Monday, March 13, 2023

माकड नाळ

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

म्हणजे आम्ही माकडं?.. माकड नाळ.. नादच खुळा

ह्या articleची सुरुवात आपण ह्या आधीच्या १-२ articles मध्ये नमूद केलेल्या काही ओळींनी (excerpts) करणार आहोत..

सर्वात महत्त्वाचे आणि अगळे-वेगळे "इंद्रवज्र" अजून due आहे.. पुन्हा येणार !

"भटक्यांची पंढरी" ओळख असलेल्या हरिश्चंद्रगडावर लिहिलेल्या article मधली ही शेवटची ओळ (read complete article here).. आम्ही काही दिवसांपूर्वी जे Marvel Comics वाल्या original Iron Manच्या Statue of Unityच्या छाती पर्यंत जाऊन आलो, साधारण तसंच ह्यावेळेस गडाच्या माथ्यापर्यंत न जाता, माकड नाळ 🐒, आडराई 🌳 आणि (अर्धा) राजमार्ग 🛣️ अश्या combinationच्या ह्या trekला हरिश्चंद्रगडाचं नाव देणं योग्य नाही वाटलं 🤷‍♂️..

रही बात "इंद्रवज्र" की.. 'काय प्रकार आहे?', तुम्ही जर हा विचार करत असाल, तर थोडक्यात सांगायचं झालं तर, "इंद्रधनुष्य" 🌈 म्हणजे science आणि "इंद्रवज्र" म्हणजे magic 🪄.. ह्याला (शक्यतो) लागतो पावसाळा 🌦️, आणि अर्थातच, सध्या पावसाळा नसल्याने ह्याचाही लांब-लांब पर्यंत काही संबंध नव्हता.. तरी, भर उन्हाळ्यात 🌞 (म्हणून, वर 'शक्यतो' म्हटलंय) जंगली जयगडला जो हा जादू बघायला 🥳 भेटला, त्याबद्दल थोडक्यात माहिती इथे वाचा..

सगळीकडेच science शोधायचं नसतं.. काही ज्या गोष्टींबद्दल आपण गाफील राहिलेलंच बरं 🙈, त्यातली ही एक - इंद्रवज्र.. आणि, एकदा book करून cancel 🚫 झालेला पाचनाई मार्गे साधा सोपा हरिश्चंद्रगड trek अजून बाकी आहे.. पुन्हा येणार!

postpone झाल्यामुळे माकडनाळ साठी थोडी वाट ⌚ बघावी लागेल, मला लिहायला आणि तुम्हाला वाचायला..

ही ओळ आहे, लता मंगेशकर 🎙️ दिवंगत झाल्याच्या दिवशीच्या लेण्याद्री-हटकेश्वर trekवर लिहिल्या "the drone material" article मधली.. detailed article here..

आणि ह्या वाक्याचा sequel म्हणून, वर्षभर वाट बघायचा कार्यक्रम संपवत, श्रीगणेशा करूया / होत आहे ह्या articleचा 🏁..

सीतेचं डोंगर, शेंडी सुळका

SG Trekkers सोबतचा हा पहिलाच technical trek 🧗‍♂️.. अंदाजे (imperial) ७०-८० फूट किंवा (metric) २०-२५ मीटर patch साठी दोर 🪢 लागेल, असा हा "surprise trek".. surpise कसा / का? तर, "something" they have recently introduced - as a substitute to "TTMM" 😏..
दुपारपर्यंत सावली ⛱️, नळीच्या वाटेहून किंचितसा छोटा आणि steep, शेंडी सुळक्याला summit - ह्याच्या अजून काही ओळखी..

११ मार्च २०२३

schedule अगोदर जसा क्वचितच project deliver होतो, असाच आजच्या travellingचा प्रसंग म्हणजे driver काकांनी आम्हाला ३:३० 🕞 वाजताच base village वाल्हीवळे गावात पोहचवलं.. नाश्त्याची सोय / वेळ होईपर्यंत तोडकी-मोडकी झोप 🥱 पूर्ण करत, वेळ होती आजूबाजूला दिसणाऱ्या गडांची नावं ओळखण्याची / ठेवण्याची.. तारामतीचा guess बरोबर नसावा 🤔, हे लगेच रामदासने (guide) confirm केलं ✅.. त्यात कोकणकड्या वरचा अंधाराचा पडदा जो हळू-हळू बाजूला सरकत त्याची ओळख पटवून देत होता - क्या कहना !! 😍 always a treat to watch..

कोकणकडा 😍

ह्या वाटेचा सुरुवातीचा काही भाग, नळीची वाट आणि ह्यातला common part.. साहजिकच, ४ वर्षांगोदरच्या (जानेवारी २०१९) आठवणी जाग्या झाल्या 🙃.. थोडं पुढे घराबाहेर एका आजीने गोळा केलेले काही फुलं दिसले.. दारू 🍷 बनवतात, असं कळलं, मोहाची फुलं.. अजून पुढे गेल्यावर एक काका हेच वेचत असतांनाही दिसले.. बरीच काही (typical) process सांगीतली (०७:०० 🕖) दारू बनवण्याची, पण ह्या article साठी नाही..

मार्च असल्यामुळे पाण्याचा एक थेंब नाही वाटेत.. म्हणजे, १. आम्ही आज सह्याद्रीची चव मुकणार होतो 😞, आणि २. गेल्या वर्षीची घोडेपण्याची नाळ बरी होती ☺️.. सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी कमीत-कमी ४ लिटर पाणी आणले होतेच, त्यात अजून काहींच्या ओझ्यात विशालने भर घातली कलिंगडाची 🍉.. total ४ - चिरलेले नव्हे, अख्खे - नादच खुळा 😋..

नेहमीप्रमाणे एक loyal soul, म्हणजे भू-भू 🐕, आमच्या सोबत.. नाळ म्हणजे रस्त्यात छोटे-मोठे boulders (धोंडे) असणारच, आणि वर छोटासा का होईना technical patch आहे म्हणून, हा प्रामाणिकपणा जास्त वेळ टिकणार नाही, हे स्पष्ट होतं 😐.. माकड नाळेच्या वाटेला right turn ➡️ घेतला, नळीची वाट डावीकडे ठेवून आणि सगळे क्षणभर विसावलो (०७:३० 🕢)..

कोकणकडा again, and the loyal soul, credits: वैभव

आमच्या just पुढे १० जणांचा मुंबईचा एक group गेला आहे, हे पोहे खातांनाच आम्हाला कळलं होतं.. technical patch चढायला त्यांना साधारण तासभर तरी लागेल, ह्या हिशोबाने आमचा speed, जरा कमीच होता.. (आधी सांगितल्याप्रमाणे) वाटेत सावली असल्यामुळे थकवा relatively कमी जाणवत होता 😌.. नाहीतर, पाठीमागे (पाठीच्या मागे) नळीची वाट चाढणाऱ्यांची जी फजिती झाली असेल, त्यांना आम्ही फक्त sympathyच देऊ शकत होतो..

(center) नळीची वाट

आधीच्या (मुंबईच्या) groupची climbing सुरू होत नाही तर आम्ही त्यांच्या सोबतीला होतो (०९:०० 🕘).. आराम आणि पेटपुजा करायला भरपूर वेळ भेटल्याची संधी साधत, पराठे, cup cake 🧁, काकडी 🥒, संत्रे 🍊 etc. etc. सोबत, नादच खुळा 😋 "कलिंगड" बाहेर काढण्यात आले.. bagचं 🎒 वजन पोटात transfer करत आम्ही वाट बघत होतो, 'अपना time आयेगा' ची..

समोर दिसणाऱ्या नळीची वाटेचं रौद्र रूप बघत काही doubts तरी भेट देऊन गेलेच.. आपण चढलो तेव्हा सुद्धा इतकीच steep होती का?.. इथून बघून तरी वाटतंय की चढायला नाही जमणार 🧐.. आणि ह्या doubtsना सोबत होती एका proud feelingची 👻.. आता, आज काय चढतोय, हे एका frame मध्ये बसवायला परत नळीची वाट trek करावा लागेल कधीतरी, कारण back in the time 🕰️, आजचा trek technical असल्यामुळे 'इथेही येऊ', हा विचार मुळीच केला नव्हता 😒 / इतक्या आपुलकीने न्याहाळलाही नव्हता..

माकड नाळ 🐵 - नाळ म्हणजे पाण्याची वाट, हे आपण जाणतोच.. "माकड" - हे नाव ठेवायचं कारण, सगळेच आप-आपल्या परीने guess करत होतो.. त्यात, माकडं भरपूर असतील, किंवा माकडांनी ये-जा करायची वाट असेल, हे guess साफ चुकीचे ठरले 😬.. तर, कोणी म्हणे माकडासारखे 🙉 आपण चार पायांनी चढतोय म्हणून म्हणत असतील.. boulders किंवा / आणि rockpatch 🧗 असल्यावर ह्याला पर्याय नसतो.. पण मग, by this logic, सर्वच नाळींना 'माकड नाळ' 🙊 म्हंटलं पाहिजे, हो की नाही?.. असो..

the safe climbing, credits: वैभव

प्रत्येक trekला भेटतंच कोणीतरी, तसेच आजच्या trekला ही होते काही धुरंधर, ज्यांना 'माकड आपले पूर्वज आहेत' असं वाटत होतं / अजूनही वाटत असेलच 🤦.. not my problem, पण ह्यांनी स्वतःवर कृपा करून Darwin's Theory पुन्हा एकदा वाचायला हवी.. किंवा 'Sapiens' पुस्तकाची 📖 काही पाने नक्कीच चाळायला हवी.. म्हणजे, गोष्टी गृहीत धरून अज्ञान पसरवण्यापेक्षा सुजाण होऊन गप बसलेलं 🤐 कधीही बरं.. again, असो..

trek चालू करायच्या आधीपासूनच जी रुखरुख होती 'शेजारी 👉 रोहिदासला पण जाऊन येऊ' ची, सर्वात आधी (११:०० 🕚) चढून गेल्यावर ती सुद्धा पूर्ण करायचा (फक्त) प्रयत्न करण्यात आला.. 'खूप वेळ लागेल', लक्षात घेत / येत 😓 थोड्यातूनच माघारी येत प्रयत्न वायफळ होत, वेळ झाली होती आजच्या trekच्या summitची 😎.. ज्यांच्या लक्षात नसेल आलं, त्यांच्यासाठी - summit म्हणजे trek मधला उच्चांक, जिथून एक तर आपण परत येतो किंवा पास 🏔️ करत दुसऱ्या बाजूला उतरतो.. हा नेहमीच top of the mountain ⛰️ असायला पाहिजे, हे जरुरी नसतं.. पण मग, by this logic, 'plus valley सारख्या trek मध्ये summit कशाला म्हणावं?', हा doubt 🤨 यायलाच हवा, की नाही?.. ह्याचा एक अर्थ असाही होतो का, की प्रत्येक trekला summit असेलच, असं नाही?..

नळीची वाट चढतांना एक सुळका जो करंगळीच्या नखापेक्षा 🤏 छोटा दिसतो, त्याची actual size इथे जवळून बघत / अनुभवत निसर्गाची किमया लक्षात येते 😯 - शेंडी सुळका.. leaning tower of Pisa 🇮🇹 सारखा ह्याचा सुद्धा एका sideला कल.. "आत्ता पडेल असं वाटतं", हे बऱ्याच लोकांचे उद्गार 😌.. सोबत सीतेचा डोंगर, नळीची वाट आणि मागच्या बाजूस भोजगिरी, सिंदोळा, निमगिरी-हनुमंतगड, वेताळ, तेली सुळके, उधळ्या, घोण्या सोबत हटकेश्वर आणि रोहिदास असल्यावर photosession 📸 संपता संपत नव्हतं.. बरं, confusion नको म्हणून, 'रोहिदास' म्हणजे हरिश्चंद्रगड शेजारचा गड / शिखर आणि 'रामदास' म्हणजे आजचा guide..

शेंडी सुळका again - the summit, credits: वैभव

सर्व आल्यावर अजून एकदा डबे आणि plasticचे पुडे काढण्यात आणि उघडण्यात / फोडण्यात आले.. trek करायचा चिमुटभर 🤌 आणि खायचं मूठभर ✊, म्हणजे, ह्या बाबतीत ताळमेळ नसलेला अजून एक trek आता उत्तरार्धात शिरत होता.. निघतांना (०१:३० 🕜) ५-५ चे २ group झाले.. रामदास (guide) सोबत आम्ही traverseवर धावत सुटलो 🏃‍♂️.. आडराई अजून लांब होतं आणि ऊन 🔆 आता बोचत होतं.. ह्यात रोहिदास (गड / शिखर), त्याच्या शेजारचा नाव माहीत नसलेला सुळका, नेढं 🪡, ह्या सर्वांचे क्षणा-क्षणाला बदलणारे रूप was new / next attraction..

(center top) नेढं

तासाभराने आडराई लागलं आणि भेटले मुंबईकर.. त्यांना आणि उरभर सावली बघत आम्हीही अजून एकदा bags टाकल्या आणि लोळलो 😌.. थोडा दम खाऊन झाल्यावर निघत जेव्हा descendला, म्हणजे जुन्नर दरवाजाहून येणाऱ्या राजमार्गला (highway kind-off) लागलो, तेव्हा परत शेवटचे टेकलो (०३:३० 🕞) 🧘‍♂️.. निघत नाही तर वैभवला चष्मा 👓 राहिल्याचा भास 😜 झाला.. गेला माघारी आणि आला परत, त्याच पावलांनी 😃..


सगळं उतरून झाल्यावर जेव्हा रामदासने दूरवर खिरेश्वरचं मंदिर दाखवलं, सर्वांनी तिथूनच नमस्कार 🙏 करत आप-आपल्या smartphone 📱 मध्ये सकाळपासून चालू असलेले recording बंद केले (०४:०० 🕓).. उर्वरीत ५ आल्यावर वेळ होती डुंबण्याची 🏊‍♂️, स्थळ: पिंपळगाव जोगा धरण 🏝️..

कारकाई and its reflection in पिंपळगाव जोगा धरण

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...