Tuesday, February 24, 2026

सिंहगड - राजगड - तोरणा २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। 
 
ऐकत नाही पोरं.. आतकरवाडी ते वेल्हे.. तीन तिगाड़ा, काम तगड़ा

सिद्धगड जसा शेवटचा लेख होता, तसाच हा शेवटचा SRT.. जो वादा किया वो.. .. 😜

गतवर्षीच्या SRTच्या articleची सांगता झाली, ती ही.. ह्याला प्रतिसाद जो मिळाला, 'तू ब्लॉग पूर्ण कर ..ट्रेक करतो आम्ही ..' म्हणून यावर्षीचा SRT आणि म्हणून हा लेख 😏.. सुचवल्यानुसार title 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन' न ठेवायचं कारण येईलच लक्षात as we navigate through the text below.. त्याआधी, as always, cricket 🏏..

another excerpt from last year's article is.. सिंहगड streak will soon cross १००० 🎂 आणि मग कुठले आकडे ह्यापुढच्या SRT साठी जमवून आणायचे, हा अभ्यास थोडा अवघड असेल..


३१९, ४१३, ५३८, ६५४, ९३७ नंतर ह्यावेळेस १०२९.. SRT सातवा आहे, मग आकडे सहाच कशे?.. तर पहिला SRT was dedicated to the God of Indian cricket 🇮🇳, SRT himself.. त्यात ह्यावेळेस अभ्यास नाही काही म्हणून लेख लिहायला घेतला तेव्हा आहे त्या आकड्याविषयी एखादा cricket record सापडतो का, हा शोध चालू झाला 🔍.. काय जे सापडलं, ते इथे लिहिण्यापुरतच.. म्हणजे असला काही record मुळात नसतो.. so, समाधानापुरता relevance असा.. 

Test cricket मध्ये सर्वाधिक partnership ६२४ आहे.. त्या Inning मध्ये Jayawardene आणि Sangakkara 🇱🇰 दोघांनी मिळून १०२९ चेंडू खेळले.. partnership साठी नव्हे तर दोघांनी जेव्हडे चेंडू individually खेळून काढले out होण्याआधी त्यांची बेरीज १०२९ 🤦‍♂️.. असले काही records अस्तित्वात नसतात, मान्य.. पण मग, Googleने असले response तरी का द्यावे? 🤔 हे कोणी clarify करण्याची शक्यता / गरज नाही कारण cricketची दुनिया असल्या फालतू statsने भरलेली आहे.. मग ते most centuries in a world cup edition or on a ground 🏟️ असो, किंवा most wickets against a team or in a calendar year 📆.. who cares? why track?.. शेवटी ज्या एकाच गोष्टीने फरक पडतो, ती म्हणजे 'Champions' 🏆 म्हणून कुठल्या संघाचा photo social media वर viral होतो.. असो..

उन्हाळ्याच्या सुरवातीला SRT आणि त्यासाठी लागणारी, होणारी आणि झालेली कुजबुज.. trek राहिला बाजूला, SRT plan करणे, हाच एक वेगळा trek असतो.. तरी म्हणालो होतो गेल्या वर्षीच, SRT बंद म्हणून.. ऐकत नाही पोरं 😬.. उलट म्हणे, we'll prepare better.. कितीही अभ्यास केला तरी परीक्षेत ऐनवेळी माती खाणार, म्हणजे SRT..

ठरलेल्या तारखेला दुसऱ्या groupचा k2s होता.. तो करता यावा म्हणून SRT आठवडाभर ढकलला ⏲️.. १४ला जाणारे आम्ही तिघेच होतो म्हणून सहजासहजी जमलंही.. postpone झाला तरी इतर कोणी येणार असल्याची लक्षणं नव्हती.. म्हणून २१ला सुद्धा आम्ही तिघेच होतो..
 
२१ फेब्रुवारी २०२६ 

pmpmlचा 🚍 बेशिस्तपणा म्हणावा की आमचा बेजबाबदारपणा, आजपर्यंत ह्यांची operating system समजलेली नाही 🤷‍♂️.. अर्धा तास वाट बघून ०५:१५ वाजता फाट्याहून प्रस्थान झाले.. त्यात वाहकाला ३ ticket 🎟️ द्यायला सांगितले, तर म्हणे, 'एकच घ्या, ते चढल्यावर अजून २ देतो'.. राहिलेला पोशाख (sleeves, cap 🧢, bandana वगैरे) परिधान करून साधारण ०५:४५ वाजता, ह्यावेळेस तरी ९च्या आत संपवायचा निर्धार करत आम्ही तंगडतोड सुरु केली..

तीन तिगाड़ा, आतकरवाडी

starting pointला photo काढायचा असतो, हे चुकल्याचं लक्षात येताच groundवर ती संधी साधण्यात आली.. नेहमीपेक्षा आजच्या सिंहगड वारीला ओझं जास्त आणि वारं मोजकं असल्यामुळे 'थोडं थांबावं का?' ही शंका अधून-मधून तिच्या स्वभावानुसार वायफळ प्रयत्न करत होती.. ह्याआधीच्या ६ प्रमाणेच आजचा पहिला टप्पा 'पुणे दरवाजा' १०२९व्यांदा गाठत त्या शंकेचं निरसन करण्यात आलं 😌..

टेहळणी करून येणाऱ्या पर्यटकांना भेदत आम्ही देव टाक्याच्या शेजारून पुढे कल्याण दरवाजा वगळून तुटक्या / फुटक्या बुरुजातून खाली उतरत गडाचा निरोप घेतला 🙋‍♂️.. चोहीकडे बघावं तो अंधार आणि अंधाराच्या सोबतीला वणव्याचा कोळसा.. आभाळामुळे तारेही सुट्टी वर गेले होते.. शुक्ल पक्षाची चतुर्थी आणि कोणाची तरी नज़र लागायला हवी म्हणून काय ती आकाशात चंद्रकोर पिवळ्या पोशाखात चमकत होती 🌜.. तिच्याही सुट्टीची वेळ झाली होती.. तरी थोडावेळ का होईना, आमच्या तीन तिगाड्याला चौथ्याची सोबत असणार होती..

जेवायची जागा ठरलेली असल्याने अधे-मधे कुठेही न थांबता थेट विंझरचा traverse पायाशी घेतला.. ह्या patchची परिस्थिती दिवसेंदिवस गरीब होत चालली आहे.. लवकरच एखाद्या groupने इथे कृपादृष्टी नाही केली तर public SRT करणं कदाचित बंद करेल, आमच्या सारखं तरी.. २ ठिकाणी danger sign म्हणून ribbons 🎀 जोडून / लाऊन सावध करायचा यशस्वी प्रयत्न केल्याचं लक्षात येतं..

पुढे घसर-घसरत ओळख असलेला उतार उतरत ह्यावेळेस नेहमी पेक्षा कमी त्रास झाला - ultra वाल्यांनी इथेही चांगलं काम केल्याचं लक्षात येतं 🤝.. संपता संपत नाही असा हा कंटाळवाणा उतार गेल्या काही वर्षात recordings 🔊 मुळे इतका बोर होत नाही आता.. ग्रामीण style मधे जंगली प्राण्यांना समजेल अशा भाषेत 'आमच्या वाटेला यायचं नाही' सांगायचे निरनिराळे प्रकार इथे ऐकण्यास येतात.. एक झलक,
 
entertainment के लिये कुछ भी करेगा 

वस्ती चालू झाली की वेळ असते कुत्र्यांना 🐶 कामाला लावायची.. ह्यांचा dna 🧬 काही केल्या बदलत नसतो बघा.. अवेळी आणि अनोळखी जरी असलो तरी कुठे तुम्हाला त्रास द्यायला आलो आहे !?.. गप बसा की 🤫.. कशाला शांतता भंग करत noise pollution ना? असो, फितरत (dna)..

राहुल नव्हता म्हणून काय झालं, वैभवला extra डबा 🌯 आणणं भाग आहेच.. thanks buddy 🙏.. मारुतीच्या मंदिरात जेवायला बसण्याआधीच आपणहून गावकऱ्यांनी पाण्याची सोय करून दिली.. एकाने, as expected, 🐆 बिबट्याचा विषय काढला.. आजकाल trending आहे, अगदी तळजाईला येणारे सुद्धा बिबट्याला शांत बसू देत नाहीत तर.. उचक्या घेऊनच किती उचकत असतील बिचारे.. विषय काढल्यामुळे नाही पण पुढे ऊसाचे 🎋 शेत लागतील, म्हणून भीती सतर्कता होतीच.. 

१०:३० 🕥 वाजता निघालो तेच कळलं पुढे रस्त्यावर concrete सांडलंय.. तातडीने दोन मावळे आले alternate वाट दाखवायला.. पुढे शेतात ऊस कापलेला दिसताच नसलेल्या बिबट्याची काय जी होती-नव्हती ती धास्ती ओसरली.. नदी ओलांडून टेकडी पलीकडे उतरलो तेव्हा मेरावणे गावात रात्री १२ - १२:३० दरम्यान मंदिरात एक मस्त कीर्तनाचा / भावगीतांचा कार्यक्रम चालू होता..
 
किती करशील संसार,
नरदेह मातीला जाणार || धृ ||
चांदी सोने पैशाच गाठोड
जाग्यावरी राहणार
नरदेह मातीला जाणार || १ ||
शेतीवाडी, बंगला, माडी
धन दुसऱ्याच होणार
नरदेह मातीला जाणार || २ ||
मायबाप बंधू बहीण
संग कुणी ना येणार
नरदेह मातीला जाणार || ३ ||
जनी म्हणे नरदेह जन्म
पुन्हा नाही मिळणार
नरदेह मातीला जाणार || ४ ||
 
२२ फेब्रुवारी २०२६
 
आपण well ahead of time आहोत लक्षात येताच ९चं target 🎯 आरामात achieve होतांना दिसत होतं.. only if उपरवाला was sufficiently मेहरबान, this was nothing more than a cakewalk (figuratively).. then comes the twist.. if only 🥺..

अभ्यास करूनही पेपर चुकीचा सोडवणारे तेच आम्ही.. आणि, आमची शाखा कुठेही नाही.. तुम्ही जे नेहमी म्हणतात, 'आम्हाला सांगत / विचारत नाही, आम्ही सुद्धा आलो असतो', ते ह्यासाठी.. कुठलाच आनंद किंवा गर्व नाही, फक्त मूर्खपणा आणि नाईलाज 💔..

चला तर, एक गोष्ट सांगतो.. आठवडाभरापूर्वी राहुलने एक Insta reel 🎥 share केली होती (link).. त्याच काळात विशालही जाऊन आला होता आणि त्याच्याकडून वैभव हे जाणून होता.. शिवाय गुरुवारी ⛰️ गडावर नियमित येणारे भगवान दादा भेटले, तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा खात्री करण्यात आली.. माहिती अशी होती की, 'चोर दरवाजा renovation साठी बंद आहे 🔐'.. that's all - गोष्ट संपली.. 

आता गोष्ट ऐकली / वाचली / बघितली तर त्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो, ही प्रथा शाळेतूनच 🚸 अगदी आपल्या dnaत रुळली आहे.. म्हणून, SRT indefinitely postpone करण्यात आला.. but, किंतु, परंतु, गडावर जायला ह्याच sideने गुंजवणे दरवाजा सुद्धा आहे.. आणि, इथे कुठलं renovation?.. थोडंसं diversion घेऊन SRT होऊ शकतो, म्हणून SRT was back on track 😃.. अगदी तिथे पोहचून फजिती नको म्हणून खाली hotelला phone केला तर कळलं, 'गुंजवणे दरवाजा चालू आहे, शिवाय शिवजयंती निमित्त चोर दरवाजाही चालू करण्यात आला आहे'.. आणि, इथे आम्ही खाल्ली माती 🫣..
 
लक्षात आलं असेलच.. ठरवलेला plan b (b for back-up) बाजूला ठेवत आम्ही चोर दरवाज्याच्या वाटेने राजगड चढायला सुरुवात केली ती फक्त बंद दरवाज्याला भेट घालण्यासाठी..

तीन तिगाड़ा, काम बिगाड़ा, चोर दरवाजा

केले प्रयत्न स्वतः उघडायचे, as if बंद करणाऱ्यांनी पुरेपूर काळजी नसेल घेतली, बाहेरून न उघडता यावा, ह्याची.. 🗣️ आवाजही देऊन बघितले, as if सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यासमोर तो टिकणार होता.. आठवला तो वाक्प्रचार आणि आठवली त्यातली कुऱ्हाड 🪓.. lead होता तो सगळा वेळ गमावला आणि आम्ही हातातली match हरायला बसलो होतो.. आता काय? तर back-up का भी back-up..

Fear 👻 is a reaction,
Courage is a decision.
 
फणशी गावातून निघतांना काय जे discussion झालं होतं, त्याप्रमाणे, परिक्रमेच्या वाटेने गुंजवणे दरवाजा गाठायचं ठरलं.. खालून दुसऱ्या टप्प्याहून १ वाजता निघून जे २:१५ दरम्यान गडावर पोहोचणार होतो, त्याला आम्हाला ३:३० झाले 😥.. आणि दोन्ही वाटांमधले अंतर किती?, तर ७०० मी... आकडा मोठा म्हणून अंतर जास्त वाटत असेल तर put differently, फक्त ०.७ कि.मी...

deviation from actual route, 0.32 kms
 
इतका वेळ लागायचं कारण - एक म्हणजे वाट पूर्णपणे तयार नव्हती.. 🌌 रात्रीची वेळ होती म्हणून अंधारात आणि अज्ञानात हे धाडस आम्ही करू शकलो.. नाहीतर माघारी येऊन गुंजवणेला आराम करत सकाळच्या बसची वाट बघण्यापलीकडे पर्याय नव्हता.. तसंच गुंजवणे दरवाजा सुद्धा बंद असता तर हाच pack-up वाला शेवटचा option / plan z असणार होता.. दुसरं असं की मी Asian companyचे shoes 👟 घातले होते.. trekking वाले आहेत म्हणून जाणून CTR घरीच ठेवले होते, तरी पाहिजे तसा confidence नव्हता.. blisters नाही एकही, हा फायदा मात्र झाला 🤗..
  
इथून पुढे खूप नवीन असं खूप काही नाही, म्हणून will थोडक्यात wrap-up..
 
संजीवनी माचीला थोडा आराम, थोडी पेटपूजा करत ५ वाजता जे सुटलो, ते थेट ७:१५ वाजता बुधला माचीच्या पायथ्याशी सापडलो.. वाटेत कचरे काकांकडे विश्रांती न घेता नुसत्या स्वल्पविराम वरच आवरलं..
 
बुधला चढतांना आणि पुढे पुणे जिल्ह्याच्या टोकापर्यंत जी दमछाक होते, त्याला काही गत्यंतर नसतं.. एक तर 🌄 उजाडायची वेळ झालेली असते, त्यात इथली खडी चढाई.. खूप जास्त जरी नसली तरी ३६ कि.मी. नंतर नको वाटते.. कोकण दरवाज्याचं तेवढं एक बरं आहे - लवकर दिसत नाही, पण एकदा दिसायला लागला तर वेल्हे गावात उतरायच्या वाटेत लागणारे कोठी दरवाजा / बिनी दरवाजा इथून काही जास्त लांब नाही.. thanks to recently well built shortcut 👍 from मेंगाई माता मंदिर..

तीन तिगाड़ा, काम तगड़ा, वेल्हे

९:३० 🕤 वाजता वेल्हे गावातल्या तोरणा विहार hotelच्या कदम काकांना ३ थाळी order देऊन recording बंद केलं ⏱️.. शास्त्र असतं ते - वेल्हेत आलो म्हणजे इतरत्र कुठे जायचं नसतं, आणि इथे दुसरं काही खायचं नसतं.. किती जरी वाजत असतील तरी काका अगदी आवर्जून खायला घालतात.. त्यामुळे yes, ९:३० वाजता थाळी 🍱..

तोरणा विहार थाळी
 
पुढचा SRT झालाच आणि ते सुद्धा ९च्या आत तर will definitely be titled 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन'.. time will tell.. तोपर्यंत,

Wake up early..
Do whatever it takes to fix your wallet, body, and mind 😇..

tada 👋

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...