।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
जो वादा किया वो निभाना पड़ेगा.. सिंहगड - राजगड - तोरणा
बारस्याला straight from 'first wonder of the world' "ताजमहल" नाव ठेवण्यात येणाऱ्या motion picture 📽️ मधल्या सुप्रसिद्ध गाण्यातली ही सुप्रसिद्ध ओळ.. title म्हणून का? तर, मागच्या वर्षीच्या लेखातील ही अधोलिखित ओळ.. ह्यापलीकडे trekशी ह्याचा काहीही संबंध नाही..
next year's article will be in मराठी, after having consecutive SRTs rambled 🚶 and scrambled 📝 in English..
ह्या articleची पेरणी मुळतः महेशने केली.. पण त्याआधी - as always, cricket 🏏.. कारण SRT म्हणजे cricket (धर्म) आणि आमच्यासाठी cricket म्हणजे SRT (देव)..
गेली चार वर्ष कुठलातरी आकडा ठरवायचा आणि जुळवा-जुळव करायची.. ३१९, ४१३, ५३८ आणि ६५४ नंतर ह्यावेळेस unplanned ९३७.. 'कसले आकडे आहेत?' तर cricket मधले काही records.. 'हेच का?', 'इतकेच का?' 💭 - असले प्रश्न पडत असतील, तर सर्व SRT articlesचा पत्ता खाली दिला आहे.. भेट घालून आलात तर लक्षात येईलच, किंवा regularly वाचत असाल, तर subconscious mind / 'other you' ने अद्याप मदत केली असेलच..
वर्ष ५वे, read here
वर्ष ४थे, read here
वर्ष ३रे, read here
वर्ष २रे, read here
वर्ष १ले, read here
सेहवाग, मांकड, धोनी सारख्या दिग्गजांनंतर ह्या वेळेसचा आकडा "विराट कोहली".. unplanned ९३७..
तसं "विराट कोहली" म्हंटलं तर first number that rings the bell is १८.. हो हो, take it easy - आली चूक लक्षात.. must have been - "विराट कोहली" should ring the (first) bell, "१८".. पण SRT सारखंच त्याच्याकडेही विक्रमांची कुठली कमतरता नाही.. आणि, तुमच्यापैकी काही cricket तज्ञ हाही विचार करत असतील, '२०१६ सालच्या IPL हंगामात त्याने ९७३ धावा केल्या होत्या.. तर, '९३७' हा आकडा चुकला असावा'.. again take it easy, ही मात्र चूक नव्हे..
ICC rankings बद्दल तुम्ही ऐकलं असेलच / ऐकत असालच.. हे प्रकरण म्हणजे, आंतरराष्ट्रीय सामन्यांतली rat race (for good, better, best).. एकूण गुण १०००, जे खेळाडूला / संघाला प्रत्येक सामन्यासाठी दिले जातात.. 'कोण देतं?' - नियम आहेत, म्हणून 'machine देते', हे अचूक उत्तर.. खेळाडूंच्या बाबतीत - कमीत-कमी सामने खेळायचा criteria fulfill झाल्याचा अवकाश आणि होते गुण मिळायला सुरुवात.. exponential average सारखं अलीकडच्या कामगिरीवर जास्त भर.. त्यात समोरचा संघ कुठला?, आणि आपला संघ सामना जिंकला की नाही?, ह्याचे अतिरिक्त गुण.. सरासरी असल्याने कुठला खेळाडू किती सामने खेळला आहे, ह्याचा direct संबंध तसा नसतो.. भेटतं काय? अर्थातच, बक्षीस 🏅.. अधिकृतपणे - वर्षअखेरी (ICC कडून), अनधिकृतपणे - कधीही (शान-शौकत)..
ह्याच आकडेवारीत / मारामारीत विराट कोहलीने २०१८ साली कसोटीत अव्वल स्थान पटकावत भारताकडून आजतागायत सर्वाधिक, असा ९३७ गुणांचा उच्चांक गाठला होता 🔝.. plan unplanned होता, म्हणून, 'सिंहगड कितव्यांदा चढायचा आकडा ह्यावर्षीच्या SRT साठी निवडायचा?' ह्याचा काहीच अभ्यास नाही.. योगायोग बघा, नुसतं आदल्या दिवशी थोडा शोध घेऊन बघितला, तेव्हा लक्षात आलं, उद्याच्या आकड्याचा उपरोक्त महत्व आहे.. harder you work, more lucky you get.. सुहागेपे सोना.. हो, आहे चुकीचं, करून घ्या बरोबर..
'unplanned' कारण similar 'elevation gain' ¼ Everesting मधेही होतं.. शिवाय भरपूर वेळही वाचतो, वाचायला 📖 - इतर गोष्टींबद्दल.. म्हणून, फेब्रुवारीत पुन्हा एकदा / दुसऱ्यांदा HoF मध्ये नोंदणी करवून घेतली.. HoF बद्दल अधिक माहिती साठी, read here.. mission तर accomplish झालं, आता "SRT" ultra वाल्यांसोबत डिसेंबर मध्ये करू, म्हणत धीमी आंचपे back-burner 🕯️.. आणि मग, अचानक महेशने माहिती विचारली.. माहिती विचारली तोपर्यंत ठीक होतं ओ, नंतर तारीखही suggest करायला लागला.. स्वतःचंच second opinion घेत plan तयार केला.. आणि म्हणून, ह्या articleची पेरणी महेशने केली..
ok, तर 'article का?', 'unplanned का?', '९३७ काय?' - आतापर्यंतचे सर्व संबंधित topics clear करून झाले.. पुढे? SRT बद्दल वाचायचंय? regularly articles वाचत असाल तर ह्यावेळेस काही वेगळं नाही आहे.. नसतील वाचले तर वर पत्ते (url) आहेत.. तरी थोडक्यात.. update: थोडं सवस्तीर केलं नंतर, खूपच shortcut घेतल्यागत वाटत होतं..
group बनवतांना जे ५ होते, त्यांनीच पूर्ण केला.. हे थोडंफार का होईना, 'चालू केलेल्यांनी complete केला', ह्या categoryत.. 'hat-trick म्हणायची का ह्याची?' - तुम्ही ठरवा.. इतर जे नंतर add झाले, ते २ ओळखीचे असूनही cancel झाले (एक सकाळी, दुसरा दुपारी) that was सोनेपे सुहागा.. निलेशचं माहिती नाही कारण कधी सोबत trek नाही केला, पण विकासने त्रास दिला असता, हे नक्की.. expert तुम्ही कितीही असाल ओ, शेवटी 'recent form' नाम की भी कोई चीज़ होती है..
trek संध्याकाळी ६ला 🕕 चालू करून, सकाळी १०:४५ वाजता वेल्हेला संपला / संपवला 🏁.. चुकांमधून शिकण्याऐवजी तीच चूक जी आम्ही परत-परत करतो, त्यासाठी भूषण गतवर्षी म्हणाला होता, 'तुम्ही दरवेळेस कोणीतरी first timerला नेता', तर ह्यावेळेस पुढाकारच first timerचा, म्हणून नाईलाज होता.. ह्याला पर्याय शोधला आहे आता, तो म्हणजे, SRT बंद 🛑.. ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी.. किस्साच खतम.. peace of mind 🕊️ सुद्धा महत्वाचं आहे, दरवेळेस कसं दुर्लक्ष करणार ⁉️.. ह्याला फक्त last year was an exception.. झोपेतून उठल्यासारखं काय SRTला यावं लोकांनी !?..
एकंदरीत जे सोबत आले, ते होते - वैभव, भूषण, मंदार, महेश आणि किरण.. 'group मध्ये ५ म्हणतो आणि नावं ६ लिहितो?', काय गडबड / भानगड आहे? 🤔.. किरणला मी ओळखत नव्हतो म्हणून त्याच्या मुळे आम्हाला उशीर होत होता.. तसं ह्या दोन्ही गोष्टींचा direct संबंध नाही, तरी बसवायचा झाला तर, ओळख असती तर नेलंच नसतं (ह्याहून जास्त diplomatic जमणार नाही).. त्यात त्याला torch 🔦 असूनही ती का वापरायची नव्हती?, हे अशक्य कोडं मला तरी सुटलं नाही.. 'आपल्यामुळे उशीर होत आहे' (dude, torch वापर ना!), हे लक्षात येताच, त्याने झुंझार बुरुज सोडताच विंझरला थांबत give-up करण्याचं ठरवलं आणि गावात पोहचल्यावर केलं, give-up.. महेशने त्याची मुक्कामाची सोय करवून दिली.. ह्या presence of mind साठी मात्र दोघांचे आभार 🙏..
विंझरच्या traverseला ultra वाल्यांनी एक step थोडी सपाट जागा बघून / करून सोयीस्कर करण्याचा नुसता प्रयत्न केल्याचं लक्षात येतं.. मागच्या वर्षी miss केली, ती कुत्री 🐕 प्रचंड ह्यावेळेस स्वागताला आणि recorded आवाज ह्यावेळेस एखाद्या चेटकीणीचा वाटत होता - ज्यांना ह्याचं प्रयोजन माहिती नाही, त्यांच्यासाठी भयाणच.. आदल्या दिवशी होळी 🔥 होत्याच्या निमित्ताने वैभवने पुरणपोळी आणली होती.. गावात मारुती मंदिरात जेवण करून आम्ही दर टप्प्याला मागच्या वर्षीच्या वेळेनुसार मोटामोटी अर्धा तास मागे पडत होतो.. ऊस नव्हता, म्हणून भीती नाही वाटली, आणि 🌕 पौर्णिमेच्या सोबतीला वणव्यामुळे सगळीकडेच मोकळं-ढाकलं दिसत असल्याने tower पर्यंत पोहचायला जास्त कसरत नाही करावी लागली..
महेश खराडे (thermos / flask) किंवा राहुल कोंडे (local माणूस) नाही म्हणून चहा नाही ☕.. पुढे वेळ cover करत आम्ही ३:१५ पर्यंत चोर दरवाजा गाठला खरी पण पुढे नको तेच झालं.. महेशसाठी संजीवनी माची was just beyond reach - रात्रीच्या plan नुसार धुलीवंदन प्रमाणात खेळला असता तर कदाचित इथे पोहचल्यावर direct घोरायला सुरुवात नसती केलीस 💤.. बाकीच्यांनी एक-एक करून उठवायचा निष्फळ प्रयत्न केला.. काही फायदा नाही, लक्षात येताच focus was back to tiffins 🥚.. पौर्णिमा होती म्हणून stargazing नाही करता आलं ✨, पण इथून मात्र निघायला आम्हाला ४:४५ झाले..
एकंदरीत हालचाल बघत, आता धावण्यापलीकडे पर्याय उरला नव्हता.. कचरे काकांकडे ६ वाजता 🕕 पोहचलो आणि अर्धा तास पडी मारली 😴.. इथून पुढे कसं आणि कुठे जायचं? पुढचं target काय?, काहीच सांगून फायदा नसतो.. त्याक्षणी उन्हाचा कोणाला किती त्रास होईल, is totally unpredictable.. फक्त दिसेल ती वाट धरत बुधला माची चढायची.. सुदैवाने अवकाळी ढगांची साथ होती आणि मुबलक गार वारा होता 🌬️..
२-४ तुरळक गडी सोडले तर गडावर अजिबात गर्दी नव्हती - बिबट्याचा इतका खौफ 🐆 !.. पुणे जिल्ह्याच्या सर्वोच्च बिंदूवर म्हणजे मेंगाई देवीच्या मंदिरात शेवटचा break घेत, ९ वाजता 🕘 आम्ही गड उतरायला चालू केलं.. last year's शेवटून पहिला भूषण ह्यावेळेस was in the lead 👏.. मंदार was totally with the flow.. अगदी शिस्तप्रिय विद्यार्थी सारखं - सांगावं तिथे बसणार, थांबणार, उठणार, पळणार.. first timer असून इतकी consistency, energy आणि जिद्द - एक नंबर 👌..
गेल्यावर्षी लगतच्या सोमवारी तारखेप्रमाणे शिवजयंती होती, ह्यावेळेस तिथीप्रमाणे आहे.. संपूर्ण वाटेत 🐍 ३ साप दिसले - तोरण्यावर २ जे मी बघितले, ते तर पिल्लांची सुद्धा पिल्लं वाटत होती (वणव्याचे परिणाम / दुष्परिणाम).. वरच्या parking जवळ cement road अजून पुढे वाढवताय असं काहीतरी groundwork दिसलं.. अर्धा तास वाट बघितल्यावर कुठे महेश आला.. अजूनही १.५ कि.मी. trek बाकी होता, त्यातही काही केल्या त्याची speed पकडायची तयारी नव्हती 😦..
all is well, that ends well.. खरंच असतं का ओ तसं 🤨.. असो.. मंदार टोल आणि महेश कुलकर्णीला पहिला SRT पूर्ण केल्याबद्दल खूप-खूप शुभेच्छा 🎉..
पिल्ल्याचं पिल्लू
that's all about the trek.. but, मागच्या वर्षी ९:१०ला वेल्हेत होतो - अर्धा तास उशीर म्हणत १०:४५ कशे? let's go back to the basics now.. म्हणजे, आता थोडं off जाऊया.. आता ह्याला तुम्ही 'तयारी' म्हणा, 'शिस्त' म्हणा, किंवा 'जबाबदारी' म्हणा - pick your word.. पण कुठेतरी तुम्हालाही improve व्हायला scope आहे..
group तयार केल्यावर पहिला message होता..
सिंहगड राजगड तोरणा, वर्ष ६वे
शुक्रवार, १४-मार्च-२०२५ 🌕
Starting Time: 06:00 p.m.
Ending Time: ~09:00 a.m. (शनिवार)
Total Distance: 40-42 kms
Total Elevation Gain: 2200+ mtrs
Important:
Hike schedule / itinerary does not include any rest / sleep.
Mandatory Things to Carry:
1. min. 3 ltrs water (वेळेनुसार वाटेत पाणी मिळणे अवघड असते)
2. Full Sleeves, Full Pants
3. Trekking Shoes (वाट काही ठिकाणी scree मुळे घसरडी आहे)
4. Dinner (जेवायला आपण विंझर गावात थांबू)
5. Snacks (Fruits, Dry Fruits, Biscuit etc.)
6. Energy Units (Glucovita, ORS, Candies, Bars etc.)
7. Torch (+ extra batteries)
8. Hiking Pole / Stick
Transport:
आपण public transport वापरणार आहोत.
जातांना: स्वारगेट - आतकरवाडी pmpml
येतांना: runtime जे भेटेल ते
Preparation:
Total distance equals a marathon, and total elevation gain equals about 4.5 times Sinhgad.
Considering the difficulty level, please decide for yourself, "how to prepare?" (Brisk Walk / Hike / Yoga / Run).
Must practice carrying some load.
तुमच्यापैकी काहींनी कदाचित थेट skipही केला असेल.. कारण सवय आहे आपल्याला, shortcut घ्यायची म्हणा किंवा egoला बळी पडण्याची (मला नाही गरज, ये तोह मेरे बाएं हाथ का खेल है etc.).. आणि मग आपण करतो दुसऱ्यांची गैरसोय.. असो.. basicsच आहेत, अजून detail मधे जाणार नाही, कारण blog trekking बद्दल आहे आणि समझने वाले समझ गये हैं.. दुसरा blog जो खास ह्याच गोष्टींपुरता बनवला आहे, त्यात होईल trekking वर चर्चा, rather मनोगत..
सिंहगड streak will soon cross १००० 🎂 आणि मग कुठले आकडे ह्यापुढच्या SRT साठी जमवून आणायचे, हा अभ्यास थोडा अवघड असेल.. ह्या अजून एका कारणामुळेही, सिद्धगड जसा शेवटचा लेख होता, तसाच हा शेवटचा SRT.. जो वादा किया वो.. .. 😜




शेवटचा SRT … nako re … next time Title ..परंपरा, प्रतिष्ठा अनुशासन… आता तू ब्लॉग पूर्ण कर ..ट्रेक करतो आम्ही ..
ReplyDeleteI hope शेवटचा SRT as in असा आपल्या आपण केलेला, next time पासून with SRT Ultra सोबत, बरोब्बर ना?
ReplyDeleteग्रेट
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteथेट शेवटचा SRT असे का? उलट मी चुकातून सुधारून पुढील वेळी नक्कीच चांगल्या परिस्थितीत असेन..
ReplyDelete👍
वाह मस्त लिखाण. नवीन कल्पना आणि उदाहरण सकट. भटकंती अनुभव वर्णन
ReplyDeleteछान वर्णन
ReplyDelete