।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
explore mode on.. माथेरान (Garbett Point)
आज सकाळी mobile (आजकाल ज्याला आपण smartphone 📱 सुद्धा म्हणतो) हाती घेतला आणि Google Photos 🖼️ चं notification "Rediscover this day".. Open करून बघितलं तर फोटोत डावीकडे होता एक railway track (toy train चा) आणि उजवीकडे होतं माथेरानचं डोंगर आणि जंगल..
ह्या trek बद्दल लेख लिहायचा होताच, आणि हा योगायोग..
१९ एप्रिल २०१९
It is April and so was exactly an year ago 😂.. उन्हाळा खूप आहे, म्हणून दिवसा trek नको.. शिवाय पौर्णिमेनिमित्त आसपासच्या weekend ला केलेल्या काही night treks मुळे, हे नवीन वेड लागलं होतं.. पण night trekचा विषय काढला की public अशी कारणं देते की विचारु नका.. तरी वेळ ठरली full moon (Good) Friday night, आणि साधारण ४ तास लागतात असा trek शोधत-शोधत सापडला तो Garbett Point..
गेल्या काही दिवसातच ओळख झालेल्या विजय (दीनानाथ चौहान नाही ओ) सोबत ४-५ trek झाले होते आणि त्यातले २ रात्रीचे होते म्हणून ते येतील ह्याची खात्री होती.. पण बाकी कोणी तयार होत नाही म्हणून नाईलाज झाला.. शुक्रवारचा दिवस उजाडला आणि cancel झाल्यामुळे बहुतेक विजयला काही करमलं नसावं, तर त्यांनी त्यांच्या २ मित्रांना तयार केलं (दोघांनाही trekking ची सवय नव्हती 😔) आणि दुपारी मला message केला, आपण आज रात्री ठरल्याप्रमाणे निघू.. म्हंटलं, ok..
Half dinner करुन आणि other half बरोबर घेऊन मी घरुन निघालो. विजयच्या घरी गाडी लावली आणि ९ वाजता आम्ही शुभारंभ केला.. ११:३० ला आम्ही भिवपुरी road railway station ला गाडी 🚗 लावायची जागा असेल, ह्या हिशोबाने मध्ये शिरलो, पण station ची समृद्धी munna bhai मधल्या "भाई, ये तो शुरू होते ही खतम हो गया" dialogue इतकीच होती 😛.. बाहेर एकाला विचारलं आणि त्याने सांगितल्याप्रमाणे, त्याच्या घरी गाडी लावत आम्ही चालायला सुरुवात केली.. घराबाहेर मोकळ्या हवेत 🛌 झोपायची तयारी करणाऱ्या खाटावर बसलेल्या ताईने विचारलं.. कुठे?.. Garbett Point.. इथून रस्ता नाही आणि पुढे फक्त धरण 🏝️ आहे.. आम्हाला फक्त त्या टाकीपर्यंत कसं जायचं तेवढं सांगा.. तिथून जाता येईल तुम्हाला पण काळजी घ्या, भावासारखे आहात म्हणून सांगते..
एवढ्यात लक्षात आलं असेलच, रस्ता आमच्यापैकी कोणालाच माहिती नव्हता.. नेहमीप्रमाणे Google maps के भरोसे होती आमची यात्रा.. "टाकीपासून धोम धरणाच्या दिशेने आणि पुढे धरणाच्या डावीकडून पलीकडे जायला जी दिसेल ती पायवाट" असा होता आजचा plan.. पाणी आटल्यामुळे आम्ही धरणाला पूर्ण वळसा न घालता shortcuts घेत चालत होतो. त्याक्षणी Google Maps 'satellite mode' मध्ये बघितल्यावर आपण पाण्यावरुन चालतोय, असं दाखवत होता.. that was अगदी "dude! 😎" वाली feeling.. Google maps वरचा trail आज योग्य तसा साथ देत नव्हता.. पण रस्त्यात ३-४ गावं लागतात आणि शेवटच्या गावापासून चढाई आहे, अशी blogs वाचल्याप्रमाणे आमची hiking व्यवस्थित चालू होती..
८-१० घरं 🏘️ असलेले ३ गाव ओलांडून एक पायवाट आम्हाला traverse करत डोंगर चढायच्या रस्त्यापर्यंत घेऊन गेली.. समोर दिसत होता चढ, आणि चढ चांगलाच होता.. काही वेळातच trekkingची सवय नसल्याने सोमनाथचा history असलेला पाय दुखायला लागला, पण दुखापत इतकी गंभीर नव्हती आणि return यायची तशी वेळ काही आली नाही.. सावकाश पुढे चालत राहिलो आणि अर्ध्यावर चढून होत नाही तर तीच वाट समोर एका घनदाट जंगलात घेऊन जाते आहे, असं आमच्या लक्षात आलं.. ०२:३० वाजता जंगल नको म्हणत डावीकडे दिसणारा traverse घ्यायचं ठरलं..
कर्जतहून येणारी वाट लागल्यावर 'आता थोडंच राहिलं आहे' म्हणत अर्धा तास break घेतला असावा.. घरून आणलेल्या डब्यावर 🌯 ताव मारत, कुत्र्यांना biscuits 🍪 खाऊ घालत, चैतन्यला सुचत असलेल्या सरळ-सोप्प्या विषयांवर गप्पा मारत आणि गार वाऱ्याचा आनंद घेत आम्ही हा break वसूल केला.. वाऱ्यामुळे finally, humidity कमी झाल्यासारखी वाटत होती..
शेवटचा पल्ला चढत आम्ही ०४:०० वाजता Garbett Pointला पोहोचलो असू.. being at this top, feels "nothing less than heaven".. परतीची सोय, आलो त्या रस्त्याने नसून, माथेरान पासून busने यायची होती. पण bus stop ला जायला जंगलातून तेवढा एकच रस्ता दिसत होता.. आता उजाडेल 🌄 तेव्हा निघू म्हणत it was time for another round of more वारा, few गप्पा आणि little snacks 🍿.. विजयला मात्र डुलकी लागली होती..
दूरवर धूसर धोम धरण दिसत होते. आपण तिथून सुरुवात केली, ह्या proud moment वर विश्वास बसत नव्हता.. कर्जतहून येणाऱ्या एका group सोबत torchlight 🔦 चा खेळ सुद्धा थोडा वेळ चालला.. रात्रीच्या / पहाटेच्या अंधारात flash मारत, येतील तशे photo काढले / काढायचे प्रयत्न केले..
आज अजून एक जी वेगळी गोष्ट बघितली, ती होती twinkling lights.. खाली, डोंगराच्या दुसऱ्या sideला असलेल्या घरांना चालू बंद होणारे light 💡 होते, अगदी ताऱ्यांसारखे.. no, it was definitely neither because of wind or particles nor those were stars..
थोडं उजाडायला लागल्यावर आम्ही निघालो.. jungle walk till माथेरान entrance was one calming experience.. photo session जे अजून करता आले नव्हते, ते झाले आणि ०६:३० च्या bus 🚌 ने नागमोडी घाट उतरत भिवपुरी road railway station.. परतीला वेळ होती चौकला (चौक हे गावाचं नाव आहे) नाश्ता करायची, at hotel Purva..
असा काही होता आमचा cancel झालेला super-duper trek..



No comments:
Post a Comment