Wednesday, August 10, 2022

माथेरान

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

दिल खुश कर दिता तुस्सी.. माथेरान (Alexander / Rambaug Point)

जशी Mother's Dayची तारीख दरवर्षी बदलत असते, तसंच, Friendship Day सुद्धा दरवर्षी वेग-वेगळ्या तारखेला साजरा केला जातो.. तिथीनुसार, respectively, मे महिन्यातील दुसरा आणि ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार.. Googleला विचारलं 🔍 तर कळलं - काही देशांचे नियम वेगळे आहेत.. म्हणून एक International Friendship Day सुद्धा असतो - ३० जुलै.. United Nationsनी हे उपक्रम २०११ साली चालू केले.. उद्देश - to promote goodwill between nations, people, cultures, and individuals as means of bridging cultural divides and igniting peace initiatives.. बघा.. सांगा तुम्हीच.. विडंबना आहे की नाही! 🤔.. मैत्री, प्रेम - ज्या गोष्टी आपण रोज celebrate केल्या पाहिजे, त्यासाठी वेगळे दिवस नियुक्त केले गेले आहेत 🤦.. त्यात super crazy thing is - there is even a "Wife Appreciation Day".. by default, आपण जे रोज करतो, त्यासाठी सुद्धा !! 🤦🤦.. म्हणजे.. नाही, there is no म्हणजे.. कोणी मला जर हे समजवू शकलं तर बरं होईल 🙄.. असो..

ह्या आधीच्या post साठी आम्ही ३१ तारखेच्या ज्या planची बली दिली होती, हे article त्यासंदर्भात.. पण त्याआधी,

बैठे-बैठे क्या करें, करना था कुछ काम,
शुरु किया articles लिखना ✍️, करके याद adventures तमाम..

तुम्ही जर ह्या blogची 0ᵗʰ post, "Welcome to my blog", वाचली असेल तर तुम्हाला हे माहिती असलेच की ह्या blogची सुरुवात पहिल्या lockdown 🔒 मध्ये झाली.. घरी बसल्या-बसल्या अनिकेतने काहीतरी timepass म्हणून आपले अनुभव कागदावर ⌨️ उतरवायला सांगितले.. "आपल्याला जमतंय का?" बघत करत त्या महिन्यात (एप्रिल-२०२०) छोटे-छोटे असे १०+ articles type करून झाले.. त्यातलाच एक होता तेव्हाच्या वर्षभर आधी, म्हणजे एप्रिल-२०१९ महिन्यात केलेला 'माथेरान' चा पहिला trek, "भिवपुरी road" railway station 🚃 हून "Garbett Point", जो night trek 🌃 ही होता.. read here..

३+ वर्षांनी परत इथेच, पण लगतच्या पठारावर trek करायचा योग आला, तो म्हणजे दिलीपच्या संगतीने.. अधून-मधून काहीतरी / कधीही न ऐकलेले suggestions देत राहतात.. त्यात हा trek थोडा सुटसुटीत वाटला.. म्हणजे काय?.. तर whatever is your guess, is fine 😉.. काही दिवसांपूर्वी ह्या trekचा trailही सापडला.. त्यामुळे हा काही खूप दिवस वाट बघणार नव्हता..

Alexander Point, Garbett Point, Garbett Plateau 

location बघता असं लक्षात आलं की आजूबाजूला डोंगर आहेत.. म्हणजे आम्हाला एका दरीतून वर जायचं होतं (kind of) आणि कदाचित वाऱ्याचा काही संबंध नसेल.. मुंबई sideला जायचं म्हणजे दुसरा त्रास humidityचा.. त्यात forecast प्रमाणे १२ दरम्यान थोड्याश्या आणि २ वाजता जोरात पावसाचे chances होते.. म्हणजे, चढतांना ज्या तिसऱ्या प्रकारच्या त्रासाची शक्यता होती तो त्रास म्हणजे ऊन 🌥️.. झाली मानसिक तयारी? चलो then..

०७ ऑगस्ट २०२२, Friendship Day 🤗

झोपेचं सुख आज राहुलला आम्हा चौघांपेक्षा जास्त लाभणार होतं.. उठून ४० मिनिटे झाली तरी वैभवच्या last seen ची वेळ बदलली नव्हती 😴.. phone करून उठवलं तेव्हढ्यात दिलीपचा message, १० मिनिट उशीर होतोय.. ह्या सगळ्यामुळे, धायरी फाट्याला पोहचायला जो २०-२५ मिनिट उशीर झाला, त्यामुळे आमचा पुढे अजून अर्धा तास वाया गेला.. कसा? बघूया..

पाषाणहून आम्ही ५ जण साधारण ६:३०ला निघालो ते direct breakfast 🍜 साठी hotel पूर्वा ला थांबायचं आहे, हे target ठेऊन.. हे साहजिक नाही का? मग मी का सांगतोय?.. तर, उशीर केला ना आम्ही निघायला.. मग त्या actionला कोणाची तरी reaction 🪃 नको का? negative publicity, express highway 🛣️ ची recent development वगैरे topics वर गप्पा मारत आम्ही खोपोली exit घेतला आणि red zone 🛑 वाल्या traffic मधे सापडलो..

traffic controller कडून कळलं की driver अडकला आहे, त्याला काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.. म्हणजे, कमीत-कमी जीवंत 🫁 आहे.. आणि काय जे झालं आहे, ते negligible 🤏 नसून considerable आहे.. बाकी सगळ्यांसारखे आम्ही सुद्धा निघालो गाडीतून बाहेर.. घटनास्थळी पोहचलो तर रस्त्याला कोणीतरी २०-२५ फूट बोचकलं होतं आणि त्याच कोणीतरीने रस्त्यावर पांढरा रंगही ⚪ मारला होता.. अजून पुढे जाऊन बघतो तर fuel tank वाहून नेणारा १४ चाकी (ज्यातले २ फाटलेही होते) truck 🚛 रस्त्याच्या उजव्या बाजूला खड्डा-cum-दरीत कलंडला होता आणि त्याला एक crane 🏗️ लावलेली होती.. दोघांची size बघता, ती त्या truckला काढण्यासाठी नसून फक्त driverला वाचवायला लावली आहे, हे लक्षात येत होतं.. बरं, त्या craneचे सर्व, म्हणजे ८ च्या ८ tyres हवेत होते.. २ भक्कम support legsच्या जोरावर शक्य होईल तितकं truckला, rather truckच्या cabinला उचलायचा वायफळ प्रयत्न करत होती.. अजून जोर लावला तर कदाचित craneच truck वर उलटी होईल, हे गणित लक्षात घेत police 👮‍♂️ दुसऱ्या craneची सोय करत होते.. 

रस्त्याच्या मधोमध आडवी लावली असल्याने, कोणालाच पुढे जाणं शक्य नव्हतं 🚫.. तरी बाजूला असलेल्या थोड्याशा जागेतून २ गाड्या गेल्या.. "आमची गाडी पण जाऊ शकते, आणू का?" विचारल्यावर, "त्याच्या बायकोचं लग्न आहे म्हणून त्यांना जाऊ दिलं.. म्हणजे, बायकोच्या घरच्यांकडे".. असं आम्हाला सांगण्यात आलं.. अर्थातच synthetic कपडे घालून कोणी लग्नाला जात नाही, so, असलं काही कारण सांगायचा आम्हाला chance नव्हता 😑..

in the meantime, एक जण त्याची trolley bag 🧳 घेऊन पायीच निघाला.. कुठे जायचं होतं माहित नाही, पण ह्या gesture वरून काहीतरी urgent असल्याचं कोणालाही लक्षात येईलच.. traffic controllerने एका दुचाकी वाल्याला 🛵 त्याला सोडून यायला सांगितलं, may be till bus stop.. तर, situation बघुन, गोड बोलून कोणीही मदत करायला तयार होतं, we all know this 🫡.. 

truck "left hand drive" असता तर driver लगेच बाहेर निघू शकला असता.. पण आणि obviously, "right hand drive" असल्यामुळे आणि सुत्रोसे मिली जानकारीसे steering आणि engine मध्येच त्याचे पाय अडकले होते, ज्यानेकरून त्याला डाव्या बाजूनेही (जी आता वरची बाजू झाली होती) निघणे शक्य नव्हते 😔.. हे सगळं प्रकरण अजून २-३ तास तरी चालेल, हे लक्षात घेत, गाड्यांची line express highway पर्यंत जाण्याच्या आत काहीतरी करायला हवं, म्हणून त्या थोड्याशा जागेतून छोट्या गड्यांना हळू-हळू काढण्यात आलं.. implies, आम्ही सुटलो 😌..

पूर्वाला नाश्ता करून base village बुरुजवाडीला पोहचल्यावर एक मोठा group बघून राहुल, "मी चाललो घरी".. त्याच्या सारखीच आमचीही thought process हीच की, माथेरानला trekking करणाऱ्यांची गर्दी नसेल.. पावसाळ्यात सगळीकडेच गर्दी करतात लोकं, म्हणून आम्ही offbeat route शोधायचे आणि इथेही तेच सोसायचं असेल तर काय फायदा?.. झटपट बूट 🥾 घालून ९:३० 🕤 वाजता (८:३० ऐवजी) आम्ही trail load केला आणि तो दाखवेल ↗️ त्या दिशेने चालायला लागलो..

slowed down version

सपाटीवरचे ३ पैकी २ कि.मी. चालून झाल्यावर एक bridge 🌉 लागला, जिथे पहिला water break म्हणुन ५ मिनिट विश्रांती घेण्यात आली.. पुढचा video 📹 म्हणजे Google Photosची कलाकारी.. यांच्यासोबत (GPhotos) दिलीपची काहीतरी under-the-table setting असणार आहे.. त्याशिवाय "रिठ्याचे दार आणि घोडेपाण्याची नाळ" trekला आणि ह्या trekला काढलेल्या एका photoचं animation, Google आपणहून gift तर नाही करणार 😬.. शेजारच्या दगडाने थोडी साथ दिली असती तर नक्कीच 'perfect' 👌 हे caption दिलं असतं..

under-the-table setting

राहिलेलं १ कि.मी. चालून आम्ही पोहचलो काटवन गावात, जिथून actual चढ लागणार होता.. वाटेत campingला ⛺ आलेला अजून एक group दिसला.. त्यांना cross करत trail सोबत आम्ही सुद्धा डावीकडे / वरच्या दिशेने turn ↖️ घेतला.. ह्यानंतर आम्हाला direct Alexander Pointलाच मनुष्य प्रजातीचा प्राणी बघायला भेटला.. पाऊस नसून ओलाचिंब झालेला shirt 👕 अजिबात वारा नसल्याची साक्ष देत होता 😥.. अधून-मधून किड्यांनी आणि काही ठिकाणी ऊन्हाने थोडा त्रास वाढवायचा प्रयत्न केला, पण आज आमचे मागच्या शनिवारसारखे हाल नाही झाले 😇..

nature + beauty 🦋, credits: वैभव

१२च्या 🕛 ठोक्याच्या आत आम्ही Alexander Point गाठला.. एका बाजूला होता Garbett Plateau (from 3+ yrs ago) आणि दुसरीकडे दिसत होती railing.. Maps बघुन Rambaug Point असल्याचा अंदाज बांधला, जो टपरीवाल्या काकांनी confirm केला 😊.. अजून विचारपूस केल्यावर समजलं की Madhavji Point हून उतरण्यापेक्षा (जो आमचा original plan होता), Rambaug Point हून आम्ही direct बुरुजवाडीला उतरू शकतो.. वाट अगदी मळलेली आहे.. 'परत तेच view बघत उतरायच्या ऐवजी दुसरे view पण बघायला भेटतील, आणि ridge असल्यामुळे वारा सुद्धा असेल' म्हणत आम्ही plan बदलला 😎.. पण त्याआधी जिथून उतरणार होतो, तो point आहे तरी काय / कुठे / कसा, ते बघून यायचं ठरलं..

established pairs प्रमाणे न वैभवने अंडी 🥚 आणली होती (श्रावण असल्यामुळे), न मी पराठे (वर सोय होईलच, ही thought process) आणि न दिलीपने fruits 🍎 🍉 🍇 (सगळेच कारण सांगण्यासारखे नसतात).. राहुल तसाही नेहमी दुसऱ्यांच्या डब्ब्यांवर अवलंबून असतो, म्हणून त्याचा pair अजून बनलेलाच नाहीये (कधी बनेल असं वाटतही नाही) 😂.. तरी "सगळ्यांनी लहानपणापासूनच cooking शिकायला हवं", निमिषच्या ह्या statementला seriously घेऊन त्याने bread 🍞 butter 🧈 jam 🍯 आणले होते 🤪.. राहुल-२ ने आज पण cake 🍩 आणले होते.. so, now we have another entry to the list, राहुल रामपुरा - cake.. 'कुठली list?' विचारताय?.. तर शेजारी, म्हणजे उजवीकडे 👉 जे archive मध्ये articles आहेत, त्यातले लेण्याद्री - हटकेश्वर आणि त्यानंतरचे articles तुम्हाला वाचावे लागतील..

काकांच्या टपरीवर चांगली गर्दी होती, म्हणून शेजारी मावशींकडे निवांत बसून चहा ☕ / कोकम 🍹 घ्यायचं ठरलं.. वर नगरपरिषद आहे म्हणून पाण्याच्या source वर तसं doubt करायचं कारण नव्हतं.. पण आबांकडून कधीतरी जे ऐकलं होतं की चहा बनवतांना पाणी उकळवावं लागतं ♨️, त्यामुळे त्यातल्या त्यात safe option आहे, म्हणून order देण्यात आली - चहा आणि कोकम.. better safe than sorry.. आबा कोण? तर कळसुबाईचं article तुमची वाट बघतंय from मार्च-२०२१ (read here).. scotch 🐕 मार खाऊन table खाली शांत बसला होता..

कोकम, एक चुस्की चाय, scotch

पुढे market sideची गर्दी लवकर आटपून घेत आम्ही 'Rambaug Pointला जायला वेगळा रस्ता आहे का?' अशी एका इसमाकडे चौकशी केली.. "उजवीकडून लांब पडेल, म्हणून डावीकडूनच जा" ऐकत आम्ही आलो त्याच वाटेला लागलो.. Alexander Pointने वर आल्याचं सांगितल्यावर त्याची reaction बघूनच आम्ही खुश झालो.. अरे व्वा, खूप छान.. अवघड रस्त्याने आले तुम्ही.. शेवटच्या पायऱ्या चढतांना पाय कशे छातीला लागतात ना 🥹.. this was highlight of today's trek.. दिल खुश कर दिता तुस्सी 🥳..

१२ वाजेच्या पावसाची आणि आमची भेट काही झाली नाही.. १ वाजता 🕐 Rambaug Pointला दिलीपने आणलेलं तडका मारलेलं protein 🥜 खाऊन आम्ही उतरायला सुरुवात केली.. अंडी नाही आणली म्हणून काय झालं, वैभवने गाजर-काकडी 🥕 🥒, सफरचंद चुकवली नव्हती.. जे विसरले असतील, त्यांच्यासाठी - सफरचंद म्हणजे मराठीत apple 🍎.. वापरावे कधी-कधी, ह्या शब्दांनाही / मराठीलाही बरं वाटेल 🙏.. समोर होती Alexander Point चढलो ती ridge, त्या पलीकडे Garbett Plateau (again from 3+ yrs ago) आणि खाली उतरायला दिसत होती well established पायवाट..

३ वाजेचं target ठेऊन उतरायला चालू केलं.. अधून-मधून वाऱ्याची झुळूक आमच्याशी flirt करत होती.. थेट दगडांवर शेवाळं, गवत आजपर्यंत बघितलं होतं.. पण फुलं, बहुतेक पहिल्यांदाच.. वाटेत एक मुंग्यांचं घरटंही दिसलं..

मुंग्यांचं घरटं - तुम्ही वारूळ ऐकलं / बघितलं असेलच, पण "मुंग्यांचं घरटं"! म्हणजे काय? 💭 तर, पावसाळ्यात वारूळात पाणी भरण्याची शक्यता असल्याने निवाऱ्यासाठी पर्याय हवा म्हणून मुंग्या झाडावर घरटं 🪹 बांधतात.. अंधारबनला विशालने दिलेल्या माहितीनुसार, मुंग्या साधारण मे महिन्यात हे घरटं बांधायला सुरुवात करतात ज्याणेकरुन पावसाळा सुरू होण्याअगोदर ते पूर्ण होतं.. एक season टिकणे, बस इतकंच purpose.. अधिक जानकारी के लिये विशालचं हे छोटंसं article नक्की वाचा..

घरटं, मुंग्यांचं

अर्ध उतरून झाल्यावर दूरवर दिसत होतं मोर्बे धरण.. शेवटचे काही मीटर / मिनिट बाकी असतांना, साधारण २:४५ ला, आमची भेट २ वाजेच्या पावसाशी झाली.. सकाळी चढतांना जेव्हडं भिजलो, तेव्हडं भिजण्याआधीच आम्ही back-to-pavilion आणि पाऊस मुसळधार 🌧️..

green carpet

भुकेच्या बाबतीत तुम्ही असं काहीतरी ऐकलं असेलच - भूक लागलेली असल्यावर काहीही खायला द्या, सगळं चांगलंच लागतं.. पण मी म्हणतो, "हे असले विचित्र, basically 'illogical' conclusion कोणी आणि कसे काढले असावे?".. म्हणजे, literally, "काहीही?".. थोडा विचार करून बघा.. be innovative.. that's right.. आता तुम्ही हे कधी म्हणणार नाही.. you are welcome, by the way.. 🤝

चौकला पोहचत करत आता सोय बघायची होती जेवणाची.. राहुलच्या साडूंनी आमच्यासाठी बंद hotel उघडायला लावलं.. श्रावण आहे म्हणून, थोडं-थोडं करून आणणाऱ्या काकूंनी fresh lot मागवून, जी आम्हाला ४:३० 🕟 पर्यंत वाट बघायला लावून थाळी 🍱 खाऊ घातली, ती म्हणजे अगदी 'उंगलियां चाटते रह जाओगे' इतकी लाजवाब 🤤.. स्थळ: निखिल खानावळ, खोपोली (GMaps location).. आवर्जून recommendation..

हम हैं राही सह्याद्रीके.. फिर मिलेंगे, चलते-चलते.. कारण 👇..

पायांना फुटलेले रस्ते कधीच सुरू होत नाहीत,
किंवा सोडून जात नाहीत
photo and caption credits: दिलीप

Monday, August 1, 2022

शेवत्या घाट - मढे घाट

​।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

मढे घाटातील जीवंत मढ्याची यात्रा.. शेवत्या घाट - मढे घाट.. another experience on a historic route or another historic experience?

भगवान चिले म्हणतात, "महाराजांनी जो इतिहास जगला, तो आपण कमीतकमी अनुभवायला तरी हवा.. ह्याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर, जेव्हा आपण एखाद्या किल्ल्यावरच्या विहिरीतलं पाणी पितो 🍶, तेव्हा हा सुद्धा विचार करायला पाहिजे, की ह्याच विहिरीतलं पाणी महाराजही प्यायचे".. on these same lines, आम्ही आज मढे घाट चढतांना, तानाजींना मरणोपरांत 🥀 ह्याच वाटेने तळकोकणातील त्यांच्या गावी, उमरठला, नेल्याचा इतिहास जगणार होतो..

अंधारबनला गेलो असताच विशालने हा trek plan करणार असल्याचे सांगितले होते.. आणि जेव्हा त्याने schedule announce 📢 केलं, आम्ही आमच्या ३१ तारखेच्या planची बली देत त्याच्यासोबत जायच्या तयारीला लागलो.. खूप कधीचा 'मढे घाट करायचा आहे' म्हणत करत, 'सोबतीला काहीतरी high endurance पाहिजे', ह्याचा योग म्हणजे हे article.. descend via शेवत्या घाट 📉 आणि ascend via मढे घाट 📈..

३० जुलै २०२२

सकाळी उठून WhatsApp check केलं तर group वर already एक message आलेला होता, "reached McD" (today's first pick-up point).. 'मी उशिरा उठलोय का? गजर ⏰ तर चुकीचा नव्हता लावला?' थोडेसे calculations करत, तयारीला लागलो.. कदाचित दिवसा जी traffic 🚦 असते, ते सुद्धा हिशोबत घेत अभिरुचीचा pick-up ५:३० 🕠 ठेवला असावा.. असो, मुद्द्याकडे वळूया..

गाडी वेल्हेहून जाणार म्हणजे नाश्त्याची 🍲 (आणि रात्रीच्या जेवणाचीही) सोय कदम काकांकडे असणार, हा थोडासा अंदाज आला होता.. मिसळ पाव, चहा / coffee ☕ झाल्यावर आम्ही निघतांना काकांना "संध्याकाळी ७ पर्यंत येतो" सांगतच होतो, त्यात त्यांची हजरजबाबी, "इतक्या लवकर येत नाही तुम्ही" 😅.. म्हणजे, 'विशाल कुठे famous नाहीये?' ह्या निरागस प्रश्नाचे साहजिक उत्तर तुम्हाला लक्षात आलं असेलच..

share केलेल्या pdf मधे total distance 20 kms, total elevation gain 550 meters आणि high endurance 💪 अशी information ℹ️ होती.. group सोबत जातोय म्हणून जास्त काही research केला नव्हता, पण 'चढ किती चढायचा आहे?', pdf प्रमाणे ह्याचा हिशोब already गोखले सरांनी 'एक सिंहगड' ⛰️ इतका लावला होता.. केळद पुढे भोर्डी गावात starting pointला झालेल्या introduction round मधे, या आधीच्या batch सोबतही येणाऱ्या, आणि आज repeat 🔁 करणाऱ्या कुशलने आपणहून second opinion दिल्यासारखं सांगितलं की trek खूप मोठा आणि 'high endurance' आहे.. त्यात विशालने सांगितलं की आपण ज्या वाकी गावापर्यंत उतरणार आहोत ते ५० मी. above MSL आहे, म्हणजे ५५० मी. चा gain मढे घाट चढण्यातच होणार होता.. 'त्याआधी किती आहे?', हे अजून गुपितच ㊙️ होतं.. हे सगळे गणित करत असताच, app मधे trail load करण्यात आला आणि निघाली आमची सवारी 🚶..

जुलै महिन्यात झालेल्या कोसळधार ⛈️ पावसाचा अनुभव आपल्या सर्वांना आहेच.. अगदी single digitला टेकलेले सर्वेच धरण 🏝️ आज ७०% च्या पुढे भरलेले आहेत.. त्यात दरड कोसळण्याच्या, रस्ते / वाट वाहून गेल्याच्या बातम्याही 📰 तुम्ही ऐकल्या / बघितल्या 📺 असतीलच.. ह्याचं पहिलं sample इथे सुरुवातीलाच बघायला भेटलं, ते म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं फक्त दुचाकी 🏍️ जाऊ शकेल, असा अर्धवट वाहून गेलेला पूल.. थोडा वेळ तर आम्हीही विचार करायला लागलो होतो की, जे काही राहिलं आहे, त्याला खाली support तरी आहे का? का जायचं शेजारच्या बंधाऱ्यावरून?..

बंधारा

पुलाच्या पलीकडे काही बंगले types 🏡 बांधकाम बघायला भेटले, जी भूमी project अंतर्गत पुनर्वसनाची घरे असावीत.. थोडा वेळ सपाटीवरून चालून झाल्यावर आम्ही चढ चढायला सुरुवात केली.. म्हणजे शेवत्या घाट जिथून उतरायचा आहे, त्या ठिकाणी पोहचण्यासाठी, दोन टप्प्यात २०० + १०० मी. चढावं लागेल, हे आमच्यासाठी hidden charges सारखंच होतं.. आणि, अंदाज लावलेला एक सिंहगड आता multiply ❎ व्हायला सुरुवात झाली होती..


'trail आहे म्हणजे आपण चुकू शकत नाही', असं कधीच नसतं 😞.. आणि थोडंसं adventure झाल्याशिवाय मजा येत नाही, हे ही तितकंच खरं.. कधी आम्ही trailच्या डावीकडे तर कधी उजवीकडे detour करत / होत होतो.. पावसामुळे वाढलेल्या गवतात आणि झाडीत 🎋, वाटेने अस्पष्ट रूप धारण केले होते.. काही क्षणातच आम्ही dead end 🚫 असलेल्या कक्षेत सापडलो.. कार्वीतून कसाबसा रस्ता बनवत डावीकडे खाली trail पर्यंत जे पोहचलो, ती दिवसातली पहिली चूक नव्हती, आणि ना शेवटची.. झऱ्यातून वाहणाऱ्या सह्याद्रीच्या गोड पाण्याने बाटल्या भरून परत पदयात्रा चालू केली.. पाऊस आज त्याचा weekend enjoy 🎉 करत होता.. दडी मारून वर ढगांमधूनच आमची गंमत 😀 बघत होता..

credits: राहुल

इथून पुढे शेवते गावापर्यंत तरी वाट चुकण्याचा प्रश्न नव्हता.. आम्ही ५ जण पुढे निघालो.. आजूबाजूची हिरवळ जणू green carpet 🤗.. सकाळी 🕣 ८:३० ला जे चालू केलं होतं, तेव्हापासून अजून तरी पोटात काही टाकलं नव्हतं आणि आता वाजले होते १२:३०.. खाली उतरतांना डावीकडे दिसणाऱ्या गाढव कड्याचा पसारा मंत्रमुग्ध करणारा होता..

गाढव कडा (पहिली बाजू)

'थोडा पाऊस 🌧️ असता तर pdf मधे दाखवण्यात आलेले बरेच धबधबे आजही बघायला भेटले असते!' हे bad luck 🥹 थोडा वेळ सोबत घेऊन आम्ही आभाळ clear झाल्यानंतरचा view टिपत 'काही खायचं का?' प्रश्नाला होकारार्थी उत्तर देत बसण्याजोगी जागा दिसण्याची वाट बघत होतो 🙄.. त्या घेतलेल्या क्षणभर विश्रांतीत आम्हाला मागून निमिष येतांना दिसले.. ५ चे ६ झालेलो आम्ही १:३० 🕜 वाजता शेवते गावात परत पोटातल्या कावळ्यांच्या आरोळ्यांना 🗣️ थोडं शांत करायला बसलो.. डावीकडे नाही तर उजवीकडे मात्र आता सुंदर धबधबे दिसायला लागले होते..

शेवते धबधबा, credits: सुहासिनी

इथून खाली होता डांबरी घाट रास्ता आणि पावसासारखंच आता ढगांनीही त्यांचं ह्या weekendचं destination बदललं 🪃 होतं.. त्यात एका काकांनी 👳‍♂️ सांगितलं की वाकी गावठाणला जाणारी पायवाट वाहून गेली आहे, म्हणजे आम्हाला संपूर्ण घाट उतरून आदिवासी वाडीहून वाकी गावठाण गाठायचं होतं, additional ४ कि.मी... 'वाडी पर्यंतचा घाट रस्ता तरी थोडाफार skip 🚷 होऊ शकतो का?', तर एक पायवाट असल्याचं समजलं.. थोडं पुढे डावीकडे एक जी वाट दिसत होती, रस्त्याने येणाऱ्या दोन मावशींकडून 👵 confirm करून घेतल्यावर आम्ही उतरायला लागलो.. परत रस्त्याला लागल्यावर सुद्धा आम्ही 'अजून काही skip करता येतंय का?', ह्याचा शोध घेत होतो.. वाडीच्या मागच्या बाजूने जात असतांना, विहिरीजवळ, जणू माकडचेष्टा करतांना पकडले गेल्यागत काही लहान पोरं 👦 आम्हाला बघून पळायला लागले.. १.५ कि.मी. चालून नाही काही तर एखादा कि.मी. अंतर तर नक्कीच वाचवलं असेल, पण जे पुढचं १.५ बाकी होतं, त्याला काहीच पर्याय नव्हता.. एव्हाना, दूरवर मढे घाटातला धबधबा दिसायला सुरुवात झाली होती.. माझं आणि राहुलचं एकंच confusion, तिथे एक मंदिर 🛕 दिसतंय.. मिराज, बाकी काही नाही..


वाजले होते २:३० 🕝.. एका घराबाहेर shed खाली जेवणासाठी योग्य जागा बघून आम्ही ६ टेकलो.. आवाज दिल्यावर ताकाच्या 🥛 demandला नाही काही तर पाण्याच्या 💧 रुपात supply झालाच होता.. बाकीचे वर शेवते गावातच भोजन 🍱 ग्रहण करत असल्याचं समजलं.. आणि हाच होता आजचा सगळ्यात मोठा plus point.. start-to-end अंबानी साहेबांची कृपा होती आमच्यावर 📲.. phone आणि net, दोन्ही कमीत-कमी एका काडीच्या जोरावर तरी आम्हाला सोबतीने होते.. 'पण सगळ्यात मोठा plus point कसा?' 🤨 तर त्यासाठी थोडी वाट बघा, सगळं सांगणार.. title मधले 'historic route' आणि 'historic experience', दोन्ही topics अजून बाकी आहेत.. jio 🃏 आजचा १७वा participant म्हणालात, तरी चालतंय.. 😇

निमिषनी आणलेल्या पाचही प्रकारच्या इडलींची gunpowder चटणी सोबत थोडी-थोडी taste घेऊन, पराठे, भाकरवाडी, चिक्की 🍫 आणि cake 🍰 ने तात्पुरतं संतुष्ट होऊन, कडकडीत ऊन्हात आम्ही निघालो डांबरी रस्त्यावर.. सोबत आणलेल्या छत्रीचा 🌂 पावसात नाही तर कमीत-कमी ऊन्हात 🌞 तरी फायदा करून घेतला.. आम्ही वाकी गावठाणला पोहचत नाही तर बाकीचे ९ लगेच आमच्या सोबतीला, courtesy: टम-टम 🚕.. राहिलेला (१६वा) कुशल अजून पुढे जाऊन bridge 🌉 जवळ आमची वाट बघत होता, जिथून आम्हाला मढे घाट चढायला सुरुवात करायची होती.. 

मध्यांतर - दमले असाल तर pop-corn फुटाणे 🥜 घेऊन या.. picture 🎥 अभी बाकी है..

काही दिवसांपूर्वी दिलीपनी group वर २ धबधब्यांचे photo 🖼️ share केले होते.. Google Lensला 🔍 विचारलं तर कळलं, सातसडा आणि नाणेमाची आहेत.. विशालने ह्याच सातसडाचा सकाळी जो ईशारा केला होता, तो असा, "आपण जर वाकी गावात १-१:३० पर्यंत पोहचलो तर social media वर सध्या viral होत असलेल्या सातसडाला जाऊन येऊ".. आता वाजले होते ३:१५ आणि इथून सातसडा अजून होता २.५ कि.मी... भूगोल, भौतिकशास्त्र, हवामान, गणित आणि (उरलेला) stamina, असं सगळं एकत्र करून 🔣 लक्षात आलं की चढायला रात्र होण्यापेक्षा skip केलेला बरा.. 

पण, कहानीमे twist असा होता, जे आम्हाला अजून माहिती नव्हतं, की कुशल जिथे थांबला आहे (मढे घाट चढायच्या सुरवातीला), तो point ह्या २.५ कि.मी. रस्त्यावरच १.५ कि.मी. पुढे आहे.. 'कुशल दिसेल तिथे थांबतो' म्हणत आम्ही ४ पूढे निघालो, म्हणजे माझ्यासोबत दोन्ही राहुल आणि सुजन.. तिथे पोहचल्यावर २० मिनिटाच्या अंतरावर धबधबा असल्याचं लक्षात येताच, आम्ही मुळीच सोडणार नव्हतो ☺️.. विशालला phone लावत, "आम्ही चौघं सातसडा बघून येतो" सांगत तिथून निघालो.. phone वर असंही कळलं की उर्वरित पैकी काहींमधे मढे घाट (एक सिंहगड) चढायची ताकत राहिलेली नाही.. पाऊस नसल्याने सगळेच परेशान झाले होते 😥 / ऊन्हाने आणि कोकणातल्या दमटपणाने सगळ्यांचीच वाजवली होती 😰.. म्हणून, त्यांनी कर्णवाडीपर्यंत गाडीने 🚖 जाऊन तिथून मढे घाट (अर्धा सिंहगड) चढायचं ठरवलं.. वाजले होते ४ 🕓..

सातसडा धबधबा 👌 - अतिशय सुंदर असा, कपारीतून, rather घळीतून वाहणारा, मोजकीच गर्दी असलेला, अगदी स्वच्छ आणि गोड पाणी वाहून आणणारा, ७ टप्प्यात पडणारा हा धबधबा कमीत-कमी १५०-२०० फूट असणारच.. 'तुम्ही काय miss करताय?', ह्यासाठी लगेच group वर photo share केला.. तरी अजून कोणी त्या वाटेला गेलं / आलं नाही.. ५ मिनिट सह्याद्रीच्या ह्या रूपाचे सौंदर्य निहारत 😍, पाणी पिऊन / सोबत घेऊन परतीला निघालो.. GMaps location

सातसडा धबधबा

जिथून phone केला होता, तिथे परत पोहचत बघतो तर ८ जण अजूनही गाडीची वाट बघताय ⏳.. राहिलेले ४, including कुशल, मढे घाटाच्या पायवाटेवर पुढे निघाले होते.. आता smartphoneच्या locked screen वर आकडे दिसत होते ४:४५.. 'साधारण २ तास जरी लागले तरी अंधार व्हायच्या आत आपण केळदला पोहचू शकतो' हा अंदाज बांधत आम्ही निघालो.. ४ पावलं चालत नाही तर आम्हाला ते चौघं, बारव जवळ भेटले.. म्हणजे, आमचा ८ जणांचा group पूर्ण मढे घाट चढणार होता आणि दुसरा ८ जणांचा group अर्धा.. 

बारव, credits: राहुल

पुढे जाण्याआधी.. तुम्हाला ते 'हम दिल दे चुके सनम' मधलं 'मनमोहिनी' गाणं 🎵 आठवतंय का? 🤔.. त्यातली एक ओळ अशी आहे - 'आग, हवा, पानी को मिलाया, तो फिर ये तस्वीर सजी'.. अतिशयोक्तीचीही अतिशयोक्ती 😲 आहे, पण ठीक आहे - कविता, गाणं, motion picture 📽️ - ह्यांच्यात हे असलं चालतं.. निसर्गाच्या कुठल्याच मर्जी पुढे आपलं काहीच चालत नाही आणि इथे तीन-तीन एकत्र करून एका ललनेच्या सौंदर्याचं 💃 वर्णन केलेलं आहे.. हलवा है क्या?.. असो, हे नमूद करायचं कारण पुढे लगेच लक्षात येईलच..

​माणसं जेव्हड्या प्रकारचे व्यायाम करतात, त्यात सर्वात जास्त थकवणारा व्यायाम म्हणजे swimming 🏊.. कारण हा व्यायाम करायचा असतो त्या गाण्यात वापरलेल्या, निसर्गाच्या 'आग, हवा, पानी' ह्या तीन बलाढ्य शक्तींमधल्या तिसऱ्या शक्ती विरुद्ध.. तुम्ही सुद्धा trek करत असतांना swimming करता / धबधब्याखाली भिजता / अशी काही इच्छा बाळगता का?, तर इथून पुढे काय जे घडलं ते वाचून 'दुसऱ्यांच्या अनुभवातून माणूस लवकर शिकतो', फक्त हे सिद्ध करा..

आमच्या आधी निघालेल्या ४ पैकी कुशल आणि विश्वंभर बारव मधे swimming करून नुकतेच बाहेर आले होते.. आम्ही फक्त photo काढून, मढे घाट समोर ठेऊन, दिसेल ती पायवाट धरत होतो.. पण थोडं चढताच पुढे वाट गायब ⛔.. सागरने थोडं खाली जाऊन आजींनी जे सांगितलं ते आम्हाला relay केलं.. जे आम्ही करत होतो, अगदी same-to-same आजींनीही तेच सांगितलं होतं, "सरळ-सरळ चढा".. अहो, पण पावसाचा उद्रेक इथे आम्हाला काही सुचू देत नव्हता - वाटच समजत / दिसत नव्हती.. तेव्हड्यात विशालचा phone 📲, "वाट सापडली का?".. त्याच्याकडे असलेल्या trailचा screenshot पाठवायला सांगितला.. त्याने screenshot आणि url, दोन्ही पाठवले.. दोन्ही बघून जेव्हा Google Maps 🗺️ बघितला तेव्हा लक्षात असं आलं की आम्हाला अजून डावीकडे जायची गरज आहे.. जमेल तसं डावीकडे जात होतो.. ह्यात एक (पहिली) चूक जी केली, ती अशी की चालता-चालता आम्ही वर सुद्धा चढत होतो.. सरळ-सरळ फक्त डावीकडे गेलो असतो तर लागलीच वाट सापडलीही असती.. 

राहुल / कुशल एका ठिकाणी म्हणाले, "ह्या पुढे जाऊ शकत नाही".. मागून सागरने आवाज दिला, "विश्वंभरला खूप दमल्यासारखं होतंय, खूप slow झालाय".. Google Mapsच्या इशाऱ्यावर थोडं मागे बघून वर नजर 👀 फिरवली तर एक वाट दिसली.. एक झाली होतीच, आणि दुसरी चूक करणे भागच होते.. केली चढायला सुरुवात.. सगळे एका झाडाखाली पोहचलो आणि आता मात्र चांगलेच फसलो.. 'तिथून try करून बघायचं का?', 'फक्त ह्या दगडापलीकडे गेलो की झालं', 'ह्यापुढे जाऊन फसलो तर उतरायला पण नाही जमणार' अशी तब्बल १५ मिनिटं trial and error आणि clash of opinions मध्ये घालवल्यावर, ६ वाजता, "aal izz well, aal izz well" 🫣 करायची वेळ आली होती..

येव्हड्यात विशालचे २-३ phone.. त्याने "range 📶 किती आहे?" विचारल्यावर माझा पहिला प्रश्न होता, "कुठलं app install करू?".. आहेच ना आपल्याला लहानपणापासूनची सवय.. प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी आपण प्रश्नच विचारत सुटतो 😏.. असो.. त्याने "ramblr" app install करून "sgtrekkers" user search करून त्याचा मढे घाटचा trail शोधायला सांगितलं.. वाट शोधायच्या गडबडीत त्याने हे जे सांगितलं होतं, काही केल्या नीट जमत नव्हतं.. सर्वात पुढे असल्याचा फायदा घेत, सगळे चुकीची वाट उतरेपर्यंत, मी ते शांत 😎 बसून जमवून घेतलं.. long live अंबानी.. त्यात विशालने हे पण सांगितलं, "आम्हाला उपांड्या घाट जवळ आहे, आम्ही तिथून चढतोय, तर तुम्ही चढून झाल्यावर गाडी घेऊन आम्हाला पुढून pick-up करा", म्हंटलं "ok"..

६:१५ च्या आसपास जेव्हा trailला join झालो तेव्हा वाटलं, 'आता काही चुकत नाही आपण, सगळं सुरळीत पार पडेल'.. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.. आणि ह्याआधी कुठल्यातरी article मधे म्हण्टल्याप्रमाणे, नशीब हे आपणच लिहीत असतो, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.. तर, आजच्या राहिलेल्या दिवसाचा लेखक होता, विश्वंभर कुलकर्णी.. कुशलने मला विचारलंही, "काय वाटतंय, चढेल का तो?".. 'पर्याय नाही' लक्षात घेत, "आता परत तरी कसा जाईल? काहीही करून घेऊन जाऊ" म्हणालो.. दुसरी महत्वाची गोष्ट होती, working setup असलेला माझा mobile मेला नाही पाहिजे, ज्याला साथ दिली ⛽ सागरच्या powerbankने.. असतं असंच, clientला demo असाच दिला जातो, कारण सगळ्याच system वर product चालेलंच, ह्याची खात्री कोणी देत नसतं 😬..

राहुलने नंतर त्याची thought process 🤔 ही सांगितली, जी चालू होते त्या घटनेपासून, जिथून ह्या घाटाचं नाव, "मढे घाट" पडलं.. सिंहगडच्या लढाईत ⚔️ वीरमरण आलेल्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचं पार्थिव / मढं ⚰️ आजपासून साधारण ३६२ वर्षांपूर्वीच्या परिस्थितींमध्ये जर इथून खाली उतरवू शकले असतील तर नक्कीच ही वाट आजच्या परिस्थितींमध्ये चढायला अवघड नसणार आहे.. म्हणून आम्ही आमच्या इराद्यावर ठाम होतो.. वाट अजिबात न सोडता, ribbon 🎀, arrow ↗️, appचा trail, सगळं अगदी पावलो-पावली check करत, ६:४५ वाजता आम्ही पठारावर आलो आणि विश्वंभर आडवा झाला.. अधून-मधून glucose 🧃 पीत असूनही पाहिजे तशी recovery दिसत नव्हती..

दिवस आता मावळायला टेकला होता 🌄 पण समोर नाणेमाची धबधबा स्पष्ट दिसत होता.. शेवटचा पराठा आणि आणलेले गाजर 🥕 संपवून आम्ही पठारावरच्या जंगलातून पुढे.. तासकाटा ७च्या 🕖 पलीकडे.. हळू-हळू धबधब्याचा आवाज वाढत होता आणि विश्वंभरचा speed कमी होत होता.. bag 🎒 आम्हाला दे.. नाही.. stick 🦯 घेऊन चालतो का?.. नाही.. जेव्हा त्याला खरंच हे realize झालं की आपण कुठेतरी चुकतोय, तेव्हा त्याने 'sorry' म्हणत बाकीचे जे सांगताय त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.. ह्यातलं अजून विशालला किंवा बाकीच्या ७-८ लोकांपैकी कोणालाही काहीच माहित नव्हतं..

गाढव कडा (दुसरी बाजू), नाणेमाची धबधबा

जंगल संपवून शेवटचा चढ सुरु झाला तेव्हा trail follow करत एका पाण्याच्या वाटेला लागलो.. वर म्हण्टल्याप्रमाणे, trail असला म्हणजे 'सब ठीक', असं नसतं 😞.. १०-१५ मी. खाली उतरून उजवीकडे वळालो, तेव्हा विश्वंभर परत आडवा झाला.. त्याला आता बजावून सांगण्यात आलं, "अजिबात पडायचं नाही, उठून बस, हळू हळू का होईना, चालत रहा".. शेवटी विशाललाही सांगितलं / कळवलं, "आम्ही गाडी घेऊन येण्यापेक्षा, तुम्ही उलटे या आणि शक्य तेव्हडं गाडी घेऊन घाटाच्या तोंडापाशी या.. विश्वंभर नाहीच म्हणतोय, त्याच्यासाठी काही करता येत असेल तर बघ" 🙏..

प्रत्येक १० मी. चढाई झाल्यावर, मी group वर १०० - ९० - ८० अशे राहिलेल्या elevationचे updates 📝 टाकत होतो.. long-long live अंबानी, आम्ही खूप-खूप कृतज्ञ आहोत 🤝.. एवढ्यात आमची सत्य-परिस्थिती वर सगळ्यांना कळली असावीच.. शेवट जवळ आहे, हे लक्षात येताच आमचाही वेग वाढला 🏃.. विशालने कुठूनतरी एक दुचाकी 🛵 जुगाड करून घाटाच्या तोंडापाशी आणली.. त्याची आणि आमची वर पोहचायची वेळ almost एकच.. वाजले होते ८ 🕗.. वि ला वि च्या सुपूर्त करून आम्ही राहिलेले ७ जण गाडी (सकाळची २०-seater) 🚐 घेऊन निघालो.. बाकीचे जवळच्याच hotelला आमची वाट बघत होते, ज्यांची दुचाकी विशालने आणली होती 👍..

hotelला भेटलो, तेव्हा वैभवने विचारलं, "कसा होता खडसांबळे २.०?".. तर, त्रास climateचा झाला नव्हताच, म्हणून तसं काही comparison 📊 करायचा प्रश्न नव्हता, पण हा अनुभव खूप काही शिकवून गेला.. विश्वंभर परत सगळ्यांना "sorry" 🙇 म्हणायला लागला.. तर, इतना तो चलता है.. महत्वाचं हे आहे की, आपण सगळे सुखरूप पोहचलो आहोत 🫂.. विशाल said, "trek ही group activity 👥 आहे, होत असतं असं".. इथपर्यंत अस्वलखिंडचा किस्सा जो मुद्दाम मी त्याला सांगितला नव्हता, तो विशालने सांगितला..

अरे, अजून एका गोष्टीचा आज जो त्रास झाला, ते तर सांगायचं राहूनच गेलं.. फक्त कोकणातला काही भाग सोडला तर सुरवातीपासून शेवटपर्यंत, किड्यांनी 🪰 असा त्रास दिलाय की मला सतत ते गाणं आठवत होतं, "दुनिया बनाने वाले, क्या तेरे मन में समाई!.. काहेको दुनिया बनाई किडे बनाये".. 😜 

असो, ते म्हणतात ना, all is well that ends well 🤞.. hmm, trek तर संपला, पण article संपवण्याआधी..

"भाजी कोणती आहे?" ह्या प्रश्नाला काकांचं नेहमीच अगदी ठरलेलं उत्तर असतं, "तुमची favourite".. म्हणून, आम्ही आता हे विचारणं सोडून दिलंय 🤫.. ताटात वाढलेल्या ४-५ भाज्यांपैकी एखादी तरी आपली favourite असतेच.. आजच्या menu मधे होत्या, शेवगा, वांगे 🍆, मेथी, कारलं आणि बटाट्यानंतर सर्वात प्रचलित, म्हणजे पत्ताकोबी.. hotel मधे सांभार पलीकडे पण शेवगा असते / बनते, हा बहुतेक पहिलाच अनुभव.. कारलं आणि मेथी तर मागून-मागून खाल्ल्या (no sarcasm).. trend set झालेला फेब्रुवारी महिन्यातील यावर्षीचा SRT, जो इथेच संपतो, तेव्हा सुद्धा मेथी होती - एकच नंबर असते.. बरं, ज्यांना अजून संदर्भ लागला नाही, त्यांच्यासाठी - कदम काका म्हणजे "तोरणा विहार".. GMaps location

credits: सागर

जेवतांना कुशल म्हणाला, मी जो पहिला मोठा trek केला होता तो म्हणजे 'कात्रज ते राजमाची'.. नाही, तुम्ही काहीच चुकीचं वाचलं नाहीये ✅.. होता है.. २५ कि.मी. चालून, दोन पेक्षा जास्त सिंहगड चढून आणि मरणाची भूक लागलेली असल्यावर कर्जतचं कात्रज होऊ शकतं, ह्यात काहीच नवीन नाही.. माझ्यासाठी कधी-कधी शिवनेरी जसा जेजुरी जवळ असतो, अगदी तसंच 🤐..

जेवण झाल्यावर राहुल (रामपुरा) म्हणाला, ह्या वेळेस blog मधे लिहायला ✍️ खूप काही आहे.. किती cut ✂️ करणार?.. तर नाही, आठवेल तेवढं सगळं लिहिणार type करणार.. movies सारखं थोडं आहे.. २ तासाचं releasable content गोळा करण्यासाठी मोकार shooting 🎬 करत सुटायचं आणि नंतर editing करण्यात वेळ वाया घालवायचा..

तर मित्रांनो, हा होता आजचा जगलेला इतिहास 📕, जो आम्हाला एक इतिहास म्हणूनही लक्षात राहील.. असाच अजून एक नामांकित इतिहास जगायचा बाकी आहे, तो म्हणजे "पन्हाळा ते पावनखिंड".. त्याचं पण article, जेव्हा कधी होईल, त्या वेळेस तुम्ही वाचालच.. पण तोपर्यंत, 'आग, हवा, पानी' ह्यांच्यापासून जरा जपूनच 😊..

Wednesday, July 6, 2022

दिवे घाट - रामदरा - मल्हारगड - दिवे घाट

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

2-in-1.. दिवे घाट - रामदरा - मल्हारगड - दिवे घाट

पर्यटन बंद 🚷 असलं तरी पाय 👣 घरी बसले नाही पाहिजे, ह्याचे आदर्श कोणाकडून घ्यायचे झाले तर गिरीश आणि गणेश ह्यांच्याकडून घ्यावेत 🙏.. कुठलीही डोंगररांग पकडायची आणि निघाले, trail शाबूत असो वा नसो.. आपणच रस्ता शोधायचा / बनवायचा.. आणि त्यात एखादा किल्ला 🏰 असला म्हणजे आम्ही selfish होऊन नक्कीच आमच्यासाठी shortlist करणार.. असाच एक trail आहे - "दिवे घाट ते मल्हारगड".. 

त्यात मागच्या रविवारी विशाल सोबत अंधारबनला गेलो असता तो "रामदरा ते मल्हारगड" कधीतरी plan 📝 करणार असल्याचं कळलं, जो वैभवनेही कधीतरी सुचवला होता.. आणि, most awaited पावसाच्या 🌧️ ठोक्याला आभार म्हणावे / आषाढ महिना just चालू झाला / नुकतीच पूण्याहून वारी गेली / निघाली - ह्यातले काहीही म्हणा, weekendला दिवे घाटहून मल्हारगडला जायचं ठरलं 🤝.. गिरीश सरांचा trail शोधला 🔍 / सापडला / group मध्ये share केला.. येऊन जाऊन १६ कि.मी. असल्याचं लक्षात आलं 😇.. अजून काही लोकांकडून कळलं की flatच आहे.. so, 'main objective' elevation gain 📈 साठी add करण्यात आला रामदरा.. 

राहुलला रविवारी जमणार नव्हतं म्हणून वार ठरला रविवार.. 😜

०३ जुलै २०२२

चिंतनला pick-up करून, मी आणि महेश ठरल्याप्रमाणे ६:३० 🕡 वाजता, आजच्या starting pointला पोहचलो 🏁.. दिवे घाटात असलेल्या विठ्ठल मूर्तीच्या 🗽 थोडंसं पुढे पालखीच्या विसाव्यासाठी उभारण्यात आलेल्या gazebo जवळ गाडी लावत, मूर्तीकडे जाणाऱ्या वाटेतला gate बंद बघत alternative शोधायला लागलो.. hotel मागून 🔙 जायचं ठरलं खरं पण अजून विकास आणि रविराज यायचे होते, ज्यांना रविवारीच जमणार होतं..


२-३ दिवस भरपूर पाऊस असूनही आज आकाशात ढगांचा 🌤️ पत्ता नव्हता.. सिंहगड भिजत जरी असला तरी इथल्या निसर्गाचा काही मूड नव्हता 😞.. so, sleeves घालून ६:५० ला भर ऊन्हात आम्ही सुरुवात केली.. ridge धरून वर चढत वाटेत एक मंदिर-cum-गोठा लागतो.. तिथे एका इसमाला विचारल्यावर डावीकडे रामदराला (खाली) जायला वाट आहे 📉, हे लक्षात आलं.. इतर लोक चढून उतरतात, आम्ही उतरून चढणार होतो.. Google Maps 'terrain' mode मध्ये elevation कमीत कमी ३०० मी. दाखवत असल्याचं माहिती असूनही 🤫..

सुटसुटीत वाट सोडून, "नंतर येव्हडा चढायचा आहेच म्हणून अजून चढ नको" करत आबड-धोबड वाढलेल्या गवतातून झाडीतून आणि फुलांमधून काट्यांमधून आम्ही traverse करत होतो.. ऊन्हापासून बचाव तर होतोच, तरी sleeves घातल्याचा हा पण एक महत्वाचा फायदा आहे.. तसं विकासने म्हण्टल्याप्रमाणे, exactly किती खरचटलं आहे, हे घरी गेल्यावर अंघोळ 🚿 करतांनाच कळतं - true that.. आमचं नशीब चांगलं होतं, की काहीच नाही कळलं.. touch-wood 🪵.. hope, you read that between the lines too, twice 🤔 🤔..

साधारण ८ वाजता 🕗 रहदारीच्या वाटेला लागताच स्मितहास्याने आमचा चेहरा ☺️ फुलला.. अगदी सुरवातीपासून आमच्या सोबतीने चालणारे आणि इथपर्यंत फक्त आम्हालाच त्रास देणारे, २ कुत्रे 🐕, इथपासून बाकीच्यांच्या चालण्यात पण मध्ये-मध्ये करायला लागले, especially the all-white one with a black ear.. २ आठवड्यांपूर्वी कोंढणपूरहुन सिंहगड चढत असतांना पहिल्यांदाच दिसलेले तांबड्या रंगाचे मखमली ढेकणं 🪲 इथे सुद्धा बघायला मिळाले.. आपला फायदा निसर्गाच्या मर्जीतच आनंद शोधण्यात आहे - मग तो पांढऱ्यात काळा असो वा red velvet ❤️.. त्यापलीकडे गेलं की दर महिन्याला हजेरी लावणारा पाऊण ऐन पावसाळ्यात लपंडाव खेळायला बघतो 🙈..

credits: रविराज

इथून खाली उतरणे म्हणजे प्रवास होता एका विचाराचा 😐, एका काळजी कडे 🙁.. journey of / from a thought, to worry.. आह से आहा तक आहा से आह तक.. पाऊस नाही तर नाहीच, पण ढगांचा आणि वाऱ्याचाही रुसवा 🌤️.. आम्हाला cross होणारे काही लोकं (जे वर चढत होते) कदाचित हा विचारही करत असतील, 'ह्यांचं चांगलं आहे, already उतरतायेत'.. त्यांना बहुतेक माहिती नसेल, grass ONLY appears to be greener 🍃 on the other side, but never is..

९ च्या 🕘 सुमारास बंद असलेल्या मागच्या gateने रामदरा मंदिराच्या परिसरात crawling entry करत आम्ही parking ने समृद्ध actual entry असलेल्या gate बाहेर walking exit करत नाश्ता 🍔 करायला बसलो.. अर्थातच, वापसीला वेळ होती walking entry आणि crawling exit ची, पाऊण तासाच्या फरकाने..

credits: रविराज

चढतांना वेळ होती endurance test ची, at ९:४५ 🌡️.. इथला अंदाज चुकायला नको म्हणून तुम्ही वर वाचलं आहेच, ६:५० ला भर ऊन्हात आम्ही सुरुवात केली होती ते.. पण ही चाचणी झाल्याशिवाय मजाही नाही, जशी मागच्या रविवारी नव्हती - अर्थात हे फक्त वयक्तिक मतच.. अंधारबन हा picnic spot सारखा popular आहे, फक्त पावसात भिजायची तयारी असायला हवी.. आणि त्यात independence point 🇮🇳 हून दिसणारी कुंडलिका valley म्हणजे totally worth it.. आमचा plan होता घुटके गावातून चालू करून, ११ कि.मी. दूर पिंपरी गावापर्यंत plain walk 🚶‍♂️, (थोडाफार) अंधार असलेल्या वनातून.. पण ह्या eventचं highlight होतं शेवटी काढलेला हा time-lapse video..

अंधारबन (पिंपरी)

आज, आम्ही ह्याच्या तिळमात्रही आसपास भटकलो नाही.. वर पोहोचल्यावरच काय ते ऊन्हाशी break-up 💔 झाल्याचं सुख लाभेल, ह्या worst case साठी लागणारी मानसिक तयारी करून आम्ही चढायला सुरवात केली.. continuous चढ नाही, हाच दिलासा 😊, ज्यात थोडीफार साथ होती सूर्याबरोबर झालेल्या लपंडावाची ☺️.. तशी कष्ट करायची गरज फक्त ह्या चढापूर्तीच होती.. ह्या आधी 'आ बैल मुझे मार' वाला traverse घेऊन जे कष्ट घेतले, ते कष्ट नव्हतेच - ती होती खाज 🤪..

किल्ला दिसायला अजून अवकाश होता पण इथे / वर वेगळ्याच प्रकारची कलाकारी बघायला मिळाली.. दगड 🪨 रचलेले दिसतात.. कळायला थोडा वेळ लागला, पण पहिला होता गणपती 🐘 आणि सोबतीला मूषक (वाहक) 🐀.. बाजूला होती एक पताका 🚩.. थोडं पुढे लिहिलं होतं 'ॐ' 🕉️.. किल्ला येता-येता पाणी अडवण्यासाठी भरपूर चर खोदलेल्या दिसल्या आणि अजून वाचायला भेटलं ते 'स्वराज्य', 'मल्हारगड' आणि 'छत्रपती'.. 


इथून पुढे पावसाचे / पाऊस 🌧️ होणार असल्याचे चिन्ह दिसायला लागले.. ये तो होना ही था.. चढतांना नसतो हा support, पण आता flat आहे ना!.. वाजले होते ११ 🕚 आणि वेळ होती थंड वाऱ्याची.. किल्ल्यावर पोहचत नाही तर सडा शिंपडल्यासारखा पाऊसही हजेरी देऊन गेला..

आज वैभव नव्हता तर त्याच्या पुतण्याकडे / चिंतनकडे अंडी 🥚 आणायचं काम होतं.. as always, महेशकडे चहा होताच ☕.. last minute entry असल्यामुळे विकास messages पूर्ण न वाचताच, म्हणजे पाण्याची फक्त एकच bottle घेऊन आला होता 😁.. त्याला supplement म्हणून रविराजने थेपले, राजगिरा लाडू आणि बरंच काही आणलं होतं.. हे सगळं आणि पराठ्यांवर ताव मारून आम्ही साधारण १२ 🕛 वाजता परतीला निघालो..


आता चिंतनला प्रश्न पडला, त्याच काट्यांमधून परत जायचंय का?.. तर 'सकाळसारखा stunt न करता, गप 😖 ridge वर दिसेल त्या वाटेने चालायचं (नाही दिसली तर बनवायची), किती जरी चढ असला तरी', असं ठरलं.. शेवटपर्यंत highway सारखा सुटसुटात 🛣️, अगदी nominal चढ, जो जाणवतही नाही आणि सकाळसारखा कुत्र्यांचा त्रासही नाही.. गाई 🐄 आणि शेळ्यांचे 🐏 थवे cross करत २ वाजता 🕑 आम्ही back-to-pavilion होतो, विठ्ठल मूर्ती.. 'आत्ता reply / comment करतो, "थवे पक्ष्यांचे 🕊️ असतात, गाई आणि शेळ्यांचे कळप असतात" करताय ना विचार?.. think, think 💭.. it's not illegal yet..

सगळे non-veg 🍗 नाही म्हणून राहुलच्या recommendationला नाराज करून थोडं पुढे सात/बारा hotelला 🍱 जेवायला गाडी 🚘 थांबवण्यात आली (GMaps location)..

'वाटेत झाडं नाहीत' म्हणून शक्यतो पावसाळ्यात करावा, अश्या categoryत असलेल्या मोजक्या treks पैकी एक.. 'दिवे घाट - मल्हारगड' किंवा 'रामदरा - मल्हारगड'.. आज आमचे दोन्ही झाले, म्हणून articleचं title 2-in-1.. असाच अजून एक आहे, 'पुरंदर - कात्रज'.. तुम्ही 🫵 जर हे वाचून हसत नसाल तर तुमचं नाव राहुल, वैभव किंवा महेश नाही, आणि असलं तरी तुम्ही कोंडे, कुलकर्णी किंवा खराडे नाही (all Ks).. 😀

Recent Post

नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  बट्ट्याबोळ.. नवसकाळी २०२६.. देर आए, दुरुस्त आए   starting 🏁 from where the last year's नवसकाळी edition r...