।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
कोकणकडा fame - हरिश्चंद्रगड
ह्या गडाबद्दल बाहूतेकच एखाद्या गडप्रेमीने ऐकलं / वाचलं नसेल.. नळीची वाट, कोकणकडा असो वा तोलार खिंड.. (किल्ले वगळता) महाराष्ट्रातील दुसरं उच्च तारामती शिखर असो वा इंद्रवज्र..
२३ जून २०१८.. तोलार खिंड
पावसाळा थोडा रिमझिम mode मधेच चालू होता आणि महेशने विचारलं, हरिश्चंद्रगड चलतो का?
एव्हाना सिंहगड व्यतरिक्त इतर कुठे तसे फार trek केले नव्हते.. हो, पहिला Himalayan book केला होता पण practice साठी कोंढाणा पुरेसा होता..
पावसाळ्यात trek करायचा म्हणजे नावडता चिखल, पण तोलार खिंड मार्गे चढायच्या संधीने बाजी मारली.. (अर्ध्या) रात्रीचा प्रवास करून आम्ही ०३:०० पर्यंत hotel Akshay ला पोहोचलो.. चटई, चादर, blanket ची सोय बघून एखाद्या manager ने overachieved 😇 ची rating द्यावी अशी गय झाली होती..
पहाटे / सकाळी नाश्ता 🍛 झाला आणि hotel मालकाच्याच भाच्याला (रोहिदास) guide म्हणून सोबत घेऊन आम्ही सुरुवात केली.. तोलार खिंड चढून झाल्यावर वेळ होती railing धरून २ rockpatch चढायची.. ह्या वाटेला अवघड म्हणतात, ते ह्याच प्रकारामुळे..
एका मराठी picture ची shooting 🎬 चालू असल्याने केदारेश्वरला जे जायला नाही भेटलं ते तारामती हून परत आल्यावर जायचं ठरलं.. वर जाऊन येऊ तोवर जेवण पण तयार करून ठेवतील म्हणत रोहिदास आम्हाला कळसुबाई नंतरच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन गेला.. ढगांवरुन ढग ☁️ बघण्याचा अनुभव फक्त विमानातूनच ✈️ नाही..
जेवण झालं आणि केदारेश्वर विसरून सगळे कोकणकड्याच्या दिशेने.. आणि धुकं, आणि अजून धुकं.. भर दुपारी आम्हाला कड्याचा तिळमात्र view नाही.. एखादी हल्की वस्तू फेकली 🌿 तर उडत परत येते 🍃, हा खेळ थोडा वेळ चालला.. आजच्या बऱ्याच छोट्या-मोठ्या achievements मधली ही एक..
चढलो ते rockpatch व्यवस्थित उतरतील का सगळे? पावसाने घसरडा वाढला असेल? लोकेश आणि नवदीपचा पाय पण दुखतोय.. पाचनाईला उतरु, गाडी बोलवून घेऊ, पण phone ला range नाही 📵, driver ला सांगणार कसं? रोहिदास एकटा उतरून driver ला सांगेल गाडी घेऊन यायला, जमण्यासारखं आहे का? सगळा विचार करत ठरलं - सूरज ☀️ आणि मी, guide बरोबर खिरेश्वरला उतरु आणि गाडी घेऊन पाचनाईला येऊ.. समध्या डोंगराला वळसा घालून ७० किमी. चा फेरा आणि परतीला तोच.. ९ पर्यंत जे घरी पोहोचलो असतो, तिथे वाजले होते ३ 😞
बरं, आम्ही सोबत एक दोर पण घेतला होता.. गरज नव्हतीच, पण पडली जरी असती तरी वापरायचा कसा, ह्याची माहिती कोणाला होती?
नळीची वाट, कोकणकडा, केदारेश्वर अजून due आहे.. पुन्हा येणार !
१३ जानेवारी २०१९.. नळीची वाट
ह्या हिवाळ्यात साधारण प्रत्येक weekend ला todo list मधला एक-एक गड कमी होत गेला होता.. थोडे अवघड trek करायला आता हरकत नाही, असा confidence आला होता.. त्यात नळीची वाट बद्दल खूप ऐकलं होतं.. आणि नोव्हेंबर मध्ये cancel करावा लागल्यामुळे तर अजुनच excitement वाढली होती..
same story.. (अर्ध्या) रात्रीचा प्रवास, थोडी झोप, पहाटे नाश्ता आणि left-right.. फरक होता तो location चा.. introduction / instruction round मध्ये कळलं की एकाचं YouTube channel 📡 आहे आणि तो आजच्या trek चा video बनवणार होता.. link 🔗 दिली आहे खाली..
तांबडं फुटायचा उशीर आणि समोर दिसतो कोकणकडा.. अवाक होऊन अगदी तसंच काही, जसं विराट कोहली MoM घेतांना Adelaide बद्दल म्हणतो "I want to wrap up this ground and take it home"..
रस्त्यात सगळ्या shapes and sizes चे boulders.. हर्षदच्या मागे चालत असलेल्या मुलीला ईजा झाल्यामुळे trek तासभर रखडला.. एका ठिकाणी बसून, वाट बघत गप्पा रंगल्या आणि त्याहून जास्त रंगली ती शिवगर्जना 🚩.. सगळं प्रकरण सुरळीत होईपर्यंत आम्ही कोकणकड्याला पोहोचलो होतो.. नंतर कळलं की तिच्याबरोबर 🙍 अजून ३ जण तिथूनच / खालूनच परत गेले होते..
नळीची वाट चढून आल्याचं समाधान, पुढे सुद्धा असे treks करायला हरकत नसल्याची मानसिक तयारी करवून देत होतं..
सगळ्या leaders ला मागे सोडून आलो होतो, म्हणून जेवायची सोय कुठे केली आहे, कळायला मार्ग फक्त एकच - प्रत्येक झोपडीत ⛺ जाऊन विचारायचं.. जेऊन झाल्यावर आप-आपली चटई आणून सगळ्यांची थोडी डुलकी.. leaders आल्यावर आम्ही परत थोडं पुढे निघून आलो..
मागच्या वेळेस राहिलेल्या केदारेश्वरचे दर्शन घेतले.. एकाच खांबावर टिकलेल्या ह्या गुहेबद्दल म्हणतात की हा पडेल त्यादिवशी दुनिया 🗺️ बुडेल.. काळजी नसावी, मजबूत आणि भक्कम आहे..
पुढे, तोलार खिंड मार्गे उतरून खिरेश्वर.. रात्री चहा ☕ साठी थांबलो होतो, तिथे आता वडापाव 🍔 ची सोय होती..
ह्या trek ची YouTube link.
सर्वात महत्त्वाचे आणि अगळे-वेगळे "इंद्रवज्र" अजून due आहे.. पुन्हा येणार !
Very well written, Sushil! Keep trekking.. Keep writing!
ReplyDeleteThank you Aniket.
DeleteWell done...
ReplyDeleteThank You 🙏
Delete