Thursday, June 11, 2026

बुरान घाटी

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। 

you had your day, let tomorrow be ours..
बुरान घाटी..
यहां कल क्या हो, किसने जाना !

welcome to yet another grand buffet 🎉 of unforgettable memories we made along the last few days.. as Vaibhav shared from his last experience, 'खूप भारी लोक आहेत' 😃.. as first timer Bhushan's naive innocence
guesstimated, एकूण ४० कि.मी. तर आहे, ७ दिवस का लागायला पाहिजे? 🤦‍♂️.. as the things un-happened a few days before making it almost a no-go expedition 😢..

eventually / as was विधिलिखित, I, along with some crazy members of the group were boarding our planes plans somewhere / sometime from the new look (learnt a new word) उड़ानपत्तन 🛫.. but before that, let's get the basics right.. as the traditional Sherpa wisdom quotes - you don't conquer a mountain 🏔️, the mountain allows you to climb it -  respect for nature over human ego..

toward end of last year (2025), Alok poked about a probable snow white adventure he and Ashish, as group coordinators, were planning by mid next year (2026).. immediate reaction was नको 👎.. but then had been having conversations of similar likes with Mahesh and Bhushan, which led to deciding on the completely opposite side and so does take place the scribbling below ✍️.. as the time traveled, planes were booked, hotels were reserved, local travel 🚘 was arranged and we were waiting, waiting more and kept waiting for the dates to happen..
 
note at Janglik dorm

बुरान घाटी 
२७ मे - ०३ जून २०२६

come 25th night, Bhushan started from his place towards (hope you too learn something new) उड़ानपत्तन, picking up me and Aditya (the quiet one) on the way.. as the IST was reset to 00:00 🕛 (past midnight), we 3 reached the departure gates.. a few minutes later, joined by Rajendra (the well-prepared one) and Vishal (another first timer), we 5 from आपली पुणे were waiting and continued doing so until the boarding announcement.. fast forward to sunrise 🌄, we landed in Chandigad, got onto the cab and had a परांठा rich 🥔 🧅 पेटभर must-have breakfast (location: somewhere near the Parwanoo toll plaza).. by now, the terrain had started gaining altitude (now in 4 digits) and we'd crossed the borders to enter the state, supposedly be our मुक्काम पोस्ट for the next ~8 days, देव भूमि 🛕, हिमाचल / हिम आंचल..

reaching the hotel at Rohru, we waited some more to be joined by Alok (the goto member), Vaibhav and Suresh - 3 from 3 different cities.. learning from #CannotAskForMore 🤤 past experience (noon lunch), we had dinner the following evening and breakfast the next morning ☕ at the very same place (GMaps location)..

room freshener at Rohru hotel
 
Bhushan - the same - you have met him in earlier articles.. Vaibhav - a different one - he hails from our college 🎓 days and has featured just once in the राजगड article, titled: पहिलं प्रेम (link here).. that should be an easy guess, on what photos to expect hereon..

8 so far, we were to be joined tomorrow by another 14 from Yavatmal at our starting point 🏁.. thereon, we all were to be at the disposal of organizers.. not even once we had any conflicts or needed any second opinion(s).. #CannotAskForMore 👌

(all stated figures below as captured by Coros  are in mtrs.)

day 1 Rohru (1550) - Janglik (2842)
ना तुम जानो ना हम

sunrise from Rohru hotel

रोहडूला ठरलेल्या pick-up pointला पोहोचून, luggage 🧳 देऊन आणि rentals घेऊन, briefing झाल्यावर आम्ही २२ जण ५ चारचाकी गाड्यांमध्ये साधारण १०:३० 🕥 वाजता आमच्या आजच्या campsite कडे निघालो ↗️.. जरी इथे exact उलट्या कारणाने पुन्हा झोप लागणार नसल्याची जाणीव होती, तरी पब्बर नदीलगतच्या वाटेत रस्त्यात थंडीचा आढावा घेत, नदीकाठी घेतलेल्या छोट्याशा breakमध्ये थोडा timepass करत, आम्हाला already पुण्यात 🌡️ न लागणाऱ्या झोपेचा विसर पडला होता..

रस्त्याचा शेवटचा patch असा भारी होता की पायी गेल्याचं परवडलं असतं कारण रस्ता नव्हताच.. म्हणून, एकच शंका आम्हाला सतावत होती - आजसाठी सुद्धा थोडा / हा trek / hike ठेऊ शकले असते 🤨..

खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार

गाडीतून उतरून सगळ्यांनी आजचा नावापुरता काय जो ascend होता, त्याला सामोरं जात welcome drink म्हणून असणाऱ्या कैरी पन्ह्याचा आस्वाद घेतला.. जेवणासोबत trek lead परीक्षित (यापुढे परी) आणि guidesशी ओळख झाल्यावर वेळ होती गावात cultural walkची.. एकही खिळा न वापरता देवदार झाडापासून 🪵 interlocking mechanismने बनवलेले मंदिर / घर बघून कौतुक वाटतं 🤘.. इथे होणाऱ्या festival gatheringsचे भव्य स्वरूप, आणि एखादी शैक्षणिक पदवी मिळाल्यावर नवस म्हणून जनावराची शिकार करून मुंडकं 🫎 वाहणं - इतपर्यंत सब ठीक होतं.. बाकी पटलं नाही, म्हणून इथे लिहून तुमचाही वेळ वाया घालवणार नाही 🤐.. अश्विनी करत होत्या प्रयत्न, पण इथल्या प्रथा जरा जास्त रूढ जाणवल्या.. not doubting the authenticity, but let's conclude this with, ना तुम जानो ना हम 🤷‍♂️..

temple, Janglik

campsiteला परतल्यावर प्रत्येकी hygiene liner देऊन मोहिमेसाठी सुसज्ज करण्यात आलं.. अजून काय राहीलं? हं, eco bag 🗑️.. डोंगरांसाठी कचरा वाटणारी वस्तू दिसली की टाकायची त्यात.. प्रत्येक campsiteला ह्याचं वर्गीकरण करून रिकामी करायची सोय होती.. all set to take-off then 🤞..

day 2 Janglik - Dayara (3392)
मेरे हम कदम हैं ये ज़मीं, मेरे हाथ में.. ..

निघायच्या आधी सर्वांचे pulse 💗, bp आणि spo2 🫁 टिपण्यात आले.. आणि काल / परवा रस्त्याने, डोंगर-खोऱ्यांमध्ये जे दिसले तेच झाड शेजारी असल्याने त्याच्या lifecycle बद्दल माहिती मिळाली - grafting, pollination etc - apples 🍏..

actual trekचा (hike / walk) आज होता पहिला दिवस - जांगलिक ते दयारा.. 'दयारा बुग्याल' (meadows) म्हणून trek बद्दल तुम्ही ऐकलं असेल, तेच हे.. pineच्या झाडांनी व्यापलेल्या या जंगलातून / वाटेवर चालतांना चढ कधी संपतो, कळतच नाही.. rather, कळायला नव्हता पाहिजे 😓.. पण, altitudeने already रंग दाखवायला सुरुवात केली होती.. 'don't touch, smell or eat anything' कालच्या warningला अपवाद म्हणून आज परीने आम्हाला pine coneचा वास घ्यायला सांगितला.. अगदी जवळचा reference द्यायचा झाला तर, निलगिरी 🤓.. next,
 
हिमालय म्हंटलं की पाठोपाठ maggieही येते.. मग बुढे हो या बच्चे, मागे-पुढे बघत नसतात 🤤.. त्यात ३ शालेय विद्यार्थी असले तर विचारायलाच नको.. organizersनी नाश्ता / जेवण कितीही छान बनवायचा प्रयत्न केला आणि कितीही छान बनवत असले तरी शेवटी maggie ती maggie 🍜.. आजचे नखरे पुरवून झाल्यावर, ढाब्याहुन निघतांना, चलते-चलते timepass म्हणून एकमेकांशी / एकमेकांची ओळख व्हायच्या हिशोबाने, आम्ही जोडीने निघालो - so, EoB पर्यंत माझे हमसफर असणार होते अभय.. campsiteला जाऊन एकमेकांना introduce करायचा कार्यक्रम न झाल्यामुळे अभयचे secrets अजूनही सुरक्षित आहेत, tension नक्कु सर 🤐..

campsite was right in the meadows 🖼️.. आम्हाला गवताने चारों तरफसे घेर लिया था.. जरा अंतरावर डावीकडे होतं elevation आणि उजवीकडे valley (दरी).. जेवण झाल्यावर थोडं वर जाऊन यायचा plan already discuss झाला होता 📈.. त्याआधी शतपावली म्हणून दरीच्या sideला जाऊन जरा collegeच्या आठवणी ताजा करण्यात आल्या.. पत्ते आज खेळलो का? 🤔 - नक्की आठवत नाही - mostly नाहीच.. असो,


(3467) मेरे हम कदम हैं ये ज़मीं, मेरे हाथ में आकाश है.

day 3 Dayara - Litham (3570)
अभी तो party शुरू हुई है..

आज मात्र गळ्याशी आलं होतं.. ह्यावेळेस त्रास जरा जास्त आणि लवकर चालू झाला.. कदाचित 'too much, too early' expose झालो थंडीला.. परतायची वेळ नको यायला म्हणून आशिषकडून गोळी 💊 मागून घेतली.. तत्पूर्वी,

परीने काल रात्री जेवण करतांना सांगिल्याप्रमाणे आजचा दिवस असणार होता DIY (Do It Yourself).. lead / guidesच्या मदती खेरीज आणि trail जरी असली कोणाकडे, तरी follow न करता, वाट नेईल त्या दिशेने जाण्याची मोहीम होती 🥳.. प्रत्येक role साठी एकाला nominate करायला सांगितलं होतं.. somehow, आम्हा तीन महाविद्यालयीन मित्रांची leads म्हणून निवड झाली 🎊.. कुठेही गेलं तरी हा tag काही पीछा सोडत नसतो बघा / इतर कुठल्या पेक्षा ही जबाबदारी परवडते 😇.. एक तसल्ली ह्याची होती की आजच्या source आणि destinationच्या altitude मध्ये जास्त फरक नसल्याने वाट चुकायची शक्यता / भीती नव्हती 🙂‍↔️..
 
source of potable water
 
नाश्त्यानंतर भूषणने जो warm-up घेतला त्याने सगळ्यांना असं तयार केलं की नंतरच्या कुठल्याच दिवशी warm-up / stretching घेण्यात नाही आलं / घ्यायची गरज नाही पडली.. त्याला कदाचित 'निसर्ग परवानगी देणार नाही' ह्याची पूर्वकल्पना असावी 🔮..

altitude सोबत flaura-fauna बदलण्याचे इथे पावलो-पावली प्रात्यक्षिक दिसते.. कालच्या 🌲 देवदार, oak आणि pineच्या शिकवणी नंतर आजचा विषय होता 'भोजपत्र' 📜.. लिहायला अतिशय सोपं, पण नाजूक असल्याने सरळ लिहिलं की त्याची टरकते, म्हणून सर्व भारतीय भाषेंची लिपी वळणदार
 असल्याचं कळलं 💡..

अधून-मधून वाहत्या पाण्याला कैद करून, photosession करत आणि पुन्हा ढाब्यावर junk खाऊन campsite पर्यंत पोहोचत नाही तर सुरु झाला पाऊस 🌧️ आणि सोबतीला होत्या गारा.. यहां नहीं तो वहां सही / कुठेतरी तर पडतो आहे.. वेगळं सांगायला नको, rainwear घातले आणि थांबला, काढले आणि चालू झाला - more than once..
 
cairn - readymade

उद्या आमचा acclimatisation day असल्यामुळे आज Lithamला आम्हाला काल आलेला group अपेक्षित होता.. अजून नाही परतल्याचं लक्षात घेत river campsite असल्यामुळे आम्ही cairnsचे अजून विविध प्रयोग बघायला निघालो.. परवाच्याची निर्मिती आमची होती, पण आज बने-बनाये भरपूर आणि अद्भुत असल्यामुळे निर्मितीची हिम्मत नाही झाली.. दरिया किनारे आनंद घेत असलेलो / बसलेलो आम्ही सहन नाही झालो बहुतेक इंद्रदेवाला..
 
Dwarf Himalayan Iris
 
el niño नसतो येत का इथे? - नसेल तर बरंच आहे, पण निसर्ग माणसांच्या मर्ज़ी का मोहताज कधीपासून झाला? 🙄.. जो चालू झाला तो थांबायचं नाव नाही.. आधीचा group धडपड करत आला म्हणे.. आता आपण काय करायचं?, तर निघाले पत्ते 🎴 - here we had a never before, never again - the most memorable and adventurous experience.. बहुप्रचलित बदाम सात, खेळणारे ७-८ जण, म्हणून २ deck 🃏 mix केले काय आणि प्रकृती नुसार चिडी / किलवरचे ♣️ पानं तिप्पटीत निघाले काय.. यामुळे काय आणि काय-काय झालं असेल, let your imagination run wild, wilder, wildest.. all thanks to Rajendra 🤝..
 
बदाम सात
 
हळू-हळू पावसाने गारांचं आणि गारांनी हिमवृष्टीचं 🌨️ स्वरूप घेत उद्याच्या acclimatisationच्या कार्यक्रमाला धोक्यात आणून सोडलं होतं.. चोहीकडे / नज़र जाईल तिथे नुसता पांढरा थर दिसत होता.. lesser then we knew, अभी तो party शुरू हुई है ☃️..

चटणी - yet another from the list of 'unforgettables'.. वास घेऊन चिमूटभर डब्यात टाकून भूषणला दिली, तर त्याने मूठभर ओतून घेतली 😱.. चटणी / लोणच्याच्या बाबतीत चव न घेता इतकी daring करणारा पहिलाच बघितला.. घास तोंडात टाकायचा उशीर, उचकी लागून उचकायची वेळ, भर पावसात नाका-कानातून निघणारा धूर 😤, तोंडातून निघणाऱ्या ज्वाला आणि tentच्या दुसऱ्या कोपऱ्यातून speed postने 📬 आलेली पाण्याने अर्धवट पण कामापुरती भरलेली पाण्याची बाटली 🍶.. हे सगळं processing होतानाच (म्हणजे तुम्हाला वाचायला जेव्हडा वेळ लागला असेल) कदाचित त्याने मनातल्या मनात शे-दीडशे शिव्या दिल्या असतील 🤬.. अहो, नसतील शे-दीडशे दिल्या, कमीतकमी एखादी तर नक्कीच दिली असेल.. त्या दिवसानंतर, rather क्षणानंतर ती चटणी कुठे गेली, is a mystery till date 💆‍♂️..
 
पब्बर river (Litham)
 
day 4 Chandernahan Lake (3963)
वहां नहीं तो यहां सही..

सकाळी उठून बघावं तर कायापलट - कालचा बर्फ (almost) उडनछू झाला होता.. आजचा trek 🚫 cancel व्हायच्या मार्गावर निघायच्या ऐवजी full तयारीने आमच्या स्वागताची वाट बघत होता.. आजही बरसला तर फजिती नको म्हणून लवकर निघून झटपट परत ↪️ यायचं काल संध्याकाळीच ठरलं होतं.. turnaround time होता - ११ - जिथे असू तिथून परतायचं.. acclimatisation dayचा हा एक (गैर)फायदा असतो - पाहिजे तिथून माघारी येता येतं 🎭.. नसायला हवं असं, but..

कालच्या lenient ascend नंतर आज होता steep terrain.. चिखल, boulders, repeat.. target होतं, उजवीकडे दिसणाऱ्या waterfallचा top - इथे आहे चंद्रनहान lake - असं म्हणतात.. चढाईबद्दल जास्त काही लिहायला नाही.. चिखलातून चालतांना स्वतःला सांभाळत चढले सगळे 🦯.. काही थोडेफार घसरलेही, but all was under control..
 
Chandernahan Lake / acclimatisation hike atop
 
वर जाऊन बघावं तर पोपट (पक्षी नाही) - lake अजून अर्धा तास डावीकडे आहे म्हणे.. ११ वाजायला 🕚 साधारण तेव्हडाच वेळ होता आणि समोर / डावीकडे चढ काही खास नव्हता, पण परवाच्या गवतासारखं, आज आम्हाला ढगांनी चारों तरफसे घेरलं होतं.. सगळे photo 🤳 काढण्यात रंगले होते, शिवाय चिडवणारा पाऊस (rainwear घातले की थांबणार, काढले की परतणार) risk factor वाढवत होता.. so, we called it a day.. वहां नहीं तो यहां सही - (गैर)फायदा 💔..

टाचेवर जोर देत उतरत सगळे सुखरूप campsiteला परतलो (कोणीच वाटेत पसरलं नाही).. मध्ये बहुतेक चेतन सरांचा goggle 😎 कुठेतरी पडला / राहिला होता म्हणे.. तो शोधायला अभय (main guide) पुन्हा थोडा trek करून आला..

संध्याकाळी परीने survival skills वर session / demo घेतलं.. सोबत काही thrilling / near death अनुभवही share केले 👻.. btw, forgot to mention, ह्यांच्या गतवर्षीच्या 'हर की दून' trekला हाच होता म्हणून त्याला खास दुसऱ्या route वरून इथे बोलावून घेतलं होतं, दुसरा कुठला guide नको म्हणे.. also to feature in this article 😝..

सुरवातीला थोडा त्रास देणारे, भाड्याने घेतलेलं बूट were all good now..

lead and guides
 
day 5 Litham - Dhunda (4078)
उम्मीदपे दुनिया कायम है

सकाळी उठून बघावं तर पुन्हा कायापलट - निघाले rainwear ☔ - आज त्याला आमची थोडी कीव आली - Dravidच्या form मध्ये होता - संततधार but defensive 🏏.. अनवाणी river crossingची जी भीती इतक्या दिवसांपासून मनात सतावत होती, त्याला बुटांना झेपल्यागत पाणी बघून खूप बरं वाटलं 🌊.. तरी काल परी म्हणाला होता, पाणी कमी जरी असलं तरी, आपण अनवाणी जाऊ - सकाळपर्यंत विसरला वाटतं - बरं झालं 🤫..

आज वाटेत ढाबा नव्हता.. crossing नंतर trail snacks 🥪 फस्त करून वर डावीकडे बघितलं तर गडमाथ्यावर दिसायला लागली होती आजची (आणि उद्याची 😢) campsite.. problem चढ असण्याचा नव्हता.. tension ह्याचं होतं की बराच चढ घसरडा होता.. वरून येणाऱ्या खेचरांची 🫏 घसरताना होणारी दशा-दुर्दशा बघून थोडं वाईट वाटत होतं.. त्याहून वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की आम्हाला नवीन वाट तयार करावी लागणार होती 😭.. इथे guidesने केलेल्या मदतीचे खूप-खूप आभार..

वर पोहोचून पुन्हा तेच - चारों तरफसे घेरा.. हलकासा फरक हा होता की ह्या बर्फात आम्हाला आजची रात्र 😴 काढायची होती..

उद्या summit, आणि summitला rappelling करून उतरावं लागणार असल्याने संध्याकाळी आम्हाला technical briefing 📢 करण्यात आलं.. अजून ३ technical guides सोबत येण्याचं कळलं.. शेवटी मात्र परीने हळूच पिल्लू सोडलं - जर weather असंच राहिलं, तर मुकाट्याने तो सांगेल 👂 ते करायचं.. ह्याचा अर्थ आम्ही एकच काढला - no summit tomorrow.. respect for nature 
over human ego.. कोई नई..

temperatureने उलटी गिनती चालू केली होती 🥶.. म्हणून, परीने डबा बर्फाने धुवायला सुचवलं.. जास्त वेळ लागत होता पण बोटांना होणारा त्रास वाचला 🙏.. अजून काय? तर झाडांसोबत आता गवतही गायब झालं होतं.. उद्याचा दिवस इथेच काढायचा असला तरी 'उम्मीदपे दुनिया कायम है' summitच्या scheduleला उठायचे गजर ⏰ लावण्यात आले..

Litham snowfall

day 6 washout 
यहां कल क्या हो, किसने जाना !

मैदानावर ढग, बर्फ आणि धुकं असं काहीसं घोंगावत होतं, जणू Buran Ghati नाही तर articleचं title Dhunda ठेवायची वेळ येते की काय, ह्याची भीती वाटत होती 😟.. झालं असतं तसं तर पैज लावतो, कोणी articleची link tap / click करून सुद्धा नसती बघितली.. Thumba सारखं कुठलं तरी rocket science संबंधित mission वाटलं असतं.. trekkingच्या blog मध्ये काय काम म्हणून सरळ कचऱ्यात टाकला असता message 🚮.. असो,

आजचा दिवस असणार होता summit.. झालं काय? तर snowfall, more snowfall आणि थोडा अजून snowfall 🌨️.. आणि मग, भरपूर snowfall.. त्यानंतर, परत snowfall, पुन्हा पत्ते आणि कंटाळा..

Dhunda snowfall
 
rainfall सारखा snowfall सुद्धा इंद्रदेव control करत असावेत, हे जर आपण गृहीत धरलं तर त्यांना आमचा एकच प्रश्न होता.. ☝️ आखिर कहना क्या चाहते हो?.. निघायच्या हिशोबाने ३.३०ला नाश्ता करून तयार झालेलो आम्ही, जे ४ वाजता 🕓 निघणार ते lead ने परिस्थितीचा आढावा घेत सांगितल्याप्रमाणे ६ पर्यंत वाट बघणार होतो ⏸️.. 

४ ते ६ च्या वेळेत कधीही कोणीही बोलवेल, आमचा हा गोड गैरसमज बघून कदाचित इंद्र वरून मिश्किलपणे हसत असावा.. बघत-बघता ४ चे ६ 🕕 आणि ६ चे १२ वाजले.. बुलावा तर नाही आला, आणि जो आला तो व्हता snowfall, more snowfall आणि थोडा अजून snowfall.. आणि मग, भरपूर snowfall 🪏.. नंतर, म्हणजे १२ नंतर जे आमचे पाहुणचार झाले, त्याला बराच उशीर झाला होता.. Test cricket सारखं असतं तर किती बरं झालं असतं.. निदान २ sessions तरी खेळ झाला असता.. but not every sport is the same.. इथून पुढे goggle 🕶️ विसरल्यागत पाऊस परतायला नको, ही प्रार्थना करत उद्याची वाट बघण्यापलीकडे पर्याय नव्हता 🤞.. पुन्हा थोडं बदाम सात खेळून कंटाळा आल्यावर काही डाव गुलाम चोर आणि झब्बूचे रंगले.. त्याचाही कंटाळा आल्यावर शेजारच्या डोंगरावर होणाऱ्या mini avalanchesचा 🛘 आनंद घेत होतो..

Buran Ghati (top center, slightly right)
 
ह्याचा दुसरा अर्थ असाही होतो की.. आमच्या नंतरचा group इथे येणार असल्याने आता camp inchargeला त्यांच्यासाठी नवीन tents उभे करणे भाग होतं.. buffer day कोणीतरी वापरेल, ह्याची कल्पना / तयारी प्रत्येक campsite करून असतोच, म्हणून problem नसतो तसा.. पण जर उद्या सुद्धा हीच परिस्थिती राहिली तर मात्र आम्हाला परतीचा मार्ग पकडत जांगलिकला जाण्यापलीकडे पर्याय नव्हता 💔.. म्हणून,

भरपूर snowशी लढायला काल दिलेल्या spikesच्या जोडीला आज gaitersची भर पडली.. spikes सगळ्यांना माहिती आहेतच - फक्त trekkingला लागणारे थोड्या वेगळ्या प्रकारे लावायचे असतात.. gaiters म्हणजे हातात / हातावर आपण जश्या sleeves घालतो, तश्या पायात घालायच्या sleeves, ज्याणेकरून बुटात बर्फ जाणार नाही 🥾..

रात्री झोपतांना निसर्गाला / इंद्रदेवाला एकच विनंती केली 🙏.. you had your day, let tomorrow be ours.. and, thus the title.. यहां कल क्या हो, किसने जाना !..
 
It's-a me, a-Mario

day 6+1 Buran Ghati (summit) (4583)
nothing like fresh powder

दोन groups आज एकाच दिवशी summit attempt करणार होते.. अर्थातच, गजरची वेळ बदलण्यात आली होती.. आमचा group आधी निघाला (०३:१०).. एका रांगेत चालायच्या कडक सूचनेचे पालन करत Gen Alpha was leading the pack.. थोडं चालत नाही तर अनन्या खाली बसली 😦.  त्रास नाही काही (medically), फक्त energy नव्हती.. खायला नको म्हणत होती - happens at this altitude.. अभय (guide) आणि स्नेहाने पुढाकार घेत तिथून summitपर्यंत योग्य ते मार्गदर्शन / मदत करत तीची काळजी घेतली 👍.. descend आधी, let's rewind a bit..

campsiteहुन आम्ही gaiters घालूनच निघालो होतो.. weather अजूनतरी clear होतं 🌌.. कलको पीछे छोडकर सगळे relatively ओळखीच्या terrain मध्ये रमत-गमत पुढे / वर जात / सरकत होते.. काही वेळाने / थोडं वर गेल्यावर आता समोर दिसणारा बर्फाचा थर पायाखाली यायला लागला होता 🪏.. पिटाऱ्यातुन सगळ्यांचे spikes ⛸️ निघाले.. पुन्हा रांगेत लागलो तर लक्षात आलं, headlamp 🔦 दप्तरात टाकायला हरकत नाही.. guides अधुन-मधून हौसला अफजाई करत होते.. अनन्याच्या अगदी योग्य आणि steady pace मुळे आम्हाला summit पर्यंत अजिबात थकवा नाही जाणवला 🙋‍♂️.. descend आधी, let's rewind a bit more..

काल दुपारी उघडल्यावर technical guide Sandy आणि Abhay टेहळणी / recce (रेकी) करायला गेले / इथे आले होते.. green signal घेऊनच येतील ह्याची खात्री होती कारण आमच्या summitची काळजी आणि घाई आमच्यापेक्षा ह्यांनाच जास्त आहे, असं जाणवत होतं 🤠.. rappellingला लागणाऱ्या गोष्टींची पूर्व तयारी करणे गरजेचं होतं, सोबत हे ही जाणून घ्यायचं होतं की परवा IPL 🏆 कोण जिंकलं?.. आम्हाला तर दुसरी team कोण? GT / RR, ह्याची सुद्धा परवा / रविवार संध्याकाळ पर्यंत कल्पना नव्हती 😵‍💫.. Janglik नंतर थेट summitच्या आसपास कुठेतरी range येते म्हणे, म्हणून Dhunda शिवाय updates भेटण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे dead investment होती 🥀.. back to future,
 
summit
 
वर पोहोचल्यावर प्रति एक जण प्रति एकाचे अभिनंदन करत होता 🫂 - शास्त्र असतं ते.. समोर दिसत होता अथांग आणि खोल सागर, ज्याला / जिथे पायी जाण्याजोगी वाट नव्हती.. वारा आटोक्यात जरी असला तरी photosessionचं 📸 भूत उतरल्यावर थंडी भरायला / वाजायला लागली होती.. rappellingचे आमचे २ setup होते.. Sandy पेक्षा 👈 डावीकडचा Santosh जास्त skilled वाटला.. घातलं harness, अडकवला rope 🪢 आणि पलक झपकते खाली 🧗‍♂️..
 
rappelling down
 
नावापुरती slide करत थोडं पुढे, उतरून झालेले राहिलेल्यांची वाट कशी लागते आहे, हे बघत स्वतःची 'सगळे सारखेच' म्हणून समजूत घालत येण्याची वाट बघत होते 😜.. कारण शेवटचा येईपर्यंत कोणी पुढे जाणार नाही, आम्हाला सक्त ताकीद देण्यात आली होती 😒..

सगळे आल्यावर आम्ही निघालो network शोधायला 🛜.. trek route वरून एखादा तरी phone घरी झाला पाहिजे - track record कसा मोडणार?.. networkचा शोध लागल्यावर अजून एक item ✔️ tick झाला.. गेल्या ४-५ दिवसात इतकं बघून / सोसून / करून सुद्धा checklist अजूनही incomplete होती.. पुन्हा येऊ ह्या विषयावर..

दुसरा group slide 🪊 करत होता - आम्हाला परवानगी नव्हती.. चढतांना जे आम्ही पुढच्याच्या footsteps 👣 वर चालत होतो, इथे थोडं अवघड जात होतं.. ज्यांना जमत असेल, त्यांना परीने fresh snow मधून चालायला / धावायला सांगितलं.. फिर क्या था !? enjoyed this part too 😁.. to quote Xander Cage: nothing like fresh powder !..
 
 
चढलो त्यापेक्षा अधिक खाली उतरल्यावर म्हणजे बर्फातून पुन्हा एकदा पायाखाली दगडं आणि गवत लागल्यावर, spikes आणि gaiters काढण्यात आले.. दूरवर कुठेतरी आजची campsite 🏕️ दिसत होती.. तेव्हा लक्षात आलं, आजचा walk १२ तास कसा लांबतो ते 🥺.. त्यात अधिकचे घातलेले कपडे सुद्धा काढायची कोणाला तरी युक्ती सुचली.. अंगावरचं ओझं पुन्हा पण वेगळ्या पद्धतीने अंगावरच पांघरत आम्ही वाट बघत होतो ४ दिवस miss झालेल्या ढाब्याची - packed lunch 🍱 सोबत होता तरी..
 
 
सकाळपासून पहाटेपासून भरपूर चालून झालं होतं.. hmm, not really, let's rephrase.. campsite सोडून आम्हाला बराच वेळ झाला होता ⏳.. elevation gainचं रूपांतर elevation loss 📉 मध्ये झालं होतं.. जेवणही झालं, चांगला तासभर breakही झाला.. तरी campsite अजून २ तास दूर होती.. 'चलते रहो' शिवाय पर्याय नव्हता 🚶‍♂️.. साधारण १२ तासांनी, ०३:३० दरम्यान (river) campsiteला पोहोचलो तेव्हा आमचा group अधिकचा असल्यामुळे डोंगरावर लावण्यात आलेले जास्तीचे tents आम्हाला दिले गेले 😶.. अपेक्षित होतं, वाजवी होतं - actually, परीमुळे काल shift नव्हतं व्हावं लागलं.. आज पर्याय नव्हता..
 
Munirang (river campsite)
 
welcome drink 🍻 नंतर दिवसभराची शांतता भंग करत सुरु झाला धो-धो 🌧️.. आजच्या campsiteला असणार होतं आमचं शेवटचं group dinner.. अर्थातच, सोबत असणार होते celebrations (cake आणि fridge magnet 🧲) आणि vote of thanks (guidesचे कौतुक).. हलकासा उशीर झाला, but we covered it all..

हिमालयात आलो असता stargazing 🛰️ अजून नाही झाल्याची खंत इथे भरून निघाली.. with that, इथली checklist पूर्ण ✔️ आणि bucket list रिकामी झाली 🙋‍♂️..
 
stargazing
 
day 7+1 Munirang (3246) - Brua (2420)
फ़ासले जब ऐसे बुलाएँ.. 

'आपण लवकर निघू'च्या suggestionला परीने हरी झंडी दिली होती.. फक्त नाश्ता मुकावा लागेल, असं म्हणाला होता - all agreed.. सकाळी trail snacks 🥪 घेऊन निघालो.. कालच्या १२०० नंतर आज अजून ९०० मी. उतरायचं होतं 📉.. कंटाळा यायला सुरुवात झाली होती.. बर्फ मागे सोडल्याचा आनंद होता, पण 'चिखल नको'ची फरमाइश नामंजूर झाल्याने थोडी नाराजी होती.. पुढे river crossing नंतर प्रति एकातला गायक 🎙️ पुन्हा बाहेर निघाला.. 

cairn - self-made
 
लिथमला एके संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम lightweight mood मध्ये रंगला होता.. अंताक्षरी नाही, ना कुठली competition.. just popular picks of 80s, 90s आणि किशोर 📻 - no any fancy criteria.. सुरेशने सुद्धा काही तेलगू गाणे गायले.. on top of that, शेजारच्या कुठल्यातरी tent मध्ये एकाकडे होतं guitar 🎸 - जेवण झाल्यावर त्यालाही खेचून आणलं होतं महफिल सजवायला..

आजच्या वाटेवर मात्र mood का जणू heavy जाणवत होता.. अचानक-भयानक sad गाणे आठवायला लागले publicला, त्यात एकही कडवं नीट नाही 🤷‍♂️.. not that I remember all by heart, पण - पायल छनकाती तुम आ जाओ जीवन में, नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो - असले बरेच प्रयोग झाले वाटेत.. गाणे सोडून आज नुसता यमक जुळवायचा कार्यक्रम चालू होता 🫣..

Dandelion for / by the youngest (Advait)

काही वेळाने range आली, म्हणजे आता group "group" राहणार नव्हता.. इथून पुण्यापर्यंत सगळं usual पद्धतीने घडलं म्हणून ते skip करत फक्त एकच topic घेऊयात.. surprise, surprise 🥳 - again ढाबा आणि again maggie? - not really.. इथले options ऐकून गेल्या ८ दिवसात पहिल्यांदा बाहेरचं खाल्लं.. त्यात काल रात्री न जेवल्यामुळे भूकही तगडी लागली होती.. main म्हणजे, मीच नाही तर सगळ्यांना इतकं मनापासून आवडलं की किती plates order केल्या, we lost track.. local आणि पौष्टिक - नागलीचे momos 🥟 आणि सिट्टू 🫓..

thinking about it again, abrupt ending नको.. let's grace also the finish line 🚩.. आज campsite नसून pick-up point असणार होता.. ब्रुआ गावातून निघून रामपूरला जेवण आणि final tata goodbye 🫂 होणार होतं.. ढाब्यापासून गाव चालू झालं खरं, पण तिथून निघूनही आता जमाना झाला होता - where was the pick-up point?.. फ़ासले जब ऐसे बुलाएँ, बस चले हम.. गाण्यात पुढची line 'मंजिलों की किसको है पड़ी' आहे, इथे situation उलटी होती..
 
only non-MH - Suresh - happy go lucky .!

pick-up point पर्यंत परीकडून आज bacteriaची 🦠 माहिती मिळाली.. इतका खज़ाना गोळा करणे ह्या वयात, commendable 🫡.. ११.३० वाजता गाड्यांमध्ये बसत रामपुरला निघालो तेव्हा पहिल्या दिवसासारखा doubt आला, अजून थोडा trek / hike ठेवता आला असता.. तसंही ४० कि.मी. साठी भूषणला ७ दिवस जास्त वाटत होते.. now you better know the 'why?' part 😅..

रस्त्याने बसपा (political party नाही) नदीवर बांधलेले बरेच hydro electric ⚡ plants दिसतात.. somehow इथल्या driversना music loud आवडतं - or may be, I am the 'odd man out' here.. नदी cross झाल्यावर वाटलं  BROला थोडं जांगलिक sideचे रस्ते बनवायला सुद्धा पाठवायला हवं 🛣️.. actually, पुणे side लिहिणार होतो, but that's taken care by / during Grand Tour 🚴‍♂️..
 

heard about the four burners ♨️ theory by James Clear - family, friends, work and health वाली?.. it says - to be successful, one must sacrifice (but also keep rotating) focus on at least one, some times two burners.. but what if you find people who can share multiple burners?.. nothing like it, right? 👏.. वैभवने जे सांगितलं, तेच गेल्या ८ दिवसात अनुभवल्याचं समाधान होतं.. मग ते परेश असो की चेतन.. आशिष, अभय असो वा ज्ञानेश्वर (नाना).. स्नेहा असो की अश्विनी.. बच्चे कंपनी अद्वैत, अनन्या असो की cadet श्रीलेख.. जावई, मामू all of them.. could also be because of their profession ⚕️, all were highly supportive and very energetic.. amidst all of them, stood out जय - गजब इंसान है यह 😂..

Buran Ghati - 27 May batch

submitting rentals, picking up luggage and bidding final one 👋 to all, along with the lead परी and guides Abhay, Dharmendra (guru), Vikram, we 8 were on our way, again riding, rather being driven further to the "Queen of Hills" ⛰️, capital city Shimla.. having consumed the buffer day, our plans here were already postponed to some other day in the future.. पर एक गल ते दास मेनू.. after all what we experienced (and now also you), will it be worth, even a dime?.. the answer is 'yes', because there are also others waiting on the burners..

पुणेरीs at mall road

similar to the one 🛋️ from Rohru, this hotel too was simply cool (GMaps location).. the next day was early goodbye to Suresh, a धावती visit to mall road, another loud-but-controlled music drive towards pollution 😷, a dead dinner at the उड़ानपत्तन (won't even wish for the enemies disliked), a silent flight to पुणे that virtually never happened (slept before take-off to wake-up directly in आपली पुणे)..

छोटे-मोठे almost सर्व expenses पकडून, total cost 💳 was around 46k (घर से घर तक).. somebody inquired just yesterday in office, म्हणून म्हटलं, let's put that too..
 
 
captured by Ashish

the only unfinished business so far shall remain that way - you may now stop wondering what medicine 💊 I had at Litham and twice thereafter.. that's another secret, between only 2-3 of us 🤣.. hold on / oops, that worked the other way, it seems.. you didn't even notice it earlier and only now you have started wondering 🤪.. all the best 🥸..

all covered then, we are good to close the chapter / tab on mission Buran 🚀.. just one last thing (only repeating),

you don't conquer a mountain 🏔️, the mountain allows you to climb it - respect for nature over human ego..
 
#CannotAskForMore

Tuesday, March 24, 2026

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। 

articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते..

अनंत शिखरे, एकच ध्यास.. जानेवारीत सुरेश परब आणि ज्ञानेश्वर नाईक नामक दोन मावळ्यांनी trans सह्याद्रीची मोहीम २५ दिसतात आटोपली.. हो.. १,२७० कि.मी. प्रवास आणि ३६ हजार elevation gain 📈 आणि loss 📉.. तापी नदी पासून तिलारी नदी, रायकोट (नंदूरबार) ते पारगड (महाराष्ट्र 
गोवा border), फक्त आणि फक्त २५ दिवसात 🫡..


नर्मदे हर.. प्रल्हाद लवाटे सरांनी चार महिन्यात / हिवाळ्यात नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली.. साधारणपणे ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर होणारा हा ३,२०० कि.मी. प्रवास, मय्येला कुठेही न ओलांडता clockwise 🔁 केला जातो.. हे सगळं वयाच्या ७२व्या वर्षी करणे म्हणजे शारीरिक आणि आध्यात्मिक कसोटीच 🙏..

नर्मदे हर

हे आवर्जून सांगायचं कारण असं की ते इथे सांगण्यापलीकडे आहे 😊.. थोडक्यात काय, तर ordinary व्यक्ती कसा extraordinary बनतो, ह्याचे काही उदाहरणं.. आता मुद्द्याकडे वळूया..

दुधाची तहान ताकावर दुधावर चहावर

गेल्या वर्षी शारदीय नवरात्री दरम्यान काही दिवस नाशिकला असल्यामुळे नवसकाळीच्या सातव्या आवृत्तीत हवा तसा elevation gainचा हातभार लागला नव्हता 💔.. सरासरी ९ कि.मी. चालून ती तहान भागवायचा प्रयत्न केला खरा, पण किती जरी म्हंटलं तरी शेवटी 'दूध' ते "दूध", 'ताक' ते "ताक" आणि पावसाळा असो वा उन्हाळा, 'चहा' तो "चहा" ☕..


90-10 : 90% without sugar ☕

हा अधुरापन घालवायला काहीतरी करावं म्हणून चैत्र नवसकाळीची योजना आखली आणि ती यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेली 😃 म्हणून हा लेख.. 

तसं चैत्र नवसकाळीचा उपक्रम हा काही पहिल्यांदा राबवण्यात आलेला नाही.. तरी, ह्या आधी २०२४ साली पहिल्यांदा आणि एकमेव प्रसंग जो नकळत घडून आला, त्यानंतर हा दुसराच ✌️.. बरं, ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी - नवसकाळी म्हणजे 9 days, 9+1 hikes - रोज गजराच्या ⏰ आवाजात स्वतःशी झुंजत उठायचं, पुण्यात जगभर हिंडायचं, rather गड / टेकड्यांवर चढाई करायची आणि weekday असला तर office 💻 करायचं.. असा रोजचा संघर्ष..

'यंदा never before काहीतरी करावं का?' चा विचार करत ठरलं असं की ह्यावेळेस तरी ९ सिंहगड करू ⛰️.. २०२४ साली resolution पाई सरासरी दीड पेक्षा कमी दिवसात एक सिंहगड होत होता 🥾, तरी ९ किंवा अधिक दिवस सलग 
करायचा प्रसंग कदाचित नसावा / नाही आहे, म्हणून अधोलिखित काय जे आहे ते has never happened before 🤘..
 
cairn / लिगोरचा 😜
 
दुधाची तहान दुधावर.. चैत्र नवसकाळी
जगात भारी, सिंहगडची वारी ⛰️..

गडावर नियमित येणाऱ्यांकडून बहुधा तुम्ही हे ऐकलं असेल.. जगात भारी, सिंहगडची वारी.. त्यात, शारदीय आणि चैत्र नवरात्रीत इथे सलग
 ९ दिवस येणारे भरपूर 🙇‍♂️.. काही जण गणपतीचे १० दिवसही रोज येतात.. पहिल्यांदा जेव्हा हे ऐकलं तेव्हा, 'आपल्याला नाही जमायचं', हा समज 😓, ज्यात आजतायगत फारसा बदल झालेला नाही.. ह्याआधी ७, rather ८ नवसकाळी झाल्या तरी हे जमलेलं नाही 🙃..

रोज?.. ११ वर्ष झाली, गडावर येतोय.. तरी आजसुद्धा हे अशक्य नाही पण अवघड आणि कौतुकास्पद नक्की वाटतं.. पण 'रोज एकच वाट?'.. ह्यातही काहीतरी वेगळं करू, हा नाद काही सरळ विचार करू देत नव्हता..

1️⃣ प्रवाहम् अनुगच्छन्तु
८.१० कि.मी., ८१० मी. 📈

काही दिवसाधी officeला दिनानाथ भेटले, तेव्हा त्यांनी सुद्धा weekly गड चालू केल्याचं कळलं 👍.. आज सुट्टी असल्यामुळे पाडव्याच्या दिवशी, गडावर त्यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली.. आजका ज्ञान 'go with the flow' / 'प्रवाहम् अनुगच्छन्तु' - हा त्यांच्या t-shirt 👕 वरचा quote.. दीड सिंहगड करून सुट्टीचा दुसरा असा फायदा करून घेण्यात आला.. तिसरा फायदा - मिसळ पाव आणि चहा ☕..


2️⃣ ये दिलवालों की दुनिया है, अजब है दास्तां इसकी
किसीसे दिल नहीं मिलता, कोई दिलसे नहीं मिलता
११.१ कि.मी., ५११ मी. 📈

विकासमार्फत ओळख झाली तो महेश वर्ष+ झालं, नियमित गडावर येतो आहे, weekly.. चिरपूटकर काका म्हणतात तसं, 🚸 school bus सारखं, त्याच्या गावाहून गडावर येता-येता रस्त्याने पोरं गोळा करत येतो.. फालतू petrol जाळून 🚗 carbon footprint का वाढवावं?, म्हणून गेली काही महिने मी सुद्धा bus pool 🚘 करतो आहे.. आज सोबत अजून प्रभुणे (प्रवीण किंबहुणे) आणि भूषण होते.. कालच्या दीड नंतर आजचा वेगळेपणा होता घाट रस्त्याने धावत उतरणे.. त्याचा सगळ्यात आवडता timepass 🏃‍♂️ म्हणून भूषण तयार झाला.. बाकी दोघं नियमित वाटेने उतरून, bus घेऊन आले आणि गोळेवाडीला we crossed paths again..


3️⃣ मंज़िल का मिल जाना आसान नहीं होता साहब
रास्ते क्या-क्या छीन लेते हैं, ये बस मुसाफ़िर ही जानता है
२०.७ कि.मी., ११६८ मी. 📈

आज कुछ तूफ़ानी करते हैं 💪.. आजचं अंतर आणि elevation gain, are easily the highest amongst all सकाळs from any of the नवसकाळीs till date 📅.. वाट नवीन नसली तरी नवसकाळीत ही range trek वाली मोहीम पहिल्यांदाच - सिंहगड ते धायरी.. त्यात 'आज तिसराच दिवस आहे, अजून ६ दिवस जायचे आहेत', म्हणून मनात थोडी रुखरुख 😟.. पण ह्यावेळेस शेवटचा / नववा दिवस शुक्रवार असल्याने, weekend एकच आणि तो सुद्धा नेमका सुरवातीला आल्यामुळे नाईलाज.. busने जायचा plan, देवूंना विचारल्यावर बदलण्यात आला 🛵.. 

सोबत गड चढून झाल्यावर मनीष भेटले.. आज लवकर आल्याचं लक्षात येताच ते सुद्धा माझ्यासोबत निघाले, next stop पर्यंत.. त्यांच्या मागे-मागे जात, काही दिवसांनंतरचा plan असलेला 'potato point' / चिलीम कडा 🥔 आजच झाला.. मनीष सोबत असले म्हणजे आपल्याला phone बाहेर काढायची गरज पडत नाही, तरी पुढील photoचे credits देवू सरांना..

 काही दिवसांनी छप्परही बघायला मिळेल 😜

इथून माघारी येत, दोघं गडाच्या दिशेने निघाले, आणि मी खालच्या.. गेल्या महिन्यात moonlight walk group 🌕 (यापुढे MWG) सोबत same route केला तेव्हापेक्षा आज एकटा असल्याचा फायदा भरपूर झाला / फायदा घेत लवकर संपवता आला.. trans सह्याद्री करणाऱ्यांना आजचा range trek हा आमच्या क्षमतेनुसार मानाचा मुजरा 😊..

4️⃣ May be the journey isn't about becoming anything, but about unbecoming everything that isn't really you.
१०.८ कि.मी., ८८५ मी. 📈

हा quote आजच्या activityला एकदम perfect fit होतो.. नसेल जमत एखादी वाट तर माणसाने सरळ नाद सोडावा.. period.

गड चढून कल्याण sideला उतरून, अर्ध्यातून परिक्रमेच्या वाटेने मोरदरी गावात जाऊन तिथून घाट रस्त्याला यायचा plan होता.. कधी-कधी वाट माहिती नसल्यामुळे फजिती होते.. आज सगळी माहिती सोबत असुनसुद्धा वाट काटेरी झाडांनी 🌵 अडवलेली / दडवलेली होती.. आलो त्या मार्गी परत जाण्यापलीकडे पर्याय नव्हता.. पहाटे लवकर पोहोचल्याचा गैरसमज जो parking न भेटल्यामुळे दूर झाला 😞, तसंच रविवार असला तरी उन्हामुळे गर्दी कमी असल्याचा गैरसमज पुन्हा lockdown 🔒 झाल्याशिवाय दूर होणार नाही, असं दिसतंय.. पण मग प्रसादही भेटणार नाही..

5️⃣ You haven't lived until you have done something for someone who can never repay you.
६.३ कि.मी., ५६४ मी. 📈

95 years since शहीद दिवस.. गडावर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीला आदरांजली 🙏, हा आजचा program.. period.

 
6️⃣ What's the point of becoming unstoppable, if you forget who were you running from or what were you running for?
७.२ कि.मी., ७०१ मी. 📈

एक अधिक पहिल्या दिवशीच्या दीड मधला राहिलेला खालचा अर्धा सिंहगड पूर्ण करत आजही दीड गडाची नोंद करण्यात आली..


7️⃣ शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही,
चरित्राला प्रमाणपत्र नाही ..contd
४.८ कि.मी., ४९४ मी. 📈

सकाळी, rather पहाटे लवकर जाग आली 🕞 आणि साक्षात्कार झाला की आज सातवा दिवस आहे म्हणून +1 करणे भाग आहे.. झटपट आवरत निघालो.. दप्तर 🎒 (load) न घेता गड चढायला सुरुवात केली तेव्हा 🔈Spotifyवर 'दिगंबरा दिगंबरा नामस्मरण' track लावला, duration - 39:57.. त्यात शेवटी शंखध्वनी 🐚आहे.. किल्ल्याची पायरी चढायचा उशीर and you guessed it right.. गायतोंडे म्हणतो ना, "कभी-कभी लगता है की अपुन ही भगवान है", तसंच काहीतरी.. 🤪 🥳

वर मनीष सरांच्या photographyचा उल्लेख करून photo नाही टाकला तर बहुत बड़ी नाइंसाफी होगी..


7️⃣ contd.. शब्दापेक्षा काही तिखट नाही,
आणि मौनासारखं उत्तम साधन नाही
९.१ कि.मी., १४० मी. 📈

साधारण सव्वा तासात गड आटपून धावत निघालो तळजाईला.. MWGचा आज walk day आहे म्हणून ५.१५ ची सुरुवात हुकणार, हे नक्की.. कमीतकमी शेवटच्या टप्प्यात तरी गाठू, असा घरातून निघतांना जो विचार केला, त्यात आपण बऱ्यापैकी lead घेतल्याचं लक्षात आलं 😌.. पोहचत करत जे थेट मंदिराजवळ चहा प्यायला भेट झाली, तेव्हा नुसता formality म्हणून नाही / नावापुरता न करता "+1" व्यवस्थित tick झाल्याचं समाधान लाभलं ✅.. म्हटलं ना, कभी-कभी लगता है.. 😜


8️⃣ संगत से स्वभाव तो नहीं बदलता पर कर्म ज़रूर बदल जाते हैं.
१३.७ कि.मी., ५६९ मी. 📈

आजच्या दिवसाला होती भूषणची 'एखादा दिवस घाट रस्त्याने जाऊ'ची फरमाइश.. म्हणजे फिर एक बार पडला '९ सिंहगड'ला खाडा.. आता एखादा ह्याला सुद्धा सिंहगड hike म्हणेल, तर अपनी-अपनी सोच है 🤔.. कोणी हे ही म्हणेल, हा नसेल पकडायचा तर पहिल्या दिवशी आणि परवा दीड-दीड केले, म्हणून उद्याचा पकडून ९ दिवसात ९ होतील.. तर हो, ते बरोबर आहे 🤜🤛.. तरी फिर एक बार, सलग ९ दिवस गड नाही - मुद्दामून.. कारण खाली आहे.. पटलं तर तुम्हीसुद्धा list बनवायला घ्या 📝.. back to today's activity..

भूषण सोबत वहिनी आणि पाखी 🧑‍🧑‍🧒 सुद्धा होत्या.. दुसऱ्या दिवशी उतरलो तोच रस्ता आज उलट / खालच्या दिशेने चढायला सुरू ↗️.. काही वेळाने दोघींना एकमेकींच्या हवाले करत आम्ही पुढे निघालो.. गडावर पोहोचत नाही तर plan बदलून नेहमीच्या वाटेने उतरायचा बेत बनला ↘️.. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना आणि त्यांना निस्वार्थपणे सेवा देणाऱ्यांना आजची ही clockwise परिक्रमा आमच्या क्षमतेनुसार मानवंदना 😊..

on a lighter note.. digital / natural, recorded / live चा फरक सोडला तर कालसारखाच आजचा योगायोग / दैवयोग 🐚.. उद्या सुद्धा, सलग तिसऱ्यादिवशी जर असंच काही झालं / घडलं, तर मला साक्षात परमेश्वराचा अवतार असल्याची खात्री होईल 😇.. "don't have a choice" म्हणतो, तसंच काहीतरी 😆..

जय श्री राम
 
9️⃣ हज़ारों उलझनें हैं राहों में, और कोशिशें बेहिसाब,
इसी का नाम है ज़िन्दगी, चलते रहिये जनाब
८.७ कि.मी., ६२७ मी. 📈

काल घाट रस्त्याने नाही उतरल्यामुळे आज शतक पूर्ण करायला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार होती.. अनपेक्षित घडायला काही scope न ठेवता लेण्यांच्या विचार रविवारच्या फजितीमुळे already डोक्यातून वजा केला होता 🙅‍♂️.. सिद्धगडच्या त्या भयाण स्मृती मनाच्या कोपऱ्यात अशा काही रूतून बसल्या आहेत की, पुन्हा ते धाडस दिवसाढवळ्याही दुरापास्त वाटते.. so, target 💯 साठी revised plan नुसार गडावरचे उर्वरित spots - गडमाथा, wind point आणि पुढील photo - केले की अधिक लागणारं अंतर पुरून उरणार होतं 🤠..

'इतका prologue म्हणजे काहीतरी twist असेल', असं वाटत असल्यास, sorry to disappoint you 😬..

आणि in case you are wondering, आज सुद्धा शंखध्वनी का?.. तर, वाचलो / सुटलो 🤗.. manifestation कामी आलं - खरंच असतं असं काही !? 🤨.. back to pavilion - normal माणसाचा जन्म आहे माझा.. feeling so relieved, नाहीतर Trump सारख्यांचा उद्धार !? 🫠.. नसेल जमत एखादी व्यक्ती तर माणसाने सरळ नाद सोडावा.. period.

जगात भारी ⛰️ सिंहगडची वारी 🙏 (#१०३५ ते #१०४३)

🔢 stats credits: Coros ⌚

बेरीज केली सर्व आकड्यांची तर ९ दिवसात होत आहे १००.६ कि.मी. पायपीट 👣 आणि ६४६९ मी. gain = highest amongst all नवसकाळीs so far.. 👏

comparison करणं नक्कीच चुकीचं ठरेल.. तरी सुरुवातीला जे लिहिलं, त्यातून प्रेरणा घेत 🙇‍♂️, तसं काहीतरी करून extraordinary बनायला किती कष्ट घ्यावे लागतील, ह्याची हळू-हळू जाणीव व्हायला लागली आहे 😰.. भगवान तो नहीं बनना पर extraordinary तो अपुन बनके रहेगा 😏..

एक दिवस वगळला तर रोज आतकरवाडी हुन गड चढणे, आणि बहुधा सोबतीला काहीतरी extras 👽 - अश्यातऱ्हेने ह्यावेळेसची चैत्र नवसकाळी संपन्न झाली, वर्ष २रे.. सिंहगड side accompanied by भूषण, महेश, प्रवीण, देवू, मनीष, रत्ना, पाखी.. तळजाई - पोपटी MWG 🦜..

हिवाळा असो वा उन्हाळा,
दुधाची तहान ताकावर दुधावर चहावर 🫖

तरी '९ दिवस सलग सिंहगड चढाई' अजूनही झालेली नाही / जमली नाही 🙂‍↔️ / जमवली नाही / कमवली नाही.. 'नाही शक्य' अशातला भाग नाही, पण राहू द्याव्या काही गोष्टी मुद्दामून अपुऱ्या 📑.. todo list अगदीच रिकामी सुद्धा चांगली नाही दिसत 😎.. what's in yours ❓

"नवसकाळी" विषयावर पुन्हा आश्विन महिन्यात भेट होईलच..
तोपर्यंत, have a great time 🙋‍♂️..

Sunday, March 1, 2026

Andharban


।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। 

LSoM (marathon नव्हे, फक्त "last sunday of the month") ला अंधरबान / अंधारबन tick-mark ☑️ झाला.. महिना संपायला आल्यावर सरतेशेवटी सरकार पडलं, आणि पाऊसही 👌..

drift of the year ⏩

after watching the video, if you are suspecting it to be AI generated 😅 - wondering such a climate and greenery is not possible to find in today's weather conditions even if it is आंधरबन, you are very much on the right track.. but still, the video is as unadulterated as it should be, only trick being the basic most of all - timelapse..

yet, that pretty much should also contribute nothing in terms of amplifying your hopes to any unbeatable levels which can never be fulfilled.. 'never be fulfilled' as in, in today's 🌡️ weather conditions.. so, here is the second trick.. the video is from a different universe 🌦️.. same place, same group, but a different time zone.. ~Jun '22..

if you missed out on 'Resolution T22' article 📑, will be helping out with the link towards the end, so that along with the drift, you also get to enjoy the swag, frame, peak ⛰️, view, pattern etc. etcetra from that year..
 
 शिलालेख, महादेव मंदिर, हिरडी
 
sometimes the wait is longer because the blessing is bigger.. Andharban.. because it's सह्याद्री !

what's with the title?.. ह्यांचा हा सुद्धा trek गंडला वाटतं?.. आणि, पावसाळ्यात already एकदा करून झाला आहे तर पुन्हा भर उन्हाळ्यात आणि भर उन्हात 🌞 करण्यासारखं असं काय आहे इथे?.. let's see..

when enquired विशाल about the availability the previous day, he replied with a हरी झंडी ✔️.. then checked with वैभव.. since he was also part of the pilot, I was doubtful if he'd come again.. but he said, 'I'll swim 🏊‍♂️,' and he showed up 👇..


now you must be wondering... since when has अंधरबान been / known for swimming ❓.. and what's with this 'pilot trek' here?.. aren't people roaming this area for the last 25+ years, may be more ⁉️ 🤔..

now is the time for the reality check 💔, but that also is the fun part of all.. जो होता है वह अच्छे के लिए होता है.. when this line is used, generally nobody would expect - everything falls / fell in place, and so it be.. the harsh reality is - we were not supposed to trail अंधरबन.. but as they say, समय से पहले और किस्मत से ज्यादा किसीको कुछ नहीं मिलता, we compromised 😒.. had to..

महादेव मंदिर, हिरडी

while the original idea was to descend the कुंडलिका valley along the emrald water 🌊, through origin of the कुंडलिका river (yes, the same one, that's famous for rafting), our ignorance was at its peak.. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं रे 🪅, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है.. least aware of the script, we reached the starting point 🏁.. and that'll also be all from bollywood..

on the way, also learnt about considerably lower RTO registration charges for 🇮🇳 all India permit vehicles 🚐 in Daman and Assam.. so, if you happen to spot any tourist vehicles having DD or AS tattoos ®️, you now know the reason..


and now, you also know the reason behind the spelling mistakes in the article.. unless those got sneaked in un-noingly, are the forced ones and forced once 🤣..

28 February 2026

one of the those few instances, where the intro might be longer than the trek itself..

if you are ever planning to visit this dark forest (नाम में क्या रखा है?), please make a dew note of this.. we were well aware about the needed entry fee 🎫.. least we were aware that this entry doesn't happen offline / on the spot anymore.. मग काय? शोधा network 🛜.. literally, each one of us were made to pay for it on an individual level.. for 25 pax, it was an hour wasted, especially when, for selecting birth date, पंकज was actually going back in time, one month per tap 🤦‍♂️ (what if he was from 60's, instead of 90's) .. trust me, you have also done this some time, so you know, what exactly am I talking about here 😜..

कुंडलिका valley, उन्नेयी धरण, भिरा गाव

our leads tried hard to convince the official that we wanted to hike down the offbeat valley, but he did not budge at all.. नाही ते नाहीच 🥺.. a few mishaps here and there, and suddenly every other area has to deal with the ripples.. somebody had died 🥀 near एकोले / lotus valley, and thus issued were strict guidelines..

last time, we hiked from घुटके till पिंपरी.. today's refreshed plan 🔄 was still from पिंपरी till भिरा, but via हिरडी..

माकड्या आणि बोकड्या ओढ्यांवर बांधलेले गरज नसलेले पूल were something different than last time.. the next distinct thing was what we first took for butterflies 🦋.. however, sensing their collective presence and a somewhat atypical fluttering style, we became skeptical.. observing closely, we realised those were moths..



couple of weeks ago, वैभव was here to hike from नागशेत till पिंपरी, when he learnt about a beautiful महादेव मंदिर at हिर्डी..


अब और का बताएं भैया / बहना 🙃, आज के लिये बस करते हैं 🫠..

what would have been otherwise an expected walk in scorching sun ☀️, turned out to be an unexpected one through the shadows interim.. generally, people are happy the other way, but we had not signed up for this..

if there will be another attempt to hike down the valley, even if all needed precautions / permissions are taken beforehand? - time will tell 🙂‍↔️..

trekचं काय जे झालं ते झालं, best thing that happened today was जेवण 🍱. period.

consecutive weekends, another plan b (b for back-up).. though start and end points were unchanged, the journey unfolded differently than planned.. yet, no complaints.. because it's सह्याद्री ! 🥳.. बऱ्याच गोष्टी ज्या पुण्यात / इतरत्र मिळत नाहीत, त्याचं हे एकमेव ठिकाण!"

another timelapse, course of the day 

उन्नेयी धरणाच्या आसपास कुठेतरी, photo credits: वैभव

annexure

last weekend's plan b, SRT

Resolution T22,

Recent Post

बुरान घाटी

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  you had your day, let tomorrow be ours.. बुरान घाटी .. यहां कल क्या हो, किसने जाना ! welcome to yet another g...