Monday, May 23, 2022

जंगली जयगड

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

इंद्रवज्र inside 👇.. जंगली जयगड

सर्वात महत्त्वाचे आणि अगळे-वेगळे "इंद्रवज्र" अजून due आहे.. पुन्हा येणार !

that's footnote from article on हरिश्चंद्रगड (read here)..
नंतर कधी हरिश्चंद्रगडचा योग तर नाही आला, पण इंद्रवज्र आता मात्र off-the-list ✅ झालाय..

तसं ह्या articleचं title काय ठेवावं, ह्यासाठी बरेच options होते, ज्यांच्या बद्दल आपण पुढे वाचणार आहोतच, 
१. monsoon trek in May
२. the leech attack returns
३. recreation of the moment
४. एक एकोणतीस पाचशे आणि सातशे तीन 
५. trek-- and picnic++

पण recursive call 🔂 केल्यासारखा आज जो इंद्रवज्र इथे अनुभवायला मिळाला, it is but obvious की we have a clear winner 🏆.. ह्याविषयी सुद्धा आपण बोलूच, पण तत्पूर्वी..

उन्हाळ्यात करण्यासारख्या treks पैकी एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील जंगली जयगड.. 'जंगली' म्हणायचं साहजिकच एक कारण इथे असलेलं घनदाट जंगल होय.. दुसरं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या जयगडहुन / जयगडमुळे ह्या गडाला दिलेली वेगळी ओळख, ज्याणेकरून नावातूनच संदर्भ लक्षात यावा 🤐.. नावात खरंच काही नसतं तर "नाम मे क्या रखा है?" म्हणणाऱ्याने खाली आपलं स्वतःचं नाव लावलं नसतं ना! 😬..

२२ मे २०२२

तारीख बदलण्याची आणि आम्ही गाडीत बसायची वेळ एकच 🤝.. base village येई पर्यंत, rather आम्ही (base village) नवजाला पोहचलो तेव्हा उजाडायला सुरवात झाली होती.. (guide) रणजीत उतेकरच्या घरी नाश्ता-चहा 🍛 करून आमची सवारी निघाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे 🐯..

पुण्याहून निघतांना तर आपण मे महिन्याच्या उन्हाळ्यात 🌞 निघालो होतो.. असे किती लांब आलोय, किंवा किती दिवसांनी पोहचलोय, की पावसाचं / पावसाळ्यासारखं ☁️ वातावरण झालंय? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता 😜.. धुक्याने दाटलेल्या ह्या जंगलात रिमझिम पडणाऱ्या पावसाने आम्हाला मागच्या महिन्यात 'winter trek in April' सारखाच हा पण चालू season विरुद्ध असा 'monsoon trek in May' होणार आहे, ह्याची खात्री करून दिली..

कोयना अभयारण्य

पहिल्या पावलापासूनच जंगल असलेल्या ह्या वाटेत शिरत नाही तर dancing leeches नी आमचं स्वागत केलं.. जळू बुटांवर, पायांवर चढत होत्या आणि सतत सप्टेंबर महिन्यात केलेल्या कोळेश्वर trekची नको ती 😔 आठवण करून देत होत्या (read a detailed post here).. 

credits: ज्ञानेश्वर aka माऊली

झटपट आवरत आम्ही ह्या डोंगरमाथ्याला पोहचलो.. समोर होता जंगली जयगड (लोहगडला असलेल्या विंचूकाटा सारखा), जो अद्याप दिसत नव्हता.. आणि अजून दिसत नव्हते कोळकेवाडी ⛰️ (धरण / गड), कोकणकडा, वाशिष्ठी (नदी) 🏞️ वा कुंभार्ली (घाट).. परततांना तरी ह्या दाट धुक्यापलीकडचा नजारा बघायला भेटावा, ही अपेक्षा ठेवत / प्रार्थना 🙏 करत, आम्ही गडाकडे निघालो..

'खाली जाऊन जेवायचंच आहे', भगव्याखाली पोहचत हा हिशोब ⚖️ लक्षात घेत, आम्ही weather clear होण्याची वाट बघत होतो.. ये-जा करणाऱ्या धुक्याचा / ढगांचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला 🤗..


काही दिवसांपूर्वीच दिलीपनी एक photo 🖼️ share केला होता.. आता वेळ होती तो moment recreate करायची 🤳.. योगायोग असा की चौघांचा तोच शर्ट, कुठलंच planning अथवा pre-discussion नाही.. tv 📺 / youtube वरचे illusionist / mentalist, ज्यांचं अश्या influential coincidence वर आधारित talent बघून आपल्याला नवल वाटतं, त्याचं हे छोटंसं प्रात्यक्षिक.. मार्च-२०२१, चकदेव-पर्वत trek (read more, here)..

the moment, recreated

क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसणाऱ्या संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला 🌈 इंद्रवज्र म्हणतात, आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याला हे दिसतं, तो स्वतःलाच (सावली) 👥 त्यात बघतो.. 'नेमकं काय म्हणायचंय?', ते खाली photo मधून लक्षात येईलच.. खूप कधीचा 'कधी बघायला मिळेल' करत आज ही इच्छापूर्ती झाली 😍..

सब्र का फल

credits: राहुल

credits: राहुल

परत रणजीतच्या घरी येऊन जेवण 🍱 करून आम्ही भैरवगडाकडे निघालो, base village पाथरपुंज.. भैरवगड म्हंटलं की काहीतरी अनपेक्षित घडणार हे नक्की 🤨.. मग तो मोरोशीचा असो (read here), शिरपुंजेचा असो (read here) वा कोयनाचा.. base village पर्यंतही पोहचू शकलो नाही, इतका खराब रस्ता (म्हणून articleचं title फक्त 'जंगली जयगड').. तरी, इथपर्यंत आलोय तर जंगलाचा आस्वाद घेऊनच जाऊ म्हणून ३-३.५ कि.मी. jungle walk करून इथे picnic साठी आल्यासारखं आम्ही कलिंगड 🍉, आंबे 🥭, सफरचंद 🍎, करवंद, जांभूळ फस्त केले आणि परतीच्या मार्गाला लागलो..

चांदोली अभयारण्य

bonus म्हणून काहींना शेकरू (Indian Giant Squirrel 🐿️) आणि हरणटोळ सापाचेही (Green Vine Snake 🐍) दर्शन झाले..

हरणटोळ, credits: विशाल, editing: राहुल

शेकरू, credits: राहुल


कुठलाही group photo काढायचा असला की सगळे एका स्वरात म्हणत 'एक एकोणतीस पाचशे' 📱.. म्हणजे काय? तर guess करायला अवघड नसावं, म्हणून विषय वाढवत नाही.. तसंच, फळं कापायला बसलेले कार्यकर्ते, 'सातशे तीन'.. ही किंमत 'folding knife' 🔪 ची - हा guess तसा 
अवघड आहे, म्हणून सांगणं गरजेचं होतं..

credits: एक एकोणतीस पाचशे

21 comments:

  1. Mast!! 👍🏻

    ReplyDelete
  2. भारी लिहलं आहे..

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय..

    ReplyDelete
  4. Awesome trek, awesome illustration! - Thanks for sharing.

    ReplyDelete
  5. Very nice article for reading which gives nature refreshment!🥰

    ReplyDelete
  6. Khup masta lihilay ...always a delight to read !!

    ReplyDelete
  7. As usual awesome....

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...