।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
a (double?) hat-trick.. कोंढाणा - मुरुंबदेव - प्रचंडगड (उर्फ SRT)
Exactly same as last time, it was last weekend of February, to this very same location, range trek involving highest forts 🏰 from पुणे district.. should this be set as a trend? only time will tell.. but if that indeed happens, you'll be reading another post 📃 in a year's time on the same topic..
that's an excerpt from last year's post on SRT.. and so, here it is..
trek बद्दल आपण बोलूच पण त्याआधी थोडंसं hat-trick 🎩 विषयी..
cricket 🏏 खेळात जन्म घेतलेल्या ह्या termचा आज सगळीकडेच वापर होतो.. कुठलीही achievement 🏆 सलग ३ वेळेस मिळवणे म्हणजे hat-trick.. पण तसं बघायला गेलं तर - १८५८ साली, सलग ३ चेंडूत ३ गडी बाद केल्याबद्दल fansनी H. H. Stephensonला जेव्हा hat भेट दिली, तेव्हा "hat-trick" ह्या termचा जन्म झाला 🐣.. अर्थातच, ह्या आधी असं काही घडलं नसेल, असं नाही.. फरक फक्त हाच की तेव्हा त्याला काही म्हणत नसत 😶..
ह्यानंतर बऱ्याच खेळांमध्ये ३ goals करणे किंवा ३ points मिळवणे म्हणजे hat-trick म्हणून प्रचलित झालं, जसं football ⚽, hockey 🏑, water polo 🤽♂️, handball 🏐, lacrosse 🥍 इ... आणि ३ championship जिंकणे म्हणून motor racing 🏎️, horse racing 🏇 इ... काही खेळांनी तर आप-आपले perfect hat-trick (one right-footed goal, one left-footed goal, one headed goal), natural hat-trick (uninterrupted by goal by opposite team), flawless hat-trick (एकाच half मध्ये) असेही प्रकार काढले आहेत..
debut matchला, वाढदिवशी 🎂, matchच्या पहिल्या ३ चेंडूत, एकाच गडीला दोनदा बाद करून किंवा ३ वेगळ्या overs मध्ये (2 Innings of a Test match) hat-trick घेणे हे सगळे cricket मधले hat-trickचे आगळे-वेगळे प्रकार..
double hat-trick - इतर खेळात सलग ६ goals score करायला किंवा cricket मध्ये सलग ४ गडी बाद करायला 'double hat-trick' म्हणतात.. ४ म्हणजे १-३ आणि २-४, अश्या २ ✌️.. आता articleचं title "double hat-trick" म्हणजे हा सहावा किंवा कमीत-कमी चौथा SRT तरी असेल.. तर, नाही ❌.. २०१९ पासून चालू केलेल्या नवसकाळीला जसे २०२१ च्या दसऱ्याला ३ वर्ष झाले, तसेच २०२० पासून ह्या article पर्यंत, ३ SRT झालेत.. म्हणून, double hat-trick 🖇️..
one last topic, before we start with the trek.. सिंहगड streak 😇 - गेल्या वर्षी भारतासाठी individual best in Tests, सेहवागचे ३१९ (चेन्नई - २००८) जसं highlight होतं, तसंच आजच्या SRT मधल्या सिंहगड countचं highlight होतं - भारतासाठी highest partnership 👥 in Tests, पंकज रॉय आणि विनू मांकड ने पहिल्या wicket साठी जोडलेले ४१३ (मद्रास - १९५६, now चेन्नई).. पुढच्या वर्षीही असं काही combination होईल, असा प्रयत्न असेलच.. बघू, time ⏳ will tell..
पद्म भूषण 🏅 विनू मांकड is the latest / last and 7th Indian 🇮🇳 to be inducted to ICC Cricket Hall of Fame 👨🎓 after Bishan Singh Bedi, Kapil Dev, Sunil Gavaskar, Anil Kumble, Rahul Dravid and Sachin Tendulkar.. known for mankading (running out the non-stricker before bowling the delivery), he is also 1 of the only 3 players to bat at all 11 positions 😎.. that opening partnership of 413 was the best in Test Cricket for the next 52 years (still best for India, for any wicket 👏) and his contribution of 231 was also best for India for the next 27 years that followed..
२६-२७ फेब्रुवारी २०२२
संध्याकाळी ७:३० 🕢 च्या स्वारगेट-सिंहगड (actually अतकरवाडी) pmpml ने आम्ही ७ जण शेवटच्या stopला उतरून लागलीच ⛰️ पहिला गड चढायला सुरुवात केली.. पुणे दरवाज्यापर्यंत आपल्याला तासभर लागतोच.. थोडाफार buffer ⏱️ धरून १०चं target होतं.. 'trek इतका मोठा असल्यावर काहीतरी अनपेक्षित होणार आणि आयत्यावेळी काहीतरी बदल करावा लागणार', ह्याची मानसिक तयारी होतीच, पण इथेच आम्हाला शेवटून येणाऱ्या दोघांची ४० मि. वाट बघावी लागेल, हे completely unexpected होतं 😔..
रा. १०:३० 🕥 - k2s ला सगळ्यांच्या पुढे धावणाऱ्या 🏃♀️ निशाला आज पहिलाच गड (चढायला) जड जात होता.. खाली परत (अतकरवाडीला) जाऊन अजून गैरसोय होण्यापेक्षा वरंच काही सोय होते का, ह्याचा शोध 🔍 चालू झाला.. पण (only valid options) आपटे सदन, टिळक बंगला 🏡 सारख्या ठिकाणी काही सोय झाली नाही..
सिंहगड तसा हर तऱ्हेने safe ☮️ आहे, हे आपल्याला माहिती आहेच.. पण आपण जे बघतो 📺 किंवा वाचतो 📚, ह्याचा direct परिणाम आपल्या thinking process 💭 वर होतो, ह्यातही कोणाला objection नसावं.. "Ram Chandra Series" चं दुसरं पुस्तक (Sita 👸 - Warrior of Mithila) सध्या वाचत असल्याने 'कोणालाच वर नाही सोडायचं', ह्या दिशेला विचारांचा कल झुकू लागला.. निशाची 'चालू / उतरू शकते?' ला संमती घेत, शेवटी 'विंझरला पोहचून काय करायचं, ते बघू' म्हणत सगळेच कल्याण दरवाज्याच्या वाटेला लागले..
| झुंजार बुरुज, credits: राहुल |
झुंजार बुरुजाच्या पुढे जेवायला थांबेपर्यंत speed जरी कमी पडत होता, तरी आमची (to be precise, निशाची) हालचाल "slow कितीपण चालेल पण थांबायचं ⏸️ अजीबत नाही" म्हणत motivate करणाऱ्या महेशमुळे non-stop चालू होती.. विंझरला उतरायच्या आधीच्या ३ टेकड्या चढण्या आधी घेतलेल्या dinner break 🍱 मध्ये सगळ्यांनी राहुलने (अगदी ice-pack सोबत) आणलेल्या आम्रखंड आणि गुलाब-जाम वर हात साफ केला 😋..
पाबे घाटला जाणारी इथपर्यंतची common वाट सोडायच्या आधीचा traverse आणि नंतरचा उतार, ह्या trek मधला सर्वात अवघड प्रकार 😨.. "confidence नसेल तर बसून उतरा" ही approach घेत आणि उतार संपल्यावर सगळ्या गाववाल्यांना जागवत आम्ही ३ वाजता 🕒 विंझरला पोहचलो.. म्हणजे, आम्हाला बघून, rather, त्यांच्या दिशेने येणाऱ्या torchच्या प्रकाशाला 🔦 बघून कुत्र्यांनी 🐕 भुंकुन-भुंकून जो गोंधळ घातला, असल्या गोंधळात माझी तरी 🥱 झोप खराब झाली असतीच 😩, म्हणून 'गाववाल्यांना जागवत'..
ठरल्याप्रमाणे, उजाडायची / public transport 🚖 चालू व्हायची वाट बघत निशा सोबत अमोल थांबणार होता.. पण राहुलच्या सोबतीने इथपर्यंत सगळ्यांपेक्षा पुढे चालणारा चिंतन सुद्धा थांबायचा आग्रह करेल, ही आजची पहिली completely unexpected घटना होती.. trek चालू करून जरी ६च तास झाले होते, तरी आपल्या mobile smartphone मधल्या 'Calendar' app 📅 वर दिसणारा आकडा बदलला होता, म्हणून 'आजची पहिली completely unexpected घटना'..
3rd and any next time I am doing SRT, these 9.7 kms will sure be a planned drive 🚘.. that's just those this-cannot-be-happening kind of things, we have to deal with..
वरील ओळी सुद्धा गेल्या वर्षीच्या article मधल्याच.. पण तशी काही गाडीची गरज भासली नाही.. कारण 🎓 universityचा diploma करत असलेल्या महेशने training अंतर्गत २ महिन्यांगोदरच हा trek केला होता.. ह्याचा फायदा 🙋 आम्हाला हा झाला की ह्या वाटेवरचा सगळ्यात कंटाळवाणा विंझर-मार्गासणी-साखर-चीर्मोडी-गुंजवणे डांबरी रस्ता 🛣️ skip करता आला.. २+ कि.मी. वाचवून मेरावणे मार्गे थेट फणशी गावातून राजगड चढायची ही शिकवण ह्या पुढे दर वेळेस कामी येईल 🤗.. तसंच, गेल्या वर्षी विशाल बरोबर तोरणा parking हून वेल्हेला trek करत उतरल्याने त्या २-२.५ कि.मी. concrete रस्त्याला सुद्धा टाळणे आता शक्य असल्याने राहतो फक्त विंझर गावातला ३ कि.मी. कंटाळा.. इतक्या मोठ्या (४०+ कि.मी.) range trek मध्ये, 'इतना तो चलता है'..
विंझरला तिघांना tata-tata bye-bye 👋 करत आम्ही final ४ कच्च्या रस्त्याने निघालो.. recorded trailला app 📱 मध्ये load करून बनलेल्या dashed-line च्या एकही dashच्या इकडे-तिकडे पाऊल न पडू देता आम्ही शेतातून, टेकडीवरून, गावातून, थोडंफार concrete रसत्यावरून, गाववाल्यांना जागवत (कुत्र्यांचे आभार मानत) फणशी गावात पोहचलो 😊..
'चंद्र-कोर 🌘 अजून कशी दिसत नाही' ह्याचा हिशोब 🔣 लावायला सुरुवात केली आणि आत्ताची वेळ ⌚ साधारण गणितात बसत होती.. कृष्णपक्षातील एकादशी म्हणजे चांद्रोदयाची वेळ असणार सूर्यास्ताची वेळ + ११ * ४८ मि... म्हणजे साधारण ४ वाजता चंद्रोदय होऊन जास्तीत-जास्त ५ पर्यंत आपल्या दिसायलाच हवा.. आणि, झालंही तसंच.. गावातून चढायला चालू करत नाही तर डावीकडे चंद्राने दर्शन दिले 😍..
इथून पुढे आम्ही गुंजवणेहून वर चढायच्या वाटेत लागणाऱ्या पहिल्या टपरीला ⛺ लागलो.. विंझरहून एकही recovery break न घेतल्याने इथे निवांत breakची नितांत गरज होती.. "चहा कधी घ्यायचा?" ह्या विषयावर जास्त चर्चा न करता महेशने थरमास 🌡️ आणि disposable cups बाहेर काढले.. हिशोब होता ८ जणांचा, त्यात आले ७ आणि आता उरले होते ४ - म्हणजे प्रत्येकी २ ☕ ☕.. आम्ही (वैभव सोडून) ह्याचा पुरेपूर फायदा घेतला - have always believed in capabilities of tea (हे वाक्य ☝️ पहिल्या SRTच्या article मधलं होय)..
| सुवेळा माची + नेढं |
"चहाचा brand कुठला आहे?".. दुसरा गड चढून चोर दरवाज्यात 📈 पोहचत नाही तर महेशला हा माझा पहिला प्रश्न ❓ होता.. म्हणजे, already २२ कि.मी. चालत आलेला माणूस, ज्याचा मेरावणे आधीची टेकडी चढतांना जीव जात होता 😦, तो चहा पिऊन झाल्यावर अवघ्या ४७ मिनिटात चोर दरवाज्यापर्यंत आलाय म्हणजे 'I am proud of myself' 🥳.. और क्या चाहिए? #CannotAskForMore
| पद्मावती तलाव, credits: वैभव |
आमची इथून शेवटपर्यंतची वाटचाल साधारण २-२च्या groupने मागे-पुढे चालू होती ज्यात त्या २-२ मध्ये बसतील ते सगळे permutations and combinations 🔀 आळी-पाळीने आपोआप बदल घेत होते..
| सईबाईंची समाधी |
| sunrise be like |
इथे आम्हाला काही handicapped ♿ लोकांचा एक group camping 🏕️ साठी आलेला दिसला - commendable 👌 👍.. वाजले होते ६:३० 🕡.. भर उन्हात बुधला माची (तिसरा गड) चढायला आमची किती वाट लागणार आहे? ह्याचं 'खूप आणि मस्त' ह्या पलीकडे उत्तर भेटणं / शोधणं अवघड झालं होतं 😓.. 'शक्य तितकं fast जाऊ' म्हणत लागलीच 🌄 sunriseचे photo काढायला break घेतले (२).. अजून एक - व्याघ्रमुखातून दिसणारी 'engineering marvel' संजीवनी माची आम्ही काही सोडत नसतो 🚫.. हे सगळं mobile मध्ये सोबत घेऊन 📸, अळू दरवाजा उतरून, संजीवनी माचीच्या खाली breakfast 🌯 साठी थांबलो - काही option नव्हता - जेवण करून ७ तासांच्यावर झाले होते आणि 💤 झोप एक सेकंद नाही..
| 'engineering marvel' संजीवनी माची, credits: राहुल |
डबे काढायचा उशीर आणि कुठूनतरी लपत-छपत बघत असेलच - एक माकड 🐒 - आलं धाऊन आम्हाला त्रास द्यायला.. एकच आहे, म्हणून हार न मानता आम्ही पेटपुजा चालू ठेवली.. पण जेव्हा लक्षात आलं की आपल्याला खाण्यापेक्षा त्याच्या हालचालीकडेच जास्त लक्ष द्यावं लागतंय, म्हणजे योग्य RoI नाही 😏, तेव्हा 'पुढे चहासाठी थांबायचं आहेच, तेव्हा उरलेलं बघू', म्हणत pack-up करून आम्ही भुतोंडे खिंडीत उतरायला 📉 चालू केलं, one step at a time 🚶..
डांबरी रस्त्यावर क्षणभर विश्रांती घेत, पुढचे ३ कि.मी. non-stop जे पळत सुटलो 🏃, ते कचरे काकांच्या घरी पोहे आणि चहा साठीच थांबलो.. रिकाम्या झालेल्या बाटल्या 🍶 भरून, साधारण १० वाजता 🕙 आम्ही तिथून निघालो.. काय आणि जेव्हडं होतं ते जंगल 🌲 राजगडच्या side लाच आहे म्हणून पुढे मेंगाईदेवीच्या मंदिरापर्यंत 🛕 फक्त आणि फक्त उन लागणार हा हिशोब लक्षात घेत 'हळू-हळू पुढे निघावं' म्हणत वैभवने already headstart ⏩ घेतला होता.. माझा २ ठिकाणी घेतलेला traverse फसला म्हणून जिथे actually घ्यायचा होता तिथल्या सरळ वाटेवरच्या दगडांवर ठळक फुल्या ❌ मारलेल्या असूनही काही हिम्मत नाही झाली.. इतकी पायपीट करून शेवटी जेव्हा बुधला माचीच्या दोन अंगावरच्या टेकड्या चढतो, खरी मजा तेव्हा येते 😰.. rockpatch आणि शिडी चढत ११:३० वाजता मोजक्या सावलीत कसेबसे विसावलो..
२-२च्या group मध्ये चालणाऱ्या, आम्ही चौघांनी एकदा परत एकत्र आल्यावर, 🕛 १२ च्या आसपास तिथून निघत साधारण १ वाजता 🕐 मेंगाईदेवीचं मंदिर गाठलं.. मागच्या sideला ऐसपैस सावलीत शेवटचा विसावा घेत पुढे धाव घेतली तोरणा parking, concrete रस्त्यापर्यंत.. इथून पुढेही आम्हाला trek करत खाली उतरायचं होतं पण त्याआधी "मध्ये एखादा point आहे का?", "अर्ध्या पाऊण तासात जाऊन येऊ शकतो का?" असल्या 😣 stupid questions ना उत्तरे द्यावी लागली.. नाही, मान्य आहे, आपण म्हणतो की "no question is stupid", पण आपण जिथे जातोय, तिथला थोडाफार अभ्यास करूनच निघतो ना.. का फक्त कोणाकडून तरी ऐकलं, "रस्ता झालाय" म्हणून काढायची गाडी आणि निघाले 🙄.. मुळात गडावर trekking करून जाण्यातच सार्थ आहे.. पण असो, controversial विषय आहे - इतक्यातच संपवतो..
महेशने मात्र lift घेऊन यायचं ठरवलं.. त्याला "ok, your wish" करत 🙋♂️ आम्ही पुढच्या अर्ध्या तासात, २:४५ दरम्यान वेल्हेतील 'तोरणा विहार' hotel गाठले.. जेवण करून, नुकत्याच चालू झालेल्या कात्रज-वेल्हे pmpml 🚌 ची १० मि. वाट बघितली.. कुठलीतरी यात्रा असल्याने खूपच गर्दी असून ४ वाजेच्या bus मध्ये जागा भेटली खरी पण राहुलने पूर्ण आणि अर्ध्यातून महेशने voluntarily आपल्या जागेचा त्याग 🧘 करत standing journey 🚹 केली..
AllTrails app वर रात्रीपासून झालेली recording ⏺️ बघत लक्षात आलं की end-to-end जरी १८ तास लागले असले (worst of 3 😟), तरी moving time फक्त ११:३० तास होता (best of 3 ☺️).. अजून एक achievement अशी की, विंझर पुढे टेकडी चढून उतरल्यामुळे ही activity आजपर्यंतची highest elevation gain म्हणून record झाली - २२९८ मी. 💪..
भेटू परत.. पुढच्या वर्षी, ह्याच ठिकाणी, ह्याच वेळेस.. with another SRT article on "घरबसल्या trekking" 👨💻.. tada 👋..
| credits: वैभव 🤳 |
Congratulations Sushil and Team 👍
ReplyDeleteThank you Bhushan 🙏
DeleteNice Sushil.. always a treat to read your blogs..
ReplyDeleteThank you Pramod 🙏
Deleteछान मस्त लेख.. कीप इट अप ...
Deleteधन्यवाद 🙏
Deleteवाचनीय ...✨
ReplyDeleteधन्यवाद प्रदीप 🙏
DeleteVery good write up with nice clicks.☑️
ReplyDeleteThank you 🙏
Delete