Sunday, April 12, 2020

सिंहगड - राजगड - तोरणा २०२०

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

SRT.. Sachin Ramesh Tendulkar नव्हे

execution to perfection
हा अनुभव share करायचा म्हणजे शिस्त ठेऊन time-table कसा follow करायचा, याचा आढावा..

काही दिवसांपासून SRT ची इच्छा घर करून बसली होती.. १-२ वेळेस plan तयार करून पण काही योग्य तशी मानसिक तयारी नसल्यामुळे execute होत नव्हता.. त्यात एकदा सिंहगडला जातांना गायकवाड काकांना lift दिली, तेव्हा त्यांनी त्यांचा SRT चा किस्सा सांगितला होता.. ऐकून असं लक्षात आलं की अवघड तर नक्कीच नाही, आणि मनात असलेल्या भीतीची मर्यादा फक्त कल्पनेपूर्तीच..

मग नुकतीच ओळख झालेल्या एका मजलेल्या trekker मित्राने विचारले, आम्ही २ दिवसात "कात्रज ते रायगड" करणार आहोत.. तुला जमणार असेल तर चल आमच्या बरोबर SRT.. त्याने सांगीतलेल्या rough plan नुसार काही कात्रजहून, तर काही सिंहगडहून trek सुरु करणार होते आणि काहींचा "वेल्हे ते रायगड" असा इरादा होता.. stay होता भट्टीला (वेल्हे पासून ५ कि.मी.).. SRT चा trek करुन मला (तोरणा base village) वेल्हेला पोहोचायला संध्याकाळ होणार होती.. "परत घरी कसा येशील?" ह्याचा विचार करत, हो-नाही करत, "ही संधी पुन्हा नाही" म्हणत time-table बनला.. अर्थातच, तिन्ही पैकी कुठलाच किल्ला बघायची त्यात सोय नव्हती.. एकदा फक्त आपले shoes कितपत साथ देऊ शकतील, हे बघण्यासाठी तळजाईला २५ किमी. भरतील अशे rounds मारले आणि "तुमसे ना हो पायेगा" करत नवीन shoes 👟 घ्यायची संधी..

२२ फेब्रुवारी २०२०

राहुलचा मित्र आम्हाला (अजून एक राहुल, गुणवंत आणि मी), चौघांना, घरुन pick-up करुन, starting point ला drop करणार होता आणि आमच्यासोबत सिंहगड चढून, परत माघारी येणार होता.. पहाटे ५:१५ ला आम्ही (सिंहगड base village) आतकरवाडीहून सिंहगड चढायला सुरुवात केली.. time check: १५ मिनिट late..

पहाटेचा पुसट अंधार हळू-हळू फुटत असलेल्या तांबड्यामागे लपायला लागला होता.. आम्ही तासाभरात पुणे दरवाजा गाठला.. २ मिनिट water break घेऊन कल्याण दरवाजा हून उतरून, "non-stop विंझर" पुढचं target होतं.. ठिकठिकाणी SRT chya खुणा असल्यामुळे ही वाट तशी भटकण्यासारखी नाही. पण शेवटच्या डोंगराचा अवघड traverse अरुंद असल्यामुळे थोडा cautiouslyच.. डावीकडे (विंझरच्या दिशेने) उतरायची वाट खूप घसरडी आहे.. फक्त slope, माती आणि अती बारीक दगडी.. support ला ना गवत, झाडी, ना sizeable दगडं. घसरुन पडायच्या भीतीने अती दक्षता घेत, नंतरचे ३-४ कि.मी. पायी, अशे आम्ही ८:४५ ला विंझरला पोहोचलो.. time check: १५ मिनिट लवकर..

कुठे नाश्ता भेटेल का? थोडी विचारपूस केली, चहा-पोहे झाले आणि पुढे गुंजवणे जायला मधून रस्ता शोधत-शोधत adventure करायचे ठरले.. अंतर कमी करायच्या नादात, गांववालोने सांगितल्या प्रमाणे कदाचित न जाता, एखादा turn चुकलो असू आणि आता पुढे कुठे? असे कितीतरी वेळेस आम्हाला प्रश्न पडायला लागले.. बरं, मध्ये एक नदी पण आहे म्हणून फक्त गुंजवणेच्या दिशेने चालायचा पर्याय नव्हता.. शेवटी एक बंधारा दिसला आणि तो पार करत, नको तो 😔 डांबरी रस्ता follow करत, ११:१५ ला गुंजवणे गाठले.. time check: ४५ मिनिट लवकर..

जरी काही अंतर वाचले नसले, we were very lucky to not have lost it by significant time.. आधीच जेवायला 🍱 सांगून ठेवलं होतं म्हणून १२ ला राजगड चढायला सुरुवात करू शकलो.. time check: ६० मिनिट लवकर..

सिंहगड किंवा इतर trek साधारण सकाळी सकाळीच करत असल्याने, माझा, भर ऊन्हात 🌞 trek करण्याचा हा rare instance.. थोडा speed कमी पडत होता पण तासभर पुढे आहोत ह्या विचाराने तशी घाई करावी असं काही वाटत नव्हतं / ताकत नव्हती.. १:३० वाजता चोर दरवाजा, क्षणभर विश्रांती आणि २:१५ ला engineering perfection संजीवनी माची हून उतरायला सुरुवात केली.. time check: १५ मिनिट लवकर..

पुढचा plan aggressive होता आणि थोडी बढत असल्याचा दिलासा.. इथला उतार सुद्धा तसाच (relatively सोप्पा) आणि सावकाश उतरणे, हा एकच पर्याय. भुतोंडे घाटाच्या पुढे थोडंफार जंगल असल्याने ऊन जाणवत नाही, पण तोरणा ची side खूपच उजाड आहे. तरी non-stop तंगडतोड करत, ५:१५ ला बुधला माची पर्यंत पोहोचलो.. famous rockpatch आणि शिडी चढून एका वेगळ्याच समाधानाशी ओळख 😇 झाली.. कमवलेली विश्रांती, १० मिनिट घेत, refresh होत, आम्ही आता शेवटचा पल्ला चढायला सुरुवात केली.. सोबत आणलेल्या biscuits ना खूप पुण्ण्याचे भाग्य लाभले. पुढे ७ पर्यंत डांबरी रस्ता गाठायचा होता.. अंधार व्हायच्या आधी तोरणाचे rockpatches, railings च्या मदतीने सुव्यवस्थित उतरत, आम्ही ७:१५ ला वेल्हेला पोहोचलो..

आता पाय काय तर सगळी काया बोलायला लागली होती.. जाम भूक लागली होती पण आधी चहाची नितांत गरज होती.. have always believed in capabilities of tea ☕ 

Everesting - सकाळीच हा शब्द पहिल्यांदा ऐकला.. काय असतं? विचारल्यावर कळलं की Mt. Everest च्या height एवढं elevation चढणे / total elevation gain करणे, ह्याला Everesting केल्याचं म्हणतात.. त्या हिशोबाने आम्ही आज quarter Everesting केलं होतं.. AllTrails app ने मोजल्या प्रमाणे २२७१ मी. ☺️

अरे हो, कात्रजहून सुरु करणाऱ्या group चा update राहिला की. नियमित running करत असल्यामुळे त्यांचा speed भरपुर होता पण ३ पैकी एकाचा गुढगा, विंझरला पोहोचेपर्यंत दुखायला लागला होता आणि त्याने तिथूनच माघारी येणे योग्य होतं.. बाकी दोघांना संजीवनी माची उतरायला अळू दरवाजा सापडत नव्हता आणि म्हणून बुधला माची पर्यंत पोहोचायला अंधार झाला होता..

असो, ठरल्याप्रमाणे बाकीची मंडळी रात्री आराम करून पुढे रायगड 🚩 ला जाणार होती आणि आता "तू परत घरी कसा जाशील?" ह्या प्रश्नाला मार्गी लावणे गरजेचे होते.. नाहीच काही सोय झाली तर बाकी मंडळीला company द्यायचा पर्याय होताच.. ८ वाजता एक bolero गाडी 🚚 निघतांना दिसली.. आवाज दिला तर कळलं सातारा highway पर्यंत सोय होऊ शकेल.. सकाळपासून पहाटेपासून १४ तास ४२+ kms चालून झालेल्या अवस्थेला घरची भाजीपोळी आणि गादी, म्हणजेच सोने पे सुहागा होणार होते.. अजून पुढे कुठे जाणार विचारल्यावर cherry on the cake 🍰 home delivery..

असा काही होता माझा एकदिवसीय सिंहगड-राजगड-तोरणा (SRT)..

आता काही लोकं विचारतात, काही गरज आहे का? तर, मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे.. कारण ही गरज नाही तर आवड आहे.. प्रत्येक जण आप-आपल्या परीने contentment शोधत असतो.. आणि आमच्यासाठी सह्याद्रीत जे नैनसुख भेटतं आणि जी निसर्गाशी (स्वतः शी) ओळख होते, ते इतरत्र नाही.. 

2 comments:

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...