।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
मढे घाटातील जीवंत मढ्याची यात्रा.. शेवत्या घाट - मढे घाट.. another experience on a historic route or another historic experience?
भगवान चिले म्हणतात, "महाराजांनी जो इतिहास जगला, तो आपण कमीतकमी अनुभवायला तरी हवा.. ह्याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर, जेव्हा आपण एखाद्या किल्ल्यावरच्या विहिरीतलं पाणी पितो 🍶, तेव्हा हा सुद्धा विचार करायला पाहिजे, की ह्याच विहिरीतलं पाणी महाराजही प्यायचे".. on these same lines, आम्ही आज मढे घाट चढतांना, तानाजींना मरणोपरांत 🥀 ह्याच वाटेने तळकोकणातील त्यांच्या गावी, उमरठला, नेल्याचा इतिहास जगणार होतो..
अंधारबनला गेलो असताच विशालने हा trek plan करणार असल्याचे सांगितले होते.. आणि जेव्हा त्याने schedule announce 📢 केलं, आम्ही आमच्या ३१ तारखेच्या planची बली देत त्याच्यासोबत जायच्या तयारीला लागलो.. खूप कधीचा 'मढे घाट करायचा आहे' म्हणत करत, 'सोबतीला काहीतरी high endurance पाहिजे', ह्याचा योग म्हणजे हे article.. descend via शेवत्या घाट 📉 आणि ascend via मढे घाट 📈..
३० जुलै २०२२
सकाळी उठून WhatsApp check केलं तर group वर already एक message आलेला होता, "reached McD" (today's first pick-up point).. 'मी उशिरा उठलोय का? गजर ⏰ तर चुकीचा नव्हता लावला?' थोडेसे calculations करत, तयारीला लागलो.. कदाचित दिवसा जी traffic 🚦 असते, ते सुद्धा हिशोबत घेत अभिरुचीचा pick-up ५:३० 🕠 ठेवला असावा.. असो, मुद्द्याकडे वळूया..
गाडी वेल्हेहून जाणार म्हणजे नाश्त्याची 🍲 (आणि रात्रीच्या जेवणाचीही) सोय कदम काकांकडे असणार, हा थोडासा अंदाज आला होता.. मिसळ पाव, चहा / coffee ☕ झाल्यावर आम्ही निघतांना काकांना "संध्याकाळी ७ पर्यंत येतो" सांगतच होतो, त्यात त्यांची हजरजबाबी, "इतक्या लवकर येत नाही तुम्ही" 😅.. म्हणजे, 'विशाल कुठे famous नाहीये?' ह्या निरागस प्रश्नाचे साहजिक उत्तर तुम्हाला लक्षात आलं असेलच..
share केलेल्या pdf मधे total distance 20 kms, total elevation gain 550 meters आणि high endurance 💪 अशी information ℹ️ होती.. group सोबत जातोय म्हणून जास्त काही research केला नव्हता, पण 'चढ किती चढायचा आहे?', pdf प्रमाणे ह्याचा हिशोब already गोखले सरांनी 'एक सिंहगड' ⛰️ इतका लावला होता.. केळद पुढे भोर्डी गावात starting pointला झालेल्या introduction round मधे, या आधीच्या batch सोबतही येणाऱ्या, आणि आज repeat 🔁 करणाऱ्या कुशलने आपणहून second opinion दिल्यासारखं सांगितलं की trek खूप मोठा आणि 'high endurance' आहे.. त्यात विशालने सांगितलं की आपण ज्या वाकी गावापर्यंत उतरणार आहोत ते ५० मी. above MSL आहे, म्हणजे ५५० मी. चा gain मढे घाट चढण्यातच होणार होता.. 'त्याआधी किती आहे?', हे अजून गुपितच ㊙️ होतं.. हे सगळे गणित करत असताच, app मधे trail load करण्यात आला आणि निघाली आमची सवारी 🚶..
जुलै महिन्यात झालेल्या कोसळधार ⛈️ पावसाचा अनुभव आपल्या सर्वांना आहेच.. अगदी single digitला टेकलेले सर्वेच धरण 🏝️ आज ७०% च्या पुढे भरलेले आहेत.. त्यात दरड कोसळण्याच्या, रस्ते / वाट वाहून गेल्याच्या बातम्याही 📰 तुम्ही ऐकल्या / बघितल्या 📺 असतीलच.. ह्याचं पहिलं sample इथे सुरुवातीलाच बघायला भेटलं, ते म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं फक्त दुचाकी 🏍️ जाऊ शकेल, असा अर्धवट वाहून गेलेला पूल.. थोडा वेळ तर आम्हीही विचार करायला लागलो होतो की, जे काही राहिलं आहे, त्याला खाली support तरी आहे का? का जायचं शेजारच्या बंधाऱ्यावरून?..
पुलाच्या पलीकडे काही बंगले types 🏡 बांधकाम बघायला भेटले, जी भूमी project अंतर्गत पुनर्वसनाची घरे असावीत.. थोडा वेळ सपाटीवरून चालून झाल्यावर आम्ही चढ चढायला सुरुवात केली.. म्हणजे शेवत्या घाट जिथून उतरायचा आहे, त्या ठिकाणी पोहचण्यासाठी, दोन टप्प्यात २०० + १०० मी. चढावं लागेल, हे आमच्यासाठी hidden charges सारखंच होतं.. आणि, अंदाज लावलेला एक सिंहगड आता multiply ❎ व्हायला सुरुवात झाली होती..
'trail आहे म्हणजे आपण चुकू शकत नाही', असं कधीच नसतं 😞.. आणि थोडंसं adventure झाल्याशिवाय मजा येत नाही, हे ही तितकंच खरं.. कधी आम्ही trailच्या डावीकडे तर कधी उजवीकडे detour करत / होत होतो.. पावसामुळे वाढलेल्या गवतात आणि झाडीत 🎋, वाटेने अस्पष्ट रूप धारण केले होते.. काही क्षणातच आम्ही dead end 🚫 असलेल्या कक्षेत सापडलो.. कार्वीतून कसाबसा रस्ता बनवत डावीकडे खाली trail पर्यंत जे पोहचलो, ती दिवसातली पहिली चूक नव्हती, आणि ना शेवटची.. झऱ्यातून वाहणाऱ्या सह्याद्रीच्या गोड पाण्याने बाटल्या भरून परत पदयात्रा चालू केली.. पाऊस आज त्याचा weekend enjoy 🎉 करत होता.. दडी मारून वर ढगांमधूनच आमची गंमत 😀 बघत होता..
इथून पुढे शेवते गावापर्यंत तरी वाट चुकण्याचा प्रश्न नव्हता.. आम्ही ५ जण पुढे निघालो.. आजूबाजूची हिरवळ जणू green carpet 🤗.. सकाळी 🕣 ८:३० ला जे चालू केलं होतं, तेव्हापासून अजून तरी पोटात काही टाकलं नव्हतं आणि आता वाजले होते १२:३०.. खाली उतरतांना डावीकडे दिसणाऱ्या गाढव कड्याचा पसारा मंत्रमुग्ध करणारा होता..
'थोडा पाऊस 🌧️ असता तर pdf मधे दाखवण्यात आलेले बरेच धबधबे आजही बघायला भेटले असते!' हे bad luck 🥹 थोडा वेळ सोबत घेऊन आम्ही आभाळ clear झाल्यानंतरचा view टिपत 'काही खायचं का?' प्रश्नाला होकारार्थी उत्तर देत बसण्याजोगी जागा दिसण्याची वाट बघत होतो 🙄.. त्या घेतलेल्या क्षणभर विश्रांतीत आम्हाला मागून निमिष येतांना दिसले.. ५ चे ६ झालेलो आम्ही १:३० 🕜 वाजता शेवते गावात परत पोटातल्या कावळ्यांच्या आरोळ्यांना 🗣️ थोडं शांत करायला बसलो.. डावीकडे नाही तर उजवीकडे मात्र आता सुंदर धबधबे दिसायला लागले होते..
इथून खाली होता डांबरी घाट रास्ता आणि पावसासारखंच आता ढगांनीही त्यांचं ह्या weekendचं destination बदललं 🪃 होतं.. त्यात एका काकांनी 👳♂️ सांगितलं की वाकी गावठाणला जाणारी पायवाट वाहून गेली आहे, म्हणजे आम्हाला संपूर्ण घाट उतरून आदिवासी वाडीहून वाकी गावठाण गाठायचं होतं, additional ४ कि.मी... 'वाडी पर्यंतचा घाट रस्ता तरी थोडाफार skip 🚷 होऊ शकतो का?', तर एक पायवाट असल्याचं समजलं.. थोडं पुढे डावीकडे एक जी वाट दिसत होती, रस्त्याने येणाऱ्या दोन मावशींकडून 👵 confirm करून घेतल्यावर आम्ही उतरायला लागलो.. परत रस्त्याला लागल्यावर सुद्धा आम्ही 'अजून काही skip करता येतंय का?', ह्याचा शोध घेत होतो.. वाडीच्या मागच्या बाजूने जात असतांना, विहिरीजवळ, जणू माकडचेष्टा करतांना पकडले गेल्यागत काही लहान पोरं 👦 आम्हाला बघून पळायला लागले.. १.५ कि.मी. चालून नाही काही तर एखादा कि.मी. अंतर तर नक्कीच वाचवलं असेल, पण जे पुढचं १.५ बाकी होतं, त्याला काहीच पर्याय नव्हता.. एव्हाना, दूरवर मढे घाटातला धबधबा दिसायला सुरुवात झाली होती.. माझं आणि राहुलचं एकंच confusion, तिथे एक मंदिर 🛕 दिसतंय.. मिराज, बाकी काही नाही..
वाजले होते २:३० 🕝.. एका घराबाहेर shed खाली जेवणासाठी योग्य जागा बघून आम्ही ६ टेकलो.. आवाज दिल्यावर ताकाच्या 🥛 demandला नाही काही तर पाण्याच्या 💧 रुपात supply झालाच होता.. बाकीचे वर शेवते गावातच भोजन 🍱 ग्रहण करत असल्याचं समजलं.. आणि हाच होता आजचा सगळ्यात मोठा plus point.. start-to-end अंबानी साहेबांची कृपा होती आमच्यावर 📲.. phone आणि net, दोन्ही कमीत-कमी एका काडीच्या जोरावर तरी आम्हाला सोबतीने होते.. 'पण सगळ्यात मोठा plus point कसा?' 🤨 तर त्यासाठी थोडी वाट बघा, सगळं सांगणार.. title मधले 'historic route' आणि 'historic experience', दोन्ही topics अजून बाकी आहेत.. jio 🃏 आजचा १७वा participant म्हणालात, तरी चालतंय.. 😇
निमिषनी आणलेल्या पाचही प्रकारच्या इडलींची gunpowder चटणी सोबत थोडी-थोडी taste घेऊन, पराठे, भाकरवाडी, चिक्की 🍫 आणि cake 🍰 ने तात्पुरतं संतुष्ट होऊन, कडकडीत ऊन्हात आम्ही निघालो डांबरी रस्त्यावर.. सोबत आणलेल्या छत्रीचा 🌂 पावसात नाही तर कमीत-कमी ऊन्हात 🌞 तरी फायदा करून घेतला.. आम्ही वाकी गावठाणला पोहचत नाही तर बाकीचे ९ लगेच आमच्या सोबतीला, courtesy: टम-टम 🚕.. राहिलेला (१६वा) कुशल अजून पुढे जाऊन bridge 🌉 जवळ आमची वाट बघत होता, जिथून आम्हाला मढे घाट चढायला सुरुवात करायची होती..
मध्यांतर - दमले असाल तर pop-corn फुटाणे 🥜 घेऊन या.. picture 🎥 अभी बाकी है..
काही दिवसांपूर्वी दिलीपनी group वर २ धबधब्यांचे photo 🖼️ share केले होते.. Google Lensला 🔍 विचारलं तर कळलं, सातसडा आणि नाणेमाची आहेत.. विशालने ह्याच सातसडाचा सकाळी जो ईशारा केला होता, तो असा, "आपण जर वाकी गावात १-१:३० पर्यंत पोहचलो तर social media वर सध्या viral होत असलेल्या सातसडाला जाऊन येऊ".. आता वाजले होते ३:१५ आणि इथून सातसडा अजून होता २.५ कि.मी... भूगोल, भौतिकशास्त्र, हवामान, गणित आणि (उरलेला) stamina, असं सगळं एकत्र करून 🔣 लक्षात आलं की चढायला रात्र होण्यापेक्षा skip केलेला बरा..
पण, कहानीमे twist असा होता, जे आम्हाला अजून माहिती नव्हतं, की कुशल जिथे थांबला आहे (मढे घाट चढायच्या सुरवातीला), तो point ह्या २.५ कि.मी. रस्त्यावरच १.५ कि.मी. पुढे आहे.. 'कुशल दिसेल तिथे थांबतो' म्हणत आम्ही ४ पूढे निघालो, म्हणजे माझ्यासोबत दोन्ही राहुल आणि सुजन.. तिथे पोहचल्यावर २० मिनिटाच्या अंतरावर धबधबा असल्याचं लक्षात येताच, आम्ही मुळीच सोडणार नव्हतो ☺️.. विशालला phone लावत, "आम्ही चौघं सातसडा बघून येतो" सांगत तिथून निघालो.. phone वर असंही कळलं की उर्वरित पैकी काहींमधे मढे घाट (एक सिंहगड) चढायची ताकत राहिलेली नाही.. पाऊस नसल्याने सगळेच परेशान झाले होते 😥 / ऊन्हाने आणि कोकणातल्या दमटपणाने सगळ्यांचीच वाजवली होती 😰.. म्हणून, त्यांनी कर्णवाडीपर्यंत गाडीने 🚖 जाऊन तिथून मढे घाट (अर्धा सिंहगड) चढायचं ठरवलं.. वाजले होते ४ 🕓..
सातसडा धबधबा 👌 - अतिशय सुंदर असा, कपारीतून, rather घळीतून वाहणारा, मोजकीच गर्दी असलेला, अगदी स्वच्छ आणि गोड पाणी वाहून आणणारा, ७ टप्प्यात पडणारा हा धबधबा कमीत-कमी १५०-२०० फूट असणारच.. 'तुम्ही काय miss करताय?', ह्यासाठी लगेच group वर photo share केला.. तरी अजून कोणी त्या वाटेला गेलं / आलं नाही.. ५ मिनिट सह्याद्रीच्या ह्या रूपाचे सौंदर्य निहारत 😍, पाणी पिऊन / सोबत घेऊन परतीला निघालो.. GMaps location
![]() |
| सातसडा धबधबा |
जिथून phone केला होता, तिथे परत पोहचत बघतो तर ८ जण अजूनही गाडीची वाट बघताय ⏳.. राहिलेले ४, including कुशल, मढे घाटाच्या पायवाटेवर पुढे निघाले होते.. आता smartphoneच्या locked screen वर आकडे दिसत होते ४:४५.. 'साधारण २ तास जरी लागले तरी अंधार व्हायच्या आत आपण केळदला पोहचू शकतो' हा अंदाज बांधत आम्ही निघालो.. ४ पावलं चालत नाही तर आम्हाला ते चौघं, बारव जवळ भेटले.. म्हणजे, आमचा ८ जणांचा group पूर्ण मढे घाट चढणार होता आणि दुसरा ८ जणांचा group अर्धा..
पुढे जाण्याआधी.. तुम्हाला ते 'हम दिल दे चुके सनम' मधलं 'मनमोहिनी' गाणं 🎵 आठवतंय का? 🤔.. त्यातली एक ओळ अशी आहे - 'आग, हवा, पानी को मिलाया, तो फिर ये तस्वीर सजी'.. अतिशयोक्तीचीही अतिशयोक्ती 😲 आहे, पण ठीक आहे - कविता, गाणं, motion picture 📽️ - ह्यांच्यात हे असलं चालतं.. निसर्गाच्या कुठल्याच मर्जी पुढे आपलं काहीच चालत नाही आणि इथे तीन-तीन एकत्र करून एका ललनेच्या सौंदर्याचं 💃 वर्णन केलेलं आहे.. हलवा है क्या?.. असो, हे नमूद करायचं कारण पुढे लगेच लक्षात येईलच..
माणसं जेव्हड्या प्रकारचे व्यायाम करतात, त्यात सर्वात जास्त थकवणारा व्यायाम म्हणजे swimming 🏊.. कारण हा व्यायाम करायचा असतो त्या गाण्यात वापरलेल्या, निसर्गाच्या 'आग, हवा, पानी' ह्या तीन बलाढ्य शक्तींमधल्या तिसऱ्या शक्ती विरुद्ध.. तुम्ही सुद्धा trek करत असतांना swimming करता / धबधब्याखाली भिजता / अशी काही इच्छा बाळगता का?, तर इथून पुढे काय जे घडलं ते वाचून 'दुसऱ्यांच्या अनुभवातून माणूस लवकर शिकतो', फक्त हे सिद्ध करा..
आमच्या आधी निघालेल्या ४ पैकी कुशल आणि विश्वंभर बारव मधे swimming करून नुकतेच बाहेर आले होते.. आम्ही फक्त photo काढून, मढे घाट समोर ठेऊन, दिसेल ती पायवाट धरत होतो.. पण थोडं चढताच पुढे वाट गायब ⛔.. सागरने थोडं खाली जाऊन आजींनी जे सांगितलं ते आम्हाला relay केलं.. जे आम्ही करत होतो, अगदी same-to-same आजींनीही तेच सांगितलं होतं, "सरळ-सरळ चढा".. अहो, पण पावसाचा उद्रेक इथे आम्हाला काही सुचू देत नव्हता - वाटच समजत / दिसत नव्हती.. तेव्हड्यात विशालचा phone 📲, "वाट सापडली का?".. त्याच्याकडे असलेल्या trailचा screenshot पाठवायला सांगितला.. त्याने screenshot आणि url, दोन्ही पाठवले.. दोन्ही बघून जेव्हा Google Maps 🗺️ बघितला तेव्हा लक्षात असं आलं की आम्हाला अजून डावीकडे जायची गरज आहे.. जमेल तसं डावीकडे जात होतो.. ह्यात एक (पहिली) चूक जी केली, ती अशी की चालता-चालता आम्ही वर सुद्धा चढत होतो.. सरळ-सरळ फक्त डावीकडे गेलो असतो तर लागलीच वाट सापडलीही असती..
राहुल / कुशल एका ठिकाणी म्हणाले, "ह्या पुढे जाऊ शकत नाही".. मागून सागरने आवाज दिला, "विश्वंभरला खूप दमल्यासारखं होतंय, खूप slow झालाय".. Google Mapsच्या इशाऱ्यावर थोडं मागे बघून वर नजर 👀 फिरवली तर एक वाट दिसली.. एक झाली होतीच, आणि दुसरी चूक करणे भागच होते.. केली चढायला सुरुवात.. सगळे एका झाडाखाली पोहचलो आणि आता मात्र चांगलेच फसलो.. 'तिथून try करून बघायचं का?', 'फक्त ह्या दगडापलीकडे गेलो की झालं', 'ह्यापुढे जाऊन फसलो तर उतरायला पण नाही जमणार' अशी तब्बल १५ मिनिटं trial and error आणि clash of opinions मध्ये घालवल्यावर, ६ वाजता, "aal izz well, aal izz well" 🫣 करायची वेळ आली होती..
येव्हड्यात विशालचे २-३ phone.. त्याने "range 📶 किती आहे?" विचारल्यावर माझा पहिला प्रश्न होता, "कुठलं app install करू?".. आहेच ना आपल्याला लहानपणापासूनची सवय.. प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी आपण प्रश्नच विचारत सुटतो 😏.. असो.. त्याने "ramblr" app install करून "sgtrekkers" user search करून त्याचा मढे घाटचा trail शोधायला सांगितलं.. वाट शोधायच्या गडबडीत त्याने हे जे सांगितलं होतं, काही केल्या नीट जमत नव्हतं.. सर्वात पुढे असल्याचा फायदा घेत, सगळे चुकीची वाट उतरेपर्यंत, मी ते शांत 😎 बसून जमवून घेतलं.. long live अंबानी.. त्यात विशालने हे पण सांगितलं, "आम्हाला उपांड्या घाट जवळ आहे, आम्ही तिथून चढतोय, तर तुम्ही चढून झाल्यावर गाडी घेऊन आम्हाला पुढून pick-up करा", म्हंटलं "ok"..
६:१५ च्या आसपास जेव्हा trailला join झालो तेव्हा वाटलं, 'आता काही चुकत नाही आपण, सगळं सुरळीत पार पडेल'.. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.. आणि ह्याआधी कुठल्यातरी article मधे म्हण्टल्याप्रमाणे, नशीब हे आपणच लिहीत असतो, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.. तर, आजच्या राहिलेल्या दिवसाचा लेखक होता, विश्वंभर कुलकर्णी.. कुशलने मला विचारलंही, "काय वाटतंय, चढेल का तो?".. 'पर्याय नाही' लक्षात घेत, "आता परत तरी कसा जाईल? काहीही करून घेऊन जाऊ" म्हणालो.. दुसरी महत्वाची गोष्ट होती, working setup असलेला माझा mobile मेला नाही पाहिजे, ज्याला साथ दिली ⛽ सागरच्या powerbankने.. असतं असंच, clientला demo असाच दिला जातो, कारण सगळ्याच system वर product चालेलंच, ह्याची खात्री कोणी देत नसतं 😬..
राहुलने नंतर त्याची thought process 🤔 ही सांगितली, जी चालू होते त्या घटनेपासून, जिथून ह्या घाटाचं नाव, "मढे घाट" पडलं.. सिंहगडच्या लढाईत ⚔️ वीरमरण आलेल्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचं पार्थिव / मढं ⚰️ आजपासून साधारण ३६२ वर्षांपूर्वीच्या परिस्थितींमध्ये जर इथून खाली उतरवू शकले असतील तर नक्कीच ही वाट आजच्या परिस्थितींमध्ये चढायला अवघड नसणार आहे.. म्हणून आम्ही आमच्या इराद्यावर ठाम होतो.. वाट अजिबात न सोडता, ribbon 🎀, arrow ↗️, appचा trail, सगळं अगदी पावलो-पावली check करत, ६:४५ वाजता आम्ही पठारावर आलो आणि विश्वंभर आडवा झाला.. अधून-मधून glucose 🧃 पीत असूनही पाहिजे तशी recovery दिसत नव्हती..
दिवस आता मावळायला टेकला होता 🌄 पण समोर नाणेमाची धबधबा स्पष्ट दिसत होता.. शेवटचा पराठा आणि आणलेले गाजर 🥕 संपवून आम्ही पठारावरच्या जंगलातून पुढे.. तासकाटा ७च्या 🕖 पलीकडे.. हळू-हळू धबधब्याचा आवाज वाढत होता आणि विश्वंभरचा speed कमी होत होता.. bag 🎒 आम्हाला दे.. नाही.. stick 🦯 घेऊन चालतो का?.. नाही.. जेव्हा त्याला खरंच हे realize झालं की आपण कुठेतरी चुकतोय, तेव्हा त्याने 'sorry' म्हणत बाकीचे जे सांगताय त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.. ह्यातलं अजून विशालला किंवा बाकीच्या ७-८ लोकांपैकी कोणालाही काहीच माहित नव्हतं..
जंगल संपवून शेवटचा चढ सुरु झाला तेव्हा trail follow करत एका पाण्याच्या वाटेला लागलो.. वर म्हण्टल्याप्रमाणे, trail असला म्हणजे 'सब ठीक', असं नसतं 😞.. १०-१५ मी. खाली उतरून उजवीकडे वळालो, तेव्हा विश्वंभर परत आडवा झाला.. त्याला आता बजावून सांगण्यात आलं, "अजिबात पडायचं नाही, उठून बस, हळू हळू का होईना, चालत रहा".. शेवटी विशाललाही सांगितलं / कळवलं, "आम्ही गाडी घेऊन येण्यापेक्षा, तुम्ही उलटे या आणि शक्य तेव्हडं गाडी घेऊन घाटाच्या तोंडापाशी या.. विश्वंभर नाहीच म्हणतोय, त्याच्यासाठी काही करता येत असेल तर बघ" 🙏..
प्रत्येक १० मी. चढाई झाल्यावर, मी group वर १०० - ९० - ८० अशे राहिलेल्या elevationचे updates 📝 टाकत होतो.. long-long live अंबानी, आम्ही खूप-खूप कृतज्ञ आहोत 🤝.. एवढ्यात आमची सत्य-परिस्थिती वर सगळ्यांना कळली असावीच.. शेवट जवळ आहे, हे लक्षात येताच आमचाही वेग वाढला 🏃.. विशालने कुठूनतरी एक दुचाकी 🛵 जुगाड करून घाटाच्या तोंडापाशी आणली.. त्याची आणि आमची वर पोहचायची वेळ almost एकच.. वाजले होते ८ 🕗.. वि ला वि च्या सुपूर्त करून आम्ही राहिलेले ७ जण गाडी (सकाळची २०-seater) 🚐 घेऊन निघालो.. बाकीचे जवळच्याच hotelला आमची वाट बघत होते, ज्यांची दुचाकी विशालने आणली होती 👍..
hotelला भेटलो, तेव्हा वैभवने विचारलं, "कसा होता खडसांबळे २.०?".. तर, त्रास climateचा झाला नव्हताच, म्हणून तसं काही comparison 📊 करायचा प्रश्न नव्हता, पण हा अनुभव खूप काही शिकवून गेला.. विश्वंभर परत सगळ्यांना "sorry" 🙇 म्हणायला लागला.. तर, इतना तो चलता है.. महत्वाचं हे आहे की, आपण सगळे सुखरूप पोहचलो आहोत 🫂.. विशाल said, "trek ही group activity 👥 आहे, होत असतं असं".. इथपर्यंत अस्वलखिंडचा किस्सा जो मुद्दाम मी त्याला सांगितला नव्हता, तो विशालने सांगितला..
अरे, अजून एका गोष्टीचा आज जो त्रास झाला, ते तर सांगायचं राहूनच गेलं.. फक्त कोकणातला काही भाग सोडला तर सुरवातीपासून शेवटपर्यंत, किड्यांनी 🪰 असा त्रास दिलाय की मला सतत ते गाणं आठवत होतं, "दुनिया बनाने वाले, क्या तेरे मन में समाई!.. काहेको दुनिया बनाई किडे बनाये".. 😜
असो, ते म्हणतात ना, all is well that ends well 🤞.. hmm, trek तर संपला, पण article संपवण्याआधी..
"भाजी कोणती आहे?" ह्या प्रश्नाला काकांचं नेहमीच अगदी ठरलेलं उत्तर असतं, "तुमची favourite".. म्हणून, आम्ही आता हे विचारणं सोडून दिलंय 🤫.. ताटात वाढलेल्या ४-५ भाज्यांपैकी एखादी तरी आपली favourite असतेच.. आजच्या menu मधे होत्या, शेवगा, वांगे 🍆, मेथी, कारलं आणि बटाट्यानंतर सर्वात प्रचलित, म्हणजे पत्ताकोबी.. hotel मधे सांभार पलीकडे पण शेवगा असते / बनते, हा बहुतेक पहिलाच अनुभव.. कारलं आणि मेथी तर मागून-मागून खाल्ल्या (no sarcasm).. trend set झालेला फेब्रुवारी महिन्यातील यावर्षीचा SRT, जो इथेच संपतो, तेव्हा सुद्धा मेथी होती - एकच नंबर असते.. बरं, ज्यांना अजून संदर्भ लागला नाही, त्यांच्यासाठी - कदम काका म्हणजे "तोरणा विहार".. GMaps location
![]() |
| credits: सागर |
जेवतांना कुशल म्हणाला, मी जो पहिला मोठा trek केला होता तो म्हणजे 'कात्रज ते राजमाची'.. नाही, तुम्ही काहीच चुकीचं वाचलं नाहीये ✅.. होता है.. २५ कि.मी. चालून, दोन पेक्षा जास्त सिंहगड चढून आणि मरणाची भूक लागलेली असल्यावर कर्जतचं कात्रज होऊ शकतं, ह्यात काहीच नवीन नाही.. माझ्यासाठी कधी-कधी शिवनेरी जसा जेजुरी जवळ असतो, अगदी तसंच 🤐..
जेवण झाल्यावर राहुल (रामपुरा) म्हणाला, ह्या वेळेस blog मधे लिहायला ✍️ खूप काही आहे.. किती cut ✂️ करणार?.. तर नाही, आठवेल तेवढं सगळं लिहिणार type करणार.. movies सारखं थोडं आहे.. २ तासाचं releasable content गोळा करण्यासाठी मोकार shooting 🎬 करत सुटायचं आणि नंतर editing करण्यात वेळ वाया घालवायचा..
तर मित्रांनो, हा होता आजचा जगलेला इतिहास 📕, जो आम्हाला एक इतिहास म्हणूनही लक्षात राहील.. असाच अजून एक नामांकित इतिहास जगायचा बाकी आहे, तो म्हणजे "पन्हाळा ते पावनखिंड".. त्याचं पण article, जेव्हा कधी होईल, त्या वेळेस तुम्ही वाचालच.. पण तोपर्यंत, 'आग, हवा, पानी' ह्यांच्यापासून जरा जपूनच 😊..










मस्तच👌👍
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
DeleteVery well written...👍
ReplyDeleteThank you 🙏
DeleteNicely written.
ReplyDeleteThank you Pramod
DeleteNice..
ReplyDeleteThank you Prashant
DeleteThank you Trunal
ReplyDelete