Tuesday, March 30, 2021

Eat. Sleep. सिंहगड*. Repeat.

|| श्री अशापुरी देव्यै नमः ||

एक बार से दिल नही भरता.. Eat. Sleep. सिंहगड*. Repeat.

काही दिवसांगोदर जेव्हा सुमेध कळसुबाई शिखर चढून गेला, तसाच सिंहगड पण चढेल हा confidence 😌 गोळा करुन ठरली आजची ३२९वी वेळ.. पण नुकतेच 🙄 night curfew चे timings बदलले आणि २-३ दिवस आधी अचानक उकळी फुटल्यामुळे 🌡️ तो family trek झालाय postpone ⏳.. आणि, draft म्हणून ही post तोपर्यंत ठेवण्यापेक्षा करतोय आता publish.. नाहीतर तुम्ही म्हणाल, लेख लिहायचा आहे 🖋️ म्हणून माहिती तर कधीची गोळा करतोय हा, पण लेख कुठे बघायला / वाचायला भेटला नाही अजून 😏..


a pure act of selflessness 😇.. ३२९* - Michael Clarke चा Test Cricket मधला सर्वोच्च 📈.. match चा तिसरा दिवस होता आणि India 🇮🇳 ला all-out करुन Australia 🇦🇺 कडे ४ बाद ४५०+ धावांची बढत होती.. दुसऱ्या session च्या drinks break 🍶 मध्ये अचानक-भयानक आलं declaration ⏱️.. स्वतः ७० च्या strike rate ने खेळत असता आणि perfect record breaking setup 🥇 असतांना त्याने declare का करावं? हे काही उमजलं नव्हतं.. बरं, match पण ४ दिवसातच संपली, तरी इतकी घाई? 🤦.. hustle, loyalty, respect.. take a bow..🙇

अजून एक प्रसंग असा की, शेवटच्या Test match नंतर (retirement च्या दिवशी) सचिन तेंडुलकरने ♉ आपल्या कर्मभूमी "cricket pitch" ला नमस्कार 🙇‍♂️ केला होता, हे आपण सर्वांनीच बघितलं आहे.. म्हणजेच, आपलं घर ज्या company ने दिलेल्या पगारावर 💳 चालतं, तीला नमस्कार केला पाहिजे.. boss कितीही खडूस 👎 असला, customer कितीजरी महाखडूस 👎👎 असला किंवा increment / promotion मनासारखं भेटत नसलं, म्हणून शिव्या 🤬 द्यायला मी मोकळा, असं नसतंं 🔇.. नसेल पटत तुम्हाला तर switch 🔁 हा खुला पर्याय आहे, नाहीतर नमस्कार हाच सर्वात योग्य पर्याय आहे..

अश्याच उदाहरणांमधून शिकत 🌝 रहावं आणि बाकी सगळं मागे सोडावं 🌚.. सुनीता नाडगीर पण हेच म्हणतात, "सगळ्यांनी एकमेकांकडून चांगलं-चांगलं शिकत राहायला पाहिजे".. 'ह्या कोण?' विचारताय.. खाली 👇 आहेत details.. असंच अजून एक उदाहरण.. कुठलेतरी मतदान 🗳️ चालू होते आणि newspaper 🗞️ मध्ये सगळ्या सिनेतारकांचे मतदान केल्याचे फोटो होते.. ह्यात news 📰 छापण्या सारखं काही नसलं, तरी शाहरुख खान एकटा होता ज्याने समजूतदारपणे सगळे बोटं 🤚 एक साथ दाखवत फोटो काढला होता.. इतरांच्या photo 🖼️ मध्ये होता फक्त मत केल्याचं marking असलेला मधला बोट 🖕.. खूप छोट्या-छोट्या 🤏 गोष्टी आहेत, पण बुंद-बुंद 💧 से ही तो समंदर 🏖️ बनता है..

माणूस म्हणून हे काय असतील ते असतील, पण उदाहरण लाख मोलाचे 👏 आहेत (माझ्या मते तरी).. now, back to 'Eat. सिंहगड. Repeat.'..

आज ३० मार्च - हाच तो बुधवारचा दिवस जेव्हा १० वर्षांगोदर फक्त ११ भारतीय मोहाली, चंदिगढच्या PCA stadium 🏟️ मध्ये पाकिस्तान 🇵🇰 cricket team विरुध्द त्यांचे कर्तव्यपालन करत होते आणि बाकीचे (१२१ करोड वजा ११) full / half day टाकून idiot box 📺 ला चिटकुन बसले होते.. काही लोकांकडून तुम्ही ऐकलं पण असेल, 'final हारलो तरी चालेल, पण आजची match जिंकायलाच पाहिजे'.. कुछ भी ⁉️ 🤔 cricket मध्ये भारतीयांना compromise चालत नाही, आणि हे बाहेरगावच्यांना, Kane Williamson 🇳🇿 ला सुद्धा माहिती आहे, म्हणूनच २०१९ साली तो उपांत्य फेरी जिंकल्यावर म्हणाला होता, "I hope, they (Indians) are not too angry" 😔.. बरं, कुठल्याही tournament चे अंतिम सामने सहसा रविवारी असतात तर ह्या मालिकेचा (२०११ विश्वचषक) अंतिम सामना शनिवारी का? दुसऱ्या दिवशी / रविवारी अमावस्या 🌑 होती - हे कारण तर नसावं !? 🤨

census - १८७२/७३ च्या पहिल्या आणि त्या नंतर सगळ्या देशांसोबत 🌍 synchronised, १८८१ पासून दर १० वर्षांनी होणाऱ्या जणगणने नुसार २०११ मध्ये भारताची जनसंं
ख्या १२१ करोड होती.. २०२१ साठी आले नाहीत ना अजून? येतील 🧍.. आणि ह्या वेळेस हा आकडा १४० करोड च्या आसपास असणार / निघणार, असे estimates आहेत.. oops 😬, परत भटकलो.. back to 'Sleep. सिंहगड. Repeat.'..

सिंहगड #१५०, credits: जितेंद्र

मे-२०१५ पासून जी ब्रिजेश आणि योगेश सोबत सुरुवात 🏁 झाली, तो अगदी कालचाच दिवस 📆 वाटतो.. २०१८ साली अशोकच्या 
वाढदिवशी 🎂 १५० ला जितेंद्र बरोबर होता, तो फक्त योगायोग.. काही दिवसांनी WhatsApp ला cricket 🏏 शी संबंधीत "from the vault" status update सुरु झाले.. पहिला बाहुतेक १७५ चा होता, जी माझ्यामते सचिनची सर्वोत्कृष्ट 👌 पारी असावी (शारजाह 🏟️ वगळता).. तसंही, हारलेल्या match मध्ये Man of the Match 🏅 मिळवणे म्हणजे performance special++ असतोच.. परवाच्या / रविवारच्या Sam Curran सारखा..

२०० चा program थोडा मोठा 🦕 करु, असा विचार करत facebook event 📢 बनवण्यात आला.. तयार झालेल्या उत्साहींपैकी सोबतीला साधारण ३० जण होते.. तारिक तीच ठरली, ज्यादिवशी रवी शास्त्री commentary करत असता, आपल्या सगळ्यांच्याच चाहित्या "superman 🦸 from India 🇮🇳", jersey no. १०, सचिन तेंडुलकरने २०१० 🔟 साली अंतरराष्ट्रीय एकदिवसीय cricket मधलं पहिलं द्विशतक 💯💯 झळकवलं होतं.. पल्लवीचं (महेशची बहिण) नेमकं त्याच दिवशी लग्न 👰 होतं (२०१९) म्हणून त्याच्या circle मधलं कोणी येऊ शकलं नाही.. असो, there is always a next time ⌚..

२५० होता २०२० चा पहिला रविवार.. निवडक लोकांनाच विचारलं होतं आणि आलेही मोजकेच.. त्याच दिवशी ठरवलं की येत्या 
वाढदिवशी 🎈 triple century करु.. but somebody at the other end of the world did not like that idea 😨..
 lockdown 🔒, lockdown 2.0 🔒🔒 आणि extended lockdown 🔒🔒🔒 मुळे झाला २ महिने उशीर.. अगदीच गर्दीमुळे लोकं नाही म्हणायला नको म्हणून सकाळ 🌇 ऐवजी संध्याकाळी 🌃 trek करायचं ठरवलं.. शिवकुमार २०० ला सोबत आणि त्यांच्या मुलीसोबत २५० ला follow-up होते.. बऱ्याच वेळेस company देणारे, निलेंद्र आणि श्रेयस २०० आणि २५० ला सुद्धा सोबत होते.. ब्रिजेश आणि वैभव, २०० आणि ३०० ला होते, तर विनायक २५० आणि ३०० ला..

journey from #200 to #300

वाढदिवशी ३०० जरी झाले नसतील तरी त्यादिवशी जो भुरळ पाडणारा नजारा 😻 बघायला भेटला तो इतर कुठल्याच दिवशी मागच्या ५ वर्षात बघितला नव्हता 😱.. lockdown चीच मेहरबानी म्हणा, clean-n-clear climate मध्ये parking हून राजगड, तोरणा, पुरंदर पासून वैराटगड, पांडवगड पर्यंत स्पष्ट view 🤗 होता ज्यात पांढऱ्या छप्पराच्या 🌫️ सोबतीला होती हिरवी चादर 🏞️ आणि सुर्यासोबत लपाछपी 🙈 खेळत असता, डाव आपल्यावर होता ☁️.. post मधील
 ३ photo 📸 त्याच दिवसाचे..

राजगड, तोरणा

Triple century 💯💯💯 in Test cricket.. THE moment of pride 😎 🤗.. as of this moment, २७ जणांनी ३१ triple centuries score केल्या आहेत.. double treat ⏫ वाले धुरंधर आहेत - Sir Donald George Bradman 🇦🇺, Brian Charles Lara 🇹🇹, Virender Sehwag 🇮🇳 आणि Christopher Henry Gayle 🇯🇲.. "धुरंधर", कारण अजून कोणाचा आपण विचारही करु शकत नाही जे हे पराक्रम करु शकतात.. त्यात एकदा शेवटी साथ द्यायला कोणी राहिलं नाही म्हणून Sir Don Bradman ना २९९* वर माघारी 😟 यावं लागलं होतं.. आणि एका match च्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला ⏸️ तेव्हा Virender Sehwag २८४* वर खेळत असता रातो-रात मधु पुण्याहून मुंबईला 🏃‍♂️ गेला, to witness ❤️ a never-before third Triple ✌️.. पण तिसऱ्या दिवशी २९३ वर बाद होत Sehwag ने त्यालाच काय तर सगळ्या भारतीयांनाच निराश केलं 💔.. हे २ instances इतिहासात होता-होता राहून गेले, जे नेहमीच लक्षात राहतील.. अगदी तशेच, जशे Clive Lloyd आणि Ricky Ponting चे hat-trick / सलग तिसरे ODI विश्वचषक हुकले.. योगायोग बघा, हे दोन्ही विश्वचषक 🏆 भारताने जिंकले.. १९८३ मध्ये Clive Lloyd 🇬🇾 ला अंतिम सामन्यात आणि २०११ मध्ये Ricky Ponting 🇦🇺 ला उपांत्यपूर्व फेरीत हरवत.. अजून एक योगायोग सांगायचा झाला तर ह्या दोघांनी जेव्हा पहिला विश्वचषक जिंकला, तेव्हा अंतिम सामन्यात तेच Man of the Match 🏅 होते.. Lloyd १९७५ आणि Ponting २००३..

साधारण ४० वर्षे वय असतांना १९३० साली जेव्हा Andy Sandham 🇬🇧 ने ☝️ पहिलं त्रिशतक झळकावलं होतं, हा record सगळ्यात oldest 👴 triple centurion म्हणून आजही त्यांच्याच नावी आहे.. सगळ्यात youngest 🧔म्हणून Sir Garfield Sobers 🇧🇧 आणि एकदाच आलेला प्रसंग - एका दिवसात त्रिशतक Sir Don Bradman 🇦🇺.. षटकार ठोकून एकमेव त्रिशतक आणि सगळ्यात कमी चेंडूत Virender Sehwag 🇮🇳, तर सगळ्यात कमी वेळेत (less than 5 hrs at crease) Wally Hammond 🇬🇧.. विश्वास माझाही बसत नाही पण वाचायला तर हेच भेटलं.. ५ तासात Sehwag (२७८) पेक्षा जास्त चेंडू खेळणं कसं शक्य आहे? त्या वेळेस over संपल्यावर strike rotate 🔄 नव्हती होत? का घड्याळ बंद पडलं होतं? ⌛.. आणि भारतात फक्त भारतीयांनीच ज्या मैदानावर 
दोनदा हा उपक्रम राबविला, तो Chidambaram / Chepauk stadium 🏟️, चेन्नई.. Sehwag २००८ च्या जोडीला 👥 Karun Nair २०१६..

वज्रगड, किल्ले पुरंदर

१६६५ साली पुरंदरच्या लढाईत ⚔️ मुरारबाजी देशपांडे कामी आल्यावर शिवाजी महाराजांनी अजून नुकसान होऊ नये म्हणून केलेल्या तहामध्ये 💱 जे पुरंदर, तुंग, तिकोना, लोहगड, रोहिडा, माहुली, सरसगड, असे २३ किल्ले जय सिंग ला सुपूर्त केले, त्यात कोंढाणा सुद्धा होता.. ५ वर्षांनंतर 🖐️ जेव्हा कर्मभूमी 'उमरट' चे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंनी ४ फेब्रुवारी १६७० ला कोंढाणा शिवाजी महाराजांना परत जिंकवून दिला, तेव्हा "गड ⛰️ आला पण सिंह 🦁 गेला" म्हणत किल्ल्याचं नामकरण करण्यात आलं सिंहगड
.. बघितला असेल 'Tanhaji: The Unsung Warrior' तर हे सगळं आठवलं असावा, पण त्यांना unsung warrior का म्हणावं, हे गणित कधी सुटलं नाही.. ह्या वाक्याचा संदर्भ तसा 'श्रीमान योगी' पुस्तकात 📙 नाही - त्यात वाचण्यात येतं, "एक गड घेतला, पण एक बुलंद गड गमावला" 😥..

स्वप्नील खोत सोबत एखादा trek करुन, किल्ल्याची
 / गडाची सविस्तर माहिती गोळा करून, मी अजून एक post 📝 लिहील..



एक बार से दिल नही भरता.. काही ओळी ✍️ नियमित सिंहगड trek करणाऱ्यांबद्दल / करणाऱ्यांकडून..

१ किंवा २ तारखेला वाढदिवस असणाऱ्यांचं ठीक आहे 😉, पण ११ तारखेला वाढदिवस म्हणून ११ वेळेस सिंहगड कोणी चढू शकतो का? 😕 किंवा चढायचा विचार तरी करु शकतो का? तर हे, दुर्गतज्ञ, इतिहासक, महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती चे सदस्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे 🚩 पायदळ प्रमुख 💂 सरनौबत पिलाजी राव गोळे यांचे १४वे वंशज 👨‍👦 मारुती गोळेंनी ऑक्टोबर २०२० ♎ मध्ये स्वतःच्या वाढदिवशी करुन दाखवलं आहे, आणि ते पण फक्त २० तासात 🙇‍♂️ (reference: city bell).. आपणही एखाद्या वर्षी ♍ ६ वेळेस करुच.. अवघड असलं, तरी अशक्य नव्हेच.. आणि 'खरंच होईल का?' 🤞 विचार करता-करता, कदाचित होऊन जाईलही 🤘.. त्यानंतर बायकोने घराबाहेर नाही काढलं म्हणजे झालं 🤷..

बऱ्याच गडांवर चढतांनाच मध्ये कधी सपाटी 🏜️ लागते, तर कधी थोडाफार उतारही.. उरलेल्या (काही मोजक्याच) गडांसारखं, सिंहगड चढतांना आपण साधारणपणे प्रत्येक पाऊल 👣 हे higher altitude लाच ठेवतो, मग ते अर्धा से.मी. 📏 का असेना.. आणि हळू-हळू ह्या elevation चा angle वाढत 📐 जातो..

१९९७ पासून दर शनिवारी येणारे राजेंद्र शेठ म्हणतात "ह्या वाढत्या चढात जी शेवटी-शेवटी छाती भरते, त्यात मजा 🥳 आहे, आणि उतरतांना खडकांवरून चालायला छान वाटतं".. partial lockdown मध्ये जेव्हा weekend ची परवानगी अजून नव्हती 🚫, तेव्हा ते बुधवारी येत असत.. उतरतांना, वर चढत असलेल्यांना खडीसाखर 🍬 / मनुका 🍇 / काहीतरी देत असतात.. आणि त्यांचे जोडीदार 🤝, सुरेंद्र तपकीर सुद्धा २०१२ पासून regular आहेत.. त्यांचे अजून एक जोडीदार, 🔆 प्रकाश दंडनायक नी भरपूर काही सांगितलं, ते थोड्या वेळातच ⏳.. saving the best for the last 🔚 किंवा last but not the least सारखंच काहीतरी..

सिंहगडचे पितामह 👑 म्हणून ओळखले जाणारे आणि ९६वा वाढदिवस 🎉 सिंहगड trek करुन साजरा करणारे आबा महाजन म्हणायचे - The climb of a mountain ⛰️ begins with one step. It doesn’t matter how slowly you walk 🚶‍♂️ as long as you don’t stop ⏹️. Your glory is not climbing without a fall but rising 📈 with every fall 📉.. मी त्यांना इथे बघितलं आहे, आणि त्यांच्या कर्तृत्वाला बघून 🧐, आपण घरी बसलो 😴 तर लाज वाटावी, असंच होईल 🥴.. प्रकाश नी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी हिमालयात 🏔️ ५०+ trek केले होते आणि सिंहगडला किमान ५० वर्षे तरी regular आले असावेत.. 
आणि मनीष कडून कळलं, ते नेहमी सगळ्यांना सांगत असत, "जेवण 🍱 आणि गड ⛰️ कधी मोजू नका".. २०१६ साली ते expire 🥀 झाले.. 

आठवड्यातून २-३ दा सिंहगडला 🦁 येणाऱ्या, मनाने तरुण 💃, सुनीता नाडगीर म्हणतात, इथे आलं की आवड निर्माण होईल, असंच चालायचं, धापा टाकत नाही चालायचं.. आणि वारंवार आलं की stamina 💪 आपोआप develop होतो, फक्त इच्छाशक्ती पाहिजे.. restrictions वयामुळे नसून fitness 👊 मुळे असायला हवे.. कितीही वय असो, जर ती व्यक्ती fit आहे तर काही न करु द्यायचं तीला restriction 🚷 नसायला हवं.. नेहमी आपलं काहीतरी workout हवं आणि ते 
निसर्गाच्या 🏞️ सानिध्यात हवं.. चार भिंतीत व्यायाम केल्यापेक्षा मोकळ्या हवेत व्यायाम केला पाहिजे.. इथे जो तुम्हाला oxygen 🍃 भेटतो, तो gym 🏋️ मध्ये नाही भेटत.. तुमचं आयुष्य किती enjoyable 😀 आहे आणि स्वावलंबी आहे, हे महत्वाचं आहेे.. वय किती? अजून काही करतात का? चला 
ऐकूया 📽️ त्यांच्याकडूनच..

सुनीता नाडगीर 

लिफ्ट-लिफ्ट खेळणारी express 🚆.. स्वतःची गाडी असल्यावरच किंवा pmpml 🚌 ने येऊनच सिंहगड करता येतो, ह्या पलीकडे जाऊन, गेली ६ वर्षे नियमित सिंहगडला येणारे डी. बी. गायकवाड.. एका group सोबत गप्पा 🗣️ मारत, planned सिंहगडचं extension थेट unplanned SRT त करणाऱ्या ह्या काकांसाठी 'क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!' 👌👍🤘.. वय किती असावं? ६८..

आपल्या ४ वर्षांच्या doggy 🐕 Milo ला सोबत घेऊन येणारे STF (सह्याद्री trekkers foundation) चे co-lead मनीष मोता सांगतात - मी २००८ पासून येतोय आणि Milo ६ महिन्यांचा असल्यापासून येतोय.. त्याचेही जवळपास २५०-३०० trek झाले असतील 😮.. सिंहगडचा सूर्योदय / सिंहगडची पहाट स्वर्गीय 🤗 आहे.. इथल्या वातावरणाचा अनुभव म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटतं 🕺.. आणि आपण जसं-जसं मेट्याच्या वरती येतो, हा आनंद वाढत जातो.. सिंहगड चालू केल्यापासून माझं वजन १०८ हुन हळू-हळू ८८ वर आलंय 😊.. health विषयी पण खूप positive आहे सिंहगड.. बाकी trek बऱ्यापैकी सोपे जातात.. सिंहगडचा by product असा की आपल्या field मध्ये काम करायला double energy 💪 मिळते, कंटाळा येत नाही 😀.. पहाटे ३-३:३० ला उठून आपण इथे येतो, पण झोपेचं खोबरं 😪 करुन सुद्धा इथे जो आनंद 😍 भेटतो, तो झोपून 🛌 नाही भेटत.. सिंहगड tickmark ☑️ केल्यासारखं नाही आहे.. हे वातावरण, ही enjoyment शब्दात नाही सांगता येत, तो अनुभवायचाच ✌️ असतो..

२० वर्षांपासून येणारे आणि सेवानिवृत्त झालेले (early retirement घेतलेले) विवेक कानडे सांगतात.. ७५ पेक्षा सुद्धा जास्त
 वयाचे 👴👵 लोक इकडे येतात.. छान वाटतं इथे येऊन, औषधंं 🩺 💉 घ्यावी लागत नाही कुठली.. आठवड्यातून एकदा इकडे आलं की आठवडाभर काहीही खायला 🤤 मोकळं.. काही दिवसांपूर्वी इथे बिबट्या 🐆 दिसल्याची अफवा 📣 पसरवण्यात आली होती, त्यामुळे २-३ आठवडे गर्दी एकदम कमी झाली होती ज्याने इथल्या दुकानदारांचं नुकसान 😞 झालं होतं.. असा social media चा गैरवापर नाही केला / झाला पाहिजे 🔇..  शिवजयंतीला जे मशाली घेऊन फिरतात, दमल्यानंतर 😴 त्याच मशाली खांबाला लावून झोपतात
 🛌, ज्याच्यामुळे गेली सलग २-३ वर्षे ढाब्यांनी / झोपड्यांनी पेट 🔥 घेतला आहे.. आपली हौस म्हणून दुसऱ्याचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी 🧠 घेतली गेली पाहिजे..

सिद्धेशवर मेणकुदळे उर्फ सिद्धू - मागच्या वर्षी (२०२०) नवरात्री नंतर २ महिन्यात
 २७ दिवस येऊन १०० 💯 वेळेस सिंहगड trek करणारे युवक 🏃‍♂️.. schedule आणि efforts मधला फरक - हाच तो.. आणि तसंच ह्या वर्षी (२०२१) ३६ दिवसात १००.. इथे आले की ३-४ च्या खाली हे बात नसतात करत.. 🙇

पूर्ण देशभर आणि काही परदेशात सुद्धा ९० हजार कि.मी. cycling 🚴‍♂️ केलेले जुगल राठी (वय वर्षे ७३) म्हणतात, इथे टिळकांचं 
वास्तव्य 🏡 होतं.. त्यांचं म्हणणं होतं, 'स्वराज्य 🚩 माझा जन्मसिद्ध अधिकार आहे', आणि इथून आपण अजून एक महाराजांकडून / गडाकडून संदेश 📨 घेतोय, "आनंदाने 🎊 जगायचं, फिट 🧘‍♂️ राहायचं, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे".. आणि त्यासाठी cycling 🚴 असेल, running 🏃असेल, trekking 🧗 असेल, जमेल ते सगळ्यांनी नियमितपणे करायला पाहिजे - वय लक्षात न घेता, वयाचा काही संबंध नाही 🔞.. आपण स्वतःला जेवढ्या वयाचे समजतो 👼, तेवढ्या वयाचे होऊ शकतो.. परमेश्वराने दिलेली आपल्याला अद्भुत देणगी आहे.. त्यामुळे fit रहा, तंदुरुस्त रहा, आनंदी रहा.. ह्याच बरोबर पर्यावरणाचं 🌱 रक्षण करा.. काळजी अवश्य घ्या पण काळजी करु नका.. सिंहगडाकडून संदेश घ्या - स्वतःला आणि परिवाराला 👨‍👩‍👧‍👦 तंदुरुस्त बनवा.. 
ते काय-काय करतात, चला जाणून घेऊया 🎥..

जुगल राठी

सिंहगडला सर्वगुणसंपन्न 💝 म्हणणारे बाळासाहेब वाघचौरे (वय वर्षे ५८) गेली १४ वर्षे regular आहेत.. त्यांच्या शब्दात - सिंहगड सोयीचा आणि वेळेत होणारा ⌚, fitness 🤸 साठी एकच number 👍 आहे.. निसर्गाच्या सानिध्यात भरपूर आनंद भेटतो .. इथे तुमच्या-आमच्या सारखी माणसं 👥 भेटतात.. ही सिंहगडचीच दिलेली ओळख आहे आणि ह्याच्यामुळेच बरेच जण जोडले गेले.. इथून return आपण १० 🕙 पर्यंत आरामात घरी 🏘️ जातो आणि दिवस भरातले काम 👨‍💻 करायला कुठेही वेळ अपुरा पडत नाही..

१७ वर्षांपासून येणारे महेश जोशी (वय वर्षे ५८) सांगतात, इथे आलो की ३-४ दिवस freshness वाटतो.. इथे regular येण्यामागे - शांतता, व्यायाम, निसर्ग, sunrise अशी इतर कारणं आहेत..

आज वयाच्या ५६ व्या वर्षी, गेल्या २८ वर्षात साधारण १२८० वेळेस चढून आलेले, प्रकाश दंडनायक म्हणतात, counting 🎲 महत्वाचं नाहीये.. आपण किती वेळात चढ
तो ⏱️, हे पण महत्वाचं नाहीये.. इथे येणं महत्वाचं आहे 👌.. कसलाही त्रास नाही ३० वर्षांमध्ये, एकही गोळी 💊 घेतली नाही.. आलो की तानाजी मालुसरेंच्या समाधीला ⚰️ नमस्कार 🙏 करून पुढे देव टाक्याचं पाणी 💧 पिऊन खाली येतो.. इथे येऊन energy भेटते, patience आणि immunity वाढते.. लहान मुलांनी 🧒👧, teenagers नी चालू करावं.. कुठल्याही वेळेला आलं तरी आनंद ☺️ वाटतो.. फक्त आपल्या rhythm मध्ये हळू-हळू चढायचं, म्हणजे मला म्हणायचं हे की don't beat your beats 💓.. नशीब चांगलंय की २०-३० कि.मी. पुण्यापासुन हा गड आहे, लोकांनी ह्याचा फायदा 🉐 घेतला पाहिजे.. इथे आलेला माणूस कधी गर्विष्ठ वाटला नाही.. आता मी इतका वर आलोय, तरी बघा ह्या गडासमोर 🦕 मी किती लहान 🐇 आहे.. सगळे राग, लोभ, मत्सर हे निघून जातात.. निसर्गाचं सौन्दर्य प्रत्येक मिनिटाला बदलत जातं 🌄 🌤️ 🌧️, त्यामुळे सर (आबा महाजन) नेहमी सांगायचे की कुणासाठी थांबण्यात येणार नाही आणि म्हणूनच कोणावर अवलंबून 🚸 पण राहिलं नाही पाहिजे.. मी इतके वर्ष येतोय पण मी कधी म्हणटलं नाही की सिंहगड हा सोपा आहे.. आठवडाभर केलेले उद्योग तुम्हाला इथे प्रत्येक पावलाला मोजावे लागतात 😓..


एक वारकरी काका तर दर रविवारी येऊन "सिंहगड दहा हजाराचं recharge 💸 आहे" आणि "इतकं सोपं नाहीये, छातीत दम लागतो" च्या घोषणा देतात.. एक गृहस्थ 'ॐ नमः शिवाय' चा जप 📿 करत चालतात आणि खाली बसणाऱ्यांना न चुकता सांगत
 असतात "बसू नका, उभं राहून 🧍 विश्रांती घ्या".. नवरात्रीत सलग ९ दिवस सिंहगड trek करणारेही इथे भेटतील 👍.. 

'100% beast' - नाही, हे मी नाही म्हणत - त्यांनी तसा t-shirt घातला होता ☝️ एकदा.. पण मी हे नक्कीच म्हणालो होतो, 200% पाहिजे 👍👍.. 'का?' video बघा 👀 आणि ठरवा.. हे आहेत, २७ वर्षांपासून येणारे आणि ५०००+ सिंहगड trek करणारेे मोहन ओगले.. cheque वर double confirm 🖇️ करत जसं आपण शब्दात लिहितो - पाच हजार 😮.. ३६ all-out ला तुम्ही जसं केलं असेल, तसंच इथे पण refresh 🔁 करुन खात्री करु शकतात, तुम्ही काही चुकीचं नाही वाचत आहात..

मोहन ओगले

परतीला खडकवासला धरणात swimming करणारे, आपल्या प्रकुर्ती साठी गेली ११ वर्षे आठवड्यातून दोनदा येणारे ७४ वर्षीय मोकाशी काका असो
वा वाटेत भेटणाऱ्या सगळ्यांनाच श्री हरी / हरी ॐ 🕉️ चे अभिवादन करणारे असो.. वर येऊन दंड-बैठका काढणारे असो वा शंखनाद 🐚 करणारे असो.. सिंहगडला regular येणाऱ्यांबद्दल लिहावं 🗒️ तेव्हडं कमी आहे.. म्हणजे, हे फक्त tip of the iceberg आहे..

२०२० च्या पहिल्या 
सूर्योदयाला 🌄 parking मध्ये एक इसम ♂️ भेटले ज्यांच्या t-shirt 👕 वर 'Everest 🗻 Summitteer May-2019' लिहिलं printed होतं.. नाव होतं - राहुल - "नाम तो सूना होगा" DTPH 🎥 fame - राहुल इनामदार.. ह्यांची दुनियाच वेगळी.. इथे आले की ३-५-७ वेळेस सलग सिंहगड trek केल्याशिवाय मन भरत नाही.. कधी-कधी घाट 🛣️ रस्त्याने खाली येऊन परत तोच घाट चढणार आणि आतकरवाडीला उतरणार 〽️..

भरपूर नावं missing आहेत, पण आज साठी पुरे.. लिहितांना काही चूक-भूल झाली असेल तर माफी असावी.. 🙏

उर्वरित लोकांमध्ये (जे normal 😜 आहेत) फक्त sunrise 🌄 किंवा झुणका भाकरी 🍛 साठी थेट parking ला गाडीने
 🏍️ 🚘 येणाऱ्यांची category सगळ्यात प्रचलित 👒 🤳, ज्यांच्या quantity ला काही सीमा नाही.. वर उल्लेखित पण normalच आहेत, फक्त वेगळ्या categoryतले 😇..

अजून एक category खूप प्रचलित अप्रचलित आहे ती म्हणजे bluetooth speakers 🔊 वापरत, निसर्गाचा अनादर करीत, वातावरण 
दूषित करणाऱ्यांची.. त्यांना एकच विनंती - please ही सवय बदला / हौस कुठे दुसरीकडे पुरी करा 🙏..


आजपर्यंत ज्यांच्यासोबत सिंहगड trek ⛰️ केला आहे किंवा जे चढतांना-उतरतांना रस्त्यात भेटले आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे, as far and deep as my memory 💾 goes (alphabetical) 🔤.. आबा, आई, अभिजीत, अजय, अलोक, अमित, अमोल, अनिकेत, अनिरुद्ध, अनिश, अनुप, अर्चना, आशिष, अशोक, ओम, भाग्येश्री, ब्रिजेश, दीपा, देवेश, दुर्गा, Eike, गिरीश, हर्षद, जितेंद्र, किरण, लखन, महेश, मंदार, मनीष, मंजीत, मयुर, नकुल, नंदकुमार, नरेंद्र, निलेंद्र, नितीन, निशांक, पूजा, प्रज्ञारानी, प्रशांत, राहुल, राजेश, रामकृष्णन, सचिन, संपूर्ण, संजय, संतोष, सर्वेश, सवी, शिवेंद्र, शिवकुमार, श्रेयस, स्नेहल, सुजीत, सुयोग, तृप्ती, वैभव, वल्लभ, वसुधा, विजय, विकास, विनायक, योगेश.. तुमचं नाव नसेल तर कळवा, करतो update..

"सिंहगड नाही चढला जात" 😦 म्हणणारा हेश आता society पेक्षा सिंहगडला जास्त वेळ भेटतो 😜.. निलेंद्रचं नेहमी एक वाक्य ठरलेलं असतं, "थोडी देर और रुकते हैं ना" 🤗.. शिवकुमार म्हणतात, "तोंडाने श्वास घेतला तरी चालतो 🌬️, चढतांना आपल्याला जास्त oxygen ची गरज असते"..

बरं, मधु (short for मधुसू
धानन) आणि दुर्गा (हेच short आणि full) ही मुलांची नावं आहेत.. that's the 😘 beauty in diversity of Indian 🇮🇳 culture.. 'beauty of', 'diversity in' पाहिजे ना? मुद्दाम केलंय हो तसंं 😉..

सध्या pandemic 😷 मुळे बंद आहेत, पण आधी जेव्हा business travel 🛬 होत होते, तेव्हा client ला weekend ला कुठे घेऊन जायचं फिरायला 📸?.. तर पहिला पर्याय डोळ्यासमोर 👁️‍🗨️ यायचा, तो सिंहगड.. वर जे तुम्ही एक अनोळखी 🆕 नाव वाचलं, ते म्हणूनच.. जाऊ द्या अजून काही महिने, ही प्रथा होईल परत सुरु आणि दिसायला लागतील सिंहगडला काही विदेशी / परदेशी 🤵🏻.. 'परदेशी' आडनाव असणारे अलग बरं..

लोकप्रियता 👌 असावी तर सुप्रसिध्द संगीतकार 🎺🥁🎸🎻🎷 पंचमदा R D Burman सारखी.. त्यांच्या नावाने किती राहुल? 🥺.. मानकर, कोंडे, रामपुरा, पाटील, जगताप, सकलेचा.. ह्यांनी वर 👆 नमूद केलेला राहुल त्यांचाच समजावा.. खेडकरांसोबत पण गेलो आहे सिंहगडला, पण ते गाडीने 🏍️.. कोणी ७वा किंवा ८वा राहुल राहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.. वाचणाऱ्याला 📜 अर्थात ७वाच वाटणार, unless त्या ७व्याला माहिती असलेला ८वा पण missing 😼 असेल तर.. आणि similarly, जर तुमचं नाव आहे पण आपण सोबत सिंंहगड trek नाही केलाय, तर ते नाव दुसऱ्या कुटुंबातलं आहे, असं समजावं - जसं अमोल, अनुप.. btw, ह्या दोघांना मी आता बोलवून-बोलवून थकलो आहे 😐.. आम्ही ही इतर गावी जाऊन trek करतोच की.. बाकी मग वैभव जे "उत्साही" म्हणतो, ती list पण एवढीच मोठी असेल, कदाचित ह्याहून मोठी ♾️..

k2s च्या list मध्ये काही ह्यातलेच तर काही इतर नावं.. k म्हणजे कात्रज (नवीन बोगदा), कल्याण पेठ, खानापूर, खंडोबा टेकडी हून bonus 💰 ११ वेळेस सिंहगड.. bonus म्हणजे, हे आतकरवाडी हून
 सिंहगडच्या पायऱ्यांपर्यंत असलेल्या ~४७० मी. elevation gain वाल्या २९ trek मध्ये मोजलेले नाहीत.. ह्या ११ गिणतीतले साथीदार (alphabetical) 🔡.. आनंद, अधिकार, चेतन, दिपाली, गिरिजेश, गुंजन, कालिदास, ललित, निर्मल, निशा, पंकज, प्रणिता, प्रशांत, प्रतिभा, प्रीतम, रोहित, साक्षी, श्रद्धा, सोनिया, सुनील, सुनीता, तुषार, योजना.. वर नमूद केलेले repeat नाही केले, पण एखादं नाव असलंच repeat 🔁 तर ते दुसऱ्या कुटुंबातलं असेल..

या कधीतरी,
१. छाती कशी भरते? अनुभवायला..
२. आपण किती छोटे आहोत? हे जाणून घ्यायला..
३. energy, patience, immunity, stamina, oxygen साठी..
४. काही नाही तर, फक्त ह्या ५०+, ६०+, ७०+ young, younger, youngest generation ला भेटायला..

Eat. Sleep. सिंहगड*. Repeat.

Tuesday, March 16, 2021

चकदेव - महिमंडणगड - पर्वत

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

जसं माणसाचं नाव 'माणूस'.. चकदेव - महिमंडणगड - पर्वत

साधारण २ आठवड्यां आधी विशाल ने message केला होता..
१३-१४ मार्च २०२१, चकदेव via शिडी route, पर्वत आणि महिमंडणगड, details coming soon..

मला आधी typing mistake वाटली, पण मग 'message कोणी केला आहे?' हा विचार केल्यावर 'शक्यच नाही' म्हणत आपल्या सर्वांच्या तारणहार, लाडक्या मित्राला, Google 👨‍💻 ला विचारलं, असं काही असतं का? एखाद्या पर्वताचं नाव 'पर्वत' असणे म्हणजे माणसाचं नाव 'माणूस', असंच झालं की.. Google कडून अजून सविस्तर माहिती घेत असं लक्षात आलं की चकदेव आणि महिमंडणगड, दोन्ही base village शिंदी हुन आणि पर्वत, base village वळवण हुन point-and-back, सोपे treks आहेत.. 'मग विशालने personally message का करावा?', 'event सोपा असेल तर website वर टाकेल ना?'.. आपण / आम्ही जसे defects park करतो, तसंच 'नंतर बघू' म्हणत ह्या topic ला पण park करण्यात आलं..

उजाडला तो आठवडा, ज्याच्या (week)end ला करायचा होता हा trek.. राहुल ने विचारलं, 'plan काय?'.. विशालने 'WhatsApp करतो' सांगून २ दिवस गेल्यावर, बुधवारी एक pdf पाठवली.. daily (दोन्ही दिवस) ८-९ तास walking 🚶, पहिल्या दिवशी ६५० मीटर ascend आणि दुसऱ्या दिवशी ७०० मीटर descend.. ही होती summary.. आणि हो, कोपऱ्यात 'high endurance' पण लिहिलं होतं.. आता तुम्ही म्हणाल, ६५० 📈 आणि ७०० 📉 मीटर साठी कुठे high endurance लागतो?.. let's see..  

१३ मार्च २०२१

१२ तारखेच्या रात्री १० 🕙 पासून pick-up सुरू झाले.. शिवाजीनगर, स्वारगेट, बिबवेवाडी, कात्रज, नवले bridge आणि दुसऱ्या दिवशी (रात्री १२ 🕛 नंतर) शेवटचा pick-up point होता सुरुर.. 'एवढे pick-up points?', 'हे होते तरी किती?'.. करताय ना विचार?.. फक्त ११.. वाई पुढे पसरणी घाट चढत, महाबळेश्वर पुढे आंबेनळी घाट उतरत, पोलदपुरहून पुढे कशेदी घाट ओलांडत, आंबीवलीला पोहोचलो (Google Maps 🌍 वर अंबावलि म्हणून आहे).. मला जाग आली तेव्हा ४:३० 🕟 वाजले होते आणि सगळे गावातल्या हनुमानाच्या मंदिरात झोपले होते, म्हणून किती वाजता पोहोचलो, हे तुम्ही guess कराल, तीच वेळ..

थोड्या वेळेतच, अंधारातच, संसार मांडण्यात आला.. 'भैरवगड ते रतनगड' (b2r) ला केलेल्या प्रमाणेच बेत होता -  आज
 सकाळी
 उपमा (special attraction: मनुका 🍇), रात्री बिर्याणी आणि उद्या सकाळी maggi 🍝.. बिर्याणी आणि maggi चे special attraction खाली (संध्याकाळी आणि उद्या).. पाण्याची योग्य सोय नव्हती झाली म्हणून सोबत आणलेल्या पाण्याने उपमा आणि ☕  चहा (special attraction: गुळ) बनवण्यात आला.. ६:३० 🕡 ला उजाडल्यावर आणि पाणी आल्यावर container भरण्यात / refill करण्यात आलं.. नाश्ता झाल्यावर, सगळं गाडीत ठेऊन, 'समोर दिसतोय, तोच चकदेव' ही एक-मेकांना भूल देत / घेत आम्ही गावकऱ्यांना वाट विचारत चढायला सुरुवात केली..

चकदेवच्या बहीण झोलाई मातेच्या / देवीच्या मं
दिराला 🛕 लांबूनच (वेळ वाचवत) नमस्कार 🙏 करत, introduction round घेण्यात आला.. तसंही त्याची कधी सक्ती नसतेच, पण "हा trek TTMM आहे, म्हणून काहीच instructions नाहीत" म्हणत विशालने indirectly 'तुम्ही timepass ⌛ करायला मोकळे आहात' असं सांगितलं.. 


शिंदीची वाट popular असली, तरी ही वाट सापडायला अवघड नव्हती.. आणलेल्या खडूंनी ↗️ arrow mark करत पुढे चालणारे, मागच्यांना directions ↖️ देत होते.. Google Maps 'terrain mode' मध्ये बघितल्यावर लक्षात आलं की आपल्याला १०० मी. पासून ९०० मी. altitude पर्यंत चढाई करायची होती फक्त चकदेव साठी, आणि महिमंडणगड वेगळा.. म्हणजेच ६५० मी. जे pdf मध्ये वाचलं होतं, ती पण भूलच.. आणि सोबतीला होता कोकणातला दमटपणा, मार्च महिन्याचं उन 🌞 आणि नसलेला वारा.. ह्याला म्हणायचं 'high endurance'?.. hold on..

एका झाडापुढे 🌳 आम्ही तीन जण बराच वेळ येऊन थांबलो, जिथून आता २-३ ridge सोडून चकदेव दिसत होता.. आवाज देतोय 🗣️ पण कोणाचं उत्तर नाही आणि बघतोय 🕵️‍♂️ पण कोणी दिसत नाही.. राहुल आणि माझा विषयही झाला, पुढे निघून जायचा, पण प्रशांतच्या मताला प्राधान्य देत आम्ही सगळ्यांसाठी थांबलो.. अर्ध्या तासाने जेव्हा सगळे आले, तेव्हा 'ह्या speed ने अवघड आहे' म्हणत, 'आता नाही थांबायचं' ठरवत आणि दिलीपला सोबत घेऊन, आम्ही चौघं पुढे निघालो.. वाढत्या उन्हात (चढण्या आधी) दिसणारा चढच घाम 😥 काढत होता.. थोड्या वेळात आम्हाला दूरवर शिडी दिसली - राहुलला दिसली, सगळ्यांना दाखवली.. वाटेवर पसरलेल्या वाळलेल्या गवतातून सावधपणे सावकाश चढत आम्ही शिडी खाली पोहोचलो.. इतर गडांपेक्षा ह्या शिडीचा प्रकार थोडा वेगळा आहे, photo बघून लक्षात येईलच..


शिडी - कुठल्याही डोंगरावर / गडावर rockpatch असला आणि त्या दगडांवर पायऱ्या बनवण्या इतकी सोय नसली की शक्यतो शिडी लावलेली / शिड्या लावलेल्या असतात.. जसं रतनगड, कळसुबाई, सुधागड, शिडी घाट, घनगड, मोरगिरी, मार्कंडेय (अजून नाही आठवत).. येणाऱ्या दुर्गप्रेमींची आणि भाविकांची सोय करणे, इथला पर्यटन वाढवणे हा हेतू.. बरं, पर्यटन म्हणजे फक्त beach समुद्रकिनारा 🏖️ (हा शब्द आपण विसरलोच, नई!) किंवा गडांवर गाड्यांनी जाणे नव्हे..

शिड्या चढून झाल्यावर, एका दगडावर कोरलेल्या गणपती जवळ सावली बघत आम्ही तिथे क्षणभर थांबलो तेव्हा दिलीप म्हणाले, "आजचा trek फसला".. व्यवस्थित तर आलो आहोत, म्हणून त्यांचं हे वाक्य मला काही कळलं नाही.. "इतका चढ आहे, हे माहित असतं तर आपण अजून लवकर निघालो असतो" म्हणत त्यांनी तिथेच power nap 😴 ची सोय करुन घेतली.. त्यांच्या सुखात त्यांना रममाण होऊ देत, पुढे १२ वाजता जेव्हा आम्ही तिघं मंदिरात पोहोचलो, तेव्हाच खाली टेकलो 🧘..


श्री शैल्य चौकेश्वर - नुकतीच महाशिवरात्री होऊन गेली होती, तेव्हा इथली गर्दी काही खूप जुनी नव्हती.. आम्ही मात्र एकांतात तिघांतात इथली शांतता अंगीकृत करत होतो.. अतिसुंदर असलेल्या ह्या मंदिरात शिरलो की एक भलामोठा नंदी 🐂 आहे आणि गाभाऱ्यात शिवलिंग सोबत काही मुर्त्या आहेत.. छोटा entrance (तोच exit) असलेल्या आणि एकही खिडकी नसलेल्या ह्या मंदिरात जरी उजेड कमी येत होता, तरी गाभाऱ्यात सगळं स्पष्ट दिसेल, असा पुरेसा प्रकाश होता.. इतका मोठा नंदी असून प्रकाशाला त्याची बाधा नव्हती.. मंदिराबाहेर इथल्या पूर्वजांच्या
स्मरणार्थ बनवलेल्या भरपूर समाध्या दिसतात..



काही घरं 🏘️ पण दिसत होती आणि 'गडावर पाण्याची सोय आहे' ह्या माहितीची खात्री झाली.. 'आधी जेवण करुन घेऊ आणि नंतर शोधू' म्हणत आम्ही bag 🎒 मधून आमचे आणि तन्मयचे डबे काढले.. तन्मयने स्वतः सगळ्यांसाठी sandwich 🥪 बनवून आणले होते.. ओझं कमी व्हावं म्हणून त्याने तिन्ही डबे राहुल आणि प्रशांतला देऊन दिले होते.. आता त्याने b2r च्या अनुभवातून कोणाला डबे द्यावे, ह्याचा अंदाज लावायला पाहिजे होता का नाही? असो, आम्ही त्यातला एक डबा फस्त केला.. चटणी, पोळ्या, दशम्या, पराठे, ketchup आणि मोसंबी 🍊 नी पेटपुजा करून झाल्यावर आम्ही १ वाजता पाण्याचा शोध घेत निघालो.. मोसंबी पण त्याच्याच होत्या बरं..

एक काका भेटले, जे त्यांच्या घरी घेऊन गेले.. खाली शिंदीत बाकीची मंडळी भेटली तेव्हा ते इथेच घरगुती कोकम सरबत 🍷 आणि ताकाचा आस्वाद घेत तृप्त झाल्याचं कळलं.. पाणी पीत, आमचे whereabouts सांगत, आम्ही फक्त 'शिंदीला उतरायचं कुठून?' ह्याचं उत्तर सोबत घेत तिथून निघालो.. वरून झऱ्यातून येणारं पाणी साठवणाऱ्या दगडी टाकीतून बाटल्या 🍶 भरुन, overflow होत असलेल्या पाण्यात तोंड धुवून आम्ही परत मार्गी लागलो.. थोडं उतरल्यावर समोर दिसली गाडी 🚌 आणि दिसायला लागलं होतं आजचं दुसरं target..

२ वाजता गाडीजवळ पोहोचलो तेव्हा शेजारच्या घरात विचारलेल्या "लिंबू सरबत भेटेल का?" प्रश्नाला नाराज करणारं उत्तर स्वीकारत, "आपल्याकडे लिंबूू 🍋, साखर 🍚 आहेत. सरबत पिऊन निघायचं का?' ह्या प्रश्नाला पण park करत आम्ही momentum जायच्या / हरवायच्या आत तिथून निघालो..

महिमंडणगड - दिसायला छोटा असलेला हा गड तसा चढायला सोपा आहे (हे सत्य आहे).. रघुवीर घाटातून गाडी ज्या रस्त्याने आली, त्यावर आम्हाला एखादा कि.मी. पायी जायचं होतं.. नंतर डावीकडे 👈 दिसणाऱ्या एका वाटेने आम्ही गड चढायला सुरुवात केली.. पण भर दुपारी चढायचा नाद आम्हाला महागात पडला.. डावीकडे होता तापलेला डोंगर ⛰️, उजवीकडे होता तळपता सूर्य 🏜️ आणि खाली होती उकळती माती.. वर पोहोचल्यावर प्रशांत म्हणाला, "मला जड गेलं".. राहुलही तत्सम.. ह्या दोघांना असं म्हणायची वेळ आली म्हणजे "high endurance" 💪.. मी जरी गप 🤫 होतो, तरी माझीही condition काही खूप वेगळी किंवा त्याहून दूर नव्हती.. चकदेवचं ८०० मी. elevation, इथल्या १५० समोर फिकं होतं.. so, let me rephrase - दिसायला छोटा वाटत असलेला हा गड तसा चढायला सोपाच असावा (हे अनुभव आहे).. कधी-कधीच अनुभवापेक्षा जे सत्य सुंदर असतं, ते हेच.. 'उलटं असतं
?' म्हणताय.. it all depends on how one treats failures, rather failed attempts.. आणि आपण जे म्हणतो, "grass is greener on the other side", हे illusion पलीकडे नाहीच काही..


वाजले होते ३ आणि जणू निसर्गाला आमची आली असावी दया (CID नाही).. सूर्य लाजून ढगांमागे लपला 🌥️.. वारा काहीच नव्हता, पण उन्हाच्या झळा तरी बंद झाल्या होत्या.. ८-१० टाकं होते आणि त्यांच्या पलीकडे वर चढून भैरवनाथाच्या सोबतीला सहसा असणाऱ्या जोगेश्वरी च्या मुर्त्या होत्या.. पहिल्यांदाच दिसलं इथे, ते होतं टाक्यात कोरीव काम.. गडाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन वेळ होती तन्मयला "आभारी आहोत" म्हणायची.. दुसरा डबा संपवत असतांना, "तिसरा तरी त्याच्यासाठी ठेऊ" म्हणत आम्ही बाकीच्यांना 'कुठपर्यंत पोहोचले?' असे phone 📞 करायला सुरुवात केली.. WhatsApp group मधले सगळे (उर्वरित ८) number try केले, एकही number लागत नव्हता.. शेवटी BSNL ने बाजी मारली.. मागच्या आठवड्यात कळसुबाईला पण हाच अनुभव.. एक BSNL चं sim card घ्यावं का? आता गंभीरपणे हा विचार केला पाहिजे..




नागेश्वर, वासोटा, जुना वासोटा, कास पठार, चकदेव ना mobile मध्ये सोबत 📷 घेऊन आम्ही उतरायला सुरुवात केली.. phone वर विशालने विचारलं होतं "marking केलंय का?".. आहे ते limited resource वापरत, फक्त गरज पडेल अश्या ठिकाणी marking करत आम्ही ४:१५ पर्यंत शिंदीला परतलो.. लागलीच चकदेवहुन बाकीचे एक-एक करून येत गेले.. तन्मय सोबत त्याचा तिसरा डबा संपवण्यात आला.. अंधार पडायच्या आत महिमंडणगड return येऊ शकतील, हा विचार करुनच आम्ही त्यांच्या इच्छेला नाराज नाही केलं.. ते गेल्यावर आम्ही शोधत होतो पिण्यासाठी थंड cold-drink 🍹.. एका दुकानात तहान भागवत, गडाला 'महिमनगड' पण म्हणतात, हे आम्हाला समजलं.. 

तिथून माघारी येत आम्ही चहा आणि बिर्याणीच्या (special attraction: सोयाबीन) तयारीला लागलो.. बाकी मंडळी येईपर्यंत, main course तयार झाला.. काय-काय टाकलं होतं, हे अजूनही फक्त आम्हालाच माहिती आहे.. काय नव्हतं टाकलं, ते खाली 👇 वाचा.. dessert 🥞 काय बनवायचं? तर ठरला झटपट तयार होणारा शिरा (special attraction: मीठ काजू).. कोण बनवणार? तर आमच्या सोबत आज होत्या मृणालिनी, म्हणजे शिरा सारखा शिरा भेटणार होता आणि खारट शिऱ्याला आज सगळे मुकणार होते.. 😁

चहा होता साखरेचा म्हणून खुश 😃 तर काजू न टाकता शाही बिर्याणी न बनवल्यामुळे दिलीप झाले होते थोडे ☹️ नाराज.. ज्यांच्या अंगणात बसलो होतो, तिथल्या काकू बोलायला खूप भारी होत्या.. त्या आणि आमच्या driver काकांची सोबत आम्हाला लाभली, हे आमचे सुदैव्य 🤞.. पुडी, बोरं आणि चिंचांच्या jokes ची मजा इथे लिहिण्यात नाही.. त्यासाठी तुम्हाला group treks करावे लागतील..

दिवसाची सांगता दिलीप सरांनी लिहिलेल्या काही ओळींनी,
शरीरभर थकव्याच्या जाणिवेत द्वेष उरत नाही. थकव्यात असते ती स्वीकारण्याची प्रक्रिया. थकलेल्या व्यक्तीपेक्षा निर्मळ काहीच नसतं.
सगळं विश्वच सामावून घेता येईल एवढी थकव्याची ही वाढत जाणारी वलयं.

१४ मार्च २०२१

हिमालयात 🏔️ trek करतांना climb high, sleep low असं म्हणतात.. ३०००-३५०० मी. उंची पर्यंत ह्याचा फरक पडत नसला, तरी आमचा program exact उलटा होता.. काल जे कोकणातून खालून वर 📈 आलो होतो, ते आज परत वरून खाली 📉 कोकणात जायचं होतं.. तालुकांच्या भाषेत, खेड - जावळी - खेड.. जिल्ह्यांच्या भाषेत, रत्नागिरी - सातारा - रत्नागिरी..

आज परत कोकणात उतरायचंय.. नोव्हेंबर २०१९ मध्ये माझ्यामुळे सर्वांना कवळ्या घाट अर्धा सोडून माघारी यावं लागलं होतं 😔, तो experience कालपासून सतत डोळ्यांसमोर येत सतावत होता - तसंच काही घडायला नको म्हणून.. आजपर्यंत फसला असेल, असा तो माझा एकमेव trek असावा - original plan मध्ये फक्त कोकणदिवा होता, तरी.. anyways, let's get back to शिंदी..

रात्रीच्या उरलेल्या बिर्याणीत काजू टाकून तीला शाही बनवण्यात आलं.. खाली उतरायला दुपार होते का संध्याकाळ, ह्याचा काहीच अंदाज नव्हता.. म्हणून, बिर्याणी दुपारच्या जेवणासाठी pack करुन घ्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आणि काल रिकामे झाले होते, ते डबे भरण्यात आले.. पण इतक्या उन्हात टिकेल का? म्हणून plan b, c पण बॅगेत टाकण्यात आले.. नाश्त्याला आज होती maggi 🍜 (special attraction: hot-n-sour soup).. सोबतीला आणि होते cream-roll, bourbon.. कधी-कधी तर bourbon 🍪 खास trekking साठी बनवले आहेत, असं वाटतं..

bus 🚐 ने २-२.५ कि.मी. वळवण पर्यंत जाऊन साधारण ८:१५ ला आम्ही पर्वत चढायला सुरुवात केली.. वर वाचलं असेलच, 'पर्वत' हे त्या पर्वताचं नाव आहे.. मुलांचे नाव Christian असतं, तसंच.. logic 🤔 पलीकडे आहे, पण आहे ते आहे, काही करु शकत नाही.. आर्ध्या तासाने पाणी लागेलच, म्हणून सगळ्यांनी खाली कुठे पाणी न भरता वरूनच natural mineral पाणी भरले.. इथपर्यंत येत, चढ आणि थोडी सपाटी होती.. ह्यापुढे मंदिरापर्यंत फक्त चढ होता.. चकदेवला पाठमोरा ठेऊन आम्ही चौघांनी ९:३० 🕤 ला मंदिर गाठलं.. आज प्रशांत आणि राहुल सोबत, सोबतीला वैभव पण होता..


स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन - चकदेवला आहे साधारण हे मंदिरही तसंच आहे.. पण ह्या मंदिरात एका बाजूस अजून एक दरवाजा आहे म्हणून प्रकाश भरपूर येतो.. नंदी तसाच मोठा, पण बसायची style थोडी तिरकी.. नवस पूर्ण झाला म्हणून इथे काही 🎭 मुखवटे वाहिलेले दिसतात, जसे चकदेवला 🐍 नाग होते..

पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशे ७ पांडवकालीन मंदिरं आहेत.. नंतर group मधून मिळालेल्या माहितीनुसार हे ७ पुढीलप्रमाणे, पण पांडवकालीन नाहीत, तर मोरेंनी काही शतकांपूर्वीच बांधले आहेत..
१. पर्वत - जोम मल्लिकार्जुन ✅
२. धारदेव - धारेश्वर
३. चकदेव - चौकेश्वर ✅
४. तलदेव - तलेश्वर
५. गालदेव - गालेश्वर
६. मालदेव - मालेश्वर
७. घोणसपूर - मल्लिकार्जुन

इथून दिसणाऱ्या view मध्ये सामील होते प्रतापगड, मधू-मकरंदगड, महाबळेश्वर, नागेश्वर, वासोटा, महिमंडणगड, चकदेव इ... सगळ्यांचा समज हाच की इथून पुढे फक्त उतार असणार आहे.. पण पुढे कुठे जायचं / कुठून उतरायचं - कोणालाच माहिती नव्हतं.. पुजाऱ्यांनी सांगितलं २ वाटा आहेत, एक उचटला जाते आणि एक सात्विक पाडा.. उचटची वाट म्हणजे रात्रीच 🌃 पोहोचलो असतो कांदोशीला, म्हणून दुसऱ्या वाटेने जायचं ठरलं.. Google Maps बघून असं वाटत होतं की अजून एक वाट कांदटला उतरत असावी, पण पुजाऱ्यांनी "सापडणार नाही" सांगत आम्हाला सात्विक पाड्यालाच उतरायला सांगितलं.. थोडं सोबत येऊन ते आम्हाला वाटेला लावून देणार होते..

पर्वतहून निघतांना आम्हाला वाटेत 
एक पिण्याच्या पाण्याची आणि दुसरी अंघोळीच्या पाण्याची 🛀, अश्या २ टाक्या लागल्या.. थोडं पुढे घेऊन जाऊन, "तिथून उतरा" सांगत पुजारी back to pavilion 🏟️.. दोन्ही वाटांच्या common point ला जायला steep उतार होता.. काही घसरत, काही बसत आणि मोजकेच चालत त्या common point ला पोहोचले.. इथून सात्विक पाडा होता उजवीकडे ➡️ आणि कांदट डावीकडे ⬅️.. थोडा अजून वेळ वाचावा म्हणून आम्ही डावीकडची वाट निवडत कांदटला उतरायचं ठरवलं.. इथून on झाला explore mode.. शोधत-शोधत, काही ठिकाणी थोडा वेळ जरी लागत असला तरी आम्ही १:३० वाजता successfully राजे चंद्रराव मोरेंची वरदायिनी देवता श्री निरीपजी देवीच्या मंदिरात पोहोचलो.. उजवीकडून non-stop 🏃 आलो असतो, तरी ह्यापेक्षा लवकर नसतो आलो..

गंजी

शाही बिर्याणी अजून सुस्थितीत होती.. पण त्याआधी वेळ होती surprise surprises ची.. दिलीप सकाळपासून सोबत कलिंगड 🍉 वाहत होते, मानना पडेगा.. नंतर त्यांच्या bag मधून निघाली सोनपापडी, गुळपट्टी आणि काही वेळाने वऱ्हाडी ठेचा.. म्हणजे इथे पुढे लिहिण्यासाठी काही राहिलंच नाही..

काही जण अजून यायचे होते.. उशीर कुठे झाला? तर नंतर कळलं की ते रूह अफ़ज़ा break साठी कांदटला थांबले होते, जे विशालने वाहून आणलं होतं..

२:४५ ला निघालो तेव्हा वाट शोधण्यापासून सुरुवात होती.. एक arrow दिसला, आणि तो follow करत आम्ही सुटलो.. जिथे marking पुसट झाले होते, तिथे आम्ही गिरवत होतो.. रस्त्यात लागली एक नदी 🏞️ आणि सगळ्यांनी बहुतेक एकच विचार केला असावा, "इथे थांबायला पाहिजे होतं जेवायला".. स्वच्छ आणि नितळ पाणी, मेहरबानी होती निवळी 🐟 मास्यांची.. पाणी भरत आम्ही पुढे निघालो, समज हाच की आपण नाळेची वाट उतरतो आहे..

nature's own water filter - निवळी मासे

design due to fern (नेचाची पानं)

एका ठिकाणी photo 📸 काढतांना राहुलचा mobile १५-२० फूट वरून खाली पडला.. पाणी असेल एखाद फूट.. "बरं झालं पडला, नवीन घेता येईल" इतका आनंद 🥳 झाला असता, 'पुढून जाता येईल' असं दिसत, दिलीप आणि राहुलने बूट काढून पाण्यात प्रवेश केला.. तिथे मागे तन्मय, विशाल आणि प्रथमेश मस्त पोहत 🏊‍♂️ होते, जे आम्हाला पुण्यात आल्यावर समजलं.. इतका वेळ पाण्यात राहून सुद्धा mobile चालू होता, म्हणजेच राहुल झाला होता नाराज 😔..

हीच ती जागा

घाट का एक खामोश पत्थर हूँ मैं, मैने नदी के हजार नखरे देखे हैं
caption credits: प्रशांत

थोड्या वेळाने लागला निरीपजी धबधबा.. इथेही वाहतं पाणी नव्हतं पण view was unbeatable.. वर उभं राहून धबधबा खाली किती force ने पडत असेल, हे काल्पनिक दृश्यच रोंगटे खडे करत होतं, आणि समोर सह्याद्रीचे डोंगर म्हणजे 'मजा आ गया' 😍..

Sahyadri Unbeatable

इसी बात पे, दिलीप सर एक बार और,
हे माझे निर्मळ डोळे आणि हे माझे तरंगणारं शरीर सांभाळत मी शून्यात स्वतःला गोठवण्याचे प्रयत्न करतो. हे अवस्थांतर टाळलं पाहिजे म्हणतानाच नियंत्रणाचे भास तुटतात. उष्णता आणि काही लांबच्या टोकांवर बर्फाळलेल्या जागा. आता हे सापेक्ष जग, संकल्पनांच्या शक्यतांमध्ये आपल्याला कैद करत जाणार.

पुढे कुठे? mark तर वर ⬆️ आहे, जी डावीकडे जाणारी वाट वाटते आहे, पण कांदोशी तर खाली ⬇️ आणि उजवीकडे आहे.. दुसरा कुठला रस्ता दिसत नसल्याने आम्ही चढायला लागलो.. भरोसा होता mark वर, कारण दुसरं कोणी नव्हतंच भरोसा करण्यासारखं.. पण हे mark कांदोशीलाच घेऊन जातील ना? नाहीतर फिरत राहू आपण जावळीच्या खोऱ्यात..

वाजले होते ४:३० 🕟.. थोडं वर जाऊन, 'वाट उतरती होतेय का?' बघायला दिलीप आणि राहुल पुढे गेले.. प्रशांत आज back-lead ला होता, म्हणून त्याचा उल्लेख कमी / नाही कुठे.. इथे लिहितांना (साहजिकच) सोबत असतील त्यांच्या बद्दलच लिहिल ना? हे दोघं आल्यावर कळलं, उजवीकडे जाणारी एक वाट खाली उतरते, पण ती बघतांनाच भीती 😨 वाटते.. खाली गेल्यावर कळलं हीच होती 'नाळेची वाट', जिथून उतरायचा original plan होता.. असो..

परत उलट्या दिशेने वाटचाल चालू.. Google Maps वर समोर दिसत होतं १०० मी. elevation आणि आता तर आम्हाला marks पण दिसेनासे झाले होते.. वाटेत काही जण जो plastic फेकून कचरा करतात, तो ही दिसत नव्हता.. 'आपण चुकलो आहोत' ही खात्री होत सगळे बसले तिथेच.. थोडं पुढे एखादा mark दिसतोय का, हे बघायला दिलीप, राहुल आणि विशाल निघाले, पण bad luck 🙁.. ते परत येत ठरलं असं की 'आपल्याला शेवटचा दिसला, त्या mark पर्यंत माघारी जाऊन, तिथून वर काही marks दिसतात का?, हे बघू.. आला तो spot आणि गेला राहुल तिथून वर.. पुढे mark दिसताय म्हणून लागलीच त्याने green signal 🏁 दिला आणि everybody was relieved..

समोर एकच target होतं - अंधार व्हायच्या आत ह्या दाट जंगलातुन बाहेर पडायचं.. पाला-पाचोळा 🍂🍁 पडल्याने पायवाट अगदी स्पष्ट दिसत नव्हती, पण जिथे मोकळा रस्ता दिसेल तिथे ठराविक अंतरावर असलेल्या arrow marking आम्हाला 'चलते रहो' चे संकेत देत होते.. दिलीप आणि राहुल कांदोशीच्या रामवरदायिनी देवीच्या मंदिरात पोहोचले ६:३० ला.. एक-एक करत शेवटचा कार्यकर्ता ८ 🕗 ला मंदिरात पोहोचला.. हात-पाय धूत असता, lockdown 🔒 पासून, पुणे सोडून, इथेच राहणाऱ्या एका गावकरीने सांगितलं तेव्हा आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या..
१. आम्ही तेलीसरी / तेली च्या वाटेने खाली आलो आहोत..
२. (मागे डोंगरावर वणवा 🔥 पेटला होता) वणव्याचा उद्देश्य - प्राण्यांनी केलेली घाण साफ व्हावी आणि पुढचं गवत छान यावं..
३. मंदिराच्या मागे वाहणाऱ्या नदीला 'जगबुडी' म्हणतात.. नावातच लपलं आहे 'किती पाणी असत असेल?' ह्याचं उत्तर..

वेळेत पोहोचल्याचा आनंद सगळ्यांनाच झाला होता, कारण कालपासूनच आज रात्री काय जेवायचं 🍲, ह्याचे plans रंगायला लागले होते.. ०९:३० 🕤 वाजता जेव्हा दिलेली order समोर तयार हुन आली
, तेव्हा आम्ही आठवड्यापासून उपाशी आहोत, अशे तुटून पडलो..

'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' चे कोटी-कोटी आभार 🙏.. त्यांनी त्यांच्या मोहिमेसाठी ज्या ठिकठिकाणी markings करुन ठेवल्या आहेत, फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आम्ही सगळे जेवायच्या वेळेत (night curfew आधी) hotel ला पोहोचू शकलो नाहीतर किती भटकत रहावं लागलं असतं आणि कधी परतलो असतो, ह्याचा काही नेमच नव्हता..



दिलीपने सांगितलेलं एक वाक्य नेहमीच लक्षात राहील.. कुठेही जा, कितीही timepass करा, पण trek कधीही अंधार व्हायच्या आत संपवा..
  
"दाग अच्छे हैं" सारख्याच "खोटं बोलायचं असतं" आणि "ती घाण healthy आहे", ह्या trek च्या इतर आठवणी 😁..

content 📝 credits - विशाल, वैभव, राहुल, मृणालिनी, दिलीप, कौस्तुभ, प्रशांत, तन्मय
photo credits - वैभव, प्रशांत

Sunday, March 7, 2021

कळसुबाई

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

family time at the top of महाराष्ट्र.. कळसुबाई

Next time will be,
१. औंढा fort on the other end of C
२. family time at the top of महाराष्ट्र
३. jewel from रतनवाडी, for अमृतेश्वर


that's footnote from दीपावली २०१८ post (read here) around पट्टा (विश्रामगड), कळसुबाई and रतनगड 💎.. having recently checked ✅ औंढा during 👨‍💻 work from Nashik (read here) and ✅ अमृतेश्वर during भैरवगड ते रतनगड (read here), it was time to complete / finish-off then prepared, this sequel TODO list with some family time 👨‍👩‍👦..

कळसुबाई - एका प्राचीन दंतकथेनुसार कळसु नावाची कोळ्याची मुलगी ♀️ होती.. ती पाटलाच्या घरी कामाला होती.. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन.. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसुला भांडी 🍽️ घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसु डोंगरावर जाऊन राहू लागली आणि तोच हा कळसुबाईचा डोंगर.. (reference: wikipedia)

महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि western ghats मधला 34th highest..


personally I believe, everyone born 🐣 in महाराष्ट्र should trek to its highest peak at 1646 mtrs, irrespective of having any trekking interests / not.. महाराष्ट्रात जन्म झाला म्हणून महाराष्ट्रातला highest..

आता तुम्ही म्हणाल, by this logic, भारतात 🇮🇳 जन्म झाला म्हणून Karakoram aka K2 (that lies in POK region) or Kangchenjunga (now India's highest peak) आणि माणूस 🙋‍♂️ म्हणूनच किंवा पृथ्वीवरच जन्म झाला म्हणून Mt. Everest पण TODO list मध्ये आहेत का? तर, नाही 🙅‍♂️.. himalayan treks 🏔️ २ झालेत, बस झालेत.. सह्याद्रीतील मजा, सह्याद्रीतच.. तिथल्या बर्फापेक्षा ☃️ इथलं ऊन बरं 🌞..

similar to last time, this was also planned not more than 2-3 days before.. we were on our way back from धुळे, from स्वप्नील's (my cousin-in-law) marriage 👰🤵 and कुलदेवी 🛕 दर्शन combo on Wednesday.. "कळसुबाईला जायचं का?" ही चर्चा 🗣️ सुरु झाली.. will Friday be a good option after resting for a day, to avoid the weekend crowd?.. पण मग दुधाचं 🥛 कसं करणार? ok, background first - आबांचं नाशिकला दुकान आहे, नाशिक रोड to be precise.. it's closed 🔒 since lockdown, and there are no re-opening plans.. but, we never stopped supplying milk to our daily customers (बंदी वाले).. and for that, we need to order 📝 the quantity a day before.. already रात्रीचे १० 🕙 वाजले होते, म्हणून शुक्रवारची setting गुरुवारीच करण्याइतकी गडबड करण्याची गरज तशी वाटली नाही.. so, the next ⏭️ available option, 'Saturday' was finalized.. am I detailing too much? of course it's a family trek.. पण अजून detail मध्ये लिहायला गेलो तर तुम्हाला बोर 😴 होईल.. so, let's get to the topic now..

06-Mar-2021

a couple of days ago, I learned about some restrictions on activities in sandhan valley.. एका नामांकित telecom 📶 company ने इथे जाहिरात केल्याआधी मला ही valley माहिती ही नव्हती, आणि सध्या इथे हमखास जत्रा भरते.. being more-or-less in same area, I was then sceptical about कळसुबाई ⛰️.. coincidentally, विशाल had also planned night trek 🌜 here same day date, so sent him a message to confirm.. limited / zero availability of mobile networks only made sure the confirmation was delayed till the end of our event..

we packed-it-up, sipped tea ☕ and started our driving 🚗 journey at 05:30 a.m. on नाशिक-पुणे, then नाशिक-मुंबई highway 🛣️, continuing on शिर्डी-घोटी road, towards base village बारी.. भगुरहून पण एक रस्ता आहे, but last experience was enough.. some lights on a mountain in front attracted our attention.. वणवा 🔥 - in a dry climate, when the temperature starts rising, the wildfire or wildland fire auto-errupts and speads over a mountain.. this is not unusual and is a common behavior with all the mountains, in all the continents..

we reached बारी at 07:00 a.m. 🕖.. having a convenient and shorter option (as compared to travelling to this side from पुणे) is a blessing 😇 indeed.. parking at a small open area near a well (विहीर), we started towards our destination, then still visible, but was soon to play hide-n-seek 🙈..

first view

after getting the best out of morning energy and whilst enjoying the views of औंढा and पट्टा, accompanied by windmills, we halted for breakfast 🥗 at 08:40 a.m... enquiring about the gathered waste (कचरा), we learned that they simply burn / fire it.. it was too late, as we had just dumped the candy wrappers 🍬 with us in their bin.. whether it's about using or burning the non-biodegradable plastic, we all are knowingly / unknowingly contributing slightly / enormously towards this hazardous cause ☹️..

औंढा आणि पट्टा

बोरकुट 🍒.. when we were kids 🧒, it was one of the popular munching options to encash the very limited pocket money 💰.. but, having a shop meant we never needed any money in / for our pockets.. as name indicates, it is powder of indian jujube (बोरं / बेर).. while पोहे (rice flakes) were being prepared, it was another moment of / to relive-the-childhood, courtesy: बोरकुट..

next in line was ☝️ first of 4 iron ladders, rather ladder patches which immensely help the fellow trekkers to go beyond the rockpatches.. 'ladder patch' because they have one or more ladders installed at 3 of them.. only last one has a single ladder that takes you straight to the top of citadel / महाराष्ट्र with the temple.. rock ऐवजी आपण rockpatch म्हणतोच ना, same logic 🤔.. second patch had few monkeys 🐒 patrolling.. cautiously passing by them while protecting our backpacks 🎒, we proceeded to third patch which is steep and longest of all 4 patches, having 'हळू चला' and 'रांगेत चला' written painted in white.. rock-based steps are now constructed after this, to simplify more the matters, which were not available last time..


from here, we regain the sight 👁️ of the top पण आता सगळेच दमले होते, सुमेध थोडा जास्त 😦.. till the last ladder, the next part is tougher than what we experienced so far, because of multiple factors, not limited to 'तिथे जायचं आहे', 'थोडी सपाटी पाहिजे आता', 'सावली दिसेल तिथे थोडं थांबून घ्या' etc. "white गोळी (glucovita) पाहिजे का?" विचारल्यावर आणि खालल्यावर जणू त्याचा पुनर्जन्मच झाला 🥳..

the last ladder (with 80 steps) and another / last 80 footsteps 👣 meant we were at the कळसुबाई / कळसु आई temple at 11:00 a.m... एका group कडून तिरंगा 🇮🇳 आणि photographer 📸 उधार घेऊन, it was time to capture the moments of today's achievement.. देवीला / देवीच्या मंदिरात ज्या साड्या चढवल्या जातात, त्यांचा वापर करुन, थोडीफार जी जागा वर available आहे, तिथे बऱ्याच झोपड्या-cum-tents ⛺ बनवले आहेत.. अश्याच एका tent खाली विसावा घेत आम्ही थंड हवेचा / वाऱ्याचा 🌀 पुरेपूर आणि भरपूर आनंद घेत होतो..




wilson dam (भंडारदारा)

अलंग मदन कुलंग

उलटं वाचायची जशी परीक्षाच होती आज.. from the top, when viewing the Wilson dam (भंडारदारा) 🏝️, we observe some rocks, painted in white, arranged to read कळसुबाई.. वरुन उलटंच दिसणार, but that was easy.. later, after descending the last ascended ladder, had bought पेढे from a lady 👩, who claimed आमच्या घरच्याच गाईंच्या खव्याचे बनवतो.. something was stamped on them.. आधी तर कळलंच नाही, कोणत्या भाषेत लिहीलं आहे.. थोडा प्रयत्न 🧐 केल्यावर लक्षात आलं की it was mirrored English, 'bhabhi kajal' it read.. cannot even make a wildest possible guess 🤨, on how an eyeliner can be remotely related to पेढे..

कळसुबाई painted white

'तुमचा मुलगा आहे का?' 'हो.' 'इतक्या वर चढून आला?' 'हो, every step by himself' (agree, हात पकडुन, पण अजून कडेवर घ्यायची वेळ नव्हती आली). 'छान, माझे मित्र अर्ध्यातूनच परत गेले.' वाटेत भेटणाऱ्या काहींशी असेच काही संवाद साधत आम्ही वर चढतांनाच जी एक बंद झोपडी 🎪, आणि तिच्यासमोरची सावली final करुन आलो होतो, जेवणासाठी, तिथे पोहोचलो.. घरुन आणलेली भाजी आणि पराठे 🌮 bag मधून बाहेर काढण्यात आले.. प्यायला काय तर हात धुवायला पण नेमकंच पाणी होतं.. वसुधाने थोडं खाली जाऊन विहिरीतून हात धुवायला पाणी आणलं.. जेवण करुन झाल्यावर दुसरी वेळ होती पाणी घेऊन यायची, जी संधी आबांनी साधली.. २ floors इतकीच होती ती चढाई, पण आता जाणवत होती.. क्षणभर विश्रांती 💤 घेत आम्ही निघालो तेव्हा माझ्या bagचं वजन होत्याचं नव्हतं झालं होतं..

we resumed after generating some more plastic 😔, i.e., buying bottles 🍶 filled with water.. चढतांना नाही वाटलं काही, पण उतरतांना मात्र किती वर आणि दूर आलो आहोत, ह्याची चांगलीच जाणीव होत होती.. विभुतीचा incidence खूप काही जुना नव्हता, म्हणून गाडीत बसेपर्यंत सुमेधचा हात सोडायचा नाहीच 🚸, हा पक्का निर्धार केला होता.. जिथे सुमेधची height कमी पडत होती, तिथे त्याला उचलत आम्ही हळू-हळू खाली उतरत होतो.. जिथे जमत असेल तिथे चालत, जिथे जमत नसेल तिथे बसत, scree can be sometimes that deceptive, can't help it..

after descending more than half, it was time for a ☕ tea break.. 'अजून किती वेळ लागेल?' विचारलं, तर कळलं अर्धा-पाऊण तास.. पण मृगजळ सारखा हा पण भ्रमच आहे, हे ठाऊक होतं आम्हाला.. आईचा speed कमी पडत होता.. खालचं कळसुबाई निवासिनी देवस्थान 🛕 येत, मी बराच पुढे निघून आलो होतो.. जिथे गाडी लावली होती, तिथपर्यंत पोहोचायला आम्हाला left ⬅️ घ्यायचा होता.. सपाटी असून सुमेध खूप slow झाला होता.. बघितल्यावर कळलं की त्याचे डोळे लागत होते 😴.. ह्यापुढे त्याला कडेवर घेऊन चालण्यापलीकडे काही पर्याय नव्हता.. रस्ता तसा अवघड नव्हता आणि सोबतीला बाकी लोक पण दिसत होते.. वसुधाला तिच्या speedच्या हवाले करत मी पुढे निघून आलो.. खाली शेतात थोडी जागा दिसली, तिथे थोडं बसून, हातांना आराम देत, ती आल्यावर आम्ही सोबत ०५:०० 🕔 वाजता गाडीजवळ आलो..

मस्त झोप झालेला सुमेध was fresh and active 🆕 as always.. हातपाय धून, विहिरीचं थंड पाणी पिऊन, २०-२५ मिनिट होऊन गेले, पण दोघांचा काही पत्ता नव्हता.. कितीजरी slow झाले असले तरी आत्तापर्यंत यायला पाहिजे होते.. आणि शाळेजवळ 🚸 गाडी लावली आहे, हे आबांना माहीत आहे, म्हणून कसेही येतीलच, ही खात्री होतीच.. तरी, mobile (range नव्हती 📵, तरी) आणि पाणी घेत मी परत निघालो.. त्याच शेतापर्यंत गेलो, जिथून सुरुवातीच्या पायऱ्या स्पष्ट दिसतात.. कोणी उतरतांना दिसत नाही म्हणून, एक काम करत असलेल्या आजीला विचारलं, "मागच्या ५-१० मिनिटात कोणी परत येताना दिसलं का?" उत्तरात "नाही" 😒 ऐकत तिथेच ५ मिनिट वाट बघितली.. तेच बघत आजीने suggest केलं, गाडीजवळ जाऊन बघा.. "तिथूनच तर आलो आहे" म्हणत एकच विचार केला - परत जाऊन बघू, कदाचित तिकडच्या रस्त्याने आले असतील.. आणि नसतीलच आले तर काय करायचं ह्याचा विचार करु..

गाडीजवळ पोहोचत आबा दिसले.. मी तिथून निघाल्यावर लगेच २-३ मिनिटात आले, असं कळलं.. कसे / कुठून? ज्या देवस्थानापासून आम्ही left ⬅️ घेतला होता, तिथून white arrow follow करत ते rightला ➡️ गावात गेले होते (हे तेच white arrow असावेत, जे deccan ultra वाल्यांनी mark केले असतील)..

2 very popular sayings, perfectly fit here..
well begun is half done..
all is well that ends well.. ☺️

being a weekend, it didn't turn out as crowded as anticipated.. but Sundays ☀️ are worse..

if any doubts about,
१. difficult nature of the trek path - being very popular and highest peak in महाराष्ट्र, enough efforts are taken to simplify the matters.. with sufficient railings for safety and adequate ladders / ladder patches make this climb easy for begineers / amateurs too 😃..
२. min / max age - well, you must have heard "age is just a number".. that day, सुमेध was 4.4 👶 and आबा 63.9 👴.. and they both don't or neither आई nor वसुधा ply trekking as a hobby..
३. needed endurance - we had not planned any schedule today.. there were no deadlines to follow / checkpoints to confirm if we are doing good / bad.. even after starting from base at 07:00 a.m., one localite on-the-way suggested, अजून लवकर चालू करायला पाहिजे.. I completely agree, but none of us 5 are complaining about anything even now, 24+ hours after returning to home 🏡.. and that is more important / matters the most 🥳..
४. how long it takes - for us, it took 10 hrs to complete the roundtrip this time.. last time / first time, it was about 7 hours.. but in a good case, it must not be a more than 🖐️ 5 hours affair..
५. base village - both instances, we started from बारी.. घोटी कडून येतांना, रस्त्यात एक 'कळसुबाई' म्हणून कमान ⛩️ लागते, जी base village इंदोरेला जाते.. but, we were more looking for an easier option, घाटाच्या पलीकडील बारी..
६. उन्हाचा त्रास - पाणी, मीठ आणि glucose ची कमतरता नसली तर कसलाच त्रास होत नसतो.. many a times, we underestimate our bodily capabilities 💪.. sure, this is in addition to the most important factor, "will power"..

everyone born 🐣 in महाराष्ट्र should trek to its highest peak, and I have my family covered.. ✌️

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...