे दरवाजा) - ५.०/५१०
6️⃣ day grey, रोहिडा / विचित्रगड - ५.६/४४४
7️⃣ day orange, सिंहगड, potato point - ९.७/७२३
8️⃣ day peacock green, तळजाई - १०.३/२४४
9️⃣ day pink, खंडोबा टेकडी - ८.६/३६३

a total of 79.1 kms feet distance 👣 and 4169 meters of elevation gain 📈..


ह्यानंतर, दुसऱ्या / दसऱ्याच्या 🏹 दिवशी 
आतकरवाडीहून सिंहगडचा ⛰️ पहिला ☝️ पुणे दरवाजा, यशस्वीरित्या, ५०० व्यांदा गाठला ✌️, a quintuple century 🖐️ 💯..

आता, तुम्ही जे प्रश्न मला नेहमी विचारता, तेच विचार करताय 💭, 'काही दिवसांपूर्वीच तर ह्याचं अमृतमहोत्सवानिमित्त 🇮🇳 "#४७५ @ ७५" article वाचलं, आणि ~५० दिवसात पुढचे २५ झाले पण?, कसली घाई 🏃आहे?, घरचे 👩‍👦काही बोलत नाही का?, work-life 👨‍💻 balance कसं जमतं ह्याला?, मला ह्याच्या बायकोचा interview घ्यायचा आहे, काय केलंय ह्याने समजलं की आम्हाला पण असा वेळ ⏳ काढता येईल'.. आज तर (to top all this), "तू हे सगळं blog मध्ये लिहितोस ✍️, म्हणून आम्ही हे सगळं म्हणतो.. हे सुद्धा blog मध्ये टाकशील 🫣", हे ही ऐकलंय / ऐकवलंय 🤪.. तर सगळं बरोबर आहे, पण ह्या प्रश्नांची उत्तरं फिर कभी.. now, back to agenda of this article..

मे-२०१५, #१.. cut to ऑक्टोबर-२०२२, #५००

ताज़ी-ताज़ी लगे हमको रोजाना 🤗,
यूं तो तेरी-मेरी बातें पुरानी हैं..

गडाच्या इतिहासावर एक article कधीतरी लिहिणार होतो, ह्योच ते.. काही चुकलं असेल किंवा महत्वाचं सुटलं असेल तर जरूर कळवा 😮‍💨, will update..

पुणेकरांसाठी एक वरदान.. सिंहगड ❣️

जवळपास २००० वर्षांचा इतिहास उराशी बाळगून, गूढ-गंभीर, अविचल, स्थितप्रज्ञ योग्यासारखा 🧘‍♂️ हा "सिंहगड"..

महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर पसरलेल्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेच्या पूर्वेकडील ➡️ फुटलेल्या भुलेश्वर रांगेवर आणि पुण्याच्या नैऋत्येस ↙️, साधारणपणे २५-३० कि.मी. अंतरावर, एका उपशिखरावर बांधलेला किल्ला म्हणजे सिंहगड.. ह्याचा आकार कुऱ्हाडीच्या पात्या 🪓 सारखा आहे आणि समुद्रसपाटीपासून उंची ४३०४ फूट / १३१२ मीटर आहे..

कुऱ्हाडीची पात,
कलावंतीणी ↖️ ते झुंझार ⬇️ ते खांदकडा ↗️

ग्रीक 🇬🇷, रोमन 🇻🇦, चीन 🇨🇳 आणि मध्य आशियातील प्राचीन संस्कृतीचे तत्कालीन भारतीय सातवाहन संस्कृतीशी व्यापारी संबंध निर्माण झाले होते 💱.. हे व्यापार प्रामुख्याने पश्चिम भारताच्या ⬅️ कोकणातील बंदरातून होत असे, जे सह्याद्रीतल्या घाटवाटांनी राजधानी पैठण उर्फ प्रतिष्ठानला जोडले गेले.. ह्या मार्गांवर लक्ष ठेवण्यास / ह्या मार्गांचे रक्षण करण्यास सिंहगड किल्ल्याच्या निर्मितीस प्रारंभ झाला असावा 🎯..

आजवर ह्याने अनेक पराक्रम पाहिले, कित्येक अपमान 🤬 गिळले, पराभव पचविले, योद्धयांची शर्थ पाहिली, कित्येक जखमा 🤕 मिरवल्या, कडेकपारीत घुमणारी आयुधं आणि तोफांच्या निशाण्याही अंगावर वागवल्या.. असंही वाचण्यात येतं की काही वर्षांपूर्वीपर्यंत तानाजी कड्याकडे बंदुकीच्या गोळ्या आणि तोफांच्या गोळ्यांची कवचं सापडत होती.. तानाजी कड्याचा विषय निघालाच आहे तर,

सिंहगडची लढाई

४ फेब्रुवारी १६७० - सिंहगड परत एकदा (तिसऱ्यांदा) स्वराज्यात आला पण त्या दिवशी झालेल्या लढाईत मराठ्यांनी एक बुलंद गड गमावला, "सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे" 💂..

painting by महादेव विश्वनाथ धुरंधर

१४ जून १६६५च्या पुरंदरच्या तहानुसार 🈴 महाराजांनी जे २३ किल्ले मुघलांच्या सुपूर्त केले, "सिंहगड" त्यातला एक महत्वाचा किल्ला होता.. मुघलांच्या ताब्यात गेल्यावर, राजस्थान मधील भीना प्रांताचा राजपूत, इथला किल्लेदार 👮 म्हणून नेमला गेला, 'उदयभान राठोड'..

आग्र्याहून सुटून आल्यावर शिवाजी महाराजांनी हे २३ किल्ले पुन्हा स्वराज्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले 🙋.. सिंहगडासाठी "उमरठ" गावचे सुभेदार 'तानाजी मालुसरे' यांनी विडा उचलला.. सरळ-सरळ युद्ध करून हा किल्ला घ्यायचे असते तर मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते.. म्हणून तानाजींनी किल्ला चढायला 🧗 सर्वात कठीण बाजू निवडली - "द्रोणागिरीचा कडा", ज्याला आज आपण "तानाजी कडा" म्हणून ओळखतो..


right half, center - द्रोणागिरीचा कडा / तानाजी कडा

कडा असल्यामुळे ह्या जागेवर फारसे सैनिक तैनात नव्हते.. तानाजी व काही मावळे हा कडा चढून गेले.. नंतर ह्यांनीच योग्य संधी साधून कल्याण दरवाजा उघडला 🔓, आणि बाहेर वाट बघणाऱ्या तानाजींचे धाकटे भाऊ, 'सूर्याजी' आणि 'शेलार मामा' सोबत इतर मावळ्यांना किल्ल्यात येण्यासाठी वाट मोकळी करून दिली 😊.. अश्या प्रकारे वर पोहोचलेले ५०० मराठे आणि जवळपास हजार-दीड हजार मुघल / राजपूत ह्यांचा रणसंग्राम सुरू झाला ⚔️ 🛡️..

लढाईमध्ये जेव्हा किल्लेदार 'उदयभान राठोड' आणि 'नरवीर तानाजी मालुसरे' आमने-सामने आले 🤼, तेव्हा लढता-लढता तानाजींची ढाल तुटली.. तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होते.. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती, पण तेवढ्यात जखमी 'तानाजी' 'उदयभान' कडून ठार झाले 🥀.. ह्यानंतर लढाईचे उपसेनानी सूर्याजींनी सुत्रे ताब्यात घेतली.. तानाजी पडल्याने मावळ्यांचा धीर सुटला व पळ काढू लागले.. हे बघता सुर्याजींनी परतीचे मार्ग बंद केले / कड्याचे दोर कापून टाकले 🪚 व मावळ्यांना "जिंका किवा मरा" असा आदेश दिला.. पर्याय नाही 😨, लक्षात घेत मावळ्यांनी किल्ला सर केला 🫡.. जखमी उदयभानही फार काळ वाचू शकला नाही.. त्याला ८० वर्षीय शेलार मामांनी ठार मारलं 🤺..

ह्या लढाईनंतर,
१. तानाजींच्या मृतदेहाला "मढे घाट" मार्गे त्यांच्या गावी "उमरठ" येथे नेऊन अग्नी 🔥 देण्यात आला..
२. शिवाजी महाराजांचे मावळ प्रांतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले..

extras: १९९९ च्या कारगील युद्धात ह्या लढाईपासून प्रेरणा घेत, भारतीय सेनेने 🇮🇳 अत्यंत अवघड कड्यांवर छुप्यारितीने चढून शत्रूवर आक्रमण केले व कारगीलची शिखरे पादाक्रांत केली..

इतर इतिहास

आदिलशाही: १६४९ - १६५६
मराठा: १६४७ - १६४९, १६५६ - १६६५, १६७० - १६८९, १६९३ - १७०३, १७०५ - १७०६, १७०७ - १८१८
मुघल: १६६५ - १६७०, १६८९ - १६९३, १७०३ - १७०५, १७०६ - १७०७
इंग्रज: १८१८ - १९४७
स्वतंत्र भारत - १९४७ पासून

झुंझार बुरुज

सिंहगड पूर्वीपासूनच स्थानिक महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता.. त्यांच्या आख्यायिकेनुसार (legend) 'कौण्डिन्य' ऋषींनी इथे तपश्चर्या 🧘‍♂️ केली म्हणून ह्याचे नाव "कोंढाणा".. इतर नावे - कुंधाना, कुंधियाना, बक्षिंदाबक्ष आणि बहुप्रचलित सिंहगड..

१३२८ दिल्लीचा सुलतान 'मुहम्मद तुगलक' याने कोंढाणा जिंकला. तेव्हा महादेव कोळी 'नाग नायक' यादवांचा किल्लेदार होता.
१३५० किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख आढळतो इ. स. १३५० च्या कवी 'इसामी'ने रचलेल्या "फुतूहस्सलातीन" किंवा "शाहनामा ए हिंद" नावाच्या फारसी काव्यामध्ये. आत्ताच जे तुम्ही १३२८ बद्दल वाचलं, त्याची माहिती इथूनच भेटते.
१४८२-८३ मलिक अहमद बहिरी निजामशाह याने कोंढाणा जिंकला.
१५५३ कोंढाणा बुर्‍हान निजामशाहच्या ताब्यात.
१५६७ विजापूरच्या आदिलशाहने मूर्तजा निजामशाहकडून कोंढाणा घेतला.
१६३३ 'शहाजी' महाराजांनी 'जिजाबाई' आणि बाल 'शिवबा' यांना कोंढाण्यावर ठेवले.
१६३५ शहाजीराजांच्या ताब्यातील कोंढाण्यावर आदिलशाही फौजेने हल्ला करून गड जिंकला. ह्या युद्धात 'कान्होजी बाजी शिळीमकर' मारले गेले. आदिलशाहकडून सुभेदार म्हणून 'दादोजी कोंडदेव' नेमले गेले.

झुंझार बुरुज again

१६४७
 'दादोजी कोंडदेव' आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्‍न नाही 
केला. त्यानंतर लगेचच बापूजी मुदगल नर्हेकर (देशपांडे) यांनी कोंढाणा पहिल्यांदा स्वराज्यात आणला.
१६४९ शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवरायांनी कोंढाणा आदिलशाहला दिला.
१६५६ कोंढाण्यातील मुस्लिम किल्लेदाराला किल्ल्याचा ताबा देण्याच्या बदल्यात 'खेड शिवापूर' गावाजवळ मोठी आणि करमुक्त जमीन देऊ करून पटवले आणि कुठलेच युद्ध / रक्तपात न करता बापूजींनीच कोंढाणा परत (दुसऱ्यांदा) स्वराज्यात आणला.
१६६३ मुघल सेनापती जोधपूर नरेश 'जसवंतसिंह राठोड' याने कोंढाण्याला चार महिने वेढा दिला. परंतु मराठ्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याला घाबरुन तो वेढा उठवून परत गेला.
१६६५ पुरंदरच्या तहात सिंहगड मुघलांकडे गेला.
१६७० सिंहगड तिसऱ्यांदा स्वराज्यात आला. ह्याबद्दल तुम्ही इतक्यात वर सविस्तर वाचलं.

सिंहगडची लढाई revision - 🌓 विडा उचलणे,
↖️ कडा चढणे, ↗️ द्वंद्व, ↙️ वीरमरण, ↘️ जिंका किंवा मरा

१६८९ सेनापती 'संताजी घोरपडे' व 'विठोजी चव्हाण' यांनी औरंगजेबच्या तुळापुर छावणीवर छापा मारून तंबूचे कळस कापून आणले तेव्हा ते सिंहगडाच्या आश्रयाला आले. त्यावेळी 'सिधोजी गुजर' गडाचे किल्लेदार होते.
१६९२ 'शंकराजी नारायण' पंतसचिव यांनी तटाला शिड्या लावून गड घेण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश आले.
१६९३ १ जुलै १६९३ ह्या दिवशी सप्तसहस्त्री सरदार 'नावजी बलकवडे' यांनी केवळ ३०० मावळ्यांनिशी 'विठुजी कारके' यांच्या मदतीने गडास माळा लावून सिंहगड जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला. ह्या कामगिरीबद्दल स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांचा मोठा सन्मान करत पवन मावळातील "सावरगाव" त्यांच्या मरणोपरांत त्यांचे पुत्र 'होनाजी बलकवडे' ह्यांना इनाम दिले.

पुणे दरवाजा १

१७०० ३ मार्च १७०० रोजी सिंहगडावर राजाराम महाराजांचे निधन झाले. महाराणी ताराबाई यांनी येथे त्यांची समाधी बांधली, आणि देखभालीची जबाबदारी सरदार ढमढेरे घराण्याकडे दिली.
१७०२ डिसेंबर १७०२ ते मार्च १७०३ औरंगजेबने गडास वेढा घातला.
१७०३ १४ एप्रिल १७०३ मुघलांनी सिंहगडावर प्रचंड हल्ला केला, त्यावेळेस 'सिधोजी जाधव' किल्लेदार होते. ह्या युद्धात सिंहगडाचे सरनाईक 'खंडोजी थोपटे' व 'सिधोजी थोपटे' सह वर्धई, खंडई, लखमई, गणई, या बेरड रामोशी सैनिकांनी गडाच्या रक्षणासाठी पराक्रमाची शर्थ केली. ह्याबद्दल त्यांना (खंडोजी थोपटे) खामगाव येथे ३० बिघे जमीन इनाम देण्यात आली. पुढे औरंगजेबने गड ताब्यात घेऊन त्याचे "बक्षिंदाबक्ष" असे नामकरण केले, जे कधी रूढ नाही झाले.

hiking trail - ridge starting from bottom right,
rambled 500 times (till date)

१७०५ २८ एप्रिलच्या सुमारास पंतसचिवांच्या मार्गदर्शनाखाली 'त्र्यंबक शिवदेव मुतालिक' आणि सरदार 'रामजी फाटक' यांनी मोठा पराक्रम गाजवून सिंहगड जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला व मुघल किल्लेदार 'देवीसिंग' यास कैद केले.
१७०६ मुघल सरदार 'झुल्फिकार खान' याने फितुरीने सिंहगड जिंकला. याप्रसंगी युवराज 'शाहू' मुघलांच्या कैदेत होते.
१७०७ औरंगजेबच्या निधनानंतर मराठ्यांनी लगेच सिंहगड जिंकून घेतला.
१७०७-५० सिंहगड किल्ला छत्रपतींच्या वतीने ४३ वर्षे पंतसचिवांच्या ताब्यात होता.
१७५० ६ जुलै १७५० छत्रपती 'रामराजे' ह्यांच्या आदेशाने सिंहगड पेशव्यांच्या ताब्यात आला. सिंहगडच्या बदल्यात पेशव्यांनी सचिवांना "तुंग" आणि "तिकोना" हे किल्ले दिले.
१७६३ एप्रिल १७६३ नारायण राव पेशवे यांचा विवाह.
१८१८ इंग्रजांनी सिंहगडला नोव्हेंबर १८१७ पासून साधारण ३-३.५ महिने वेढा देऊन तोफांचा प्रचंड मारा केला. शेवटी १ मार्च १८१८ रोजी मराठी सैन्य शरणागतीस गेले आणि 
General Smithच्या हुकुमावरून Commandant Pitzlarने ३ मार्च १८१८ला गड ताब्यात घेतला.

कलावंतीणी बुरुज आणि खानापूर हुन येणारी / ला जाणारी वाट

१८८९ लोकमान्य टिळकांनी चिंतन आणि लेखनासाठी ह्या गडाची निवड केली. 'रामलाल नंदराम नाईक' ह्यांची जागा विकत घेऊन एक बंगला बांधला. ह्याच बंगल्यामध्ये त्यांनी 'गीतारहस्य' ह्या महान ग्रंथाची लेखन प्रत तयार केली. त्याचबरोबर 'Arctic Home in Vedas' हा ग्रंथ ही साकार केला.
१९१० सिंहगडावरच 'लोकमान्य टिळक' आणि 'महात्मा गांधी' ह्या दोन महापुरुषांची भेट झाली.
१९३१ 'नेताजी सुभाषचंद्र बोस' यांनी सिंहगडला भेट दिली. त्याप्रसंगी कल्याण दरवाजा मध्ये त्यांनी गुरु 'रविंद्रनाथ टागोर' यांनी शिवरायांवर रचलेले काव्य उत्स्फूर्तपणे म्हंटले. शिवरायांपासून प्रेरणा घेऊनच त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प केला.

कल्याण दरवाजा - शिलालेख,
श्री शालीवाहन शके १६७२ कारकीर्द
श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान

 सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे समाधी 🪦

१९३८ तानाजी स्मारक मंडळाने तानाजी समाधीच्या चौथर्‍यावर concreteची चौकोनी मेघडंबरी केली.
१९४१ २० फेब्रुवारी १९४१ च्या दिवशी सिंहगडावर तानाजींचा पहिला concreteचा अर्धपुतळा (bust) बसविण्यात आला.
१९७६ २४ मार्च १९७६ रोजी, राजाराम महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मेघडंबरी मध्ये नवीन bronzeच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पहिला concreteचा पुतळा आता कोंढणपूर गावातील नरवीर तानाजी विद्यालयात ठेवला आहे.
२०१८-१९ समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करत, मूळ समाधी कायम ठेऊन त्यावर नव्याने (सध्याची) अष्टकोनी bronzeची मेघडंबरी बांधण्यात आली, आणि सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंचा bronzeचा पुतळा शेजारी एका चौथऱ्यावर बसविण्यात आला.

bronzeचा पुतळा

समाधी लगतच आपल्याला युद्ध अवेशातील मावळ्यांचा एक सुरेख देखावा बघायला मिळतो.. 'मुक्त' category व्यतिरिक्त इतर ३ प्रकारचे, अमुक्त, मुक्तामुक्त, यंत्रमुक्त, जे शस्त्र मराठे लढाईत वापरायचे, त्यांची एक छोटीशी झलक..

१. उच्च प्रतिच्या युद्धात वापरले जाणारे - धनुष्य-बाण 🏹 (bow and arrow)
२. आद्य शास्त्रांपैकी एक - परशु 🪓 (halberd)
३. पायदळात वापरात येणारी - मराठा वक्र धोप (curved sword)
४. पुरंदरच्या पहिल्या युद्धात प्रामुख्याने वापरलेले - गोफण (slingshot - 'angry birds' fame)
५. संरक्षणासाठी - ढाल 🛡️ (circular shield)
६. दुधारी, घातक शस्त्र - दांड पट्टा 🤺 
(sword with a handguard / gauntlet - 'avengers' fame)
७. चिलखत भेदण्यासाठी अत्यंत उपयुक्त - गुर्ज (3-in-1, mace-sword-axe)
८. लहान मुलांचे, स्त्रियांचे आणि मानकरी - कट्यार 🔪 (dagger with H-shaped handle)
९. घोडदळात वापरात येणारी सरळ पात्याची - मराठा धोप 🗡️ (linear sword)
१०. लांबवरील शत्रूला मारायला तोफेचे छोटे स्वरूप - बंदुक 🔫 (gun)
११. मुक्तामुक्त, दोन्ही प्रकारे वापरला जाणारा - भाला (spear)
१२. boomrang 🪃 सारखे परत येणारे - विटा (lance with a cord)

भाला, धनुष्य-बाण, मराठा वक्र धोप,
ढाल, बंदुक, दांड पट्टा, विटा

longest of few cannons on the fort,
लांबी २ मी., व्यास २३ से.मी.

तर हा होता गडाचा श्रीमंत इतिहास, थोडक्यात.. 'श्रीमंत' कारण दुसऱ्या कुठल्या गडावर इतक्या वेळेस सरकार बदललं नसेल 🤭.. article मध्ये काही गोष्टी मुद्दाम टाकल्या नाहीत, कारण ह्या mythology सारख्या आपण इतक्या वेळेस ऐकल्या आहेत की खऱ्या वाटायला लागल्या आहेत 🤦.. 'गड आला पण सिंह गेला', हे त्यातलं सर्वात प्रचलित उदाहरण.. असो..

एक गंमत 🎭 सांगायची झाली तर.. 'तानाजी, the unsung warrior' motion picture 🎥 मध्ये एक scene आहे, ज्यात उदयभान राठोड राजगडच्या दिशेने तोफ करून मारा करायला सांगतो.. आता ह्याच्याशी पन्हाळगडाचा वेढा, किंवा रामशेजचे युद्ध compare करून बघा 😐.. ह्यांची माहिती नसल्यास, (alternatively) "आग हवा पानी" वालं article आठवा (link here).. अगदी same-to-same, or should that be, अगदी shame-to-shame 🤦.. again, असो..

title मध्ये गडाला "वरदान" म्हणायचे कारण, इथे नियमित येणाऱ्या लोकांमध्ये दिसणारा उत्साह 🤠, ज्यातलं बरंच public ५०-८० वयोगटातील आहे 🫡.. ह्यांच्याबद्दल / ह्यांचे मनोगत थोडक्यात वाचा, in article "एक बार से दिल नही भरता.. Eat. Sleep. सिंहगड*. Repeat." (here)..

कोणाची वाट बघताय मग? हे वरदान वाया जाऊ देऊ नका.. सिंहगड जेव्हडा माझा आणि आमचा आहे, तेव्हडाच तुमचा आणि आपला सुद्धा आहे 😇..

from the vault - YouTube short created during सिंहगड #३००,

No comments:

Post a Comment

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...