।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
कुठलाही offbeat trek करायचा म्हणजे "कोणीतरी" संकल्पना देणार 💬, "कोणीतरी" वाटेची चाचणी करणार 🧪, "कोणीतरी" lead घेणार आणि मग, जायची तारीख 📅 आणि येणारी public ठरली / जमली की पाऊले आपोआप मंजिल पर्यंत पोहोचतात.. ह्यातले तिन्ही "कोणीतरी" एकच असले, तेव्हा ठीक आहे.. आणि नसले तर? 🤔.. नसले तर पुस्तकांमध्ये जसा acknowledgements 🙏 धडा असतो, तसा ह्या articleचा पूर्वार्ध..
ह्या trekची संकल्पना देणारे दिलीप (हो तेच, कलिंगड 🍉 वाले).. कुठल्याही trekला भेटले की निरनिराळे फळं तर आणताच, सोबत वेग-वेगळे routesही suggest 💡 करत असतात.. त्यांच्यातला एक म्हणजे हा - सिंहगड परिक्रमा ⭕.. पण मग वाट कुणाला माहीत आहे? म्हणून इतर suggestions सारखंच ह्यालासुद्धा विसरून we moved on ⏭️..
सिंहगड 720° at #720
last month, सिंहगड 360° at #360 सारखंच 720° at #720 केल्यानंतर आगरखेडकर काका महेंद्रकडे cheers ☕ करायला भेटले, तेव्हा त्यांनी एका groupने आजच (त्याच दिवशी) परिक्रमा केल्याचं सांगितलं 😃.. that clarified, आम्ही wind pointची वाट चढतांना झुंझार बुरुजाखाली दिसणारं public काय करत होतं ते.. दुपारी काकांनी 📽️ video share केला आणि not available वाट 🚫, Strava वरून संदीपच्या activityची gpx file download करत available झाली ✅..
homework झाला तर complete.. आता वेळ होती परीक्षा द्यायची / घ्यायची.. वाट बघता लक्षात आलं, मोरदरी गावातून कल्याण दरवाजा (काळूबाई माता मंदिर to be precise) आणि मेट्याहून घाट रस्ता, हे २ patch सोडले तर इतर patch कमीत-कमी एकदा तरी केलेले आहेत 😎.. म्हणून, काही दिवसांनी ती gpx file follow करत, ह्यांची चाचणी घेण्यात आली.. आणि निकाल काय लागावा तर करवंदच करवंद 😇..
Thank You 🙏 संदीप, दिलीप, माधवी, आगरखेडकर काका, विनायक.. without you, this would not have been possible.. काही नावं नवीन आहेत - have saved them for later..
इच्छापूर्ती.. सिंहगड परिक्रमा
ज्यांच्यामुळे route भेटला त्यांना सोबत नाही न्यायचं, ही तर नाइंसाफी झाली असती ⚖️.. काकांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर - श्री. अनंत आगरखेडकर - आज़ादी का अमृतमहोत्सव 🇮🇳 निमित्त ह्यांनी ७५ दिवस सलग सिंहगड चढाई केली.. काहींनी अंदाज बांधल्यानुसार ते तितक्यात थांबणार नव्हतेच.. तर, २२-२३ साली उपक्रम राबवला म्हणून थेट २२३ (तिप्पट) करूनच 🚩 शिवजयंतीच्या दिवशी दम घेतला.. cut to agenda,
नाशिकहून आल्यावर group मध्ये विचारताच ३-४ जणांनी हात वर केले 🙋♂️.. 'कधी करायची?', तर कुठल्याही तारखेला एकमत नाही 😞.. म्हणून, सिंहगड परिक्रमेवर लिहिण्यात आलेलं हे पहिलं जरी असलं तरी शेवटचं article नसणार आहे 🔁..
परिक्रमा म्हणजे बहुतांश लोकांचा समज हाच असतो की trek खूप मोठा असेल ⌛, आणि म्हणून दोघांचा doubtही सारखाच.. म्हटलं, जेवायला घरी येतो आपण.. exact किती वाजले? let's find out..
१५-जून-२०२४
जोशींचा messageला reply नाही म्हणून phone केला 📲.. कितीतरी वेळ ring वाजल्यावर समोरहून बाई म्हणते, "the number you are trying.. .." म्हणजे, जोशी will / should feature now (and also) in next article..
वैभव आणि भूषण सोबत ठरल्या वेळेत, म्हणजे 🕠 ०५:३० वाजता गुरुदत्तला पोहोचलो तेव्हा काका सुद्धा लागलीच हाजर.. चहा घेत, शिट्टी 🔔 सोबत काही tips share केल्या त्यातली एक माहीत नसलेली म्हणजे.. गळ्याला काहीतरी बांधलेलं 🧣 असलं म्हणजे एखाद्या जनावराला hold करायला काही भेटत नाही, म्हणून आपण (kind of) सुरक्षित असतो 👍..
गुरुदत्त ते मेटं
ज्यांना 'मेटं' माहित नाही, त्यांच्यासाठी "किल्ला व पायथा यांच्या मधे असणारी मोक्याची किंवा वस्तीची तटबंदीरहित जागा" 💂♂️.. ज्यांना गुरुदत्त माहीत नाही, त्यांच्यासाठी आतकरवाडी.. आणि ज्यांना आतकरवाडी माहीत नाही, त्यांनी बहुदा सिंहगड आपल्या terraceहूनच बघितला असावा 🔭..
परिक्रमेच्या वाटेत हा आणि शेवटचा patch, regular hiking route वरचाच.. season आणि वेळ बघता torchची 🔦 गरज नव्हती.. October / November मध्ये पुन्हा येऊ, तेव्हा ही ओळ वेगळ्या तऱ्हेने लिहिलेली असेल..
काकांसोबत बलदेवजी होते, ज्यांनी mobile वर गुरबाणी 🎶 लावली होती.. पंजाबी नसलो / येत नसली म्हणून काय झालं, (EBC article 🏔️ मध्ये सांगितल्याप्रमाणे) music कुछ भी चलता है आम्हाला.. आम्ही चौघे बराच वेळ सोबत होतो.. काही अंतराने every Saturday कानडे सर भेटले.. party बदलत त्यांच्यासोबत काही वेळ words exchange झाले.. मेट्याला त्यांच्या wishesचे आभार मानत, आम्ही क्षणभर विश्रांतीसाठी थांबलो 😴..
![]() |
| बेडकाची छत्री |
मेटं ते घाट रस्ता
माधवी madamनी ह्या वाटेबद्दल कधी काळी जी माहिती दिली होती, ती म्हणजे, 'वाटेत खूप कारवी आहे, पावसाळ्यात करण्यासारखी नाही, चढ जास्त नाही, पण थोडा घसरडा आहे'.. कोणी जात नाही म्हणून तेव्हाच्या confidence सोबत एकटं जायची हिंमत नाही झाली.. मागच्या महिन्यात मात्र हे फक्त ऐकून नव्हतो तर सध्याच्या आत्मविश्वासासोबात अनुभवलही होतं.. back to future (today)..
एक गुरबाणी संपली तर वैभवने दुसरीची फ़रमाइश केली.. battery health 🔋 आणि ETA बघता बिनधास्त बलदेवजी तयार झाले.. मेट्याहून डावीकडे 👈 वळत नेहमीची वाट सोडल्याचं म्हणजे गर्दीतून बाहेर आल्याचं सुख काही वेळ का असेना सोबत असणार होतं.. वाटेत सोबतीला होते भरपूर खेकडे 🦀.. आम्हाला बघून सैरा-वैरा पळायला लागले.. 'नाही करत तुम्हाला काही', आश्वासन देत आम्ही त्यांची भीती घालवायचा प्रयत्न करत होतो 😁..
लागलीच (as expected) new place, new photosची संधी साधत photosession 📸 चालू झालं.. दिवसभरात काढण्यात आलेल्या कितीतरी मधला पहिला group selfie विहिरीजवळ झाला 🤳..
विहिरीपुढे traverse संपत चढ आहे 📈.. योग्य तिथे नागमोडी आणि कारवीच्या सावलीमुळे न जाणवणारा हा चढ अगदी सहजरीत्या पार होतो.. डावीकडे सूर्योदयानंतर हळू-हळू 🥔 बटाटा pointचाही उदय होत होता.. मागच्या आठवड्यात वाहतुकीसाठी चार दिवस बंद असणारा घाट रस्ता लागताच गर्दी was back.. माणसांसोबत गाड्या आणि गाड्यांसोबत धूर 💨 - नाईलाज.. ताक आणि चिक्की सोबत निसर्गाचा आनंद घेत, rest of the article पुरता का होईना, आम्ही रस्ता ओलांडत लागलीच ह्या गर्दीतून बाहेर पडलो 🌞..
घाट रस्ता ते मोरदरी
डावीकडे बटाटा point, समोर (खाली) मोरदरी आणि उजवीकडे सिंहगड.. वाटेत करवंद नसलेल्या जाळ्या, पाणी नसलेले ओढे तरी चिखलाने माखलेली पायवाट.. हा झाला ह्या patchचा परिचय..
त्यात gpx file follow करत असूनसुद्धा थोडीफार चुकामूक होत होती.. traverse नंतर खाली उतरायला कधी इथे व्यवस्थित वाट सापडत नाही / आजपर्यंत सापडलेली नाही 😓.. तळं दिसायला लागलं, तेव्हा "कसेही पोहोचा" सांगत route follow करायचा नाद सोडला..
दुष्काळ पडल्यागत अगदी शेवटी एक भरलेली जाळी दिसताच आम्ही तुटून पडलो.. एक चाखताच 'तेरावा महिना' नुसता म्हणींपूर्ता मर्यादित नसतो, हे सिद्ध झालं 😭..
तळ्याकाठी kingfisherची (पक्षी) 🐦 मजा बघत, फोटो काढत, पाणी पीत, breakfast साठी झुंझार बुरुजाखाली पाहिजे तर अर्धा तास थांबू, ह्या तयारी सोबत आम्ही इथून निघालो..
मोरदरी ते झुंझार बुरुज
आठचा ठोका पडायच्या आत 🕗 आम्ही पुन्हा एकदा गड चढायला सुरुवात केली.. 'कुंपणाच्या डावीकडून चढायचं आहे', माहिती असूनसुद्धा उजवीकडे 👉 मळलेली वाट बघत confuse झालो.. 'चुकलो आहे' लक्षात येताच hopped over to the left side.. वरील करवंदांचा photo ह्याच patch मधला.. same place, different time..
काळूबाई देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचतच कल्याण पेठ गावातून येणाऱ्या वाटेला लागलो.. समोर गडावर जरी ढग दिसत असले ☁️ तरी इथे भरपूर उन होतं ☀️, म्हणून sideने न जाता, आम्ही धारेवरूनच वाऱ्याआड लपायचा प्रयत्न करत वर चढत होतो.. काल रक्तदान 🩸 केल्यामुळे सारंगचा speed आता कमी पडत होता.. 'चढ येवढाच आहे' सांगत त्यांची हौसला-अफ़ज़ाई करण्यात आली..
photo काढून झाल्यावर, gpx file follow करायच्या नादात चांगली-चुंगली माहिती असलेली वाट सोडत आम्ही निघालो आडवाटेवर 🥹.. कोई नई, next time साठीचा हा past experience कामात येईल.. जास्त time waste किंवा adventure न करत आम्ही साधारण ०९:१० च्या आसपास ह्या trekच्या midpointला, म्हणजेच झुंझार बुरुजाखाली नाश्ता करायला बसलो.. अंडी 🥚, bread butter / cheese 🧀, वाटी cake, biscuits 🍪, चिक्की and what not?.. आरामात पोट भरत 🤤 आणि पोटभर आराम करत 😌 साधारण २० मिनिटांनी आम्ही second half साठी SRTच्या वाटेला लागलो..
एव्हाना कदाचित जोशी गडावर असावेत.. सांगितलं असतं, 'आम्हाला इथे join व्हा', तर आलेही असते, पण हे सगळं तेव्हा नाही सुचलं 🤦♂️.. अजून एक जे वेळेवर नाही सुचलं ते म्हणजे, निघायला लागलो तेव्हा वैभव म्हणतो, "time lapse 📹 लावायला पाहिजे होता"..
झुंझार बुरुज ते कळकीचे मेट
mar '19.. कोळीवाडी २ - कोळीवाडी १ म्हणून एक दिवशी विनायकचं status होतं.. 'काय भानगड आहे?' ह्याचा तपास लावण्यात जास्त कालावधी नाही लागला.. तसंही नुकताच (feb '19) काळूबाई मंदिर, थोपटेवाडीहून सिंहगड केल्यामुळे ही वाट पूर्णपणे अपरिचित नव्हती.. back to परिक्रमा..
second half जरी असला तरी चढाई ह्यापुढे ना बराबर 😀.. पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, "SRT?" 🤨.. technically 'yes', पण फक्त काही सेकंद.. थोड्या अंतरावर उजवीकडे एक वाट खाली उतरतांना दिसते.. इथे SRT वाल्यांनी फूली मारलेली आहे ❌ - that was indication enough..
आज त्याच वाटेने कोळीवाडी २ / कळकीच्या मेटाकडे उतरायचे होते.. ५ वर्षांगोदर पेक्षा, आज ही वाट खूपच सुटसुटीत आहे, त्यामुळे unlike last time, आज शोधायची कुठलीच गरज नाही पडली 👌..
'थोडाफार तरी पडायला पाहिजे', ह्या आशेवर आलेलो आम्हा सगळ्यांना the most awaited पावसाचे काही थेंब इथे लाभले 🌦️, पण असून नसल्यासारखे.. ४-५ घरं 🏘️ असणाऱ्या ह्या वाडीत फक्त एक भू-भू दिसलं / ऐकलं 🐕.. यापुढे आहे ह्या trekचा सर्वात मोठा traverse, about 5 kms, एका मेट्यापासून दुसऱ्यापर्यंत.. किल्ल्याची level म्हणजे झुंझार बुरुज ते खांदकडा बुरुज.. base level म्हणजे दुर्गदरा ते आतकरवाडी..
कळकीचे मेट ते अमृतेश्वर
ह्या ५ मधले १.५ कि.मी. म्हणजे कोळीवाडी २ (कळकीचे मेट) - कोळीवाडी १ (अमृतेश्वर).. वाटेत, सुरुवातीलाच एक विहीर सोडली तर जास्त लिहायला नाही.. पण अमृतेश्वर मंदिर आणि त्याच्या जवळ असलेल्या स्मृतिशीळा / समाधी ह्याआधी नजरेस न पडल्याचं नवलच वाटलं 🤷♂️.. गडावरच्या अमृतेश्वर मंदिरासारखंच इथेही दोन मूर्त्या दिसतात..
शेजारीच एक चौकोनी टाकं सुद्धा आहे, ज्याला ३-४ पायऱ्या आणि उर्वरित तिन्ही sideला आतल्या sideने केलेलं खोदकामही दिसतं ⚒️ - clever.. ह्यापुढच्या वाटेत बसायला जागा नाही, हे लक्षात घेत इथेच राहिलेलं ताक 🥛 संपविण्यात आलं..
अमृतेश्वर ते मेटं
regular वाटे आधी शेवटचे हे ३.५ कि.मी. म्हणजे #720 च्या वेळेस, उलट्या sideने केली ती वाट 🙃.. का म्हणायला पाहिजे, आज उलट्या sideने करणार होतो.. 'एकूण एकच' म्हणताय? let's see..
ह्या patchमध्ये चिक्कार करवंद expected होते.. नव्हते जरी of that magnitude, तरी दुष्काळ finally संपला होता.. मनासारखा नसला, तरी ह्या बाबतीत अगदीच नाखूष होऊन trek संपणार नाही, हेच समाधान 😊..
इतकं चालूनही आतापर्यंत कुठे जास्त चुकामूक नव्हती झाली.. आणि ह्या patch वर आम्हा ६ पैकी ३ जण आधी येऊन गेलो असून दोनदा चुकलो 😬.. 'एकूण एकच' म्हणालात ना? नसतं असलं काही.. कुठल्याही वाटेत दर वेळेस काहीतरी निराळेपणा असतोच, त्या शिवाय का गडावर इतकं public regular येतं?..
चुकलो ती वाट
मेटं ते गुरुदत्त
परिक्रमेच्या वाटेत पहिला आणि हा patch, एकच.. फरक फक्त चढ-उताराचा.. मारुती मंदिरात मारुतीस नमन करत 🙏, जयघोषणा देत परिक्रमा वेळेत संपल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला.. राहिलेली अंडी 🥚 संपवत, शेवटचे (?) group photosession करत हा टप्पा उतरायला चालू केला.. सगळे आप-आपल्या परीने regular routeने / shortcut घेत उतरत ground वर पुन्हा जमले..
शेवटचे (sub)group photosession exact 🕛 १२ वाजता झाले आणि पुढच्या १० मिनिटात गुरूदत्तला trek संपवत smart phones / watches ⌚ वरचे recording(s) थांबवण्यात आले.. estimate केल्याप्रमाणे १२/१२:३० झाले होते.. जेवायला घरी 🏢.. ज्यांना सोय नव्हती किंवा अजून खूप लांब जायचं होतं, त्यांनी मिसळ पाववर 🍲 ताव मारत trekवर शिक्कामोर्तब केले..
आज खऱ्या अर्थाने सिंहगड ३६०° झाला.. stats compare केले तर k2s येव्हडा trek.. अर्धा चढ आणि शेवटचा बऱ्यापैकी traverse जंगलातून.. म्हणजे, कधी night trek करायची इच्छा नसेल, तर हे चांगलं / better option आहे ✌️.. काका सतत म्हणत होते, अगदी मोरदरी गावात उतरायची गरज नाही पडायला पाहिजे, मधून कुठून तरी वाट नक्कीच असेल.. असली तर कळेलच कधीतरी ..
तोवर हीच आमची / आपली परिक्रमा ⭕..
संदीपच्या शब्दांत.. ज्या गडकोटांवर राहून महाराजांनी स्वराज्य निर्माण केले 🚩 आणि जे गडकिल्ले महाराजांनी जपले, वाढवले.. ते सर्व गड किल्ले म्हणजे स्वराज्याची मंदिरेच 🛕.. त्यापैकी एक म्हणजे किल्ले सिंहगड.. आज सिंहगड प्रदक्षिणा पूर्ण करून गडाला मानवंदना दिली 🙏..












