Tuesday, December 6, 2022

गिरनार २०२२

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

।। श्री गुरुदेव दत्त ।।

उम्मीद 🤞 पे दुनिया कायम है.. ગિરનાર.. peak ⛰️ of the year

ગિરનાર बद्दल पहिल्यांदा मी देवेशकडून ऐकलं होतं.. १. त्याचे अनुभव ऐकून, २. खूप काही दूर नसल्याने, आणि साहजिकच, ३. trekking असल्याने - कधीतरी आपल्यासाठीही विचार करायला हरकत नाही, म्हणजे सहजा-सहजी कधी जमलं तर जाऊन येऊ 😊, इथपर्यंत विचारांची गाडी पोहोचली होती.. नंतर प्रसादने जेव्हा त्यांचा दुसऱ्यांदा जायचा plan सांगितला, तेव्हा self-drive 🚗 असल्याने 'नको' म्हणत विषय तात्पुरता / परत back-burner वर ठेवण्यात आला..

recently, राजगडला जेव्हा राहुलने विषय काढला, तेव्हा गाडी विचारांमधून निघून writing मध्ये पळायला लागली 😀.. सर्व available optionsचा विचार करत ३.५ दिवसांचा (3 days 🌇, 4 nights 🌃) plan तयार झाला - शनिवार-रविवार धरून फक्त १ दिवस सुट्टी.. पहिली train 🚉 होती १ तारखेच्या रात्री, दुसरी ३ तारखेच्या आणि चौथी ४ तारखेच्या रात्री.. म्हणजे झोपण्यासाठी hotelची गरज होती ती फक्त २च्या रात्री, जेव्हा actually आम्ही night trek करणार होतो (३ला पहाटे).. plan कसा / किती जरी असला तरी, article 'घरबसल्या trekking' blog मधले असल्यामुळे ह्यात रुळांवरच्या 🛤️ किंवा रस्त्यावरच्या 🛣️ गाडींचे किस्से नसून फक्त ગિરનાર trek (पायांच्या गाडी) विषयी माहिती आहे.. बाकीच्या sightseeingचे spots शेवटी 'Annexure' मध्ये थोडक्यात..

peak of the year, credits: राहुल

writing मध्ये तयार झालेले ६ जण होते, राहुल (२), वैभव, महेश आणि मी.. हे तर ५च 🖐️ झाले ना?, हो.. जाणाऱ्या trainचं booking झाल्यावर प्रशांत देवर्डेने interest दाखवला (आडनाव सांगायचं कारण येईल लक्षात लवकरच).. seats available आहेत, हे बघत त्यालाही add ➕ करण्यात आलं.. so, equation for now was ५ जण एका boggieत आणि प्रशांत शेजारच्या 🚃..

जशी-जशी तारिक जवळ येत होती, बाकीचे bookingsही झाले.. म्हणजे, returnचे, ગુજરાત internal, hotel 🏨 etc etc.. नंतरचे काही दिवस हे गणित सुस्थितीत होतं.. आणि मग, एखादा जो cancel होणार असतोच 🤦, तो झाला - महेश.. 'replacement भेटली तर ठीक, नाहीतर ticket शेवटच्या दिवशी cancel करू', approach सोबत मागच्या रविवारीच नागेश्वरला 🔱 (ज्योतिर्लिंग नाही, trek) गेलो असता राहुलने प्रशांत चौधरीला 'एक ticket आहे', म्हणून सांगितलं.. rest, you can guess.. so, final ६ होते, २ राहुल, २ प्रशांत आणि १ वैभव-सुशिल 😆..

first boarding, credits: वैभव

train मध्ये कधी काय checking होईल, ह्याचा नेम नाही, म्हणून महेशकडून जी आधार cardची soft copy घेतली होती, त्याची प्रशांतने print 🖨️ काढून आणली होती.. and, it actually paid off.. 'hair transplant चा खर्च किती होतो?', ह्याचं उत्तर जरी नसेल भेटलं, तरी 'प्रशांतच महेश आहे का?', ह्याचं उत्तर द्यायची गरज नाही पडली 😎.. कारण 'आधार card, हे photo id म्हणून कसं वापरतात?', हे मला अजूनही गुपितच 🤨 आहे..

सरदार पटेल दरवाजा, જૂનાગઢ, credits: राहुल

articleचं title 'उम्मीद पे दुनिया कायम है', म्हणजे રાજકોટ (आणि बरंच काही) 😁.. plan नुसार आम्ही ३ वेळेस રાજકોટ cross करणार होतो.. जातांना आम्ही અમદાવાદला machineचा चहा ☕ नाकारला कारण उम्मीद होती की રાજકોટला सोय होईल, which was overruled 😔.. तरी, येतांना आम्ही railway staffच्या जेवणाच्या हाकांना 🗣️ परत-परत ignore करत होतो, कारण उम्मीद होती की 'રાજકોટला चांगलं भेटेल', which was partially sustained 🥪 🥐.. असो, back to -

ગિરનાર - आजू-बाजूला दाट जंगल, म्हणजे हिंस्त्र प्राणी असल्यामुळे परिक्रमेसाठी फक्त कार्तिकी एकादशी ते पौर्णिमा 🌕 असे ५ दिवस allowed, आणि / कारण ह्या ५ दिवसात कुठलेच प्राणी आपल्याला त्रास देत नाहीत.. trekking साठी वर्षभर खुला, आणि एका बाजूने १०,००० पायऱ्या.. खूप जास्त वाटत असतील तर ५,००० पर्यंत ropewayही 🚡 आहे.. नंतर मात्र खाली-वर आहे, जिथे पायी जाण्याशिवाय पर्याय नाही, इ.. अशी काही जी आपल्याला ગિરનારची ओळख आहे, त्यात दिवेकर काकांनी थोडी भर घातली - मंदिर संध्याकाळी ०७:०० 🕖 वाजता बंद होतं, सकाळी ०६:०० 🕕 वाजता उघडतं, ०६:१५ वाजता आरती 🪔 असते.. सिंहगडला regular जाणाऱ्या publicला ३-३.५ तासापेक्षा जास्त वेळ नाही लागायला पाहिजे 🙃.. ह्या महत्त्वाच्या माहितीसोबत त्यांनी एक जो 'पहाटे ०३:००-०३:३० ला चालू करा' चा सल्ला दिला, त्याने plan आखायला आणि आमच्यापैकी कोणाला कसलाच त्रास न होता execute करायला खूप मदत केली 🤝 🤘.. त्यानुसार,

२ (तारखे)ला જૂનાગઢला दुपारी ३ला पोहोचून बंद असलेल्या / झालेल्या attractionsची जमेल तशी थोडीफार sightseeing 📸 करून लवकर झोपी जात 😴, ३ला early morning २ वाजता 🕑 उठून आंघोळ 🚿 वगैरे करून ३:१५ ला आमची पायांची गाडी ભવનાથ / તળેટી हून निघाली पूर्व दिशेने ➡️ - ગિરનાર calling..

०३ डिसेंबर २०२२

पहिल्या ५,००० पायऱ्या

सुरवातीपासूनच मंदिरं (साहजिकच).. काही पायऱ्या चढून होत नाही तर राम-लक्षण-सीता च्या शेजारी स्वामी समर्थ, आणि एका श्लोकचा / मंत्राचा सुमधुर background score 🎼.. नाही आठवत आता, exactly कुठला?, पण त्याला साथ होती एकदम योग्य volume 🔉 आणि tempoची.. #CannotAskForMore 

काही ठिकाणी टपरीवाल्यांनीच पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या, जांभळ्या, ह्या रंगांनी रंगवलेल्या पायऱ्या दिसतात.. पण हा उत्साह थोड्यापुरताच.. ropewayची 🚡 सोय असलेल्या अंबाजी मंदिरापर्यंत (अ)ठराविक अंतराने आकडे.. आता, १०,००० किंवा ह्या मंदिरापर्यंतच्या ५,००० जरी चढायच्या असतील, तर कोणाला मोजणे 🔢 तर नाही जमणार, पण मग "आपण किती आलोय?" पेक्षा "अजून किती बाकी आहेत?" ची माहिती असणे पण महत्वाचे आहे ना? 😌, म्हणून checkpoint / psychological support किंवा demotivation म्हणा, काही irregular intervals वर एक आकडा वाचण्यात येतो - e.g., ७०, ८०, ५००, ११००, २०००, ३१००.. sequence मध्ये कुठलाच ताळमेळ 😑 नसल्यामुळे, ज्याला जो random / round / whole number आवडला, त्याने तसं छापायचं / गिरवायचं 🖌️ काम आप-आपल्या परीने केल्याचं लक्षात येतं..

checkpoint (example)

आम्ही पहाटे चालू केलं असलं तरी रस्त्याने बरेच भाविक चढतांना दिसत होते.. बरेच लोक मराठीच होते, जे बहुतेक पुणे-વેરાવળ express आठवड्यातून एकदाच असल्यामुळे असावेत.. मंदिरांसोबत वाटेत maggi 🍝, पाणी, biscuit 🍪 वगैरेच्या भरपूर टपऱ्याही लागतात, ज्यातले काही भाड्याने काठी 🦯 सुद्धा देतात.. lion 🦁 sighting बद्दल १-२ जणांकडून ऐकल्यामुळे आम्ही ६ काही वेळ एकत्रच होतो.. अगदीच एकटे नाही आहोत, लक्षात येत आमच्यात ३-३ चे २ group झाले.. म्हणजे, माझ्यामुळे दोन्ही राहुलचा speed आता कमी झाला होता.. सिंहगडहुन खाली आतकरवाडी आणि पुण्याचं दृश्य 🌌 दिसतं, साधारण तसंच इथून खाली बघितल्यावर ભવનાથ / તળેટી आणि જૂનાગઢ दिसतात..


साधारण २.५ हजार पायऱ्या चढून झाल्यावर लागतो (kind-of) एक कडा (nothing technical), जो चढण्यासाठी घाटरस्ता type पायऱ्या बांधलेल्या / बनवलेल्या आहेत.. height आणि width तीच ठेवत इथून पुढे पायऱ्यांची depth कमी होते, आणि म्हणूनच relatively कमी पायऱ्या चढूनच दम लागायला सुरुवात होते 😓.. कमी झालेली मंदिरांची density परत वाढते आणि ४-५ भव्य जैन मंदिरांसोबत ☸️ उच्चांक गाठते.. थोडं अजून चढल्यावर खालून दिसणारा top, म्हणजे ropewayचं दुसरं टोक किंवा "अंबाजी मंदिर" 🛕 लागतं.. Appवर राहिलेली trail बघत एक doubt लागलीच हट्ट करत / धरत मनात घर करून बसला, अजिबात ऐकेच ना 🙄.. अंदाजे ७०% रस्ता cover करून जर फक्त ५,००० पायऱ्या झाल्या आहेत तर, इथून पुढे राहिलेल्या ५,००० नसणारच (उम्मीद)..

ropeway 🚡

"अंबाजी मंदिर" आजचं highest altitude का? 🤔, तर,

शेवटच्या ५,००० (कुछ भी !?) पायऱ्या

इथपर्यंत आम्हाला लागले १ तास आणि ५५ मिनिटे, म्हणजे तासकाट्याने नुकताच ५चा आकडा ओलांडला होता.. समोर बघतो तर अंधारात का होईना, lights मुळे एक शिखर ह्याहून किंचीतसं उंच दिसून येत होतं 📈.. खालपासूनच / चालू केल्यापासूनच follow करत असलेला approach इथेही घेत, 'परत येतांनाच सगळे वाटेतले मंदिरं बघू' म्हणत, दुसऱ्या बाजूला उतरायला 🚶‍♂️ सुरुवात केली.. नंतर, २ टप्प्यांमधल्या पायऱ्या चढून झाल्यावर आला आजचा highest point 🔝, गोरखनाथ मंदिर, आणि अजून समोर स्पष्ट दिसायला लागलं होतं आजचं target - "श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुका" मंदिर.. अजूनही अंधारच होता पण मंदिराच्या location, आकारामुळे आणि त्यात चालू असलेल्या light मुळे हे सगळं आमच्यासाठी चकचकीत हिऱ्यापेक्षा 💎 कमी नव्हतं..

इथून पूढे तर आम्हाला return येणारे सुद्धा दिसले.. शंका हीच की, 'मंदिर बंद असल्यावर, हे परत कुठून आणि का येत आहेत?' 🤷, असो.. समोर दिसणाऱ्या प्रकाशाबरोबरच खाली पण (lightचा) उजेड दिसत होता.. immediate calculation 🔣 was - इतक्या खाली जाऊन जर समोर परत चढायचं असेल तर may be, in an extreme case, ५,००० पायऱ्या असू शकतील.. इसी बात पे, मनात घर करून बसलेला doubt मिश्कीलपणे हसत होता 😂.. ५,००० नंतर एकही आकडा कुठे वाचायला भेटला नाही, त्याचं कारण 'खरं सांगितलं तर तो thrill कसा येईल', हेच असावं 🫣..


थोडं खाली जात एक कमान लागली ⛩️, जिथून पुढे २ वाटा होत्या.. ठरल्याप्रमाणे, 'target आधी आणि बाकीचे lights नंतर' revise करत, डावीकडची वर जाणारी वाट धरत non-stop चढत जे थांबलो ते थेट बंद मंदिराबाहेर वाढत जाणाऱ्या रांगेच्या शेवटीच, ~४० जण असतील.. वेळ होती ५:४५, म्हणजे २.५ तासात hotelहुन मंदिरापर्यंत.. आमच्या पुढे मंदिर उघडायची वाट बघत असणाऱ्यांना जेव्हा हे सांगितलं, तर, 😮 "शक्यच नाही, तुमचं घड्याळच बंद पडलंय" म्हणत वाद घालायला लागले.. जेव्हा राहुल "चला खाली आणि येऊ परत 🔁" उत्तरला, तेव्हा कुठे त्यांनी माघार घेतली.. त्यांचाही point of view बरोबर ✔️ होता.. कारण ते आमच्या फक्त अर्धा तास आधी पोहोचले होते, पण त्यांनी चढायला सुरुवात मात्र रात्री ११ला 🕚 केली होती.. दुपटीहून जास्त फरक - 'शक्यच नाही', तुम्ही पण करताय ना विचार, 'कोणीतरी चुकतंय', म्हणून.. होता है, nothing new in there.. आमच्याहून दुप्पट speed वाले 🫡 सुध्दा बरेच आहेत, हे तुम्हाला सांगितलं / दाखवले तर 😱..

थोड्यावेळात मंदिर उघडलं आणि exact ६ला 🕕 आरती चालू झाली.. आरती संपल्यावर रांग पुढे सरकली आणि आम्ही इथली शेवटची पायरी चढत, श्री गुरुदेव दत्ताचे दर्शन घेत, चरणस्पर्श केले 👣.. #DoneNDusted #CannotAskForMore 

ती शेवटची पायरी १०,०००वी होती का?.. एकतर हे साफ खोटं आहे 😒, नाहीतर 'अजून कुठल्या-कुठल्या मोजल्या आहेत?', हे तरी कोणी सांगावे..

जैन मंदिर

कुछ भी !?, ५,००० आणि अजून काही पायऱ्या

परत येतांना वेळ होती - 'कमानीच्या दुसऱ्या sideला उतरून 📉 काय आहे?', हे discover करायची.. 'इथे प्रसाद / नाश्ता 🧆 सुद्धा मिळतो' was a surprise.. बरं झालं आम्हाला हे कोणी सांगितलं नव्हतं.. few things are better left unsaid / untold.. खमण 🧀 इतका delicious 😋 होता की सगळ्यांचा double round झाला, काहींचा तिसरा सुद्धा - '५,०००' + 'कुछ भी !?' पायऱ्या चढून भूकच 🤤 इतकी लागली होती.. पण, इथे गेलात तर काही गोष्टी / नियम लक्षात ठेवा - 
१. रांगेनेच बसायचं - तुमच्या बरोबरचे कुठे मागे-पुढे असतील तर मोकळी जागा बघून सगळे एकत्रच बसू, हा हिशोब इथे चालत नाही
२. अजिबात बोलायचं नाही 🤫
३. खायला पाहिजे तेव्हडं भेटेल, पण वाया अजिबात घालवायचं नाही (हे तर मी सुमेधला पण सांगत / शिकवत असतो)
४. table वर बसलं की इतर timepass (mobile वगैरे) करायचा नाही 📵
५. उभं राहून चहा सुद्धा प्यायचा नाही
६. पाणी पितांना पेल्याला तोंड लावायचं नाही 🫗

ह्यातल्याच वेग-वेगळ्या कारणांनी, आम्ही ६ पैकी काहींनी बोलणे खात, इथे entry केली / exit घेतला..


वेळेनुसार आता सूर्योदय 🌄 due होता.. तांबडं फुटायला सुरुवात होणार / झाली होती.. पहाटे बघितलेल्या हिऱ्याचे फोटो 📸 ह्या तांबड्याचं पिवळं व्हायच्या आतच काढले गेले पाहिजे, म्हणून आम्ही परत कुठेही न थांबता आजच्या highest pointला माघारी आलो, गोरखनाथ मंदिर.. ગિરનારला येऊन ह्या spot वरून photo काढणे 🖼️ is a must.. बाकी काही नाही केलं / जमलं, तरी it's ok 🆗..

credits: राहुल

रस्त्यात जशे लागतील तशे एक-एक मंदिरं बघत, आम्हाला अंबाजी मंदिरातली (आजची दुसरी) आरती भेटली.. इथून थोडं खाली जात आम्ही गौमुखी गंगा मंदिरात शिरलो.. गौमुखातून पडणारं पाणी 💧 आपल्या घरच्या purifierच्या output इतकं स्वच्छ, पण rich in minerals.. इथेही नाश्त्याची सोय होती.. तिघांत एक plate घेऊन, आजूबाजूच्या शांततेचा आनंद घेत इथेच थोडा वेळ रिकामे बसलो (इथले साधू 👨‍🦳 काही नाही बोलले).. ह्या वेळेस तोंड न लावता mineral water पिऊन इथून बाहेर पडलो आणि 'लक्ष्मीनारायण मंदिर' board 📋 दिसला.. 'जवळच असावं', हे guestimate करत आम्ही घेतला detour.. बरंच चालून झाल्यावर जेव्हा उत्तरेकडे खाली एक मंदिर दिसलं, त्याला 'इतक्या खाली जाऊन return ↪️ नको' म्हणत एका भाविकाला जेव्हा विचारलं, त्याने आमचं लक्ष अजून उजवीकडे असणाऱ्या कमानीकडे नेलं.. almost गडाच्या उत्तरेकडच्या ⬆️ ridge पर्यंत जाऊन परत आल्यावर आम्ही आलो त्या रस्त्याला लागलो.. पहाटे जो १०,०००चा आकडा राहिला होता, तो ह्या २ diversionsनी पूर्ण झाला असावा 🤗 - श्री गुरु दत्तात्रेय संस्थान (अन्नक्षेत्र) आणि लक्ष्मी नारायण मंदिर..

cannot stop adding photos from this spot

जैन मंदिरांमध्ये आम्हाला काही entry नाही भेटली / दिली 🚷.. ropeway सुरू झाला होता आणि एकाच वेळेस one-side, at least १० अंडे तरी ये-जा करत होते.. एका अंड्याची capacity ६-८ जण असावी, म्हणजे गर्दी होण्याचा प्रश्न नाही.. पुढे रमत-गमत १०च्या सुमारास परतलो पहिल्या पायरीला, तोच मंत्र / श्लोक / जप 🎼 ऐकायला.. आम्ही घेतलेले दोन्ही diversions जर वगळले, तर एका sideने १०,००० steps (पायऱ्या) जरी नसल्या, तरी १०,००० steps (पावलं) नक्कीच आहेत.. परत एकदा नाश्ता केल्यावर / झाल्यावर, रस्त्यात एक जण गाड्यावर काहीतरी नवीनच / वेगळंच विकतांना दिसला - आकार आंब्यासारखा 🥭 आणि रंग हिरव्या नारळांसारखा 🌴.. विचारल्यावर कळलं, फोडल्यावर ह्यातून १०-१२ पिस्ता निघतात, ज्यांचं roasted स्वरूप आपण generally खातो..

credits: राहुल रामपुरा 

first of other highlights of the trek was - a dog 🐕.. सह्याद्री मधल्या treks सारखंच, ह्याने सुद्धा सुरवातीपासून शेवटपर्यंत आणि return आम्हाला साथ 👥 दिली - such noble souls 😇 they are.. कोकणाच्या levelला असूनही humidityचा कसलाच त्रास नाही was 'the cherry on (top of) the cake 🍰'.. कमीत-कमी कचऱ्यामुळे शांत आणि स्वच्छ वातावरण ☮️.. ना माकडांचा 🐒, ना टपरीवाल्यांचा त्रास - दोघेही अपनी अलग दुनियामे आराम करण्यात busy..

पलके चमकने लगी हैं, ये राज़ कैसे छुपायें..

ગિરનારच्या ह्या trek / article सोबतच माझं ह्या वर्षाचं resolution ही (almost) पूर्ण झालं आहे 🥳, ज्या बद्दल तुम्ही लवकरच, म्हणजे ५१व्या article मध्ये वाचाल, ready for publication, on or before this International Mountain Day ⛰️.. so, till then, आणि of course, नंतर सुद्धा, have a good time..

Annexure

१. एकाच दिवसात जी तिसरी आरती भेटली, ती होती સોમનાથची 🔔..
२. बाण स्तंभ, સોમનાથ - आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग
३. દ્વારકાच्या flatची चावी दिल्याबद्दल प्रजेशचे आभार 🙏..
४. ludo 🎲 खेळण्यात आणि हे article लिहण्यात 📝 परतीचा train प्रवास अगदी सुकर झाला..
५. 'मोती महल' hotelला already ५ स्टार rating दिली गेली आहे 👌..
६. travelling / train 🚂 details,
a. पुणे ते જૂનાગઢ -  Pune Veraval express (11088)
b. વેરાવળ ते દ્વારકા - Somnath Okha express (19251)
c. દ્વારકા ते અમદાવાદ -  Saurashtra mail (22946)
d. અમદાવાદ ते पुणे - Pune AC Duronto express (12297)
७. total trip expenses (घर से घर तक) - ₹७,२००

महोबत मकबरा, જૂનાગઢ, credits: राहुल

अशोक शिलालेख, જૂનાગઢ

only bus travel, courtesy: प्रशांत, credits: राहुल रामपुरा

સોમનાથ beach

દ્વારકા beach, credits: वैभव

pass-time with ludo 📱, credits: वैभव

3 comments:

  1. जय गिरनारी,हर हर महादेव nice place.

    ReplyDelete
  2. छान फोटोज, सुंदर शब्दांकन 👍
    श्री गुरूदेव दत्त 🙏

    ReplyDelete
  3. Khup chan, wachun javasa watla... Next time gelas tar mala nakki sang...

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...