Tuesday, January 11, 2022

चंदन-वंदन

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

plan z.. चंदन-वंदन

title वाचून लक्षात आलं असेलच आज काही चंदन-वंदन चा इरादा नव्हता.. जितके options shortlist करून आणि participants shuffle होऊन हा final झाला, तो plan b / c नाहीच.. जी तयार झाली, ती checklist ☑️ अशी काही होती - थालीपीठ, चंदन-वंदन, किकली 🛕, बारा मोटाची विहीर.. 

Google Maps वर चंदन किंवा वंदन search 🔍 केलं तर आपल्याला साताऱ्याच्या उत्तरेस ⬆️ दोन जोडकिल्ले दिसतात.. पण ह्यातल्या काही pins 📍 उलट्या आहेत / होत्या.. when viewed conventionally (वर उत्तर दिशा ठेऊन), ह्यातला उजवीकडचा, म्हणजेच उत्तर-पूर्व / ईशान्य ↗️ दिशेला आहे चंदन आणि डावीकडचा, म्हणजेच दक्षिण-पश्चिम / नैऋत्य ↙️ दिशेला आहे वंदन.. edit 📝 केलंय, पण दिलेलं suggestion reject झालं तर confusion नको म्हणून 'chandangad fort' ही pin ❌ चुकीची आहे, हे लक्षात घ्यावे..

०८ जानेवारी २०२२

थालीपीठ साठी सुप्रसिद्ध अभिरुची hotel (Google Maps 🌍 वर 'Hotel Abhiruchi Pure Veg, Surur') ला नाश्ता करून भुईंज हून left 👈 घेण्यातच आजचं adventure झालं होतं.. तासकाटा ८च्या पुढे गेला असूनही सूर्य पांढरा दिसत होता.. highway 🛣️ हुन service road, तिथून कारखाना 🏭 road आणि पुढे किकलीला कसे गेलो, हे फक्त आम्हालाच माहित 😅.. 'पुढे गाडी आहे' हे एकमेकांना सांगत आम्ही वैभवला सावधान ⚠️ करत होतो, आणि तो आम्हाला confidence 😃 देत होता..

बेलमाचीला गाडी लावून ८:४५ ला पायी वाटचाल 🚶‍♂️ चालू झाली.. खालीच लावलेल्या एका पाटीवर दोन्ही गडांवर बघायला 👀 काय-काय आहे, ह्याचा अभ्यास करून आम्ही पुढे भैरवनाथ मंदिरात पोहोचलो.. इथून पुढे दोन्ही गडांच्या मधल्या खिंडी पर्यंतची arrow marking ↖️ आमच्या सोबतीला होती.. खिंडीच्या पलीकडचा नजारा अलीकडच्या नजाऱ्याहून दाट होता..

time check ⌚: 09:32

आधी चंदन करायचा म्हणून समोर दिसणाऱ्या धारेवरून चढायचा प्रयत्न वायफळ ठरतोय असं लक्षात येताच उलट्या ↪️ दिशेला आता स्पष्ट दिसणाऱ्या वाटेने तरी वंदन आधी करून घेऊ ✅, म्हणून माघारी येत आम्ही वंदन गडाच्या डावीकडून वर चढती वाट धरली.. पण त्याआधी एका frame 🖼️ मध्ये समावणाऱ्या वंदनची संधी आम्ही सोडणार नव्हतो..

माकडं 🐒 - कुठल्याही गडावर गेलो की आपल्याला शक्यतो माकडं दिसतात.. आणि जिथे अति प्रमाणात (माणसांची) गर्दी असते, तिथे ह्यांच्या (माकडांच्या) गर्दीला पण काही सीमा नसते.. महाबळेश्वरला त्यागलेल्या biscuit 🍪 सारखंच गेल्या आठवड्यात सज्जनगडला गेलो असता, एका माकडाने सुमेधच्या हातातल्या maaza (tetrapack)🧃 वर जसा हल्ला केला, तसा प्रसंग आपल्यासोबतही कधीतरी घडला असेलच.. 

१०:३० 🕥 वाजता इथे (वंदनगडावर) महादरवाज्यात पोहोचता जणू आम्ही trespassing करतोय, असा cctv 📹चा पहारा देत असलेले काही माकडं धावून आले.. खिंडीतून चंदनगडावर जायला रस्ता शोधायच्या नादात झालेल्या timepass ⌛ मुळे आता भूक लागली होती आणि खायला बसण्याजोगी जागा आणि सोबत सावलीची शोधमोहीम 🧐 चालू होती, जी माकडांना मंजूर नव्हती.. गेलो त्या दिशेला, आमच्या मागे येत 'आम्ही bag 🎒 कधी उघडतोय', ह्याची वाट बघत होते.. नेहमी trekking pole 🦯 आणणाऱ्या वैभवला ढाल 🛡️ बनवत आम्ही हा १२व्या शतकात बांधलेला किल्ला बघत होतो.. महा दरवाजा, पारसी शिलालेख असलेला पण वाट ढासळलेला भोज दरवाजा, चुन्याचा घाणा, धान्याचे कोठार, शिव वंदनेश्वर मंदिर, बालेकिल्ला, तळं, काही कबरी आणि दर्गा बघून जेव्हा ११:३०ला 🕦 आम्हाला एक pakka accommodation सारखं माकड-safe structure वाटलं / दिसलं 👁️, त्यात पेटपूजा करायचं ठरलं.. त्या आधी, घाण्याजवळची 'काळूबाई मंदिर उजवीकडे' पाटी follow करून सुद्धा जेव्हा काही शोध नाही लागला, तेव्हा आम्ही पूर्वेकडील बुरुजापासून u-turn घेतला.. भोज दरवाज्यात भेटलेल्या दोन जणांकडून 👥 कळलं की चंदनला वर जायला (खिंडीतून) उजवीकडून 👉 रस्ता आहे..

चंदन from वंदन

वानर - माकडांचा विषय निघालाच आहे, तर थोडंसं वानरांबद्दल पण.. शब्दशः अर्थ 'वन में रहने वाला नर ♂️', आणि म्हणूनच रामायणात वाचण्यात येतं 'वानर सेना'.. मग आपण माकडांना, किंवा काळ्या-पांढऱ्या माकडांना जे वानर म्हणतो, ते कितपत योग्य आहे, ह्याचा विचार केला पाहिजे 🤔.. तसंच, आपण जे कधी-कधी म्हणतो, माकडं आपली पूर्वज आहेत, तर थांबा.. आपण खरंच जर माकडांचे वंशज असतो तर मग आज जे दिसतात ते माकडं का / कोण आहेत?.. evolution 🦧 जर झालेच असेल, तर सगळ्यांचेच व्हायला पाहिजे ना.. जसं आजकालच्या penguins 🐧 ना उडता येत नाही.. आधीसारखे काही अजूनही उडतात / उडू शकतात, असं नाही ना!.. on the other hand, आपले आणि माकडांचे करोडो वर्षांपूर्वीचे पूर्वज एकच, ह्याचा बोध होणे म्हत्वाचे 🦍.. आता तुम्हाला प्रश्न पडायला हवे, "पूर्वज नाही तर मग, ह्या logicने भाऊ 👬 म्हणू शकतो का?" आणि "'वन में रहने वाली मादी ♀️' ला काय म्हणतात?"

खिल्लारी

१२:३० 🕧 वाजता खिंडीत परत येऊन चंदन गडावर जायला traverse घेत गडाच्या दक्षिण-पूर्व / आग्नेय ↘️ दिशेला मरिमाता मंदिरापासून वर चढायला सुरुवात केली.. असे शिंग असलेल्या २ गाई बहुतेक पहिल्यांदाच बघितल्या असतील, खिल्लारी 🐄.. इथून गडावर जाणारा रस्ता भरपूर developed आहे, अगदी विटा वापरून पायऱ्या बनवलेल्या आहेत.. बेलमाची ऐवजी बनवडी / दुधानवाडीहून trek चालू केला असता तर परवडलं 😊 असतं, असं वाटायला लागलं होतं.. वेळ ⏱️ may be तेव्हढाच लागला असता, पण कमीत-कमी रस्ता शोधण्यात तरी वेळ गेला नसता..

पाचवड

असो, किल्ल्याच्या entranceलाच एक पडलेल्या दरवाज्याचे अवशेष दिसतात.. थोडं पुढे एक महादेव मंदिर लागतं ज्याच्या शेजारी पाचवड आहे, म्हणजे, वडाचे पाच झाडं merge झाले आहेत असं लक्षात येतं.. similarly, मंदिरात सुद्धा 🖐️ पाच पिंड असलेलं शिवलिंग आहे.. थोडी पुढे एक दर्गा 🕌 आहे, जी वंदन गडावरच्या पेक्षा मोठी आहे.. मागे एक विहीर आणि चौथरा आहे, जी कधीकाळी सदर असावी.. सकाळी ज्या दिशेने आम्ही चढायचा प्रयत्न करत होतो, त्या sideला कोठार आहेत.. आता वाजले होते २:१५.. खिंड समोर आणि खाली दिसत होती, पण माघारी जाऊन तोच traverse घेतल्याशिवाय पर्याय नव्हता 😔.. ३ वाजता 🕒 तिसऱ्यांदा खिंडीत येऊन, सावली साधत, काकडी-गाजर 🥒🥕 refuel करत शेवटच्या टप्प्यासाठी (ह्या article मधली शेवटची उपदिशा) उत्तर-पश्चिम / वायव्य ↖️ दिशेने non-stop धाव घेतली..


वंदन from चंदन

वीरगळींचं गाव किकली -  travorbisच्या YouTube channelवर किकली मंदिराचा video आधी बघितला होता.. पण exactly कुठे आहे, हा शोध 🔎 कधी घेतला नव्हता.. इथे येण्याआधी Maps 🗺️ बघत जेव्हा 'किकली' नाव वाचलं 👓, तेव्हा इथल्या त्रिदल पद्धतीच्या भैरवनाथ मंदिराने आजच्या checklist मध्ये शेवटची entry घेतली, जिथे आम्ही ४:१५ वाजता entry केली.. ह्या पूर्वाभिमुख मंदिरात ३ गाभारे आहेत.. मुख्य आणि दक्षिण गाभाऱ्यात शिवलिंग तर उत्तर गाभाऱ्यात भैरवनाथ.. मंडपाबाहेरच्या परिसरात एक दीपस्तंभ 🪔 आणि भरपूर वीरगळी आहेत.. मंदिराबद्दल अजून काही जास्त लिहिण्यापेक्षा स्वप्नीलने video मध्ये सांगितलेली माहिती ऐकावी / बघावी, link here..


बारा मोटाची विहीर - सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण 👌 आणि वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ही ऐतिहासिक वास्तू १८ व्या शकतात शाहू महाराजांच्या कारकिर्दीत बांधली गेली आहे.. जमिनीखाली महालात असलेल्या ह्या अष्टकोनी 🛑 आणि शिवलिंगाकृती विहिरीचा व्यास ५० फूट आहे आणि खोली ११० फूट आहे.. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे 🗿 आणि हत्तीवर, घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 🏇 शिल्प इथल्या खांबावर बघायला मिळतात..

आपण शाळेत चुकीचं गणित 🔢 तर नाही शिकलो म्हणून परत-परत मोजून सुद्धा जेव्हा मोटांची बेरीज बारा नव्हती होत, नाईलाजाने चिंतनने तिथे हळद, पापड, लोणचं विकणाऱ्या आजींना विचारलं.. तेव्हा कळलं, १५ पैकी फक्त १२ वापरायचे.. but it was just a little too late.. आजी 👵 आम्हाला काही सोडत नव्हत्या.. 'हळद माझ्याकडून घ्या' चा गोंधळ उडाला.. ५:३० 🕠 वाजता ऊसाचा रस 🎋 पीता-पीता 'रोज काहीतरी नवीन शिकावं' च्या list मध्ये 'अळणी हळद' किंवा 'पांढरी हळद' बद्दल शिकलो.. आणि हे search करत अजून लक्षात आलं की हळद ७ प्रकारची असते ⚪ ⚫ 🟣 🟡 🟠 🔴 🟡.. conclusively, 'हळदी color' जर आपण कुठे वापरत असू, तर ते बंद 🙊 करायला हवं.. obviously, ऐकणारा पिवळाच समजेल, पण technically ambiguous आहे.. आणि, पिवळी आणि खाण्यातली साधी हळद, हे सुद्धा २ वेगळे 🙃 प्रकार आहेत..

बारा मोटाची विहीर

article ची सांगता चंदन-वंदनच्या सुरुवातीला असणाऱ्या पाटीच्या footnote ने,
जमीन विकायची नसते, पिकवायची असते 🌾
झाडे लावायची असतात, तोडायची 🪓 नसतात..

content 📝 and photo 📷 credits: वैभव, (२ वर्षांनी group trekला आलेला) सुयोग

20 comments:

  1. चंदन वंदन ला नमन करण्याइतपत मंदिरे तेथे आहेत ही माहिती छान आहे.🙏👍

    ReplyDelete
  2. सुंदर लिहिलय सर..

    ReplyDelete
  3. मस्त लिहिलंय...प्लॅन z successful झाला... Hopefully next time प्लॅन A च implement karu 👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद वैभव 🙏
      हो, कारण statically, आपला record बिगडत चालला आहे, प्लॅन A च्या बाबतीत.. 😂

      Delete
  4. Very well noted ,, वाचतांना प्रत्यक्ष मी पण ट्रेक ला आलो होतो अशी अनुभूती आली.. thank you.

    ReplyDelete
  5. Wowwww, so well written n even nice to know new type of halad, pandhari halad!

    Great going keep it up n keep posting blogs

    Thanks

    ReplyDelete
  6. Replies
    1. Thank you Deepa 🙏
      हे plans चे नाटक आता नेहमीचे झाले आहेत.. 😃

      Delete
  7. Khup chan... Good start of 2022.. Keep exploring and keep writing..

    ReplyDelete
    Replies
    1. वाहवा सुंदर वर्णन
      नुकतेच 2वेळा जाऊन आल्यामुळं सर्व कसे ओळखीचे वाटले
      याबरोबरच आम्ही जरंडेश्वर v कल्याणगड पण केला होता

      Delete
  8. Chandan Vandan che khup chhan likhan ani informative...Pachwad photo masta

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...