।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
It's about the Journey, not the Destination.. कैलासगड आणि प्लस व्हॅली
plan होता AMKचा, जो माझा ह्याच वर्षी दुसऱ्यांदा cancel झाला होता 😔.. पहिल्यांदा "खूप गर्दी असते, climbing / rappeling 🧗साठी तासभर वाट ⏱️ बघावी लागते" म्हणत आणि ह्या वेळेस, "minimum participants नाही म्हणून confirm नाही" म्हणत.. असो, ToDo list मध्ये असलेले trek असे cancel 🚫 होऊन, जेव्हा actually Done list मध्ये प्रस्थान करतात, ती मजा वेगळीच 😇.. ह्या category मधले काही उदाहरण द्याचे झाले तर, लिंगाणा, (मोरोशीचा) भैरवगड, (शिरपुंजेचा) भैरवगड ते रतनगड, अस्वलखिंड इ. (सगळेच organizersनी cancel केले होते, असं नाही).. उजवीकडे 👉 Blog Archive 🗒️ मध्ये आहेत.. ही post जर आवडली तर नक्की ते सुद्धा वाचा.. नाही आवडली 😉 तरी, भैरवगडच्या दोन्ही तर नक्की वाचाच (from February 2021), ज्या आहेत "trek म्हणजे 'trek आणि बरंच काही'" ची perfect / classic उदाहरणं 👌..
दुसरी एक category म्हणजे 'नुकताच ऐकला 👂 आणि लागलीच केला ✅', किंवा ToDo list मध्ये न जाता, थेट Done list मधेच.. मोजकेच पण हे सुद्धा अनुभव सांगण्यासारखेच.. ढाक बहिरी, देहेरगड ('आम्ही तर कधी नाव पण ऐकले नाही' 🤨 म्हणणारे), ह्या post मधला / मधली plus valley (trek म्हणून 'मधला' आणि valley म्हणून 'मधली') इ...
आता येते कैलासगडची category.. ऐकून आहोत पण आवर्जून करावा, अशी इच्छा नाही 😒.. ह्यामागची कारणे भरपूर, त्यातलं एक ☝️ म्हणजे - Google Maps 🌍 घरून २ तासाच्या वर दाखवतोय, त्यात फक्त तासभर trek करून माघारी म्हणजे पचण्यासारखं 😞 नाहीच, मला तरी.. 'RoI' 💱 पण काही प्रकार असतो, का नाही?.. मग Duke's nose सोबत इरशाळगड 👥, मोहनदरी सोबत कण्हेरगड 👯, कैलासगड सोबत plus valley 🖇️, हे असलं काही सुचतं..
बरं, AMK करणार म्हणून group वर weekend planningचं तसं काही discussion नाही 😐.. पण एकदा cancel झालाय म्हण्टल्यावर राहुल, वैभवला 'आपण weekendला काय करायचं?" ह्या प्रश्नाचं समाधानकारक 🥳 उत्तर भेटलं असावं.. थोडा research करत 🔬, काही वेळात महेश आणि आधी 'माझं fix नाही' म्हणणारा अमन संध्याकाळ 🌇 पर्यंत तयार झाले.. "गोष्ट इथे संपत नाही" चा कार्यक्रम रविवारी होता म्हणून दिवस आधीच ठरला होता शनिवार..
२० नोव्हेंबर २०२१
"बालाजी चौकातून ये" orderला follow करत आणि Google Mapsच्या बाईला नाराज करत, आम्ही राहुलच्या घरी 🏢 पोहोचलो.. ६ वाजता 🕕 तिथून निघत आणि अमनची चांदणी चौकातून जायची ईच्छा मारत, आम्ही थेट पौडला बाहेर निघत ताम्हिणी घाटाच्या रस्त्याला लागलो 🛣️.. Maps वर बघता हे आधीच लक्षात आलं होतं की एकदा हा रस्ता सोडला तर नाश्त्याची 🍛 सोय होणे अवघड आहे, पण रस्त्यात असलेल्या बऱ्याच hotelsचा 🏨 (technically, restaurantsचा) अजून दिवस उजाडला 🌄 नव्हता / weekend चालू झाला नव्हता.. आणि जे मोजकेच उघडलेले दिसत होते, तिथे एकतर फक्त चहाची सोय होती, नाहीतर राहुलचा speed ⏩ थांबायची परवानगी देत नव्हता..
विठ्ठल कामतच्या पार्किंग मध्ये १-२ गाड्या दिसल्या तर ठरलं, now or never.. रस्त्याला toll नाही म्हणून इथे mobileला सुद्धा range नाही 📴.. तुमच्याकडे cash 💰 असेल तरच तुम्ही आत या म्हणून बाहेरच पाटी लावलेली होती "only cash, no internet, no wifi".. barter system सारखं आपल्याकडची अंडी 🥚 देऊन नाश्ता भेटेल का? ही hypothesis दिवसभरासाठी (at regular intervals) व्यंगाचा 😂 विषय होऊन गेली.. १० मिनिट लागतील म्हणत २ मिनिटात order 🍝 देणारं
अंधारबनचा turn ➡️ चुकलो, तो आजचा पहिला (आणि शेवटचाही) नव्हता.. नशीब चांगलं होतं की तिन्ही वेळेस २-५ मिनिटांच्या वर वेळ नाही गेला 😊.. Maps वरच्या 'Kailasgad trek starting point' ला पोहोचायच्या प्रयत्नांमध्ये रस्त्यात आम्हाला बगळ्यांसारखे काही पक्षी 🦢 दिसले / लागले.. एक तर समोरून हलायलाच तयार नव्हता.. "आम्ही बिबट्याला 🐅नाही घाबरत, असेल तो बिबट्या, त्याच्या घरी" सारखंच, तो आम्हाला हूल देत असावा, "असशील तू कोंडे, तुझ्या घरी 🏠.. मी नाही घाबरत"..
parking - मराठीत काय? tea 🍵 ला चहा म्हणतात, coffee ☕ ला? bread 🍞 म्हणजे पाव, आणि toast? मराठी भाषेने काही शब्द फक्त लिपीच्या 📝 फरकाने जशेच्या तशे आत्मसात केले आहेत, त्यातला एक - पार्किंग.. "कैलासगडाकडे" board 📋 च्या बाजूला जेमतेम एक-दोन गाड्या बसतील इतकीच जागा.. गाडी लावली आणि विषय एकच, ok, दोनच.. पाहिल्या पावलापासूनच चढ 😥 आहे, warm-upला काही scopeच नाही.. किती वारा 🍃 आहे!? थोडा खडसांबळेला पाठवा.. 'खडसांबळे' पहिल्यांदाच ऐकत / वाचत असाल तर तुम्ही सुखी 🙋 आहात, कारण तुम्ही नक्कीच आमच्या बरोबर त्या trekला नव्हते..
बराच चढ सरल्यावर आला थोडा traverse आणि मंदावला वारा.. म्हणजे योग्य तिथे आहे / होता आणि आता नसला तरी हरकत नव्हती.. तिन्ही बाजूला होतं मुळशी धरण आणि आम्ही चढत होतो चौथ्याच दिशेला.. आळीपाळीने चढ चढत आणि traverse करत, सूर्य आणि ढगांचा लपंडाव ⛅ बघत / सोसत ४०-४५ मिनिटात वर पोहोचलो.. डावीकडच्या sideला थोडं उतरून पाण्याचं एक सुंदर टाकं 👍 आहे.. माघारी परत येऊन पुढे बांधकामाचे काही अवशेष आणि App वरचा trail संपतो तिथे शिवलिंग आहे (प्रत्येक गडावर असतंच).. ह्यापलीकडे गडावर बघायला काही नाही (at least, आम्हाला दिसलं 🧐 तरी नाही).. बाकी मग गडावरून बघायला मुळशी धरणाचा सुंदर परिसर आहे, जिथे you cannot skip falling in love 💖 with that 1 beautiful tiny island 🏝️ in the North (हे मराठीत नसतं जमलं)..
खाली उतरून झाल्यावर जवळच वाघोबा मंदिर आणि caveला जाऊन यायचं ठरलं.. मंदिर बघून, cavesला जायला रस्ता सापडत नसल्याने माघारी येऊन पुढच्या ⏭️ destination कडे journey सुरु झाली.. अमनने सांगितलं नसतं तर 'तेरी महिमा अपरंपार' 👏 कुंडलिका valleyच्या viewचा आनंद न घेताच आम्ही निघून गेलो असतो.. नव्हतं माहिती म्हणून काय गमावलं असतं, हे कळालं नसतं आणि म्हणून कदाचित ह्या वेळेस वाईट वाटलं नसतं 🙃, पण आता कळाल्यावर next time चुकलो, तर नक्कीच वाईट वाटेल.. so for this time, it was surprise, surprise ! 😍
जेवायची वेळ तर नाही झाली, पण plus valley हून परत येई पर्यंत वेळ निघून जाईल ⌛ - मग करायचं काय?.. म्हणून काही तासांपूर्वी जो turn चुकलो होतो, त्या कोपऱ्यावरच्या 'जय मल्हार' ला भेटेल ते इंधन ⛽ पोटात टाकत, गाडी पुढच्या वाटेला निघाली.. तिथल्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे plus valleyच्या थोडं पुढे मंदिराला लागून parkingची सोय होती.. तिथे पोहोचून, गाडी लावून 🚘, उलट्या trekची सुरुवात झाली.. 'उलटा' कारण, इथे होता आधी descend 📉 आणि return येतांना ascend 📈.. पण, त्याआधी..
Western Ghats - ज्याला आपण महाराष्ट्रात सह्याद्री म्हणून ओळखतो / संबोधतो, हे कशे तयार झाले असतील? ही process नक्कीच केवल १ / २ / ५ हजार वर्ष जुनी नाही.. हे transformation घडत आलंय गेल्या ६ करोड वर्षांपासून 🏚️.. ज्वालामुखीतून 🌋 निघालेला लावा पसरावा आणि ह्या थंड झालेल्या लावाची झीज होऊन जेव्हा दऱ्या / खोरं तयार झाली, त्यातून सह्याद्री ⛰️ तयार व्हावा.. मग हिमालय 🏔️ पण असाच का? तर नाही, इथे ज्वालामुखीचा काही संबंध नाही.. पृथ्वीचा भूभाग १५ Tectonic plates 🗺️ ने बनलेला आहे, ज्या दरवर्षी साधारण २ से.मी. सरकतात.. करोडो वर्ष सरकत-सरकत जेव्हा Indian 🇮🇳 plate आणि Eurasian plate converge झाल्या, त्यातून निर्मिती झाली हिमालयाची.. दोन्हीकडच्या दगडांमधला फरक ह्यामुळेच.. खालच्या image मध्ये आपण reverse engineering करत जर बघितलं, तर अंदाज घेता येतो की भारत देश आधी अफ्रिका आणि अंटार्क्टिका ह्या दोन्ही महाद्वीपांच्या मध्ये होता.. पण हे मी इथे का सांगतोय? 🤔 ह्याचा आणि ह्या postचा संबंध काय?.. तर ऑगस्ट-२०१४ पासून नवीन / सध्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले 👩🏫 पुणे विद्यापीठाने 🎓 ह्या वर्षीच चालू केलेल्या Diploma in Mountaineering and Allied Sports च्या अभ्यासक्रमात हे सगळं शिकवलं जातं.. महेश ने admission घेतली आहे आणि ही Geology 📖 विषयी माहिती त्यानेच plus valley उतरतांना दिली..
वाट दिसायला तशी पाण्याची वाटत होती पण उतरण्याजोगी होती.. बोराट्याची नाळ (लिंगाणा) किंवा नळीची वाट (हरिश्चंद्रगड) आठवावी, अशी समृद्धी.. इथे १२ महिने पाणी 🏊♀️ असतं असं म्हणतात, जे आम्हाला त्या plusच्या centerला पोहोचल्यावर लागलं सुद्धा / लागणारंच होतं.. purest form of water - तुमच्या-आमच्या घरी येणाऱ्या 🚰 किंवा purify होणाऱ्या पेक्षाही कितीतरी हितकारी.. थोडी विश्रांती 🧘♂️ घेऊन (तसं दमण्यासारखं अजून काही केलं नव्हतं, पण वेळ आणि जागेचा आदर 🙏 करणं गरजेचं असतं), रिकाम्या बाटल्या भरून (रिकाम्या करून आणि भरून), App जो उजवीकडे अजून trail दाखवत होता, त्या दिशेने आमची वाटचाल चालू झाली trekच्या end point 🔚 पर्यंत.. इथून जे पाणी धबधबा म्हणून खाली पडतं, तो म्हणजे देवकुंड (स्वप्नीलने सांगितल्याप्रमाणे 1 of its 7 streams)..
ह्या end point साठी काही शब्द नाहीत, फक्त photo 📸 आणि video 🎥, आणि हीच आजची आठवण / परत येण्याची ओढ / ह्या post ची समाप्ती..
In some parts of the world, people believe, 'Journey is just as important as the Destination'.. In some other, 'Destination is just as important as the Journey'.. In सह्याद्री, there is no Journey or Destination, yet everything is Journey and Destination 🤗..
मस्त रे
ReplyDeleteधन्यवाद वैभव 🙏
DeletePlus vally आणि धबधबा अप्रतिम!!!
ReplyDeleteधन्यवाद भूषण 🙏
Deleteवाचूनच ट्रेक पूर्ण झाला 👍
ReplyDeleteधन्यवाद Trunal 🙏
Deleteखरच, निसर्ग दर्शन व धबधबा (आवाजासहीत) खुप आवडला.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteKup chan
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteKhup sunder Sushil...likhan, photo ani mahiti ...keep trekking keep blogging
ReplyDeleteधन्यवाद कौस्तुभ सर 🙏
Deleteदोन आवडत्या ठिकाणाचे अचूक वर्णन,मस्त लेख 👍
ReplyDeleteधन्यवाद गिरीश सर 🙏
DeleteVery nice !!
ReplyDeleteIn सह्याद्री, there is no Journey or Destination, yet everything is Journey and Destination ....very true
Thank you Radhika 🙏
Delete