।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
2-in-1.. दिवे घाट - रामदरा - मल्हारगड - दिवे घाट
पर्यटन बंद 🚷 असलं तरी पाय 👣 घरी बसले नाही पाहिजे, ह्याचे आदर्श कोणाकडून घ्यायचे झाले तर गिरीश आणि गणेश ह्यांच्याकडून घ्यावेत 🙏.. कुठलीही डोंगररांग पकडायची आणि निघाले, trail शाबूत असो वा नसो.. आपणच रस्ता शोधायचा / बनवायचा.. आणि त्यात एखादा किल्ला 🏰 असला म्हणजे आम्ही selfish होऊन नक्कीच आमच्यासाठी shortlist करणार.. असाच एक trail आहे - "दिवे घाट ते मल्हारगड"..
त्यात मागच्या रविवारी विशाल सोबत अंधारबनला गेलो असता तो "रामदरा ते मल्हारगड" कधीतरी plan 📝 करणार असल्याचं कळलं, जो वैभवनेही कधीतरी सुचवला होता.. आणि, most awaited पावसाच्या 🌧️ ठोक्याला आभार म्हणावे / आषाढ महिना just चालू झाला / नुकतीच पूण्याहून वारी गेली / निघाली - ह्यातले काहीही म्हणा, weekendला दिवे घाटहून मल्हारगडला जायचं ठरलं 🤝.. गिरीश सरांचा trail शोधला 🔍 / सापडला / group मध्ये share केला.. येऊन जाऊन १६ कि.मी. असल्याचं लक्षात आलं 😇.. अजून काही लोकांकडून कळलं की flatच आहे.. so, 'main objective' elevation gain 📈 साठी add करण्यात आला रामदरा..
राहुलला रविवारी जमणार नव्हतं म्हणून वार ठरला रविवार.. 😜
०३ जुलै २०२२
चिंतनला pick-up करून, मी आणि महेश ठरल्याप्रमाणे ६:३० 🕡 वाजता, आजच्या starting pointला पोहचलो 🏁.. दिवे घाटात असलेल्या विठ्ठल मूर्तीच्या 🗽 थोडंसं पुढे पालखीच्या विसाव्यासाठी उभारण्यात आलेल्या gazebo जवळ गाडी लावत, मूर्तीकडे जाणाऱ्या वाटेतला gate बंद बघत alternative शोधायला लागलो.. hotel मागून 🔙 जायचं ठरलं खरं पण अजून विकास आणि रविराज यायचे होते, ज्यांना रविवारीच जमणार होतं..
२-३ दिवस भरपूर पाऊस असूनही आज आकाशात ढगांचा 🌤️ पत्ता नव्हता.. सिंहगड भिजत जरी असला तरी इथल्या निसर्गाचा काही मूड नव्हता 😞.. so, sleeves घालून ६:५० ला भर ऊन्हात आम्ही सुरुवात केली.. ridge धरून वर चढत वाटेत एक मंदिर-cum-गोठा लागतो.. तिथे एका इसमाला विचारल्यावर डावीकडे रामदराला (खाली) जायला वाट आहे 📉, हे लक्षात आलं.. इतर लोक चढून उतरतात, आम्ही उतरून चढणार होतो.. Google Maps 'terrain' mode मध्ये elevation कमीत कमी ३०० मी. दाखवत असल्याचं माहिती असूनही 🤫..
सुटसुटीत वाट सोडून, "नंतर येव्हडा चढायचा आहेच म्हणून अजून चढ नको" करत आबड-धोबड वाढलेल्या गवतातून झाडीतून आणि फुलांमधून काट्यांमधून आम्ही traverse करत होतो.. ऊन्हापासून बचाव तर होतोच, तरी sleeves घातल्याचा हा पण एक महत्वाचा फायदा आहे.. तसं विकासने म्हण्टल्याप्रमाणे, exactly किती खरचटलं आहे, हे घरी गेल्यावर अंघोळ 🚿 करतांनाच कळतं - true that.. आमचं नशीब चांगलं होतं, की काहीच नाही कळलं.. touch-wood 🪵.. hope, you read that between the lines too, twice 🤔 🤔..
साधारण ८ वाजता 🕗 रहदारीच्या वाटेला लागताच स्मितहास्याने आमचा चेहरा ☺️ फुलला.. अगदी सुरवातीपासून आमच्या सोबतीने चालणारे आणि इथपर्यंत फक्त आम्हालाच त्रास देणारे, २ कुत्रे 🐕, इथपासून बाकीच्यांच्या चालण्यात पण मध्ये-मध्ये करायला लागले, especially the all-white one with a black ear.. २ आठवड्यांपूर्वी कोंढणपूरहुन सिंहगड चढत असतांना पहिल्यांदाच दिसलेले तांबड्या रंगाचे मखमली ढेकणं 🪲 इथे सुद्धा बघायला मिळाले.. आपला फायदा निसर्गाच्या मर्जीतच आनंद शोधण्यात आहे - मग तो पांढऱ्यात काळा असो वा red velvet ❤️.. त्यापलीकडे गेलं की दर महिन्याला हजेरी लावणारा पाऊण ऐन पावसाळ्यात लपंडाव खेळायला बघतो 🙈..
इथून खाली उतरणे म्हणजे प्रवास होता एका विचाराचा 😐, एका काळजी कडे 🙁.. journey of / from a thought, to worry.. आह से आहा तक आहा से आह तक.. पाऊस नाही तर नाहीच, पण ढगांचा आणि वाऱ्याचाही रुसवा 🌤️.. आम्हाला cross होणारे काही लोकं (जे वर चढत होते) कदाचित हा विचारही करत असतील, 'ह्यांचं चांगलं आहे, already उतरतायेत'.. त्यांना बहुतेक माहिती नसेल, grass ONLY appears to be greener 🍃 on the other side, but never is..
९ च्या 🕘 सुमारास बंद असलेल्या मागच्या gateने रामदरा मंदिराच्या परिसरात crawling entry करत आम्ही parking ने समृद्ध actual entry असलेल्या gate बाहेर walking exit करत नाश्ता 🍔 करायला बसलो.. अर्थातच, वापसीला वेळ होती walking entry आणि crawling exit ची, पाऊण तासाच्या फरकाने..
चढतांना वेळ होती endurance test ची, at ९:४५ 🌡️.. इथला अंदाज चुकायला नको म्हणून तुम्ही वर वाचलं आहेच, ६:५० ला भर ऊन्हात आम्ही सुरुवात केली होती ते.. पण ही चाचणी झाल्याशिवाय मजाही नाही, जशी मागच्या रविवारी नव्हती - अर्थात हे फक्त वयक्तिक मतच.. अंधारबन हा picnic spot सारखा popular आहे, फक्त पावसात भिजायची तयारी असायला हवी.. आणि त्यात independence point 🇮🇳 हून दिसणारी कुंडलिका valley म्हणजे totally worth it.. आमचा plan होता घुटके गावातून चालू करून, ११ कि.मी. दूर पिंपरी गावापर्यंत plain walk 🚶♂️, (थोडाफार) अंधार असलेल्या वनातून.. पण ह्या eventचं highlight होतं शेवटी काढलेला हा time-lapse video..
अंधारबन (पिंपरी)
आज, आम्ही ह्याच्या तिळमात्रही आसपास भटकलो नाही.. वर पोहोचल्यावरच काय ते ऊन्हाशी break-up 💔 झाल्याचं सुख लाभेल, ह्या worst case साठी लागणारी मानसिक तयारी करून आम्ही चढायला सुरवात केली.. continuous चढ नाही, हाच दिलासा 😊, ज्यात थोडीफार साथ होती सूर्याबरोबर झालेल्या लपंडावाची ☺️.. तशी कष्ट करायची गरज फक्त ह्या चढापूर्तीच होती.. ह्या आधी 'आ बैल मुझे मार' वाला traverse घेऊन जे कष्ट घेतले, ते कष्ट नव्हतेच - ती होती खाज 🤪..
किल्ला दिसायला अजून अवकाश होता पण इथे / वर वेगळ्याच प्रकारची कलाकारी बघायला मिळाली.. दगड 🪨 रचलेले दिसतात.. कळायला थोडा वेळ लागला, पण पहिला होता गणपती 🐘 आणि सोबतीला मूषक (वाहक) 🐀.. बाजूला होती एक पताका 🚩.. थोडं पुढे लिहिलं होतं 'ॐ' 🕉️.. किल्ला येता-येता पाणी अडवण्यासाठी भरपूर चर खोदलेल्या दिसल्या आणि अजून वाचायला भेटलं ते 'स्वराज्य', 'मल्हारगड' आणि 'छत्रपती'..
इथून पुढे पावसाचे / पाऊस 🌧️ होणार असल्याचे चिन्ह दिसायला लागले.. ये तो होना ही था.. चढतांना नसतो हा support, पण आता flat आहे ना!.. वाजले होते ११ 🕚 आणि वेळ होती थंड वाऱ्याची.. किल्ल्यावर पोहचत नाही तर सडा शिंपडल्यासारखा पाऊसही हजेरी देऊन गेला..
आज वैभव नव्हता तर त्याच्या पुतण्याकडे / चिंतनकडे अंडी 🥚 आणायचं काम होतं.. as always, महेशकडे चहा होताच ☕.. last minute entry असल्यामुळे विकास messages पूर्ण न वाचताच, म्हणजे पाण्याची फक्त एकच bottle घेऊन आला होता 😁.. त्याला supplement म्हणून रविराजने थेपले, राजगिरा लाडू आणि बरंच काही आणलं होतं.. हे सगळं आणि पराठ्यांवर ताव मारून आम्ही साधारण १२ 🕛 वाजता परतीला निघालो..
आता चिंतनला प्रश्न पडला, त्याच काट्यांमधून परत जायचंय का?.. तर 'सकाळसारखा stunt न करता, गप 😖 ridge वर दिसेल त्या वाटेने चालायचं (नाही दिसली तर बनवायची), किती जरी चढ असला तरी', असं ठरलं.. शेवटपर्यंत highway सारखा सुटसुटात 🛣️, अगदी nominal चढ, जो जाणवतही नाही आणि सकाळसारखा कुत्र्यांचा त्रासही नाही.. गाई 🐄 आणि शेळ्यांचे 🐏 थवे cross करत २ वाजता 🕑 आम्ही back-to-pavilion होतो, विठ्ठल मूर्ती.. 'आत्ता reply / comment करतो, "थवे पक्ष्यांचे 🕊️ असतात, गाई आणि शेळ्यांचे कळप असतात" करताय ना विचार?.. think, think 💭.. it's not illegal yet..
सगळे non-veg 🍗 नाही म्हणून राहुलच्या recommendationला नाराज करून थोडं पुढे सात/बारा hotelला 🍱 जेवायला गाडी 🚘 थांबवण्यात आली (GMaps location)..
'वाटेत झाडं नाहीत' म्हणून शक्यतो पावसाळ्यात करावा, अश्या categoryत असलेल्या मोजक्या treks पैकी एक.. 'दिवे घाट - मल्हारगड' किंवा 'रामदरा - मल्हारगड'.. आज आमचे दोन्ही झाले, म्हणून articleचं title 2-in-1.. असाच अजून एक आहे, 'पुरंदर - कात्रज'.. तुम्ही 🫵 जर हे वाचून हसत नसाल तर तुमचं नाव राहुल, वैभव किंवा महेश नाही, आणि असलं तरी तुम्ही कोंडे, कुलकर्णी किंवा खराडे नाही (all Ks).. 😀





Purandar Katraj hya season la karun gheu.... Rajgad Parikrama was winter trek in April...so seems this was summar trek in monsoon
ReplyDeleteindeed, should have thought of before to title it as 'summer trek in June'.
Deleteyes, Purandar - Katraj is now due for more than a year, let's plan asap.
As usual well written, I too decided to visit Ramdara... Keep it up!!!
ReplyDeleteअप्रतिम लेख, सुरेख मांडणी एका मस्त ट्रेक ची, 2020 आणि 2021 lockdown मध्ये दिवे घाट, बोपदेव घाट, कात्रज घाट, सिंहगड घाट, पाबे घाट या वाटेवरील सर्व वाटा केल्या. पुरंदर ते कात्रज पण सुंदर आहे 26 -27 km चा दमदार ट्रेक, त्या वाटे वरील 2-3 route बघून ठेवले आहेत कधी जमतंय बघू. याच route वरील एक ट्रेक डोक्यात आहे ठरला कि सांगतो.
ReplyDelete🙏🙏
तुम्ही inspiration आहात ह्या सगळ्यामागचे.. असंच मार्गदर्शन करत राहा.. धन्यवाद 🙏
Delete