Sunday, April 26, 2020

सिंहगड ते विंझर

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

सिंहगड ते विंझर.. एक होता विंचू आणि एक होता नाग

नुकताच भर दिवसा 🌞 🏜️ केलेल्या तोरणा ते राजगड range trek ने उन्हाळ्यात शक्यतो trek टाळावे हे खूप चांगलच शिकवलं होतं.. पण ह्याच trek ने "सिंहगड ते राजगड पण कधीतरी करायला हवा" ह्या इच्छेला 🤨 चिंगारी दिल्यागत झालं.. माहिती गोळा करायला सुरुवात झाली आणि लक्षात आलं की अंतर जरा जास्त आहे, त्यात शेवटचे ८-१० किमी. डांबरी रस्ता.. आता trek करतांना इतकं डांबरी रस्त्यावरून चालायचं हे जरा नवीनच / अजिबच होईल आणि अजून काही करता येईल का? ह्या विचाराला चालना मिळाली..

तर ठरलं असं की trek डांबरी रस्त्यापर्यंतच करायचा.. कोणाला उन्हाचा त्रास नको आणि परतीला पण योग्य अशी 🚙 सोय झाली पाहिजे म्हणून वेळ ठरली रात्रीची 🌃.. but this distance was now a little less for a night trek.. after adding couple of nearby spots, the plan was finalized..

०६ एप्रिल २०१९

धायरी फाट्याला मी, हर्षद आणि सुजीत रात्री 🕙 १० ला सिंहगडचा board असणाऱ्या bus 🚌 मध्ये चढलो.. नांदेड city हून वैभव आणि विजय बसणार होते.. आतकरवाडीला उतरणारे आम्ही फक्त पाच जण होतो.. ११:३० वाजता सिंहगड parking ला पोहोचून थोडी rest घेत पुढे 🥔 potato point la निघालो, अंदाजे २ किमी. अंतरावर असेल.. आणि वाटेत दिसला एक विंचू 🦂.. कदाचित हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग असावा.. 😇

credits: Vaibhav

ह्या टेकडीला (actually टेकडी हा शब्द मोठा आहे) एका पसरट cone सारखा आकार आणि सगळ्या बाजूने खोल दरी असल्यामुळे वारा भरपूर असतो.. वरती बटाट्याच्या गोल-मटोल आकाराचा साधारण १५ फुटी दगड आहे, ज्याच्यावर एक छानसं शिवलिंग कोरलेलं आहे आणि बाजूला लहानसा नंदी 🐂 पण ठेवलेला आहे.. उन्हाळा असूून वाऱ्यातला गारवा जास्त वाटत होता आणि थोड्या वेळाने आम्ही परत सिंहगडच्या दिशेने वाटचाल केली.. विंचू नंतर आता वाटेत आम्हाला दिसला नाग 🐍..

"सगळंच आज नको, अजून भरपूर trek करायचे आहेत" 😉 म्हणत पुढे पुणे दरवाजाला break घेत, घरून आणलेल्या half dinner 🌯 वर ताव मारून झाल्यावर वेळ होती सिंहगडाच्या wind point ला जायची.. काही public इथे झोपलं 😴 होतं, त्यांना त्रास नको, म्हणून लागलीच u turn घेऊन आम्ही पोहचलो कल्याण दरवाज्याला.. रात्र भरून काढण्यासाठीचे इतर दोन्ही points आता आटोपले होते..

वाजले होते ०२:३० आणि mini break घेऊन आता वेळ होती ridge follow करत final destination विंझरच्या दिशेने वाट शोधायची.. हे काम सुरुवातीला अवघड नव्हतं, ठिकठिकाणी arrows 🎯 बनवलेले आहेत आणि काही ठिकाणी SRT च्या खुणा सुद्धा..

शेवटच्या डोंगराला वळसा घालून डावीकडे उतरायचं होतं.. अरुंद आणि घसरड्या वाटेमुळे हा traverse थोडा अवघड आहे.. डोंगराच्या डावीकडे उतरायला काही रस्ता दिसत नव्हता आणि सरळ जाणारा रस्ता पाबे घाटाला जातो, म्हणून चुकीचा आहे, हे लक्षात आलं होतो.. तरी थोडं पुढे जाऊन बघू असं ठरलं.. हव्या त्या दिशेला असलेल्या एका arrow ⬅️ ने आमची भीती घालवली..

आता बाकी होता तो फक्त descend.. आणि इथला हा प्रकार आजचा सगळ्यात कठीण असलेला प्रकार होता.. फक्त slope, माती आणि अती बारीक दगडी.. support ला ना गवत, झाडी, ना sizeable दगडं.. घसरुन पडायच्या भीतीने अती दक्षता घेत, हळू-हळू खाली उतरुन झाल्यावर शेवटच्या water break साठी थांबलो.. उतरुन झालं होतं पण विंझरला अजून अवकाश होता.. हा शेवटचा patch साधारण २.५ - ३ किमी. असला पाहिजे.. चालायचा कंटाळा येत होता पण अगदी समोरच्या दिशेला राजगड छोट्याचा मोठा होतांना दिसत होता आणि हर क्षणी फक्त एकच विचार मनात येत होता, "plan तर सिंहगड ते राजगड चाच बनवायला पाहिजे होता".. असो, there is always a next time..

दिवस उजाडायला 🌄 आणि आम्ही रस्त्याला पोहोचायला वेळ एकच.. कसलीही वाट न बघता, एका मागे एक गाड्या भेटत गेल्या आणि पहिल्यांदाच रामभरोसे सोडलेलं transport चं option सफल ठरलं.. 🎉

credits: Sujeet

No comments:

Post a Comment

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...