Monday, April 4, 2022

मोहनगड आणि कावळ्या

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

this won't take long, श्रद्धा vs छंद.. मोहनगड आणि (adhoc) कावळ्या

तसं बघायला गेलं तर ह्या article मध्ये लिहिण्यासाठी ✍️ काही असणार नव्हतं.. plan होता - मोहनगड (only).. internet 🌐 हून मिळालेल्या माहितीनुसार, "गड अवघड नाही (endurance as well as technical)", हे लक्षात आलं होतं 😀.. पण मग trek मध्ये अविस्मरणीय काही घडलं नाही, तर मग त्याला ToDo मधून बाद कसं करणार? म्हणून हे article..

ह्याची सुरुवात होते काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा कानडे सरांच्या statusला इथला photo बघितला.. as a result, उत्सुकता 🤠 तर वाढलीच, आणि राहुलने काही दिवसांपूर्वी suggestही केला.. 'small world' किंवा 'coincidence' म्हणतात, ते हेच.. त्याचा free slot बघत weekend ठरला एप्रिल 🍉 महिन्यातील पहिला आणि शनिवारी 'आम्रखंड 🥭 special' गुडीपाडवा असल्याने दिवस ठरला रविवार.. पावसाळा ⛈️ संपून हिवाळाही 🧥 संपला असून, वरंधा घाट दुरुस्त झाल्याचही त्याने सांगितलं.. and lastly, वैभवच्या "ऊन खूप आहे, लवकर निघायचं का?" ह्या प्रामाणिक मताला योग्य प्रतिसाद देत plan तयार झाला.. सोबतीला अजून होते सुयोग आणि Explorers Groupचा one of the trek leads, परमेश्वर (ह्यापुढे परम).. (त्यांचा) सांधण cancel 🚫 झाल्यामुळे he was last minute entry - to this article 📄..

०३ एप्रिल २०२२

५ वाजता 🕔 घरून निघून, in no time we were on the highway 🛣️, heading South ⬇️.. दोन जण चहा प्यायला बसले आहेत बघून, भोरच्या पुढे हिर्दोशीला आम्ही सुद्धा आमची गाडी 🚗 थांबवली.. पोहे-भजी-चहा झाल्यावर (बनवून आणि खाऊन) नीरा-देवघर धरणाला राहीलेला वळसा घालत आम्ही त्याच्या उत्तरेकडून पश्चिमेकडे आलो होतो.. पौर्णिमेच्या पहाटे खडकवासलात चंद्राचं 🌕 विलोभनीय प्रतिबिंब दिसतं, अगदी शेम-टू-शेम (same-to-same) आज इथे सुर्योदय 🌞 अनुभवायला मिळाला..


शिरगाव - 🕗 ८ वाजता मंदिराबाहेर मोकळ्या पटांगणात गाडी लावून "किल्ले मोहनगड ➡️" board (GMaps location) ने सांगितल्याप्रमाणे आम्ही गड चढायला सुरुवात केली.. सिंहगड सारखंच इथेही ठरवलं तरी कोणी चुकू शकत नाही, वाट इतकी मळलेली आहे.. थोड्या वेळाने तोरणा दिसायला लागला आणि अजून थोडं वरून राजगड 😍.. तरी, 'गेल्यावर article लिहू' असा विचार अजून केला नव्हता - everything was just normal till here.. but then, was time for a twist 🙄, श्रद्धा vs छंद..

गडमाथ्याच्या सुरुवातीला traverse अगोदर दुर्गाडीहून येणारी वाट इकडच्या / शिरगावहून येणाऱ्या वाटेला मिळते.. junctionला एक ठाणं आहे, जिथे २ आजी 👵 पूजा करत होत्या आणि वर जायला निघतच होत्या.. आम्हाला बघताच त्यांनी सांगितलं (multiple times), "चपला इथेच काढून पुढे जा, काळजी करू नका - कोणी नेणार नाही".. त्यांनी even ४-५ spotsही सांगितले.. इतकी श्रद्धा बघून आम्हाला काही shoes 🥾 न काढता तिथून पुढे जायची इच्छा होईना.. पण अजून साधारण ८० मी. elevation 📈 बाकी होता आणि आम्ही सापडलो होतो धर्मसंकटात 😕.. shoes is the trekker's first shield 🛡️.. then follows, full pants, full sleeves, cap 🧢 etc in descending order of usefulness..

दुर्गाडीच्या वाटेहून येणाऱ्या २ जणांच्या पायांकडे आम्ही खूप आशा लाऊन बघितलं.. but, no luck 🙁.. आजींसारखे ते सुद्धा अनवाणी 👣 होते.. परम even said, treks delay ⏳ होतात पण ह्यावेळेस कारण नवीन / वेगळच आहे.. photo 📷 काढण्यात मग्न वैभव अजून यायचा होता.. त्याच्यासाठी थांबून, आम्ही सगळे सोबत पुढे निघालो, shoes on.. तेवढ्यात आजी बऱ्याच पुढे निघून गेल्या होत्या.. एक तर वरच्या मंदिरात पोहचल्या सुध्दा होत्या.. वैभव आणि गोंडस दिसणाऱ्या सुयोगला ढाल 🔰 बनवून आम्ही आजी पासून 'keep safe distance
' approach घेत पुढे सरकत होतो 🐢.. शेवटी धाडस करून वैभवने आजीला overtake केलं.. थकलेल्या आजींकडून काही objectional response नाही आहे 🙃, हे बघत आम्ही पण पुढे निघालो..

मंदिरात काही localitesशी गप्पा झाल्या.. एक काका तरी म्हटलेच, "बुट नाही घालून यायचे इथे".. दुसऱ्या काकांचा "त्यांना कसं माहिती असेल" reply ऐकत आमचा confidence अचानक वाढला 🤗 - चला, कोणीतरी local आपल्या sideहून आहे (that's secret to every success story).. म्हणजे, श्रद्धा vs छंद, ह्यात कोणाचाच पराभव झाला नव्हता 🙋..

अजून थोडं वर (top) पोहचत mesmerizing सह्याद्रीला once more निहाळत (काय जे आणि जेव्हढे दिसत होते), अलौकिक दृश्य mobile आणि मनात साठवून परतीला निघालो.. ह्या आठवणींमध्ये समावेश होता / आहे - W point, रायरेश्वर, नाखिंद, कोळेश्वर, महाबळेश्वर, गाढवाचा माळ, Arthur Seat, मधू-मकरंदगड, प्रतापगड, मंगळगड, कावळ्या, रायगड, राजगड, तोरणा आणि बरेच काही ज्यांची नावे आम्हाला माहितीही नाही.. एखादा कोकणदिवाही असेल, एखादा लिंगाणा आणि एखादा रायलिंगही.. आपण थोडे कमी pollution केले असते, तर सिंहगडही.. असो, सुयोगने एका pointला even 'potato point' नावही दिले 😁..

W Point आणि बरंच काही

side note - नाखिंद म्हणजे protruding part of a mountain.. म्हणजे जिथे डोंगराचा थोडासा part नाकासारखा 👃 बाहेर येऊ बघतो, त्याला नाखिंद असं म्हणतात.. इथल्या नाखिंदला नेढंही आहे, पण स्वप्नीलने अजून दिलेल्या माहितीनुसार, ते सगळ्याच नाखिंदला असतं, असं नाही..

नाखिंद with a नेढं, credits: राहुल

well ahead of schedule असल्याने plan मध्ये कावळ्या add करण्यात आला.. कारण तेवढ्यासाठी आपण इतक्या लांब येणार नाही, आणि जोडीने करायला परत मोहनगडच आहे, म्हणून तोही plan लवकर होणार नाही, हे लक्षात घेत लवकर उतरून लागलीच कावळ्या गडाकडे निघू, असं ठरलं..

उतरतांना परत 'मंदिर cross करतांना shoes काढायचे का?' तर, 'झटपट कोणाकडे लक्ष न देता निघून जाऊ' म्हणत एका आजोबांनी "दर्शन घेतलं का?" च्या प्रश्नाला न थांबता / मागे न बघता "हो" उत्तर देत आम्ही निघालो.. थोडं diversion घेऊन पाण्याची टाके बघायला गेलो.. तिथे,
परम: सगळ्यांचे Action आहेत.. trekking साठी perfect shoes..
सुशिल: माझे CTR aahet..
सुयोग: काही अपवाद 🍀 असतात..
सुशिल: trekking साठी CTRच वापरायचे असतात.. अपवाद तुम्ही चौघे आहात..
राहुल: trekking साठी Salomon perfect आहेत..
वैभव: shoes कुठलेही असो, इथे काढावे लागतात.. 👻
म्हणजे, हा विषय इतका मनात बसला होता की can't explain it here.. तो फक्त, तुम्ही बरोबर असते तरंच तुमच्या लक्षात आला असता..

खाली मंदिरात पोहचलो तेव्हा सकाळची मांजर 😿 छपराहून खाली उतरली होती आणि आम्हाला बघून क्यांव-क्यांव करत होती.. अहो, उपाशी असल्यावर सगळ्यांचेच स्वर बदलतात.. वैभवने द्राक्ष 🍇 काढायच्या आत, राहुलने तिला biscuit 🍪 दिले.. अशी तुटून पडली की विचारू नका.. दुसरं अर्ध संपवून परत पाण्यासाठी क्यांव-क्यांव.. पोटभर पाणी पिऊन, आराम करायला बसली, पण द्राक्ष चाखला सुद्धा नाही..


पुढे अर्ध्या तासात आम्ही पुणे-रायगड जिल्हा border वर होतो.. ridge धरून internationalच नाही तर इतर bordersही आहेत, ह्याचं उदाहरण.. वरंधा घाटात ह्या खिंडीच्या / ह्या u-turn पलीकडे आहे रायगड जिल्हा आणि अलीकडे आपला पुणे जिल्हा.. इथे ही board होता - कावळा गड.. आणि समोर दिसत होत्या ८-१० पायऱ्या.. मागच्या वर्षी भैरवगड-रतनगड करतांना बघितले होते कोंबडा 🐓, अस्वल 🐻 आणि गाढव 🐴.. आणि आज वेळ होती कावळ्याची 🐦.. कोणाच्या नावाने गडांची नावं ठेवतील, ह्याचा काही नेम नाही ! 🤔

district border - पुणे (left), रायगड (right)
credits: सुयोग

"४० मिनीटात पोहचाल तुम्ही".. back-to-base आलेले ३ जण भेटले, हे त्यांचे estimate.. १२:१५ वाजता आम्ही झेंड्याखाली 🚩 होतो, exactly as they estimated.. म्हणजे एकाने estimate करून दुसऱ्याने execute करायचे, हे पराक्रम फक्त आमच्या क्षेत्रातच नसतात तर 😜.. गड खूप मोठाही नाही, आणि ह्या बाजूने काहीच उंच नाही.. घाटातून जो गडाच्या उत्तरेकडे नाव्हीण सुळका दिसतो, त्याचे दर्शन 🧐 शेजारी असून इथून होत नाही.. एक पायवाट जात होती त्या दिशेने, पण जास्त मळलेली नसल्याने आम्ही परत ↩️ माघारी आलो.. राजगड, तोरणाला सकाळपेक्षा जवळून बघून समाधानी होतो.. viewला अजून होता घाट रस्त्याचा steep drop (steeper than usual घाटs), जो सप्तशृंगी गडाची आठवण करून देत होता..

कोकण side of वरंधा घाट

border हून परत आपल्या जिल्ह्यात शिरत आम्ही वाघजाई मंदिराजवळ लिंबू-सरबत साठी (GMaps location), नांदगाव जवळ नीरा साठी (GMaps location) आणि भोरला जेवायला थांबलो.. खेड-शिवापूर toll plazaला usually असलेली भयाण गर्दी अजीबात नाही, हे बघत सगळ्यांचे अभिनंदन 🤝 करत १२ तासांनी, exact ५ वाजता घरी पोहचलो..

as said, this won't take long - so, winding up in short.. पण shoes वाला किस्सा, is another one for a lifetime 😇..

8 comments:

  1. Loved reading the blog. It helped me to relive the moments of our recently concluded trek literally.

    'Belief vs Hobby' chapter is vividly written and makes the blog humorous and memorable, exactly what it did to our trek. :-)

    Look forward to being a part of many such adventures in the future too.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Parmeshwar for the kind words 🙏
      We sure will plan many more in future, together 😊

      Delete
  2. श्रद्धेने सबुरी ने घेतले म्हणून छंद जोपासता आला...नाहीतर अवघड होते..ब्लॉग वाचून मजा आली परत एकदा..

    ReplyDelete
    Replies
    1. 😊
      खरंच.. next time, night trek करू मोहनगड 😁🤪

      Delete
  3. Nice one Sushil Bhai :-)

    ReplyDelete
  4. Nice description,as usual.
    Liked sunrise wala click.

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...