Tuesday, October 27, 2026

नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। 

बट्ट्याबोळ.. नवसकाळी २०२६..
देर आए, दुरुस्त आए
 
starting 🏁 from where the last year's नवसकाळी edition rested 🔚.. and just to let the blog title "trekking" not feel left out, pretty fittingly this time, the article is completely devoted to hiking / trekking ⛰️.. शारदीय नवरात्र म्हणजे ह्यावर्षी ११-१९ ऑक्टोबर, रोज सकाळी होणारा हा नवरंग उपक्रम काही अपरिहार्य कारणास्तव 🦟 प्रस्तावित वेळेवर चालू न झाल्याने मागच्या वर्षीसारखी ह्यावेळेसही "नवसकाळी" बोंबलण्यास आतुर होती 😞..
 
इतर treksचं तसं बरं असतं.. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा - सब चलता है.. पण आपण जे 'दिवसाला महत्व असतं' म्हणतो, ती 'तिथी' ह्याबाबतीत तनिक खडूस असते 🙂‍↔️.. 'नंतर ये' सांगितलं तर SP अस्लम सारखं 'आपकी आवाज नहीं आ रही' म्हणत सर्रास phone cut करते 📵.. गतवर्षी सारखाच यंदा सुद्धा "बट्ट्याबोळ" झाल्यामुळे नाईलाज म्हणून ही अधोलिखीत मनमानी.. in other words, मनाच्या समाधानासाठी नसून असल्यासारखा हा लेख 📝.. देर से ही सही, with an offset of 5 days, this year's नवसकाळी was / is 'back on track' ☺️..
 
आणि हो, फार फरक नसला तरी, hiking आणि trekking आमच्यासाठी एकच.. प्रत्येक गोष्टीला ४-४ शब्द का असतात इंग्रजीत?, हे काही केल्या झेपत नाही बघा अजून 🤦‍♂️.. medical आणि biology पेक्षा जास्त नखरे आहेत इंग्रजीचे.. असो,

नवसकाळी (5d offset)
9 days, 9+1 hikes, वर्ष ८वे
 
1️⃣ 531 mtrs, 5.7 kms
Save 100% when you don't buy anything.

तिथी प्रमाणे हिरवा आणि रंग षष्टी.. तारीख १६ 🎂 - म्हणजे सुमेधच्या पावलांचं नवीन दशकात पदार्पण.. २ वर्षांगोदरच्या ८०० @ ८ सारखंच ह्यावेळेसही सिंहगड streakच्या ११०० @ १० milestoneचं निमित्त साधून साजरा करण्याचा plan अपरिहार्य कारणास्तव 🤒 फस्कटित होत 'आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा' वर ढकलण्यात आला.. घाई गडबडीत वाचण्यात लक्षात नसेल आलं तर इथे तुम्हाला प्रश्न पडायला हवा होता, ''षष्टी' कुठला नवीन रंग आणि 'हिरवा' कुठली नवीन तिथी?' 🫠..
 
अंथरुणातून उठून सीधा गड करण्यापेक्षा परवाच्या दिवशी तळजाईला फेरफटका मारला तेव्हा 'still not there' लक्षात आलं होतं 🫣.. तरी आजचा मुहूर्त हुकता कामा नये म्हणून काही झालं तरी गडावर जाऊन यायचा निश्चय झोपतांना उशाशी सोबत घेतला होता.. शुक्रवार असून for a similar reason महेश नव्हता.. म्हणून नकळत सुरु झालेल्या नवसकाळीची सुरवात अकेले-अकेलेच झाली.. आता इथे तुम्ही म्हणाल, 'अकेले?', तर तुमचंही बरोबर आहे.. शारदीय नवरात्र म्हणजे गडावर वेगळाच जल्लोष असतो.. regular येणारी मंडळी ९ दिवस रोज येत असते म्हणून, photo मध्ये कोपऱ्यात कुठेतरी माझं पहिलं-वहिलं ☝️ contribution डोकावू बघत होतं, जिथे बाकीच्यांचे चेहरे ६ पटीने 🖐️☝️ फुललेले होते..

 
2️⃣ 628 mtrs, 6.8 kms
Stop forcing. Start tuning.

'अकेले-अकेले' म्हणजे गेली ६-७ वर्ष सोबत येणाऱ्यांपैकी सोबत कोणी नाही.. आजही तेच.. regular येणाऱ्यांच्या✌️🖐️ ७ सोबत माझे २ ✌️..
 
कालपेक्षा आज कमी वेळ लागल्याचा आनंद होता 🙃, तोच उतरतांना वैभव भेटला.. आता कुठे थोडंफार (तरी बळच) नवसकाळी वाला feel यायला सुरुवात झाली होती 😀.. actual नवरात्रीचे राहिलेले २ दिवस सलग येऊन पुन्हा दसऱ्याला आलो तर ११०० होतील, हे लक्षात घेत रेंगाळत असलेला milestone जास्त दूर न ढकलायचं ठरवलं 🥳, त्यात वैभव तेव्हढ्यापुरता तरी यायला तयार झाला 🤝.. गड चढायचं elevation gain ~५०० मी. असून वर अथवा खाली (तुमच्या सोईनुसार) दिसणारे जास्तीचे आकडे वैभवसोबत थोडं repeat केल्याचे आहेत..

 
3️⃣ 687 mtrs, 7.7 kms
व्यायाम उद्यापासून fix 🤘

महिन्याच्या सुरुवातीला प्रसादच्या वाढदिवसाला 🎂 त्यांच्या १००च्या milestoneला सोबत म्हणून अधिकचा केलेला गड (अद्याप न मोजलेला) पूर्ण करायचा राहिला होता 😶.. एकदा गड चढून + तो राहिलेला जर आज पूर्ण केला, तर count दोनने वाढवून उद्या तळजाईला जाऊ शकण्याचा पर्याय सुध्दा आपल्याकडे असल्याचं लक्षात घेत त्यावर अंमलबजावणी झाली.. म्हणून, आजसुद्धा 📈 ५००चे सीमोल्लंघन झाले..
 
रविवार असता वाटेत भेट झाली सूर्यनमस्कार 😌 fame सचिनशी.. रोज व्यायाम करत असून नेहमी 'व्यायाम उद्यापासून fix' वाला t-shirt 👕 असतो.. ह्याला "अंदाज़ अपना अपना" म्हणायचं की "ये बाबूराव का स्टाईल है"? 😆..

Originals, as captured

कलाकारी by AI

4️⃣ 180 mtrs, 11.2 kms
हम पर किसीके होने का असर उतना ही होता है,
जितना की उनके ना होने का.

विलास सर नऊ दिवस अनवाणी राहत असल्याने तळजाईला आत शिरत नसत 🚫.. म्हणून त्यांच्या photosession आणि ultra photosची जरा वाट बघावी लागेल.. तरी, article मधले बहुतांश photo 'AI generated' नसले तरी 'AI modified' नक्कीच आहेत 😍..

Original 📸

by AI

5️⃣ 519 mtrs, 5.6 kms
Sɪɴʜɢᴀᴅ 𝟙𝟙𝟘𝟘
यत्र साहसं, तत्र विजयः

सुधारित planनुसार आज असणार होता ११०० 🎯.. काल तळजाईला ठरल्याप्रमाणे खाडिलकर, लवाटे sir आणि वैशाली madam सोबत येणार होते.. अजून join होणाऱ्यांमध्ये सीमा, वैभव आणि भूषण होते.. त्यात काल सकाळी ६ ते आज सकाळी ६, अशी "२४ तास ⏱️ सलग सिंहगड चढाई" मोहिमेत काही ओळखीचे volunteers आणि participants असल्यामुळे त्यांचीही सोबत असणार होती..

जास्त details देत नाही आणि ५ जणांची RTO passing 🚗 असल्याने वाटेत भूषणला कायदेशीर pick करून पायथ्यापासून आम्ही ५ जणांनी सोबत ⛰️ गड चढायला सुरुवात केली.. काल संध्याकाळी देवूचं कळलं, आज मनीष भेटले वाटेत - २४ तास मोहिमेत १० वेळेस सिंहगड 👏.. बाकी मग वर गेल्यावर २० वाले सिद्धेश्वर, १८ वाले सचिन पहिला 🥇 आणि दुसरा 🥈 पुरस्कार घेतांना दिसले 🫡 / भेटले..

त्याआधी, ठरल्याप्रमाणे खाडिलकर आणि लवाटे sir मेट्याहून परतले ↪️.. शेवटच्या टप्प्यात वैशाली madam 🪨 दगडात पाय अडकून पडल्या.. इथेही जास्त details देत नाही पण हे नक्की की माझ्यापेक्षा madamनाच ११०० जास्त लक्षात राहील 🤕.. बाकी मग मिसळ साठी milestonesला company देणाऱ्या भूषणला आज सोबतीला कोणी नसल्याने त्यानेही मिसळचा बेत रद्द केला..

Thank You for joining 🙏
Bhushan, Mandar, Shrikant, Pralhad,
Vaishali, Santosh, Baldev, Sachin
 
6️⃣ 164 mtrs, 10.8 kms
Know the difference between
being patient and wasting your time.

half done.. ५ झाल्याचं समाधान असं की खात्री पटली, अजून ४ दिवस continue करत ह्यावर्षी पडणारा खाडा आपण चुकवू शकतो 😇..

पुढचा milestone आणि तारीख ठरेपर्यंत सिंहगड वारी shifts now to back burner ♨️.. so, गाडी खरं तर इतर ठिकाणी फिरस्तीला निघायला हवी होती पण पुन्हा तेच, ही 'नवसकाळी' authentic नव्हे 🤦‍♂️.. म्हणून, तळजाई repeat आज आणि तळजाई repeat उद्या..


7️⃣ 173 mtrs, 10.7 kms
The best time has already passed.
The second best is disappearing ⏳.

आजचा दिवस होता sketch आणि photography विशेष.. photo अर्थातच ultra, म्हणजे 35x चा माज करत 😜 सूर्याचा मंगळ म्हणून कसा photo काढायचा, ये कोई इनसे सीखे..

35x credits: विलास

sketch special म्हणजे सुभाष बाठे.. ह्यांच्या कलाकारीला आणि कलाकृतींना साष्टांग नमन 🙇‍♂️.. चहा प्यायला बसणार आणि बघता-बघता (literally) फिरवणार लेखणी 🖋️.. आणि पलक झपकते / thanos ने snap 🫰 करायच्या आत कागदावर जणू बोलकी / चालती-फिरती सृष्टी अवतरते.. जरा अती झालं असलं तरी ह्यांची scrapbook बघाल तर नक्की चाट पडाल, हेही तितकंच सत्य..

चहाचा विषय निघालाच आहे तर होऊन जाऊ दे, 


8️⃣ 497 mtrs, 4.8 kms
It's a bigger risk ⚠️ not to take one.

आज शुक्रवार.. back to normal महेश येणार म्हणून back to basics, गाडी पुन्हा 🚩 सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या दिशेने निघाली.. म्हणजे, back burner वगैरे काही नसतं मुळी - "सब मोह माया है"चं धावतं-पळतं उदाहरण 🤠..

आजची highlight आणि climax होती दसऱ्याला उधळलेली हळद.. बाकी, "A picture is worth a thousand words"..

 
9️⃣ 983 mtrs, 9.7 kms
Winter is coming, hopefully 🤞

पावसाळा / पाऊस नाही म्हणून सध्या होणारी आपली फजिती 💧 दूरवरून बघणाऱ्या हिवाळ्याला सुद्धा विचार पडत असावा, 'जाऊ का नको?'.. 'तिथी' येण्यावाचून रहात नाही, आणि 'ऋतु' असतो 'अपनी मर्ज़ी का मालिक'.. दोन्हीं समोर आपली काही चालत नसते 😥.. म्हणून, hopefully गरम कपडे काढायची गरज नाही पडणार यावर्षी.. oops 😬, उलट म्हणायचं होतं.. hopefully, tables will turn (and stay) in our favour 🤞..

परंपरेनुसार ९ मधला कुठलातरी एक दिवस (सातवा in particular) २ trek करायचे असतात / होत असतात.. ती follow करत आज दोनदा गड झाला.. सातव्या ऐवजी नवव्या दिवशी झाल्याचं काही दुःख नाही 😎.. तसंही ही मुळात नवसकाळी नाहीच, rather असून नसल्यासारखी.. आज सोबतीला वैशाली आणि मधुरा होत्या, पण फक्त फाट्यापासून पायथ्यापर्यंत..

 
doing the math 🔣..
4362 mtrs elevation gain 📈
73.0 kms 👣 feet distance
 
🔟 597 mtrs, 6.1 kms
मन से रावण जो निकाले,
राम उसके मन में हैं.

दरवेळेस नाही, पण एखाद-दुसऱ्या पर्वात दहाव्या दिवशी उतारा म्हणून consolation trek झाले आहेत.. यंदा दहावा दिवस म्हणून आजची मोहीम होती १० वेळेस पर्वती चढायची (आणि उतरायची).. पण fresh from the oven 🛌 अस्वस्थपणा आणि ९ दिवसाचा शहाणपणा, ९व्याचा actually दीड, factually दोन - यामुळे त्रासलेले पाय 🦵 तनिक protest करू इच्छित / पाहत होता.. उठण्यापासूनची जी जबरदस्ती चालू होती, ती पहिल्या २-३ फेऱ्या होईपर्यंत काही पीछा सोडत नव्हती 😦..
 
शेवटपर्यंत "काल करे सो आज कर" च्या विपरीत 'आराम उद्या करू' ची समजूत काढत रडत-खडत / कसा-बसा १०चा आकडा गाठला 😓.. रावणाच्या प्रत्येक मस्तकासाठी एक 😈.. आपल्यातल्या प्रत्येक विकारासाठी एक.. कुठले दहा? 🤔.. हा आजचा गृहपाठ / उत्तर पुढील नवसकाळी अंकात..


thus ends another नवसकाळी edition, this time नसून असल्यासारखी.. confined to limited locations, with no colors followed..
#delayed yet #CannotAskForMore 

stats credits: Coros ⌚
photo credits: ChatGPT

6 comments:

  1. ' देरसे परंतु दुरुस्त' कहावत आपके लिए और 'Half done is Well begun' हमारे लिए संहित की गयी है ना?

    ReplyDelete
  2. Sahi re ... As always, ekdam kadakkkk...

    ReplyDelete
  3. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा' वर ढकलण्यात आला

    मस्त, hats off to your consistency and determination....माझं वरच्या ओळीं प्रमाणे चालू आहे

    ReplyDelete
  4. एकदम भारी!

    ReplyDelete
  5. छान लिहिले आहे.

    ReplyDelete

Recent Post

नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  बट्ट्याबोळ.. नवसकाळी २०२६.. देर आए, दुरुस्त आए   starting 🏁 from where the last year's नवसकाळी edition r...