Sunday, January 19, 2025

सिंहगड परिक्रमा #२

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

लांडगा आला रे आला.. सिंहगड परिक्रमा

ह्याआधीच्या article (सिद्धगड) मध्ये निरोप घेतल्या नंतर, खरं तर ह्या articleचा तसा काही अर्थ निघत नाही.. पण मग, जूनच्या सिंहगड परिक्रमेच्या article मध्ये नमूद केलं तसं कुठल्याही वाटेत दर वेळेस काहीतरी निराळेपणा असतोच.. म्हणून, त्या निरालेपणा खातर हे भांडवल (कष्ट हेच भांडवल)..


वाट तीच.. १९-२० च्या फरकाने वेळही साधारण तेव्हढाच लागला.. डब्बे फस्त करायची जागा ठरलेलीच.. आणि, सोबतीला बोटांवर मोजण्या इतकेच 🖐️.. म्हणून, detailed माहिती हवी असेल तर please shift to another tab by clicking here..

मग पुढे काय आहे? 🤔.. तर, "लांडगा आला रे आला".. हो, तीच ती - शाळेतली बोधकथा 🚸..

नेहमी आपण कुठल्यातरी news channel 📺 वर, किंवा gen-zला आपलंसं वाटेल असं, आजकाल ज्याचं सर्वात जास्त fad आहे, अश्या social mediaवर हमखास जे वाचतो / ऐकतो, ते म्हणजे, "बिबट्या दिसला".. आणि परिसर शक्यतो असतो सिंहगड ⛰️.. 'किती खरं? किती खोटं?' हे त्या भगवंतालाच ठाव..

ह्या सर्व बातम्या आपल्यासाठी त्या बोधकथेतील सुरवातीच्या mock drills.. आणि निरीक्षण केल्यास आपल्या हे ही लक्षात येतं की "mock" शब्दाचे दोन्ही ✌️ अर्थ कशे इथे योग्य ठरतात (literally).. so, now you better know, why they are called "mock" drills 😆..


हे झालं इतरांचं.. पण मग आपल्याला दिसल्यावर काय? सोबत शेळ्या घेऊन फिरायचं? 😃.. कोणीतरी आज suggest ही केलं, leg piece 🍗 ठेवायचा.. आता मला सांगा, त्याच्या वासाने ते अजून आकर्षित होणार नाही का?..

तरी share करतो आहे, trekkingच्या कारकीर्दीत आलेले अनुभव in chronological order 📆..

1️⃣ राजगड - गुंजवणे दरवाज्याची वाट उतरत असतांना एक हरणाचं गोंडस पिल्लू 🦌.. अंतर: ~४० फूट

2️⃣ धायरी-हत्ती डोंगर-धायरी - k2sची वाट सोडून खंडोबा टेकडीकडे येतांना एक वन्यप्राणी - सांबार / तत्सम.. अंतर: ~५० फूट

3️⃣ वाघेरा - गडाच्या मागच्या वाटेने उतरत असताना दूरवर टूनटून उड्या मारणारे लांडग्याचे २ पिल्लं / तत्सम 🐺.. अंतर: ~५० मीटर

4️⃣ SRT - राजगड उतरल्यावर जंगलात रात्री-अपरात्री दिसले / चमकले ते डोळे 👀.. अंतर: ~३० फूट

5️⃣ सिंहगड - रात्री / पहाटेची वेळ आणि पहिल्या पायरी जवळ एका adolescentने जीव वाचवत पळ काढणे.. again, सांबार / तत्सम.. अंतर: ~४० फूट

6️⃣ सिंहगड परिक्रमा - highlight of all.. बिबट्या 🐆, त्यांच्या age group मधला teenager.. अंतर: ~२५ फूट

'किती खरं? किती खोटं?' हे त्या भगवंतासोबत ह्या अंतरातम्यासही ठाव..

लांडगा आला रे आला - १ नव्हे तर ६, rather ७.. हे article म्हणजे शाळेतल्या गोष्टीतली झाडावर बसून देण्यात आली ती शेवटची आरोळी 📣.. mock drills होत राहतील पण साक्षात स्वरूपात पुढचा लांडगा दिसेपर्यंत हेच आमचं dopamine, or?..

photo मागत असाल तर अवघड आहे.. त्यासाठी go-pro सारखं काहीतरी घेऊन फिरावं लागेल.. किंवा, अजून एक option असंही आहे की ⏱️ time travel शिकावं लागेल / शोध लावावा लागेल.. tch ❗ एकंदरीत अवघडच दिसतंय..

वेगळं सांगायला नको, पण मनुष्य जात दिसताच हे (शक्यतो) रफुचक्कर होत असतात.. कुठेतरी वाचलंही आहे की हे (शक्यतो) आपल्याहून छोट्या height वाल्यांवर हल्ला करतात.. so, 'आपण घाबरायला हवं की नाही, 👻 किंवा घाबरायचं प्रमाण किती असायला हवं?', हे आपलं आपणच ठरवायला हवं..


१८ जानेवारी २०२५

अजून वेगळं काय?.. तर मागच्या वेळेस एक पिंड miss झाली ती ह्यावेळेस बघितली.. अपेक्षेविरुद्ध आमच्या सोबतीला अजून एक group होता (५ + ४) - विशेष हे की ते अज्ञात मोहिमेवर निघाले होते (वाट नव्हती माहिती) 🧐.. first and only left turn ⬅️ घेताच एक फाटकही ⛩️ लागलं - फाटक एखाद्या पुरातन हवेलीतून आणलं असावं; साखळी ⛓️ आणि कुलूप 🔒 मात्र कोरे-करकरीत होते.. तलावाला पाणी मोजकंच असलं तरी खंड्या (Kingfisher) 🐦 बरेच होते.. ३ जण झुंझार माचीला प्रस्तरारोहण (rock climbing) 🧗‍♂️ करतांना दिसले.. कळकीचं मेटं व्यापलेलं होतं - बकऱ्या, गाई, शेण etc etc.. वातावरण फुस्स, म्हणून फोटोंमध्येही मजा नाही 👎.. आणि, शेवटचा फरक - ताक ऐवजी लिंबू सरबत..

lastly, वन्यप्राणी दिसले की सांगायला होतात असले किस्से.. पण मग 'heart skips a beat' is also equally true 😳.. म्हणून अजून लांडगे न दिसण्यासाठी तलावाकडे जाणारी / उतरणारी वाट शोधायचे कष्ट न घेता, पुढच्या परिक्रमेला सरळ मोरदरी गावात जाऊन कच्च्या रस्त्याने तलावापर्यंत यायचं हं.. ते हिंदीत म्हणतात ना काहीतरी, "मजाक की भी हद होती है".. तसंच, मराठीतही काहीतरी म्हणत असतीलच 😎..

2 comments:

  1. शेवटी प्रश्न उरतोच, तू फोटो का नाही काढलास??? 😃

    ReplyDelete
  2. आम्हाला डिसेंबर K2S करताना एक प्राणी दिसला होता....समोरून पळत गेला

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...