।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
#DilMaangeMore.. रिठ्याचे दार आणि घोडेपाण्याची नाळ (घाटवाटा, ढाकोबा annexe)
काही दिवसांपूर्वी दिलीपनी group वर एक पिल्लू सोडलं.. 'काय होतं?' तर wikimapia वरचा एक screenshot 🖼️ ज्यात marking होतं, "रिठ्याचे दार" आणि "घोडेपाण्याची नाळ".. 'कुठे आहे? कमीत कमी search 🔍 तर करून बघू' म्हणत सापडले २ blog आणि १ YouTube video 📽️ ज्यांच्यात जीवधन (especially वानरलिंगी) आणि बाहुला-बाहुली सुळक्यांचे photo बघून माझं झालं #DilMaangeMore.. मार्च महिन्यात जायचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि सगळ्यांची availability बघत तारिक ठरली २६-२७ चा weekend..
काही दिवसांनी "जमत नाही" म्हणून राहुल cancel झाला 😔 आणि अजून पुढे उशीर करण्याऐवजी prepone करत तारिक ठरली १३चा रविवार आणि 'लांब जाऊन मोठा अवघड trek करायचा आहे' हा हिशोब लक्षात घेत निघायची वेळ ठरली पहाटे ५ची 🕔.. राहुल नाही, पण मग article मध्ये कसं शिरता येईल, ह्या साठी त्याने group वर "आकाशला भेटू" असा message केला.. 'काय भानगड आहे?' 🤔 हे आमच्या नंतर लक्षात आलं.. btw, वर त्याचं already शिरून झालंय, पण इतक्यात काही त्याचं पोट भरत नसतं 🤫..
१३ मार्च २०२२
ठरल्याप्रमाणे, आम्ही ५:१५ वाजता माझ्या घरून (+ वैभव), आणि 🕕 ६ वाजता प्रसादच्या घरून (+ दिलीप) निघालो.. मोशी / चाकण जवळ लागला traffic jam (not the usual one).. सगळ्यांना प्रश्न पडला, 'सकाळ तर झाली नाही अजून, मग गर्दी कसली?' तर, एक truck महाराजांचा पुतळा 🏇 घेऊन जात होता, ज्याने एक lane पूर्णपणे block केली होती आणि मोशी-राजगुरुनगर either side फक्त 2 lane road आहे, हे आपल्याला माहिती आहेच.. नशीब चांगलच म्हणावं 😇, कारण पुढे जुन्नर पर्यंत ह्याच truck 🚚 मुळे वाढीव गर्दीचा त्रास होण्यापेक्षा बरं होतं.. आत्ता नाही, पण नंतर आमच्या लक्षात आलं की जुन्नरला भर रस्त्यावर ठिकठिकाणी जी रांगोळी काढली जात होती, ती ह्याच्यासाठीच.. आज (भव्य) कार्यक्रम होता / मिरवणूक होती, शिवनेरी अगोदरच्या चौकात महाराजांचा पुतळा replace करण्याचा / करण्याची..
६:४५ वाजता आकाशला नाश्त्यासाठी 🍛 पोहचलो खरं, पण available options होते फक्त चहा ☕ आणि bread.. चाय (और bread-butter 🍞) पे चर्चा करत second course मिसळ-पाव, इडली-सांबार सुद्धा तयार झाला / आला आणि राहुलही.. better half बरोबर ह्याच areaत trek करायचा त्यांचा plan होता.. कुठे? तर महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला आणि ज्या देवीच्या नावावर त्यांचं नाव ठेवण्यात आलं, त्या शिवाई देवीचं मंदिर 🛕 असलेल्या गडावर, शिवनेरी 🚩..
निघत करत ७:३० 🕢 झाले आणि हजेरीला आलेला source of life 🌞 आज source of misery 😥 बनणार, ह्याचा trailer बघायला / अनुभवायला भेटला.. unexpected नव्हतं, पण किती जरी म्हंटलं तरी theoretical आणि practical फरक पडतोच.. दिलीपनी मागच्या वेळेप्रमाणे जुन्नरहून फळं घेतली 🍉 🍎 🍇 🍌.. that adds another pair to the established list.. "Dilip - Fruits".. 'कुठली list? विचारताय!' तर read here..
शिवनेरीपुढे शेवटचं गाव आंबोली ओलांडून रस्ता असेल / नेईल तिथपर्यंत आम्ही गाडी नेली 🚗.. वाजले होते ९:२०.. शेजारी एक आजोबा (किसन मोरे) त्यांच्या नातीला खेळवत होते, वर्षाची असेल, नाव होतं 'सई' 👶.. "वाट दाखवायला कोणी सोबत येईल का?" विचारत, त्यांना कामाला लावून आम्ही सईसोबत खेळायला लागलो.. तिच्या मोठ्या भावाचा अभ्यास घ्यायला दिलीप बसले, ३-४ वर्षांचा असेल.. pencil (पाटी वरची ◼️) नाही म्हणून त्याला घरात आणायला पाठवलं तर पठ्ठा परत आलाच नाही.. त्या चिमुकलीची मात्र आजोबा येत नाही तोपर्यंत एक गोळी चाखत-चाखत संपवून झाली होती..
वाटाड्या शोधत-शोधत आमच्या सोबत यायला तयार झाले 'बबन कासळे', इथून पुढे - 'मामा' आणि एक कुत्री 🐕, इथून पुढे - 'बसंती'.. कोयता 🔪 आणि शिदोरी घेऊन ९:४५ ला आजच्या adventureचा श्रीगणेशा झाला तेव्हा त्यांनी सांगितलं, 'घोडेपाण्याची नाळ' इथे 'तवलीची वाट' म्हणून ओळखली जाते.. नंतर वैभवने सांगितलं, हे common नाव आहे जे इतर ठिकाणी पण आहे.. so, we will stick to 'घोडेपाण्याची नाळ'.. दाऱ्या घाट डावीकडे ठेऊन आम्ही समोरची टेकडी चढायला सुरुवात केली.. हो, इथून टेकडीच आहे / दिसते, same as any other घाटवाट.. पण, कोकणातून कोणतीही घाटवाट वर चढतांना ह्याच टेकड्या (-cum-पठार) आपल्याला 'चेष्टा-मस्करी पुरे' असं चिडवत चांगलीच शिकवण देतात 😜..
थोडा चढ चढत नाही तर मामांनी वाटेत लागलेल्या अंबोली तोडून आम्हाला खायला दिल्या.. ऊन्हात चालत असलो तरी इथे थोडाफार वारा सोबतीला असल्याने काही वाटत नव्हतं, पण, trek सुद्धा आत्ताच चालू झाला होता, आणि उत्तर ⬆️ दिशेला उतरून जे उजवीकडच्या नाळेतून परत चढायचं होतं, तो steep चढ (elevation gain) ह्या सुरुवातीच्या gradual चढाच्या साधारण तिप्पट होता.. तिथे पण असाच वारा असला तर बरं होईल, ह्या hopes ठेऊन आमची वाटचाल चालू होती..
मामा सोबत घेतलेल्या कोयत्याचा योग्य तिथे वापर करून वाट साफ करून देत होते.. बसंती आळीपाळीने सगळ्यांच्या मधे-मधे करत होती.. मामांनी सागितलं की त्यांच्या बरोबरच असते पण काही नाव नाही, म्हणून आम्हीच तिला 'बसंती' म्हणायला लागलो.. खिंडीत पोहचलो आणि भरमसाठ photo काढायला पहिला टप्पा सापडला 😃.. इथलं highlight होतं Google Photos.. 'म्हणजे काय?' तर, तुम्ही जर कधी Google Photosला photo upload केले असतील तर आपली कलाकारी दाखवायच्या नादात कधी-कधी ते App विलक्षण output पण देतं.. इथे काढलेल्या दिलीपच्या एका photo ला असंच काही त्याने दिलेलं animation खाली upload केलंय..
उजवीकडे ➡️ होती खिंड "रिठ्याचे दार", actual trekचा first half.. ती उतरण्याचा जो speed होता, तो इथपर्यंत चढून यायच्या speed हून slow 🚶 होता.. 'खिंड उतरतोय की नाळ?', पहिला doubt 🤔 तर हाच होता.. बाकीचे doubts होते, 'नाळ type वाट उतरणे अवघड असते, तर जमेल का?', ' इतकं slow उतरतोय, तर चढायला तर रात्रच होईल'.. हळू-हळू उतरत, दगडं सांभाळत एक step घसरली.. एका बोटाला आणि कोपरला खरचटलं, trekking pole थोडा वाकला.. होता है.. जर सिंहगड सारख्या ठिकाणी मी पडू शकतो तर त्याच्यापुढे 'ये तो बहुत ज्यादा है (difficulty wise)'..
वर पडलो त्याने मन नाही भरलं तर आता सगळ्यांमध्येच 'आज कुछ तुफानी करते है' चा किडा 🐞 घुसला.. समोर दिसणारी वाट डावीकडे ⬅️ थोडी वर चढत होती.. होतं असं, लांब उडी मारायची असेल, तर एक step मागे घ्यावी लागते.. पण आपल्याला खाली उतरायचं ना, मग उजवीकडे झाडी साफ करत नाळेतूनच उतरायचा सरळ रस्ता घ्यायला हवा.. शहाणपणा केला तर काहीतरी unprepared किंवा undesired नक्कीच घडतं 😒.. this is my version of Murphy's law.. actual law says, "anything that can go wrong, will go wrong.".. and, based on my life experiences, I am a (big) fan 🙋.. 'big fan', 'breaking news', ह्या निरर्थक terms वर पण लिहिलं असतं, but let's stick to the topic.. १०-१५ फुटाचे २ patch अगदी clear दिसत होते की आपल्याला सहजा-सहजी जमणार नाही.. पहिला patch खूप प्रयत्न करून दिलीप सगळ्यांच्या आधी उतरले.. एक-एक करून जेव्हड्या वेळेत सगळे उतरलो, तेव्हड्यात कितीतरी वेळेस तर 'परत जाऊन ती डावीकडची वाट घ्यायची का?' हा प्रश्न ❓ विचारला गेला असेल.. सगळे व्यवस्थित उतरले आणि लगेच समोर होता दुसरा patch.. परत दिलीपनी पुढाकार घेतला आणि बाकीच्यांनी तेच follow केलं.. सगळ्यांबरोबर चालणारी बसंती इथे मात्र मागे पडली आणि 'अब मेरा क्या होगा?' विचार करत रडायला लागली.. मामांनी त्यांच्या भाषेत उजवीकडून यायला सांगितलं.. खालून वर बघत (उलटं) आता डावी side उजवीकडे झाली ना, so उजवीकडून..
थोडं पुढे जात नाही तर आली परत बसंती back-in-the-game 🤗.. इथपर्यंतच्या view मध्ये जे आधी जीवधन, वानरलिंगी, टोक सुळका, पळूची लिंगी आणि नानाचा अंगठा दिसत होते, ते काही वेळाने खाली उतरल्यावर समोरच्या रांगेमागे लपले 🙈.. बाहुला-बाहुली सुळके अजून काही दिसले नव्हते म्हणून तो #DilMaangeMore वाला moment अजून expectedly बाकी होता..
वाजला होता १ 🕐 आणि रिठ्याचे दार almost पूर्ण उतरून झाले होते.. पुढे सिंगापूर गावात जायचा काही plan नव्हता, म्हणून आता आम्ही शोधत होतो trekचा second half "घोडेपाण्याची नाळ".. एका ठिकाणी काही गावकरी माशे 🎣 पकडतांना दिसले.. त्यांना विचारलं आणि लागलीच उजवीकडे वळत आम्ही वर चढायला सुरुवात केली.. पाणी आणि सावली दिसताच शिदोरी सोडायची संधी साधली.. पराठे, फळं 🍎 🍌, अंडी 🥚 आणि पहिल्यांदाच खाण्यात आलेल्या प्रसादने आणलेल्या गूळ पोळी 🌯 वर तृप्त होऊन वेळ होती break extension 🥱 ची.. कलिंगड थोडं वर गेल्यावर खाऊ म्हणत तसंच bag मध्ये परत गेलं..
उतरतांना जसं adventure झालं, इथून पुढे तसं शेवटपर्यंत काहीच नव्हतं.. सकाळच्या वारेने जागवलेले hopes सगळे धुळीस मिळाले होते 😥.. photo काढायचे spot स्वतः मामा आम्हाला सांगत होते.. पण सावली दिसेल तिथे मुद्दाम बसत-बसत आम्ही वाट बघत होतो पारा 🌡️ खाली उतरायची.. कसलीच घाई नाही, कुठलीच गर्दी नाही..
आता बाहुला-बाहुली सुळके दिसायला सुरुवात झाली होती, पण side view.. ३ लिटर पासून केलेली सुरुवात पुरणार नव्हती, ह्याची जाणीव सगळ्यांना होतीच म्हणून अजून थोडं वर गेल्यावर वाहतं पाणी दिसल्यावर बाटल्या 🍶 भरण्यात आल्या.. सुळके लहानाचे मोठे होत होते आणि view बहरत चालला होता.. समोरून डावीकडे जात आता सुळके मागे गेले होते.. मागे वळून बघितल्यावर नकळतच ते इतके मोठे दिसायला लागतील (front / back view), हे आम्हाला completely अनपेक्षित होतं 🤩.. echoच्या मोहात सगळ्यांनीच आप-आपली स्वरनालिका आजमावली 🗣️, दिलीपनी जरा जास्तच.. त्यांना actually गैसमज झाला होता की शेजारी जीवधनच आहे म्हणुन एखादा तरी response भेटेल..
आम्ही जसं-जसं वर चढत होतो, तसा ह्या सुळक्यांमागून जीवधन (and extras) हळू-हळू वर येत होता.. सूर्योदयाला 🌄 तत्सम ह्या processला जीवधनोदय म्हणता येईल का? 😋 ह्याच साठी, फक्त ह्याच साठी केला होता अट्टाहास 🙃.. म्हणजे, when does सह्याद्री disappoint? ह्या प्रश्नाला उत्तर शोधण्यापेक्षा आधी प्रश्न तरी बरोबर आहे का? ह्याचं उत्तर शोधायची गरज आहे.. कात्राबाई, कोकणकडा, मढी महल, बाबू कडा सारखंच a perfect example of "nature is an infinite sphere of which the center is everywhere and the circumference nowhere"..
without any second thoughts, इथे वेळ होती "I wish I could take this home" म्हणत मंत्रमुग्ध होण्याची 😍.. वेळ होती चेहरा फुळवणारा आनंद आत्मसात करायची.. म्हणजेच, वेळ होती भरपूर photo 📸 काढण्याची..
इथून पुढे मात्र मामा घाई करायला लागले कारण 'torch 🔦 लागेल' ह्या तयारीने कोणी आलं नव्हतं.. वाजले होते ६ आणि अजून थोडीफार काय जी बाकी होती, ती खिंड चढून पलीकडे आंबोली गावात उतरायचं पण होतं.. सकाळपासून track करत असलेला trail बघत लक्षात फक्त हेच येत होतं की 'मंजिल अभी दूर है'.. राहिलेला चढ non-stop चढत आणि तसंच non-stop उतरत होतो तर मध्येच मामा डावीकडे बघून ओरडायला / हकलायला लागले - त्यांना दिसलं होतं सांभर.. झाडांमध्ये आम्हाला पण हालचाल दिसली पण बघायला काही भेटलं नाही.. बसंती निघाली शोध घ्यायला - तिला पण 'काय हासिल झालं असेल?' माहित नाही, पण घरापर्यंत बरोबर येऊन पोहचली..
| बिजली, credits: वैभव |
मामा नसते बरोबर (सोबत) तर बरोबर (योग्य) वाट शोधत-शोधत आम्ही रात्रीच 🌌 परतलो असतो.. आणि बसंती नसती तर that 'cherry on the cake' 🍰 वाली feeling आली नसती..
compare करायचं झालंच तर सिंहगडला जे shortcuts आहेत, तसा छातीवरचा चढ उतरायला पण होता आणि चढायला पण.. record झालेला trail बघत आपण ताशी १ कि.मी. पेक्षा सुद्धा कमी speedने चाललो आहे 🐌, हे लक्षात येत होतं.. of course, moving time आणि total time मधला फरक सुद्धा खूप होता.. elevation gain बद्दल सांगायचं झालं तर almost पुणे दरवाज्यापर्यंतचे २ सिंहगड ⛰️⛰️.. total ~९.१५ तासात ८.३ कि.मी., ९२४ मी. elevation gain, ~५.१५ तास moving time..
परत निघायला गाडी काढली तेव्हा तासकाट्याने ७चा 🕖 आकडा ओलांडला होता.. उशीर झाल्याचा फायदा हा झाला की आम्हाला जुन्नरची मिरवणूक वाली traffic नाही लागली.. आत्ताच चहा झाला आणि भूक भयानक लागल्यामुळे दुधाचा 🥛 बेत cancel करत गाडी थेट जेवायला थांबली कळंबच्या पुढे मल्हारला.. राजगुरुनगरची गाड्यांवाली traffic, again नाहीच..
आता, दिलीपनी परत एक पिल्लू सोडलंय.. कुठे आहे, किती छोटं-मोठं आहे, अजून homework बाकी आहे.. पण, त्याचा जेव्हा कधी classwork होईल, तेव्हा (ह्या blog मार्फत) तुम्हाला कळेलच 📝..
मस्त...प्लस व्हॅली नंतर हा एक ट्रेक....परत करायला कधीच हरकत नाही....thanks for documenting each details.
ReplyDeleteधन्यवाद वैभव 🙏
Deleteभारी लिहलं आहे.
ReplyDeleteधन्यवाद दिलीप 🙏
DeleteEkdam bhari as always!
ReplyDeletedhanyawad Vishvas 🙏
DeleteExciting
ReplyDeleteThank You Trunal 🙏
DeleteVery much interesting.👍
ReplyDeleteThank You 🙏
DeleteAs always, Bhari 👍
ReplyDeletethank you Bhushan 🙏
Deleteएका सुंदर ट्रेक चे अप्रतिम लेखन, दोन्ही घाट वाटा भन्नाट आहेत, त्या रांगेतल्या सर्व घाट वाटा सुंदर आहेत. मस्त फोटो आणि वर्णन 👍⛰️
ReplyDeleteधन्यवाद गिरीश सर 🙏
DeleteAs usual wonderful... while reading I see the trek by your eye.. thanks for making such blogs...
ReplyDeleteThank You Jitendra 🙏
Deletethat serves the purpose of writing here 😁