।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
क्या समय? क्या प्रलय? दोनो में तेरी महानता.. नागेश्वर गुहा.. ending on a high note
बामणोली sideने ३ वर्षांगोदर (December २०१९) जेव्हा वासोटा ⛰️ केला, तेव्हा boatingची 🛶 आयुष्यभराची हौस पूर्ण झाली 😐.. म्हणजे next time इथून चुकूनही यायचं नाही, हे ठरलं - अगदी carved in stone 🪨.. पण नागेश्वर गुहेचा trek अजून बाकी होता.. म्हणून, चोरवणे sideने जर एखाद्या groupने कधी plan केला तर नक्कीच जाऊन, परत आल्यावर article लिहू 📝, असा सगळा योग जुळून आल्याचा परिणाम म्हणजे - आज, आता, ताबडतोब - तुम्ही हे article 📜 वाचत आहात..
SGच्या WhatsApp statusला काही दिवसांगोदर ह्याचं schedule 📑 बघितलं / दिसलं.. 'अजून कोणी येईल का?' चा शोध घेत दोन्ही राहुल तयार झाले 👍.. आदल्या दिवशी विशालने publish केलेल्या list मध्ये मात्र एकच सापडला.. असो,
नागेश्वर गुहा - इथला शिखर नागाच्या 🐍 डोळ्यांसारखा दिसतो, कदाचित त्यामुळे ह्या ठिकाणाला 'नागेश्वर' असे नाव पडले असावे.. इथे पाहण्याजोगी एक अतिशय अनोखी प्रक्रिया म्हणजे - वर्षभर होणारा शिवलिंगाचा 'अभिषेक' 💧.. अगदी २४*७ / १२ महिने / ३६५ दिवस / २४ तास (pick your favorite) - पाण्याचा एक नैसर्गिक प्रवाह 🌧️ डोंगरमाथ्यावरून खाली झिरपतो आणि थेट शिवलिंगावर पडतो.. लोकांचा असाही विश्वास 🍀 आहे की इथे केलेला नवस पूर्ण होतो.. सांगायची गरज नसावी, पण तरी - महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार निमित्त इथे दूरवरून भाविक दर्शनासाठी 🙏 येत असतात..
आम्ही शनिवारी 🕚 रात्री ११ वाजता पुण्याहून निघालो 🚌.. गाडी मध्ये बसलो आणि cylinder, शेगडी, भांडे घेऊन निघणारा जुना विशाल साधारण दीड वर्षांनी भेटला ☺️.. तसं typical details असणाऱ्या message मध्ये त्याने नाश्त्याला maggi 🍜 (आहे / असेल) असं नमूद केलं असल्याने अंदाज आला होताच, पण "things to carry"च्या list मध्ये plate 🍽️, spoon, cup नसल्याने खात्री नव्हती..
२७ नोव्हेंबर २०२२
Google Maps वर "डांगेवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर" ही pin 📍 असलेल्या locationला विशालने जेव्हा चहा करायला पातेलं शेगडीवर 🔥 ठेवलं तेव्हा वाजले होते ५:४५.. AH47 (ग्वालियर-मुंबई-बेंगलुरू) सोडल्यावर येऊन-जाऊन करत त्रास देणाऱ्या झोपेने परेशान झाल्यामुळे आता ☕ चहाचा (सु)वास आल्यावर काही राहवेना.. दूध (powder) टाकूनही black tea सारखा दिसणाऱ्या चहात दूध powder कमी झाली होती की चहा powder जास्त? 🤔 ह्याचं उत्तर त्यालाच माहित.. score - बनवणारे ०, खाणारे-पिणारे १..
ह्याची कमतरता भरून काढली maggi ने.. आपण सर्वांना सवय / माहिती आहेच, तरी - maggi बनवायला फक्त पाणी 💧 पुरेसं नसतं.. maggi बनवायला लागते "कला".. hot-n-sour soup 🍵 नव्हतं आज, पण जसं बटाटा कुठल्याही भाजीत चालतो, तसं maggi बनवतांना किंवा बनवून झाल्यावर त्यात काहीही टाकलेलं चालतं, पण हे फक्त कलाकारालाच जमतं.. bonus point के साथ 🤤, score - बनवणारे २, खाणारे-पिणारे १..
इथून साधारण गडाच्या दिशेने २ कि.मी. नंतर टाकायचं होतं trekkingचं पहिलं पाऊल.. "journey of thousand miles begins with a single step" म्हणतात ना, त्यातलं पहिलं पाऊल / single step, हेच ते.. ह्याची pin 📌 सुद्धा GMaps वर कोरलेली आहे.. पाणी 🍶 घालून आणि shoes 🥾 घेऊन परत एकदा bus मधून उतरून आम्ही निघालो.. 'काहीतरी चुकीचं लिहिलंय' असं वाटलं असेल तर तुम्ही बरोबर आहात.. नसेल वाटलं तर मात्र परत वाचा.. check करतोय ओ, तुम्ही आहात ना सोबत! 🤨..
वाट ठसठशीत आहे, हे माहित होतंच आणि सोबत होती 'सुरवातीला चढ, मध्ये traverse / आडवा आणि शेवटी steep', ही अधिकची मानसिक तयारी.. वाजले होते ०८:०० 🕗.. १०:३०चं 🕥 सुटसुटीत target ठेऊन चढायला सुरुवात केली.. कोकणातून वर चढायचंय, म्हणून वाऱ्याचा हट्ट धरत निसर्गाशी भांडण्यात काही अर्थ नव्हता 😓.. फक्त काल जो (पुण्यात) संध्याकाळी १०-१२ थेंब पाऊस झाला / पडला, तसलं काही वातावरण नको 🤞, हीच प्रार्थना करत आम्ही elevation gain 📈 करायला लागलो..
साधारण अर्ध चढल्यावर समोर दिसलं नेढं / नाखिंद.. म्हणजे, job half done.. माहित नाही, "का?", पण नेढं नुसतं बघितलं / दिसलं तरी जे समाधान मिळतं 👻, त्याचं काही मोजमाप नाही.. कदाचित कारण असावं, निसर्गाच्या ताकदीचा पुरावा भेटल्यावर, "आपण किती छोटे आहोत" ह्याची होणारी जाणीव.. सतत reminders 🔔 लावत-लावत एखाद्या गोष्टीची जी सवय होते आपल्याला, तसंच काहीतरी..
नेहमीप्रमाणे राहुल, आणि आजचे नवीन जोडीदार, मंदार, काही वेळ सोबत होते.. traverse करतांना हे दोघेही पुढे निघाले आणि मला वाटेत भेटले चिपळूण इथले रहिवासी - समीर जोशी.. ह्यांची 'भटजी' 🕉️ म्हणून ओळख.. इथे नियमित येऊन पूजा करणारे.. localite म्हणून विशालने आजच्या late lunchच्या 🍱 सोयीची जबाबदारी ह्यांना दिली होती.. सकाळी चहा घेतांनाच त्यांनी आम्हाला, "वर आपल्याला पूजा करायची आहे, group photo काढायचा आहे", म्हणत head-start ⏯️ घेतला होता..
इथून पुढे होता चढ.. आणि चढ इतका चांगला 😓 होता की भाविकांच्या सोयीसाठी इथे कोरलेल्या पायऱ्या चढायला काही ठिकाणी railing तर काही ठिकाणी साखळ्याही ⛓️ लावलेल्या आहेत.. 'हे ही कमी पडेल' हा विचार करणाऱ्यांनी अगदी लोखंडी शिड्याही इथे बसवलेल्या दिसतात.. सर्वांचे आभार 🙇 मानत वर जेव्हा वासोट्याहून येणाऱ्या / वासोट्याला जाणाऱ्या वाटेला लागलो, तेव्हा "हत्ती 🐘 गेला, शेपूट राहिली", म्हणत, 'आता १० मिनिटात गुहा गाठू' विचार करत जेव्हा mobileच्या screenला 'उठ' 🙃 म्हणून हाक मारली, तर दिसणारे आकडे बघत एक क्षणभंगुर विचार cut मारून गेला - 'range नसल्यावर mobileचं घड्याळ सुद्धा बंद पडतं का?' 😜..
(as projected) exact १० मिनिटात बूट काढून, गुहेत शिरत, समोर होती पिंड.. rather, मी पिंडीच्या समोर होतो.. ०९:४५.. थोडा वेळ दम खात, 'पिंडीवर non-stop पडणारं (टीप-टीप 💧 का होईना) पाणी कसं आणि कुठून येत असेल?' ह्याचा अजिबात विचार न करता (शास्त्रज्ञ ⚛️ करतील / करत आहेत, as per their priority list), वर कळसरुपी शिखरावर 🚩 जाऊन यायचं ठरलं.. प्रशांत (आल्यावर) आणि आम्ही तिघे, बाकीचे यायच्या आत जाऊनही आलो.. हिवाळा 🧣 असल्यामुळे, as expected, फक्त जो थोडाफार दिसत होता, तो म्हणजे 'चकदेव' ⛰️.. वर जे तुम्ही hot-n-sour soup बद्दल वाचलं, तो प्रसंग ह्या गडाच्या पायथ्याचाच ⛺.. राहिलेलं public यायच्या आत जी थोडीफार माहिती ℹ️ जोशींनी दिली, ती पुढीलप्रमाणे,
चोरवणे गावाहून नागेश्वर देवस्थानाला यायला forest departmentची परवानगी 🆗 लागत नाही.. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कैद्यांना इथे शिक्षा देण्यासाठी 👮 ठेवण्यात येत असे.. नंतर, J. Asthana ⚕️ J. Williams 💂 यांनी, इथे यायला-जायला नवीन मार्ग बनवला.. इथे आपल्याला अध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही समाधान भेटतात 🧘♂️.. अर्ध चढून झाल्यावर दिसणाऱ्या नेढ्याचं / नाखिंदचं, 'हत्तीची सोंड' म्हणून चित्र आखलं तर आपल्याला हा देव अंबारीत बसल्यासारखा लक्षात येतो..
दरम्यान, (सतत पाणी पडत असल्यामुळे 🫗) पिंडीची अजून झीज होऊ नये, म्हणून गाववाल्यांनी वरून ठेवलेलं तांब्याचं पात्र (next photo), त्यांनी उचलून आम्हाला 'दगडी', म्हणजे original पिंडीचे दर्शन घडवून दिले (first photo 🔝) 🙏.. सगळे वर पोहोचल्यावर वेळ होती गणपतीची 🐘, शंकराची 🔱 आणि देवीची ♀️ आरती म्हणायची, followed by a group photo 📸..
दिवसाचा तिसरा प्रहर 🕛 चालू झाल्याचं लक्षात घेत आम्ही इथून थोडं खाली, बामणोली / मेट इंदावली sideने वर येणाऱ्या वाटेला लागणाऱ्या विहिरीतून पाणी भरून माघारी येत, आलो त्या रस्त्याने खाली उतरायला सुरुवात केली.. गंमत आहे ना? - तिसरा प्रहर चालू झाला की त्याला म्हणायचं "दुपार" 🌞.. असो.. ऊन आणि दमटपणा, ह्यांचा प्रकोप असा की अंगातून वाफा निघत होत्या.. थांबायची हिम्मत "ना" बराबर 🚫.. पण चालायचं motivationही तेवढंच - शून्य / भोपळा ⭕.. जेव्हा शेवटी, म्हणजे चढतांना सुरवातीलाच ज्या जांभा दगडाच्या पायऱ्या लागल्या होत्या, त्यांवर चालत जो सुकून भेटला, त्याचे "क्या कहने?" 😇..
जांभा - एक प्रकारचा खडक, जो सहसा उष्ण आणि ओल्या विषुवत वृत्तीय (equatorial) प्रदेशांत सापडतो.. भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो.. लाल रंगाच्या 🔴 ह्या खडकात iron आणि bauxite खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.. हा अतिशय खडबडीत, पण सच्छिद्र आणि कातळापेक्षा वजनाने हलका असतो.. कोकणातील बहुतांश घरे ह्या दगडापासून बांधली जातात.. (संदर्भ: wikipedia)
late lunch / early dinner साठी suggest केल्याप्रमाणे आम्ही चिपळूण येथे तुलसी hotelला (राजस्थानी) थाळी 🍱 खायला टेकलो.. brunch सारखीच lunner सुद्धा एक term असायला हवी ना? इथे, हे type करून Google search 🔍 केलं तर साक्षात्कार ✨ असा झाला की, there actually is an established term "lunner", by exactly the same meaning 🤓.. अश्याच अजून बऱ्याच बाबतीत मी अंधारात 🌑 आहे, I know.. but, so are you.. all sailing in the same boat ⛵..
"चेन्नई एक्स्प्रेस", "पांढरा रस्सा, तांबडा रस्सा" आणि "लस्सी हुन बनवत असतील कढी" 🤣, ह्या trekच्या काही "ending on a high note 🔖" आठवणी..






Sahi re. Changle locations sapdatat tula. Sobat ghvun ja yaar kadhitari
ReplyDeleteMastach Sushil 👌..parat ekda trek kela tuzya barobar ...arthatach 'fast' trek kela 😃...khup chan mahiti Nageshwar Caves chi ...keep writing 👍👏👏
ReplyDeleteखूप छान लेखन केले आहे...परत या जय भवानी जय शिवराय
ReplyDelete