Wednesday, August 10, 2022

माथेरान

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

दिल खुश कर दिता तुस्सी.. माथेरान (Alexander / Rambaug Point)

जशी Mother's Dayची तारीख दरवर्षी बदलत असते, तसंच, Friendship Day सुद्धा दरवर्षी वेग-वेगळ्या तारखेला साजरा केला जातो.. तिथीनुसार, respectively, मे महिन्यातील दुसरा आणि ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार.. Googleला विचारलं 🔍 तर कळलं - काही देशांचे नियम वेगळे आहेत.. म्हणून एक International Friendship Day सुद्धा असतो - ३० जुलै.. United Nationsनी हे उपक्रम २०११ साली चालू केले.. उद्देश - to promote goodwill between nations, people, cultures, and individuals as means of bridging cultural divides and igniting peace initiatives.. बघा.. सांगा तुम्हीच.. विडंबना आहे की नाही! 🤔.. मैत्री, प्रेम - ज्या गोष्टी आपण रोज celebrate केल्या पाहिजे, त्यासाठी वेगळे दिवस नियुक्त केले गेले आहेत 🤦.. त्यात super crazy thing is - there is even a "Wife Appreciation Day".. by default, आपण जे रोज करतो, त्यासाठी सुद्धा !! 🤦🤦.. म्हणजे.. नाही, there is no म्हणजे.. कोणी मला जर हे समजवू शकलं तर बरं होईल 🙄.. असो..

ह्या आधीच्या post साठी आम्ही ३१ तारखेच्या ज्या planची बली दिली होती, हे article त्यासंदर्भात.. पण त्याआधी,

बैठे-बैठे क्या करें, करना था कुछ काम,
शुरु किया articles लिखना ✍️, करके याद adventures तमाम..

तुम्ही जर ह्या blogची 0ᵗʰ post, "Welcome to my blog", वाचली असेल तर तुम्हाला हे माहिती असलेच की ह्या blogची सुरुवात पहिल्या lockdown 🔒 मध्ये झाली.. घरी बसल्या-बसल्या अनिकेतने काहीतरी timepass म्हणून आपले अनुभव कागदावर ⌨️ उतरवायला सांगितले.. "आपल्याला जमतंय का?" बघत करत त्या महिन्यात (एप्रिल-२०२०) छोटे-छोटे असे १०+ articles type करून झाले.. त्यातलाच एक होता तेव्हाच्या वर्षभर आधी, म्हणजे एप्रिल-२०१९ महिन्यात केलेला 'माथेरान' चा पहिला trek, "भिवपुरी road" railway station 🚃 हून "Garbett Point", जो night trek 🌃 ही होता.. read here..

३+ वर्षांनी परत इथेच, पण लगतच्या पठारावर trek करायचा योग आला, तो म्हणजे दिलीपच्या संगतीने.. अधून-मधून काहीतरी / कधीही न ऐकलेले suggestions देत राहतात.. त्यात हा trek थोडा सुटसुटीत वाटला.. म्हणजे काय?.. तर whatever is your guess, is fine 😉.. काही दिवसांपूर्वी ह्या trekचा trailही सापडला.. त्यामुळे हा काही खूप दिवस वाट बघणार नव्हता..

Alexander Point, Garbett Point, Garbett Plateau 

location बघता असं लक्षात आलं की आजूबाजूला डोंगर आहेत.. म्हणजे आम्हाला एका दरीतून वर जायचं होतं (kind of) आणि कदाचित वाऱ्याचा काही संबंध नसेल.. मुंबई sideला जायचं म्हणजे दुसरा त्रास humidityचा.. त्यात forecast प्रमाणे १२ दरम्यान थोड्याश्या आणि २ वाजता जोरात पावसाचे chances होते.. म्हणजे, चढतांना ज्या तिसऱ्या प्रकारच्या त्रासाची शक्यता होती तो त्रास म्हणजे ऊन 🌥️.. झाली मानसिक तयारी? चलो then..

०७ ऑगस्ट २०२२, Friendship Day 🤗

झोपेचं सुख आज राहुलला आम्हा चौघांपेक्षा जास्त लाभणार होतं.. उठून ४० मिनिटे झाली तरी वैभवच्या last seen ची वेळ बदलली नव्हती 😴.. phone करून उठवलं तेव्हढ्यात दिलीपचा message, १० मिनिट उशीर होतोय.. ह्या सगळ्यामुळे, धायरी फाट्याला पोहचायला जो २०-२५ मिनिट उशीर झाला, त्यामुळे आमचा पुढे अजून अर्धा तास वाया गेला.. कसा? बघूया..

पाषाणहून आम्ही ५ जण साधारण ६:३०ला निघालो ते direct breakfast 🍜 साठी hotel पूर्वा ला थांबायचं आहे, हे target ठेऊन.. हे साहजिक नाही का? मग मी का सांगतोय?.. तर, उशीर केला ना आम्ही निघायला.. मग त्या actionला कोणाची तरी reaction 🪃 नको का? negative publicity, express highway 🛣️ ची recent development वगैरे topics वर गप्पा मारत आम्ही खोपोली exit घेतला आणि red zone 🛑 वाल्या traffic मधे सापडलो..

traffic controller कडून कळलं की driver अडकला आहे, त्याला काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.. म्हणजे, कमीत-कमी जीवंत 🫁 आहे.. आणि काय जे झालं आहे, ते negligible 🤏 नसून considerable आहे.. बाकी सगळ्यांसारखे आम्ही सुद्धा निघालो गाडीतून बाहेर.. घटनास्थळी पोहचलो तर रस्त्याला कोणीतरी २०-२५ फूट बोचकलं होतं आणि त्याच कोणीतरीने रस्त्यावर पांढरा रंगही ⚪ मारला होता.. अजून पुढे जाऊन बघतो तर fuel tank वाहून नेणारा १४ चाकी (ज्यातले २ फाटलेही होते) truck 🚛 रस्त्याच्या उजव्या बाजूला खड्डा-cum-दरीत कलंडला होता आणि त्याला एक crane 🏗️ लावलेली होती.. दोघांची size बघता, ती त्या truckला काढण्यासाठी नसून फक्त driverला वाचवायला लावली आहे, हे लक्षात येत होतं.. बरं, त्या craneचे सर्व, म्हणजे ८ च्या ८ tyres हवेत होते.. २ भक्कम support legsच्या जोरावर शक्य होईल तितकं truckला, rather truckच्या cabinला उचलायचा वायफळ प्रयत्न करत होती.. अजून जोर लावला तर कदाचित craneच truck वर उलटी होईल, हे गणित लक्षात घेत police 👮‍♂️ दुसऱ्या craneची सोय करत होते.. 

रस्त्याच्या मधोमध आडवी लावली असल्याने, कोणालाच पुढे जाणं शक्य नव्हतं 🚫.. तरी बाजूला असलेल्या थोड्याशा जागेतून २ गाड्या गेल्या.. "आमची गाडी पण जाऊ शकते, आणू का?" विचारल्यावर, "त्याच्या बायकोचं लग्न आहे म्हणून त्यांना जाऊ दिलं.. म्हणजे, बायकोच्या घरच्यांकडे".. असं आम्हाला सांगण्यात आलं.. अर्थातच synthetic कपडे घालून कोणी लग्नाला जात नाही, so, असलं काही कारण सांगायचा आम्हाला chance नव्हता 😑..

in the meantime, एक जण त्याची trolley bag 🧳 घेऊन पायीच निघाला.. कुठे जायचं होतं माहित नाही, पण ह्या gesture वरून काहीतरी urgent असल्याचं कोणालाही लक्षात येईलच.. traffic controllerने एका दुचाकी वाल्याला 🛵 त्याला सोडून यायला सांगितलं, may be till bus stop.. तर, situation बघुन, गोड बोलून कोणीही मदत करायला तयार होतं, we all know this 🫡.. 

truck "left hand drive" असता तर driver लगेच बाहेर निघू शकला असता.. पण आणि obviously, "right hand drive" असल्यामुळे आणि सुत्रोसे मिली जानकारीसे steering आणि engine मध्येच त्याचे पाय अडकले होते, ज्यानेकरून त्याला डाव्या बाजूनेही (जी आता वरची बाजू झाली होती) निघणे शक्य नव्हते 😔.. हे सगळं प्रकरण अजून २-३ तास तरी चालेल, हे लक्षात घेत, गाड्यांची line express highway पर्यंत जाण्याच्या आत काहीतरी करायला हवं, म्हणून त्या थोड्याशा जागेतून छोट्या गड्यांना हळू-हळू काढण्यात आलं.. implies, आम्ही सुटलो 😌..

पूर्वाला नाश्ता करून base village बुरुजवाडीला पोहचल्यावर एक मोठा group बघून राहुल, "मी चाललो घरी".. त्याच्या सारखीच आमचीही thought process हीच की, माथेरानला trekking करणाऱ्यांची गर्दी नसेल.. पावसाळ्यात सगळीकडेच गर्दी करतात लोकं, म्हणून आम्ही offbeat route शोधायचे आणि इथेही तेच सोसायचं असेल तर काय फायदा?.. झटपट बूट 🥾 घालून ९:३० 🕤 वाजता (८:३० ऐवजी) आम्ही trail load केला आणि तो दाखवेल ↗️ त्या दिशेने चालायला लागलो..

slowed down version

सपाटीवरचे ३ पैकी २ कि.मी. चालून झाल्यावर एक bridge 🌉 लागला, जिथे पहिला water break म्हणुन ५ मिनिट विश्रांती घेण्यात आली.. पुढचा video 📹 म्हणजे Google Photosची कलाकारी.. यांच्यासोबत (GPhotos) दिलीपची काहीतरी under-the-table setting असणार आहे.. त्याशिवाय "रिठ्याचे दार आणि घोडेपाण्याची नाळ" trekला आणि ह्या trekला काढलेल्या एका photoचं animation, Google आपणहून gift तर नाही करणार 😬.. शेजारच्या दगडाने थोडी साथ दिली असती तर नक्कीच 'perfect' 👌 हे caption दिलं असतं..

under-the-table setting

राहिलेलं १ कि.मी. चालून आम्ही पोहचलो काटवन गावात, जिथून actual चढ लागणार होता.. वाटेत campingला ⛺ आलेला अजून एक group दिसला.. त्यांना cross करत trail सोबत आम्ही सुद्धा डावीकडे / वरच्या दिशेने turn ↖️ घेतला.. ह्यानंतर आम्हाला direct Alexander Pointलाच मनुष्य प्रजातीचा प्राणी बघायला भेटला.. पाऊस नसून ओलाचिंब झालेला shirt 👕 अजिबात वारा नसल्याची साक्ष देत होता 😥.. अधून-मधून किड्यांनी आणि काही ठिकाणी ऊन्हाने थोडा त्रास वाढवायचा प्रयत्न केला, पण आज आमचे मागच्या शनिवारसारखे हाल नाही झाले 😇..

nature + beauty 🦋, credits: वैभव

१२च्या 🕛 ठोक्याच्या आत आम्ही Alexander Point गाठला.. एका बाजूला होता Garbett Plateau (from 3+ yrs ago) आणि दुसरीकडे दिसत होती railing.. Maps बघुन Rambaug Point असल्याचा अंदाज बांधला, जो टपरीवाल्या काकांनी confirm केला 😊.. अजून विचारपूस केल्यावर समजलं की Madhavji Point हून उतरण्यापेक्षा (जो आमचा original plan होता), Rambaug Point हून आम्ही direct बुरुजवाडीला उतरू शकतो.. वाट अगदी मळलेली आहे.. 'परत तेच view बघत उतरायच्या ऐवजी दुसरे view पण बघायला भेटतील, आणि ridge असल्यामुळे वारा सुद्धा असेल' म्हणत आम्ही plan बदलला 😎.. पण त्याआधी जिथून उतरणार होतो, तो point आहे तरी काय / कुठे / कसा, ते बघून यायचं ठरलं..

established pairs प्रमाणे न वैभवने अंडी 🥚 आणली होती (श्रावण असल्यामुळे), न मी पराठे (वर सोय होईलच, ही thought process) आणि न दिलीपने fruits 🍎 🍉 🍇 (सगळेच कारण सांगण्यासारखे नसतात).. राहुल तसाही नेहमी दुसऱ्यांच्या डब्ब्यांवर अवलंबून असतो, म्हणून त्याचा pair अजून बनलेलाच नाहीये (कधी बनेल असं वाटतही नाही) 😂.. तरी "सगळ्यांनी लहानपणापासूनच cooking शिकायला हवं", निमिषच्या ह्या statementला seriously घेऊन त्याने bread 🍞 butter 🧈 jam 🍯 आणले होते 🤪.. राहुल-२ ने आज पण cake 🍩 आणले होते.. so, now we have another entry to the list, राहुल रामपुरा - cake.. 'कुठली list?' विचारताय?.. तर शेजारी, म्हणजे उजवीकडे 👉 जे archive मध्ये articles आहेत, त्यातले लेण्याद्री - हटकेश्वर आणि त्यानंतरचे articles तुम्हाला वाचावे लागतील..

काकांच्या टपरीवर चांगली गर्दी होती, म्हणून शेजारी मावशींकडे निवांत बसून चहा ☕ / कोकम 🍹 घ्यायचं ठरलं.. वर नगरपरिषद आहे म्हणून पाण्याच्या source वर तसं doubt करायचं कारण नव्हतं.. पण आबांकडून कधीतरी जे ऐकलं होतं की चहा बनवतांना पाणी उकळवावं लागतं ♨️, त्यामुळे त्यातल्या त्यात safe option आहे, म्हणून order देण्यात आली - चहा आणि कोकम.. better safe than sorry.. आबा कोण? तर कळसुबाईचं article तुमची वाट बघतंय from मार्च-२०२१ (read here).. scotch 🐕 मार खाऊन table खाली शांत बसला होता..

कोकम, एक चुस्की चाय, scotch

पुढे market sideची गर्दी लवकर आटपून घेत आम्ही 'Rambaug Pointला जायला वेगळा रस्ता आहे का?' अशी एका इसमाकडे चौकशी केली.. "उजवीकडून लांब पडेल, म्हणून डावीकडूनच जा" ऐकत आम्ही आलो त्याच वाटेला लागलो.. Alexander Pointने वर आल्याचं सांगितल्यावर त्याची reaction बघूनच आम्ही खुश झालो.. अरे व्वा, खूप छान.. अवघड रस्त्याने आले तुम्ही.. शेवटच्या पायऱ्या चढतांना पाय कशे छातीला लागतात ना 🥹.. this was highlight of today's trek.. दिल खुश कर दिता तुस्सी 🥳..

१२ वाजेच्या पावसाची आणि आमची भेट काही झाली नाही.. १ वाजता 🕐 Rambaug Pointला दिलीपने आणलेलं तडका मारलेलं protein 🥜 खाऊन आम्ही उतरायला सुरुवात केली.. अंडी नाही आणली म्हणून काय झालं, वैभवने गाजर-काकडी 🥕 🥒, सफरचंद चुकवली नव्हती.. जे विसरले असतील, त्यांच्यासाठी - सफरचंद म्हणजे मराठीत apple 🍎.. वापरावे कधी-कधी, ह्या शब्दांनाही / मराठीलाही बरं वाटेल 🙏.. समोर होती Alexander Point चढलो ती ridge, त्या पलीकडे Garbett Plateau (again from 3+ yrs ago) आणि खाली उतरायला दिसत होती well established पायवाट..

३ वाजेचं target ठेऊन उतरायला चालू केलं.. अधून-मधून वाऱ्याची झुळूक आमच्याशी flirt करत होती.. थेट दगडांवर शेवाळं, गवत आजपर्यंत बघितलं होतं.. पण फुलं, बहुतेक पहिल्यांदाच.. वाटेत एक मुंग्यांचं घरटंही दिसलं..

मुंग्यांचं घरटं - तुम्ही वारूळ ऐकलं / बघितलं असेलच, पण "मुंग्यांचं घरटं"! म्हणजे काय? 💭 तर, पावसाळ्यात वारूळात पाणी भरण्याची शक्यता असल्याने निवाऱ्यासाठी पर्याय हवा म्हणून मुंग्या झाडावर घरटं 🪹 बांधतात.. अंधारबनला विशालने दिलेल्या माहितीनुसार, मुंग्या साधारण मे महिन्यात हे घरटं बांधायला सुरुवात करतात ज्याणेकरुन पावसाळा सुरू होण्याअगोदर ते पूर्ण होतं.. एक season टिकणे, बस इतकंच purpose.. अधिक जानकारी के लिये विशालचं हे छोटंसं article नक्की वाचा..

घरटं, मुंग्यांचं

अर्ध उतरून झाल्यावर दूरवर दिसत होतं मोर्बे धरण.. शेवटचे काही मीटर / मिनिट बाकी असतांना, साधारण २:४५ ला, आमची भेट २ वाजेच्या पावसाशी झाली.. सकाळी चढतांना जेव्हडं भिजलो, तेव्हडं भिजण्याआधीच आम्ही back-to-pavilion आणि पाऊस मुसळधार 🌧️..

green carpet

भुकेच्या बाबतीत तुम्ही असं काहीतरी ऐकलं असेलच - भूक लागलेली असल्यावर काहीही खायला द्या, सगळं चांगलंच लागतं.. पण मी म्हणतो, "हे असले विचित्र, basically 'illogical' conclusion कोणी आणि कसे काढले असावे?".. म्हणजे, literally, "काहीही?".. थोडा विचार करून बघा.. be innovative.. that's right.. आता तुम्ही हे कधी म्हणणार नाही.. you are welcome, by the way.. 🤝

चौकला पोहचत करत आता सोय बघायची होती जेवणाची.. राहुलच्या साडूंनी आमच्यासाठी बंद hotel उघडायला लावलं.. श्रावण आहे म्हणून, थोडं-थोडं करून आणणाऱ्या काकूंनी fresh lot मागवून, जी आम्हाला ४:३० 🕟 पर्यंत वाट बघायला लावून थाळी 🍱 खाऊ घातली, ती म्हणजे अगदी 'उंगलियां चाटते रह जाओगे' इतकी लाजवाब 🤤.. स्थळ: निखिल खानावळ, खोपोली (GMaps location).. आवर्जून recommendation..

हम हैं राही सह्याद्रीके.. फिर मिलेंगे, चलते-चलते.. कारण 👇..

पायांना फुटलेले रस्ते कधीच सुरू होत नाहीत,
किंवा सोडून जात नाहीत
photo and caption credits: दिलीप

4 comments:

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...