Wednesday, May 28, 2025

सिंहगड - धायरी - सिंहगड

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

but this way is better ना​..
सिंहगड धायरी सिंहगड​..
Cowabunga !!

title s2d2s जरी असलं तरी पुढे मामला थोडा अलग आहे 🤨..

एके दिवशी STFचे योगेश सर 🎒 भेटले सिंहगडला.. 'पाठीवर दप्तर कसले?' प्रश्न पडला.. विचारपूस करता कळलं, काल संध्याकाळ ४ पासून त्यांची पायपीट चालू होती.. एकूण ३ जण s2k2s करत होते 😲.. आतकरवाडी - वाघजाई मंदिर - आतकरवाडी.. stats चा थोडा अभ्यास केला किंवा अंदाज बांधला तर, almost SRT एव्हढा trek.. नाही करत लोकं, असं नाही, पण त्याची मर्यादा कोंढणपूर फाट्यापर्यंतच असते (k2s2k), ज्याला एक रात्र तशी पुरते 🌌.. त्यात आतकरवाडी add करणं. is. probably. too. much.. त्याच दिवशी, rather रात्री वैभवने black peakच्या group सोबत k2s केला..

on a parallel thread, भूषण सोबत k2sचे discussion चालू होते.. त्याच्या societyतून २० जणांचा group k2s करणार होता.. पौर्णिमा येईपर्यंत हा आकडा ४०+ झाला.. धायरीहून एकट्याने चालू करून त्याला / त्यांना खिंडीत गाठून पुढे सोबत जाऊ, असा plan झाला 🙋‍♂️.. execute करायच्या दिवशी, rather रात्री, खिंडीत १५-२० मिनिट वाट बघूनही जेव्हा तो / ते पत्त्यावर पोहचला / पोहचले नाही, 'आपटे सर आत्ताच cross झाले, त्यांच्यासोबत जाऊ' विचार करत, resumed 🚶‍♂️.. उन्हाळ्यातली पौर्णिमा म्हणजे k2sला असते जत्रा.. पुढे अजून सारंग भेटले (ह्यांना तुम्ही पहिल्या सिंहगड परिक्रमेच्या article through ओळखतात).. आपटेंना सोडून त्यांच्यासोबत कोंढणपूर फाट्याला आल्यावर गडाच्या दिशेने निघालो, तर आमच्या सोबत एक जण, 'मी सुद्धा येतो' म्हणत join झाले.. कोण? a new trek buddy.. cut to article's agenda..

भाग १ - s2d - सिंहगड ते धायरी

black peakचा नुसता उल्लेख करून कसं सोडून देईल ओ.. जास्त माहिती मलाही नाही, पण तात्पुरता / कामापुरता तपशील - UK मधला एक trek.. आता UK म्हणजे kingdom वगैरे समजू नका.. आपल्याला कधी-कधी UK registration असणाऱ्या गाड्या दिसतात, ते UK (गढ़वाल region).. height ६३८७ मी. 🗻.. वैभव धरून साधारण १० जण चाललेत हा महिनाअखेर (मे-२०२५).. article इतका रखडला आहे की एव्हाना तो trek in-progress आहे.. त्यांना सराव म्हणून कुठलातरी range trek करायचा होता.. k2s नुकताच झाला होता आणि 🌡️ उन्हाचा जोर बाकीचं काही सुचू देत नव्हता.. शेवटी ठरला 'सिंहगड ते विंझर' - अजून एक night trek.. title तर विंझर नाही, मग?.. we'll see 🙈 / we'll learn 🙊..

१८ एप्रिल २०२५

good fridayची सुट्टी असल्याने ठरला शुक्रवार.. येणारे गळत-करत उरले ४.. 'cancel करायचा का?' साहजिक प्रश्न पडायला लागला.. हो-नाही करत ९ वाजता पोहोचलो धायरी फाट्याला.. ९:४५ झाले, एकही bus येई ना..  'cancel करायचा का?', हा अजूनही उंबरठ्याशीच 'कोणी like and subscribe 🔔 करतंय का?' ह्याची वाट बघत होता.. पुढच्या stopला थांबलेल्या वैभवशी phone वर हेच discussion.. त्याला शेवटी, 'निशा आल्यावर आम्ही Uber करतो' असं सांगितलं.. निशा also, तुम्ही ओळखता.. SRT २०२२च्या article मध्ये आहे.. ती पु. ल. देशपांडे garden (bus stop) ला तिचं काम संपवून आम्ही (मी, सीमा आणि वैभव) जे करत होतो तेच करत होती (busची वाट बघणे).. आता सीमा कोण?, तर we are back to black peakची मोहीम.. म्हणजे, आजच्या ४ जणांमध्ये, मी होतो 'odd man out'.. आणि पुढे 'हर्षद कोण आणि कुठली मक्कारी?', हा प्रश्न पडेलच, तर ते गुपितच राहणार 😬 - त्यासाठी तुम्हाला सोबत trek करावे लागतील.. सर्वच किस्से असे कसे टाकणार ओ articles मध्ये, थाली परोसल्यासारखे? 😜..

निशा आल्यावर ठरल्याप्रमाणे, cab वाल्याला OTP सांगत नाही तर तिचा phone.. 'इतक्यात तर सोबत होती, मग phone का केला असेल?' हाच विचार करताय ना?.. I was also perplexed 🤔.. k2sला जे हर्षद म्हणाला होता त्याच 'मक्कारी' शब्दाला जगत, ती आणि सीमा already bus मध्ये चढल्या होत्या.. कुठली bus? कधी आली? हे सगळं त्या cabच्या नादात मला काहीच कळलं नाही.. काही फायदा होणार नव्हता, तरी तिने suggest केल्याप्रमाणे driverला सांगितलं, busला overtake करून पुढच्या stopला उतरवून दे.. त्याने तसं केलं ही, पण मग ride end करतांना लक्षात आलं, as expected, पैसे काही खास वाचत नाही.. म्हणून, continued till गुरुदत्त 🏁..

५ मिनिटात busही आली.. साधारण ११ वाजता, आम्ही 'सिंहगड ते विंझर' मोहीम चालू केली.. चढतांना (मेट्या आधी) discussion हेच की विंझरला रमत-गमत आपण ४ पर्यंत पोहोचतो.. इतक्या लवकर पोहोचून करणार काय?.. २०१९ प्रमाणेच potato point, wind point सोबत हा ६ पर्यंत ताणू / संपवू शकतो.. तोपर्यंत public transport चालू झालं असेल, मग जे भेटेल 🚙 🚌 त्याने घरी येऊ.. with this, निशा म्हणाली, 'उगाच उलट्या दिशेला potato point कशाला?'.. आणि, इथून trigger झालं ते म्हणजे, 'तिथूनच पुढे गेलो तर?'.. सहज विषय काढला, "विंझर ऐवजी धायरीला जायचं का?" 🙃.. बिनविरोध निवडणुकीचा जसा बिगर लढताच निकाल लागतो, अगदी same-to-same, इथेही झटक्यात हालचाल थेट उलट्या दिशेने.. then ⬅️ ⬇️ 'आधी पश्चिम, नंतर दक्षिण' पासून now ➡️ ⬆️ to 'आधी पूर्व, नंतर उत्तर'.. अंतर थोडं जास्त आहे, पण फायदा / USP हा की आम्ही direct घरी पोहोचणार होतो..

पुणे दरवाज्याला moonrise 🌔 सोबत थोडा विसावा घेऊन झाल्यावर, u-turn घेत आम्ही आता घाट रस्त्याने detour घेत काही अंतरावर wind point, better known as potato pointला आलो.. wind point म्हणायचं कारण हे की, इथे तुम्ही दिवसाच्या कुठल्याही ठोक्याला आलात, वारं लागणार म्हणजे.. .. म्हणजे.. .. लागणारच.. मग महिना कुठलाही असो, climate कसंही असो, (no offence) एखाद्या निर्लज्ज किंवा येड्या माणसासारखा ह्यालाही काही फरक पडत नसतो.. महाशिवरात्रीच्या जत्रेनंतर आज exclusive access भेटला, ह्या समाधानीशी 👍 आम्ही गारठण्याआधी इथून निघालो.. परत घाट रस्त्याला लागून कोंढणपूर फाटा..

इतपत वाजले होते २:१५.. हो, निवांतहूनही निवांत.. मोटा-मोटी (buffer सकट) ४ पर्यंत तरी पुढच्या तिन्ही टेकड्या चढून-उतरून + त्यापुढचा चढ चढून व्हायला पाहिजे, आणि तिथून accelerate करत ६ पर्यंत खंडोबा टेकडी, हे target ठेवण्यात आले ⏱️.. अधून-मधून स्वल्प विश्रांती साठी थांबत, पहिलं target was bang on time..

गेल्या आठवड्यात जत्रा होती (वर तुम्ही वाचलंय).. 'आज इथपर्यंत येऊनही अजून कसं कोणी cross झालं नाही?' प्रश्न पडत होता.. इतक्यात काही जण भेटले.. as usual प्रश्न तर होतेच, 'अजून किती वेळ लागेल?' अगैरे-वगैरे, सोबत एक जण विचारत होता, 'return येताय?'.. तुम्हाला जे सुरवातीला सांगितलं, त्यालाही तेच repeat केलं, 'title s2d2s जरी असलं तरी पुढे मामला थोडा अलग आहे', थोडक्यात सांगायचं झालं तर, 'return नाही, उलटा करतोय' 😎..

सुरवातीपासूनच सगळं black-n-white.. इथून पुढे त्याच काळ्या पांढऱ्यात, as described by AI,

In the heart of a summer night,
Moonlight dances, soft and bright.
Clouds whisper secrets to the stars,
As we hike beneath their silver bars.

The air is warm, yet cool with breeze,
Nature's symphony, a gentle tease.
Footsteps echo on the winding trail,
In moonlight's embrace, we prevail.

perfectly echoing the article's title
Cowabunga !! 😈 👻

credits: सीमा

कुठल्यातरी group वर Strava activity बघितली - bandok site was helping with the titles.. in a way बरोबरही आहे - रोजच काय, त्याच त्या 'morning run' / 'morning hike' नावाने activities !?.. कुठलेही कष्ट न घेता, काहीतरी वेगळं होत असेल - why not?.. थोडा ज्यादा शोध घेता लक्षात आलं की इतकं काही खास काम करत नाही.. once in a blue moon 🔵 सारखे कधी नवं ते titles चांगले असतात (काहीतरी शिकण्यासारखे), उदाहरण आत्ताच वाचलं 'Cowabunga'.. इतर वेळेस, सुजीत (ref: सरपास) म्हणाल्याप्रमाणे titles वाचून हे bandok नसून बिनडोक असायला हवं, हे मत मांडायला वेळ लागत नाही.. असो..

इथून पुढे ५:१५ वाजता नवरा-नवरी खिंड आणि तिथून पुढे ६चं target विसरत, target अलीकडच्या टेकडीवर almost तासभर बसून निसर्गाला black-n-white मध्ये रंग भरतांना बघत / निहाळत गप्पा रंगल्या 🗣️..

अंत भला तोह सब भला, का picture अभी बाकी है?.. गोंधळ उडवून सुरुवात झालेल्या eventचा समारोप इतका feel-good !? 🤞.. you wish.. दोन्ही तासभर रंगल्यावर - गप्पा आणि निसर्ग - उकडायला लागायच्या आत आम्ही शेवटचं निघालो.. main road लागताच सीमा तिच्या घरी.. आम्ही bus / रिक्षा दिसायची वाट बघत होतो.. उन्हाळाच्या सुट्ट्या आणि weekend म्हणजे normal लोकांचे दिवस थोडे उशीराच उगवता - ह्याचा सूर्योदयाशी काहीही संबंध नसतो.. so, आमच्यासारखे !normal आपली २ नंबरची गाडी चालू ठेवत, almost मारुती मंदिराजवळ पोहोचलो होतो.. त्यात ह्या दोघांसाठी एक रिक्षा थांबली.. माझं घर तिथून ५ मि. walking असल्याने 'भाग १' actually आधीच्या paragraph सोबत नाही तर कमीत-कमी इथे तरी संपायला हवा होता.. आणि इथे मदतीस धावून येत आहे, कुलकर्ण्यांचं वैभव, 'फक्त नावात' (मी नाही हं, त्याचीच signature आहे).. ३ तासांनी त्याचा message,

gele hote photos 🤦‍♂️

भाग २ - d2s - धायरी ते सिंहगड

वैभव again, ह्यावेळेस खोसेंचा.. ह्याची सुद्धा तुम्हाला एके काळी ओळख करून दिली होती.. exactly सांगायचं झालं तर, २०२२ सालच्या 'पहिलं प्रेम 💓.. राजगड' article मार्फत.. ह्याच्याशी गाठभेट होणे म्हणजे पुन्हा एकदा, once in a blue moon, but this time, नुसतं आलंकारिक नव्हे तर शब्दशः.. आता तुम्ही गोंधळात सापडलात ना !?.. नैसर्गिक उपग्रह आणि महाविद्यालयीन मित्र - ह्यात काय साम्य असू शकेल?.. अस्वलखिंडच्या article मध्ये 'blue moon' ची व्याख्या आहे.. आज अजून लक्षात आलं, ती अर्धवटच आहे.. म्हणजे 'blue moon' चे एक नसून दोन अर्थ आहेत.. एक जो already आपल्याला माहिती आहे - एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा.. नवीन वाला असा की, एका मौसमात ४ पौर्णिमा 🌕..

एका वर्षात ३ मौसम (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) मोजले तर प्रत्येकी ४ पौर्णिमा तश्याही होतातच, मग?.. तर तसं नाही.. शाळेत जितके शिकवले, AI जितके सांगतो आणि सध्याच्या घडामोडींनुसार तुम्हाला काय जे वाटतं, ह्या सगळ्यांचा विचार करत एखादा निष्कर्ष काढायचा झाला, तर बस सोचते रह जाओगे.. काय करायचं मग?.. तर हे मौसम वेगळे वाले, ज्यांना म्हणायचं "astronomical seasons".. सरळ-सोप्या शब्दात किंवा अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, उत्तरायण <- s1 -> equinox <- s2 -> दक्षिणायन <- s3 -> equinox <- s4 -> उत्तरायण (repeat).. ह्यात एखाद्याला ४ पौर्णिमेंचा लाभ झाला तर त्याला सुद्धा 'blue moon' म्हणतात.. पहिल्या प्रकारचं असो वा दुसऱ्या, दोघांची frequency २.५ - ३ वर्ष.. आता oct '२२ 🪔 पासून लावा हिशोब.. वैभवला ह्याआधी भेटूनही इतकाच कालावधी झाल्याचं लक्षात येईल.. म्हणून, शब्दशः blue moon..

भारतात अवतरताच 🛬 भूषण आणि माझ्या phone मध्ये प्रकटला.. 'भाग २' plan सांगताच होकार.. अधून-मधून पाऊस होता, पण 'चिखल वाला' असा नसतो, इतका फरक स्पष्ट ओळखू येत होता.. २-३ दिवस होते अजून, आणि उपरवाला त्यावर, rather त्याच्या familyवर 'food poisoning' च्या स्वरूपात कोसळला 🤮.. cancel जरी झाला असला तरी महेशने (ref: SRT २०२५) सुचवल्यानुसार लगतच्या weekendला पुन्हा एकदा त्याच्या मुलासोबत plan करायचा विचार होता.. तेव्हा तरी blue moonशी भेट झाली असती, पण इथे सुद्धा पुन्हा एकदा उपरवाला कोसळला - नुसता त्याच्यावर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर - स्वरूप काय? तर !normal = ओबड धोबड ⛈️.. किंवा तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर कळवा.. शेवटी trek वगळून भेटावं लागलं, पण त्याचा इथे काही संबंध नाही.. next topic..

वर 'a new trek buddy' म्हणून एक उल्लेख आहे.. सविस्तर माहिती म्हणजे 'अनंत पाटील'.. पौर्णिमेच्या k2s नंतर moonlight group 🔦 सोबत माझी तिसऱ्यांदा सिंहगड परिक्रमा झाली, तेव्हा पाटील साहेबही सोबत होते आणि यंदा d2sला सुद्धा हजेरी लावणार होते.. आमच्या group मध्ये सर्वात fast तसा 'local माणूस' राहुल (आज पुन्हा नव्हता - family reasons).. अनंत त्याहून सरस.. हार्दिक पांड्या २०२३ final हारल्यावर म्हणाला होता, "I'd rather lose to him (MSD)" सारखंच काहीतरी 😏..

एप्रिलच्या पौर्णिमेची गर्दी बघता, ह्या वेळेस त्या पुढचा शुक्रवार ठरला.. good friday नसला तरी आमच्यासाठी भ्रमंतीला पुरून उरणारे, सर्वच good day.. आदल्या दिवशी, नेहमीप्रमाणे suggestion दिलं - k2s ऐवजी d2s करायचा का?.. बाकीच्यांचं माहिती नाही, माझा भरपूर वेळ वाचतो, आणि time is money 💰.. त्यात अनंत सरांचा reply, 'I am ok with k2s and d2s'.. म्हणलं, दोन्ही नाही करायचे एक साथ - articleचा मामला थोडा अलग आहे..

महेश once a week सिंहगडला येत असतो.. शक्यतो प्रवीण सोबत असतात, आजही होते.. ५ झालेत.. सहावा आणि शेवटचा गडी नवीन होता, निखिलेश - महेश's another acquaintance - SRT सारखी गत नको व्हायला, ही वेगळी हुरहुर.. अजून २ येणार होत्या (भाग १ वाल्या अलग), पण वेळेवर cancel.. त्यांचा परिचय, जेव्हा कधी येतील, त्या-त्या article मध्ये..

१६ मे २०२५

सगळे घरी जमल्यावर, आम्ही १०:२० दरम्यान सुरवात केली.. १५ मिनिट concrete - मेरे TDSकी धरती आणि ​(कलकल​ && दूषण).. नंतर पुणे दरवाज्यापर्यंत मेरे देश की धरती आणि ​(!कलकल​ && !दूषण)..​ interestingly, that's not exactly negation programmatic​ally, yet is exactly opposite pragmatically.. another example of matters behaving differently, theoretically and practically​ - it's not just with Pakistan 👿..

आकाशात सर्वत्र आभाळ, म्हणून चांदोबाला लपायला लिंबोणीच्या झाडापेक्षा ऐसपैस विकल्प उपलब्ध होता.. put differently, वर चिकटवलेला black-n-white नज़ारा आजच्या वाढीव अपेक्षांना नाराज करणार होता 😞..

खंडोबा टेकडीच्या पायथ्यापर्यंत घामात भिजत, आणि पुढे पायऱ्या चढतांना वाऱ्याचा आनंद घेत, आम्ही typical schedule नुसार, म्हणजे तासाभरात, मंदिरासमोर पोहोचत क्षणभर विश्रांती घेतली.. काळोख्यात जेमतेम दिसणाऱ्या एखाद्या areaस पाहिजे ती ओळख सांगणारे सर्वांचे अंदाज बरोबर ठरत होते 😜.. हा खेळ काही वेळ चालला, आणि इथून पुढे, आमची तुकडी नवरा-नवरी खिंडीच्या दिशेने निघाली.. चिखलामुळे आता बूट जड व्हायला लागत होते.. बस थोड़ी देर और - एकदा k2sला लागलो की परत हलके होतील म्हणत साधारण तारीख बदलायच्या वेळेत आम्ही खिंडीत पोहोचलो 🕛..

इथून उजवीकडे k2s - whole वावर was ours, in a good sense.. गेल्या काही दिवसात झालेल्या मूठभर पावसाने हिरवळ पुन्हा बहरली होती.. तरी unexpectedly, गड येईपर्यंत एकही group नाही दिसला.. आज पावसानेही हजेरी नाही लावली, हे त्याहून महत्वाचं, आणि ह्यासाठी निसर्गाचे खूप-खूप आभार.. पडला असता तरी काही बिघडलं नसतं, but this way is better ना.. पण मग, ह्याचा मोबदला म्हणा / bettering it further​ म्हणा, ​वाटेत भेटले / दिसले राम और श्याम 🐍 🐍.. कुंभ मेळ्यात बिछड़ले असावेत.. वेग​-वेगळ्या टेकड्यांवर मस्त झोपा काढत होते.. इतर कुठले नाही तर त्यांचे स्वप्न भंग केल्याचे पाप आज आम्ही केले होते..

राम और श्याम

संपूर्ण वाटेत अनंत was in lead.. भूषण त्यांच्या मागे आणि नंतरचा sequence काही ठरलेला नव्हता.. अधून-मधून महेश and company थांबायचं कुठे, ह्याचा आढावा घेत होते.. ह्यासाठी आमचा spot ठरलेला आहे, म्हणून पुन्हा-पुन्हा त्यांना अजून नाराज़ करण्यात येत होतं.. वर तुम्ही ४ वाजेच्या target बद्दल वाचलं, त्या चढावर, जो आता ह्या sideने उतार असणार होता, तिथे नावापुरती बसण्याजोगी जागा आहे, जिथे आमचे copyrights आहेत.. उन्हाळ्यातल्या पौर्णिमेचा एक side-effect हा की त्या गर्दीत बरेच लोक असेही असतात ज्यांना civic sense मूळतः नसतो ⁉️.. म्हणून, कचरा नसलेली ही जागा आम्ही आमच्यासाठी कायमची reserve करून ठेवली आहे..

उघडले गेले डबे आणि रंगल्या गप्पा.. इथेच हे article लिहायचा विचार डोक्यात शिरला 💡.. share करण्यासारखे अनुभव आणि किस्से भरपूर आहे.. दोन्ही side एकत्र करून, first of its kind होऊ शकतो.. फक्त एक गोष्ट घडवून आणायची होती, म्हणजे दोन्ही route 'mirror image' types झाले असते / होणार होते - potato point.. पाटील साहेबांना pin 📍 टोचली आणि काम बन गया..

लवकर पोहोचून गडावर कुडकुडण्या पेक्षा इथे संथ वाऱ्याचा मस्त आनंद घेत exact ०२:०५ वाजता निघालो.. भाग १ मध्ये ०२:१५ च्या हिशोबाने ४ होतं target.. ह्या sideने चढ जास्त असूनही​ for the same patch, target was ०३:३० 🕞.. का? ते समजून घ्या.. तिसऱ्या टेकडीचा चढ gradual आहे, ही अपेक्षा भंग झालेल्या भूषणला "sorry shaktiman" म्हणत target achieve करत आम्ही फाट्याला टेकलो.. पुन्हा डबे उघडण्यात आले, इतर आणि राहिलेले..​ 'good friday नसला तरी आमच्यासाठी भ्रमंतीला पुरून उरणारे, सर्वच good day' celebrate करत कोणाकडे bourbon नाही म्हणून दुधाची तहान 'good day' रूपी ताकावर भागवावी लागली, टिंग टिंग टिडींग 🍪.. 

इथून पुढे कंटाळा येतो concreteचा.. आपल्याकडूनच पैसे (TDS) घेऊन बनवला असला, तरी नको वाटतो.. इथलं फाटक ६ शिवाय उघडत नसतं.. पायी जाणारे जातात बंधारा ओलांडून, tourist spot म्हणून गडावर येणाऱ्यांना वाट बघावी लागते.. आता reply करू नका, 'बंधारा' वेगळं असतं - मराठी अजूनही शिकत असलो तरी 'कुंपण' हा शब्द ज्ञात आहे मला.. 'हारणार आहे', माहिती असलं तरी काही खेळ खेळायचे असतात - तसंच काहीतरी..

इतक्यात कोंढणपूरहून येणारी एक दुचाकी 🛵 त्या फाटकासमोर थांबली - local विक्रेते असावे.. आता मला सांगा - मागे बसलेली (साडी नेसलेली) बाई उतरणार, बंधारा ओलांडणार, त्या टपरी वाल्याला उठवणार, चावी घेणार, फाटक उघडणार - भरपूर वेळ लागेल, बरोबर?.. मग गाडी बंद कर ना दादा !! 🔐.. म्हणजे, 'का?'.. फाटकापलीकडे जाऊन परत हीच process undo करणार.. त्यातही तेच.. असो.. 'फाटक उघडलंय, आपणही जायचं का?' तर तात्पुरता का होईना ह्याला like and subscribe न करता आम्ही आमचा good day, better बनवत होतो.. नंतर आली त्या चारचाकी सोबत आम्ही ही संधी साधली.. 🛻 नसता आला​ तरी काही बिघडलं नसतं, but this way is better ना​..

बटाट्याला जायच्या आशा आता नाहीश्या होत होत्या.. detour घेतला तर ६ची bus नक्की चुकते, ह्याचा साक्षात्कार झाला होता.. मोरदरीला उतरणाऱ्या किंवा wind point, better known as 🥔 potato pointला जाणाऱ्या spot वर एक break नेहमी असतो.. तिथे थांबलो असता, 'काय करायचं?' discussion / debate चालू झालं.. पाटील साहेब ठाम होते, बाकीचे 'नको'.. मी सोडून कोणीच अजून गेलं नव्हतं, and that was good enough for an argument.. 'ही मुकली तर पुढच्या busने जाऊ' म्हणत, स्वेच्छेने, 'मी नाही येत, तुम्ही जाऊन या' म्हणणाऱ्या प्रवीण आणि निखिलेशला आप-आपले दप्तर सुपूर्द करून आम्ही detoured.. final tick in the box 🎁.. नसता झाला तरी article लिहिलं असतंच, but this way is better ना​..

+ निखिलेश, महेश, प्रवीण, अनंत, भूषण

इथून पुढे, rather माघारी येऊन आजचं दुसरं पाप करत आम्ही चिरनिद्रेचा आनंद घेणाऱ्या राम और श्यामला 👥 अस्वस्थ केलं.. इथून पुढे (this time rightly put) पुणे दरवाजा, शेवटचा group selfie (कदाचित पहिला सुद्धा) आणि गुरुदत्त.. अंदाज बांधल्यानुसार उतरतांनाच तासकाट्याने ६चा आकडा ओलांडला होता.. पुढची bus ०६:५० ला असते - पुढच्या वेळी आणि त्यानंतरही ह्या वाढीव माहितीचा पुरेपूर उपयोग करण्यात येईल.. घरी पोहोचून groupवर कुठलाच 'gele hote photos' सारखा message नाही आला.. आणि, त्या दिवसापासून तो group आज तक चिरनिद्रेचा आनंद घेत आहे.. ह्यावेळेस कुठलाही पाप न करता, ह्या articleची link 📧 टाकून, वेळ आली आहे त्याला अस्वस्थ करण्याची..

निरोप घेण्याआधी.. 
आता title s2d2s दिलं आहे तर तो trek सलग​ सुद्धा कधीतरी व्हायला हवा, नही तो नाइंसाफी होगी.. नाही आतकरवाडी तर किमान कोंढणपूर फाट्यापर्यंत d2s2d किंवा, आतकरवाडी to-n-fro खंडोबा टेकडीच्या स्वरूपात s2d2s.. कधी होईल माहिती नाही.. पण titleला इंसाफ ⚖️ 
मिळणार जरूर..

भाग १

भाग २

4 comments:

  1. जमलाय छान 👌
    D2S2D (Kondhanpur) पर्यंत जमण्यासारखा वाटतोय मला, करूया प्रयत्न पण हिवाळ्यात 😊

    ReplyDelete
  2. मस्त.. आता 2 way ट्रेक पण करू.

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...