Thursday, February 11, 2021

भैरवगड (मोरोशीचा)

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

भैरवगड आहेत बरेच, त्यातला पहिला.. भैरवगड (मोरोशीचा)

२ वर्षांअगोदर book 📔 पण केला होता, पण sufficient participants नसल्याने नाईलाज 😔 झाला होता.. नंतर लिंगाणाला जो rappellingचा अनुभव घेतला (read post here), वर्षभर technical treks नको, हे तेव्हाच ठरवलं होतं.. वर्ष सरलं, back-to-normal झालेल्या lifestyle मध्ये परत website 👨‍💻 वर भैरवगडचं schedule दिसलं.. चौकशी केली तर कळलं, ह्यावेळेस नाही होणार cancel, बऱ्यापैकी enquiries आहेत.. वैभवला विचारलं (त्याने केला आहे, हे माहिती होतं), "climbing आणि rappelling किती आहे?", "जास्त नाही, पण जे आहे ते risky आहे"..  आणि आठवला 🤨 नुुुकतीच super-duper hit झालेल्या web series मधला dialog "risk है तो इश्क है" .. 

१९१६ मध्ये स्थापित आणि नुकताच स्वायत्त (autonomous) झालेल्या पुण्यातील प्रतिष्ठित सर परशुरामभाऊ महाविद्यालय 👨‍🏫 (SP college) हुन रात्री ११:३० 🕦 ला गाडी निघणार होती.. आता मागच्या वेळेस cancel झाला होता म्हणून (less known / अवघड असल्यामुळे कदाचित) काही जास्त public नसेल, हीच मनाची समजूत, पण ३६ ⁉️ आनंद आले (trekला नव्हते) आणि packed breakfast 📦 बरोबर instructions ही देत होते.. "गेल्यावर आपल्याला फक्त चहा ☕ पिऊन लगेच trek चालू करायचा आहे.. rock patchला वेळ लागतो आणि 🌻 रविवार असल्यामुळे इतर groups असण्याची शक्यता नाकारता येत नाही" .. हे मी का सांगतोय, ते लवकर कळेलच.. 

७ फेब्रूवारी २०२१

packed breakfast आणि ⚓ harness वगैरे bag 🎒 मध्ये ठेऊन वेळेत निघालो..  भोसरी आणि मोशीहुन काही pick-up होते.. त्यांना उरकत राजगुरुनगर toll नाक्याला पोहचणारच तेव्हढ्यात tyreचा आवाज, वाजले होते रात्रीचे १.. समज त्या वेळेस हाच की सहापैकी कुठलातरी एक puncture झाला असेल.. प्रत्येक trek हा memorable ☺️ असतोच, तर आजच्या trekची ही पहिली घटना.. driver ने गाडी थांबवली आणि tyre बदलायची प्रक्रिया चालू झाली.. पण stepneyचा काही आज mood नव्हता.. काही केल्या साखळी खाली यायला तयारच नव्हती.. २ जणांनी एकत्र जोर 💪 लावून बेडा पार केला.. दीड तासानंतर आमची happy journey परत चालू झाली.. trek संपल्यावर driver काकांना विचारलं, "puncture काढलं का?" तर तेव्हा कळलं, truck 🚛 / bus 🚌 चे tyre कधी puncture नाही होत, तर direct फाटतात.. त्यांनी photo पण दाखवले.. 🌃 रात्री अंधारात काय झालं होतं, ते आता अजून स्पष्ट झालं होतं..  

base village / hotel ला पोहचून चहा 🍵 झाला आणि गडाच्या दिशेने वाटचाल 🚶चालू झाली.. अंधारच होता आणि समोर गडावर ज्या torchlight 🔦 दिसत होत्या, त्याने खात्री झाली होती - जे लवकर पोहचून कमावणार होतो, ते आपण गमावलं आहे - लवकर परतायची संधी..  


थोड्यावेळातच उजाडायला 🌄 लागलं होत आणि समोर २ टोकं दिसायला लागली होती.. एकाचा आकार भिंतीसारखा होता आणि दुसरा होता त्याहून उंच डोंगर ⛰️.. सोबत आलेल्या गावकरी काकांनी सांगितलं, डावीकडचा भैरवगड.. म्हणजे आज चढायची होती भिंत, ज्याला ह्या दिशेने चढायचा रस्ता दिसत नाही.. नेहमीप्रमाणेच blogs 📑 वाचून आणि video 📽️ बघून इतकी माहिती तर होती की गड चढायला अवघड आहे, पण दोघांपैकी कुठला आहे, हे त्या क्षणापर्यंत माहित नव्हतं.. "नक्की का?" confirmation घेत आमची यात्रा पुढे निघाली..


काही वेळाने पठार आला आणि समोर होते आजोबा 👴 पासून तारामती 🌟 आणि माळशेज घाट.. वऱ्हाडी पासून नानाचा अंगठा 👍..  unbeatable view of Sahyadri ranges in all directions.. भिंतीच्या पायथ्याशी पोहोचून नाश्ता 🥙 झाला.. आणि फिरुन पलीकडे गेल्यावर दिसायला लागली वर चढायची वाट..

"आपण एक ladder सोबत आणली आहे; जिथे overhang आहे, तिथे लावणार आहोत" .. मी काही चुकीचं ऐकलं का? किंवा तुम्ही काही चुकीचं वाचताय का? असं नक्कीच वाटणार .. आता ह्याआधी ज्या ladder बघितल्या, त्या फक्त कळसुबाई, सुधागड सारख्या गडांवर.. आणि आपण गेले २ तास जे चालून आलो आहोत, त्यात तश्या प्रकारच्या ladder तर नक्कीच वाहून आणलेल्या नाहीत.. मग हे काय नवीन? 🤔  सगळ्या instructions सांगून झाल्यावर, सुनील (trek lead) ने त्यांच्या backpack 💰 मधून ladder काढली .. होतं काय? तर.. ropeला बांधलेली एक steel step, जी आम्ही फक्त एक पाऊल 👣 व्यवस्थित ठेवता यावा, ह्या हिशोबाने overhang च्या ठिकाणी लावणार होतो.. बरं, overhang म्हणजे काय? तर "mission impossible 2" movieच्या सुरवातीलाच जे agent Hunt climbing 🧗‍♂️करतांना दाखवला आहे, त्या प्रकारच्या डोकावत असलेल्या खडकाला overhang म्हणतात, जिथे प्रामुख्याने हाताने चढाई करायची असते.. इथे (भैरवगडला) तशी फक्त एकच step आहे, म्हणून ह्या comparisonला अतिशयोक्ती 😯 समजणेच योग्य ठरेल.. 

खालून बघितलेला नजाऱ्याचं topला जाऊन "cherry on the cake" 🍰 झालं.. बाकीचं public rockpatch हळू-हळू चढून येत असल्याने साहजिकच आम्हाला वर एकमेकांची ओळख करून घ्यायला आणि गप्पा मारायला भरपूर वेळ भेटला..


खाली उतरतांना वेळ होती rappelling 🧗 करायची.. दोन्हीपैकी कुठून कमी करावी लागेल, हे लक्षात घेऊन leaderला विचारलं, "मी पुढून जाऊ का?", तर "५ फुटांनी काय फरक पडणार आहे?" ऐकत गप तिथूनच belay लावत, झटपट खाली.. सकाळी नाश्त्याला थांबलो होतो, तिथे सुखी माणसं झोपी गेले 🛌 आणि देवमाणूस घोरायला लागले 😴.. 

परत आल्यावर, त्याच पठारावरून जेव्हा भर प्रकाशात हीच भिंत अजून स्पष्ट आणि प्रखर दिसते, तेव्हा निसर्गाची कमाल आहे 💭 असा एकच विचार मनात येतो, "ही खालच्या sideला निमुळती असून उभी कशी?" 😱


ठिकठिकाणी थांबत असल्याने उशीर होत होता आणि असहय्य अशी भूक 😋 लागली होती.. शेवटी काढला आपला तारणहार AllTrails app आणि केला follow तो फक्त सकाळी record ⏺️ केलेला route.. पहाटेच्या अंधारात आणि सकाळच्या थंडीत आपण किती चाललो होतो, ह्याची जाणीव फक्त परतीला दुपारच्या टोचणाऱ्या ऊन्हात 🌞 आणि पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनीच होते.. then, all metric units fail.. 

ज्याला थोडे thrilling trek करायचे आहेत, with very limited climbing and rappelling, this is the perfect getaway 👌.. shoes with good grip are must to negotiate the scree..

तेरे संग, ये दुनिया अलग ही नजर आती है.. 😁

14 comments:

  1. भैरवगड climb chya aathvani .... Mast lihila aahe.:)

    ReplyDelete
  2. Very Nicely written. Expressed nicely.

    ReplyDelete
  3. NicEly expressed what you had experienced...
    भिंत डोळ्या समोर उभी राहिली

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...