Tuesday, March 30, 2021

Eat. Sleep. सिंहगड*. Repeat.

|| श्री अशापुरी देव्यै नमः ||

एक बार से दिल नही भरता.. Eat. Sleep. सिंहगड*. Repeat.

काही दिवसांगोदर जेव्हा सुमेध कळसुबाई शिखर चढून गेला, तसाच सिंहगड पण चढेल हा confidence 😌 गोळा करुन ठरली आजची ३२९वी वेळ.. पण नुकतेच 🙄 night curfew चे timings बदलले आणि २-३ दिवस आधी अचानक उकळी फुटल्यामुळे 🌡️ तो family trek झालाय postpone ⏳.. आणि, draft म्हणून ही post तोपर्यंत ठेवण्यापेक्षा करतोय आता publish.. नाहीतर तुम्ही म्हणाल, लेख लिहायचा आहे 🖋️ म्हणून माहिती तर कधीची गोळा करतोय हा, पण लेख कुठे बघायला / वाचायला भेटला नाही अजून 😏..


a pure act of selflessness 😇.. ३२९* - Michael Clarke चा Test Cricket मधला सर्वोच्च 📈.. match चा तिसरा दिवस होता आणि India 🇮🇳 ला all-out करुन Australia 🇦🇺 कडे ४ बाद ४५०+ धावांची बढत होती.. दुसऱ्या session च्या drinks break 🍶 मध्ये अचानक-भयानक आलं declaration ⏱️.. स्वतः ७० च्या strike rate ने खेळत असता आणि perfect record breaking setup 🥇 असतांना त्याने declare का करावं? हे काही उमजलं नव्हतं.. बरं, match पण ४ दिवसातच संपली, तरी इतकी घाई? 🤦.. hustle, loyalty, respect.. take a bow..🙇

अजून एक प्रसंग असा की, शेवटच्या Test match नंतर (retirement च्या दिवशी) सचिन तेंडुलकरने ♉ आपल्या कर्मभूमी "cricket pitch" ला नमस्कार 🙇‍♂️ केला होता, हे आपण सर्वांनीच बघितलं आहे.. म्हणजेच, आपलं घर ज्या company ने दिलेल्या पगारावर 💳 चालतं, तीला नमस्कार केला पाहिजे.. boss कितीही खडूस 👎 असला, customer कितीजरी महाखडूस 👎👎 असला किंवा increment / promotion मनासारखं भेटत नसलं, म्हणून शिव्या 🤬 द्यायला मी मोकळा, असं नसतंं 🔇.. नसेल पटत तुम्हाला तर switch 🔁 हा खुला पर्याय आहे, नाहीतर नमस्कार हाच सर्वात योग्य पर्याय आहे..

अश्याच उदाहरणांमधून शिकत 🌝 रहावं आणि बाकी सगळं मागे सोडावं 🌚.. सुनीता नाडगीर पण हेच म्हणतात, "सगळ्यांनी एकमेकांकडून चांगलं-चांगलं शिकत राहायला पाहिजे".. 'ह्या कोण?' विचारताय.. खाली 👇 आहेत details.. असंच अजून एक उदाहरण.. कुठलेतरी मतदान 🗳️ चालू होते आणि newspaper 🗞️ मध्ये सगळ्या सिनेतारकांचे मतदान केल्याचे फोटो होते.. ह्यात news 📰 छापण्या सारखं काही नसलं, तरी शाहरुख खान एकटा होता ज्याने समजूतदारपणे सगळे बोटं 🤚 एक साथ दाखवत फोटो काढला होता.. इतरांच्या photo 🖼️ मध्ये होता फक्त मत केल्याचं marking असलेला मधला बोट 🖕.. खूप छोट्या-छोट्या 🤏 गोष्टी आहेत, पण बुंद-बुंद 💧 से ही तो समंदर 🏖️ बनता है..

माणूस म्हणून हे काय असतील ते असतील, पण उदाहरण लाख मोलाचे 👏 आहेत (माझ्या मते तरी).. now, back to 'Eat. सिंहगड. Repeat.'..

आज ३० मार्च - हाच तो बुधवारचा दिवस जेव्हा १० वर्षांगोदर फक्त ११ भारतीय मोहाली, चंदिगढच्या PCA stadium 🏟️ मध्ये पाकिस्तान 🇵🇰 cricket team विरुध्द त्यांचे कर्तव्यपालन करत होते आणि बाकीचे (१२१ करोड वजा ११) full / half day टाकून idiot box 📺 ला चिटकुन बसले होते.. काही लोकांकडून तुम्ही ऐकलं पण असेल, 'final हारलो तरी चालेल, पण आजची match जिंकायलाच पाहिजे'.. कुछ भी ⁉️ 🤔 cricket मध्ये भारतीयांना compromise चालत नाही, आणि हे बाहेरगावच्यांना, Kane Williamson 🇳🇿 ला सुद्धा माहिती आहे, म्हणूनच २०१९ साली तो उपांत्य फेरी जिंकल्यावर म्हणाला होता, "I hope, they (Indians) are not too angry" 😔.. बरं, कुठल्याही tournament चे अंतिम सामने सहसा रविवारी असतात तर ह्या मालिकेचा (२०११ विश्वचषक) अंतिम सामना शनिवारी का? दुसऱ्या दिवशी / रविवारी अमावस्या 🌑 होती - हे कारण तर नसावं !? 🤨

census - १८७२/७३ च्या पहिल्या आणि त्या नंतर सगळ्या देशांसोबत 🌍 synchronised, १८८१ पासून दर १० वर्षांनी होणाऱ्या जणगणने नुसार २०११ मध्ये भारताची जनसंं
ख्या १२१ करोड होती.. २०२१ साठी आले नाहीत ना अजून? येतील 🧍.. आणि ह्या वेळेस हा आकडा १४० करोड च्या आसपास असणार / निघणार, असे estimates आहेत.. oops 😬, परत भटकलो.. back to 'Sleep. सिंहगड. Repeat.'..

सिंहगड #१५०, credits: जितेंद्र

मे-२०१५ पासून जी ब्रिजेश आणि योगेश सोबत सुरुवात 🏁 झाली, तो अगदी कालचाच दिवस 📆 वाटतो.. २०१८ साली अशोकच्या 
वाढदिवशी 🎂 १५० ला जितेंद्र बरोबर होता, तो फक्त योगायोग.. काही दिवसांनी WhatsApp ला cricket 🏏 शी संबंधीत "from the vault" status update सुरु झाले.. पहिला बाहुतेक १७५ चा होता, जी माझ्यामते सचिनची सर्वोत्कृष्ट 👌 पारी असावी (शारजाह 🏟️ वगळता).. तसंही, हारलेल्या match मध्ये Man of the Match 🏅 मिळवणे म्हणजे performance special++ असतोच.. परवाच्या / रविवारच्या Sam Curran सारखा..

२०० चा program थोडा मोठा 🦕 करु, असा विचार करत facebook event 📢 बनवण्यात आला.. तयार झालेल्या उत्साहींपैकी सोबतीला साधारण ३० जण होते.. तारिक तीच ठरली, ज्यादिवशी रवी शास्त्री commentary करत असता, आपल्या सगळ्यांच्याच चाहित्या "superman 🦸 from India 🇮🇳", jersey no. १०, सचिन तेंडुलकरने २०१० 🔟 साली अंतरराष्ट्रीय एकदिवसीय cricket मधलं पहिलं द्विशतक 💯💯 झळकवलं होतं.. पल्लवीचं (महेशची बहिण) नेमकं त्याच दिवशी लग्न 👰 होतं (२०१९) म्हणून त्याच्या circle मधलं कोणी येऊ शकलं नाही.. असो, there is always a next time ⌚..

२५० होता २०२० चा पहिला रविवार.. निवडक लोकांनाच विचारलं होतं आणि आलेही मोजकेच.. त्याच दिवशी ठरवलं की येत्या 
वाढदिवशी 🎈 triple century करु.. but somebody at the other end of the world did not like that idea 😨..
 lockdown 🔒, lockdown 2.0 🔒🔒 आणि extended lockdown 🔒🔒🔒 मुळे झाला २ महिने उशीर.. अगदीच गर्दीमुळे लोकं नाही म्हणायला नको म्हणून सकाळ 🌇 ऐवजी संध्याकाळी 🌃 trek करायचं ठरवलं.. शिवकुमार २०० ला सोबत आणि त्यांच्या मुलीसोबत २५० ला follow-up होते.. बऱ्याच वेळेस company देणारे, निलेंद्र आणि श्रेयस २०० आणि २५० ला सुद्धा सोबत होते.. ब्रिजेश आणि वैभव, २०० आणि ३०० ला होते, तर विनायक २५० आणि ३०० ला..

journey from #200 to #300

वाढदिवशी ३०० जरी झाले नसतील तरी त्यादिवशी जो भुरळ पाडणारा नजारा 😻 बघायला भेटला तो इतर कुठल्याच दिवशी मागच्या ५ वर्षात बघितला नव्हता 😱.. lockdown चीच मेहरबानी म्हणा, clean-n-clear climate मध्ये parking हून राजगड, तोरणा, पुरंदर पासून वैराटगड, पांडवगड पर्यंत स्पष्ट view 🤗 होता ज्यात पांढऱ्या छप्पराच्या 🌫️ सोबतीला होती हिरवी चादर 🏞️ आणि सुर्यासोबत लपाछपी 🙈 खेळत असता, डाव आपल्यावर होता ☁️.. post मधील
 ३ photo 📸 त्याच दिवसाचे..

राजगड, तोरणा

Triple century 💯💯💯 in Test cricket.. THE moment of pride 😎 🤗.. as of this moment, २७ जणांनी ३१ triple centuries score केल्या आहेत.. double treat ⏫ वाले धुरंधर आहेत - Sir Donald George Bradman 🇦🇺, Brian Charles Lara 🇹🇹, Virender Sehwag 🇮🇳 आणि Christopher Henry Gayle 🇯🇲.. "धुरंधर", कारण अजून कोणाचा आपण विचारही करु शकत नाही जे हे पराक्रम करु शकतात.. त्यात एकदा शेवटी साथ द्यायला कोणी राहिलं नाही म्हणून Sir Don Bradman ना २९९* वर माघारी 😟 यावं लागलं होतं.. आणि एका match च्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला ⏸️ तेव्हा Virender Sehwag २८४* वर खेळत असता रातो-रात मधु पुण्याहून मुंबईला 🏃‍♂️ गेला, to witness ❤️ a never-before third Triple ✌️.. पण तिसऱ्या दिवशी २९३ वर बाद होत Sehwag ने त्यालाच काय तर सगळ्या भारतीयांनाच निराश केलं 💔.. हे २ instances इतिहासात होता-होता राहून गेले, जे नेहमीच लक्षात राहतील.. अगदी तशेच, जशे Clive Lloyd आणि Ricky Ponting चे hat-trick / सलग तिसरे ODI विश्वचषक हुकले.. योगायोग बघा, हे दोन्ही विश्वचषक 🏆 भारताने जिंकले.. १९८३ मध्ये Clive Lloyd 🇬🇾 ला अंतिम सामन्यात आणि २०११ मध्ये Ricky Ponting 🇦🇺 ला उपांत्यपूर्व फेरीत हरवत.. अजून एक योगायोग सांगायचा झाला तर ह्या दोघांनी जेव्हा पहिला विश्वचषक जिंकला, तेव्हा अंतिम सामन्यात तेच Man of the Match 🏅 होते.. Lloyd १९७५ आणि Ponting २००३..

साधारण ४० वर्षे वय असतांना १९३० साली जेव्हा Andy Sandham 🇬🇧 ने ☝️ पहिलं त्रिशतक झळकावलं होतं, हा record सगळ्यात oldest 👴 triple centurion म्हणून आजही त्यांच्याच नावी आहे.. सगळ्यात youngest 🧔म्हणून Sir Garfield Sobers 🇧🇧 आणि एकदाच आलेला प्रसंग - एका दिवसात त्रिशतक Sir Don Bradman 🇦🇺.. षटकार ठोकून एकमेव त्रिशतक आणि सगळ्यात कमी चेंडूत Virender Sehwag 🇮🇳, तर सगळ्यात कमी वेळेत (less than 5 hrs at crease) Wally Hammond 🇬🇧.. विश्वास माझाही बसत नाही पण वाचायला तर हेच भेटलं.. ५ तासात Sehwag (२७८) पेक्षा जास्त चेंडू खेळणं कसं शक्य आहे? त्या वेळेस over संपल्यावर strike rotate 🔄 नव्हती होत? का घड्याळ बंद पडलं होतं? ⌛.. आणि भारतात फक्त भारतीयांनीच ज्या मैदानावर 
दोनदा हा उपक्रम राबविला, तो Chidambaram / Chepauk stadium 🏟️, चेन्नई.. Sehwag २००८ च्या जोडीला 👥 Karun Nair २०१६..

वज्रगड, किल्ले पुरंदर

१६६५ साली पुरंदरच्या लढाईत ⚔️ मुरारबाजी देशपांडे कामी आल्यावर शिवाजी महाराजांनी अजून नुकसान होऊ नये म्हणून केलेल्या तहामध्ये 💱 जे पुरंदर, तुंग, तिकोना, लोहगड, रोहिडा, माहुली, सरसगड, असे २३ किल्ले जय सिंग ला सुपूर्त केले, त्यात कोंढाणा सुद्धा होता.. ५ वर्षांनंतर 🖐️ जेव्हा कर्मभूमी 'उमरट' चे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंनी ४ फेब्रुवारी १६७० ला कोंढाणा शिवाजी महाराजांना परत जिंकवून दिला, तेव्हा "गड ⛰️ आला पण सिंह 🦁 गेला" म्हणत किल्ल्याचं नामकरण करण्यात आलं सिंहगड
.. बघितला असेल 'Tanhaji: The Unsung Warrior' तर हे सगळं आठवलं असावा, पण त्यांना unsung warrior का म्हणावं, हे गणित कधी सुटलं नाही.. ह्या वाक्याचा संदर्भ तसा 'श्रीमान योगी' पुस्तकात 📙 नाही - त्यात वाचण्यात येतं, "एक गड घेतला, पण एक बुलंद गड गमावला" 😥..

स्वप्नील खोत सोबत एखादा trek करुन, किल्ल्याची
 / गडाची सविस्तर माहिती गोळा करून, मी अजून एक post 📝 लिहील..



एक बार से दिल नही भरता.. काही ओळी ✍️ नियमित सिंहगड trek करणाऱ्यांबद्दल / करणाऱ्यांकडून..

१ किंवा २ तारखेला वाढदिवस असणाऱ्यांचं ठीक आहे 😉, पण ११ तारखेला वाढदिवस म्हणून ११ वेळेस सिंहगड कोणी चढू शकतो का? 😕 किंवा चढायचा विचार तरी करु शकतो का? तर हे, दुर्गतज्ञ, इतिहासक, महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती चे सदस्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे 🚩 पायदळ प्रमुख 💂 सरनौबत पिलाजी राव गोळे यांचे १४वे वंशज 👨‍👦 मारुती गोळेंनी ऑक्टोबर २०२० ♎ मध्ये स्वतःच्या वाढदिवशी करुन दाखवलं आहे, आणि ते पण फक्त २० तासात 🙇‍♂️ (reference: city bell).. आपणही एखाद्या वर्षी ♍ ६ वेळेस करुच.. अवघड असलं, तरी अशक्य नव्हेच.. आणि 'खरंच होईल का?' 🤞 विचार करता-करता, कदाचित होऊन जाईलही 🤘.. त्यानंतर बायकोने घराबाहेर नाही काढलं म्हणजे झालं 🤷..

बऱ्याच गडांवर चढतांनाच मध्ये कधी सपाटी 🏜️ लागते, तर कधी थोडाफार उतारही.. उरलेल्या (काही मोजक्याच) गडांसारखं, सिंहगड चढतांना आपण साधारणपणे प्रत्येक पाऊल 👣 हे higher altitude लाच ठेवतो, मग ते अर्धा से.मी. 📏 का असेना.. आणि हळू-हळू ह्या elevation चा angle वाढत 📐 जातो..

१९९७ पासून दर शनिवारी येणारे राजेंद्र शेठ म्हणतात "ह्या वाढत्या चढात जी शेवटी-शेवटी छाती भरते, त्यात मजा 🥳 आहे, आणि उतरतांना खडकांवरून चालायला छान वाटतं".. partial lockdown मध्ये जेव्हा weekend ची परवानगी अजून नव्हती 🚫, तेव्हा ते बुधवारी येत असत.. उतरतांना, वर चढत असलेल्यांना खडीसाखर 🍬 / मनुका 🍇 / काहीतरी देत असतात.. आणि त्यांचे जोडीदार 🤝, सुरेंद्र तपकीर सुद्धा २०१२ पासून regular आहेत.. त्यांचे अजून एक जोडीदार, 🔆 प्रकाश दंडनायक नी भरपूर काही सांगितलं, ते थोड्या वेळातच ⏳.. saving the best for the last 🔚 किंवा last but not the least सारखंच काहीतरी..

सिंहगडचे पितामह 👑 म्हणून ओळखले जाणारे आणि ९६वा वाढदिवस 🎉 सिंहगड trek करुन साजरा करणारे आबा महाजन म्हणायचे - The climb of a mountain ⛰️ begins with one step. It doesn’t matter how slowly you walk 🚶‍♂️ as long as you don’t stop ⏹️. Your glory is not climbing without a fall but rising 📈 with every fall 📉.. मी त्यांना इथे बघितलं आहे, आणि त्यांच्या कर्तृत्वाला बघून 🧐, आपण घरी बसलो 😴 तर लाज वाटावी, असंच होईल 🥴.. प्रकाश नी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी हिमालयात 🏔️ ५०+ trek केले होते आणि सिंहगडला किमान ५० वर्षे तरी regular आले असावेत.. 
आणि मनीष कडून कळलं, ते नेहमी सगळ्यांना सांगत असत, "जेवण 🍱 आणि गड ⛰️ कधी मोजू नका".. २०१६ साली ते expire 🥀 झाले.. 

आठवड्यातून २-३ दा सिंहगडला 🦁 येणाऱ्या, मनाने तरुण 💃, सुनीता नाडगीर म्हणतात, इथे आलं की आवड निर्माण होईल, असंच चालायचं, धापा टाकत नाही चालायचं.. आणि वारंवार आलं की stamina 💪 आपोआप develop होतो, फक्त इच्छाशक्ती पाहिजे.. restrictions वयामुळे नसून fitness 👊 मुळे असायला हवे.. कितीही वय असो, जर ती व्यक्ती fit आहे तर काही न करु द्यायचं तीला restriction 🚷 नसायला हवं.. नेहमी आपलं काहीतरी workout हवं आणि ते 
निसर्गाच्या 🏞️ सानिध्यात हवं.. चार भिंतीत व्यायाम केल्यापेक्षा मोकळ्या हवेत व्यायाम केला पाहिजे.. इथे जो तुम्हाला oxygen 🍃 भेटतो, तो gym 🏋️ मध्ये नाही भेटत.. तुमचं आयुष्य किती enjoyable 😀 आहे आणि स्वावलंबी आहे, हे महत्वाचं आहेे.. वय किती? अजून काही करतात का? चला 
ऐकूया 📽️ त्यांच्याकडूनच..

सुनीता नाडगीर 

लिफ्ट-लिफ्ट खेळणारी express 🚆.. स्वतःची गाडी असल्यावरच किंवा pmpml 🚌 ने येऊनच सिंहगड करता येतो, ह्या पलीकडे जाऊन, गेली ६ वर्षे नियमित सिंहगडला येणारे डी. बी. गायकवाड.. एका group सोबत गप्पा 🗣️ मारत, planned सिंहगडचं extension थेट unplanned SRT त करणाऱ्या ह्या काकांसाठी 'क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!' 👌👍🤘.. वय किती असावं? ६८..

आपल्या ४ वर्षांच्या doggy 🐕 Milo ला सोबत घेऊन येणारे STF (सह्याद्री trekkers foundation) चे co-lead मनीष मोता सांगतात - मी २००८ पासून येतोय आणि Milo ६ महिन्यांचा असल्यापासून येतोय.. त्याचेही जवळपास २५०-३०० trek झाले असतील 😮.. सिंहगडचा सूर्योदय / सिंहगडची पहाट स्वर्गीय 🤗 आहे.. इथल्या वातावरणाचा अनुभव म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटतं 🕺.. आणि आपण जसं-जसं मेट्याच्या वरती येतो, हा आनंद वाढत जातो.. सिंहगड चालू केल्यापासून माझं वजन १०८ हुन हळू-हळू ८८ वर आलंय 😊.. health विषयी पण खूप positive आहे सिंहगड.. बाकी trek बऱ्यापैकी सोपे जातात.. सिंहगडचा by product असा की आपल्या field मध्ये काम करायला double energy 💪 मिळते, कंटाळा येत नाही 😀.. पहाटे ३-३:३० ला उठून आपण इथे येतो, पण झोपेचं खोबरं 😪 करुन सुद्धा इथे जो आनंद 😍 भेटतो, तो झोपून 🛌 नाही भेटत.. सिंहगड tickmark ☑️ केल्यासारखं नाही आहे.. हे वातावरण, ही enjoyment शब्दात नाही सांगता येत, तो अनुभवायचाच ✌️ असतो..

२० वर्षांपासून येणारे आणि सेवानिवृत्त झालेले (early retirement घेतलेले) विवेक कानडे सांगतात.. ७५ पेक्षा सुद्धा जास्त
 वयाचे 👴👵 लोक इकडे येतात.. छान वाटतं इथे येऊन, औषधंं 🩺 💉 घ्यावी लागत नाही कुठली.. आठवड्यातून एकदा इकडे आलं की आठवडाभर काहीही खायला 🤤 मोकळं.. काही दिवसांपूर्वी इथे बिबट्या 🐆 दिसल्याची अफवा 📣 पसरवण्यात आली होती, त्यामुळे २-३ आठवडे गर्दी एकदम कमी झाली होती ज्याने इथल्या दुकानदारांचं नुकसान 😞 झालं होतं.. असा social media चा गैरवापर नाही केला / झाला पाहिजे 🔇..  शिवजयंतीला जे मशाली घेऊन फिरतात, दमल्यानंतर 😴 त्याच मशाली खांबाला लावून झोपतात
 🛌, ज्याच्यामुळे गेली सलग २-३ वर्षे ढाब्यांनी / झोपड्यांनी पेट 🔥 घेतला आहे.. आपली हौस म्हणून दुसऱ्याचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी 🧠 घेतली गेली पाहिजे..

सिद्धेशवर मेणकुदळे उर्फ सिद्धू - मागच्या वर्षी (२०२०) नवरात्री नंतर २ महिन्यात
 २७ दिवस येऊन १०० 💯 वेळेस सिंहगड trek करणारे युवक 🏃‍♂️.. schedule आणि efforts मधला फरक - हाच तो.. आणि तसंच ह्या वर्षी (२०२१) ३६ दिवसात १००.. इथे आले की ३-४ च्या खाली हे बात नसतात करत.. 🙇

पूर्ण देशभर आणि काही परदेशात सुद्धा ९० हजार कि.मी. cycling 🚴‍♂️ केलेले जुगल राठी (वय वर्षे ७३) म्हणतात, इथे टिळकांचं 
वास्तव्य 🏡 होतं.. त्यांचं म्हणणं होतं, 'स्वराज्य 🚩 माझा जन्मसिद्ध अधिकार आहे', आणि इथून आपण अजून एक महाराजांकडून / गडाकडून संदेश 📨 घेतोय, "आनंदाने 🎊 जगायचं, फिट 🧘‍♂️ राहायचं, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे".. आणि त्यासाठी cycling 🚴 असेल, running 🏃असेल, trekking 🧗 असेल, जमेल ते सगळ्यांनी नियमितपणे करायला पाहिजे - वय लक्षात न घेता, वयाचा काही संबंध नाही 🔞.. आपण स्वतःला जेवढ्या वयाचे समजतो 👼, तेवढ्या वयाचे होऊ शकतो.. परमेश्वराने दिलेली आपल्याला अद्भुत देणगी आहे.. त्यामुळे fit रहा, तंदुरुस्त रहा, आनंदी रहा.. ह्याच बरोबर पर्यावरणाचं 🌱 रक्षण करा.. काळजी अवश्य घ्या पण काळजी करु नका.. सिंहगडाकडून संदेश घ्या - स्वतःला आणि परिवाराला 👨‍👩‍👧‍👦 तंदुरुस्त बनवा.. 
ते काय-काय करतात, चला जाणून घेऊया 🎥..

जुगल राठी

सिंहगडला सर्वगुणसंपन्न 💝 म्हणणारे बाळासाहेब वाघचौरे (वय वर्षे ५८) गेली १४ वर्षे regular आहेत.. त्यांच्या शब्दात - सिंहगड सोयीचा आणि वेळेत होणारा ⌚, fitness 🤸 साठी एकच number 👍 आहे.. निसर्गाच्या सानिध्यात भरपूर आनंद भेटतो .. इथे तुमच्या-आमच्या सारखी माणसं 👥 भेटतात.. ही सिंहगडचीच दिलेली ओळख आहे आणि ह्याच्यामुळेच बरेच जण जोडले गेले.. इथून return आपण १० 🕙 पर्यंत आरामात घरी 🏘️ जातो आणि दिवस भरातले काम 👨‍💻 करायला कुठेही वेळ अपुरा पडत नाही..

१७ वर्षांपासून येणारे महेश जोशी (वय वर्षे ५८) सांगतात, इथे आलो की ३-४ दिवस freshness वाटतो.. इथे regular येण्यामागे - शांतता, व्यायाम, निसर्ग, sunrise अशी इतर कारणं आहेत..

आज वयाच्या ५६ व्या वर्षी, गेल्या २८ वर्षात साधारण १२८० वेळेस चढून आलेले, प्रकाश दंडनायक म्हणतात, counting 🎲 महत्वाचं नाहीये.. आपण किती वेळात चढ
तो ⏱️, हे पण महत्वाचं नाहीये.. इथे येणं महत्वाचं आहे 👌.. कसलाही त्रास नाही ३० वर्षांमध्ये, एकही गोळी 💊 घेतली नाही.. आलो की तानाजी मालुसरेंच्या समाधीला ⚰️ नमस्कार 🙏 करून पुढे देव टाक्याचं पाणी 💧 पिऊन खाली येतो.. इथे येऊन energy भेटते, patience आणि immunity वाढते.. लहान मुलांनी 🧒👧, teenagers नी चालू करावं.. कुठल्याही वेळेला आलं तरी आनंद ☺️ वाटतो.. फक्त आपल्या rhythm मध्ये हळू-हळू चढायचं, म्हणजे मला म्हणायचं हे की don't beat your beats 💓.. नशीब चांगलंय की २०-३० कि.मी. पुण्यापासुन हा गड आहे, लोकांनी ह्याचा फायदा 🉐 घेतला पाहिजे.. इथे आलेला माणूस कधी गर्विष्ठ वाटला नाही.. आता मी इतका वर आलोय, तरी बघा ह्या गडासमोर 🦕 मी किती लहान 🐇 आहे.. सगळे राग, लोभ, मत्सर हे निघून जातात.. निसर्गाचं सौन्दर्य प्रत्येक मिनिटाला बदलत जातं 🌄 🌤️ 🌧️, त्यामुळे सर (आबा महाजन) नेहमी सांगायचे की कुणासाठी थांबण्यात येणार नाही आणि म्हणूनच कोणावर अवलंबून 🚸 पण राहिलं नाही पाहिजे.. मी इतके वर्ष येतोय पण मी कधी म्हणटलं नाही की सिंहगड हा सोपा आहे.. आठवडाभर केलेले उद्योग तुम्हाला इथे प्रत्येक पावलाला मोजावे लागतात 😓..


एक वारकरी काका तर दर रविवारी येऊन "सिंहगड दहा हजाराचं recharge 💸 आहे" आणि "इतकं सोपं नाहीये, छातीत दम लागतो" च्या घोषणा देतात.. एक गृहस्थ 'ॐ नमः शिवाय' चा जप 📿 करत चालतात आणि खाली बसणाऱ्यांना न चुकता सांगत
 असतात "बसू नका, उभं राहून 🧍 विश्रांती घ्या".. नवरात्रीत सलग ९ दिवस सिंहगड trek करणारेही इथे भेटतील 👍.. 

'100% beast' - नाही, हे मी नाही म्हणत - त्यांनी तसा t-shirt घातला होता ☝️ एकदा.. पण मी हे नक्कीच म्हणालो होतो, 200% पाहिजे 👍👍.. 'का?' video बघा 👀 आणि ठरवा.. हे आहेत, २७ वर्षांपासून येणारे आणि ५०००+ सिंहगड trek करणारेे मोहन ओगले.. cheque वर double confirm 🖇️ करत जसं आपण शब्दात लिहितो - पाच हजार 😮.. ३६ all-out ला तुम्ही जसं केलं असेल, तसंच इथे पण refresh 🔁 करुन खात्री करु शकतात, तुम्ही काही चुकीचं नाही वाचत आहात..

मोहन ओगले

परतीला खडकवासला धरणात swimming करणारे, आपल्या प्रकुर्ती साठी गेली ११ वर्षे आठवड्यातून दोनदा येणारे ७४ वर्षीय मोकाशी काका असो
वा वाटेत भेटणाऱ्या सगळ्यांनाच श्री हरी / हरी ॐ 🕉️ चे अभिवादन करणारे असो.. वर येऊन दंड-बैठका काढणारे असो वा शंखनाद 🐚 करणारे असो.. सिंहगडला regular येणाऱ्यांबद्दल लिहावं 🗒️ तेव्हडं कमी आहे.. म्हणजे, हे फक्त tip of the iceberg आहे..

२०२० च्या पहिल्या 
सूर्योदयाला 🌄 parking मध्ये एक इसम ♂️ भेटले ज्यांच्या t-shirt 👕 वर 'Everest 🗻 Summitteer May-2019' लिहिलं printed होतं.. नाव होतं - राहुल - "नाम तो सूना होगा" DTPH 🎥 fame - राहुल इनामदार.. ह्यांची दुनियाच वेगळी.. इथे आले की ३-५-७ वेळेस सलग सिंहगड trek केल्याशिवाय मन भरत नाही.. कधी-कधी घाट 🛣️ रस्त्याने खाली येऊन परत तोच घाट चढणार आणि आतकरवाडीला उतरणार 〽️..

भरपूर नावं missing आहेत, पण आज साठी पुरे.. लिहितांना काही चूक-भूल झाली असेल तर माफी असावी.. 🙏

उर्वरित लोकांमध्ये (जे normal 😜 आहेत) फक्त sunrise 🌄 किंवा झुणका भाकरी 🍛 साठी थेट parking ला गाडीने
 🏍️ 🚘 येणाऱ्यांची category सगळ्यात प्रचलित 👒 🤳, ज्यांच्या quantity ला काही सीमा नाही.. वर उल्लेखित पण normalच आहेत, फक्त वेगळ्या categoryतले 😇..

अजून एक category खूप प्रचलित अप्रचलित आहे ती म्हणजे bluetooth speakers 🔊 वापरत, निसर्गाचा अनादर करीत, वातावरण 
दूषित करणाऱ्यांची.. त्यांना एकच विनंती - please ही सवय बदला / हौस कुठे दुसरीकडे पुरी करा 🙏..


आजपर्यंत ज्यांच्यासोबत सिंहगड trek ⛰️ केला आहे किंवा जे चढतांना-उतरतांना रस्त्यात भेटले आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे, as far and deep as my memory 💾 goes (alphabetical) 🔤.. आबा, आई, अभिजीत, अजय, अलोक, अमित, अमोल, अनिकेत, अनिरुद्ध, अनिश, अनुप, अर्चना, आशिष, अशोक, ओम, भाग्येश्री, ब्रिजेश, दीपा, देवेश, दुर्गा, Eike, गिरीश, हर्षद, जितेंद्र, किरण, लखन, महेश, मंदार, मनीष, मंजीत, मयुर, नकुल, नंदकुमार, नरेंद्र, निलेंद्र, नितीन, निशांक, पूजा, प्रज्ञारानी, प्रशांत, राहुल, राजेश, रामकृष्णन, सचिन, संपूर्ण, संजय, संतोष, सर्वेश, सवी, शिवेंद्र, शिवकुमार, श्रेयस, स्नेहल, सुजीत, सुयोग, तृप्ती, वैभव, वल्लभ, वसुधा, विजय, विकास, विनायक, योगेश.. तुमचं नाव नसेल तर कळवा, करतो update..

"सिंहगड नाही चढला जात" 😦 म्हणणारा हेश आता society पेक्षा सिंहगडला जास्त वेळ भेटतो 😜.. निलेंद्रचं नेहमी एक वाक्य ठरलेलं असतं, "थोडी देर और रुकते हैं ना" 🤗.. शिवकुमार म्हणतात, "तोंडाने श्वास घेतला तरी चालतो 🌬️, चढतांना आपल्याला जास्त oxygen ची गरज असते"..

बरं, मधु (short for मधुसू
धानन) आणि दुर्गा (हेच short आणि full) ही मुलांची नावं आहेत.. that's the 😘 beauty in diversity of Indian 🇮🇳 culture.. 'beauty of', 'diversity in' पाहिजे ना? मुद्दाम केलंय हो तसंं 😉..

सध्या pandemic 😷 मुळे बंद आहेत, पण आधी जेव्हा business travel 🛬 होत होते, तेव्हा client ला weekend ला कुठे घेऊन जायचं फिरायला 📸?.. तर पहिला पर्याय डोळ्यासमोर 👁️‍🗨️ यायचा, तो सिंहगड.. वर जे तुम्ही एक अनोळखी 🆕 नाव वाचलं, ते म्हणूनच.. जाऊ द्या अजून काही महिने, ही प्रथा होईल परत सुरु आणि दिसायला लागतील सिंहगडला काही विदेशी / परदेशी 🤵🏻.. 'परदेशी' आडनाव असणारे अलग बरं..

लोकप्रियता 👌 असावी तर सुप्रसिध्द संगीतकार 🎺🥁🎸🎻🎷 पंचमदा R D Burman सारखी.. त्यांच्या नावाने किती राहुल? 🥺.. मानकर, कोंडे, रामपुरा, पाटील, जगताप, सकलेचा.. ह्यांनी वर 👆 नमूद केलेला राहुल त्यांचाच समजावा.. खेडकरांसोबत पण गेलो आहे सिंहगडला, पण ते गाडीने 🏍️.. कोणी ७वा किंवा ८वा राहुल राहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.. वाचणाऱ्याला 📜 अर्थात ७वाच वाटणार, unless त्या ७व्याला माहिती असलेला ८वा पण missing 😼 असेल तर.. आणि similarly, जर तुमचं नाव आहे पण आपण सोबत सिंंहगड trek नाही केलाय, तर ते नाव दुसऱ्या कुटुंबातलं आहे, असं समजावं - जसं अमोल, अनुप.. btw, ह्या दोघांना मी आता बोलवून-बोलवून थकलो आहे 😐.. आम्ही ही इतर गावी जाऊन trek करतोच की.. बाकी मग वैभव जे "उत्साही" म्हणतो, ती list पण एवढीच मोठी असेल, कदाचित ह्याहून मोठी ♾️..

k2s च्या list मध्ये काही ह्यातलेच तर काही इतर नावं.. k म्हणजे कात्रज (नवीन बोगदा), कल्याण पेठ, खानापूर, खंडोबा टेकडी हून bonus 💰 ११ वेळेस सिंहगड.. bonus म्हणजे, हे आतकरवाडी हून
 सिंहगडच्या पायऱ्यांपर्यंत असलेल्या ~४७० मी. elevation gain वाल्या २९ trek मध्ये मोजलेले नाहीत.. ह्या ११ गिणतीतले साथीदार (alphabetical) 🔡.. आनंद, अधिकार, चेतन, दिपाली, गिरिजेश, गुंजन, कालिदास, ललित, निर्मल, निशा, पंकज, प्रणिता, प्रशांत, प्रतिभा, प्रीतम, रोहित, साक्षी, श्रद्धा, सोनिया, सुनील, सुनीता, तुषार, योजना.. वर नमूद केलेले repeat नाही केले, पण एखादं नाव असलंच repeat 🔁 तर ते दुसऱ्या कुटुंबातलं असेल..

या कधीतरी,
१. छाती कशी भरते? अनुभवायला..
२. आपण किती छोटे आहोत? हे जाणून घ्यायला..
३. energy, patience, immunity, stamina, oxygen साठी..
४. काही नाही तर, फक्त ह्या ५०+, ६०+, ७०+ young, younger, youngest generation ला भेटायला..

Eat. Sleep. सिंहगड*. Repeat.

30 comments:

  1. खूप सुंदर शब्द रचना

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिखाण आणि perfect वर्णन 🙏🙏

    ReplyDelete
  3. Good write up, bigger than michael clarke feat was feat of Mark taylor , he declared on 334 as a mark of respect for Sir Don Brahman as he holds record for highest australian score.

    ReplyDelete
  4. अप्रतिम आहे लिखाण आणि अनुभव सुद्धा .. मी सुध्दा अताच म्हणाजे २७/०३/२०२१ ला शनिवारी १० वेळेस सिंहगड पर्किग परिसतपासून ते पुणे दरवाजा असे लूप केले खूप छान वाटलं कधी स्वप्नातही नव्हत ठरवलं पण ६/०३/२०२१ का दोन वेळा केला मग लगेच ०३/०३/२०२१ ला तीन वेळा केला मग १३/०३/२०२१ ला चार वेळा केला नंतर मग २०/०३/२०२१ ला ०५ वेळा केला मग लगेच डोक्यात आले १० का नाही आणि मग ठरवलं आणि २७/०३/२०२१ ला १० वेळा केला माझा moving time १९ तास आहे सगळे लूप पार्किंग एरिया ते पुणे दरवाजा असे आहेत.
    धन्यवाद
    माझे नाव - रामेश्वर सीताराम गायकवाड
    वय - ३९ वर्ष
    राहणार - DSK विश्व धायरी
    व्हॉट्स ॲप मोबा. न. ९३७२२४७३०५

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏 आणि अभिनंदन 🎉

      Delete
  5. अप्रतिम लिखाण आणि perfect वर्णन.

    याच भावनेने गेली 20 वर्ष सिंहगड सलग चालू आहे, 1232 वेळा मोजला आहे त्याच्या अगोदर 10 वर्ष मोजला नाही.
    सिंहगड काय किंवा दुसरा कुठलाही किल्ला जो ऊर्जा देतो ती कुठलेही energy drink मध्ये असू शकत नाही.
    Lockdown च्या काळात may च्या 15 तारखे नंतर जेव्हा सगळे जग घरी होते त्या वेळेला आम्हाला सिंहगड हे motivation होते.
    रस्त्यावर भयाण शांतता होती पण सिंहगडावर आल्यावर, आपली नेहमी भेटणारी लोक भेटल्यावर जो आनंद आणि जी ऊर्जा मिळाली ती खूप पॉसिटीव्ह होती.

    पुणेकरांना सिंहगड हे एक वरदान आहे आणि सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा.

    ReplyDelete
    Replies
    1. completely agree..
      trekking ची मजा, ह्यात भेटणारी energy, satisfaction, इतरत्र नाहीच..
      lockdown मधला experience पण must होता.. घरी बसून-बसून आलेला कंटाळा, सिंहगड ने खूप सहज दूर केला.. ☺️

      Delete
  6. जबरदस्त सुशील....हा ब्लॉग नक्कीच माझ्या ब्लॉग पेक्षा मोठा झालाय...पण वाचून खूप motivation मिळाले. खरंच नाशिककर असून तू सिंहगड पासून सुरुवात केलीयेस आणि तुझी ट्रेकिंग मधली प्रगती वाखाणण्याजोगी आहे...कोरोना च्या काळात लोकांनी सिंहावलोकन करायची गरज आहे..जर फिटनेस बाबत काहीही शंका असेल तर pulse oximeter वरचे reading बघण्या पेक्षा सिंहगडकडे पहावे...तिथला सिंह नक्कीच प्रेरित करेल आणि या संकटात आपल्याला तरून नेईल.


    ReplyDelete
    Replies
    1. हो, पण बहुतेक इतकी मोठी post यापुढे नाही होणार.. बघू..
      Thank you for the appreciation.. 🙏☺️

      Delete
  7. Sushil mitra.Gre8 commitment I would like to come with you

    ReplyDelete
  8. इतके सर्व सविस्तर लिखाण करणेसुद्धा "सिंहगड"चढून गेल्यासारखेच आहे.

    ReplyDelete
  9. सुशिल चा 200 वा सिंहगड ट्रेक 24-02-2019 रोजी आम्ही (आई,आबा,ओम,आर्य)खास नाशिक हून जाऊन सोबत केलाय.खुप छान वाटले.
    नातवासोबत (सुमेध)परत जाण्याची इच्छा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. corona थोडा मंदावला की नक्की जाऊ ☺️

      Delete
  10. अप्रतिम लिखाण...
    कधीतरी भेटायला आवडेल असाच एखाद्या सिंहगड ट्रेक ला...

    ReplyDelete
  11. अप्रतिम लेख....

    ReplyDelete
  12. अस म्हणतात की गड मोजले की संपतात समजले की आभाळा एवढे दिसतात. लिखाण अप्रतिम आहे. अगदी 100 वेळा सिंहगड ट्रेक वेगेरे केला नाही पण बराच वेळा गेलोय गडावर पण हे वाचून घरबसल्या सिंहगड ट्रेक केल्या सारखं वाटलं. बाकी दादा तुम्ही भारी आहात तुमचं सह्याद्री वरच प्रेम अफाट आहे. तुमच्या 350 वा सिंहगड ट्रेक सोबत येता आल याचा आनंद आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. pleasure is all mine, जेव्हा तुम्ही सोबत येऊन milestones चा आनंद वाढवता आणि memorable बनवतात..
      धन्यवाद 🙏

      Delete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...